पुणे - पुण्यातील टीव्ही ९ चा रिपोर्टर पांडुरंग रायकर ( वय ४२ ) यांचं कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाल्याने टीव्ही मीडियात काम करणाऱ्या रिपोर्टरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग रायकर यांची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर तो विश्रांतीसाठी गावी गेला. पुन्हा थोडी तब्येत बिघडली, तेव्हा स्वाब टेस्ट केली तर ती पोझिटिव्ह आल्यानंतरब कोपरगावच्या हॉस्पिटल मध्ये गेला, तिथे 40 हजार रुपये ऍडव्हान्स भरायला सांगितले. तेव्हा तिथे ऍडमिट न होता पुण्यात जम्बो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला. इथे प्रकृती खालावत गेली.
खासगी हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नव्हता. अखेर काल संध्याकाळी मंगेशकर मध्ये बेड उपलब्ध झाला. तिकडे शिफ्ट करण्यासाठी कार्डियाक अम्ब्युलन्स हवी होती , ती पहाटेपर्यंत मिळू शकली नाही, जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
पत्रकारितेचे केव्हढे दुर्दैव की, तीन तासानंतरही त्यांच्या निधनाची दखल कोणत्याही मीडियाने घेतली नाही. त्यांच्याच चॅनलने सुध्दा नाही. हीच मीडियात काम करणाऱ्यांची शोकांतिका आहे. झालंच तर स्क्रोल पट्टीत किंवा सिंगलच्या बातमीत संपेल त्यांची निधनवार्ता. आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणा आणि आपल्याच मीडियाचा दुर्लक्षपणा !
पांडुरंग रायकर यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.
पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करू - राजेश टोपे
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाबाबत बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, या घटनेत अॅब्युलन्स न मिळाले हे दुर्देवी आहे. याचं समर्थन नाही. अशा घटना घडू नये म्हणून आपण नियम बनवलेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी सगळ्यांना सांगितलं आहे की, ही सुविधा मोफत द्या. तरीही अशा घटना घडत आहेत जे दुर्देवी आहे. पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करू तसेच माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ, असंही टोपे म्हणाले.
हेही वाचा
पंढरीच्या पांडुरंगावर सॅनिटायझरचा अभिषेक ! पण हाडामासाच्या पांडुरंगाचे काय ?
पत्रकारीतेतला पांडुरंग हरपला...
2 टिप्पण्या
मृतांच्या टालुवरचे लोणी खाणारा आजचा मीडिया फक्त सुशांतच्या मृत्युची बातमी दाखवत राहणार कारण त्यामुळे त्यांचीTRP वाढते. मात्र स्वतःच्या वाहिनीचा पत्रकार कोरोना मुळे जातो, त्याचे त्यांना काहीच दुःख नाही😢
उत्तर द्याहटवामृतांच्या टालुवरचे लोणी खाणारा आजचा मीडिया फक्त सुशांतच्या मृत्युची बातमी दाखवत राहणार कारण त्यामुळे त्यांचीTRP वाढते. मात्र स्वतःच्या वाहिनीचा पत्रकार कोरोना मुळे जातो, त्याचे त्यांना काहीच दुःख नाही😢
उत्तर द्याहटवा