> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, २१ जून, २०१९

फेसबुक लाईव्ह करुन पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर - फेसबुक लाईव्ह करुन पंढरपुरातील एका पत्रकाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिराज उबाळे असं या पत्रकाराचं नाव आहे.एका न्यूज पोर्टलचा तो संपादक आहे. 

फेसबुक लाईव्हनंतर त्यांनी विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अभिराज यांनी फेसबुक लाईव्हमध्ये आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची व्यथा मांडली आहे. पंढरपुरातील नेते उमेश परिचारक, पंढरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह काही जण केल्या काही दिवसांपासून आपल्याला जीवे मारण्याची धमकी तसेच त्रास देत असल्याचा आरोप अभिराज यांनी केला आहे.

अभिराज उबाळे यांचं फेसबुक लाईव्ह-

बुधवार, १९ जून, २०१९

भोईटे यांचे एबीपी माझावर अखेर 'तुळशी'पत्र !

मुंबई - बेरक्याचे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. एका ठिकाणी स्थिर न राहणाऱ्या तुळशीदास भोईटे यांनी अखेर एबीपी माझावर 'तुळशी'पत्र   ठेवून  टीव्ही ९ मराठी  जॉईन केले आहे. वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून त्यांना घेण्यात आले असून इनपूट आणि आऊटपूट  समन्वयक (Cordinator) याची जबाबदारी देण्यात आली आहे.

तुळशीदास भोईटे हे एका ठिकाणी स्थिर न राहणारे व्यक्तिमत्व ! सहा महिन्यात युनिट बदलण्याची त्यांची  जुनी परंपरा आहे. ही  परंपरा त्यांनी एबीपी माझा  सोडताना कायम ठेवली आहे. एबीपी माझा, टीव्ही ९  पासून सुरु झालेला प्रवास दोन वर्तुळ पूर्ण करून पुन्हा एबीपी माझा ,  टीव्ही ९ असा सुरु झाला आहे.

टीव्ही ९ मराठी मध्ये अगोदरच  निखिला म्हात्रे, गजानन कदम, माणिक मुंडे, सुनील बोधनकर असे चार कार्यकारी संपादक आहेत.त्यात  तुळशीदास भोईटे यांची भर पडली आहे. संपादक पदाचा चार्ज रोहित विश्वकर्मा यांच्याकडे कायम आहे. जुने चारही कार्यकारी संपादक थेट संपादकास रिपोर्ट करणार आहेत. त्यामुळे भोईटेना काम करण्यास पुन्हा एकदा अडचण निर्माण होणार आहे. ते टीव्ही ९ मराठी मध्ये किती दिवस रमणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


भोईटेचे गोलाकार वर्तुळ

> टीव्ही ९ ( आता दुसरी वेळ )
> झी २४ तास ( दोन वेळा )
> एबीपी माझा ( दोन वेळा ) 
> जय महाराष्ट्र ( दोन वेळा )
> ईटीव्ही मराठी ( १ वेळा )
> आयबीएन ७ ( १ वेळा )
>   मी मराठी ( १ वेळा )
> लोकमत ऑनलाईन ( १ वेळा )
> जनशक्ती पेपर ( १ वेळा )

सात जणांना नारळ भेटणार
टीव्ही ९ मराठी मधून एकूण ७ जणांना नारळ देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पैकी चार जणांना अगोदरच राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. या सर्वावर अकार्यक्षमपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मंगळवार, ११ जून, २०१९

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप

जळगाव -समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि वृत्तपत्रात क्षेत्रात काम करणार्‍या पत्रकारांसह इतर घटकांच्या विकासासाठी महामंडळ स्थापन व्हावे या मागणीसाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बंद पडलेल्या पतसंस्थांसाठी आम्ही फेडरेशन उभा केले असुन त्यात विम्याची हमी दिली. याच धर्तीवर प्रसारमाध्यमांसाठीचे महामंडळ असावे अशी पुष्ठीही त्यांनी जोडली.

जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे 14 वे राज्य अधिवेशनाचा समारोप कांताई सभागृहात रविवार दि. 9 जून रोजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्‍वास आरोटे उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव पाटील  यांनी पत्रकार संघाच्या मागणीला आपला पाठिंबा असुन शासन दरबारी यावर प्रयत्न करू तसेच  पत्रकार संरक्षण कायद्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळावी यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली.

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय पत्रकार संघाचे पुरस्कार  वितरण
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात  राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण करण्यात आले असून या वर्षीचा पुरस्कार उत्कृष्ट कार्याचा प्रथम पुरस्कार ठाणे जिल्हा पत्रकार संघ भगवान चंदे, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मराठवाडा विभागातुन बिड जिल्हा पत्रकार संघ वैभव स्वामी, तृतीय क्रमांकाचा विर्दभ पुर्व महेश पानसे यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र गौरव पुरस्कार समाजभुषण प्रमोद अण्णा लबडे, उद्योजक सुरेश भागवत, डॉ भुषण मगर, आरोग्य, रविंद भादाले शिक्षण, डॉ स्वामी शिरकुल समाजभुषण या राज्यस्तरीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.
.


सोमवार, १० जून, २०१९

पत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कानोजिया यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले.
योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्र
करणी दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक करण्यात आली होती. तसेच नोएडातील एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी लखनौमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रशांत यांना ताब्यात घेतले होते. एका महिलेने योगींना लग्नाचा प्रस्ताव दिल्याबद्दलचा व्हिडिओ प्रशांत यांनी ट्विटर आणि फेसबुकवर अपलोड केला होता. याविरोधात त्यांची पत्नी सर्वोच्च न्यायालयात गेली होती.
सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणी सुनावणी करताना त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले. सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने अटक करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायलयाने कनोजिया यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, हा खटला सुरु राहणार असल्याचेही सांगितले आहे. कनोजिया यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर जे वक्तव्य केले ते चुकीचे होते. मात्र, त्यासाठी त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती असा सवाल न्यायलयाने केला आहे.

मंगळवार, ४ जून, २०१९

नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांचा खून

मुंबई - नेटवर्क १८ चे माजी मार्केटिंग अधिकारी आनंद नारायण यांच्या खून प्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकास पोलिसांनी अटक  केली आहे. सारंग पाथरकर असे या आरोपीचे नाव असून या  खून प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
आनंद नारायण यांचा खून हॉटेल व्यवसायातून झाला की प्रेम प्रकरणातून झाला ? याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. आरोपी सारंग पाथरकर याचे पुणे आणि मुंबईत हॉटेल असून, या हॉटेल मध्ये न्यूज १८ लोकमतच्या एका माजी संपादकाची पार्टनरशिप आहे. त्यामुळे या  संपादकाची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच  आरोपी सारंग पाथरकर याची पुण्यातील काही पत्रकाराबरोबर उठबस होती, त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे.


नंदीबैलाची पुन्हा हकालपट्टी !

पुणे - अवघ्या सहा महिन्याच्या आत पद्मश्रीच्या पेपरमधून नंदीबैलाची  पुन्हा एकदा हकालपट्टी  करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ३६ लाखाचा घपला केल्याचा सुगावा लागताच  पद्मश्रीनी  त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून लावले आहे.

उदय भविष्यपत्रातून हकालपट्टी झाल्यानंतर नंदीबैल पुन्हा पद्मश्रीच्या पाया पडत  आला होता. मात्र त्याच्या सुमार कामगिरीमुळे दैनिकाचा खप दिवसेंदिवस घसरत चालला होता, तसेच त्याच्या एकंदरीत कारभारावर अनेक कर्मचारी विरोधात गेले होते. त्यात ३६ लाख रुपयाचा घपला केल्याचे समजताच   पद्मश्रीनी अक्षरशः शिव्या घालत त्याची  पुन्हा एकदा हकालपट्टी केली आहे. विशेष म्हणजे पैसे 'पद्मश्रीं'च्या नावे खाल्ले आणि एका वार्ताहराला त्यात गोवण्याचा प्रयत्न केला होता.

नंदीबैलाचे 2-4 बगलबच्चेही अजून वेगवेगळ्या 'हफ्तेखोरी'त सामील असल्याचीही चर्चा असून आता या बाहेर शेखी मिरविणाऱ्या, 'कलेक्टर' चोरांचाही हिशेब चुकता केला जाण्याची शक्यता आहे .

फेसबुक वर शेअर करा

Facebook