शैलेश पांडे यांची अवस्था, ना घरका - ना घाटका !



नागपूर - दैनिक सकाळचे  कार्यकारी संपादक शैलेश पांडे  हे लोकमतचे संपादक होणार, अशी हवा त्यांच्या पंटर मार्फत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर पसरविण्यात आली होती,पण  शैलेश पांडे यांची अवस्था, ना घरका - ना घाटका ! अशी झाली आहे. सकाळने पांडे यांना काही कारणामुळे नारळ दिला तर तिकडे लोकमतने अजून ग्रीन सिग्नल दाखवलेला नाही.

ज्येष्ठ साहित्यिक  सुरेश द्वादशीवार यांनी सहा महिन्यापूर्वी संपादक पदाचा राजीनामा दिला होता. ३१ जुलै रोजी निवासी संपादक जानभोर यांनीही लोकमतला बाय - बाय केले.लोकमतमध्ये या दोन्ही जागा रिक्त आहेत. या जागेसाठी लोकमतने प्रथमच २ ऑगस्ट रोजी जाहिरात दिली आहे. ही  जाहिरात निघाल्यापासून  शैलेश पांडे यांचे पंटर पांडे लोकमतचे संपादक होणार, अशी हवा सोशल मीडियावर पसरवली होती.

शैलेश पांडे यांच्याविषयी अनेक तक्रारी होत्या, त्यामुळे सकाळने त्यांना अचानक नारळ दिला आहे. पण त्यांचे पंटर , शैलेश पांडे लोकमतला जाणार असल्यामुळे सकाळचा राजीनामा दिलेला आहे, अशी हवा पसरवली होती, पण ही  हवा फुसकी निघाली आहे. लोकमतने शैलेश पांडे यांना अद्याप ग्रीन सिग्नल दाखवलेला नाही.

लोकमतच्या संपादक  पदासाठी दिल्ली प्रतिनिधी विकास झाडे, अकोल्याचे संपादक रवी टाले, मुंबईचे यदु जोशी  प्रयत्नशील आहेत. बाबूजी होम हाऊस  मधून संपादक घेणार की  बाहेरचा उमेदवार आयात करणार ? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र शैलेश पांडे यांची अवस्था, ना घरका - ना घाटका अशी झाली आहे. दरम्यान निवासी संपादक पदासाठी नागपुरातील आणखी एक  पांडे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पण बाबूजींनी दोन्ही चुलबुल पांडेची हवा सध्या तरी काढून घेतलेली आहे.

दरम्यान, सकाळने नागपूर आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी अकोला आवृत्तीचे संदीप भारंबे यांची नियुक्ती केली आहे. 

हेही वाचा 

मानबिंदूला कुणी संपादक मिळेल का संपादक ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या