> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २९ मे, २०१४

मुंबई ब्युरो चीफ उद्धव ढगे-पाटील यांचा 'देशदूत'ला रामराम!

'देशदूत'चे गेल्या अनेक वर्षांपासूनचे मुंबईतील ब्युरो चीफ उद्धव ढगे-पाटील यांनी नव्या संपादकीय व्यवस्थेच्या मनमानीला न जुमानता पदाचा राजीनामा देवून बाहेर पडणे पसंद केले आहे. यापूर्वी काही कामाचे नसल्याचा ठपका ठेवून ज्यांना नारळ दिला गेला होता त्याच एका जुन्या पत्रकाराला पुन्हा एक कोटींच्या बिझनेस टार्गेटच्या शर्थीवर "कामाचे" म्हणून घेण्यात आल्याचे समजते. टीडीआर, एफएसआय हीही कामे कदाचित अजेंड्यावर असू शकतील, असेही समजते. हे नवे पत्रकार महोदय अलीकडेच दोन वर्षे मुंबई विधीमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुकीत सपाटून आपटलेले आहेत.
विक्रम व जनक सारडा यांच्या उपस्थितीत उद्धव यांनी आज नाशकात राजीनामा नोटीस दिल्याची चर्चा आहे. खरेतर देशदूत व ढगे-पाटील हे अतूट असे समीकरण आहे; अन्यथा मुंबईत हा ब्रॅंड ओळखतोच कोण? नगरविकास मंत्रालयात त्यांचे जबरदस्त सोर्सेस आहेत. अर्थात मुंबईच्या मंत्रालयीन पत्रकारितेत अपवाद वगळता, ज्या काही दलालांच्या टोळ्या आहेत; त्यातील अनेकांशी फटकून वागल्याचाही ढगेंना फटका बसला आहे. आता मालकमंडळींनाही एकनिष्ठतेपेक्षा दलाल महत्त्वाचे वाटू लागलेहेत, हे दुर्दैव! तसे जर नसते तर बरखा प्रकरणात सर्व गृहमंत्रालय अंगावर ओढवून घेत "देशदूत"ला ज्याने ओळख, प्रसिद्धी, चेहरा मिळवून दिला; दैनिकाला चर्चेत आणले, त्या ढगे पाटलांना राजीनामा देण्याइतके वैतागण्याची वेळ नक्कीच आली नसती. "देशदूत"ची सर्वत्र अधोगतीच सुरू आहे. कमकुवत लोकांच्या आकर्षणापायी, त्यांच्या भुलथापांना बळी पडून एकाच संस्थेत आयुष्य खर्ची करणारयावर अन्याय म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी; दुसरे काय!

रविवार, २५ मे, २०१४

ऋषीबाबूंनी एका दगडात दोन पक्षी मारले

जळगाव- लोकमतच्या जळगाव आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन यांची औरंगाबादला बदली करून ऋषी दर्डांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
सुधीर महाजन हे गेल्या पाच वर्षापासून लोकमतच्या जळगावच्या आवृत्तीचे संपादक म्हणून काम करीत होते.त्यांच्या काळात मकरंद देशमुख,संदिप बिष्णोई,अमोल गुप्ते हे तीन जनरल मँनेजर बदलून गेले.सध्या प्रवीण चोपडा जनरल मँनेजर आहेत.
जळगावमध्ये लोकमतचा खप विविध कारणामुळे उतरला आहे.तसेच बिझनेस पण कमी झाला आहे.त्याचे खापर जनरल मँनेजरवर फोडण्यात आले होते.मात्र खरे कारण संपादकीय विभाग असल्याचा जावाईशोध आता लागला आहे.
महाजन यांच्याविरोधात अनेक कर्मचारी विरोधात गेले होते.त्यांच्याविरूध्द असंख्य तक्रारी होत्या.एक वर्षापुर्वी ऋषी दर्डांनी प्रत्येक कर्मचा-यांची फेस टू फेस भेट घेवून अडचण जाणून घेतली होती.त्यात सुधीर महाजन यांचा त्रास आणि जाच कारण समोर आले होते.त्यामुळे महाजन यांची औरंगाबादला बदली करण्याचे नक्की झाले होते.पण जळगावला दुसरा संपादक मिळत नव्हता.जळगावहून पुण्याला गेलेले विजय बाविस्कर परत जळगावला येण्यास इच्छुक होते,पण ऐनवेळी त्यांनी कट मारला,त्यामुळे दर्डांना जळगावसाठी संपादक पाहिजे अशी जाहिरात देण्याची पाळी आली.

महाजन यांची औरंगाबादला बदली करण्याची दोन कारणे सांगितली जात आहेत.
एक म्हणजे महाजन यांची औरंगाबादला बदली केल्यानंतर जळगावमधील असंतोष थांबेल आणि त्यांच्यावर दस्तुरखुद्द ऋषी दर्डा यांची नजर राहील ( कारण ऋषी दर्डा सर्वात जास्त काळ औरंगाबादला असतात )
दुसरे म्हणजे कार्यकारी संपादक चक्रधर दळवी यांचे पंख छाटता येतील.दळवी यांचे कर्मचार्यामध्ये  प्राब्लल्य आहे.दळवींच्या डोक्यावर महाजन यांना बसविल्यास त्यांचे प्रस्थ कमी होईल....दळवींना शह देण्यासाठीच महाजन यांना औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.

बरोबर आहे की नाही,ऋषी दर्डांनी एका दगडात दोन पक्षी मारले ?

जाता - जाता : जे जिल्हा प्रतिनिधी पाच वर्षापासून एकाच जागेवर ठाण मांडून आहेत,त्यांच्या येत्या जूनमध्ये बदल्या होणार आहेत.त्यात यवतमाळ,चंद्रपूर,सांगली ,धुळे परभणी,हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधींचा समावेश आहे.

 .............................
लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांची औरंगाबादला बदली झाल्यामुळे जळगावमधील कर्मचाऱ्यांत आनंद...अनेकांनी वाटले पेढे...काहींनी पार्टी दिली...

शुक्रवार, २३ मे, २०१४

जालना येथील पत्रकार विठ्ठलसिंग राजपूत यांची हत्त्या

जालना येथील साप्ताहिक विश्वप्रतापचे संपादक  विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूत ( वय 35) यांचा काल जुना जालना परिसरातील शनिमंदिर भागात निर्घृण खून करण्यात आला.रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडल्याचं जालना पोलिसानी सांगितलं..विठ्ठलसिंग राजपूत हे मुळचे मंठा तालुक्यातील तळणी येथील रहिवाशी होते.
मारेकरी रात्री  घरात घुसले आणि लाकूड,काठीने मारत सुटले.जीव वाचविण्यासाठी विठ्‌टलसिंह घरातून बाहेर धावत सुटले.पण मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.घराच्या बाहेरही त्यांना बेदम मारहाण केली गेली.अंतिमतः त्यांना खंजिराने भोसकण्यात आले.त्यात त्यांचे निधन झाले.गवळी मोहल्लयातील जनता हायस्कूल परिसरात त्यांचा मृतदेह पोलिसाना आढळून आला.या प्रकरणी रात्री उशिरा कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. आणखी दोघे फरार आहेत.आरोपीना आज न्यायालयात हजर केले असता आरोपी  सुनील रामेश्वर सोनार,अकबरखान युसूफखान,शेख अन्वर शेख बाबर,यांना न्यायालयाने 6 जून पर्यत पोलिस कोठडी दिली आहे.सर्व आरोपी 19 ते 21 वयोगटातील आहेत.हत्येचं नक्की कारण समजू शकले नाही.
महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला आहे.

गुरुवार, २२ मे, २०१४

'मजीठीया'साठी 'भास्कर'च्या कर्मचारयांची धरणे

'मजीठीया' वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मीलावे म्हणून दैनिक 'भास्कर'चे कर्मचारी धरणे आंदोलन करीत आहेत. काही कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. कर्मचारी वर्गातर्फे एमडी ला पत्रही देण्यात आले आहे. जुने कर्मचारी 'मजीठीया'नुसार वेतनाच्या मागणीवर अडून बसले तर कॉस्ट कटिंग करण्याच्या निर्णयाप्रत भास्कर प्रशासन आल्याचे समजते. तसे झाल्यास नव्या प्रोजेक्ट्सन त्याचा पहिला फटका बसेल. बिहारात तसेच महाराष्ट्रात 'दिव्य मराठी'मध्ये मध्यप्रदेश, राजस्थानपेक्षा अधिक वेतन दिल्याच्या असंतोष आधीच आहे. यानिमित्ताने काही कर्मचारी कपात व काहींचे वेतन कपात केली जाण्याची शक्यता आहे. सध्या अतिरिक्त कर्मचारी यादी बनविण्याचे काम 'दिव्य'चा एचआर विभाग करीत असल्याचे समजते. महाराष्ट्रातून पुरेसे उत्पन्न नाही व भरमासाठ खर्च त्यातच ब्रांड बदनाम झाल्याने भोपाल प्रशासन चांगलेच वैतागत असल्याची चर्चा आहे. 
 
राजस्थानात पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी कामगार मंत्रालयाला पत्र लिहून सर्व वर्तमानपत्रांची माहिती मागविली आहे. 
 
दरम्यान, मजीठीया वेतन हे करार, सीटीसी व सर्व कर्मचारी वर्गासाठी बंधनकारक केले गेले आहे.  
 
कोणालाही नव्या पद्धतीने वेतन मिळत नसेल तर ते त्या-त्या ठिकाणच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात खालीलप्रमाणे विहित नमुन्यात तक्रार करू शकतात. हा अर्ज मराठी, इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषातही स्वीकारला जाईल.

वेतन भुगतान अधिनियम की धारा 15/3 के अंतर्गत आवेदन पत्र का प्रारूप

                   न्यायालय प्राधिकारी वेतन भुगतान अधिनियम ………….. क्षेत्र,…….
                   प्रकरण संख्याः...................... /2014
……………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………….
                                                                                                                                …. प्रार्थी/कर्मचारी
                                                                     बनाम
…………………………………………………………………………………………………….
…………………………………………………………………………………………………….
                                                                                                                         …. प्रतिपक्षी/नियोजक
                 
                               प्रार्थना पत्र अन्तर्गत धारा 15/3 वेतन भुगतान अधिनियम, 1936
मान्यवर,
              प्रार्थी निम्न निवेदन करता है:-
1. यह कि प्रार्थी प्रतिपक्षी द्वारा नियोजित श्रमिक है, जिसका पता सूचना आदि प्रेषित करने हेतु ऊपर शीर्षक में अंकित है।
2. यह कि प्रतिपक्षी प्रार्थी के वेतन के भुगतान के लिए अधिनियम की धारा 3 के अन्तर्गत जिम्मेदार व्यक्ति है, जिसका पता सूचना आदि प्रेषित करने हेतु ऊपर शीर्षक में अंकित है।
3. यह कि प्रार्थी प्रतिपक्षी के यहाँ ………………………..के पद पर दिनांक ……………………….. से नियोजित था।  उस का वेतन …………………….. प्रतिमाह था।  प्रार्थी का दिनांक ……………. से दिनांक  …………………. तक का वेतन प्रतिपक्षी ने देरी कर के भुगतान नहीं किया है।
अथवा/तथा
प्रार्थी के दिनांक ……………………….. से दिनांक ………………………… तक के वेतन से रुपए  …….. ……………………………. की अवैधानिक कटौती कर ली गई है।
4. यह कि प्रार्थी को प्राप्त होने वाले लाभ का मूल्य रुपए ………………….. अक्षरे रुपए…………… ……………………………… मात्र है।
5. यह कि प्रार्थी प्रार्थना करता है कि अधिनियम की धारा 15 की उपधारा (3) के अन्तर्गत प्रतिपक्षी को आदेश हो कि वह:-
क. प्रार्थी को उसके भुगतान न किए गए एवं अवैधानिक रुप से काटे गए वेतन की अनुमानित धनराशि का भुगतान करे, तथा
ख. भुगतान न किए गए व अवैधानिक रुप से काटे गए वेतन की अनुमानित धनराशि से दस गुणा हर्जाने का भुगतान करे।
सत्यापन-
मैं घोषणा करता हूँ कि उक्त प्रार्थना पत्र में वर्णित समस्त तथ्य प्रार्थी के ज्ञान एवं विश्वास से सही एवं सत्य है।
                                           
हस्ताक्षर प्रार्थी
(प्रार्थी का नाम)……………………………………………………
(प्रार्थी का पता) ……………………………………………………
……………………………………………………..प्रार्थी/कर्मचारी
स्थान-………………
दिनांक- …………………….

 

कर नाही तर डर कशाला...

सध्या कोणी तरी खोडसाळपणे काही जणांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर एक मजकूर टाकला आहे.त्यात हा लबाड म्हणतो की,लवकरच पत्रकारांची एक टीम बेरक्या उर्फ नारदचा स्ट्रींग ऑपरेशन करणार आहे.त्यात काही चॅनलचे आणि वृत्तपत्राचे नाव घेण्यात आले आहे.
ज्याला स्ट्रींग ऑपरेशन करायचे आहे,तो सांगून करीत नाही आणि केले तरी बेरक्या उर्फ नारद कधीही तयार आहे.
त्यात हा लबाड म्हणतो,बेरक्या उर्फ नारदमुळे पत्रकारांची प्रतिमा खराब होत आहे.खराब माणसांची प्रतिमा खराब होत असते,चांगल्या माणसांची कधीच होत नसते.
बेरक्या अशा धमक्यांना कधीच घाबरत नाही आणि घाबरणार नाही.ज्यांच्या हिंमत आहे,त्यांनी जरूर आमच्यात डोकावून पहावे.कर नाही तर डर कशाला.
मित्रानो,कोणीतरी जाणीवपुर्वक हा मजकूर टाकला आहे.यावर विश्वास ठेवू नका.

असा मजकूर तयार करणा-यास बेरक्याचे आव्हान
असे लबाड धंदे बंद करा,नाही तर असलेली पत घालवून बसाल.बेरक्याकडे तुमची सगळी कुंडली तयार आहे.
असे लबाडाने ज्या चॅनलचे आणि वृत्तपत्राचे नाव दिले आहे,त्यांचा ऐकमेकांत ताळमेळ तर आहे का ?
तो म्हणतो,हा मेसस पुढे पाठवा...याचा अर्थ बेरक्याला कळेल असाच होतो.बेरक्याला का बुध्दू समजतो का ? तुझ्यासारखे किती तरी लबाड कोळून पेला आहे.
अरे लबाडा,असे धंदे बंद कर बाबा...स्वत: सुधार आणि मग आमच्या नादी लाग...
आम्ही काही तुझ्यासारखे हप्ते खात नाही,कोणच्या पोरीच्या मागे लागत नाही...तुझ्यासारखे राजकीय पुढा-यांचे बटीक बनत नाही...
आमचा आमच्यावर पुर्ण विश्वास आहे...आम्ही कोणाचे वाईट केलेले नाही...
बेरक्या हा कोणत्याच पत्रकारांच्या विरोधात नाही.वाईटांना मात्र सोडत नाही..
गेल्या तीन वर्षात असे किती तरी अनुभव आम्ही घेतलेले आहेत..
आमच्या नादी लागून असलेली इज्जत घालवून बसू नको...

जाता - जाता
असा मजकूर आपणास आल्यास संबंधितास जाब विचारा...कोण पाठवला म्हणून...मग शोध लागेल...आम्हाला ई - मेल करा किंवा चॅट बॉक्समध्ये माहिती पाठवा...

................................................


सुप्रीम कोर्ट ने कहा है कि स्टिंग ऑपरेशन करने वालों को आपराधिक कानून से मुक्ति नहीं दी जा सकती.
स्टिंग ऑपरेटरों की सहभागिता होने पर उसे फौजदारी कानून के दायरे में खींचना गैरकानूनी नहीं है. स्टिंग करने वालों को यह कहकर छूट नहीं दी जा सकती कि उनके द्वारा किया गया काम जनहित में था.

चीफ जस्टिस पी सदाशिवम की अध्यक्षता वाली बेंच ने कहा कि देश की सबसे बड़ी अदालत ने वकील आरके आनंद मामले में जनहित में किए गए स्टिंग ऑपरेशन को मंजूरी दी थी, लेकिन कानून प्रवर्तन के सभी मामलों के स्वीकार्य सिद्धांत के तौर पर इस तरह के तरीके को मंजूरी देने से जुड़े अनुपात को समझना मुश्किल है. बेंच ने कहा कि स्टिंग ऑपरेशन ने कुछ नैतिक सवाल खड़े किए हैं.

पीड़ित को अपराध करने के लिए लालच दिया जाता है और इसके साथ पूरी गोपनीयता का भरोसा दिया जाता है. इन परिस्थितियों में यह सवाल खड़ा होता है कि किसी पीड़ित को कैसे अपराध के लिए जिम्मेदार ठहराया जाए. अदालत ने कहा कि इस तरह के ऑपरेशन से एक और तथ्य सामने आता है कि किसी अपराध को साबित करने का तरीका खुद ही एक आपराधिक कृत्य होता है.

सुप्रीम कोर्ट ने कहा कि अमेरिका और कुछ अन्य देशों में स्टिंग आपरेशन को कानून प्रवर्तन का कानूनी तरीका माना गया है, लेकिन यह सीमित दायरे हैं और यह स्थिति भारत में नहीं है. अदालत ने उन दो आरोपियों की याचिका को खारिज करते हुए यह आदेश पारित किया जिन्होंने पूर्व केंद्रीय मंत्री दिलीप सिंह जूदेव का स्टिंग किया था और अवैध रूप से पैसे लेते पकड़ा था.
http://www.samaylive.com/nation-news-in-hindi/262483/those-criminal-law-enforcement-sting-operation.html


स्टिंग ऑपरेशन कानूनी तरीका नहीं: सुप्रीम कोर्ट

नई दिल्ली - सुप्रीम कोर्ट ने गुरुवार को कहा है कि स्टिंग ऑपरेशन कानून को लागू कराने का कानूनी तरीका नहीं है। कोर्ट ने लालच देकर किसी को फंसाने के इस तरीके पर सवाल उठाया है।

चीफ जस्टिस पी. सदाशिवम की अगुआई वाली बेंच ने कहा कि सुप्रीम कोर्ट ने आरके आनंद के मामले में जनहित में स्टिंग ऑपरेशन को अप्रूव किया था, लेकिन संबंधित केस में यह समझना मुश्किल है कि सभी मामलों में इसे कानून के पालन के तरीके के सिलसिले में कितना मंजूर करने लायक माना जाए।

बेंच ने कहा कि स्टिंग ऑपरेशन कुछ नीतिगत सवाल भी उठाते हैं। स्टिंग ऑपरेशन का पीड़ित शख्स एक तरह से बेकसूर होता है, उसे फुसलाकर अपराध करने के लिए उकसाया जाता है। इसमें गोपनीयता और का भरोसा दिलाया जाना भी अहम सवाल उठाता है, क्योंकि उसे उस अपराध में फंसाया जा रहा है जो उसने किया ही नहीं।
http://navbharattimes.indiatimes.com/india/national-india/sting-operation-not-a-legal-method-of-law-enforcement-sc/articleshow/34167968.cms

 

बुधवार, २१ मे, २०१४

दै.विवेकसिंधुचे संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ यांना आ.पृथ्वीराज साठे यांच्याकडून शिवीगाळ

अंबाजोगाई -  दै.विवेकसिंधूचे वृत्तसंपादक अभिजीत जगताप(गाठाळ) यांनी फेसबुकवर लोकसभेच्या निकालाचे विश्‍लेषण केले. या विश्‍लेषणाचा लिहिलेला लेख वाचून आ.पृथ्वीराज साठे अनावर झाले. या संदर्भात माझ्याविरोधात लेख का लिहिला या कारणावरून आ.साठे यांनी दै.विवेकसिंधुचे संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ यांना अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ व धमकी दिली. हा प्रकार रविवारी रात्री 8.00 ते 9.30 यावेळेत झाला. या घटनेची तक्रार प्रा.गाठाळ यांनी पोलिसात दिली आहे. या घटनेचा अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. मुंबई येथील पत्रकार हल्लानियंत्रण समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून या घटनेची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांना दिली आहे.
लोकसभेच्या मतमोजणीनंतर दै.विवेकसिंधुचे वृत्तसंपादक अभिजीत जगताप(गाठाळ) यांनी फेसबुकवर ‘‘भविष्याच्या धास्तीने आ.पृथ्वीराज साठेंनी अंथरून धरले’’या आशयाचा लेख लिहिला. हा लेख लिहिल्याच्या कारणावरून रविवारी रात्री 8.00 वा.आ.साठे या प्रकरणाची विचारणा करण्यासाठी प्रा.गाठाळ यांच्या घरी 8 ते 10 जणासोबत गेले. यावेळी प्रा.गाठाळ एका कार्यक्रमात असल्याने घराच्याबाहेर अर्वाच्च भाषेत ते गाठाळ कुटूंबियांना शिव्या देवू लागले. हा प्रकार गाठाळ कुटूंबियांच्या समोर सुरू होता. प्रा. गाठाळ घरी नसल्याचे पाहून आ.साठे व त्यांचे सहकारी दै.विवेकसिंधु शहर कार्यालयाकडे आले.तेथे प्रा.गाठाळ त्यांची भेट झाली. यावेळी आ.साठे यांनी प्रा.नानासाहेब गाठाळ यांना अपमानास्पद वागणूक दिली. शिवीगाळ करून तुम्ही दैनिक कसे चालवता, तुमचा मुलगा रस्त्यावरून कसा वागतो अशा धमक्या त्यांना दिल्या. व ते निघून गेले. या घटनेची तक्रार प्रा.नानासाहेब गाठाळ यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.
आ.पृथ्वीराज साठे यांचा पत्रकार संघाच्या वतीने निषेध
फेसबुक वर विरोधात लेख का लिहिला ? या कारणावरून आ. पृथ्वीराज साठे यांनी रविवारी रात्री दै. विवेकसिंधू चे संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ यांना अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ व धमकी दिली. या घटनेच्या अंबाजोगाई पत्रकार संघाच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
अंबाजोगाई पत्रकार संघाची बैठक सोमवारी सायंकाळी नगर परिषदेच्या सभागृहात झाली. या बैठकीत सर्वांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. पत्रकार संघाचे विश्‍वस्त जेष्ठ पत्रकार अमर हबीब, जेष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश लखेरा, उपाध्यक्ष हनुमंत पोखरकर उपस्थिती होते.
यावेळी बोलताना अमर हबीब म्हणाले की, सत्तेची मस्ती वाढल्याने लोकप्रतिनिधींना आपल्या विरोधात लिहलेले सहन होत नाही. आगामी काळात पत्रकारांकड बोट दाखविण्याची हिम्मत कोणी करणार नाही. यासाठी पत्रकारांची एकजुट महत्वाची असल्याचे ते म्हणाले. आ.साठे यांनी पत्रकार एकजूट महत्वाची असल्याचे ते म्हणाले. आ.साठे यांनी पत्रकार संघाची माफी मागावी अन्यथा पत्रकार संघ पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल. यावेळी झालेल्या प्रकाराची माहिती प्रा.नानासाहेब गाठाळ यांनी दिली. यावेळी सुदर्शन रापतवार,हनुमंत पोखरकर, दत्तात्रय अंबेकर, अविनाश मुडेगांवकर, अभिजीत गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केला. पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी यावेळी आ.साठे यांच्या तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
पत्रकार हल्ला नियंत्रण समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख घेणार गृहमंत्र्यांची भेट
अंबाजोगाई येथील दै. विवेक सिंधुचे संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ यांना आ. पृथ्वीराज साठे यांनी अपमानास्पद वागणुक देऊन शिवीगाळ व धमकी दिल्याची माहिती मुंबई येथील पत्रकार हल्ला नियंत्रण समितीचे नियंत्रक एस.एम. देशमुख यांना समजताच त्यांनी प्रा. गाठाळ यांच्याकडून घटनेची माहिती घेतली व या घटनेचा निषेध नोंदविला. सोमवारी सायंकाळी ते या घटनेची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांची भेट घेऊन देणार आहेत.

मंगळवार, १३ मे, २०१४

आण्णा हजारे यांची भीष्मप्रतिज्ञा ...मी यापुढे लोकमत वाचणार नाही....

आण्णा हजारे यांची भीष्मप्रतिज्ञा
मी यापुढे लोकमत वाचणार नाही....
लोकमत... लोकांचे नव्हे,मालकांचे मत झाले...
सुरेश जैन प्रकरणात लोकमतने बाजू घेतल्यामुळे आण्णा चिडले...
काय आहे,आण्णांचे पत्र ?


सोमवार, १२ मे, २०१४

संजय राऊतांचे पंख छाटणार; सुभाष देसाई व डाकेंना 'सामना'त लक्ष घालण्याचे आदेश


शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक व पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गुजराती समाजावर अग्रलेख लिहिल्यानंतर त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरु झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि लीलाधर डाके यांना 'सामना'च्या दैनंदिन कामात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देसाई आणि डाके यांनी सोमवारपासूनच सामनात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना सोडून गेलेल्या लोकांसमवेत राऊतांचे 'मधुर' संबंध असल्याचे बोलले जाते. शरद पवारांशी जवळीक व सेनेतील महत्त्वाच्या बातम्या 'लीक' होण्यामागे संजय राऊत असल्याचे उद्धव यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर गेल्या काही दिवसापासून संजय राऊत उद्धव यांच्या रडारवर होते असे सूत्रांनी माहिती दिली आहे.
1 मे रोजी ‘सामना’च्या अग्रलेखात गुजराती समाजाच्या ‘बेपारी’ वृत्तीवर टीका करण्यात आली होती. वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी हा अग्रलेख लिहिला होता. तसेच यातील मजकूराची माहिती उद्धव यांना दिली नव्हती. उद्धव त्यावेळी पत्नी रश्मीसह युरोपच्या दौ-यावर होते. मात्र, सामनातील या अग्रलेखानंतर मुंबईतील गुजरातींत अवस्था पसरली.
भाजपनेही उघड नाराजी व्यक्त केली. मुंबईतील मोदींच्या खास दूतामार्फत ही माहिती मोदीपर्यंत गेली. त्यानंतर मोदींनी सेनेशी चर्चा केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार्‍या गुजराती समाजाला दुखावल्यास विधानसभेला मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव सुभाष देसाई यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्षात आणून दिल्यानंतर उद्धव खडबडून जागे झाले व त्यांनी लागलीच युरोपमधून एक निवेदन प्रसिद्ध केले. तसेच पक्षाची ही अधिकृत भूमिका नसल्याचे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

रविवार, ११ मे, २०१४

जनशक्ति समूहाचे महापोर्टल देणार मंत्रालयाचे रिअलटाईम अपडेट!

पुण्यातील सिद्धिविनायक समूहाच्या अधिपत्याखालील जळगावच्या जनशक्ति समूहातर्फे लवकरच मंत्रालयाचे रिअलटाईम अपडेट देणारे महापोर्टल सुरु केले जाणार आहे. आजवरचा पत्रकारितेतील हा सर्वात भन्नाट प्रयोग असेल. पारंपरिक पत्रकारितेला नव्या टेकयुगाशी जोडणारे हे एक धाडसी पाऊल असेल. महाराष्ट्रात सध्या रिअलटाईम अपडेट देणारे 'मटा ऑनलाईन' हे एकमेव पोर्टल आहे. मात्र त्याचा सारा फोकस जनरल न्यूजवर आहे.

जनशक्ति समूहाचे मंत्रालय पोर्टल राज्य सरकारचे निर्णय, प्रशासनातील घडामोडी-हालचाली, जीआर आणि त्यांचे विश्लेषण, निर्णयांचे राजकारण व त्याचा समाजासाठी फायदा-तोटा; बदल्यांचे राजकारण, अधिकारी-मंत्री; तसेच कर्मचारी यांच्या मुलाखती; तज्ञांचे लेख असा विविधांगी परिपूर्ण मजकूर असेल. एका बाजूला बातम्या आणि घडामोडींचे डायनामिक, रिअलटाईम अपडेट देण्याबरोबरच जनसामान्यांना उपयुक्त अशा माहितीचाही पोर्टलवर समावेश असेल. महाराष्ट्राचा कारभार हाकणारे मंत्रालय आणि राज्यभराच्या प्रशासनातील सारे काही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा हा जबरदस्त महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आज बातमीबाबत काहीही हवे असेल तर
'मटा ऑनलाईन'चा पर्याय स्वीकारला जातो. यापुढे प्रशासन, राजकारण, मंत्रालय, शासननिर्णय यातील काहीही हवे असेल तर मंत्रालयाचे रिअलटाईम अपडेट देणारया   जनशक्ति समूहाच्या महापोर्टलचा पर्याय उपलब्ध असेल.

पोर्टलवरील कंटेंट हे Android App
वरही उपलब्ध असेल. हे App नेहमीपेक्षा वेगळे असेल. नवी माहिती अपडेट झाली कि स्मार्टफोनवर मेसेज किंवा व्हॉटस्अप वर ज्या पद्धतीने पॉपअप ब्लिंक किंवा सूचना मिळते तशी सूचना मिळेल. तुम्हाला न्यूज हंट अथवा इतर NewsApp प्रमाणे दरवेळी स्वत: लॉगइन करून अथवा App मध्ये शिरून पाहण्याची गरज भासणार नाही. आपोआप नवे कंटेंट अपलोड झाल्याची सूचना मिळेल. पोर्टल व App वरही मल्टीमीडिया कंटेंटची जोड राहील.

स्मार्ट व सोपा युझर इंटरफेस तसेच इंटरएक्टिव्ह असे हे पोर्टल असेल. पोर्टलची सारे काम, समन्वय, अपलोड व अपडेशन जळगावातून होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जळगावसारख्या ग्रामीण भागातून
'जळगाव लाईव्ह'सारख्या दर्जेदार व निरंतर अपडेट पोर्टलच्या संचालनाबद्दल ज्यांचा जाहीर गौरव केला होता ते शेखर पाटील (9226217770) यांच्या कल्पनेतून हे मंत्रालय पोर्टल साकारले जाणार आहे. त्यासाठी मुंबईत लोअर परळमध्ये कार्यालय व मंत्रालय ब्युरो कार्यान्वित करण्यात येणार आहे. 'महानगर'च्या सहायक संपादकपदाचा राजीनामा देवून ज्येष्ठ राजकीय पत्रकार नितीन सावंत (9892514124) या प्रोजेक्टचे मुंबईतील ब्युरोचीफ/समन्वयक म्हणून रुजू होत आहेत. या प्रोजेक्टसाठी काम करण्यास इच्छुक असणारे नवे व तरुण पत्रकार (पंचविशीच्या आतले) तसेच नुकतेच पत्रकारितेची पदवी/पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून कामाची तयारी असल्यास् पुढील ई-मेल आयडीवर वेतनाच्या अपेक्षेसह रिझ्युम पाठवावेत (सब्जेक्ट लाईन मध्ये Project Mantralaya असे जरूर नमूद करावे) -
TO : shekhar243@rediffmail.com
CC : kundan@janashakti.in, vikrant@vikrantpatil.com


सध्या इतरत्र काम करीत असलेले सीनिअर्सही या प्रोजेक्टमध्ये आपले पूर्वीचे काम सांभाळून सहभागी होवू इच्छित असतील तर त्यांनीही आपले अर्ज पाठविण्यास हरकत नाही. किमान स्वीकार्राह मानधनाचा उल्लेख जरूर करावा.

शनिवार, १० मे, २०१४

महाराष्ट्रनामा...

सातार्‍यातील प्रभावशुन्य आवृत्ती प्रमुखाबद्दल नाराजी...
सिमावर्ती भागातील एक आघाडीचे दै. असलेल्या सातारा आवृत्तीचा प्रभावशुन्य प्रमुख आपल्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचा थेट जातीवरुन उल्लेख करत असल्याने पत्रकार विश्‍वात नाराजी व्यक्त होत आहे.
त्याचा हा कारनामा थेट बेळगावस्थित मालकांपर्यंत पोहचल्याने त्याची लवकरच उचलबांगडी होण्याचे संकेत मिळाले आहेत. फक्त नावातच 'दिपक' उरलेल्या या प्रभावशुन्य घार्‍याला आता चांगलाच धडा मिळेल.
एकीकडे सातार्‍यातील सकाळ, लोकमत या दैनिकांच्या आवृत्त्यांमध्ये रोज नवे प्रयोग घडत असताना प्रभावशुन्य आपल्या आवृत्तीमध्ये कोणतेही नाविन्यपुर्ण प्रयोग करत नाही. यामुळे त्याच्या दैनिकाचा खपही घसरला आहे.


 मुंबई - नाहक गुजराती वाद उकरुन पक्षनेतृत्वाला अडचणीत आणल्यामुळे आता खासदार संपादकच अडचणीत 
नाशिक 'मटा'मध्ये धुसफूस सुरूच, रिपोर्टर विक्रम जोर्वेकर याचा पक्षपाती एप्रायझलविरोधात राजीनामा 
मुंबई - महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्रे इन्कम टॅक्स स्लॅबबाहेरील कर्मचारयांच्या वेतनातून टीडीएस कापताहेत, सरकारकडे मात्र जमा नाहीच
 मुंबई - महानगर'च्या मालकाने प्रशासनाला झापले, दोन लाखांपेक्षा कमी वार्षिक वेतन असलेल्यांच्या वेतनातून टीडीएस कापणे थांबविले 
मुंबई  'महानगर'च्या ऑपरेटर अमित गुडेकरचा राजीनामा, कार्यकारी संपादकासमोर वरिष्ठाची गच्ची धरून अमित म्हणाला, "बिनडोक XXX''

 नाशिक - मजीठिया आयोगानुसार वेतन न देणारी वृत्तपत्रे येणार अडचणीत, 'भास्कर'चे अनेक कर्मचारी जाणार सुप्रीम कोर्टात...

 अकोला - भोपाळशेठच्या पेपरमध्ये कॉस्ट कटींगचा धसका...पोस्टींगच्या तुलनेत जास्त पगार असलेल्या संपादकीय विभागातील रिपोर्टर आणि उपसंपादकांची गच्छंती अटळ अथवा स्थानांतरण...अमरावतीत बैठक घेवून वरिष्ष्ठांनी दिल्या सूचना..

मुंबई - विलास बडे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र...एबीपी माझाच्या वाटेवर..

मुंबई -  ग्लोबल टाईम्सच्या मालकाचा मुजोरपणा...कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार देत नाही.सोडून जाणाऱ्यांना तर बाबाजी का ठुल्लू दाखवितो.पगाराबाबत विचारणा केली तर कारणे सांगतो.पी.ए.मालकांना भेटू देत नाही...

बुधवार, ७ मे, २०१४

दैनिक "ऐक्‍य' व "सकाळ' कार्यालयावर हल्ला

फलटण - एका संघटनेच्या पाच ते सात स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी दैनिक "सकाळ' व दैनिक "ऐक्‍य' यांच्या येथील कार्यालयांवर आज दुपारी पावणेबाराच्या सुमारास हल्ला करून कार्यालयातील संगणक व दूरध्वनींची मोडतोड केली. खिडक्‍यांच्या काचाही फोडल्या. कार्यालयात उपस्थित असलेल्या बातमीदाराला गजाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या हल्ल्यात "सकाळ' कार्यालयाचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आज दुपारी 11 वा 50 मिनिटांनी हातात भगवा ध्वज घेतलेले एका संघटनेचे चार कार्यकर्ते प्रथम ऐक्‍य वृत्तपत्राच्या कार्यालयात गेले. तुम्ही आमच्या बातम्या छापत नाही, असे म्हणत त्यांनी तेथील कर्मचारी विनायक शिंदे यांना दमबाजी केली. तेथील एक संगणक लोखंडी गजाने फोडला. त्यानंतर कार्यालयातील काचेच्या तावदानांची तोडफोड करून कार्यालय प्रमुखांच्या केबिनमधील कागदपत्रे व अन्य बाबी फेकून दिल्या. त्यानंतर शिवीगाळ करून संशयित चौघांनी आपला मोर्चा "सकाळ' कार्यालयाकडे वळवला. त्या वेळी अन्य तिघे जण उभे होते. या सात जणांपैकी तिघे जण बाहेर थांबले होते. चौघांनी "सकाळ' कार्यालयात प्रवेश केला व आतून कडी लावली. "तुम्ही आमच्या बातम्या छापत नाही,' असे म्हणत खिडकीची तावदाने फोडली. दूरध्वनी संच आपटून फोडला. "सकाळ'चे बातमीदार संदीप कदम त्या वेळी संगणकावर काम करत होते. त्यांनी संबंधितांना "असे करू नका,' अशी विनंती केली. त्यावर हल्लेखोरांतील एकाने लोखंडी गज त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. कदम यांनी तो प्रहार चुकवला; मात्र गजाचा फटका बसल्याने संगणकाचा मॉनिटर फुटला. त्यांनी फॅक्‍स मशिनही तोडले. जाताना बाहेरून कडी लावून ते निघून गेले.

या घटनेची माहिती मिळताच शहरात दिवसभर तिचे पडसाद उमटले. अनेक सामाजिक कार्यकर्ते, नगराध्यक्ष, विविध पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही कार्यालयांना भेटी देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पोलिस उपअधीक्षक राहुल माकणीकर, पोलिस निरीक्षक संजय बाबर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन झालेल्या हल्ल्याचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी शहर पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर संबंधितांना ताब्यात घेण्याची यंत्रणा वेगाने फिरल्याने सायंकाळी सहा वाजेपर्यंत नवनाथ पाटील (वय 26), दीपक पिंजारे (22 दोघेही रा. आवे ता. पंढरपूर), तुकाराम शेंडगे (24, रा. जांबूल, ता. माळशिरस) व गणेश महाराज शिंदे (30, रा. पिंप्रद ता. फलटण) या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपअधीक्षक राहुल माकणीकर तपास करीत आहेत.

""सकाळ व ऐक्‍य कार्यालयांवर हल्ले करणाऱ्यांपैकी चौघांना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.''
- अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक


फेसबुक वर शेअर करा

Facebook