> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

पुढारीच्या पाठीत खंजीर खुपसून एस.के.एकमतच्या दारात

औरंगाबाद - बेरक्याची बातमी शंभर टक्के खरी ठरली आहे.कार्यकारी संपादक म्हणून निवड झालेल्या एस.के.ने पुढारीच्या पाठीत खंजीर खुपसून एकमतची वाट निवडली आहे.त्यामुळे नकटीच्या लग्नाला शतराशे साठ विघ्ने अशी पुढारीची अवस्था झाली असून,येत्या १७ सप्टेंबरचा मुहूर्त पुढे ढकलण्याची पाळी पुढारीवर येणार आहे.आतापर्यंत एस.के.ने दिव्य मराठी,लोकमत आणि आता पुढारीस धोका दिला असून,त्याची विश्वासर्हता फार धुळीला मिळाली आहे.
आर.टी.आणि एस.के.ची मागील लोच्यावरून पुण्यनगरीतून हकालपट्टी झाल्यानंतर आर.टी.पुन्हा पुढारीच्या दारात गेले होते,परंतु तेथे कल्याण पांडे यांनी जागा अडवून ठेवल्याने त्यांनी देशमुखांच्या बाभुळगावची गढी गाठली.सोबत परममित्र,परमस्नेही आणि ग्लासमेंट एस.के.होते.दोघांनी अमित देशमुख यांना एक कोटीची ऑफर दिली.तुम्ही औरंगाबाद आवृत्ती सुरू करा,सर्व खर्च भागवून वर्षाला एक कोटी आणि शिवाय तुमची सारी प्रसिध्दी करून देण्याचा विडा उचलला.
हे दोघेही बीडच्या ताईची शिफारस घेवून गेले होते.ताई लातूरच्या पालकमंत्री आणि वडीलांपासूनचे नाते,यामुळे अमित भैय्यांनी होकार दिला असून,आर.टी.हे एकमतचे सरव्यवस्थापक तर एस.के.हे औरंगाबाद आवृत्तीचे संपादक असा बेत ठरला आहे.त्यामुळे एस.के.पुढारीत जॉईन झाले नाहीत.इकडे लातूरला पुढारीतून आलेल्या मंगेशास कसलाही थांगपत्ता नाही.सारे काही परस्पर ठरले जात आहे.मंगेशाही सपशेल फेल ठरल्याने एस.के.ची टांगती तलवार मंगेशाच्या डोक्यावर लटकणार आहे.
पुढारीच्या कार्यकारी संपादक पदासाठी एस.के.ची निवड केल्यास मोठी समस्या निर्माण होईल,असा इशारा बेरक्याने दिला होता,परंतु पद्मश्रींच्याजवळ असलेल्या सुरेश पवार यांनी मोठा घोळ गेला.त्यांनी एस.के.ची निवड केली.एस.के.पुढारीत आल्यामुळे पिंपळवाडकर पुण्यनगरीत गेले.आता तेल गेले,तूप गेले आणि हाती धुपाटणे आले अशी म्हणण्याची पाळी पुढारीवर आली आहे.
पुढारीची औरंगाबाद आवृत्ती १७ सप्टेंबर रोजी सुरू होणार होती.अजून कार्यकारी संपादकाचा पत्ता नाही.आहे ते चार दोन कर्मचारी पुन्हा जुन्या ठिकाणी जात आहेत.त्यामुळे पुढारीचा लॉचिंगपुर्वीच फियास्को झाला आहे.
जिथे आर.टी.तिथे एस.के.ही जोडगोळी का,याचे उत्तर आहे,पॉकेट जर्नालिझम.या दोघांच्या अनेक सुरस कथा बेरक्याकडे येत आहेत.ते यथाआवकाश प्रसिध्द करू.मात्र एस.के.ने दिव्य मराठीला धोका देवून पुण्यनगरी जॉईन केले.लोकमतला सिटी एडिशनचा संपादक म्हणून जॉईन होतो म्हणून पुन्हा पुण्यनगरीतच राहणे पसंद केले आणि आता पुढारीला येतो म्हणून एकमत जॉईन करणे,हा गेल्या पाच वर्षातील तिसरा धोका आहे.यामुळे एस.के.ची विश्वासर्हता शून्य झाली असून,एस.के.चा एकमत हा शेवटचा पेपर राहील.तसेच  आर.टी.आणि एस.के.यांचे हे एकमत किती दिवस टीकणार,हे आगामी काळातच कळेल.
आता पुढारीला नविन कार्यकारी संपादक शोधावे लागेल.पर्याय एकच आहे.मुुंबईहून विवेक गिरधारी यांना औरंगाबादला आणून बसवणे आणि गिरधारी आले तर औरंगाबाद आवृत्ती दमदार सुरू होतील अन्यथा पुढारी असून नसल्यासारखा राहील.पुढारीवाल्यांनो आता तरी शहाणे व्हा.चांगली माणसे निवडा.ज्या गावच्या बोरी,त्याच गावच्या बाभळी असतात,आता तरी पटले ना...

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

सुशिल कुलकर्णी पुढारीत येताच पिंपळवाडकर पुण्यनगरीकडे...

औरंगाबाद - बेरक्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.पुण्यनगरीतून बाहेर पडलेल्या सुशिल कुलकर्णी यांंची पुढारीच्या कार्यकारी संपादकपदी वर्णी लागली आहे.त्याची अधिकृत घोषणा समुह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांनी औरंगाबादमध्ये करताच,निवासी संपादक भालचंद्र पिंपळवाडकर यांनी पुढारीचा राजीनामा दिला.ते १६ ऑगस्ट रोजी पुण्यनगरी जॉईन करणार आहेत.
गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर औरंगाबादेत पुढारी अखेर १६ सप्टेबर रोजी सुरू होत आहे,परंतु सुरू होण्यापुर्वीच औरंगाबादेत नाट्यमय घडामोडी घडत आहेत.सुशिल कुलकर्णी यांना पुण्यनगरीतून काढले की त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला याबाबत वेगवेगळा मतप्रवाह असला तरी कुलकर्णी यांना पुढारीची बंपर लॉटरी लागली आहे.
कुलकर्णी पुढारीमध्ये येत असल्याची कुणकुण लागलाच,पुर्वीचे निवासी संपादक भालचंद्र पिंवळवाडकर यांनी अगोदरच पुण्यनगरीबरोबर सेटींग केली होती.तसे वृत्त बेरक्याने प्रसिध्द केले असता,डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोल्हापूरहून समुह कार्यकारी संपादक सुरेश पवार काल औरंगाबादेत दाखल झाले,त्यांनी पिंपळवाडकर यांच्याबरोबर समेट घडवण्याचा प्रयत्न केला परंतु कुलकर्णी यांना सर्वाधिकार देण्यात आल्यामुळे पिंपळवाडकर यांनी पुढारी सोडणे पसंद केले.ते येत्या १६ ऑगस्टला पुण्यनगरी जॉईन करत आहेत.पुण्यनगरीच्या संपादकपदी सुंदर लटपटे यांची वर्णी लागली असतानाही पिंपळवाडकर यांनी लटपटेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला परंतु सुशिल कुलकर्णी यांच्यासोबत काम करण्याचे नाकारले.
पुढारीने आपणाबरोबर विश्वासघात केल्याचे पिंपळवाडकर यांचे म्हणणे आहे.सुशिल कुलकर्णी हा ज्युनिअर आहे,एका ज्युनिअरच्या हाताखाली काम करण्यापेक्षा एका सिनिअरच्या हाताखाली काम केलेले बरे म्हणून त्यांनी पुण्यनगरीचा रस्ता निवडला.कुलकर्णी पुढारीत येताच पिंपळवाडकर पुण्यनगरीत जात असल्यामुळे इकडेच तिकडे आणि तिकडचे इकडे हा खेळ सुरू होणार आहे.

रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

बाबूजी जरा संभलना, पेपरमें क्या है जरा देखना...

श्रावण महिन्यात अन्नदान केल्याने म्हणे पुण्य लाभते. हे पुण्य मिळविण्यासाठी अनेक जण उदार होतात. त्यातल्या त्यात बाबूजी पडले अतिउदार... त्यांनीही अन्नदानाचे हे पुण्य मिळविण्यासाठी म्हणे, श्रावण शनिवारी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादकडे पायी जाणा-या भाविकांना फराळाचे वाटप केले...(त्याची बातमी लोकमतमध्ये शनिवारच्या ६ ऑगस्टच्या अंकात प्रसिध्द झाली आहे.) पण बाबुजींनी काही चांगले केलेले न बघवणा-या मंडळींच्या डोळ्यांत हे खुपले असावे. कारण त्यांच्याच पेपरात म्हणे, अशा प्रकारे अन्नदान करणा-यावर यथेच्छ टीका करण्यात आली... पेपर बाबुजींचा अन् टोमणाही बाबूजींना... हे बघून वाचकांचे डोळे भलेही फिरले असतील, पण शेवटी लोकमत किती निर्भिड अन् निपक्षही आहे, याचेही दर्शन घडले ना! मालक चुकला म्हणून काय झाले, त्यालाही  दरडावयला हवे की नको!!
रविवारच्या, सात ऑगस्टच्या अंकात पान २ वर 'वावर' या सदरात गजानन दिवाण यांनी श्रावण महिन्यात अन्नदान करणा-या तमाम मंडळींना (अर्थात बाबुजींनाही) झोडपले. पोट भरलेल्यांना खाऊ घालण्यात कसले आले पुण्य, असा सवाल त्यांना केला... (हा सवाल पाहून नंतर हा लेख छापल्याबद्दल बाबुजींनी संपादकाला काय काय सवाल केले असतील देव जाणे.) एवढ्यावरच न थांबता दिवाण नावाच्या या महाशयांनी अन्नदान करणाèयांची आर्थिक मिजासखोरीही काढली (त्यात बाबुजी आलेच.) सध्या पैसा भरपूर आहे, पण तो काहीच लोकांकडे आहे, पण त्यांनाही समाधान नाही. मग अन्नदानातून अशा वेगवेगळ्या मार्गाने समाधान शोधण्याचा प्रयत्न केला जातो, असेही सांगायला दिवाण यांनी कमी केले नाही. हा सर्व लेख वाचल्यानंतर बाबुजींनी आशू दर्डा यांच्यासह जाऊन जे अन्नदान केले, ते पुण्यासाठी नव्हे तर समाधानासाठी केले, असे जणू या लेखकाला सूचवायचे असावे. अन्नदानाच्या चुकीच्या (!) कृत्याबद्दल ज्या निर्भिडपणे लोकमतच्या संपादकांनी मालकाचे कान टोचले याला तोड नाही. (अर्थात बाबुजींच्या ही बाब लक्षात आली असेल तर संपादकांचा ते नक्कीच या निर्भिडपणाबद्दल सत्कार करतीलच, नाही का?)  दिवाण यांचा लेख वाचून बाबुजींना निश्चितच काहीतरी चुकीचे केल्याची जाणीव होईल आणि ते केलेल्या अन्नदानाबद्दल पुन्हा लोकमतमध्ये जाहीर दिलगिरीही व्यक्त करतील, असे वाचकांना 
वाटल्याशिवाय राहिले नाही. एवढे मात्र खरे की, हा सारा प्रकार संपादकांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करणारा ठरला आहे, मालकाच्याच कृत्याला अशा प्रकारे त्यांच्याच वृत्तपत्रात चुकीचे ठरवणारा संपादक जगाच्या पाठीवर पहिलाच असावा. दिवाण यांचा लेख चांगला असला तरी, त्याचा टोन योग्य पद्धतीने घेतला असता, एकवेळ दूर्लक्षित केले गेले असते, पण साराच प्रकार जणू बाबुजीशी असलेली खुन्नस काढण्यासाठीच असावा, असा संशय येतो...(!)


शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

पत्रकारांना विचार करायला लावणारे एक पत्र...

सर्व पत्रकार बांधवांस,
सप्रेम नमस्कार ....
पत्रास कारण की, काल वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला मंत्र्याने दिलेली उद्दाम वर्तणूक पाहिली. मंत्री चुकलेच, पण माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
संबंधित मंत्री जे काही बोलले तो प्रसंग चुकीचा असला तरी त्यांनी जे काही सांगितले ते मात्र अजिबात चुकीचे नाही. *तुम्ही टीआरपीसाठी काहीही करू शकता* असे मंत्रयांचेच नाही तर सामान्य माणसांचेही म्हणणे आहे.
26/11 च्या हल्ल्यात तुम्ही जे वागलात ते आम्ही पाहिले. कालच्या *महाड दुर्घटनेत तुम्ही प्रतिक्रिया घेण्याच्या नावाखाली जो काही धुडगूस घालत होता तेही आम्ही पाहिले*. तुम्ही बीबीसी वगैरे बघत नसाल कदाचित. त्यामुळे *गांभीर्य वगैरे प्रकारांशी तुमचा काहीही संबंध आलेला नाही*. परवा फ्रान्सच्या नाईस शहरात दहशतवादी हल्ला झाला. मी एकही मृतदेह माझ्या टीव्हीच्या पडद्यावर पहिला नाही, रक्त नाही आणि *झीट आणणारा बूमधारी सर्वज्ञांचा कर्कश कोलाहलही नाही*. तो मला 9/11 लाही दिसला नव्हता.
एक लक्षात घ्या, *तुम्ही पत्रकार आहात न्यायाधीश नाहीत*. तुमची बदललेली भाषा कळते आम्हाला. "याना शिक्षा करा," "याना फासावर लटकवा," "यांची चामडी सोला," "यांचे राजीनामे घ्या" असले तुमचे मथळे. आणि भाषा अशी की, सगळे ज्येष्ठ तुमच्यासोबत शाळेत गोट्या खेळत होते. अजून शेंबूड पुसता येत नाही अशी तुमची अँकर माजी मुख्यमंत्र्यांना थेट नावाने हाक मारते. "जी", "सर" असली आदरार्थी विशेषणे फक्त तुमच्या टुकार संपादकांसाठी आहेत, असा तुमचा समज असेल तर तसे एकदा जाहीरच करून टाका.
तुम्ही जनहितार्थ असाल तर तसेही काही नाही. *पक्ष व व्यक्ती बघून तुमचा आवेश ठरतो*. रोज उठून लोकांना ढुशा देणारा "बोधामृतफेम" संपादक स्वतःच लिहिलेला अग्रलेख दुसऱ्या दिवशी चक्क मागे घेतो. डुकराचे कार्टून छापणारं वृत्तपत्र जाहीर माफी मागतं. एका वृत्तपत्राचा आणि वाहिनीचा मालक चार महिने जेलात आहे. दुसऱ्या वाहिनीचा मालक कोळसा घोटाळ्यात आहे. *एक आमदार लाईव्ह टेलिकास्ट मध्ये संपादकाने कशी पाकिटे घेतली त्याचा उद्द्धार करतो*. एक पत्रकार, पत्रकारांवरच सेन्सॉरशिपची मागणी करतो, दुसरी पत्रकार त्याला शिव्या देते, एक दीड शहाणा गोमांस खातानाचा फोटो फेस बुकवर टाकतो, एका इंग्रजी दैनिकाचा पत्रकार फेसबुकवर हिंदुत्ववाद्यांची अर्वाच्च्य शब्दात आई-बहीण काढतो, आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तुमच्या संघटना दबाव आणतात तेव्हा तुमची निषेधाची तोंडे का बंद होतात?? *तेव्हा कुठे जातो तुमचा ताठ कणा आणि बाणा*??
तुम्ही गप बसलात तरी *सोशल मीडिया नावाचा तुमचा बाप जिवंत आहे हे लक्षात ठेवा*.
*मेहता चुकलेच. पण पत्रकाराचा प्रश्न काही फार बरोबर होता असेही नाही. "लोकांच्या मनात तुमच्याबद्दल रोष आहे" हा आपत्कालीन स्थितीतला प्रश्न आहे का?* आपत्कालीन स्थिती प्रशासनाने हाताळायची आहे, त्यासाठी नियंत्रण कक्ष असतो. तिथे काय स्थिती आहे, हे एकाही चॅनेलने दाखवली नाही. एखाद्या माणसाला शोधायचे आणि त्याला ठोकून काढायचे, *हे धंदे बंद करा. गांभीर्य ओळखा*.
*मंत्री आजपर्यंत खासगीत तुम्हाला शिव्या घालत होते, आज जाहीर घालू लागलेत.*
खांडेकर म्हणाले "देवा, या देशाला नेत्यांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येणार आहे." लोक म्हणतात, "देवा, या देशाला पत्रकारांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येऊन गेली आहे"
आणि *हा प्रसंग तुम्ही तुमच्या कर्माने स्वतःवर आणला आहे*, हे वेळीच लक्षात घ्या, नाहीतर *जी काही छाटकभर इज्जत आणि विश्वासार्हता शिल्लक राहिली आहे तीपण गमावून बसाल*.
-----------------------------------------

अर्थात फॉरवर्डेड... 

-----------------------------------------
● मुंबईतील मंत्रालय पत्रकारांच्या "रायटिंग जर्नालिस्ट्स" या ग्रुपवर आलेली ही पोस्ट.....

‘लोकमत’ची पुन्हा बनवेगिरी

पुण्यात लोकमत - सकाळमध्ये चांगलेच युध्द पेटले आहे.लोकमतने आपल्या अंकात वृत्तपत्र विक्रेत्यांनी लोकमतचा सत्कार केल्याचे वृत्त प्रसिध्द करताच,सकाळने लोकमतची चांगलीच पोल खोलली आहे...
पुणे - खप वाढविण्यासाठी कट-क्‍लृप्त्या, आमिषे आदी सवंग मार्गांचा वापर करणाऱ्या ‘लोकमत’चा फेकाफेकीमध्ये राज्यात कुणीही हात धरू शकत नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे. सर्व विधिनिषेध गुंडाळून ठेवून स्वत:चीच पाठ बडवल्यानंतर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या खोट्या प्रतिक्रियाही त्यांनी छापल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या तोंडी चुकीची वाक्‍ये घालण्यात आली, असे संबंधितांनी स्पष्ट केल्याने ‘लोकमत’ची बनवेगिरी पुन्हा उघड झाली आहे.

फुटकळ सर्वेक्षणाचा डांगोरा पिटणाऱ्या या वृत्तपत्राने पहिल्यापासून दिशाभूल करण्याचे काम केले. आपल्या जाहिरातीतील आकडे नेमके कशाचे आहेत, हेदेखील त्याला तेथे स्पष्टपणे सांगता आले नाही. तसेच ‘नंबर वन’ची शहरभर फ्लेक्‍सबाजी करूनही पुण्यातील आणि पुणेकरांच्या मनातील ‘सकाळ’च्या अढळस्थानाला आपण साधा ओरखडाही लावू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर आणि असल्या सर्वेक्षणाला पुणेकर भीक घालत नसल्याचे कळल्यावर ‘लोकमत’ने कटकारस्थानांचे आणखी एक पाऊल टाकले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेला गळ घालण्याचा प्रयत्न केला. संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या तोंडून आपला गुणगौरव करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे वृत्तपत्र ‘नंबर गेम’साठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे स्पष्ट झाले.

विजय पारगे म्हणाले, ‘‘आमची संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून पुणेकरांपर्यंत वृत्तपत्रे पोचण्याचे काम करते. त्यामुळे कोणाची किती ताकद आहे याची आम्हाला चांगली माहिती आहे. म्हणून पुण्यात पहिल्यापासून ‘सकाळ’ हेच पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. त्यासाठी असल्या सर्व्हेचा आधार घेण्याची काही गरज नाही आणि वृत्तपत्रांचा खप ठरवणारी ‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन’ (एबीसी) हीच एकमेव संस्था आहे याचीही आम्हाला माहिती आहे. पुण्यामध्ये वृत्तपत्रांच्या खपात ६० ते ६५ टक्के वाटा एकट्या ‘सकाळ’चा आहे आणि उर्वरित ३५ ते ४० टक्‍क्‍यांत इतर सारी वृत्तपत्रे येतात.’’

‘सकाळ’च्या जाहिरातीत ‘नंबर वन’ला पगडी घातली म्हणून ‘लोकमत’चा पोटशूळ उठला आहे कारण त्यांच्या जाहिरातीत ‘नंबर वन’च्या सावलीला बसलेल्या व्यक्तीला पगडी घातली आहे. पगडी कुणाला घालायची हे अस्सल पुणेकरांकडून त्यांनी शिकावे. राज्यभर टोप्या घालण्याचे उद्योग केल्यानंतर पुण्यात ‘पगडीचे सोंग’ आणून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न येथील जनता खपवून घेत नाही, हे गेल्या १८ वर्षांतही न समजल्याने त्यांचे वाममार्गांचे प्रयोग सुरूच राहणार असल्याचे आता साऱ्यांना माहिती झाले आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया
‘पुण्याचा ध्यास, श्‍वास आणि मानसन्मान सकाळ’

पुण्याचा ध्यास, श्‍वास आणि मानसन्मान म्हणजे सकाळ. घरातल्या छोट्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या सर्वांचे आवडते दैनिक म्हणजे सकाळ. दर्जेदार पुरवण्या व असंख्य उपक्रमांचा खजिना वाचकांपर्यंत पोचविणारे एकमेव दैनिक म्हणजे सकाळ. यामुळेच ‘एबीसी’ व इंडियन रीडरशिप सर्व्हेमध्ये सकाळने नं. १ चा किताब पटकविला आहे. कमी किंमत व भेट वस्तूंची आमिषे दाखविणारे किती तरी दैनिके आली तरी सकाळने आपला नं. १ कायम ठेवला आहे आणि राहील.
- दत्तात्रय पिसे, वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ

पुणे म्हणजे ‘सकाळ’ हे समीकरणच आहे व भविष्यातही राहील. गेली ८० वर्षे सकाळने पुणेकरांच्या मनावर राज्य केले आहे व इथून पुढेही ‘सकाळ’ सदैव आघाडीवर राहील.
- अनंता भिकुले, कार्याध्यक्ष

आज ही पुणे शहरातील कोणत्याही विक्रेत्यांकडे त्याच्या व्यवसायात सकाळचा अंक किती आहे याला खूप महत्त्व आहे. विक्रेत्या बांधवच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा ‘सकाळ’चा आहे. त्यावरून ‘सकाळ’ नंबर वन आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सकाळ हा नंबर १ आहे आणि भविष्यातही राहणार यात काही शंका नाही.
- अरुण निवंगुणे, सचिव

जनसामान्यांशी नाळ असलेले एकमेव वृत्तपत्र असल्याने ‘सकाळ’ कायमच पुण्यात आघाडीवर आहे आणि राहील. इथूनपुढे वाचकांची पहिली पसंती सकाळच राहील.
- राम दहाड, सहसचिव

‘सकाळ’ गेली ८० वर्षे पुणेकरांच्या हृदयात बसला आहे. पुण्यात बाहेरून आलेले नागरिकही प्रथम ‘सकाळ’चीच मागणी करतात. हा माझा गेली कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘सकाळ’ला कधीच कोणत्या स्कीमची गरज लागली नाही.
- प्रमोद परुळेकर, माजी अध्यक्ष

पुणे शहरात वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून काम करताना विविध प्रसंगात सकाळचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याचे अनुभवले. सकाळचे स्थान अबाधित आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञांची गरज नाही.
- रमेश बोराटे, माजी अध्यक्ष

पुण्यामध्ये अजूनपर्यंत सकाळला पर्याय नाही व भविष्यातही पर्याय निर्माण होऊच शकत नाही.
- वैजनाथ कानडे, माजी उपाध्यक्ष

कोणत्याही शहराचा एक चेहरा असतो. पुण्याचा चेहरा हा ‘सकाळ’ आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही आकडेवारीची गरज नाही. ‘सकाळ’ला धक्का पोचवण्याचे स्वप्न अनेक वृत्तपत्रांनी पाहिले; पण ते स्वप्नच राहिले आहे.
- संजय भोसले, खजिनदार

वृत्तपत्र व्यवसाय करताना विविध वाचकांशी संवाद साधता येतो. वाचकांचे सकाळवर असलेले प्रेम सर्वाधिक आम्हाला पाहता येते. इतर कोणत्याही दैनिकाबद्दल एवढी निष्ठा वाचकांमध्ये दिसत नाही. सकाळ कायम पुण्यासाठी नंबर वन दैनिक आहे, याबद्दल तिळमात्र शंका नाही.
- सुनील बरके, उपाध्यक्ष

सकाळ पेपर वाचल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. वाचक वर्षानुवर्षे सकाळ वाचत असल्यामुळे त्यांना स्कीमचा पेपर दिला तरी ते आमच्याकडे सकाळ पेपरचीच मागणी करतात. माझ्या आणि इतर विक्रेत्यांच्या मराठी पेपरच्या तुलनेत सकाळचा शेअर ६० टक्के आहे व इतर मराठी दैनिक मिळून ४० टक्के आहेत आणि राहणार. म्हणून सकाळच आमच्यासाठी नंबर १ आहे.
- सचिन मुंगारे, उपाध्यक्ष

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील असंख्य वाचकांच्या मनात उतरलेले दैनिक म्हणजे सकाळ होय. आणि याची जाणीव आम्हाला वाचकांकडून वेळोवेळी होते. समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोचलेले आणि त्यांच्या विश्‍वासास पात्र ठरलेले दैनिक म्हणजे ‘सकाळ’.शहरात नवीन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पसंती सकाळच असते.
- प्रवीण माने, उपाध्यक्ष

आमच्या हडपसर भागात ग्राहकांची पहिली मागणी सकाळच असते व बाहेरगावांहून आलेल्या ग्राहकांनी पुण्यात चांगला पेपर कोणता विचारले असता, आम्हीही ‘सकाळ’चेच नाव सांगतो. पुणे म्हणजेच सकाळ.
- दिनकर कापरे, उपाध्यक्ष

गेली २५ वर्षे वृत्तपत्र विक्री व्यवसायात आहे. तेव्हापासून आजतागायत सकाळच नं. १ आहे आणि तो राहणार हे निर्विवाद सत्य आहे. सत्य मांडणी, शुद्ध लेखणी व संस्कारक्षम ‘सकाळ’ने वेळोवेळी जनतेचे हित जोपासले आहे म्हणूनच सकाळ नं. १ आहे.
- वसंत घोटकुले, संघटक

‘सकाळ’ पुण्याचा आत्मा आहे. दिवसाची सुरवात ‘सकाळ’नेच होते. ‘सकाळ’ची लेखणी बातमी नेहमीच दर्जेदार असते. ८५ वर्षांची परंपरा लाभलेला आणि समाजाशी नाळ जोडलेला ‘सकाळ’ ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपले एक नंबरचे स्थान टिकवून आहे.
- राजकुमार ढमाले, सल्लागार

नवनवीन विचार, कल्पना मांडणारे ‘सकाळ’ हे पुण्यातले एकमेव वर्तमानपत्र. पुण्याच्या संस्कृतीशी नाळ जोडलेली असल्याने ‘सकाळ’ कायमच आघाडीवर आहे आणि राहील. संस्कारक्षम लेखनशैली हे सकाळचे वैशिष्ट्य आहे.
- आनंद निबांळकर, विभागप्रमुख, कॅम्प विभाग

‘सकाळ’ म्हणजे पुण्याचा श्‍वास आहे. सकाळी उठल्यावर चहाबरोबर ‘सकाळ’च हवाय. ‘सकाळ’चे उपक्रम मग ते नैसर्गिक आपत्तीतील मदत असो, की बस डे, तनिष्का गट... हे सर्व कौतुकास्पद आहे. पुणे वृत्तपत्र विक्रेत्या संघाच्या सर्व विक्रेत्यांचा अपघाती विमा उतरवणारे सकाळ हे एकमेव दैनिक आहे.
- चैतन्य गणपुले, विभागप्रमुख, अप्पा बळवंत चौक

सकाळ म्हणजे परिवारातील कर्त्या व्यक्तीप्रमाणे आहे. सर्व स्तरातील बातम्या निर्भीडपणे मांडणारे व्यासपीठ म्हणजे ‘सकाळ’. पेपर वाचल्यावरच समाधान मिळते व ‘सकाळ’च १ नंबरचे दैनिक आहे, यात तिळमात्र शंका नाही. 
- जितेंद्र मोरे, विभागप्रमुख, बोपोडी विभाग

पुण्यात ‘सकाळ’ कायमच निर्विवादपणे १ नंबर आहे. इतर दैनिकांच्या स्कीम सकाळच्या वाचकांना सांगितल्या तरी ते सकाळचीच मागणी करतात हा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे.
- संतोष लोहार, विभागप्रमुख, चंदननगर

सकाळ कायमच पुण्यात आघाडीचे दैनिक राहिले आहे. आजही एकूण मराठी पेपरच्या संख्येत ६० टक्के वाटा हा ‘सकाळ’चाच आहे.
- वेगनाथ काळे, विभागप्रमुख, हडपसर विभाग

वृत्तपत्र व्यवसायात आमची चौथी पिढी कार्यरत आहे. सुरवातीपासून आमच्या व्यवसायत ‘सकाळ’चे योगदान इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेत खूप आहे. माझ्याकडे एकूण मराठी वर्तमानपत्रांच्या संख्येत ‘सकाळ’च ६५ टक्के आहे. आणि उर्वरित वर्तमानपत्रे ३५ टक्के आहेत. वाचकांचा ‘सकाळ’कडे आलेला कल पाहता, ‘सकाळ’च्या जवळपास कोणते दैनिक पोचेल असे वाटत नाही.
- यतिन चौधरी, विभागप्रमुख, वारजे विभाग

कोणी वृत्तपत्राने माझ्या तोंडी ते नंबर वन असल्याचे प्रसिद्ध केले असेल तर ते चुकीचे आहे. कारण मी तसे कधीच म्हणालो नाही. 
- विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटना
esakal 

पुण्यात लोकमत - सकाळ युध्द पेटले...

पुण्यात हंसाचा हवाला  देवून लोकमतने नंबर 1 चा दावा केल्यानंतर सकाळने लोकमतविरूध्द जोरदार मोहीम उघडली आहे.
एबीसीची आकडेवारी देत सकाळने लोकमतला कोंब फुटलेला कांदा म्हटले आहे.त्यामुळे लोकमतचा वांदा झाला आहे.


गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

बेजबाबदार प्रकाश मेहतांची उद्धट उत्तरं, पत्रकाराला धमकी

महाड - येथील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री प्रकाश मेहता यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अनास्था व दडपशाहीची वर्तणूक आज (गुरुवार) कॅमेऱ्यात कैद झाली. ‘साम‘ टीव्हीचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी विचारलेल्या प्रश्‍नामुळे प्रकाश मेहता यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि तांबे यांच्या अंगावर ते धावून गेले. ‘कोसळलेल्या पुलाविषयी आणि पीडितांच्या नातेवाईकांविषयी प्रश्‍न विचारल्यामुळे मेहता आणि कार्यकर्त्यांचा तोल गेला. विशेष म्हणजे, कालही दुसऱ्या एका दूरचित्रवाहिनीच्या पत्रकारांसह मेहता यांचा वाद झाला होता.
काय आहे प्रकरण:

‘मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये का केली नाही?’ असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. ‘याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली.

इतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं एकीकडे लोकांचे जीव गेल्यानंतरही सरकारचा उद्दामपणा आणि धमकावणं सुरुच असल्याचं दिसतं आहे.

कोण आहे ही हंसा ?

पुणे - खरं तर महिलांचे वय,वृत्तपत्राचा खप आणि पत्रकारांचा पगार विचारू नये,परंतु लोकमतवाले हंसाचा हवाला देवून प्रतिस्पर्धी दैनिकाबरोबर विनाकारण पंगा घेत आहेत.
कोल्हापुरात पुढारी नंबर १ आहे.कोल्हापूर ही पुढारीची मातृभूमी.पुढारीबरोबर लोकमतने खूप स्पर्धा केली,त्यांची माणसे फोडली,परंतु कोल्हापूरचा हा पैलवान लोकमतला चारीमुंड्या चित्त केला.बॅकफुटवर आलेल्या लोकमतने हंसा नावाच्या एका खासगी संस्थेचा हवाला देवून कोल्हापुरात नंबर १ चा दावा केला,परंतु पुढरीने जसेच्या तसे उत्तर दिल्यानंतर लोकमतवाले गार झाले.
कोल्हापुरातील पुढारीबरोबरचा सामना हरल्यानंतर आता लोकमतने पुण्यात सकाळबरोबर पंगा घेतला आहे.हंसाचा हवाला देत त्यांनी पुण्यात नंबर १ चा दावा करून पुण्यात गेल्या काही दिवसांत दोनशे फ्लेक्स लावले आहेत.त्यानंतर सकाळने आजच्या अंकात लोकमतची फेकमफाक,बनावट दावे पुणेकरांसाठी विनोदाचा विषय अशी बातमी प्रसिध्द करून लोकमतला चँलेज केले आहे.सकाळची मातृभूमी पुणे आहे.पुणे म्हणजे सकाळ आणि सकाळ म्हणजे पुणे असे समीकरण आहे.
वास्तविक वृत्तपत्राचा खप केवळ आणि केवळ एबीसीच्या आकडेवारीवरून कळतो.एबीसीने पुण्यात सकाळचा खप ५ लाख ४५ हजार ९९५ तर लोकमतचा खप ७१ हजार ३५४ दिला आहे.सकाळच्या अर्धाही लोकमतचा खप नाही,मग हंसा अशी कशी खोटे बोलते ? याचा अर्थ पैसा देवून अहवाल तयार केला गेला,हे स्पष्ट आहे.हंसा ही कोणाची संस्था आहे,त्याचे डायरेक्टर कोण,ही संस्था खपाचा कशावरून निकष काढते याची उत्तरे लोकमतवाले देतील का ?
कोणी काही म्हटले तरी
मुंबई - महाराष्ट्र टाइम्स
पुणे - सकाळ
कोल्हापूर - पुढारी
नागपूर - लोकमत

सर्वात आघाडीवर आहेत.
एकंदरीत आकडेवारी पाहता सकाळ राज्यात नंबर १ आणि लोकमत नंबर २ वर आहे.स्कीमवर विक्री करण्यात येणा-या अंकाची आकडेवारी एबीसी पकडत नाही,त्यामुळे सकाळने लोकमतवर मात केली आहे.
यवतमाळच्या प्रकरणात संस्काराची माती झाल्यानंतर दर्डा बंधु बॅकफुटवर आले आहेत,राजेंद्रबाबू विधानसभा हरल्यानंतर आणि विजयबाबूची खासदारकी गेल्यानंतर दर्डा बंधु आता वृत्तपत्रसम्राट होण्याच्या प्रयत्नात आहेत,परंतु सध्याच्या डीजीटल युगात वृत्तपत्राचा खप टिकून राहणे अवघड आहे.
त्यामुळे हंसाचा हवाला देवून हसे करून घेवू नये,हाच आमचा सल्ला !

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

‘लोकमत’ची फेकमफाक;पुण्यात ‘सकाळ’च नंबर 1

वृत्तपत्रांच्या दुनियेत खपाचं मोजमाप ठरवायचा अधिकार फक्त ‘एबीसी’ या संस्थेचा आहे आणि ‘एबीसी’नं पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ‘सकाळ’च निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असतानाही लोकमतने कोणत्यातरी हंसाचा हवाला देत पुण्यात नंबर 1 चा दावा करत पुणे शहरात जवळपास 200 होर्डिग्स लावले होते,त्याचबरोबर काल पान 1 वर सर्व आवृत्तीमध्ये जाहिरात प्रसिध्द केली होती,त्याचा सकाळने चांगलाच समाचार घेतला आहे.सकाळची बातमी जशीच्या तशी प्रसिध्द करीत आहोत...
.........................................................................

पुणे -  झाला,‘लोकमत’चा पुन्हा रडीचा डाव सुरू झाला. पुण्यात लहान मूलही सांगतं पुण्याचं मुखपत्र, या शहराचं ‘नंबर वन’ दैनिक ‘सकाळ’च आहे. कित्येक वर्षे, अनेक दशके यात खंड नाही; तरीही कुठल्या तरी बिनबुडाच्या रोकडा मोजून करून घेतलेल्या तथाकथित सर्वेक्षणाचा आधार घेऊन ‘लोकमत’ची सुरू झालेली फ्लेक्‍स फेकमफाक पुण्यात चेष्टेचा विषय बनला आहे. हेच वृत्तपत्र अलीकडेपर्यंत ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशनचा (एबीसी) आधार घेऊन राज्यात पहिल्या क्रमांकाचा दावा करायचे. ताज्या एबीसी आकडेवारीने ‘सकाळ’च राज्यातही निर्विवाद नंबर वन असल्याचे स्पष्ट होताच ‘लोकमत’चे धाबे दणाणले आणि पुण्यात फ्लेक्‍सवरून कोल्हेकुई सुरू झाली. पुण्यात ‘सकाळ’च्या पहिल्या स्थानाबद्दल कधीच कोणाला शंका नव्हती. राज्यातही ‘सकाळ’ नंबर वन बनताच ‘एबीसी’ची आकडेवारी ‘लोकमत’साठी कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशा प्रकारची बनली आहे. 

वृत्तपत्रांच्या दुनियेत खपाचं मोजमाप ठरवायचा अधिकार फक्त ‘एबीसी’ या संस्थेचा आहे आणि ‘एबीसी’नं पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ‘सकाळ’च निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे. आपल्या कामाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या ‘सकाळ’पुढे पीछेहाट झाल्याने ‘लोकमत’चा रडीचा डाव सुरू आहे.

आकडेवारीतच बोलायचं, तर ‘एबीसी’नं प्रमाणित केल्यानुसार ‘सकाळ’चा जुलै ते डिसेंबर २०१५ या काळातला पुण्यातला खप ५ लाख ४५ हजार ९९५ प्रती इतका आहे. तर लोकांची साथ मिळवण्यात सपशेल अपयशी ठरल्याने ‘फेकमत’ निर्मितीत रमलेल्या ‘लोकमत’चा याच काळातला ‘एबीसी’नं मान्य केलेला खप अवघा ७१ हजार ३५४ प्रती इतका आहे.

‘एबीसी’च्याच आधीच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून २०१३ या सहामाहीत ‘लोकमत’चा राज्यातला एकत्रित खप १४ लाख ४८ हजार ४६३ प्रती इतका होता. जानेवारी ते जून २०१४ या सहामाहीत खपाचा हाच आकडा १४ लाख ६ हजार ४०२ प्रतींवर आला. जुलै ते डिसेंबर २०१४ या सहामाहीत खपाचा हा आकडा आणखी घसरून १३ लाख ८१ हजार ७१२ प्रतींवर आला. जानेवारी ते जून २०१५ या सहामाहीसाठी ‘लोकमत’ने ‘एबीसी’चे खपाचे प्रमाणपत्र घेतलेच नाही. जुलै ते डिसेंबर २०१५ या काळासाठी त्यांनी पुन्हा जेव्हा प्रमाणपत्र घेतले, तेव्हा त्यांचा राज्यातला एकत्रित खप आणखी खाली जाऊन १३ लाख २६ हजार १८८ प्रतींवर आला होता.

‘सकाळ’च्या पासंगालाही ‘लोकमत’ पुरत नाही अशी पुण्यातली स्थिती आहे. ‘सकाळ’च्या तुलनेत पुण्यात ‘लोकमत’ लढतीतच नाही. ‘सकाळ’ची ताकद जवळपास चौपट आहे. साहजिकच सारा प्रचार एखाद्या हिंदकेसरीच्या ताकदीवर जळणाऱ्या मरतुकड्यानं ‘मीच ताकदवान’ म्हणावे असा आहे. आता हे वास्तव पचवता येत नसल्यानं बनावटगिरीवर आधारलेला प्रचार सुरू झाला आहे. ‘लोकमत’ने जी कथित आकडेवारी रस्त्यावर मांडली ती ‘हंसा’ नावाच्या खासगी कंपनीकडून स्वतःच करून घेतलेल्या कथित सर्वेक्षणाची आहे. मुळात असल्या सर्वेक्षणाला माध्यमांच्या जगात कवडीची किंमत नाही. या फुटकळ आणि उठवळ प्रचाराचा अर्थ आपणच आपली आरती ओवाळण्यासारखा आहे. फेकमत तयार करायचा असाच प्रयत्न कोल्हापुरात झाला, तेव्हाही तो तोंडावर आपटला आणि कोल्हापुरात हे वृत्तपत्र गांभीर्यानं घ्यायचे कारण नाही असे जनमानस तयार झाले. असेच पुण्यातही घडते आहे. 

जे अस्तित्वात नाही, ते आहे असं मानून जगण्याला भ्रम म्हणतात. असं सतत भ्रमात राहण्याला भ्रमिष्ट होणं म्हणतात. पुण्यात ‘लोकमत’ने रस्त्या-रस्त्यावर फलक लावून जो तमाशा उभा केला आहे तो याचेच निदर्शक आहे. फलकांवर मिरवून कोणी नेता होत नाही, प्रत्यक्षातही आणि व्यवसायातही. त्या मिरवण्याला सत्याचा आधार नसेल, तर दावे हास्यास्पद ठरतात. पुण्यात ‘सकाळ’ निर्विवाद नंबर वन आहे. हे काही आज घडलेले नाही. यात ‘सकाळ’च्या समाजहितैषी कामगिरीचा वाटा मोठा आहे. ‘सकाळ’चे काम आणि विश्‍वासार्हतेचं नाणं खणखणीत आहे. त्यापुढे कितीही प्रयत्न करून डाळ शिजत नाही हे वर्तमानपत्रांच्या जगात अनेकांनी अनुभवले आहे.

पुणे असो की महाराष्ट्र मराठी माणसाचे ‘सकाळ’शी जडलेले नाते अकृत्रिम आहे. नित्यनवे आहे. ‘सकाळ’मध्ये वाचल्याखेरीज बातमीवर विश्‍वास न ठेवण्याची परंपरा महाराष्ट्रात तयार झाली आहे. यात कुठेच ‘सकाळ’समोर उभे राहता येत नाही, हे वारंवार सिद्ध झाल्यानंतर येणारे नैराश्‍य ‘लोकमत’च्या पुण्यातल्या आगाऊ फलकबाजीतून झळकत आहे. ‘एबीसी’च्या आकडेवारीनंतरही चाललेला हा फेकमत निर्मितीचा डाव पुणेकरांसाठी थट्टेचा विषय बनला नाही तरच नवल. 

लोकांची खरी साथ असलेल्या ‘सकाळ’ला खरंतर अशा भुक्कड प्रयत्नांची दखल घ्यायचे कारणही नाही. पण समाजात अकारण फेकमत पसरू नये यासाठी वास्तव सांगायलाच हवे. तथ्यहीन गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या, तर कदाचित जे नाहीच त्याचा बोलबाला होण्याचा धोकाही असतो. वृत्तपत्रातल्या चढाओढीला इतक्‍या सुमार पातळीवर नेले जात असेल, तर सत्य सांगायलाच हवे. वृत्तपत्रांचा खप प्रमाणित करणारी अधिकृत मान्यताप्राप्त संस्था ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन (एबीसी) हीच आहे. वाचकसंख्या प्रमाणित करणारी संस्था ‘आयआरएस’ आहे. यातील ‘आयआरएस’ची ताजी आकडेवारी नाही. त्यामुळं अधिकृतपणे वाचकसंख्येचं प्रमाणीकरण झालेलं नाही. मात्र, ‘एबीसी’चं सहामाही ऑडिट सुरूच आहे आणि या संस्थेच्या ताज्या उपलब्ध ऑडिटमधील आकडेवारीनुसार सकाळ महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचे दैनिक आहे. ज्या पुण्यातल्या विचारी विवेकी वाचकांसोबत फेकमफाक सुरू झाली आहे तिथे तर ‘सकाळ’ ‘लोकमत’च्या प्रचंड पुढे आहे. ‘सकाळ’ला मिळणारा प्रतिसाद, ‘सकाळ’चे उपक्रम, जाहिरातींना मिळणारा प्रतिसाद हे सारं चोखंदळ पुणेकरांनी अनेकदा जोखलं आहे. साहजिकच ‘लोकमत’चे तथाकथित पहिल्या क्रमांकाचे फलक पुणेकरांनी सकाळी सकाळी विनोद म्हणूनच पाहिले. 

ज्यांना असे विनोद करायचे ते करत राहोत. ‘सकाळ’चे पुण्यातले अढळस्थान निर्विवाद आहे.

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

"दिव्य" हे मराठी !

*"गार्डीयन कार्पोरेशन"वर "दिव्य" मेहेरबानी*
*मेन इश्यू पेज 5 (3 कॉलम)*
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/jalgaon/253/02082016/0/5/
*दिव्य सिटी पेज 2 (2 कॉलम)*
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/jalgaon/254/02082016/0/2/
● एकाच अंकात 'मेन इश्यू'वर 'सिटी'ला फोटो फ्री; कुणी केले असेल बरं *'सेटींग'* या पेजेसचे (पेजसेटींग!)
● खरेच इथे राज्य, मुख्य, समूह, कार्यनिवासी, अमुक-ढमुक *संपादक आहे/आहेत की नाही असा प्रश्न पडतो. असतील तर सारे बहुधा झोपा काढत असावेत!!*
● आता निर्लज्ज ढकलाढाकली सुरु होईल आणि जाहिरात विभागावर खापर फोडले जाईल कदाचित. *वार्ताहर, वाचकांच्या बातम्या/फोटो छापायला जागा नाही आणि कमर्शिअल फोटो एकाच अंकात दोन वेळा!!* वाचकांपर्यंत जे जाते त्याची जबाबदारी संपादकाचीच!! कार्यकारी *चुकीची जबाबदारी रात्रपाळीच्या संपादक/उपसंपादकाची* कारण प्रत्येक पान पाहून फायनल तोच करतो व रात्रीच्या प्रत्येक चुकीला न्यूजरूम इनचार्ज म्हणून तोच जबाबदार असतो.
● एकाच महिन्यात, एकाच अंकात, एक फोटो 2 वेळा छापण्याची ही सहावी वेळ आहे.
● *गल्लीतलं 1,000 खपाचं वर्तमानपत्रही अशा चुका वारंवार करत नाही*
*आगंतुक सल्ला/सवाल*....
● प्रशांतराव, अजून किती शांत राहणार? *हा पोरखेळ थांबवा*. तुमची कमांड दिसू द्या जरा (अभिलाषजींसारखी!!) .... कुणी कितीही पटवलं तरी पटू नका.... खुज्या, बांडगुळांना सांभाळून *आणखी किती वाट लावाल दर्जा, गुणवत्तेची?*

"दिव्य" हे मराठी !

● मुले *गाडी रडत असल्याचे पाहून* प्रवाशांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
● वसतिगृह  सोडल्यानंतर ही *दोघी* मुले भुसावळ जळगाव *एसटी*त *बसली*
● या कार्यालयात सकाळी *बाहेर राज्यातून* गुटखा आल्याची माहिती मिळाली.
● पानमसल्याचे 25 *कार्टून* पोलिसांना सापडले.
● पोलिसांना *किल्ल्यांचा* *गुच्छा* पडलेला दिसला.
🤖 👈🏻 *कार्टून*
*कर्टन* 👉🏻 📦

फेसबुक वर शेअर करा

Facebook