> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१३

मराठी पत्रकारितेची मानसिकता सुधारणार कधी ?

मराठी पत्रकारितेची मानसिकता सुधारणार कधी असा सवाल आता माध्यमात उपस्थित होऊ लागला आहे. इतर भाषिक वर्तमानपत्रांची आक्रमणे मराठी भाषिक पत्रकारितेत होत असताना मराठीत मात्र पाय ओढण्याच्या स्पर्धेचा कळस झाला आहे. मराठी पत्रकारिता आता केवळ परंपरा सांगण्यासाठीच उरली आहे की काय, असे वाटू लागले आहे.
 अमुक पत्रकाराचे अमुक दैनिकात कसे वाईट चालले आहे, याचे चर्वण किती दिवस आता आमची पत्रकार मंडळी करणार आहेत, देव जाणो...अमुकचे कसे वाईट चालले आहे...अमुकला साहेबांनी कसे झापले...अमुकने कसा घोटाळा केला...अमुकची कशी जिरवली....असे अनेक विषय घेऊन आमचा मराठी पत्रकार चर्चा करण्यात अग्रेसर ठरू लागला आहे. परंतु मराठी किंवा इतर भाषेतील एखादे चांगले पुस्तक नुकतेच प्रसिध्द झाले आहे आणि ते आपण वाचले आहे, असे किती माई के लाल छातीठोकपणे सांगू शकतात, हे आता प्रत्येकाने स्वत:लाच विचारले पाहिजे. माझी भाषा सुधारली पाहिजे, माझ्या विचारांच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत, माझ्या लिखानाची शैली सुधारली पाहिजे, असे किती जणांना वाटते, याचाही विचार आता गांभीर्याने होने आवश्यक आहे...केवळ तोंडचाडगेपणा करून स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांची संख्याचा आता वाढू लागली आहे, आणि हेच नेमके मराठी पत्रकारितेच्या मुळावर उठले आहे. 
ज्या वर्तमानपत्रात काम करायचे त्याच वर्तमानपत्राच्या कार्यालयात बसून व्यवस्थापनाची बदनामी करायची आणि स्वत: सर्वज्ञानी असल्याच्या आव आणणाऱ्यांनी आपली‌ बौध्दिक क्षमता तपासून पाहणे आवश्यक आहे. माझ्याशिवाय वर्तमानपत्र चालत नाही, असा आव आणणाऱ्यांची संख्याही अलिकडे वाढू लागली आहे. चारओळी धडपणे लिहिता येत नसणाऱ्यांची वाचाळ बडबडही सुरू आहे. अशा परिस्थितीत मराठी पत्रकारितेला केवळ देवच वाचवू शकेल, असेच म्हणावे लागेल. कुणाचा खप किती आहे, कुणाच्या वर्तमानपत्रात भानगडी आहेत, अमुक कसा लफडेबाज आहे, याची चर्चा करण्यापेक्षा आता नव्याने येणाऱ्या पत्रकारांनी स्वत:ची मर्यादा ओळखली पाहिजे. ज्या वर्तमानपत्रात काम करीत आहोत, ते वर्तमानपत्र तरी कितीजण प्रामाणिकपणे वाचतात, याचाही शोध घेतला पाहिजे. मराठीत धड चार ओळी लिहिता येत नाहीत, असे तोंडचाडगे लोक जागा अडवून बसले आहेत. 
हुजरेगिरी करणे आणि बॅगा उचलण्याचे काम करीत तोंडाची वाफ दवडण्याचे काम करणाऱ्यांनी आता सावध झाले पाहिजे. काही काळ जरी त्यांना ढकलता आला तरी एक दिवस त्यांची अवस्था घर का ना घाट का अशी होणार आहे, यात शंका नाही. 
अमुक पत्रकार अमुक दैनिकातून अमुक दैनिकात जाणार, हा तर आमच्या तमाम बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. जसे काही आमची धनदौलत घेऊनच तो जात आहे, अशा अविर्भावात ही मंडळी बोलत असतात. एखाद्याला त्याच्या करीअरमध्ये मदत करणे, सहाय्य करणे, अशी सद्‌भावना निर्माण होण्याला आणखी किती काळ लागेल ठाऊक नाही, परंतु मराठी पत्रकारितेची मानसिकता बदलली नाही तर आज सुपात असणाऱ्यांनी त्यांचे जाते दूर नाही हे लक्षात ठेवायला हवे.
- लेखणीबहाद्दर

माध्यमांपेक्षा राजकारणी प्रामाणिक - पी. साईनाथ

निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पेङ न्यूजचा मामला चर्चेत येऊ लागला आहे. ही चर्चा दबक्या आवाजात होत असली तरी हळूहळू या चर्चेचा वेग वाढणार आहे आणि ऐन निवङणुकीच्या दरम्यान पुन्हा एकदा माध्यमांतील लेखणीबहाद्दरांना राजकारण्यांच्या दारात पेड न्यूजची भीक मागावी लागणार आहे. पेड न्यूजमुळे किती फायदा होतो आणि किती नाही, हे अलहिदा....परंतु किमान या पेड न्यूजच्या पॅकेजमुळे वाईट बातमी तरी वर्तमानपत्रात छापून येत नसल्याने नको ती कटकट म्हणून राजकारणी माध्यमांसमोर पेडन्यूजचा तुकडा टाकतात आणि लायकी नसणाऱ्या वर्तमानपत्रांचीही चांदी होते....यासंदर्भात हिंदू या दैनिकात नुकताच पी. साईनाथ यांनी एक लेख लिहिला असून यामध्ये माध्यमांपेक्षा राजकारणी प्रामाणिक असल्याचा कयास त्यांनी काढला आहे. राजकारणी लोक किमान पेड न्यूज दिली असल्याचे जाहीरपणे कबूल करीत असतात परंतु माध्यमे मात्र पेड न्यूज घेऊनही यासंदर्भात कानावर हात ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कुंभमेळ्यासाठी आकाशवाणीची खास प्रसारण सेवा

कुंभेमेळा हा तमाम भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रध्देचा विषय आहे. याचा आखोंदेखा हाल संपूर्ण दशवासियांना देण्यासाठी माध्यमांची चढाओढ लागली आहे. यात आकाशवाणीसारखे सरकारी माध्यमही आता मागे राहिलेले नाही. आकाशवाणीने यासाठी खास कुंभवाणी चॅनलची सुरूवात केली असून दिवसभरात 16 तास या चॅनलवरून प्रसारण करण्यात येणार आहे. 103.1 एफएम बॅंड वरून हे प्रसारण संपूर्ण देशभरात ऐकता येणार असून 25 फेब्रुवारीपर्यंत हे प्रसारण सुरू राहणार आहे. कुंभमेळ्यातील घडामोडींचे प्रसारण तर या चॅनलवरून करण्यात येणारच आहे, परंतु त्याचबरोबर वसंत पंचमी स्नान, आमवस्या पर्व आदींचे थेट प्रसारणही करण्यात येणार आहे. टीव्हीशी स्पर्धा करताना भलेही आकाशवाणीची दमछाक होत असली तरी या माध्यमाची विश्वासहर्तता आणि श्रोत्यांचा विश्वास यावर आजही आकाशवाणीची सेवा टिकून आहे.

बुधवार, ३० जानेवारी, २०१३

देशातील टॉप 10 न्यूजपेपर...

देश  के टाप देन सबसे बड़े पब्लिकेशन्स में अंग्रेजी का सिर्फ एक अखबार है. वह है टाइम्स आफ इंडिया. बाकी सारे अखबार हिंदी या क्षेत्रीय भाषाओं के हैं. इससे पता चलता है कि यह देश भले ही अंग्रेजीदां लोग चला रहे हों लेकिन देश की जनता को अपनी भाषा में पढ़ना, सुनना और समझना पसंद है. तब भी दुर्भाग्य देखिए की रीडरशिप सर्वे के आंकड़े अंग्रेजी में ही जारी किए जाते हैं. टाप टेन पब्लिकेशन्स में नंबर वन पर है दैनिक जागरण अखबार. दसवें नंबर पर है मातृभूमि अखबार. टाइम्स आफ इंडिया छठें नंबर पर है. आईआरएस 2012 क्वार्टर तीन यानि तीसरी तिमाही में इन टाप टेन अखबारों का पूरा हाल इस प्रकार है-

दैनिक जागरण नंबर एक
Among all the top 10 publications Dainik Jagran continues to be the No. 1 publication of the country, with an AIR of 1.65 crore an increase of 45,000 readers since Q2, 2013. The Hindi daily is also the second biggest gainer among the top 10 publications of the country.
दैनिक भास्कर नंबर दो
The No.2 position is also taken by a Hindi publication, Dainik Bhaskar, with an AIR of 1.45 crore - 1983 readers less than Dainik Jagran. The Hindi newspaper has also registered a growth of 43,000 AIR, making it the third biggest gainer in the list.
हिंदुस्तान नंबर तीन
At No. 3 is last quarter's biggest gainer, Hindustan, with an AIR of 1.2 crore. While the Hindi daily had registered an increase of 48,000 readers last quarter, this time it has added 37,000 AIR.
मलयाला मनोरमा नंबर चार
The Malayalam newspaper, Malayala Manorama, stands at No.4 spot with an AIR of 97 lakh, an increase of 42,000 readers since the last quarter. Incidentally, the daily had recorded the sharpest fall among the top 10 publications last quarter - a decrease of 165,000 readers.
अमर उजाला नंबर पांच
Amar Ujala is at No. 5, with an AIR 85 lakh - a fall of 72,000 readers this time. The daily had also registered de-growth of 85,000 readers last time.
टाइम्स आफ इंडिया नंबर छह
The Times of India takes the No. 6 position, with an AIR of 76 lakh this quarter. The English daily has maintained its position in the top 10 list. However, unlike last quarter, where it had registered a marginal decline of 9,000 readers, this time the publication has added 10,000 readers, putting it at no loss, no gain.
डेली थांती नंबर सात
The only Tamil daily to feature in the top 10 publications, Daily Thanthi takes up the No. 7 spot. The daily has an AIR of 74 lakh this quarter. Though the daily has lost readers in this quarter it has moved one rank up.
लोकमत नंबर आठ
Pushed down by Daily Thanthi , Lokmat, is at No. 8, with an AIR of 74 lakh - 14,000 readers more than Daily Thanthi. While the daily had recorded a growth of 22,000 in AIR, the Marathi publication is the biggest loser this time - a fall of 98,000 in AIR.
राजस्थान पत्रिका नंबर नौ
No. 9 position is taken up by Rajasthan Patrika with an AIR of 68 lakh. The Hindi publication is also the biggest gainer this quarter, a gain of 62,000 readers. However, last quarter the daily had lost 51,000 readers.
मातृभूमि नंबर द
Mathrubhumi is at No. 10 spot, with an AIR of 64 lakh, registering a decline of 78,000 readers this time. The daily continues its losing spree and is the second biggest loser in this quarter. The Malayalam publication had lost more than lakh readers last quarter.

मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

दै.व्हिजन वार्ताच्या नगर आवृत्तीचे शानदार प्रकाशन


रविवार, २० जानेवारी, २०१३

'सकाळ' नाशिक आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी श्रीमंत माने

पुणे - 'सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक श्रीमंत माने यांची पदोन्नतीवर "सकाळ'च्या नाशिक आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. माने गेली 20 वर्षे पत्रकारितेत आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीस दैनिक "लोकसत्ता'मधून प्रारंभ केला. "हिंदुस्थान टाइम्स'सह अन्य काही दैनिकांतही त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. जलसिंचन, पायाभूत सुविधा, राजकारण, कुपोषण, खार जमिनींचा प्रश्‍न हे माने यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.

'सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून काम पाहत असताना "सातपुडा बचाव अभियान', आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांचे प्रश्‍न, पर्यावरणावरील कार्यशाळा, खानदेशातील पायाभूत सुविधा, बेटी बचाव अभियान असे उपक्रम त्यांनी "सकाळ'च्या माध्यमातून सक्रियपणे राबविले. त्यांना यापूर्वी पत्रकारितेसाठी वसंतराव नाईक कृषिमित्र, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता आदी पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाच्या जलसंधारण सल्लागार परिषदेचे ते सदस्यही आहेत.
साभार - दैनिक सकाळ 

गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

पुणे - अप्रतिम मीडिया व ओम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अकादमीच्या वतीने देण्यात येणा-या चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरिय पुरस्कारासाठी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक तसेच नव माध्यमातील पत्रकार-छायाचित्रकारांना आपल्या प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी राजकारण, उद्योग-व्यापार, शिक्षण, आरोग्य, क्राईम रिर्पोटिंग, सहकार, पर्यावरण, कोर्ट, स्थानिक स्वराज्य संस्था या व इतर बिटमध्ये आपली गुणवत्ता सिद्धकरणा-या पत्रकार-छायाचित्रकारांचा चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरिय पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
अप्रतिम मीडिया ही मल्टि- फंक्शनल एजन्सी असून या एजन्सीने दैनिके, साप्ताहिके, मासिके तसेच न्यूज चॅनेल,रेडिओ,वेबसाईटस यामध्ये काम करणा-या पत्रकारांना चौथास्तंभच्या एका व्यासपीठावर सन्मानित करण्याची परंपरा गेल्या चार वर्षांपासून सुरु केली आहे.
यंदा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.संबंधित पत्रकारांनी जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१२ या दरम्यान प्रसिद्ध वा प्रसारित झालेले वृत्तांकन, विश्लेषण पुरस्कारासाठी प्रवेशिका म्हणून पाठवावे. आपली वैयक्तिक माहिती, फोटो तसेच प्रसिद्ध मजकूरांची कात्रणे, डिव्हिडी वरिष्ठांच्या स्वाक्षरीसह पाठवाव्यात. संबंधितांनी आपल्या प्रवेशिका मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९८२२३३७५८२
chauthastambh@gmail.com
 प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता -
अप्रतिम मीडिया, द्वारा-महाराष्ट्र मीडिया सव्र्हिसेस,एफ विंग, डिएसके चिंतामणी, फ्लॅट क्र.४, ५१२, शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौक, पुणे-३०

सोमवार, १४ जानेवारी, २०१३

नाशिकच्या 'गांवकरी'चे रंगरूप बदलणार ...


मंडळी विश्वास नाही ना बसत? 'गांवकरी' आणि प्रयोग हे समीकरण काही जुळत नाही. खरे तर एव्हढे विश्वार्साह दैनिक... अगदी आता-आतापर्यंत स्पर्धा वाढली नव्हती तोपर्यंत उत्तर महाराष्ट्र परिसरात लोक 'पेपर' म्हणायचे नाही. कोणत्याही 'पेपर'ला 'गांवकरी'  म्हणायचे. सकाळी स्टॉलवर गेलेल्या माणसाला सकाळ, लोकमत, देशदूत किंवा रामभूमी हवा असेल तरी तो म्हणायचा, 'गांवकरी' द्या! इतका तो सुवर्णकाळ होता. मराठीतील 'रिडर्स डायजेस्ट' असा लौकीक मिळविलेले 'अमृत' मासिक काढले जायचे. आपल्या आधीच्या दोन पिढ्यात अनेक प्रतिभावंत या मासिकाने घडविले. मराठवाड्यात दूरदृष्टीने 'अजिंठा' निघायचा. खूप काही लिहीता येईल 'गांवकरी'विषयी. वंदन पोतनीस नावाचा जबरदस्त प्रतिभाशाली माणूस अतिशय बचावात्मक रितीने कारभार हाताळतोय. वास्तविक त्यांच्याइतकी बातम्यांची समज, अफाट जनसंपर्क आणि माणसे जोडण्याची हातोटी कुणाजवळही नाही. मराठीतील एकही आघाडीच्या संपादकाला नसेल इतकी आर्थिक विषयाची त्यांची जाण उत्तम आहे. फक्त माणसांवर टाकलेला अतिविश्वास त्यांना आजवर नडला आहे. याशिवाय ज्या माणसांवर विश्वास टाकायचा त्यांच्यावर ते टाकत नाही! यावेळी मात्र त्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आणि योग्य माणसावर विश्वासही टाकलाय.

नवी मुंबई/ठाण्यात 'गांवकरी'चे रंगरूप बदलण्यात मोलाची भूमिका बजावणारे सुनील आढाव आता नाशिकला 'गांवकरी'त दाखल झाले आहेत. सुनील आढाव हे विक्रांत पाटील यांचे फाईंड! पाटलांसह आढावांनी नवी मुंबईत अनेक भन्नाट प्रयोग केले. बातमीची उत्तम जाण आणि आर्टिस्ट हाताळायची क्षमता असलेला संपादक मिळाला की अगदी छोट्या दैनिकाने केलेल्या प्रयोगांची दखल तमाम बड्यांनाही घेणे भाग पडते हे 'गांवकरी मुंबई'त दिसले तसेच नंतर अलिबागमध्ये 'कृषीवल'मध्येही दिसले. 'गांवकरी'तून आढाव कोकणात गेले आणि तिथे संजय आवटे यांना लॉंन्चिंगचा धमाका करता आला. आता पुन्हा आढाव स्वगृही परतत आहेत.

तुम्ही म्हणाल, एखादा आर्टिस्ट दैनिकाचे रुपडे खरेच बदलू शकतो का? दोन अत्यंत यशस्वी उदाहरणे आहेत. नाशकातही ती पुनरावृत्ती होईल, यात शंकाच नाही. फार वेळ वाट पाहायला लागणार नाही. 'बेरक्या'ला मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून 'गांवकरी'चे नाशिकमधील कामकाज इन डिझाईन, सीएस 6 मध्ये होणार आहे. आढाव यांनी जॉईन झाल्यापासून आठ जणांना तयार केले आहे. स्टाइलशीट तयार झालीय. आढाव तरुण असले तरी कल्पक आहेत.  इनडिझाईन, एडोबी आणि करोल मध्ये त्यांचा जबरदस्त हातखंडा आहे. त्यामुळेच आवटेंनी त्यांना 'कृषीवल'चे कला संपादकपद बहाल केले होते. पूर्वी 'महानगर'मध्ये  महाराष्ट्रातला एकमेव कला संपादक असण्याचा मान दिलीप पवार यांना होता. आढाव हे त्यातील दुसरे. 'महानगर'मध्ये वृत्तसंपादक म्हणून काम केलेल्या विक्रांत पाटलांनी त्याच अटीवर आढाव यांना नवी मुंबईतून अलिबागेत पाठविले होते, असे बोलले जाते.

आढाव यांनी तयार केलेला 'कृषीवल'चा दिवाळी अंक पाहिला की त्यांची सृजनशीलता, कल्पकता आणि क्षमता याची कल्पना येते. मोहोर, लाईव्ह रायगड, कलासक्त, मुक्ता, दुनिया, हेल्थ  असे भन्नाट लोगो या कलासक्ततेची साक्ष देतात. अर्थात हे सारे करताना मदतीला असलेला अमर मर्ढेकरही नाशकात असता तर सोने पे सुहागा झाले असते. एक माणूस नक्कीच सारं चित्र बदलू शकतो. हे बदललेले चित्र नाशिकमध्ये लवकरच पाहायला मिळेल. तेव्हा प्रतीक्षा करूयात तरुण, देखण्या, चकचकीत आणि मुबलक व्हाइट स्पेस असलेल्या गांवकरीची! आढाव यांनी निगुतीने केलेल्या सजावटीची!!
सुनील आढाव पूर्वी 'गांवकरी'त असले तरी तेव्हा त्यांना पूर्णत: हाताळलेय ते विक्रांत पाटील यांनीच. आता वंदन पोतनीस हेच त्यांना थेट हाताळणार आहेत. नाशिकची टकलेंची सुकन्या व अलिबागच्या शेकापवाल्या जयंत पाटलांच्या सूनबाई असलेल्या चित्रलेखा पाटील यांच्याकडील नोकरी सोडून आढाव आता नाशकात आलेत. त्यामुळे चित्रलेखाबाई नाही म्हटल्या तरी थोड्या नाराजच आहेत. मात्र, पोतनीस-टकले संबंध अतिशय स्नेहपूर्ण आहेत आणि  टकलेंना व चित्रलेखाताईंनाही बदललेला, पुन्हा बहरू पाहणारा गावकरी नक्कीच आवडेल; नव्हे दोघांनाही असा बदल होऊ शकतो, याची पूर्ण खात्रीच असणार!
बेरक्याच्या आढाव आणि वंदन पोतनीस यांनाही मन:पूर्वक शुभेच्छा... त्यांनी रिस्क घ्यावी, प्रयोग करावेत, पैसा ओतावा; पण हा उत्तर महराष्ट्रातील जिव्हाळ्याचा ब्रँड टिकवावा, अशीच अनेकांची मनोमन इच्छा आहे.

आढाव यांचे 'फ़ेसबुक'वरील स्वगत : समोरून येणार्‍या प्रचंड वादळांवर मात करून उत्तुंग ध्येयाकडे मार्गक्रमण करणे हा माझा स्वायीभाव. गरीबीवर विजय मिळवून श्रीमंतीचा पराभव करणे हे आमच्या रक्तातच आहे. उगीचच अकलेचे तारे तोडणार्‍या भ्रमिष्ट नि अहंकारी लोकांना त्यांची जागा दाखवून काही तरी सृजनात्मक घडवणे हे माझे उद्दिष्ट आहे.

शनिवार, १२ जानेवारी, २०१३

'नाशिक टाइम्स'चा फॉरमॅट बदलतोय; जळगाव उपआवृत्तीही लवकरच!

पुणे, नाशिकमधील यशाने जोशात आलेल्या बेनेट-कोलमन व्यवस्थापनाने आपला विस्ताराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा तेज केला आहे. एकीकडे 'डीबी कॉर्प'च्या गोटात पाच आवृत्त्यांनंतर सामसूम झालेली असताना 'मटा'चा वारू उधळला आहे. लवकरच 'नाशिक टाइम्स'चा फॉरमॅट बदलतोय. या फीचर बेस्ड पुरवणीतही आता न्यूज असतील. सध्या कोल्हापूर, नागपूरला तशी पुरवणी आहे. पुरवणीतील तीन पानं न्यूज आणि तीन पानं फिचर असतील. एकदा ही नव्या स्वरूपातील पुरवणी सेट झाली की मग जळगावची उपआवृत्ती काढण्याचा 'मटा' व्यवस्थापनाचा विचार आहे. नाशिकमध्ये बातम्या आणि बिझनेस या दोन्ही पातळीवर टार्गेट पार करून जबरदस्त कामगिरी झाल्याने संपादक अशोक पानवलकर यांच्यासह 'मटा' व्यवस्थापनही ब्युरो चीफ सचिन अहिरराव यांच्यावर खूष आहेत. 

आजच्या घडीला आपल्या लिखाणाने वाचकांना आकर्षित करण्याची ताकद असणारे मोजकेच पत्रकार उत्तर महाराष्ट्रात आहेत. त्यातील 'गांवकरी'चे कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरे यांची 'राजकारणा'वर जबरदस्त पकड आहे. मात्र, क्षमता असूनही ते नाशिकबाहेर डोकवायला तयार नाहीत. त्यांनी आपले वर्तुळ विस्तारण्याची गरज आहे. दुसरे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल ते सचिन अहिरराव यांचे. नाशिकमध्ये बसून ते ज्या ताकदीने जळगाव-धुळ्यातील विषय हाताळतात, त्याला तोड नाही. खानदेशातील स्थानिक संपादकांनाही कधी त्या ताकदीने लिहिता आले नाही किंवा त्यांच्या लेखणीत तो दमच नाही. नाही म्हणायला श्रीमंत माने यांनी खानदेश समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला. खानदेशात कुणालाही भिडण्याची ताकद असणारा 'सकाळ'च्या मुशीतील पत्रकार आहे, सुरेश उज्जैन्नवल; पण त्यांची फार नसबंदी केली गेलीय (म्हणजे लिखाणालाच बंदी!). हे मोजकी दोन-तीन नावे सोडली तर उत्तर महाराष्ट्रात चटकन एखादं ताकदीचं नावच समोर येत नाही. किरण अग्रवाल यांच्या सदराचे नाव तर 'सारांश' आहे पण त्यात साराच फाफटपसारा विस्ताराने असतो. बरे एव्हढे दम लागेस्तोवर वाचले तरी लेखकाला नेमके काय म्हणायचेय त्याचा 'किरण'च वाचकाच्या डोक्यात पडत नाही. हेमंतराव लिहितात भन्नाट; पण ते समजायला त्या ताकदीचं डोकं हवं. 'ऍग्रोवन'मध्ये असताना शैलेंद्र चव्हाण यांनी कृषी विषयांवर विपुल लिखाण केले. अनेक सरकारी त्यांचा सल्ला घेतात. मात्र 'आधुनिक किसान'मध्ये गेल्यापासून त्यांचे लिखाण काही कुणाला कळत नाही. याशिवाय 'देशदूत'मध्ये सुरेश अवधून पुन्हा परतले आहेत. कुणी काहीही म्हणो त्यांची 'भरारी' अनेकांना भावते. बहुतेक सारडांकडचे लग्नकार्य आटोपले की नंदकुमार टेणी यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. नाशकात ते गेले की जळगावात पाठविलेल्यांना पुन्हा नाशकात हलविले जाईल, अशी चिन्हे आहेत. कारण वर्धापनदिनी गाडी आली नाही म्हणून जे काही गैरहजेरी नाट्य घडलेय, ते काही जनकभाउना रुचलेले नाही. एकीकडे 'देशदूत'मध्ये संपादकांची गोची झाली असताना 'सकाळ'ला जळगावात संपादक मिळत नाहीये. 'बेरक्या'ला मिळालेल्या माहितीनुसार, 'सकाळ'कडे अवघे तीन अर्ज आले आहेत. त्यातील एक मुळच्या खानदेशातील व सध्या मराठवाड्यात काम करीत असलेल्या वृत्तसंपादकाचा आहे. दुसरा सारडांकडे अडगळीत पडलेल्या जुन्या 'सकालाईट'चा तर तिसरा संस्थेंतर्गत 'सरदारा'चा आहे. बघूया कोणाला लॉटरी लागते ते..

गुरुवार, १० जानेवारी, २०१३

पत्रकारांना संरक्षण कायद्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत - अजित पवार

मुंबई - आपल्या अखत्यारित येणाऱ्या विषयांवर आपण तडकाफडकी निर्णय घेतो . एखाद्या गोष्टीवर निर्णय प्रलंबित ठेवणे आपणास कदापि आवडत नाही . होणार असेल तर हो आणि नसेल तर नाही अशी काम करण्याची आपली पद्धत आहे , असे स्पष्ट करून राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी कायदा करण्याचा विषय हा राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांकडे आहे . त्यामुळे ते काय निर्णय घेतात ते बघू , असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले .

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे दिला जाणारा यंदाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख , पत्रकार एस . एम . देशमुख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला . त्याप्रसंगी ते बोलत होते . लोकांचा मोठा सहभाग असलेल्या आंदोलनाची दखल सरकार घेत असतात हे अलिकडच्या दिल्लीतील घटनेवरून दिसून आले . पण काही आंदोलनात सहभाग मोठा नसला तरी त्यातील सामाजिक आशय आणि लोकशाहीतील मुलभूत हक्कांबाबतची जाणीव लक्षात घेऊन त्याकडे लक्ष देणे राज्यकर्त्र्यांना आवश्यक असते , असेही पवार यांनी सांगितले .

बऱ्याचदा मंत्रिमंडळात न झालेल्या चर्चेच्या बातम्या छापून येत असतात . त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर काही मंत्री पुन्हा बसले होते का याची शंका यायला लागते असे मिश्कीलपणाने सांगत मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायला हवी असे आपणास व्यक्तीशः वाटते . त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळण्यास मदत होईल असे पवार म्हणाले .

यंदाचा दुष्काळ भयानक आहे . पावसाळा सुरू होण्याआधी प्रत्येक दिवस बिकट राहील . दुष्काळ निवारणाच्या कामात मिडीयाने सरकारला मदत करावी . सरकारचे काही चुकत असेल तर अवश्य टीका करावी . त्याचवेळी आगामी बजेटमध्ये दुष्काळ निवारणाच्या कामासाठी मोठी तरतूद असण्याचे संकेत त्यांनी दिले .


पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यात सरकार उदासिन असल्यानेच राज्यातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांत चितांजनक वाढ झाली असल्याचा स्पष्ट आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमु़ख एस.एम.देशमुख यांनी केला आहे.
देशमुख यांनी आपल्या भाषणात चळवळींचे मह्त्व अधोरेखित करीत महाराष्ट्रातील पत्रकारितेला चळवळींची मोठी परंपरा आहे मात्र अलिकडं चळवळींकडं सहानुभूतीनं पाहण्याऐवजी चळवळ मोडित काढ्‌ ण्याचाच प्रयत्न सरकारकडून होताना दिसतो.चळवळ मग ती शेतकऱ्यांची असो,भ्रष्टाचार विरोधातली असो नाही तर पत्रकारांची.फोडा आणि झोडा नीतीचा वापर करून ती मोडायची किंवा चळवळींची उपेक्षा करीत तिला लुळेपांगळे करायचे असंच धोरण सरकारचं राहिलेलं आहे.हे धोरण राज्याच्या मुळावर येणारं असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.
महाराष्टात पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत.त्याविरोधात 11 वेळा आम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटलो.प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही.नागपूर अधिवेशनाच्या वेळेसही मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा मसुदा कॅबिनेटसमोर मांडण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र नागपूर अधिवेशनानंतर क ॅबिनेटच्या पाच बैठका झाल्या पण मसुदा आणला गेला नाही.याचा अ र्थ सरकारला केवळ आश्वासनं देऊऩ वेळ मारून न्यावयाची आहे.राज्यातील पत्रकारांचा पेन्शनचा प्रश्न प्रलंबित आहे,आरोग्याचे प्रश्न आहेत,अधिस्वीकृतीचे,जाहिरातीचे प्रश्न आहेत मात्र या प्रश्नाकडं सरकारचे लक्ष नाही. इोकाशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.सरकारच्या या उदासिनतेच्या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आपले आंदोलन अधिक तीव्र केल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा देशमुख यांनी दिला.माझा सन्मान हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा आणि राज्यातील तमाम पत्रकारांचा सन्मान असून समितीच्या व्यासपीठावरून आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन सुरूच राहिल असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रकाश जोशी यांचेही भाषण झाले.मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी प्रस्ताविक केले.अनिकेत जोशी यांनी मानपत्र वाचन केले,तर कार्यवाह संजीव शेवडेकर यांनी आभार मानले.यावेळी पुरस्कार निवड समितीचे अनिकेत जोशी,आणि धमेंद्र जोरे यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या संचालक श्रध्दा बेलसरे,उपसंचालक शिवाजी मानकर,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार,किरण नाईक,अभय देशपांडे,विलास टोकले, प्रवीण पुरो,संतोष पवार,संतोष पेरणे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.

कल्‍पेश याज्ञनिक यांना 'भास्कर'चे समूह संपादक म्हणून बढती

दैनिक भास्कर समूहाचे राष्ट्रीय संपादक (नेशनल एडिटर)  कल्‍पेश याज्ञनिक यांना समूह संपादक (ग्रुप एडिटर) म्हणून बढती देण्यात आल्याची माहिती 'बेरक्या'कडे आली आहे. याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. श्रवण गर्ग 'नई दुनिया'मध्ये गेल्यापासून 'भास्कर'चे समूह संपादकपद रिक्त होते. व्यवस्थापनाने आता  याज्ञनिक यांनाच त्या पदी नियुक्त करण्याचे नक्की केले आहे.  याज्ञनिक ज्या मेहनतीने आणि जीव तोडून काम करीत आहेत, त्याचेच हे फळ मानले जात आहे. दुसरीकडे, उत्तर भारत प्रमुख म्हणून  पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील जबाबदारी सांभाळीत असलेले कमलेश सिंह यांनाही बढती देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यांना गेल्या आठवड्यातच भोपाळमध्ये बोलावून घेतले गेले होते.  याज्ञनिक यांच्या बढतीमुळे रिक्त होत असलेल्या जागी राष्ट्रीय संपादक म्हणून सिंह यांची वर्णी लागेल. 

भ्रष्टाचारामुळे संपादक, पत्रकार बडतर्फ

भ्रष्टाचारामुळे दैनिक भास्कर, रायगढ़ यूनिटचे एडिटोरियल हेड अजय तिवारी आणि  रिपोर्टर अखिलेश पुरोहित यांची नोकरीवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.  राष्ट्रीय संपादक कल्‍पेश याज्ञनिक यांनी हा निर्णय घेतला आहे. 'भास्कर'मध्ये भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, अशी सख्त सूचना देणारा ई-मेल ग्रुपमधील सर्व संपादकांना पाठविण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रीय संपादक कल्‍पेश याज्ञनिक यांचे इंग्रजीतील संस्थांतर्गत आवाहनपत्र दिल्ली/लखनौतील एका प्रमुख हिंदी मिडीया वेबसाइटवर जसेच्या तसे प्रसिद्ध झाल्याने भास्कर व्यवस्थापनाने याही प्रकाराची चौकशी सुरू केल्याचे भोपाळमधील  सूत्रांनी सांगितले.

मंगळवार, ८ जानेवारी, २०१३

कौशल्ये वाढवा, अन्यथा आत्मघात - अभिलाष खांडेकर

मुंबई - दूरचित्रवाणी, वेब आवृत्त्या आणि पर्यायी माहितींचे स्रोत निर्माण झाल्याने 2009 मध्ये युरोपातील अनेक वृत्तपत्रे बंद पडली. तशीच स्थिती मराठीतही येण्याची शक्यता आहे. त्यातच जिथे समृद्धी येत आहे तेथून मराठी हद्दपार होऊ लागली आहे. त्यामुळे या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी मराठी पत्रकारितेत मोठे बदल घडवून आणले पाहिजेत, अन्यथा या वृत्तपत्रांचे भविष्य खडतर असेल,असे मत दै. ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी येथे व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण सोमवारी खांडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते म्हणाले की, मराठीतील पत्रकारांनी बहुविध कौशल्ये आत्मसात करून स्वत:चा आवाका वाढवल्याशिवाय आजच्या पत्रकारितेत  त्यांचा टिकावच लागणार नाही,  
स्थलांतरास तसेच इतर भाषेत पत्रकारिता करण्यास मराठी पत्रकार नाखुश असतात. मराठी पत्रकारांनी स्वत:भोवती उभ्या केलेल्या संकुचित भिंती भविष्यात त्यांच्या नोकºया संपुष्टात आणू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाह विजयकुमार बांदल आणि संयुक्त कार्यवाह प्रभाकर राणे होते.
या कार्यक्रमात संध्या नरे-पवार (चित्रलेखा), योगेश त्रिवेदी (सामना), मुकुंद संगोराम (लोकसत्ता) आणि रमेश औताडे (पुण्यनगरी) या पत्रकारांना खांडेकर यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल पुरस्कार देण्यात आले. 

सोमवार, ७ जानेवारी, २०१३

दैनिक व्हिजन वार्ताच्या चार आवृत्त्या या महिन्यात सुरू होणार

कोल्हापूर - जेथे जाहिरातीचे काहीच उत्पन्न नाही,अशा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव येथे दैनिक व्हिजन वार्ताची आवृत्ती सुरू झाल्यामुळे व्हिजन वार्ता प्रशासनाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.त्यात एका ठिकाणी रक्कम अडकल्यामुळे डिसेंबर महिन्यात कर्मचा-यांच्या पगारी उशिरा झाल्या.सोलापूर आवृत्तीतील कर्मचा-यांच्या अजूनही पगारी झाल्या नाहीत.मात्र येत्या १० तारखेपर्यंत पगारी करण्याचे आश्वासन सरव्यवस्थापक एन.एस.पाटील यांनी दिले आहे.
दैनिक व्हिजन वार्ताचा आर्थिक प्रश्न आता सुटल्याने चालू जानेवारी महिन्यात नगर,कोल्हापूर,सांगली आणि सोलापूर आवृत्ती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाता - जाता : आम्ही कोणाचीही बाजू घेवून काही गोष्टी लपवत नाही. जो कोणी चुकत असेल,तर नक्कीच त्याविरूध्द आवाज उठवू.मात्र दैनिक व्हिजन वार्ताचा अजून नविन संसार आहे. काही गोष्टीमुळे समस्या निर्माण झाली आहे,मात्र लगेच वाईट म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी वेट अ‍ॅन्ड वॉच.

रविवार, ६ जानेवारी, २०१३

पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम 'बेरक्या'ने केले- एस.एम.देशमुख

अहमदनगर - पत्रकारितेत चालू असलेल्या अपप्रवृत्तीवर घाला घालण्याचे आणि पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम बेरक्याने केले, त्यामुळे 'बेरक्या' पत्रकारांचा ख-या अर्थाने 'पाठीराखा' ठरला आहे,असे गौरवोद्गार पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी येथे व्यक्त केले.
अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने रविवारी सायंकाळी दर्पण तथा मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस.एम.देशमुख बोलत होते.यावेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते, अर्थतज्ज्ञ मुकुंद घैसास,पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे,वात्रटिकाकार विलास फुटाणे,प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, पुर्वी पत्रकारितेतील घडामोडी कळण्याचे माध्यम नव्हते, मात्र बेरक्या ब्लॉगमुळे ते कळू लागल्या आहेत. पत्रकारांच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही पत्रकारांवर अन्याय झाला तर बेरक्या ठामपणे त्यांच्यापाठीमागे उभा राहतो. त्याने कधी कोणता पत्रकार आणि कोणता पेपर आहे,याचा विचार केलेला नाही.वृत्तपत्र व्यवस्थापनाविरूध्द अत्यंत निडरपणे त्यांनी बातम्या दिल्या.बेरक्यामुळेच पत्रकारितेतील अपप्रवृत्तीला आळा बसला आहे.
अनेकजण समजतात,मी बेरक्या आहे,मात्र बेरक्या मी नाही, बेरक्या कोण आहे,हे मला माहित नाही,मात्र माझ्या चळवळीला बळ देण्याचे काम बेरक्याने केले, बेरक्यामुळे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला ख-या अर्थाने व्यासपीठ मिळाले.
देशमुख आणखी म्हणाले की,महाराष्ट्रात पत्रकारांवर राजकीय नेते आणि पोलीस प्रशासनाकडून सातत्याने हल्ले होत आहेत.त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळावे, त्यासाठी कायदा व्हावा म्हणून आपण लढा सुरू केला आहे. हा लढा आता कायदा झाल्याशिवाय थांबणार नाही.राजकीय नेते कायदा होवू नये म्हणून प्रयत्नशील आहेत,तर शासन पत्रकारांच्या बाबतीत उदासिन असून, या सरकारला वठणीवर आणण्यासाठी पत्रकारांनी एकसंघ होण्याची गरज आहे, 
यासंदर्भात अधिक बातमी आजच्या देशदूतमध्ये वाचा...
देशदूत

‘बेरक्या’ वर उमटतात माध्यमाच्या अंतरंगातील ‘त्या’ बातम्या - डॉ.अनिल फळे

औरंगाबाद -  ‘माध्यम समूहाचा मुख्य संपादक आणि लहान दैनिकाचा मालक-संपादक या दोघांच्याही पत्रकारितेचे स्वातंत्र्य बाजारीकरणामुळे धोक्यात आले आहे’ , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ.अनिल फळे यांनी केले.
औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ व माहिती-जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त आयोजित एका परिसंवाद ते बोलत होते. ‘प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य व जबाबदारी’  या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
    डॉ.अनिल फळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे, राजेंद्र शहापूरकर, शिवनाथ राठी, जमिल कादरी यांनी आपली मते मांडली. पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी शंकर बावस्कर यांनी आयोजिलेल्या या कार्यक्रमाला पत्रकारांची उपस्थिती होती.
नव तंत्रज्ञानाचा लाभ घेत आपले विचार व स्थानिक प्रश्नांना न्याय देण्याचे काम सुनिल ढेपे यांच्या ‘उस्मानाबाद लाईव्ह डॉट कॉम’  यासारख्या संकेतस्थळावरुन केले जाते, मंदार फणसे यांनीही मुंबईत असे संकेतस्थळ सुरु केले आहे. तहलका डॉट कॉम ने यापूर्वी मोठे उदाहरण निर्माण केले आहे. यासारख्या प्रयोग लहान दैनिकांनीही करायला पाहिजेत, अशी भूमिका मांडली. दुसरीकडे स्पर्धेच्या युगात त्या त्या समस्यांना न्याय देण्याचे काम वार्ताहर-उपसंपादक नेमकेपणाने करीत आहेत, असेही डॉ.फळे यांनी सांगितले. या पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बिट जर्नालिझमसाठी म्हणून चौथास्तंभ हा राज्यस्तरिय विशेष पत्रकारिता पुरस्काराचा उपक्रम अप्रतिम मीडियाच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून राबविला जात आहे, याबद्दल त्यांनी माहिती दिली.
परिसंवादाच्या कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांची नगण्य उपस्थिती होती, याचा अनेकांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तो धागा पकडत डॉ. फळे यांनी कार्पोरेट जर्नालिझम करणा-या नामवंत पत्रकारांना त्यांची मालक मंडळी सार्वजनिक कार्यक्रमापासून ते विचार व्यक्त करण्यापर्यंत अनेक प्रकारची बंधने घालतात. तर दुस-या बाजूला छोट्या दैनिकांना आर्थिक संघर्ष करावा लागल्याने निर्भिड पत्रकारितेला मर्यादा येत चालल्या आहेत यावर भाष्य केले. या संबंधी माध्यम-जगातील अंतरंग दाखविणा-या बातम्या ‘बेरक्या’  ब्लॉगस्पॉटवर उमटत असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
 तत्पूर्वी, बाबा गाडे यांनी आचार्य बाळकृष्णशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या काळात मांडलेल्या सामाजिक समस्या आजही कायम आहेत. माध्यमांनी या समस्यांकडे तितक्याच प्रखरतेने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.

थोडक्यात महत्वाचे

औरंगाबाद - राहूल इंदोलीकर यांचा टाइम्स ग्रुपला टा-टा..लोकमतमध्ये डेप्युटी जनरल मँनेजर (जाहिरात)म्हणून जॉईन...कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांचे फोडाफोडाचे राजकारण सुरूच...इंदोलीकर यांची उद्योगपतीत ऊठबस चांगली, वक्तृत्व आणि इंग्रजी झकास...

* बेरक्याचा नविन वर्षे आणि मराठी पत्रकार दिनानिमित्त संकल्प...
बेरक्या ब्लॉगवर प्रसिध्द झालेल्या जाहिरातीचे 50 टक्के उत्पन्न गरीब पत्रकारांना अडचणीच्या वेळी म्हणजे (ऑपरेशन, अपघात, वैद्यकीय खर्च ) किंवा मयत पत्रकारांच्या पत्नीस देणार... 

* एकाने आमच्या FaceBook Wall वर कॉमेंन्टस् लिहिली की, बेरक्या नेमका कोण आहे आणि त्यांनी नाव जाहीर करावे.
आम्ही अनेक वेळा सुचित केले आहे की, बेरक्या हा कोणी एकटा नाही. अनेक जणांची ही टीम आहे. हे काम एकट्याचे नाही. जे चांगले पत्रकार आहेत, ते बेरक्या आहेत, त्यांच्या सहकार्यावर ही मोहीम चालू आहे.ज्यांना बेरक्याचा हेतू कळत नाही, त्यांना आम्ही नेहमी वाईटच दिसतो,त्यांनी आम्हाला अनफेन्डस् केले तरी आमची हरकत नाही,मात्र बेरक्या कोण आहे, हा प्रश्न पुन्हा - पुन्हा विचारू नये, ही विनंती.

मराठी वृत्तपत्रांना पत्रकार दिनाचे वावडे...

 काल रविवार दि. ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा झाला. काही बोटावर मोजण्याऐवढ्या वृत्तपत्रात या दिनाविषयी लेख होते. मात्र साखळी आणि बहुतांश वृत्तपत्रात यासंदर्भात ओळही नव्हती.
आपण इतर दिनाचे महत्व पान एक वर फोटोसह देतो, मात्र आपल्याच दिनाचे महत्व विषद करत नाही. महाराष्ट्र शासनाने दिलेली जाहीरात सोडली तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा फोटो नव्हता. अशा वृत्तपत्रांना मराठी पत्रकारितेविषयी वावडे का ?

- बेरक्या उर्फ नारद

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

येत्या दोन वर्षात वेब मीडियाचा उदय होणार - ढेपे

औरंगाबाद - प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर येत्या दोन वर्षात थर्ड मीडिया म्हणून वेब मीडिया उदयास येईल तसेच सन २०२० पर्यंत अनेक वृत्तपत्रे बंद पडून,त्याची जागा ई - पेपर्स आणि ऑनलाईन न्यूज पेपर्स घेतील,असे मत उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी येथे व्यक्त केले.
भूमिपुत्रांचा खरा मित्र म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण करणा-या दैनिक लोकपत्रच्या इंटरनेट न्यूज चॅनलचे उद्घाटन आणि औरंगाबाद गुड मॉर्निंग पुरवणीच्या प्रकाशन समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी लोकपत्रचे संस्थापक संपादक अंकुशराव कदम, कार्यकारी संपादक सुंदर लटपटे, सहाय्यक संपादक उमाकांत टिळक, बीड लाइव्हचे संपादक प्रा.गणेश पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.अजित बो-हाडे आदी उपस्थित होते
ढेपे म्हणाले की,सध्या पत्रकारितेत ज्या हालचाली सुरू आहेत, त्या प्रामुख्याने ऑनलाईन माध्यमांशी संबंधित आहेत.सध्या सर्वत्र डॉटकॉमचा बोलबोला सुरू सुरू झाला आहे.अमेरिकेतील प्रख्यात इंग्रजी साप्ताहिक न्यूजविकने सुध्दा ७९ वर्षानंतर आपली प्रिंट आवृत्ती बंद करून, इंटरनेट आवृत्ती सुरू केली आहे.
सध्या प्रिंट मीडियात गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. कागदाचे आणि मशिनचे वाढलेले भाव,मिळणारे एकंदरीत उत्पन्न यामुळे अनेक वृत्तपत्रे अडचणीत आले आहेत.जिल्हास्तरावरील अनेक दैनिके साखळी वृत्तपत्रामुळे बंद पडण्याचा मार्गावर आहेत.त्यांच्यापुढे एकच पर्याय आहे,तो म्हणजे ऑनलाईन न्यूज पेपर.
काळाची गरज ओळखूणच आपण दोन वर्षापुर्वी उस्मानाबादसारख्या मागास ठिकाणी उस्मानाबाद लाइव्ह नावाचे ऑनलाईन पेपर सुरू केला.ऑनलाईन न्यूज पेपर जगभरात कोठेही आणि केव्हाही वाचता येत असल्यामुळे त्याकडे दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे.
ऑनलाईन न्यूज पेपरमध्ये टेस्ट,ऑडिओ आणि व्हीडिओ याचा मिलाफ करता येतो, तसेच स्कोल,टेस्ट, ऑनिमिशन,ऑडिओ आणि व्हीडीओ जाहिराती टाकण्याची सुविधा असल्यामुळे जाहिरातदारांचा कलही ऑनलाईन न्यूजपेपरकडे वाढला आहे.
यावेळी ढेपे यांनी पत्रकारितेतील आपले अनुभव सांगून,  पत्रकारांनी काळाबरोबर आणि बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर चालण्याचे आवाहन केले.सुंदर लटपटे यांच्या नेतृत्वाखाली लोकपत्रने यावर्षी जबरदस्त गती पकडल्याचे सांगून इंटरनेट न्यूज चॅनल आणि पुरवणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ.अजित बो-हाडे, सुंदर लटपटे,प्रा.गणेश पोकळे, यांचीही समयोचित भाषणे झाली.अध्यक्षीय भाषणात अंकुशराव कदम यांनी, वृत्तपत्राचे लक्ष केवळ शहरी भागाकडे असून,खेड्याकडे नसल्याची खंत व्यक्त केली.मराठवाड्यात विशेषत: उस्मानाबाद, बीड,जालना जिल्ह्यात भयाण दुष्काळी परिस्थिती असून, त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली.उपेक्षितांच्या गरजा,समस्या लक्षात घेवून वृत्तपत्राचे धोरण असले पाहिजे.याच धोरणाचा स्वीकार करून,लोकपत्रची वाटचाल चालू आहे.कार्यकारी संपादक सुंदर लटपटे यांना  लिखणाची पुर्ण मुभा देण्यात आली आहे,त्यावर आमचा अंकुश राहणार नाही,असे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय विद्याथ्र्यांसाठी नववर्षानिमित्त घेण्यात आलेल्या घेण्यात घोषवाक्य स्पर्धेतील विजेतांना पारितोषिकाचे वितरणही करण्यात आले.प्रास्ताविक प्रादेशिक विभाग प्रमुख अजित तांबोळी यांनी केले.
दैनिक लोकपत्र

बुधवार, २ जानेवारी, २०१३

चॅनलचे पत्रकार होण्यासाठी लागतात 35 हजार रूपये

जळगाव - महाराष्ट्राच्या मानबिंदूध्ये दि.2 जानेवारी रोजी पान 7 वर एका न्यूज चॅनलची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. ही जाहिरात प्रसिध्द करणाऱ्यांची नावे आहेत,रूपेश ठाकूर आणि गणेश ठोंबरे ...ही जाहिरात वाचून काही नवख्या पत्रकारांनी त्यांना फोन केला असता, तालुका पत्रकार होण्यासाठी लागतात 35 हजार आणि जिल्हास्तरावरील एजन्सी घेण्यासाठी लागतात पाच लाख रूपये,असे रूपेश ठाकूर यांनी सांगितले.

जाता - जाता : रूपेश ठाकूर आणि गणेश ठोंबरे यांचे नाव औरंगाबादच्या मीडियात कोठेच चर्चेत नाहीत.आता ही जाहिरात खरी की खोटी याचा तुम्हीच शोध घ्या...

मंगळवार, १ जानेवारी, २०१३

मंत्रालयातील अनेक पत्रकार मौनीबाबा - राजीव खांडेकर

बीड - मंत्रालयातील अनेक पत्रकार मौनी बाबा आहेत. ते मंत्र्याच्या पत्रकार परिषदेला हजर राहतात, मात्र कधीच प्रश्न विचारत नाहीत. ऐवढेच नाही तर बातमी लिहिण्यासाठी कधीच पेन उचलत नाहीत.या पत्रकारांनी चांगल्या पत्रकारांची जागा अडवून ठेवली आहे, असे मत ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी येथे व्यक्त केले.
बीड येथील कै.वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात १ जानेवारी रोजी दुपारी खांडेकर यांचे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ग्रामीण पत्रकार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रमेश पोकळे, उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे, पत्रकार वसंत मुंडे, संतोष मानूरकर, महेश वाघमारे आदी उपस्थित होते.
जागतिकीकरणाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच पत्रकारिता क्षेत्रातही नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संधी अशाच राहतील, या भ्रमात न राहता या क्षेत्रात येऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांनी  नवीन तंत्रज्ञानाला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल. बदलाच्या लाटेवर स्वार व्हा, असे आवाहनही राजीव खांडेकर यांनी केले.

खांडेकर म्हणाले, दूरचित्रवाहिन्यांमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. १९८८-८९ पर्यंत केवळ दूरदर्शनवर जेवढे कार्यक्रम प्रसारित व्हायचे, आज त्यातील प्रत्येक कार्यक्रमांवर आधारित स्वतंत्र वाहिन्या आहेत, एवढं हे क्षेत्र विस्तारलं आहे. हे चित्र पुढील किती वर्षे राहील, याविषयी साशंकता आहे. अमेरिकेत वेबसाईटवरुनच चॅनेलवरील कार्यक्रम पाहातात. आठवडाभरातील मालिकांचे भाग एकत्र करुन सोईनुसार पाहातात, ते तंत्र भारतातही येत आहे. त्यामुळे टेलिव्हिजन कंपन्यांनी संशोधन कमी केलं आहे.

थ्रीजी मोबाइलवर बातम्या पाहू शकता. आगामी काळात फोरजी, फाइव्हजी तंत्रज्ञान येईल, तेव्हा टेलिव्हिजन, दैनिकांची मक्तेदारी संपुष्टात येत चाललेली दिसेल. जग जेवढं जवळ येत चाललं आहे, तेवढी माणसे संकुचित होत आहेत.

तेंव्हा बदल स्वीकारून नव्या परिस्थितीला तोंड देण्याचं कौशल्य आत्मसात करावं लागेल, असे खांडेकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील युवकांच्या गुणवत्तेवर माझा विश्वास आहे. खेड्यातून शहरात जाताना निर्माण होणार्‍या परिस्थितीपेक्षा पत्रकारितेत येताना मनापासून निष्ठेने काम करा. उद्दिष्ट गाठताना मोहाला बळी पडाल तर तिथेच गाडी घसरेलव गुणवत्ता असूनही सावरण अवघड होईल, असे त्यांनी सांगितले. चांगला पत्रकार होण्यासाठी स्वत:वर विश्वास आणि अंगात धाडस लागते, असे सांगून, खांडेकर म्हणाले की,एखाद्या नवख्या पत्रकारांने पत्रकारितेच्या क्षेत्रात एन्ट्री केली की,त्याला प्रस्थापित पत्रकार नामोहरण करण्याचा प्रयत्न करतात.मात्र या नवख्या पत्रकारांनी न्यूनगंड न बाळगता,आपले कर्तृत्व पणाला लावावे.
मुंबई - पुण्यापेक्षा कितीतरी चांगले पत्रकार  ग्रामीण भागात आहेत. खरे टॅलेंट ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारांतच आहे. जेव्हा ग्रामीण पत्रकार मुंबईत येतात,तेव्हा त्यांच्यात काहीतरी नविन करण्याची धमक असते.ते कितीही वेळ काम केले तरी थकत नाहीत,म्हणून ABP माझाने टीमची निवड करताना ग्रामीण पत्रकारांना अधिक संधी दिली व त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळाला.प्रत्येक रिपोर्टरने त्याच्या भाषेतच बोलावे,असा ABP माझाचा कटाक्ष आहे.जेणेकरून हे न्यूज चॅनेल आपले वाटेल.
२० वर्षापुर्वीची पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेत अमुलाग्र बदल झाला आहे, काळाच्या बदलाबरोबर पत्रकारांना त्यावर स्वार व्हावे लागेल अन्यथा ते मागे पडतील.येणारा काळ मोबाईल काळ राहणार आहे.ज्यांना न्यूजमध्ये इंटरेस्ट आहे, ते  हवा तो फोटो काढून अथवा एखाद्या घटनेचे व्हीडिओ शूटींग करून इंटरनेटवरील सोशल साईटस् फेसबुक, टयुटर,युटूबवर लोड करून,आपल्या चाहत्यांसाठी खुले करू शकतो,त्यामुळे आगामी काळात कोणत्याही इलेक्ट्रॉनिक अथवा प्रिंट मीडियातील कोणाचीही मक्तेदारी राहणार नाही.येणारा काळात वेवसाईटस् अधिक कार्यक्षम होतील,असेही ते म्हणाले.
बदनामीचा कलंक लागू देवू नका
अनेक चांगले पत्रकार कुठल्या तरी अमिषाला अथवा व्यभिचाराला बळी पडून, बाजूला फेकले गेले आहेत.हा अनुभव लक्षात घेवून पत्रकारांनी आपले चारित्र्य जपावे,असा मौलीक सल्लाही राजीव खांडेकर यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात रमेश पोकळे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बदलांना यशस्वीपणे तोंड द्यावे, यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे उपक्रम आयोजीत करण्यात येतात.अल्पावधीतच वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाने पत्रकारीता क्षेत्रात मराठवाडाभर वेगळा ठसा निर्माण केला असून या महाविद्यालयाचे जवळपास ११५ विद्यार्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दैनिकामध्ये, शासकीय कार्यालय, इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये करिअर करत असल्याचा अभिमान आम्हास आहे. पत्रकारिता महाविद्यालयात शासनाने अनुदान सुरू करावे,यासाठी राजीव खांडेकर यांनी आपली ताकद पणाला लावावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी केंद्र सरकारच्या नाट्यसमितीवर मराठवाड्याचे एकमेव सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ.सतिश साळुंके यांचा खांडेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार व्यंकटेश वैष्णव यांनी केले तर विद्यार्थी संसद सचिव गणेश सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साभार - बीड लाइव्ह 

फेसबुक वर शेअर करा

Facebook