राजा माने यांना लोकमतमधून भावपूर्ण निरोप

लोकमत कर्मचाऱ्यांचे वेतन कपात सुरु 


औरंगाबाद - दैनिक लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांची स्वेच्छा निवृत्ती घेण्यात येवून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, त्यानंतर माने लोकमतच्या सर्व व्हाट्स अँप ग्रुप मधून लेफ्ट झाले आहेत. 

राजा माने यांनी लोकमत - इन  आऊट पाच वेळा केले असून २००७ पासून म्हणजे तेरा वर्षांपासून सलग कार्यरत होते. कोल्हापूर, सोलापूर येथे संपादक म्हणून काम केल्यानंतर त्यांची दीड वर्षांपूर्वी औरंगाबादला राजकीय संपादक म्हणून बदली करण्यात आली होती. गेल्या दीड वर्षात कोणतेही काम न देता त्यांची गोची करण्यात आली होती. अखेर निवृत्तीला एक वर्ष बाकी असताना,  स्वेच्छा निवृत्ती घेण्यात आली आणि काल  भावपूर्ण निरोप देण्यात आला. 

राजा माने यांच्या पत्रकारितेची सुरुवात लोकमतमधूनच झाली होती. सुरुवातीला परभणी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर नगरला बदली झाली होती. त्यानंतर त्यांनी लोकमतचा राजीनामा देऊन लोकपत्र जॉईन केले होते. नंतर एकमत, सुराज्य, पुढारी असा प्रवास करून गेल्या तेरा वर्षांपासून लोकमतशी एकनिष्ठ होते. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोकमत डाऊन झाला आहे. खप प्रचंड घसरला असून, जाहिरातीचा बिझिनेस घटला आहे. त्यामुळे दर्डानी काटकसर सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ३० टक्के कपात करण्यात आली आहे, ही कपात मार्च २०२१ पर्यंत राहणार आहे. तसेच  वेतन आयोग लागू असलेल्या ( कायमस्वरूपी कर्मचारी ) राज्यातील ३५० कर्मचाऱ्यांचे  राजीनामे घेण्यात आले असून त्यांना करार पद्धतीने घेण्यात आले आहे. 

एकीकडे दर्डा बंधू कर्मचाऱ्यांना आम्ही काढणार नाही, असे सांगत असले तरी कर्मचाऱ्यांचे वेतन कापणे,  वेतन आयोग लागू असलेल्या ( कायमस्वरूपी कर्मचारी ) कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने घेणे आदी चाली खेळत असल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. 

Post a Comment

1 Comments

  1. अनेक वृत्तपत्रांनी ४०% वेतन कपात केली आहे...
    काम करा नाहीतर घरी बसा, धमकीवजा आदेश...

    ReplyDelete