> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, ३० जून, २०१५

वागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे...

आयबीएन - लोकमतची मुहुर्तमेढ रोवण्यात निखिल वागळे यांचा सिंहाचा वाटा आहे,हे कोणी नाकारू शकत नाही.आयबीएन - लोकमत म्हणजे निखिल वागळे आणि निखिल वागळे म्हणजे आयबीएन - लोकमत हे जणू समीकरण झाले होते.
मात्र वर्षभरापुर्वी निखिल वागळे यांना आयबीएन - लोकमतमधून राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची जागा मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांनी घेतली.
मात्र मंदार फणसे आणि महेश म्हात्रे चॅनलमध्ये आल्याचे अनेकांना रूचत नव्हते आणि पचनीही पडत नव्हते...
आयबीएन - लोकमतच्या सर्व गुप्त गोष्टी निखिल वागळे यांना सांगण्याचे पाप काही पापभिरू कर्मचारी करत होते.एव्हडेच काय रात्रीच्या डिबेटला एखांद्या गेस्टला दुसरीकडे जाण्याचे महापापही काहीजण करत होते.त्यात वागळे यांचा पंटर आशिष दिवाना करत होता.
आयबीएन - लोकमतच्या संस्थेचा पगार घेवून आणि केवळ संस्थेमुळे मोठे झालेले पापभिरू संस्थेची हानी करत होते.संस्थेची बित्तंमबातमी वागळेंना पोहचवण्यात या पापभिरूंचा हातभार होता.वागळे यांना व्देष आणि इर्षेपोटी केवळ आयबीएन - लोकमत डॅमेज करायचे आहे.परंतु त्यांच्या गळाला आतापर्यंत फक्त तिघेजण लागले आहेत,एक आशिष जाधव,दुसरा विनायक गायकवाड आणि तिसरा गणेश मोरे.संस्थेने वारंवार सूचना देवूनही त्यांच्यात काही फरक पडत नव्हता आणि अखेर वागळेजी तुम्ही पोसा आता म्हणत फणसे आणि म्हात्रे यांनी या तिघांचे राजीनामे घेतले आहेत.
वास्तविक वागळे यांच्या चॅनलची अजूनही कसलीच बांधणी नाही.फक्त चॅनल काढणार आहेत,एव्हडीच काय ती हवा.
चॅनलसाठी प्रथम केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते.ती मान्यता नाही.किमान ५० कोटी रूपये लागतात,ते बजेट अजून उपलब्ध नाही.स्टुडिओचं सोडा साधे ऑफीस सुध्दा नाही.कुठल्या तरी हॉटेलमध्ये चर्चा करून चॅनल सुरू होत नाही.
माणसे भरती करण्याची प्रक्रिया शेवटची आहे.पहिल्यांदा नाव आणि स्टुडिओ तर उभा करा...उगी चॅनल सुरू करणार आहे,तुम्ही या म्हणून माणसे फोडण्याचे काम सध्या सुरू आहे.त्याला वागळेंचे दिवाने झालेले काही आशिष बळी पडत आहेत...हे तर उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असे झाले...
असो,बेरक्याच्या हातात निखिल वागळे यांना आयबीएन -लोकमतची बित्तंमबातमी देत असताना,काही फोटो सापडले आहेत.आता कोण आहेत,हे पापभिरू हे तुम्हीच ओळखा... 

........
आपल्याला 6 महिन्यात खुप त्रास झाला ,अस IBN लोकमतचे आशिष दिवाने यांनी आपल्या "राजी"नामा पत्रात म्हटलय . मात्र मागील वर्षभरात विविध चैनल्सच्या मालकांपुढे गोंडा घोळत चपला झिजविन्याचा त्रास आशिष दिवानेना का झाला नाही? 
त्रास होत असल्याने आपण राजीनामा देऊन आपल्यातला सृजनशील पत्रकार जीवंत ठेवल्याची मल्लिनाथी मिरवणाऱ्या आशिष दिवानेच्या फुग्यातील हवा महिन्याभरापूर्वीच काढली गेली होती 
अनेक मंत्र्यांची हाजी हाजी आणि नको तिथे नाक खुपसण्याचा आवडता छंद जोपासणारा आशिष दिवाने कामाकडे लक्ष देत नसल्याचा लक्षात आल्यामुळे संपादकांनी ( थेट काढता येत नसल्यामुळे ) दिल्लीला जाण्यासाठीची ऑफर दिली होती . त्या नंतर ही जाधवगिरी थांबत नसल्याने अखेर काल संपादकांनी पगारवाढ नाकारली आणि ही बाब बाहेर येण्याआधी आशिष दिवानेनी राजीनामा देऊन चॅनलमधून काढता पाय घेतला.
स्वतःला प्रामाणिक म्हणणार्या आशिष दिवानेला चिक्की प्रकरणाची पहिली बातमी मिळाली होती.मात्र स्वतःला फार हुशार समजणाऱ्या या महाभागाने ती बातमी एका नवख्या महिला सहकार्याला सांगितली आणि स्वत:वरची जबाबदारी झटकली ,हां जर एवढा अनुभवी पत्रकार होता तर अशी मोठी बातमी संपादकाला कळवायची असते हे ही याला कळल नसेल का ?
पण चिक्कीला यालाही चिपकायच होत म्हणून हां चिपकू सगळ करून नामानिरळा राहिला..
अश्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला,हे योग्यच झाले...

आशिष जाधव यांचा आयबीएन- लोकमतला अखेरचा रामराम....

> लवकरच नविन इनिंग सुरू करणार असल्याचे जाधव यांचे सुतोवाच...
> जाधव यांची Whats App वर फिरणारी पोस्ट
..............................................................
मित्रांनो, 
आज अखेर मी आयबीएन-लोकमतचा राजीनामा दिला. गेल्या सात-साडेसात वर्षांमध्ये माझं आणि आयबीएन-लोकमतचं घट्ट नातं अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवलं. लोकसत्तासारख्या अग्रगण्य वर्तमानपत्रात स्थिरावल्यानंतर नवख्या इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये रिपोर्टिंग करण्याचा निर्णय सोपा नव्हता. बाईट जर्नलिझमच्या पलिकडे जाऊन इलेक्ट्रॉनिकचं रिपोर्टिंग व्हायलाच हवं, हे आधीपासूनंच मनात होतं. त्यामुळंच संपादक निखिल वागळेंच्या मार्गदर्शनाखाली माझ्यातल्या बूमधारी बातमीदाराला वेगळा ठसा उमटवता आला. आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये कुमार केतकर आणि राजीव खांडेकर यांचे लोकसत्तामध्ये लाभलेले मार्गदर्शन आणि निखिल वागळे यांचा आयबीएन-लोकमतमधल्या प्रोत्साहनामुळं माझ्यातला धडपड्या पत्रकार सतत जागरुक राहिला. या जागरुकतेमुळेच मला कामाचं समाधान मिळत होतं. पण का कुणास ठाऊक गेल्या सहा महिन्यांपासून कामाचं समाधान मिळेनासं झालं होतं. कदाचित आधी दिग्गज लोकांबरोबर काम केल्यानंतर एकाएकी आपल्या कामाचाच दर्जा घसरलाय की काय, या शंकेनं मी ग्रासलो गेलो. त्यामुळं वेळीच सावध होत मी आयबीएन-लोकमतचा आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. या राजीनाम्यानंतर माझ्यातला सजग पत्रकार अकाली संपण्यापूर्वी तो वाचवल्याचा मला आनंद होतोय.... आता पुन्हा नवी इनिंग सुरू करायची आहे.... तेव्हा लवकरंच कळवेन!
आपलाच....
आशिष जाधव

महाराष्ट्रनामा ..

पुणे - नव जागृतीच्या कर्मचाऱ्यांचे चार दिवसांपासून काम बंद आंदोलन
जून संपला तरी एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन मिळाले नाही..
.स्ट्रींजरचे एप्रिल आणि मे चे मानधन मिळाले नाही...
चॅनलचे सर्व बुलेटीन चार दिवसांपासून बंद..
जुने बुलेटीन सध्या सुरू ...दर्शक कंटाळले....
मालक राज गायकवाड यांचे आश्वासन हवेत विरले...> बेरक्यावर नव जागृतीविषयी पहिली बातमी झळकली,तेव्हा मालकांनी स्ट्रींजर रिपोर्टरचे मार्च महिन्याचे पेमेंट अदा केले.मात्र एप्रिल आणि मे चे तसेच बाकी ठेवले.कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पगारापोटी अॅडव्हान्स पाच हजार दिले,पण पुर्ण पेमेंट दिले नाही.29 जून लास्ट डेडलाईन होती.पण मालकांने अजूनही पेमेंट केले नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.आता जून महिन्यापर्यंत पेमेंट झाल्याशिवाय कामावर ज्वाईन व्हायचे नाही,असा निर्णय अनेक कर्मचाऱ्यांनी घेतलाय.त्यामुळे नव जागृतीचे कामकाज ठप्प आहे...........................

मुंबईत एक नविन हवा पसरली आहे.निखिल वागळे नविन चॅनल काढणार आहेत म्हणे.व्हीआयपी ग्रुपचे हे चॅनल आहे.महाराष्ट्रात त्यांच्या मराठी चॅनलचे नाव राहणार आहे,'महाराष्ट्र 1'...
आता ही अफवा आहे की,खरोखरची बातमी आहे,याबाबत अजून तरी अधिकृत माहिती मिळालेली नाही...परंतु काही तरी हालचाली सुरू आहेत,हे नक्की...
आशिष जाधव, गणेश मोरे,विनायक गायकवाड हे वागळे यांच्या चॅनलमध्ये ज्वाईन होणार असल्याची चर्चा... 
अर्ध्यापेक्षा जास्त आयबीएन - लोकमत खाली होणार असल्याची पसरली हवा...

Nikhil Wagale Tweets


..........................

आयबीएन -लोकमतमध्ये घडामोडींना वेग...
..........................................................
आशिष जाधव पाठोपाठ गणेश मोरे आणि विनायक गायकवाड आयबीएन - लोकमत सोडण्याची शक्यता... 
 


..............


औरंगाबाद येथील दै.गांवकरीच्या कर्मचार्‍यांचे मागील काही वर्षांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन करत कामगार उपायुक्तांना निवेदन दिले. 

दिव्य मराठीच्या वरीष्ठांना कामगार अधिकाऱ्याची नोटीस

मजेठिया आयोग लागु करण्याची वेळ येताच पत्रकारांचे बळजबरीने राजीनामे घेतल्याप्रकरणी यवतमाळच्या सरकारी कामगार अधिका ऱ्यांनी दिव्य मराठीच्या अकोला येथील वरीष्ठांना नोटीस बजावली आहे. थेट मुख्यमंत्र्यांकडे गोपणीय तक्रार करण्यात आल्यानंतर या प्रकरणात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देवेंन्द्र फडणवीस यांनी दिले आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून कामगार मंत्रालयात आदेश धडकताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लेबर कमिश्नर मार्फत यवतमाळच्या कामगार अधिका ऱ्याला देण्यात आले.
दिनांक 14 मे 2015 रोजी यवतमाळ तसेच बुलढाणा येथील एकून नऊ रिपोटर्सना अकोला येथे बोलविण्यात आले होते. या ठिकाणी त्यांना बदलीच्या धमक्या देऊन तसेच पुन्हा कामावर घेण्याचे आमिष दाखवून राजीनामे घेतले गेले. दरम्यान या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांकडे गोपणीय तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन देवेन्द्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे सुचविले आहे. ही तक्रार खरी आहे किंवा नाही यासाठी यवतमाळच्या पाच पत्रकार तसेच एक डिझायनर यांना कामगार अधिका ऱ्यांनी नोटीस देऊन प्रथम त्यांचे म्हणने ऎकुन घेतले. यातील चार जण दिव्य मराठीत राजीनामा दिल्यानंतरही कमी पगारात कार्यरत असल्याने यातील तीन जणांनी मात्र या प्रकरणात आपला संबंध नसल्याचे लिहून दिले आहे. मात्र उर्वरीत तीन पत्रकार मात्र आपला लढा कायम ठेवण्याच्या तयारीत आहे. तीन पत्रकार ठाम राहील्याने यवतमाळच्या कामगार अधिका ऱ्यांनी अकोला येथील कार्यकारी संपादक, एच आर हेड तसेच युनिट हेड यांना नोटीस बजावून त्यांना आपली बाजु मांडण्याचे पत्र दिले आहे. या अनुषंगाने नुकतेच अकोला दिव्य मराठीच्या एचआर हेड यांनी यवतमाळ येथे येऊन बाजु मांडण्यासाठी वेळ मागुन घेतला आहे. दिव्य मराठी चे अधिकारी आता या प्रकरणात काय बाजु मांडतात आणि लढणारे पत्रकार काय बाजु मांडतात याकडे इतरही कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे कामगार मंत्रालयाने दिव्य मराठीला मजेठीया आयोग लागु करण्याबाबत पत्र दिल्याने या आदेशाचे दिव्य मराठी केव्हा पालन करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविवार, २८ जून, २०१५

निवासी संपादकअभावी कोल्हापूर मटा मठ्ठच...

कोल्हापूर - महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय चोरमारे यांची मुंबईला बदली होवून चार महिने झाले तरी कोल्हापुरात निवासी संपादकाची जागा अजून भरलीच गेली नाही.त्यामुळं कोल्हापूर मटा मठ्ठच झाला आहे.
अंकात दररोज कोणत्या ना कोणत्या चुका होणे,महत्वाच्या बातम्या सुटणे,एकच बातम्या दोन पेजवर प्रकाशित होणे,बातम्यांत शुद्धलेखनाचाच्या अक्षम्य चुका होणे ही नित्याची बाब झाली आहे.त्यात ऑफीसमध्ये होणा-या किरीकिरीमुळे विजय पाटील यांनी मटा सोडून पुन्हा पुढारीचा रस्ता धरला.
जेव्हा चोरमारे मुंबईत स्थायिक झाले तेव्हा पुण्याचे कार्यकारी संपादक पराग करंदीकर यांनी कोल्हापूरसाठी दोघांच्या मुलाखती घेतल्या होत्या.मुलाखती देणा-यामध्ये पुढारीचे सहाय्यक कार्यकारी संपादक मुुकुंद फडके आणि पुण्यनगरीचे विजय जाधव यांचा समावेश होता.परंतु नंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मटाची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.त्यामुळे पराग करंदीकर येत्या आठवड्यात कोल्हापुरात येणार असल्याची चर्चा आहे.या भेटीत ते आता सकाळचे सहयोगी संपादक चंद्रशेखर माताडे,पुढारीचे फडके किंवा पुण्यनगरीचे जाधव यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील,अशी चर्चा आहे.
कोल्हापुरातून जी दैनिके निघतात,त्यात सांगली,सातारा आणि कोल्हापुरात पुढारी नंबर एकवर आहे.मात्र बेळगावासह कोकणात पुढारी चांगलाच मागे गेला आहे.त्याखालोखाल लोकमत,सकाळ,बेळगाव तरूण भारत आणि पुण्यनगरी असा क्रम आहे.मटा सर्वात शेवटी आहे.कोल्हापूर मटाने पुन्हा एकदा वाचक स्कीम राबवली आहे.वार्षिक ९९ रूपये भरा आणि महिन्याला ५० रूपये द्या,शिवाय एक गिप्ट मिळवा,यामुळं मटाचा जेमतेम खप झाला आहे.जाहिरात बिझनेसमध्ये मटा सर्वात शेवटी आहे.
त्यासाठी मटाला हवा आहे,दमदार निवासी संपादक...आपणाकडे ही पॉवर असेल तर पराग करंदीकर यांच्याशी संपर्क करा.त्यांना बेरक्याच्या शुभेच्छा...

शनिवार, २७ जून, २०१५

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत देवदास मटाले बहुमताने विजयी...


मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत देवदास मटाले यांची हॅटट्रीक...
तिसऱ्यांदा विजयी....कार्यकारिणीवर मटाले गटाचेच वर्चस्व..
शशिकांत सांडभोर यांचा दारूण पराभव...

मटाले १७०, सांडभोर १३२, मोकाशी ६९ आणि वाभळे यांना ६४ मते ... 


 मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार  
अध्यक्ष - देवदास मटाले उपाध्यक्ष- प्रभाकर पवार आणि विजयकुमार बांदल कार्यवाह -प्रमोद तेंडुलकर कोषाध्यक्ष - दीपक म्हात्रे विश्वस्त - अजय वैद्य व प्रकाश कुलकर्णी कार्यकारिणी सदस्य विष्णू सोनवणे, भीमराव गवळी, सत्यवान ताठरे, आत्माराम नाटेकर, कल्पना राणे, दीपक परब, महेश विचारे, शैलेंद्र शिर्के आणि स्वाती घोसाळकर.

'सकाळ' निष्पक्षपाती वृत्तपत्र- फडणवीस

पुणे - ‘सकाळ‘मध्ये शरद पवार यांच्या विचारांना जेवढे प्राधान्य दिले जाते, तेवढेच प्राधान्य माझ्या आणि आमच्या पक्षाच्या विचारांनाही मिळत असून, हा "सकाळ‘चा निष्पक्षपातीपणा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात खऱ्या अर्थाने "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखालील "सकाळ जलयुक्त शिवार‘, "तनिष्का‘ अशा उपक्रमांद्वारे समाजपरिवर्तनाचा विचार पुढे नेत आहे,‘‘ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे काढले.
पुण्यभूषण फाउंडेशनच्या "पुण्यभूषण‘ पुरस्कार वितरण समारंभात फडणवीस यांनी "सकाळ‘च्या भूमिकेचा, तसेच त्याच्या उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘जलयुक्त शिवार योजना‘ सुरू करून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला. त्यासाठी ठिकठिकाणी विकेंद्रित पाण्याचे साठे तयार केले. या योजनेत "सकाळ माध्यम समूहा‘चे काम पथदर्शी असेच आहे.‘‘
फडणवीस म्हणाले, ‘ज्या ज्या ठिकाणी या योजनेचे काम चाललेले आहे, तेथे "सकाळ‘च्या तनिष्का भगिनी मदतीला येतात. हे सामाजिक भान समाजात निर्माण करण्याचे काम "सकाळ‘ आणि प्रतापराव पवार यांनी केले आहे. ते महत्त्वाचे आणि तितकेच मोलाचेही आहे. आपण किती कार्य करतो, यापेक्षा लोकोपयोगी, चांगल्या कामांसाठी किती लोकांना प्रेरित करतो, हे अधिक महत्त्वाचे असते. जे लोक असे इतरांना प्रेरित करू शकतात, तेच खरे त्या त्या क्षेत्रातील नेतृत्व असते. असे नेतृत्व पवार यांनी उभे केले, म्हणूनच त्यांना "पुण्यभूषण‘ हा अतिशय मानाचा सन्मान मिळाला.‘‘
‘उद्योग, सामाजकारण, पत्रकारिता अशा क्षेत्रांतील प्रतापराव पवार यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. विशेषतः "सकाळ माध्यम समूह‘ हे माध्यम वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांपुरते मर्यादित न ठेवता, त्याला त्यांनी वेगळे रूप दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजपरिवर्तन ही माध्यमांची भूमिका होती. समाजासमोर स्वातंत्र्याचे बीजारोपण झाले पाहिजे, या पद्धतीचा माध्यमांचा विचार होता आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रतापराव पवार आणि आमचे मित्र अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखालील "सकाळ‘ समाजपरिवर्तनाचा विचार पुढे नेत आहे. सामाजिक परिवर्तनासाठी माध्यमे किती सकारात्मक पद्धतीने काम करीत असतात, हेच या उदाहरणातून पाहायला मिळत आहे,‘‘ असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, ‘अलीकडच्या काळात अनेक दैनिके मुखपत्रे बनत आहेत; पण "सकाळ‘ने निष्पक्षपातीपणा पाळला आहे. समाजाला काय अपेक्षित आहे, कशाची आवश्‍यकता आहे, याचा विचार करून मूलभूत गोष्टींमध्ये काम करायचे, हीच "सकाळ‘ची यशस्वी वाटचाल आहे. "तनिष्का‘, "ऍग्रोवन‘सारखे निरनिराळे उपक्रम "सकाळ‘ने सुरू केले. हे कौतुकास्पद आहे.‘‘

शुक्रवार, २६ जून, २०१५

प्रसन्न जोशीकडेच राहणार चॅनल हेडची जबाबदारी ?

मुंबई -जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये लवकरच प्रसन्न व्यक्तीमत्वाच्या प्रसन्न जोशींचे आगमन होणार आहे.त्याची बातमी बेरक्यावर सर्वप्रथम झळकली.तोपर्यंत ही बातमी कोणालाच माहित नव्हती.जगाच्या बातम्या देणा-या जय महाराष्ट्र चॅनलमधील रिपोर्टर,अँकर आणि कर्मचा-यांनाही त्याची गंधवार्ता नव्हती.बेरक्यावर जेव्हा बातमी प्रसिध्द झाली,तेव्हा जय महाराष्ट्रमधील अनेक कर्मचा-यांना आश्चर्याचा धक्काच बसला.त्यानंतर फोनाफोनी सुरू झाली आणि खात्री पडल्यानंतर अनेकांचा सुतकी चेहरा झाला.त्यातला त्यात विलास आठवलेसह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला.
मित्रानो,आता एक नविन बातमी हाती येत आहे.प्रसन्न जोशी जय महाराष्ट्रमध्ये चॅनल हेड म्हणून येणार आहेत.सध्याचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे अधिकार कमी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.विलास आठवले जरी आता कार्यकारी संपादक असले तरी आहे त्या पदावर ठेवून फक्त इनपूटची जबाबदारी द्यायची की पुन्हा इनपूट हेड पदावर पाठवायचे,याबाबत जय महाराष्ट्रचे प्रशासन गांभिर्याने विचार करत आहे.
प्रसन्न जोशी हे एबीपी माझामध्ये अनेक वर्षे होते.रात्री ९ वाजता होणा-या माझा विशेषचे ते मुख्य एंकर होते.त्यांचा हा शो चांगलाच लोकप्रिय होता.मात्र आहे त्या पदावर किती दिवस काम करायचे,आता जाईन तर चॅनल हेड म्हणूनच जाईन असे त्यांचे स्वप्न होते.त्यांना झी २४ तास आणि आयबीएन लोकमतमध्ये मोठी ऑफर होती.परंतु त्यांना चॅनल हेड पद हवे होते आणि जय महाराष्ट्रने ते देवू केल्यानेच प्रसन्न जोशी यांनी एबीपी माझाला जय महाराष्ट्र केला आहे.
जय महाराष्ट्रचा टीआरपी वाढणार का ?

शैलेश लांबे यांच्या काळात जय महाराष्ट्र चॅनलमध्ये एक प्रकारची अवकळा आली होती.त्यांचा चमचा आनंदने पुर्ण वाटली आणि लांबेचीही वाट लावली.मात्र राजेश क्षीरसागर सीईओ झाल्यापासून चॅनलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
या चॅनलचा स्वीचर खराब झाला होता,तो २५ लाख रूपये खर्च करून नविन घेण्यात आला.त्यामुळे चॅनलचा लूक आकर्षक झाला आहे.त्याचबरोबर ग्राफीक्स् चेंज करण्यात आले आहेत.मात्र चॅनलला चेहरा नव्हता.विलास आठवले यांनी कामापेक्षा राजकारण जास्त केल्यामुळे अनेक कर्मचारी दु:खावले होते.अनेकजण राजीनामा देवून बाहेर पडत होते.त्यामुळं चॅनलला हवा होता,एक प्रसन्न चेहरा.त्यामुळचं जय महाराष्ट्रनं प्रसन्न जोशीना ऑफर दिली आहे.
प्रसन्न जोशी आल्यानंतर जय महाराष्ट्रचा टीआरपी वाढणार का ? एबीपी माझातील अनेक होतकरू कर्मचारी जे एबीपी माझात दु:खावले आहेत,ते जय महाराष्ट्रमध्ये येणार का,या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीय आहे.
जय महाराष्ट्रचा एकूण तोटा सध्या फक्त १२ टक्के आहे.तो भरून निघाल्यास हे चॅनल पुन्हा फॉर्मात येईल,अशी अपेक्षा आहेत.प्रसन्न जोशी जुलैच्या पहिल्या आठवड्यात जय महाराष्ट्रमध्ये ज्वाईन होणार आहे.त्यांना बेरक्याच्या शुभेच्छा...

मु.पो.नागपूर

नागपुरात मराठी बाण्याच्या एका सप्तपुत्र व्हिडिओ कैमेरामननं थेट,अचूक,बिनधास्त अर्थात छम् छम् न्यूज चॅनलच्या अतिशहाण्या आणि चमकोगिरी करणार्या विजयला चांगलाच इंगा दाखवला आहे. 
नागपुरात थेट,अचूक,बिनधास्त अर्थात छम् छम् न्यूज चॅनलची लाल ओबी फिरते. या ओबीत ओबी इंजिनिअर आणि विडिओपर्सन सप्तपुत्र असतात. त्यांच्या कामाची वेळ सकाळी ६ ते रात्री कितीही. रिपोर्टर विजय यांची मात्र मनमानी असते. मुळात विजय व्हिओ आर्टीस्ट आहे. आवाज देणें, हे त्याचं काम.पण त्याचा आवाज कधी लागलाच नाही. म्हणुन ई टीवीच्या प्रतापबहाद्दर अशोकानं त्याची वाट लावली. तेव्हापासुन हे विजय महाशय चाचपडत होते. लार्ड बुद्धाच्या माध्यमातुन नागपुरची जागा बळकावली. विजयला मुळात फक्त आवाज देण्याची कला अवगत असल्यानं, छम् छम् न्यूज चॅनलचा नागपुरातील गळाच आवळण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे, फणसाच्या चैनलमधील गणेश पुत्राशी प्र-वीण्य मिळवत विजयानं मैत्री केली. आता ही मैत्रीच विजयाला घेऊन डुबणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्याचे झाले असें की, कायम स्टोरी मागुन घेणारा किंवा असाईनमेंटला नेहमी ऊशिरा पोचणार्या प्र-वीणाला एक ओझ्याचं गाढव हवं होतं. ते विजयाच्या रुपानं मिळालं. प्र-वीणा मुळात डेस्कचा माणुस, रिपोर्टींगसाठीची पळापळ कशाशी खातात, हे याला मुळात माहीतीच नाही. अन् विजया फक्त आवाजाचा धनी, प्रत्रकारिता जाऊँ द्या साधी बातमी, त्याचा एन्ट्रो याला समजत नाही. वेगळ्याच प्रकारच्या आवाजाचा हा धनी असल्यानं, बाकी पत्रकार याला जवळही उभें करत नाही. नेमकी हीच बाब प्र-विणानं हेरली अन् विजयाशी गट्टी जमली. त्यात, कैमेरा, कैमेरामन, ओबी, ओबी इंजिनिअर, अन् ड्रायव्हर हा सारा छम् छम् न्यूज चॅललचा लवाजमा प्रविणाच्या १३ मजली इमारतीच्या खाली दिमतीला रहायला लागला. त्यात प्र-वीणाचं आफिस एसी अन् विजयाला साध आफिसही नाही, अशी दोघांची गट्टी जमली. इतकी की भलताच संशय यावा. हा संशय छम् छम् न्यूज चॅनलच्या सप्तपुत्र कैमेरामनला आला, तसा ओबी इंजिनिअरलाही आला. छम् छम् न्यूज चॅनलची सगळी यंत्रणा फणसाच्या अन् महेशाच्या दावणीला प्र-वीणानं लावली. प्र-वीणा सांगेल तशी ड्युटी. बदल्यात विजयाला मिळेल स्क्रीप्ट. असा मामला सुरु झाला. सप्तपुत्र अन् ओबी इंजिनिअर स्वस्थ बसले तरच नवल. दोघानी थेट छम् छम् न्यूज चॅनल मुख्यालयात मेल धाडला. मुख्यालयात विजयाची शाळा झाली. त्याचा मुर्गाही झाला. पण आतांच खरी गंमत आहे, हा सप्तपुत्र अन् ओबी इंजिनिअर म्हणे इथं नागपुरात टिकतातच कसें, असा जाहीर विडाच विजयानं उचललाय. सध्या तरी प्र-विणा गंमत बघतोय. नागपुरातील इलेक्ट्रानिक मिडियात प्र-विणा अन् विजयाची जोडी चांगलीच हिट्ट ठरलीय.

पत्रकार संघाच्या ‘खुर्ची’साठी ठेचण्याची भाषा!

मुंबई - मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, शनिवारी मतदान होत असून मतदानाला अवघे काही तास शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या वेगवेगळ्या गटांकडून एकमेकाला ठेचण्याची भाषा केली जात असून एरवी राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा करणाऱ्या सर्वसामान्य पत्रकारांमध्ये आपल्याच सहकाऱ्यांच्या घोटाळ्यांची चर्चा रंगली आहे.
तब्बल ७५ वर्षांची परंपरा लाभलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाला मुंबईतील पत्रसृष्टीत महत्त्वाचे स्थान आहे. आजवर अनेक नामवंत पत्रकारांनी संघाचे अध्यक्षपद भूषवले असून आपापल्या परीने संघाचा नावलौकिक वाढविण्यास मदत केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत संघ हा राजकारणाचा आखाडा बनत चालल्याची खंत सजग पत्रकार व्यक्त करीत आहेत. यंदाची निवडणूकही त्यास अपवाद राहिलेली नाही. पत्रकारांवर होत असलेले हल्ले, वाढत्या ताणतणावामुळं त्यांची होणारी ससेहोलपट, त्यांचे आरोग्य अशा मूलभूत समस्यांची चर्चा करण्याऐवजी भलत्याच मुद्द्यांवरून चिखलफेक सुरू आहे. पत्रकार संघाचे सुशोभिकरण, मुदत ठेवी, संघाच्या प्रमुख सभागृहाच्या नामकरणापासून ते राजकारण्यांकडून मिळालेल्या देणग्यांचे व घोळाचे मुद्देच प्रचारात प्रमुख बनले आहेत. विरोधकांना 'ठेचून' काढण्याचे आवाहन करण्यापर्यंत काही उमेदवारांची मजल गेली आहे.
निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी कसलेल्या राजकारण्यांप्रमाणे 'दारोदारी' प्रचार सुरू केला आहे. संघाच्या सदस्यांच्या मेलचे इनबॉक्स आवाहन व विनंतीच्या मेलनी भरून गेले आहेत. मोबाइलवर मेसेजवरून मेसेज आदळत आहेत. याशिवाय, गेल्या पंधरवड्यापासून सदस्यांच्या घरच्या पत्त्यावर पत्रकांचा पाऊस पाडला जात आहे. त्यातून विरोधकांच्या कारभारावर कोरडे ओढले जात आहेत. पत्रकारांच्या या राजकारणाची चर्चा राजकीय व सामाजिक क्षेत्रातही चवीनं चघळली जात आहे.
उमेदवार हायटेक; संघाची साइट जुनाट!
.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत उतरलेले उमेदवार व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियातून हायटेक प्रचार करत आहेत. प्रचाराचे नवनवे फंडे आजमावले जात आहेत. मात्र, ७५ वर्षांची परंपरा असलेल्या संघाची वेबसाइट आजही जुनाट अवस्थेत आहे. लोकांना अपडेट ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पत्रकारांच्या संघाची वेबसाइट धड अपडेट नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊन जवळपास वर्ष लोटले तरी मुंबईतील खासदार, आमदारांची यादी अपडेट करण्यात आलेली नाही. धक्कादायक म्हणजे, दिवंगत खासदारांचे नावही वेबसाइटवर खासदार म्हणून झळकते आहे.
........................
(साभार -मटा ऑनलाइन )

गुरुवार, २५ जून, २०१५

आता सोशल मीडियातील लेखनासाठीही पत्रकारिता पुरस्कार

> राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2014 साठी
> 31 जुलैपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
> व्यक्ती, संस्था, संघटनेकडून येणा-या शिफारसींचाही विचार होणार

.....................................................................................

मुंबई -  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार याबरोबरचआता सोशल मीडियातील लेखनासाठीही पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2014पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै2015असा आहे.
या स्पर्धेत आता कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेला पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्तीच्या नावांची शिफारस करता येणार आहे. पत्रकारितेत काम करणा-या व्यक्तीने अर्ज केला नसेल, मात्र तिची शिफारस कुठल्याही व्यक्ती किंवा संस्था, संघटनेने केली असेल तर त्याचा पुरस्कारासाठी विचार होऊ शकतो. तथापि, अशी शिफारस करताना प्रवेशिका सादर करण्याबाबतच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
2014या कॅलेंडर वर्षात प्रसिद्ध झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या तसेच सोशल मिडियासंदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे :
राज्यस्तर (मराठी) आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार-  41 हजार रुपये, मानचिन्ह वप्रशस्तीपत्र आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व.ज.) 41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.

         विभागीय पुरस्कार :
नाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (यापैकी रुपये 10 हजार, दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत);औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
पुणे विभाग : नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;
कोकण विभाग: शि.म.परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोल्हापूर विभाग : ग.गो.जाधव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;नागपूर विभाग: ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.

नियम व अटी
    पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/ विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
पत्रकारांच्या, तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
                               मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असले तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.
2014या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा

    इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु. ल. देशपांडे पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल.

पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत.
वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/ संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/ कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/ जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळ मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6 आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.

सोशल मीडिया पुरस्कार, रु. 41 हजार मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
    ही स्पर्धा संकेतस्थळे व ब्लॅाग या सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त/पत्रकारिता विषयक मजकुरासाठी आहे. या स्पर्धेत संकेतस्थळे व ब्लॉग सोशल मीडियाचा वृत्त/ पत्रकारिता विषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबधित वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगव्दारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष झालेले  असावे. त्याचप्रमाणे,      वृत्त/ पत्रकारिताविषयक संकेतस्थळ हे अधिकृत असावे व त्यावर सोशल मीडियाचा वापर करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या  विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असाव्यात व त्यात शासनाच्या  विविध योजनांना पूरक  अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने वा त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी सोशल मीडियाव्दारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट ) सादर कराव्यात. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील
छायाचित्रकार पुरस्कार
    राज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांकरिता आहे.

2014च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2014या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी.
पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.
एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथे उपलब्ध आहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.बेरक्याच्या दणक्यानंतर 'नव जागृती'चे प्रशासन वठणीवर

पुणे - 'बेरक्या'च्या दणक्यानंतर 'नव जागृती'चे प्रशासन हादरले आहे.'बेरक्या'च्या वृत्ताची दखल घेवून मालक राज गायकवाड यांनी राज्यातील स्ट्रींजरचे माहे मार्च महिन्याचे मानधन बँक खात्यावर जमा केले आहे.उर्वरित एप्रिल, मे आणि चालू जून महिन्याचे मानधन १० जुलैपर्यंत देण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले आहे.त्याचबरोबर कर्मचा-यांचे पेमेंट येत्या दोन दिवसांत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.त्यापैकी काही अनामत रक्कम त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे.
केवळ पेमेंटअभावी 'नव'जागृती'च्या कर्मचा-यांत आणि स्ट्रींजर रिपोर्टरमध्ये निरूत्साह आलेला आहे.गेल्या काही दिवसांपासून एक किंवा दोन बुलेटीन सुरू आहेत,आणि तेच रिपीट केले जात आहेत.त्यामुळे स्पर्धेत येत असलेल्या या चॅनलला अवकळा आली आहे.तीन महिन्यापुर्वी 'नव जागृती' चॅनलमध्ये एक 'सल्लागार संपादक' नेमण्यात आला होता.त्यांनी मालक गायकवाड यांना चुकीचा सल्ला दिल्यामुळे चालू असलेल्या चॅनलला 'वाळवी' लागली आणि सारी 'समीकरणे'च बदलली.या 'वाळवी'मुळेच सुरळीत चालू असलेल्या चॅनलला ब्रेक बसला.
'नव जागृती'च्या दोन संचालकांनी चुना लावल्यामुळे आणि मीडियातील अतिहुशार लोकांनी चुकीचा सल्ला दिल्यामुळं चॅनलमध्ये गडबड झाल्याचे मालक राज गायकवाड यांनी मान्य केले आहे.मात्र १० जुलैपर्यंत सर्व गाडा सुरळीत करू,असा खुलासाही त्यांनी केला आहे.
चंद्रपूरमध्ये काही लोकांनी आपल्यास ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला,त्यातून चुकीचे वृत्त प्रसिध्द झाले होते,मात्र नंतर त्याचा खुलासा प्रसिध्द झालेला आहे.आपणाविरूध्द चंद्रपूर अथवा कोठेही गुन्हा दाखल नसून,जागृती अ‍ॅग्रो फुडस् कंपनीचा कारभार नियमानुसार सुरू असल्याचेही गायकवाड यांचे म्हणणे आहे...

जाता-जाता 
बेरक्या कोणत्याही न्यूज चॅनल अथवा वृत्तपत्राच्या मालकांच्या विरोधात नाही.'नव जागृती' कर्मचा-यांचा आणि स्ट्रींजर रिपोर्टरचे पेमेंट वेळेवर व्हावे आणि हे चॅनल स्पर्धेत यावे,ही अपेक्षा आहे.
'नव जागृती'ला बेरक्याच्या नव्याने शुभेच्छा...

बुधवार, २४ जून, २०१५

वरिष्ठांच्या मारामारीत कनिष्ठांची गोची....

कोल्हापूर-पुढारी दैनिकात वरिष्ठांच्या मारामारीत कनिष्ठांची वाताहत होऊ लागली आहे. दोन वरिष्ठ कार्यकारी संपादकांच्या श्रेयाच्या स्पर्धेत कनिष्ठ भरडले जात आहेत. आठ दिवसांपूर्वीच तब्बल ९ उपसंपादक रजेवर होते. त्यावेळी पेजर लोकांनीच आवृत्त्या काढल्या. वरिष्ठांचे टोमणे, कुत्सित बोलणे यामुळे पद्मश्री परिवारात कमालीची नाराजी पसरली आहे. बाहेरून आलेल्या लोकांना भरभक्कम पगार आणि घराच्या लोकांना ठेंगा हे धोरण नाराजीत भर घालीत आहे. 
पवार आणि लोंढे यांच्या कुस्तीत मुकुंदपंतांचे भरीत झाले आहे. चांगले काही झाले कि साहेबांकडे फीत मिरवण्यासाठी चाललेली वरिष्ठांची धडपड चेष्टेचा विषय ठरली आहे. आता पद्मश्रीनीच यांना कानपिचक्या देऊन अंकात नवीन कल्पना लढवण्यास आणि नव्या कल्पनांना वाव देण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी होत आहे.
 

ABP माझाचा उलटा प्रवास सुरू...

ABP माझा (जुने नाव स्टार माझा) जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याची टींगल बालगोपाळांचे चॅनल म्हणून केली जात होती,तेव्हा झी २४ तास नंबर १ वर होते.मात्र नंतर माझाने झेप घेतली.मात्र नंतर आयबीएन -लोकमत सुरू झाल्यानंतर माझा पुन्हा खाली आला आणि नंतर दोन वर्षानंतर पुन्हा माझाने झेप घेतली.
गेली अनेक वर्षे माझा क्रमांक १ वर होता,परंतु गेल्या काही महिन्यापासून माझाला उतरली कळा लागलेली आहे.
ज्यांनी माझाला खरे रूप दिले त्या माणिक मुंडेंना एका मुलीच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.त्यानंतर एक महिन्यापुर्वी स्टार रिपोर्टर निलेश खरे यांनी माझाला रामराम ठोकून मी मराठीची वाट धरली आणि आता स्टार एंकर प्रसन्न जोशींनी माझाला जय महाराष्ट्र करून जय महाराष्ट्रमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय.आता उरले आहेत शांत आणि संयमी एंकर मिलींद भागवत आणि आणखी एक पडद्यामागचा कलाकार राहूल खिचडी.माझाच्या स्टो-यांंना जो जबरदस्त आवाज असतो,तो आहे राहूल खिचडी यांचा आहे.खिचडी यांनी माझा सोडला तर माझाची खिचडी झालीच समजा...
मुंडे यांच्या राजीनाम्याचे कारण जगजाहीर असले तरी निलेश खरे आणि प्रसन्न जोशींच्या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.मिळालेल्या माहितीनुसार खरे आणि जोशी यांना पगाराचा आकडा लाखाच्या वर पार केलेला होता.मँनेजमेंटला आता त्यांना पगारवाढ द्यायची नव्हती,म्हणून दोघांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातय,दुसरे असे की,जास्त पगाराची आणि दीर्घ काळाची माणसे काढून मँनेजमेंटला नविन फ्रेश माणसे भरती करायची आहेत.
असो,एकामागून एक तीन मोहरे गळाल्यामुळं माझाचा आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे.संपादक राजीव खांडेकर यांचा चेहरा माझाला तारू शकत नाही.त्यासाठी हवे आहेत,दमदार खेळाडू आणि हे दमदार खेळाडू आता माझाला लवकर गवसणे अशक्य आहे...

जय महाराष्ट्रमध्ये दोन कार्यकारी संपादक राहणार...

मुंबई - होय,बेरक्याने महिन्याभरापुर्वी दिलेली न्यूज तंतोतंत खरी ठरली आहे.एबीपी माझाचे स्टार एंकर प्रसन्न जोशी यांनी माझाला रामराम केलाय.त्यांनी एक महिन्यापुर्वीच प्रशासनाकडे राजीनामा दिला होता,तो मंजूर करण्यात आलाय.
प्रसन्न जोशी आता जय महाराष्ट्र चॅनलमध्ये कार्यकारी संपादक म्हणून जुलैच्या पहिल्या आठवड्यात ज्वाईन होणार असल्याचे वृत्त बेरक्याकडे आले आहे.जोशी जय महाराष्ट्रमध्ये गेल्यामुळे आता पुर्वीचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे काय होणार,असा प्रश्न निर्माण झाला होता.परंतु मिळालेल्या माहितीनुसार आठवले आणि जोशी हे दोघेही कार्यकारी संपादक राहणार आहेत.एकाकडे इनपूट तर एकाकडे आऊटपूटची जबाबदारी राहणार आहे.गरज पडल्यास जय महाराष्ट्रमध्ये एडिटर इन चिफ पदावरही एका मोठ्या पत्रकाराची वर्णी लागू शकते.जोशी जय महाराष्ट्रमध्ये ज्वाईन होत असल्यामुळे त्यांचे एबीपी माझामधील जुने स्पर्धक माणिक मुंडे यांचा पत्ता आपोआप कट झालेला आहे.

माझाचे तीन मुख्य मोहरे गळाले...

अनेक वर्षे नंबर १ वर राहिलेल्या एबीपी माझाचे एकामागून एक तीन मोहरे गळाले आहेत.आऊटपूर हेड माणिक मुंडे यांना एका मुलीच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता.मुंडे सध्या साममध्ये आऊटपूट हेड आहेत.
त्यानंतर एक महिन्यापुर्वी स्टार रिपोर्टर निलेश खरे यांनी राजीनामा दिला होता.खरे सध्या मी मराठीमध्ये आहेत.त्यानंतर आता स्टार एंकर प्रसन्नजोशी यांनी माझाला रामराम करून जय महाराष्ट्रचा रस्ता धरला आहे.

माझामध्ये आता स्टार एंकर कोण ?

एबीपी माझामध्ये रात्री ९ वाजता माझा विशेष हा शोचे मेन एंकर प्रसन्न जोशी होते.ते आता माझामधून बाहेर पडल्यामुळे या शोची जबाबदारी आता कोणाकडे जाणार,याकडं लक्ष वेधलं आहे.ही जबाबदारी मिलींद भागवत आणि विलास बडे यांच्याकडे जावू शकते,अशी चर्चा आहे.

मंगळवार, २३ जून, २०१५

पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहीणार : राज्यपाल

पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत आपणही चिंतीत असून राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याबाबत शासनाने विचार करावा, या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचे आश्वासन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज दिले.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या एका 15 सदस्यीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार दि २३) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्रात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सन 2013 मध्ये राज्यात 71 पत्रकारांवर हल्ले झाले होते, २०१४ मध्ये हा आकडा ८२ पर्यंत वाढला. २०१५ च्या पहिल्या सहा महिन्यातच ४१ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत, तर दहा वर्षातली ही संख्या ८०० पेक्षा अधिक आहे. १९८५ नंतर राज्यातील १९ पत्रकारांच्या हत्या झालेल्या आहेत तर गेल्या दहा वर्षात राज्यात माध्यमांच्या ४७ कार्यालयांवर हल्ले झाले आहेत. या घटनांतील एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असे समितीचे निमंत्रक एस् एम् देशमुख यांनीराज्यपालांना सांगितले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक, प्रफुल्ल मारपकवार, सुभाष शिर्के, प्रसाद काथे, संतोष पवार, अनिकेत जोशी, प्रविण पुरो व इतर पत्रकार उपस्थित होते.

सोमवार, २२ जून, २०१५

दिव्य मराठीच्या कथनी आणि करणी मध्ये फरक

दिव्य मराठीने दर सोमवारी नो निगेटिव्ह न्यूज सुरु केली आहे. या दिवशी दिव्य मराठी तसेच भास्कर वृत्तपत्र पॉझीटिव्ह न्यूज ला प्राधान्य देतात. हा एक चांगला प्रयत्न आहे. मात्र भास्कर ग्रुपच्या कथनी आणि करणी मध्ये फरक आहे.

मजेठिया आयोग लावण्याचे आदेश झाल्याने दिव्य मराठीने विदर्भातील अनेक रिपोटर्स चे राजीनामे घेतले. बुलढाणा तसेच यवतमाळच्या एकूण  9 जनांचे राजीनामे तर एकाच दिवशी घेण्यात आले. त्यांच्याकडून कौटूंबिक कारणाने राजीनामे घेत असल्याचे लिहून घेण्यात आले. अमरावती येथील सुध्दा अनेक जनांना कामावरुन काढण्यात आले आहे. बदलीच्या धमक्या देऊन सुध्दा कारवाई करण्यात येत आहे. सरकारने पत्रकारांसाठी काहीतरी चांगले करण्याचा निर्णय घेतला तर त्यात वृत्तपत्रांचे मालक आडकाठी आनण्याचा प्रयत्न करीत आहे.

एकीकडे अशी हलकट वृत्ती ठेवायची आणी दुसरीकडे सोमवारी पॉझीटिव्ह न्यूज चा ढिंडोरा पिटायचा हा विरोधाभास मनाला पटण्यासारखा नाही. दिव्य मराठी ने मी नाही त्यातली आणी कडी लावा आतली ही प्रवृत्ती सोडायला हवी. भास्कर ग्रुपच्या या कार्याचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी सुध्दा केले आहे. विदेश दौ ऱ्यात असतांना त्यांनी भारतातील या कार्याचा उल्लेख केल्याचे भास्करवाले सतत सांगत आहे. परंतु मजेठिया आयोग लागु करता येऊ नये म्हणून त्यांनी राज्यातील एप्रिल तसेच मे 2015 याा दोन महिण्यात किती जनांचे राजीनामे घेतले, त्यांच्या दूरवर बदल्या केल्या अथवा त्यांना परमनंट नोकरीवरुन 
काढून त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसीस वर कमी पगारात कामावर ठेवले हे त्यांनी घोषीत करायला हवे. पॉझीटिव्ह विचारसरणीच्या लोकांनी पॉझिटिव्ह राहीले पाहीजे. सर्वप्रथम वर्धेचे कार्यालय बंद करुन तेथील कर्मचाऱ्यांना वा ऱ्यावर सोडण्यात आले. चांगली नोकरी सोडून हे कर्मचारी दिव्य मराठीत आले होते. आता बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला च्या पत्रकारांना काढण्यात आले. नागपूर चा सुध्दा नंबर असल्याची माहिती आहे. निगेटिव्ह वृत्ती कायम ठेऊन नो निगेटिव्ह न्यूज चा डंका पिटणाऱ्या भास्करने नो निगेटिव्ह न्यूजचा डंका पिटने बंद करावे. 

पंतप्रधानांनी सुध्दा अशा हलकट प्रवृत्तीच्या लोकांचा नामोल्लेख टाळला पाहीजे. आता दिव्य मराठी वाले सोमवारी बलात्कार अथवा चोरी खुनाच्या बातमीमध्ये सर्वात वर नकारात्मक बातमी असा उल्लेख करतात. असे त्यांनी केले नाही तर झालेला बलात्कार हा सकारात्मक होण्याची शक्यता असावी. वाचकांना सुध्दा सामाजिक कार्य अथवा बलात्कारामधला फरक समजत नसावा म्हणून दिव्य मराठीवाले बातम्यांच्या वर अशी टिपणी टाकत असावे. विशेष म्हणजे सोमवारी नो निगेटिव्ह न्यूज आणि मंगळवार पासून मात्र पुन्हा तमाशा सुरु असेच काही दिसून येत आहे.
 सोमवारी पॉझीटिव्ह न्यूज टाकल्यानंतर मंगळवारी दिनांक 16 जून 2015 रोजी दिव्य मराठी अकोला आवृत्तीमध्ये मुख्य अंकात 7 कॉलम 14 वर्षाच्या मुलीने पळविले 5 लाखाचे दागीणे ही बातमी प्रकाशित करण्यात आली. 14 वर्षाची बालिका आहे तिच्या आई वडीलांनी दुसरे लग्न केले. त्या मुलीवर संस्कार कसे पडले असतील. तीला मदत मिळेल असे काहीतरी कृत्य करण्याऐवजी तीने 5 लाखाचे दागीने पळविलयाची 7 कॉलम लिड करण्यात आली. सामाजिक दृष्ट्या वृत्तपत्रांनी अशा बातम्यांना स्थान द्यायला नको. दिव्य मराठीवाले किती ग्रेट आहेत यावरुन याची प्रचिती येते. सोमवारी नो निगेटिव्ह न्यूज आणी मंगळवारी पुन्हा काटे री बातम्या टाकणाऱ्यांना समज केव्हा येईल. आता तर अनेक पत्रकांरांना कामावरुन काढल्यामुळे दिव्य मराठीचा दर्जा आणखी दिव्य होईल यात शंकाच नाही.

नव जागृती चॅनलचा बॅन्ड वाजला

पुणे - नव्यानेच सुरू झालेल्या नव जागृती चॅनलचा पुरता बँन्ड वाजला आहे.२३ जून उजाडला तरी कर्मचा-यांचा एप्रिल आणि मे महिन्याचा पगार झालेला नाही तर राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टरचे मार्च,एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही.
पगार वेळेवर होत नसल्यामुळे अनेक कर्मचा-यांनी रजा टाकून कार्यालयाला दांडी मारलेली आहे तर प्रचंड मेहनत करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्यामुळे अनेक स्ट्रींजर रिपोर्टरनी स्टो-या पाठवणे बंद केले आहे.त्यामुळे हे चॅनल सध्या रडत पडत सुरू आहे.पगार वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचारी आणि स्ट्रींजर सध्या अस्वस्थ आहेत.
शेळी पालनावर आधारीत असलेल्या जागृती अ‍ॅग्रो फुडस् कंपनीचे हे चॅनल आहे.सांगलीचे राज गायकवाड याचे मालक आहेत.रोख १० लाख भरा आणि ४८ महिन्यांत करोडपती बना,अशी स्कीम तयार करून राज्यातील अनेक लोकांकडून त्यांनी करोडो रूपये जमा केलेले आहेत.चॅनल सुरू करताना कर्मचारी आणि स्ट्रींजरच्या बैठकीत माझे रोजचे दोन कोटी रूपये उत्पन्न आहे,हे चॅनल कधीच बंद पडणार नाही,अशी ग्वाही देणा-या गायकवाडांनी अवघ्या तीन महिन्यांतच पलटी मारली आहे.
कर्मचा-यांना आणि स्ट्रींजर रिपोर्टरंना दररोज पगाराची तारीख दिली जाते,परंतु पगार काही होत नाही.तारीख पे तारीख ऐकूण कंटाळलेले कर्मचारी आणि स्ट्रींजर रिपोर्टर लवकरच सामुहिक काम ंबंदचे हत्यार उपासणार आहे,असे सांगितले जात आहे.
या चॅनलचे मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी युवकांची नवी टीम उभी करून हे चॅनल सुरू केले होते,परंतु प्रशासनाच्या भोंदू कारभारामुळे ते हातबल झालेले आहेत.त्यामुळे हे चॅनल लवकरच गाशा गुंडाळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
राज गायकवाड यांच्या विरोधात अगोदरच चंद्रपूर तसेच अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत.कर्मचा-यांचा आणि स्ट्रींजर रिेपोर्टरचा पगार बुडवला म्हणून काही कर्मचारी कामगार न्यायालयात धाव घेणार आहेत.

नव जागृतीचे संचलन करणाऱ्या जागृती अॅग्रो फुडस्चे मालक राज गायकवाड यांच्या विरोधात चंद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.त्याच्या बातम्या लोकसत्ता,पुण्यनगरीसह अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या आहेत...हा घ्या पुरावा...


नव जागृतीचे संचलन करणाऱ्या जागृती अॅग्रो फुडस्चे मालक राज गायकवाड यांच्या विरोधात चंद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.त्याच्या बातम्या लोकसत्ता,पुण्यनगरीसह अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या आहेत...हा घ्या पुरावा...

नव जागृती कर्मचाऱ्याना आणि स्ट्रींजर रिपोर्टरना आवाहन

गेल्या काही महिंन्यापासून नव जागृती कर्मचाऱ्यांचा पगार तर स्ट्रींजर रिपोर्टरचे मानधन मिळाले नसल्याच्या तक्रारी बेरक्याकडे आल्या आहेत...त्यांनी खालील पाऊल उचलावे...
आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी कामगार न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो 
Go to Asst Labor Commissioner 
420, 32, 34 चा गुन्हा दाखल करा...
Indian Broadcasting Foundation
कड़े तक्रार करा
त्यांच्या कंटेंटविरोधात तक्रारी करा
इथेही तक्रार करा -
http://emmc.gov.in/
News Broadcasting Standards Authority
C/o News Broadcasters Association
Reg. Off.: 101-103, Paramount Tower
C-17, Community Center, Janakpuri,
New Delhi - 110 058.
Email: authority@nbanewdelhi.com

................


 जागृती अॅग्रो फुडस्च्या मालकाविरूध्द काही दिवसांपुर्वी चंद्रपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.त्याची बातमी लोकसत्तामध्ये प्रसिध्द झाली होती.त्या बातमीचे कात्रण असल्यास ई - मेल करा ..त्यावर प्रसिध्द झालेली तारीख लिहा. 
berkya2011@gmail.com

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीला रंग

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीला आता चांगलाच रंग आला आहे.विद्यमान अध्यक्ष देवदास मटाले आणि शशिकांत सांडभोर यांच्यात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून,ऐकमेकांची खालच्या थरावर बदनामी सुरू आहे.त्यामुळे आता ही निवडणूक मुद्दावरून गुद्दावर आली आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मालकीचा लोणावळ्यात विश्रामधाम आहे.त्यात आपल्या प्रेमीकाला घेवून कोण गेले,त्या प्रेमिकांच्या पतीस नोकर म्हणून कोण ठेवले,याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी एका चॅनलमध्ये असताना एका ACP अधिकाऱ्यांच्या पत्रकार मुलीस गुरू कसा करायचा असतो,असे म्हणून मांडीवर थाप मारणाऱ्यास थप्पड कशी बसली,अशी चर्चा पसरावली जात आहे.
या आरोप - प्रत्यारोपामुळे 27 जूनच्या निवडणुकीत कोणते पॅनल विजयी होणार,याकडं लक्ष वेधलं आहे.

अमरावतीच्या पाच पत्रकारांना पालकमंत्र्यांकडून विदेश वारी भेट

अमरावतीच्या पाच पत्रकारांना पालकमंत्र्यांकडून विदेश वारी भेट
24 ते 30 जून पर्यंत हे पाच पत्रकार सिंगापूरला जाणार 
सर्व खर्च पालकमंत्री करणार... 
भाग्यवंत पत्रकारांत समावेश न झाल्याने अनेकांची नाराजी...
........................
हे आहेत भाग्यवंत ... tongue emoticon
.............................
1)विलास मराठे (हिन्दुस्तान)
2)जयराम आहुजा (प्रतिदिन)
3) संजय शेंडे (आयबीएन लोकमत आणि पूर्ण वेळ एमसीव्हीसी शिक्षक महात्मा फुले शैक्षणिक संस्था अमरावती )
4) यशपाल वरठे ( दूरदर्शन आणि पूर्ण वेळ शिक्षक शिवाजी संस्था अमरावती)
5 वा कन्फर्म नाही पण शशांक चवरे एबीपी माझा याचे नाव होते पहिल्या चार जणांनी पासपोर्ट झेराँक्स दिल्या होत्या एबीपी ने द्यायची होती..
....................
अहमदनगर - कोपरगाव तालुक्यात सार्वमतचे पत्रकार काका खर्डे यांना पोलीस उपनिरिक्षक जगदिश मुलगिर यांनी केली बेदम मारहाण...
वाळूचे डंपर व जेसीबी पकडले व पैशाची तडजोड करत असताना फोटो काढले असता या गोष्टीचा राग येवुन मुलगीर यांनी हातातील दंड्याने केली मारहाण ...
मायगावदेवी ता.कोपरगाव येथील घटना...........................
राजेंद्र काळेंचे वृत्तदर्पण झाले पाच शतकी
बुलडाणा - दैनिक देशोन्नतीचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांच्या ’वृत्तदर्पण’ या साप्ताहिक स्तंभास 500 आठवडे पूर्ण झाले आहेत. एखाद्या जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक अन् सर्वच अंगांना स्पर्श करणारा लेखाजोखा एका साप्ताहिक सदराद्वारे मांडणारी राजेंद्र काळे यांची लेखनी खरोखर अभिनंदनास पात्र आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook