> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

राम तू 'अबोल' का ?

राम खटके जिल्हा प्रतिनिधी असताना दैनिक यशवंतच्या वर्धापनदिनाचा क्षण.मुख्य संपादक प्रा.मोतीपवळे यांना शुभेच्छा देताना मी.यावेळी राम आणि बाजूला ओमप्रकाश मोतीपवळे दिसत आहेत.
राम खटके साडेतीन वर्षापुर्वी दिव्य मराठीत उस्मानाबाद सिटी रिपोर्टर म्हणून ज्वाईन झाला.त्यापुर्वी तो लातूरहून प्रकाशित होणा-या दैनिक यशवंतचा उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी होता.यशवंतचे संपादक ओमप्रकाश मोतीपवळे हे माझे खास मित्र.मी लातूरला १९९० मध्ये एम.ए.करत असताना,दैनिक यशवंतमध्ये वृत्तसंपादक होतो.मोतीपवळे घराण्याशी माझे कौटुंबिक संबंध.माझ्या शिफारशीनुसारच राम यशवंतमध्ये ज्वाईन झाला होता.
रामची आर्थिक परिस्थिती मी जाणून होतो.त्यामुळे त्याला शक्य तितकी मदत करत होतो.नळदुर्गमध्ये दरवर्षी भरणा-या श्री खंडोबा यात्रेचा विशेषांक काढण्यास मी त्यास मदत करत होतो.त्यामुळे रामला जाहिरातीच्या माध्यमातून काही रक्कम मिळत होती.नोकरी करत तो पत्रकारितेची डिग्री पुर्ण करत होता.यशवंतचे ऑफीस जनता बँकेसमोरील नगर परिषदेच्या गाळ्यात आहे.तेथील इंटरनेट कनेक्शन ब-याच वेळा बंद असे.त्यामुळे रामला मी हक्काचा माणूस वाटत असे.त्यामुळे तो रात्रीचे एक वाजले तरी घरी येत असे आणि गुरू तुम्हाला त्रास देतो,एवढे पेज ईमेल करा,असे म्हणत असे.कधी झोपलेला असलो तरी डोळे चोळत 
त्यास हाक ऐकूण उठत असे आणि पान पाठवत असे,पण कधीच नकार दिला नाही.
मी त्याच्या ऑफीसमध्ये दिवसातून एकदा तरी जात असे आणि तासभर बसत असे.नाही गेलो तर त्याचा नक्कीच फोन येत असे,गुरू आज का आला नाहीत,म्हणून विचारत असे.किमान आजची विशेष बातमी काय,म्हणून विचारत असे.यशवंतमध्ये त्यास मानधन कमी होते पण मान जास्त होता.
पण तो जसा दिव्यमध्ये लागला तसे त्याचे येणे कमी झाले आणि बोलणेही कमी झाले.सकाळी साडेदहा वाजता तो ऑफीसला जात असे आणि रात्री ११ वाजेपर्यंत तो काम करत असे.कधी वाटेत भेटला तरी पाच मिनीटाच्या आत निघत असे.गुरू गरबडीत आहे,नंतर बोलू असे म्हणत असे.कधी पत्रकार परिषदेत भेटला तरी मोजकेच बोलत असे.
रोज तासन्तास बोलणारा राम असे मोजकेच बोलत असल्याचे पाहून मला कधी कधी वाईट वाटत असे.पण त्याला कसले तरी टेन्शन आहे,याची जाणीव मला झाली होती.तो मलाच नाही तर सर्व जवळच्या मित्रांबरोबर असेच वागत असे.तो पुर्वीप्रमाणे मनमोकळे का बोलत नाही,याची कारणे मला समजली होती.परंतु मी आताही त्याचा उहापोह करणार नाही.पण परिस्थितीमुळे तो गांजून गेला होता,हे नक्की होते.रोज बारा तास काम करणा-या रामबरोबर दिव्य प्रशासन कोडगेपणाने वागत आहे.त्याचा वेगळा पंचनामा केलेला आहे.
राम हा सभ्य, सरळ आणि साधा तरूण. काळाने त्याच्यावर मोठा आघात केला आहे.जसा तो अबोल झाला आहे,तेव्हापासून जीवाची घालमेल सुरू आहे.गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामवर कोसळलेले हे संकट माझ्यासह अनेक मित्रांवर आघात आहे.देवाने त्याच्यावर कृपादृष्टी ठेवून त्यास ठणठणीत बरे करावे,हीच प्रार्थना.

संपादक
उस्मानाबाद Live
www.osmanabadlive.com

मानकर सर तुम आगे बढो...

सरकारची प्रतिमा (चांगली की वाईट हा प्रश्‍न विचारायला बंदी आहे)  निर्माण करण्याचं काम माहिती आणि जनसंपर्क विभागाचें आहे.या विभागाचे "राज्याचे संचालक"(  ही नियुक्ती "अत्यंत तात्पुरती" आहे असं म्हणतात,खरं खोटं आम्हाला माहिती नाही.) शिवाजी मानकर हे काम अत्यंंत "खुबीने" पार पाडताना दिसताहेत.संचालक असलेले मानकर अधिस्वीकृती समितीचे "सदस्य सचिव" आहेत.सचिव या नात्यानं अधिस्वीकृती समितीचे इतिवृत्त तयार करण्यापासून ते अधिस्वीकृती समितीचे कामकाज "सुरळीतपणे" पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची जबाबदारी आहे.हे सारं करताना थोडे नियम,थोडे संकेत बाजुला ठेवण्याची कसरत केली तर चूक काय? असे त्यांना वाटते . तसे केल्याने  काही आकाश कोसळत नाही असे ही  त्यांचे म्हणणे असते . ते योग्यही  आहे .शेवटी आपण ज्या  अधिस्वीकृती समितीचे  सचिव आहोत त्या समितीची "स्वच्छ प्रतिमा" बाहेर  गेली पाहिजे असं त्यांना वाटणार असेल तर त्यात गैर (?) काय आहे? काही "चळवळे सदस्य" याला विरोध करतात,"कामकाज चुकीच्या पध्दतीनं चाललंय" म्हणत आक्षेप घेतात.गुन्हगारी पार्श्‍वभूमी असलेल्या सदस्याला समितीतून  तडीपार करा,तडीपार करा म्हणून कोकलत असतात..ते ओरडणं व्यर्थ (?) आहे.अहो तडीपार, तडीपार काय लावलेय ? तडीपार गुंड कुठे नाहीत? ,सर्वोच्च सभागृहापासून गावच्या पंचायतीपर्यत सर्वेत्र आहेत.पत्रकारांच्या समितीतही अशी एखादी "वल्ली"  असली तर बिघडले कुठे ?.समितीत सगळ्याप्रकारचे पत्रकार आहेत हे महत्वाचं नाही काय ? समितीत 27 सदस्य आहेत त्यातील  एखादा तडीपार व्हायला निघाला म्हणून त्याला समितीतूनच तडीपार करा असा आग्रह धरणे म्हणजे समितीलाच वेठीस (?)  धरण्यासारखे नाही काय ?.त्यामुळं कोण काय मागणी करतंय याकडं दुर्लक्ष करीत "त्यानं केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून तरी" त्याच्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्हयांकडं दुर्लक्ष करीत त्याला पाठीशी घातलंच पाहिजे.तसा "दिलेला शब्द पाळणं" हा माणुसकीचा आणि सभ्यतेचा  भाग नसावा काय? .मित्रांनो,तत्वं वगैरे दुसर्‍यांना सांगण्यासाठी असतात,आपल्यावर त्याबाबत भूमिका घ्यायची वेळ आल्यावर ती पाळायची नसतात एवढा व्यवहार तर  पाहिलाच पाहिजे ना.."एका गुन्हेगार  सदस्याला समितीतून तडीपार करा" अशी मागणी करणे हे "कृत्य" समितीची बदनामी करणारे आणि म्हणूनच  आक्षेपार्ह नाही काय ? नक्तीच आहे. म्हुणुन एका  सदस्यानं सुचविल्याप्रमाणं अशी मागणी कऱणार्‍या "चळवळ्या  सदस्यांचा"  समितीने निषेध करायला हवा आणि  तो एकमुखी झाला ( अगदी ज्या सदस्यांचा निषेध करायचा त्यांचाही या निषेधाला पाठिंबा आहे असं दाखवायला हवं ) असा उल्लेख इतिवृतांत करायला हवा.त्या शिवाय संबंधितांना अक्कल येणार नाही. शेवटी ही समिती देखील संस्कृती रक्षकांचीच आहे ना.? आपली संस्कृती काय सांगते ( आम्ही "संस्कृती" नावाच्या नाशिकमधील हॉटेलबद्दल बोलत नाहीत तो विषय गहन आहे.आम्ही बोलतो आहोत ते भारतीय संस्कृतीबद्दल) दुर्जनांनाही क्षमा केली पाहिजे,त्याच्यात बदल घडवून आणला पाहिजे.वाल्याला आपण सांभाळून घेत त्याला वाल्मिकी व्हायची संधी  दिली असेल तर समितीतील आपल्या मित्रालाही सांभाळून घेणं हे कर्तव्य आहे.त्याला जे विरोध करतात ते संस्कृती विरोधी,पत्रकारिता विरोधी आहेत यात शंकाच नाही.अशा  विरोधाकाना  गोबेल्सनं दाखवून दिलेल्या तंत्राचा अवलंब करून  नागडं केलं पाहिजे.
आठ गुन्हे दाखल असलेल्या "मित्राला" नंदुरबार आणि धुळे जिल्हयातून तडीपार करावे अशी शिफारस पोलिसांनी कलेक्टरांकडे केली म्हणून त्यांना समितीतूनही तडीपार करावे अशी मागणी करणे आणखी एका कारणासाठी चुकीचे आहे. समितीमध्ये पत्रकारितेतील विविध घटकांना प्रतिनिधीत्व दिलेले असते. त्यात साप्ताहिक,छोटे दैनिकं,मोठी दैनिकं,वाहिन्यांचे प्रतिनिधी,पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी असतात.सरकारची बाजु लावून धऱणारेही समितीत असतात.नियमात महिलांसाठी कोटा नसला तरी यावेळेस महिलांनाही  समितीत  खास  जी आर  काढून घेतले गेले आहे.अशा स्थितीत विविध गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचा प्रतिनिधी समितीत असला तर बिघडले कुठे ?  ( नाही तरी "गुन्हेगार पत्रकार" हा एक नवा घटक पत्रकारितेत सक्रीय आहे असा आरोप सर्रास केला जात असतो  ) पत्रकारावर एखादा गुन्हा दाखल असेल तर त्याला अधिस्वीकृती दिली जात नाही.तसा नियम आहे म्हणे..समितीतील हे महोदय उद्या "गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या पत्रकारांनाही अधिस्वीकृती मिळालीच  पाहिजे" यासाठी "दंड- बैठका" मारत मागणी करू  शकतात आणि त्या संबंधीची दुरूस्ती नियमातही करून घेऊ शकतात.(ते अशक्यही नाही कारण त्यांची बाजू समर्थपणे लाऊन धरणारेही काही सदस्य समितीत आहेतच ना..) त्यामुळे महाराष्ट्रातील काही  पत्रकारांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.अशा पत्रकारांचा दुवा मग  मौन धारण करून नरो वा कुंजरो वा भूमिका घेणार्‍या सदस्यांना मिळू शकेल.अशा स्थितीत चिमुटभरांची टिवटिव गंभीरपणे घेण्याचं कारण नाही..त्यामुळं मानकरसाहेब पुण्याच्या बैठकीचं इतिवृत्त तयार करताना आपण जी चलाखी दाखविलीत त्याबद्दलही आपलं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे.इतिवृत्त हे ऐतिहासिक दस्तऐवज(?) असेल तर त्यात काय घ्यायचे आणि काय नको हे किमान सदस्य सचिवांना कळलेच पाहिजे.समितीच्या बैठकीतला गोंधळ,काही सदस्यांनी दिलेल्या घोषणा आणि समितीच्या बैठकीतून केलेले सभात्याग या गोष्टी  इतिवृत्तात घेण्याचे  टाळून आपण जे अतिमहान कार्य केलंत त्याला अधिस्वीकृतीच्या इतिहासात तोड नाही.आपल्या या कार्याची नोंद नक्कीच या समितीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा झाल्याशिवाय राहणार नाही.पारदर्शक पारदर्शक कारभार म्हणजे तरी काय असतं हो,? "जे आपल्या सोयीचं असतं ते इतिवृतांत  घेणे,किवा करणे  आणि जे गैरसोयीचे असते ते टाळणे म्हणजे पारदर्शक कारभार ना" ?..या व्याख्येनुसार आपण पारदर्शक कारभाराचा एक चांगला नमुना पेश केलात..सर आपको सलाम आगे बढो...सर जमाना अच्छे दिन का आहे.  अशा सुमधुर काळात समितीतील दणदणाट कागदावर येणार नाही याची काळजी घेणं राज्याचे संचालक म्हणून आपलं कर्तव्यच आहे.आपल्या पारदर्शक कारभाराचे आम्ही तर फॅन झालो बुवा .पुढील तीन वर्षे समितीचा कारभार अशाच पारदर्शक(?) पध्दतीनं चालला पाहिजे.चार -दोघांनी आरडा ओरड केली म्हणून काय झाले सर ,आपण उपकृत केलेली काही मंडळी नक्कीच आपल्या सोबत आहेत,आणि मुख्य म्हणजे आम्हीही आपल्या सोबत आहोत.(माफ करा सर,पण आमच्या पाठिंब्याला एका सुप्त भितीचीही किनार आहे.नाशिकमध्ये म्हणे एका वरिष्ठ अधिकार्‍यानं पाच जिल्हयातल्या  आपल्या हाताखाली काम करणार्‍या  तब्बल 64 कर्मचार्‍यांवर 50 लाखांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.ज्या दिवशी कोर्टात तारीख असते त्या दिवशी पाच जिल्हयातील ऑफीसमध्ये सुकसुकाट असतो.आपण नाशिकचे असल्यानं हा अधिकारी कोण? हे आपणास नक्कीच माहिती असेल.आम्हाला तशीच  भिती वाटते सर.आम्ही पडलो पामर.  सत्तेच्या हो मध्ये हो मिळविला नाही आणि आमच्यावर पन्नास लाखांचा दावा दाखल केला गेला तर आमच्या दोन्ही किडण्या विकूनही आम्ही तेवढी रक्काम जमा करू शकणार नाही.तेव्हा पंगा कश्याला घ्या? असा आमचा व्यवहारी विचार..( समितीतील अन्य काही सदस्यांप्रमाणंच).. बरोबर आहोत ना सर आम्ही.. ) 
 ,
 . समितीच्या कामकाज कसं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं हे जगाला दिसलंच पाहिजे.आम्ही तरी बुवा त्याचं समर्थन करतो.पतसंस्था असतील,साखर कारखाने असतील यांच्या बैठकीतील इतिवृत्तांत तरी असे गोंधळ कुठे असतात.? आता हा पायंडा पत्रकारांच्या  सरकारी समितीतही पाडला जात असेल तर नवा बदल म्हणून त्याचंही स्वागत केलं पाहिजे.आमची तर मागणी आहे,ज्या खुबीने(?)  मानकर सर आपण  इतिवृत्त लेखन  केलंय त्याबद्दल आपला  आदर्श इतिवृत्त लेखक म्हणून किं वा इतिवृत्त शिरोमणी हा किताब देऊन   मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  सत्कार  करायला हवा. कारण हल्लीच्या काळात एवढे निष्टावान आणि सरकारहितदक्ष अधिकारी दिसतात कुठे?.अपवादात्मक असलेल्या अशा अधिकार्‍यांच्या पाठिवर शाबासकी थाप  टाकून इतरांनाही अशा कार्यासाठी(?)  प्रोत्साहित करण्याची गरज आहे.(त्यासाठी माध्यम सल्लागारही मुख्यमंत्र्यांकडं शिफारस करू शकतात.शेवटी समितीचा कारभार " ठरल्याप्रमाणं" चाललां पाहिजे असं त्यांनाही वाटणं स्वाभाविक आहे ). कोणत्याही कारणानं हे शक्य झालं नाही तर पुढच्या बैठकीत किमान मानकर यांच्या अभिनंदनाचा ठराव तरी झालाच पाहिजे.तो स्वतः समितीच्या अध्यक्षांनी मांडला तर त्याला कोणी विरोध कऱण्याची हिंमत दाखविणार नाही. .चळवळ्यांनाही आमची विनंती आहे की,त्यांनीही त्याला विरोध करू नये कारण अधिस्वीकृती समितीत अच्छे दिन आणायचे असतील आणि नवी संस्कृती रूजवायची असेल तर चांगली कामं (?)  करणारांचं कौतूक हे व्हायला हवं की नको?.व्हायलाच हवं.शेवटी आपण समितीत अल्पसंख्य आहात.तडीपार होऊ घातलेल्या व्यक्तीचं समर्थन करणारे किंवा त्यावर भिष्माचार्य,द्रोणाचार्य यांच्याप्रमाणं बघे  बहुसंख्येनं  आहेत ना..त्यां बिचार्‍यांना भिती वाटते की,आपण काही भूमिका घेतली तर मुख्यमंत्री नाराज होतील.त्यामुळं त्याचं मतलबी मौन आहे तेव्हा चळवळ्यांनो, तुम्ही ओरडत बसा.तुमची दखल कोणीच घेणार नाही.तुमचा विरोध थांबला नाही तर कुणाला तरी कोर्टात पाठवून कोर्ट मॅटर आहे "कोर्टाचा निकाल जसा येईल तसा निर्णय सरकार घेईल" अशी भूमिका घेत समितीला हात झटकता येतील. त्यामुळे  मीत्रानो  विरोध थांबवा आणि इतरांप्रणाणे सबका साथच्या नार्‍यात नारा मिळवून पत्रकारांच्या हिताच्या गोष्टी बंद करा.
त्यापेक्षा तुम्ही अधिक काहीच करू शकत नाही.कारण साधं इतिवृतांतही तुमचं म्हणण्याची दखल घेतली गेली नाही आणि आम्हाला खात्रीय की,पुढच्या बैठकीत असं का केलं म्हणून आपण सोडलात तर एकही सदस्य तसा जाब सदस्य सचिवांना विचारणार नाही.मानकर साहेबांचं ते चातुर्य आहे.खरं तर आपण बैठकीस उपस्थित होता याचा उल्लेख मानकरसाहेबांनी इतिवृत्तात घेतला त्याबद्दल आपण त्यांचे आभारच मानायला हवेत.आपली ही "चळवळ" अशीच चालणार असेल तर पुढच्या बैठकीस आपण उपस्थित होता याचा उल्लेखही इतिवृत्तांतून गाळला जाईल मग बसा बोंबलत. बैठकीत कोणीही कोणताही विसंवादी(?) सूर काढूच नये.,असा प्रयत्न आहे.   काढला तर त्याचे प्रतिध्वनी बाहेरच्या जगात उमटू नये याची दक्षता घेतली जात असेल तर आजच्या सरकारी धोरणानुसारच ते घडते आहे.त्यामुळे इतिवृत्तांत हे नाही,ते नाही वगैरे कोकलत बसण्यात काही अर्थ उरणार नाही..परिणामतः आपला विरोध वांझोटाच ठरणार आहे.. अनुल्लेखानं मारायचं आणि चळवळी संपवायच्या ही राजनीती मानकर साहेब आपणास आम्ही सांगण्याची गरज नाही."पत्रकार एकत्र येताच कामा नयेत "अशीच आपलीही भूमिका वारंवार दिसून आली आहे.समितीच्या निमित्तानं पत्रकारांमध्ये उभी फूट पडणार असेल तर ती आपल्या विभागातील अधिकार्‍यांच्या पथ्यावर पडणारी नाही का?  तेव्हा मानकर सर आपण आपलं "फोडा आणि झोडाचं" कार्य सुरू ठेवा.कोणी विचारलंच तर "जी जी म्हणत" " माझ्या काय हातात आहे?,वरिष्ठांनी सांगितलं म्हणून त्यांच्याकडं बोट दाखविता येतंच.आपण  आणि आपल्या विभागानं सुरू केलेलं "चळवळ संपवा अभियान "चे  महान कार्य आपल्या  हातून अधिक जोमानं घडावं यासाठी  आमच्या ढिगभर  शुभेच्छा आपल्या पाठिशी आहेतच.
शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

दिव्यने सबनीसाला मांजर केले...

औरंगाबाद - गेली अनेक वर्षे सटेलाईट एडिटर म्हणून मिरवणा-या पाद-या सबणीसाला दिव्यने अखेर मांजर बनवले आहे.त्याच्याकडील पदभार नितीन फलटणकर यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यास आता कोणतेही काम ठेवले नाही.तो सध्या रोज ऑफीसात येतो,आणि एका कोप-यात बसून निघून जातो.येत्या दोन महिन्यात त्यास दिव्यतून कायमचा निरोप देण्यात येईल,अशी चर्चा आहे.
महाराष्ट्राचे स्टेट एडिटर खंडणीकर असताना,सबणीसाचा रूबाब वाढला होता.केवळ चमकोगिरी आणि झोलूगिरी करणे,या गुणावर त्यास सॅटेलाईट एडिटरपद मिळाले होते.खंडणीकरांची दिल्लीला उचलबांगडी झाल्यानंंतर महाराष्ट्राचा पदभार प्रशांत दीक्षीत यांच्याकडे आला आणि सबणीसांची गुणे हळूहळू उघडकीस येवू लागली.अखेर त्याचा पदभार काढून त्याच्या जागेवर फलटणकरांस बसवण्यात आले.फलटणकर यांचे टीम लीडर म्हणून काम चांगले असून,सर्वांना सोबत घेवून काम करण्याची त्यांची पध्दत अमरावतीमध्ये अनेकांनी अनुभवली आहे.रिपोर्टर ते ब्युरो चिफ आणि आता सॅटेलाईल एडिटर म्हणून त्यांनी झेप घेतलेली आहे.त्यांना बेरक्याकडून शुभेच्छा...काम करताना सर्वांना सोबत घेवून काम करा,सुडाचे राजकारण करू नका,झोलूगिरी आणि चमकोगिरी करणा-यांना पाठीशी घालू नका,ही अपेक्षा त्यांच्याकडून आहे.
सबणीसांला पोसण्याचे काम मराठवाड्यातील काही ब्युरोंनी केले आहे.सबणीस आले की,त्यांची सर्व व्यवस्था ( खाण्यापिण्यापासून झोपण्यापर्यंत ) करणारे ब्युरो सबणीस गेल्यामुळे हादरले आहेत.काही ब्युरो सकाळी येवून छा - छू करून निघून जात होते आणि रात्रीच उगवत होते.दिवसभर स्वत:ची खासगी कामे करत फिरत होते.सहकार्यावर दबाब आणून त्यांना वेठीस धरत होते.अनेकांच्या बातम्या स्वत:च्या नावावर खपवत होते.वार्ताहरांचे विषय स्वत: उचलत होते.स्थानिक जाहिरात प्रतिनिधीबरोबर संगनमत करून ऑफीसला डायरेक्ट आलेल्या जाहिरातीचे कमिशन उचलत होते.अश्यांचा हिस्सा सबणीसाकडे जात होता आणि सबणीस अश्या ब्युरोंना पाठीशी घालत होता.अश्या ब्युरोची यादी आता फलटणकर यांच्याकडे उपलब्ध आहे.संस्थेला घोडे लावणा-या ब्युरोवर आता कडक कारवाईची गरज आहे.जे सहका-यांना छळतात,कामाचे नाटक करून पाट्या टाकतात त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे.फलटणकर ते करतील,अशी अपेक्षा आहे.

पत्रकाराची जात कोणती असते? वृत्तपत्राला जात असते का?

3 दिवसांपूर्वी मला जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या प्रतिष्ठित व्यक्तीचा, कायदेमंडळ सदस्याचा फोन आला होता... अचानक..! मला सेलिब्रिटीज, राजकारण्यांचं अप्रूप नाही की मी त्यांना भेटत-बोलत नाही!! कदाचित  मुंबईतील 8 वर्षात गावाकडले हे शेर साध्या कक्ष अधिकाऱ्यापुढे दलालीच्या फाईली घेवून लाचार उभे असलेले पाहिल्याचा परिणाम असावा!! कुणी विचारत नाही न ढुंकूनही पाहत नाही!! (काही सन्माननीय अपवाद) असो. या महोदयांनी इकडल्या-तिकडल्या गप्पा हाणल्या आणि मग सादरे प्रकरणी शोक व्यक्त केला. मग हे महोदय, मूळ मुद्द्यावर आले, "साहेब, तुम्ही इतकं जबरदस्त लिहिता यांव न त्यांव... तुमचं गाव कोणतं?" मला उद्देश् लक्षात आला. मी काही त्याला सांगितलं नाही. बनेल पठ्ठया पिच्छा सोडीना! म्हटला, "साहेब, सादरे तुमचे नातेवाईक होते का?" ... डोकंच भणाणलं...
मी म्हटलं, "अहो नात्याचा संबंध येतो कुठे?"
महोदयांचं सुरूच, "नाही, सादरेसाहेब अमुक-ढमुक 'जाती'चे होते; तुम्ही अमुक-ढमुक 'जाती'चे आहात का?"
काय बोलावं सुचेना, अवाक् झालो!! मुळात असल्या 'जाती'च्या चौकशा आयुष्यात कधीच कुणाच्या केलेल्या नव्हत्या न असल्या क्षुद्र, फालतू चौकशांना किंमत दिली होती!! सादरे कोणत्या 'जाती'चे असावेत, हा विचारही कधी मनाला शिवला नव्हता... साधारण आपल्या जिल्ह्यातील आडनावांच्या ढोबळ अनुमानानुसार अमुक-ढमुकवर्गीय असावेत, असाच समज झाला असता!!
एकीकडे त्या क्षुद्र विचारधारेच्या व्यक्तीवर संताप होत होता... दुसरीकडे म्हटलं, चला, या माणसाकडूनच 'जात'कारण समजून घेवूया!!
(उगाचंच यानिमित्ताने आता आठवलं, "दिव्य मराठी"त मला हा जातकारणाचा फटका मात्र बसला होता! "खांडेकर" -"दीक्षित" हे ब्राह्मण, त्यांना कानाखालचे सांगकामे हवे होते "पटवे"सारखे... "पटवे"महोदय हे अमळनेर तालुक्यातील पातोंडयाचे रंगारी! दिला असेल कुणी त्यांना पूर्वी त्रास!! मात्र विजय नवल पाटीलने ट्रॅक्टर एजन्सीत नोकरी दिली-सांभाळलं, रोहिदास पाटलांनी मदत केली हा मधला इतिहास विसरून पातोंडयातील लहानपणचा सूड़ विक्रांत पाटीलवर??)
मी म्हटलं, "जातीचा बराच अभ्यास दिसतोय साहेब आपला? तुम्ही कुठल्या जातीचे?"
महोदय म्हटले, अमुक-तमुक!
मी म्हटले, "आजवर कधी आपण बोललो नाही, भेटलो नाही आणि आज थेट 'जाती'ची चौकशी? काय विशेष?"
म्हटला, "सादरे प्रकरणात तुम्ही एकदम खतरनाक आणि पोटतिडकीने लिहीताय.. अगदी आतून शब्द उमटतात... जीव तीळ-तीळ तुटतो असे तुम्ही म्हणता त्या वेदना आणि तो संताप, तो धिक्कार शब्दातून अंगावर येतात, प्रकटतात!!"
मी - "साहेब, फार सुंदर मराठी हो आपलं! पत्रकार हवा होतात, चुकून राजकारणात गेला आणि आमचे बाळासाहेब (ठाकरे) नेहमी म्हणायचे राजकारण म्हणजे गजकर्ण... तुम्ही 'जात'कारण उकरून, ते खरेच हे सिद्ध केलंत हो!!"
समोरचे महोदय जरा चपापले... उसनं अवसान आणून म्हणाले, "कितीही गप्पा मारल्या जरी शेवटी 'जात' महत्त्वाचीच!!"
{{याच्या दुप्पट पोटतिडकीने 'घरकुल' प्रकरणात लिहीत होतो... तेव्हा हीच मंडळी किती खूष होती, याची आठवण देणे टाळले!!}}
मी - "ही सर्व तुम्ही राजकारणी लोकांनी केलेली घाण आहे... जेव्हा काहीच नसतं हाती तेव्हा 'जात' पुढे करायची...! तुमचं नेमकं काय काम आहे ते सांगा स्पष्ट, कशाला उगाच ही नुसतीच चर्चा.."
महोदय - "माझं काही काम नाही तसं, पण तुमचं लिखाण आवडतं म्हणून सहज आपलं..."
मी - "लिखाण आवडलं म्हणून डायरेक्ट 'जात' विचारायची?"
महोदय - "नाही! एकदम डेअरिंगबाज लिहीता तुम्ही... त्याच बातम्या होतात मग!! सगळीकडे फिरतं तुमचं लिखाण... एका अमुक-ढमुक 'जाती'च्या अधिकाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे..."
मी - "का हो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अधिकाऱ्याला 'जाती'चं लेबलं चिकटवायला, पत्रकाराची 'जात' विचारायला? तुमचं म्हणण काय नेमकं ते सांगा की आता माझे पेशन्स आणि चांगुलपणा दोन्ही संपत चाललंय... ठेवतो मी फोन!"
महोदय - "तुम्ही सांगता म्हणून सांगतो डायरेक्ट की हा 'आपला माणूस' असता तर एव्हढं केलं असतं का, अशी चर्चा आहे?"
मी - "व्वा, व्वा ... काय विचार आहेत साहेब आपले... आपल्यासारखे लोक बसले सगळीकडे की कल्याण होईल हो या देशाचे!! मला सांगा, 'तुमचा माणूस' म्हणजे कोण?"
महोदय - "पेपरवाले मॅनेज आहेत सर्व... NCP वाले आणि आमच्याच पक्षातील काही अमुक-ढमुक 'जाती'चे लोक करताहेत हे सर्व.. कुठल्या-कुठे संबंध जोडताहेत!!..."
मी - "मला खरंच आता कीव वाटते तुमची विचारशक्ती आणि बुद्धीची... कसे एव्हढ्या मोठ्या पदावर बसून तुम्ही इतका क्षुद्र विचार करू शकता? तुमचंच लॉजिक लावू चला .... सादरे कोण हे तुम्ही सांगितलंच ... त्यांना छळण्याचा आरोप असलेले कोणत्या जातीचे हेही सांगा? अहो ज्या NCPचं तुम्ही बोलताय त्यांचा जिल्ह्यातील एक माजी आमदार, जो नेहमी बोलतो त्यांचा 'सहयोग' कुणाला दिसतोय? आणि अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक... सर्वांच्या तोंडाला कुलूप लागलेय ना या प्रकरणात? कॉंग्रेसवाले संदीप पाटील, रवींद्र पाटील हे बोलताहेत काही? ते कोणाचे जातवाले? पारोळ्याचे चिमणराव पाटील, वसंत मोरे हे बोलताहेत काही??? ते कोणत्या जातीचे? ते सोडा... काही राजकीय पक्षातील पाटील-वाघ वैगेरे कुणी असतील 'जनसेवक'... ते कुठल्या जातीचे? ते बोलताहेत काही सादरेंसाठी? तुमच्याशी बोलायला सुद्धा मला आता लाज वाटतेय ... तुमच्या बुद्धीची तर कीव येतेच पण ज्यांनी तुम्हाला इथवर आणून पोहोचवलंय त्या समूहाचीही कीव येतेय ... कसा माणूस झेलणार ते आणखी पुढची काही वर्षे... चला बाय, ठेवतो ... पुन्हा कॉल करू नका आणि भेटूही नका कुठे!!"
या प्रकारानंतर विचार केला की, अशोक सादरे यांच्या मृत्यूपश्चात बदनामीशिवाय ही अशी क्षुद्र मनोवृत्तीची माणसे काही करूही शकत नाही.. काय असते जात एखाद्या पत्रकाराची, एखाद्या वृत्तपत्राची, असा विचार यानिमित्ताने डोक्यात आला. वृत्तपत्र मालकाला जात असते का? या क्षुद्र मनोवृतीच्या 'सो कॉल्ड' 'जनसेवकां'पेक्षा आमचा मालक कितीतरी वैचारिक पुढारलेला, माणूसपण जपलेला आणि प्रगल्भ असल्याचे नक्कीच अभिमानाने सांगता येईल!!
अशोक सादरे यांची जर "जात" पाहिली जात असेल तर त्या नालायकांना सांगावेसे वाटतेय, की सादरेंच्याच जातीचे नाही-नाही ते आरोप करताहेत... "पुण्यनगरी"च्या संपादकाची जात काय? तिथे तर सादरेंच्या समर्थनार्थ एक ओळ छापून आली तरी संपादकाला हीव भरेल, अशी स्थिती एकूण मजकुरावरून जाणवतेय... सादरे प्रकरणात "तरुण भारत"चे कव्हरेज पाहतच आहेत सर्व ... आजवर जितके "छापले" नसेल या प्रकरणात तितके सादरेंवर भंपक आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विशेष पुरवणीतून "छापले"य त्यांनी... मग "तरुण भारत"ची जात काय असावी? आणि "तरुण भारत" व इतरत्र "खास लोकाग्रहास्तव" आरोप करणारी पुरवणी तयार करणाऱ्याची जात काय असावी? 'दिव्य मराठी'ची  "घरकुल" प्रकरणात काय "जात" होती? आता सादरे प्रकरणात या पेपरची "जात" बदलली का? "लोकमत"ची "जात" आता सादरे प्रकरणात त्यांच्याशी जुळायला लागली का? मग VG पाटील हत्येप्रकरणी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांची कोणती जात असावी? प्रतिभाताई देशाच्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा वृत्तपत्रांनी कोणती 'जात' धारण केली होती? BHR प्रकरणात काय 'जात' होती वृत्तपत्रांची? अरविंद खरात या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर 1010 नंबरचे ट्रक्टर घातले गेले, या प्रकरणात 'जनसेवक' दबाव आणत होते... तेव्हा वृत्तपत्रांची जात कोणती होती? या खरात प्रकरणात सारे रेतीचे महा'सागर' दडले आहे... त्यातले सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे CDR काढले तर कोण कोणत्या 'जात'कुळीचे आहे, हे सारे लक्षात येईल... 3 मे रोजींचा सर्व आरोपी तसेच नाव घेतले जातेय त्या सर्वांचा CDR तर तपासावाच; पण त्या दिवशीचे 8 किंवा त्याहून अधिक पेजेस नियमित प्रकाशित करणाऱ्या शहरातील सर्व मेनस्ट्रीम वृत्तपत्रातील सर्व क्राईम रिपोर्टर, फोटोग्राफर आणि संपादक यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड CDR जरूर तपासावेत... म्हणजे खरे 'दूध का दूध' आणि 'पानी का पानी' होईल. तेव्हा सर्वांच्या 'जात' समोर येतील. सादरे यांच्याजवळ कोण 'जाती'चे पत्रकार होते आणि किती जवळ होते आणि कशा-कशात सहभागी होते... हे सारे उघड होईल... पत्रकारच नव्हे तर जनसेवक आणि अधिकारी व सर्व लागेबांधेही उघड होतील ... कोण कुठे गायब आहे किंवा सादरे यांच्या आत्महत्येनंतर कोण, कोठे आणि किती दिवस होते, हेही तपासून पाहायला हवे...
'जनशक्ति'तील टीम पाहा - आढाव, अस्वार, चौधरी, गोसावी, वैद्य, इंगळे, जोशी, सुरवाडे, भालेराव, बडगुजर, लोखंडे, बेंडाळे, गायकवाड, गवळी, गुरव, मऱ्हे, अत्तरदे, भावसार, ठाकरे, म्हस्के, दुबे, पाटील, भदाणे ..... आता या 'जातीय'वादी बांडगुळाना म्हणावे करत बसा विश्लेषण!!! आणि एक सुद्ध 'माई का लाल' असेल तर त्याने त्याच्याकडे असलेल्या माणसांची यादी घेवून समोरासमोर चर्चेस यावे ... केव्हाही, खुले आव्हान!!
पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या जातीचा असा वाह्यात विचार एखादा सडका माणूसच (प्यादं) करू शकतो. मात्र, हा सडका माणूस (प्यादं) जेव्हा हे सारे एक कोटीसाठी चाललेय, अशी अफवा पसरवतो कुजबूज आघाडीतून तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. एक कोटी....!!! लिहिताही येणार नाही धड, भोवळ येईल ऐकताच...! मग हे 'सादरें'साठी चाललेय, 'जाती'साठी चाललेय की 'कोटी'साठी? सडका विचार पसरवणारेच (प्यादे आणि त्याचा बादशहाही) कन्फ़्यूझ आहेत. मराठी पत्रकारिता यांनी एका 'नव्या उंचीवर', 'कोटी'वर नेवून ठेवलीय, याबद्दल आभार!! हे 'कोटी' देणार कोण? ज्यांनी दिवाळीत 'सोने' लुटलेय ते सादरेंच्याच 'जाती'चे दरोडेखोर की आजवर कधी स्वत:च्या खिशातून एक दमडी न काढून देणारा, फुकटच्या रेतीत ज्ञानालयाचे इमले चढविणारा अवलिया बादशहा? आणि हे 'पेड' करायचेच असेल तर ते झाड माझ्यासारख्या सामान्य पगारी नोकराच्या घरात कशाला उगवले जाईल.... मालकाकडेच 'मनी प्लांट' लावला जाईल ना ... मूर्ख लेकाचे!!! कधीकधी प्यादी बादशहाला गड्ड्यात घालतात ... अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली प्यादी.... अतिउत्साही अन नको तिथे नको तेव्हा 'निष्ठा'प्रदर्शनाला उतावीळ प्यादी... आता या प्याद्यांचे काय घ्यावे अन काय नाही ते बादशहाने विवेकाने ठरवावे... खरेतर, नागरिकशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे, की सर्व चाकर-नोकर आणि प्यादी ही कधीच एका जात-कुळीतली नकोत ... अन स्वत:च्या गोत्रातले तर कुणी 'इन सर्कल'मध्ये नकोच .... नाहीतर आपल्याच जात-गोत्राचा हा लवाजमा 'पालखी' कधी कुठे खड्ड्यात घालतो, ते कळतही नाही.... पालखीचे 'भोई' हे वेगळ्याच जात-गोत्राचे विश्वासू असावेत, हा जातकारण करणारयांना प्रामाणिक आणि नि:पक्ष सल्ला...!!
वृत्तपत्राला आणि पत्रकाराला जात नसते पण एखाद्याच्या मृत्यूतही जे हरामखोर धंदा आणि संधी शोधतात किंवा मला जो "जनसेवक" जात विचारू पाहत होता, यांची जात नक्कीच सांगता येईल... विकृत आणि हीन ही जात आहे यांची... लंपट, लोचट आणि मृताच्या मढयावरचे लोणी खाणारी ही निर्लज्ज जात आहे यांची ... नीतीमत्ता गुंडाळून ठेवलेली ही जात आहे यांची... यांना माणूस म्हणायचीही लाज वाटावी अशी माणुसकीच्या नावाला काळीमा फासणारी जात आहे यांची...
या धंद्यात असल्याची गेल्या 20-22 वर्षात प्रथमच इतकी लाज वाटतेय... कुणीतरी आदरस्थानी असलेलं, जवळचं, परिचयातलं ... असं सारं विवेकहीन, संवेदनाहीन आणि माणुसकीशून्य वाटणारं प्रत्यक्ष व्यवहारात उतरवतं तेव्हा या 'व्यवसाय'क्षेत्रात असल्याची लाज वाटते.... मुडद्याच्या जीवावर पोसली जाणारी गिधाडं झालो आहोत का आपण? व्यथित करणारा, मन सैर-भैर करणारा प्रश्न आहे .... ही माझी या गृपवरची शेवटची पोस्ट... हा ग्रुप सोडतोय आणि या 'सोशल मीडीया'चाही निरोप घेतोय ...पर्याय मिळालाच काही पोटा-पाण्याचा अन्य या वयात तर व्यथित करणाऱ्या या 'मुर्दाड' बनलेल्या पारंपरिक मीडियाचाही निरोप घेईन ... कुणी चुकून, कळत-नकळत दुखावले असेल तर कृपया माफ करावे ... कोणतीही पोस्ट ही व्यक्तिगत माझ्या स्वार्थासाठी नव्हती... केवळ एका चांगल्या अधिकाऱ्याला न्याय मिळावा, मरणोत्तर बदनामी कुणाची करण्यापेक्षा सन्मान राखला जावा, यासाठीच ही धडपड होती ... अपवाद वगळता, जळगावच्या मीडियाने एकदिलाने न्यायाची लढाई छेडली, हे कौतुक आहेच .... व्यवसाय करताना काही किमान तारतम्य, संकेत आणि नीतिमत्ता पाळली जावी, हे माणूसपणाचे लक्षण आहे .... व्यवसायाच्या, टार्गेटसच्या फालतू नादात किंवा त्या सबबीखाली इतरांची दिशाभूल करून एखाद्या जुन्या दोस्तीच्या कर्जातून उतराई होण्याच्या दडपणात अन वस्तुनिष्ठ सत्य जुमानायचेच नाही, या अट्टाहासापायी बेभान काही माणसं जर हैवान बनली असतील तर देव त्यांचं भलं करो ....
{{सोशल मीडिया या माध्यमाची जबरदस्त ताकद यानिमित्ताने पाहायला मिळाली; तुम्ही पारंपरिक प्रसिद्धीवर अंकुश आणू शकता, पार्सले गायब करू शकता, पण सत्य आणि विचार किंवा व्यक्त होणे नाही दडपू शकत!!}} 
【मेसेजेस नको असल्यास यूझर म्यूट किंवा ब्लॉक करावे किंवा विशिष्टच विषयावरील मेसेजेस हवे असल्यास रिप्लाय करावा】

- विक्रांत पाटील
कार्यकारी संपादक
जनशक्ति, जळगाव

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

दिव्य मराठीचा नालायकपणा


दिव्य मराठीचा उस्मानाबाद सिटी रिर्पाटर राम खटके हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.५ सप्टेंबर रोजी तो ऑफीसकडे येत असताना,त्याच्या डोक्यास गंभीर दु:खापत झाली आहे.त्यामुळे त्याच्या मेंदूवरील ताबा गेला आहे.मेंदू हालला असून,त्यास चार टाके पडले आहेत.त्यामुळे त्याची स्मरणशक्ती नाहीशी झाली आहे.
एका उमंंद्या पत्रकारावर वयाच्या ३० व्या वर्षी हा मोठा आघात झाला.पंधरा दिवसाचा त्याचा खर्च साडेतीन लाख झाला आहे.त्यापैकी दिव्य प्रशासनाने ९२ हजार दिल्याचे सांगण्यात आले.राम हा गरीब शेतकरी कुटुंबातील.त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत तोलामोलाची.ऑन ड्युटी त्यास आघात झालेला आहे.मात्र प्रशासनाने ९२ हजार देवून जणू उपकार केल्याचे दाखवत आहे.
राम खटके हा साडेतीन वर्षापुर्वी उस्मानाबाद आवृत्ती सुरू झाल्यानंतर ज्वाईन झाला.त्याचा पी.एफ.दरमहा ७०० रूपये कपात होत होता.कायद्याप्रमाणे कंपनी त्यास अर्धे पैसे मिसळते.याचा हिशोब केला तर रामचा पी.एफ.च त्यास मेडिकल बिल म्हणून परत दिला आहे.कंपनीने स्वत:चे काय पैसे दिले,हा आमचा सवाल आहे.कंपनीकडे आकस्मिक निधी असतो,त्यातील एकही रूपया दिलेला नाही.दुसरे असे की,कपनीला एव्हडी काळजी होती तर त्याचा दोन महिन्यापासून पगार बंद का केला,हा आमचा सवाल आहे.गरज सरो आणि वैद्य मरो,अश्यातला हा प्रकार आहे.
रामला कश्याचे टेन्शन होते,याबाबतचा उहापोह लवकरच करू,आता ती वेळ नाही,परंतु रामला आता वाचवणे आवश्यक आहे.त्यासाठी वैद्यकीय खर्च जमा करणे आवश्यक आहे.आमच्या पोस्टनंतर उभ्या महाराष्ट्रातून लोक मदतीसाठी धावले आहेत.दिव्य प्रशासन मात्र आता जागे झाले आहे.सोलापूरचे हेच.आर.आता धावपळ करत आहेत.आमच्या एका मित्राला ते रामला सर्व मदत करत असल्याचे खोटे सांगत आहेत.अरे बाबानो,तुम्हाला इतकी काळजी होती तर आमच्या रामचा पगार लगेच बंद का केला ?
तुमचे नाव मोठे आणि लक्षण खोटे आहे.अरे बाबानो,तुम्ही जरी मदत नाही केली तर आम्ही अजून मेलोलो नाही.भले आम्ही फाटके असू पण आमच्या शब्दावर विश्वास ठेवून लाख रूपये देणारे लाखाचे पोशिंदे आहेत.दिव्य मराठीवाल्यानो थोडे आता तरी लाजा...

..................
 दिव्य मराठी बाबत whats app वर फिरत असलेली पोस्ट 

'राम'ला हवाय मदतीचा हात...


उस्मानाबाद - राम खटके...दिव्य मराठीचा सिटी रिपोर्टर...आता कुठे उत्तुंग झेप घेत असताना,काळाने त्याच्यावर मोठा आघात केला आहे.गोकुळअष्टमी दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून समतानगरमधील दिव्य मराठीच्या ऑफीसला येत असताना,वाटेत एका मोटारसायकलस्वाराशी त्याची जोरदार टक्कर बसली.त्यात तो मोटारसायकलवरून पाच फुट वर उडून खाली पडला.त्यात त्याच्या डोक्याला मार लागला.डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.त्याला सोलापूरच्या डॉ.काटीवर हॉस्पीटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले.पण त्याच्या मेंदूला गंभीर दु:खापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती.त्याच्या मेंदूवर ऑपरेशन करण्यात आले.त्यातून तो थोडा बरा झाला.तो शुध्दीवर आला पण भान हरपून बसला.त्याला माणसे ओळखता येत नव्हती किंवा त्याला कोणाशी नीट बोलताही येत नव्हते.एका बालकाप्रमाणे त्याची अवस्था झाली.त्याची ही अवस्था मनाला अस्वस्थ करणारी होती.पंधरा दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि गावी भंडारवाडीला नेण्यात आले.
गावी आल्यानंतर त्याच्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी माणसाची मदत लागत होती.त्याच्या घरच्यांनी त्याला सांभाळले.पण आठ दिवसांपुर्वी त्यांला पुन्हा काटीकर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.दुर्देव असे की,त्याला आता अर्धांगवायुचा झटका आला असून,शरीराच्या हालचाली मंदावल्या आहेत.त्याची प्रकृती चिंताजनक आहे.आपण सर्वांनी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू या,हे राम आमच्या रामला बरे कर...
मित्रानो,रामचे वय आता कुठे ३० आहे.भंडारवाडीच्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला राम वयाच्या २० व्या वर्षी पत्रकारितेत आला.पत्रकारितेची डिग्री घेवून तो स्थानिक वृत्तपत्रात एक हजार रूपयापासून नोकरी करू लागला.लातूरहून प्रकाशित होणा-या यशवंत वृत्तपत्राने त्यांला ३ हजार रूपये मानधन आणि जाहिरात कमिशन दिले.तीन वर्षापुर्वी १२ हजाराची नोकरी त्यांला दिव्य मराठीत लागली.त्याचा पगार आता १६ हजारावर गेला होता.आता कुठे त्याला सुखाचे दोन घास मिळत असताना,काळाने त्याच्यावर मोठा आघात केलेला आहे.पहिल्या १५ दिवसांत त्याच्यावर साडेतीन लाखाचा हॉस्पीटल खर्च झालेला आहे.त्यातील ९४ हजार रूपये दिव्य मराठी प्रशासनाने दिले आहेत.बाकीचे काही मित्रानी आणि कुटुंबाने दिले आहेत.आता पुन्हा खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याला उपचारासाठी मदत हवी आहे.आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शक्य तितकी मदत रामला करावी.दुर्देवाने रामच्या पत्नीच्या नावावर बँक अकाऊंट नाही.काय मार्ग काढता येईल,याबाबत विचार सुरू आहेत.
रामला दीड वर्षाचा मुलगा आहे.

संपर्क : रामच्या पत्नीच्या भाऊ अनिकेत माने याचा नंबर - ८६२४०९९१९३
राम यांच्या भावाचा नंबर - 8007507292

साभार 

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५

वागळेंचे महाराष्ट्र १ आता नव्या वर्षात

मुंबई - निखिल वागळे यांचे महाराष्ट्र १ न्यूज चॅनल आता नव्या वर्षातच सुरू होण्याची चिन्हे आहे.सध्या भरती करण्यात आलेल्या कर्मचा-यांना ट्रेनिंग देण्याचे काम सुरू असून,वागळे मास्तर स्वत: रोज दोन तास प्रशिक्षणार्थी लोकांना लेक्चर देत आहेत.
निखिल वागळे यांचे महाराष्ट्र १ चॅनल २ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असल्याची घोषणा हवेत विरल्यानंतर ते दिवाळीला सुरू होईल,असे सांगितले जात होते.परंतु एकंदरीत रागरंग पाहता,ते नव्या वर्षातच सुरू होईल,अशी चिन्हे आहेत.
एकीकडे महाराष्ट्र १ चे लॉचिंग केव्हा होणार,याकडे लक्ष वेधले असताना,दुसरीकडे जय महाराष्ट्र चॅनल शेट्टींनी विक्रीस काढल्याची चर्चा पसरली आहे.नवे त्रिकुट टीआरपी वाढविण्यात अपयशी ठरले असून,चॅनलचा तोटा दिवसेंदिवस वाढतच आहेत.त्यामुळे शेट्टींनी न्यूज चॅनल विक्रीस काढले आहे.दुसरीकडे डान्स बारवरील बंदी उठवल्यामुळे आण्णा पुन्हा जुना धंदा सुरू करण्याची शक्यता आहे.चॅनलपेक्षा छम छम परवडते,असा आण्णांचा जुना अनुभव आहे.
दुसरीकडे मी मराठी आणि टीव्ही ९ मधील सामना दिवसेंदिवस रंगत चालला आहे.टीव्ही ९ ने मी मराठीच्या मोतेवारचा चिटफंड घोटाळा लावून धरल्याने मी मराठीवाले रेड्डीची लफडी शोधत आहेत.मोतेवारच्या हातात बेड्या पडणार,ही हवा गेल्या अनेक वर्षापासुन सुरू आहे.परंतु प्रत्यक्षात बेड्या केव्हा पडणार,याकडे लक्ष वेधलेत.
असो,
मंडळी,सध्या मराठी मीडियात काहीच हालचाली नाहीत.त्यामुळे आम्हाला शांत बसावे लागत आहे.बेरक्या शांत कसा असा अनेकांना प्रश्न पडलेला असेल.बेरक्या शांत नसून आहे तिथेच आहे,परंतु घडना घडामोडी घडल्यानंतर तो नक्कीच पुन्हा आपल्या सेवेत आहे.तोपर्यंत बाय बाय...

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

अखेर त्याचे दिवस भरले...

औरंगाबाद - एखाद्या जिल्हा कार्यालयाला भेट दिले की,सगळ्या कर्मचा-यांसमोर,तुम्हाला माहित आहे का,मी सॅटेलाईट एडिटर आहे,मी महाराष्ट्राचा हेड आहे,समजले का, असे म्हणून स्वत:च्या खिशातील ओळखपत्र दाखवणरा पाद-या सबणीसाची दिव्यातून हकालपट्टी झाल्यामुळे राज्यातील सर्व रिपोर्टरनी आनंद व्यक्त केला आहे.
खंडणीकर महाराष्ट्राचे स्टेट एडिटर असताना,चमकोगिरी करणा-या पाद-या सबणीसाची थेट सॅटेलाईट एडिटरपदी नियुक्ती झाली.माकडाच्या हातात ककडी मिळाल्यामुळे या पाद-याला आकाश टेंगणे वाटत असे.तो  महिन्यातूून प्रत्येक जिल्हा कार्यालयाला भेट देवून,ब्युरो चिफबरोबर सेटींग करत असे.बातम्या कोणत्या आणि कश्या लावायच्या यावरून सेटींग करत असे.
तो कर्मचा-यांसमोर फुशारकी मारत असे.गंमत असे की,प्रत्येक वेळी तुम्हाला माहित आहे का,मी सॅटेलाईट एडिटर आहे,मी महाराष्ट्राचा  हेड आहे,समजले का असे म्हणून स्वत:च्या खिशातील ओळखपत्र काढून कर्मचा-यांना दाखवत असे.विशेष म्हणजे त्याचा ड्रामा प्रत्येक भेटीत चालत असे.ते पाहून कर्मचारी मनोमन हासत आणि मागे टिंगल करत असत.अश्या या फालतू,चाड्या चुगल्या करणा-या आणि खुर्ची टिकवण्यासाठी वरिष्ठाची चमकोगिरी करणा-या पाद-या सबणीसाची दिव्यच्या सॅटेलाईट एडिटर पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.त्याची आता कायम हकालपट्टी करावी,अशी मागणी होत आहे.

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

दोन पवारांनी घातला 'पॉवर' साठी राडा

पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून शहरात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मोठ्या पवाराने धाकल्याला पुढ करत गेल्या काही दिवसांपासून राडा घालण्यास सुरवात केली. मात्र, मोठ्या पवारची खेळी अयशस्वी ठरल्याने धाकल्याला कपडे फाटे पर्यन्त मार खावा लागला. एवढ सगळ होऊन ही मोठ्या पवाराचा माज कमी झाला नाही. मात्र तो तोंडावर पडला हे नक्की.
पत्रकार संघाची निवडणूक झाल्यास आपल्या हाती काही राहणार नाही या चिंतेतच मोठा पवार गेल्या महिन्यापासून 'पॉवर' गेम करण्यात मग्न होता. २०१३ साली देखील त्याने खेळी करत हवश्या-नवश्यांना पुढ करून निवडणूक बिनविरोध काढली होती. तेव्हाच्या कार्यकारिणीची ही त्याला धास्ती होती. मात्र, ही धास्ती अवघ्या काही महिन्यात उतरली.
कारण २०१३ च्या लोकांनी विशेष असे काही केले नाही. आणि त्यांचा त्रासपण मोठ्या पवाराला म्हणावा तसा झाला नाही. पण गेल्या महिन्यापासून निवडणूक लागली आणि गेमा टाकत धाकल्या पवाराला मोठ्याने लोकांच्या अंगावर सोडल.
15 तारखेला पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत या दोन्ही पवारांनी आपली पायरी सोडली आणि जेष्ठांच्या अंगावर हात टाकले.
मटाचे सुनिल लांडगे आणि लोकमतचे संजय माने या दोघांचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. लांडगे यांच्या पॅनेल मध्ये उपाध्यक्ष पदासाठी अनिल कातळे (एमपीएसी न्युज), दिलिप कांबले (साम मराठी) सरचिटणीस पदासाठी अमोल येलमार(पुढारी),सचिव पदासाठी गोविंद वाकडे(आयबीएन लोकमत), प्रसाद गोसावी (जनशक्ती) खजिनदार पदासाठी संदेश पुजारी (पवना समाचार) यांचा तर माने यांच्या पॅनेल मध्ये उपाध्यक्ष पदासाठी संतलाल यादव (सिद्धांत समाचार ),सरचिटणीस पदासाठी दिपेश सुराणा (सकाळ), लिना माने (पीसीबीटुडे), खजिनदार संजय शिंदे (पुढारी) यांचा समावेश होता.
दोन्ही पवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हते. पण निवडणुकीच रिमोट कंट्रोल मोठ्या पवारने आपल्या हातात ठेवल होत. त्यांनी या निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयन्त ही केला. बोगस मतदार वाढवले याचा फटका मानेलाच बसला.
संघाच्या इतिहासात प्रथमच मतदान प्रक्रिया होत होती. यापूर्वीच्या सर्व निवडणुका सांमजस्याने बिनविरोध पार पडल्या होत्या. एकमेकांत कितीही मतभेद असले तरी संघात कोणी राजकारण करत नव्हतं. नेमकी हीच बाब मोठ्या पवारांना खटकत होती. कारण त्याला शहरातल्या पत्रकारांवर होल्ड ठेवता येत नव्हता.
निवडणुकीच्या दिवशी मतदानाला जाताना आज तकच्या समिर शेख ने गोविंद वाकडेला मतदान कसे करायच विचारल. त्यावेळी धाकला पवार तिथेच होता. तसेच जेष्ठ पत्रकार छबु कांबळे हे देखिल तिथे होते. धाकल्या पवारच्या अंगात अचानक 'भीम' संचारला आणि त्याने वाकडेला शिविगाळ करायला सुरवात केली. यावेळी कांबळेनी धाकल्या पवाराला समजुतीच्या दोन गोष्टी सांगायचा प्रयन्त केला. पण अंगात 'भीम' संचारलेल्या धाकल्या पवाराने त्यांच्याही वयाच्या, अनुभवाचा मुलाहिजा न ठेवता त्यांनाही शिविगाळ केली. मोठा पवार हे सगळ 'विनोदाने' घेत होता.
दरम्यान, धाकला पवार थेट वाकडेला मारायला त्याच्या अंगावर धाऊन गेला. मग सर्वांचा संयम सुटला आणि त्यांनी धाकल्याला मधे घेत धु धु धुतल. त्यात मधस्थी करणाऱ्या मटाच्या रोहीत आठवलेच्या हाताला दुखापत  झाली.
पुन्हा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बसली. त्यात देखील प्रक्रियेत अडसर आणत रात्री काळा गॉगल घालून फिरणा-या मोराने वातावरण परत पेटवले. त्यात आठवले ने गोंधळलात भर घालत बहिष्कार टाकत आपण प्राथमिक सदस्त्वाचा राजीनामा देत असल्याच जाहीर केल. (आठवले मागच्या कार्यकारणीत सरचिटणीस होते) धाकल्याची अवस्था पाहुन 'विनोद' करणारा मोठा पवार मात्र आपली पॉवर चालणार नाही हे लक्षात आल्याने तोंड घाली घालून बसला होता. धाकला तर मार खाल्यानंतर पळून गेला होता. पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, ती नियंत्राणात आणण्यासाठी पोलिसांना बोलवाव लागल.
या नंतर मतदान थांबवा म्हणून काही लोकांनी स्टँड घेतला. आरडा-ओरड सुरू होती. जुनी कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा केविलपाणा प्रयत्न करत होत. या पॉवर गेम मध्ये आठवलेने शांततेने घेण्यापेक्षा गोंधळ करण्याऐवजी पवार निती हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. गोंधळात काही लोकांनी मतदान सुरू ठेवण्याचा घाट घातल्याने लांडगे गटाचे दोन लोक पडले.
या सर्व राड्यानंतर आता लांडगे काही करून दाखवतात की नुसत मिरवतात हे येणा-या काळात स्पष्ट होईल. अनेक वर्षांपासून पडद्यामागून घाणेरडी पॉवर निती करणा-यांचा बुरखा नव्या दमाच्या लोकांनी फाडल्याने जेष्ठांसह नुकतेच या क्षेत्रात दाखल झालेले सुखावले आहेत.
तसेच या हाणामारीत ज्येष्ठ (वयाने) असलेले मंत्रालय प्रतिनिधी विजय भोसले खाली पडले हे वेगळच. त्यांना इतरांनी हात दिला नाहीतर दवाखाना लांब होता. 'विनोदाने' घेणारे भोसले मात्र या प्रकारने पुरते गोंधळले.
आता मोठा पवार माज सोडून देतो की धाकल्या पाठोपाठ मार खातो याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

पेठकर पुन्हा नागपूरला तर फलटणकरांची 'घरवापसी'

औरंगाबाद -   दिव्य मराठीमध्ये नागपूरहून औरंगाबादला बदली झालेल्या अतुल पेठकरांना पुन्हा नागपूरला पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र संपादक प्रशांत दीक्षित यांनी घेतला आहे . नागपूरचे मंगेश राऊत हे लोकसत्ता मध्ये गेले आहेत. नेमकी हीच बाब पेठकरांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे ते सध्या  जाम खूष आहेत.  30 तारखेला सामान गुंडाळून 31 तारखेला  ते रातराणीने  नागपूरला जाणार आहेत. 
दुसरीकडे   सॅटेलाइट एडिटर श्रीपाद  सबणीस यांच्या पदाचा प्रभार अकोल्या वरून बदलून आलेल्या नितीन फलटणकर यांना देण्यात आला. त्यामुळे सध्या् सबणीस हे बिनखात्याचे संपादक झाले आहेत. सतत कुणाच्या ना  कुणाच्या काड्या करणाऱ्या सबणीसाची कायम हकालपट्टी करावी अशी मागणी होत आहे.

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

आकडे छापल्याबद्दल "पुढारी व तरुण भारत" वर गुन्हा

पणजी - गोव्यात चाललेल्या मटक्‍यावर बडगा उगारताना गोवा पोलिसांनी "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘ या वृत्तपत्रांवरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या दणक्‍याने मटक्‍याचे आकडे छापण्याचे वृत्तपत्रांचे कृत्य चव्हाट्यावर आले आहे. या वृत्तपत्रांसह काही मटका ऑपरेटर तसेच एक अनोळखी मंत्री, काही राजकारणी, पोलिस अधिकाऱ्यांवरही उच्च न्यायलयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु झाला असून संबंधित वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांकडेही चौकशी होईल असे या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक विश्‍वेश कर्पे यांनी सांगितले.
गोव्यात राजरोस मटका जुगार चालत असतानाही पोलीस कारवाई करीत नाहीत. राजकीय पाठबळ आणि हप्तेशाहीमुळे जुगारचालकांना भय उरलेले नाही. शिवाय, वृत्तपत्रांमधून मटक्याचे आकडे प्रसिद्ध होत असल्याने या जुगाराचा प्रसार वेगाने होण्यास हातभार लागत आहे. मटक्याच्या जुगारामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, तरुणपिढीही यात ओढली जात आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी माहिती हक्क कार्यकर्ते आणि वीज खात्याचे कर्मचारी काशिनाथ शेट्ये (रा. रायबंदर-गोवा) यांनी उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात एप्रिल २0१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती.
या याचिकेची दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. त्यानुसार ११00 मटका बुकी, 'कल्याण', मीलन, स्टार, आदी नावाने मटक्याचे रॅकेट चालविणारे गुजरातमधील मटकामालक, निनावी राजकारण्यांसह 'पुढारी' आणि 'तरुण भारत' या वृत्तपत्रांवर भा.दं.वि. कलम १0९, १२0 (बी), (३४), गोवा-दमण-दीव जुगार विरोधी कायदा कलम ३, ४, ११ (२) १२ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

 मटक्‍याच्या चक्रात अनेक संसार धुळीला मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. या संपूर्ण बेकायदा धंद्यावर पूर्ण नियंत्रण पोलीस ठेऊ शकलेले नाहीत त्याचबरोबर काही वृत्तपत्रे मटक्‍याचे आकडे प्रसिध्द करुन याचा प्रसारच करीत असतात. सामान्य, गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात माती कालवण्याचाच उद्योग मटक्‍याच्या प्रसारातून होतो. त्याविरोधात गोव्यात दाखल झालेल्या गुन्ह्याने मटका चालवणारे, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसोबतच मटक्‍याचे आकडे प्रसिध्द करणाऱ्या वृत्तपत्रांना चपराक बसली आहे. या दोन्ही वृत्तपत्रांनी मटक्‍याचे आकडे प्रसिध्द केल्याचा गुन्हा गोवा दमण दीव जुगार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार नोंद झाला आहे.

"पुढारी‘ आणि "तरुण भारत‘सह 1100 मटका बुकींच्या विरोधात पणजी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. गुन्हा अन्वेषण शाखेने या दोन वृत्तपत्रांसह यात गुंतलेल्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मटका जुगार चालवणाऱ्या काहींची नावेही यात समाविष्ट आहेत. यामध्ये मिलन मटका ऑपरेटर गुजरात, कल्याण मटका ऑपरेटर गुजरात, गुजरातमधील मुख्य ऑपरेटर, स्टार ऑपरेटर गुजरात, तसेच बुधो उर्फ पारेख गोवा यांचा समावेश आहे. थिविम येथील किरण नावाच्या राजकीय नेत्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

गोव्यातील आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये, डॉ. केतन गोवेकर, संजय सरमळकर, रुई फेरेरा, सोनिया सातर्डेकर, डेस्मंड अल्वारेस यांनी गोव्यातील मटका जुगाराविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडे धाव घेतली. या जनहित याचिकेत गेल्या दहा वर्षातील मटका जुगार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती दिली होती. गोव्यात राजरोस चालणाऱ्या मटक्‍यावर पोलिस कारवाई करत नाहीत, उलट राजकीय पाठबळ आणि हप्तेखोरीमुळे जुगाराला बळच मिळते वृत्तपत्रातून मटक्‍याचे आकडे प्रसिध्द होत असल्याने त्याचा वेगाने प्रसार होतो तसेच यात तरुण पिढीही ओढली जाते याकडे काशिनाथ शेट्ये व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेत लक्ष वेधण्यात आले होते. त्यांनी मटक्‍याचा व्यवहार कसा चालतो तसेच "पुढारी‘ व "तरुण भारत‘मधून आकडे कसे प्रसिध्द होतात याचीही माहिती दिली होती.

खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर याचिकेतील माहितीवर आधारीत गुन्हा दाखल करण्याचे तसेच त्यावर पुढील तपास करण्याचे आदेश दिले. दर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा प्रगती अहवाल न्यायालयास सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा शाखेच्या रायबंदर-पणजी कार्यालयात गुन्हा नोंद झाला आहे. भादंवि कलम 109, 120 (बी), (34), गोवा-दमण- दीव जुगारप्रतिबंधक कायदा 1976 च्या कलम 3, 4,11 (2) 12 (1) (अ) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात गोव्यातील राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचाही उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. तर "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘ या वृत्तपत्रांवरही गुन्हा नोंद झाल्याने आकडे प्रसिध्द करण्याचे प्रकार चर्चेत आला आहे. यावर पोलिस पुढे काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक विश्‍वास कर्पे यांनी "पुढारी‘ व "तरुण भारत‘मध्ये छापलेल्या आकड्यांची माहिती घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांस काही दिवसात बोलावण्यात येईल असे आज येथे सांगितले. या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणीही केली जाईल असेही त्यांनी सांगितले. जुगाराच्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी पोलीसांचे पथक गुजरात तसेच मुंबईतही जाण्याची शक्‍यता आहे. पोलीसांनी गोव्यातील मटका बुकींकडेही चौकशी सुरु केली आहे. दिवसभरात सुमारे 100 बुकींकडे अशी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र पोलिस कारवाई करणार काय?
बेटिंग ही समजाला लागलेली कीड आहे. गरीबांचे घरदार उध्वस्त करणाऱ्या या बेकायदा धंद्याच्या विरोधात निर्णायक कारवाई होत नाही याला कंटाळूनच गोव्यातील माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने दखल घेतल्याने पोलीसांना "पुढारी‘, "तरुण भारत‘सह अनेकांवर गुन्हे दाखल करणे भाग पडले आहे. मटका जुगार गोव्यात आहे तसाच महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकातही राजरोस सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तरी गोव्यातील पोलिसांनी मटक्‍यावर हातोडा उगारला आहे. यातून महाराष्ट्राचे पोलिस काही शिकणार का? असा सवाल विचारला जात आहे. मटका आणि त्याचे आकडे प्रसिध्द करणे हा महाराष्ट्रातही सर्रास चालणारा प्रकार आहे. त्यावर पोलिसी बडगा उगारला जाणार का याकडे लक्ष असेल.

याप्रकरणात मटका जुगार माफिया आणि पोलिस राजकारणी यांच्यातील लागोबांधे तपासले जावेत तसेच "पुढारी‘ व "तरुण भारत‘मधील मटका आकड्यांची, ते पुरवणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. तपासकामात ढिलाई झाल्यास सीबीआयकडे तक्रार करु
- काशिनाथ शेट्ये (या प्रकरणातील याचिकाकर्ते)

गोव्यातील मटका जुगारावर पूर्ण बंदी आणावी. जी वृत्तपत्रे आणि राजकारणी या मटका जुगाराला प्रोत्साहन देतात त्यांचाही पर्दाफाश व्हायला हवा. राजकारणी, पोलीसांच्या आशिर्वादाशिवाय दिवसाढवळ्या आणि सर्रास मटका सुरु राहणे शक्‍य नाही.
- ऍड अजितसिंह राणे (गोवा राज्यप्रमुख, शिवसेना)

महाराष्ट्रात कायदेशीर मत घेणार - दीक्षित
बेटिंग ही समजाला लागलेली कीड आहे. गरिबांचे घरदार उद्‌ध्वस्त करणाऱ्या या बेकायदा धंद्याच्या विरोधात निर्णायक कारवाई होत नाही याला कंटाळूनच गोव्यातील काही कार्यकर्त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने दखल घेतल्याने पोलिसांना "पुढारी‘, "तरुण भारत‘सह अनेकांवर गुन्हे दाखल करणे भाग पडले आहे. मटका महाराष्ट्रातही सुरू आहे आणि येथेही काही वृत्तपत्रे आकडे छापतात गोव्यातील कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात कारवाई होणार काय याविषयी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात कायदेशीर मत घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.यांच्यावर गुन्हे.. 
१. मीलन मटका ऑपरेटर, गुजरात
२. कल्याण मटका ऑपरेटर, गुजरात
३. मेन मटका ऑपरेटर, गुजरात
४. स्टार मटका ऑपरेटर, गुजरात
५. सुपर मटका ऑपरेटर, गुजरात
६. बुधो ऊर्फ पारेख, गोवा ७. थिवी-बार्देस येथील किरण नामक राजकीय व्यक्ती
८. ११00 मटका बुकी
९. दैनिक तरुण भारत
१0. दैनिक पुढारी

संजीव उन्हाळे यांच्या विरोधात बहिणीची गंभीर तक्रार


औरंगाबाद - महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक श्रीमंत श्रमिक पत्रकार आणि पंचतारांकित सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणारा औरंगाबाद शहरातील संजीव उन्हाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या सख्ख्या बहिणीला ठार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस स्टेशनकडे स्वतः बहिणीनेच केली आहे.
संजीव उन्हाळे यांची सख्खी धाकटी बहिण वृन्दा पंढरीनाथ उन्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी तेहतीस वर्षांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन सुंदर लटपटे या दुसऱ्या पत्रकाराशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.लग्नानंतर तेहतीस वर्षांनी गेल्या १५ सप्टेंबरच्या रात्री माझी सुंदरसोबत संजीवच्याच विषयावरून बोलाचाली झाली. त्या दिवशी सुंदरने मला आईवरून शिव्या दिल्याने मी रागाच्या भरात घरातील आमच्या दोघांच्याही डिप्रेशन आणि झोपेच्या बऱ्याच गोळ्या घेऊन संजूच्या घरी निघून गेले.तिथे रडापडीनंतर संजीव आणि त्याची पत्नी अनघा पाटील यांनी माझ्याकडील गोळ्या हिसकावून घेऊन तू या गोळ्या थोड्या घे,तुला बरे वाटेल असे म्हणत आठ-दहा गोळ्या मला जबरदस्तीने गिळण्यास भाग पाडले.परिणामतः माझी शुद्ध हरवली.माझ्या बेशुद्ध अवस्थेतच मला बीडच्या डॉक्टर भावाकडे त्याच्या दवाखान्यापुढे एका गाडीने आणून पोचवल्याचे मला सकाळी जरा समजले.विशेष म्हणजे एमडी डॉक्टर असणाऱ्या माझ्या डॉक्टर भावानेही मला जबरदस्तीने मला सात-आठ गोळ्या गिळायला लावल्या आणि परत हात धरून बसविले.मी पुन्हा बेशुद्ध झाले.याचीच आवृत्ती लातूर येथे बहिणीच्या घरीही झाली.मधेच जरा शुद्ध आल्यावर मी माझा मोबाईल सुरु केला तर माझा पती सुंदर याचा सेकंदातच फोन आला.या फोन चालू करण्याच्या माझ्या एका कृतीमुळे मला परत येत आले नाहीतर मी गाडीतच मरून पडावे आणि आळ सुंदरवर यावा,काटा दोघांचाही निघावा असा डाव सख्खे भाऊ-बहिण माझ्यासोबत खेळले,असे वृन्दा उन्हाळे यांनी सांगितले. 

( संजीव उन्हाळे  हे दिलासा संस्थेचे सर्वेसर्वा   आणि लोकमत चे  स्तंभ लेखक   आहेत ) 

................................................
वृन्दा  उन्हाळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार अशी 
दिनांक – १३/१०/२०१५
प्रती,
आ.पोलीस निरीक्षक,
मुकुंदवाडी पोलीस स्टेशन,
औरंगाबाद
फिर्यादी – वृन्दा पंढरीनाथ उन्हाळे 
आरोपी – १] संजीव पंढरीनाथ उन्हाळे,
प्राईड पार्क,वेदांतनगर,औरंगाबाद 
मोबाईल – ९८२२०५९८८३
२] डॉ.अनघा वसंत पाटील,
प्राईड पार्क,वेदांतनगर,औरंगाबाद 
मोबाईल – ९८२२०९७२६४ 
३] डॉ.राजू पंढरीनाथ उन्हाळे,
उन्हाळे हॉस्पिटल,मेन रोड,बीड.
मोबाईल – ९८२२२४४५१३
४]नंदा दिलीप भातलवंडे,
स्टेट बँक ऑफ हैदराबाद कॉलनी,अंबाजोगाई रोड,लातूर
९४२२४६८६९३
५] दिलीप भातलवंडे 
स्टेट बँक ऑफ हैदराबाद कॉलनी,अंबाजोगाई रोड,लातूर
फोन -०२३८२-२२७६०२ 
६] ड्रायव्हर – नाव माहिती नाही 
गाडी स्कारपीओ [बहुतेक]
विषय – तक्रार दाखल करून चौकशी करणेबाबत
आदरणीय महोदय,
मी, वृन्दा पंढरीनाथ उन्हाळे,वय ५०, राहणार तिरुपती पार्क,जी बिल्डींग,घर नं.८, सिडको-एन ४ आपल्याकडे माझ्याच कुटुंबियांविषयी तक्रार देऊ इच्छीते. माझ्या पतीचे नाव श्री. सुंदर विलासराव लटपटे असे आहे. पण मी पूर्वीपासूनच माझे माहेरचे नाव लावते. तक्रार करण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. माझा विवाह मी तेहतीस वर्षांपूर्वी कुटुंबाच्या विरोधात जाऊन केला. मी जन्माने ब्राह्मण असून माझे पती जन्माने वंजारी आहेत. आम्हाला मुलबाळ नाही. एक मुलगी झाली होती पण ती जन्मानंतर काही दिवसांनीच वारली.
माझे पती पत्रकार होते, नंतर त्यांनी एकलव्य प्रकाशन नावाचा शालेय मुलांच्यासाठी स्वाध्यायमाला काढली. हा व्यवसाय खूप चालला. मी त्यावेळी बँकेत नोकरी करत होते पण व्यवसायाला मदत करण्यासाठी मी ती नोकरी सोडली. दुर्दैवाने २००५ साली माझे पती आजारी पडले आणि काही लोकांनी अफवा पसरवून आमचा व्यवसाय आता चालू शकणार नाही, या दुखण्यातून ते वाचू शकणार नाहीत असा अपप्रचार केला. हे सर्व पाहून माझे पती जास्तच आजारी पडले आणि डिप्रेशनमध्ये गेले. नंतर आमचा व्यवसाय बुडाला. त्यानंतर माझे पती तीन वर्षे बेडरीडन होते. या गोष्टीला आता दहा वर्षे झाली आहेत आणि हरप्रयत्न करून आम्ही पुन्हा उभे राहण्याची धडपड करत आहोत.
मला मोठा भाऊ संजीव उन्हाळे, डॉ.राजू उन्हाळे आणि नंदा भातलवंडे अशी तीन भावंडे आहेत. यात मी सगळ्यात लहान आहे. माझ्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले. माझी आई ७८ वर्षांची आहे. माझा मोठा भाऊ हाच आमच्या कुटुंबाचा कर्ताधर्ता आहे. 
माझ्या वडिलांच्या निधनानंतर संजीवने बोलण्याबोलण्यात मला सुचवले की मी त्याच्या ‘दिलासा’ या एनजीओ या संस्थेसाठी काम करावे. त्यावेळी माझे पती दैनिक लोकपत्रमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम करत होते. पण व्यवसाय करण्याचे त्यांच्या डोक्यात होतेच. मी दिलासाबद्दल बोलल्यानंतर त्यांनी मला संमती दिली आणि त्यांनी ठरवले की दोन-तीन महिन्यांचा वेळ घेऊन व्यवसाय निश्चित करावा. मग त्यांनी त्यांची नोकरी सोडली. पण त्यांनी नोकरी सोडल्याचे कळताच संजीवने मला त्याच्या संस्थेत घ्यायला नकार दिला. हा खूपच मोठा धक्का होता. आम्ही पुन्हा शून्यावर आलो होतो. मी अनेकदा विनंती केली पण त्याचा नकार कायम राहिला. कंपनीने आम्हाला दिलेले घर सोडून दुसरे घर घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. शेवटी काही मित्रांच्या मदतीने आम्ही नवे भाड्याचे घर घेतले आणि माझ्या पतींनी शैक्षणिक संस्थांना कन्सल्टींग देणे थोड्या प्रमाणात चालू केले. पण आमचा खर्च त्यात भागत नव्हता. व्यवसाय बंद झाल्यापासून सुंदरला डिप्रेशन आणि झोपेच्या गोळ्या सुरु आहेत. मग मजबूर होऊन मी संजीवला मला एखादा छोटे क्लिनिक सुरु करण्यासाठी तुझ्या ओळखीने लोन मिळवून दे, अशी विनंती केली.मधल्या काळात मी घरगुती औषधोपचार आणि मसाज थेरेपीचा तसेच अल्टरनेटिव्ह मेडिसीनचा कोर्स केला होता आणि अभ्यासही केला होता. त्याने होकार दिला पण पुढे काहीच केले नाही. इथे एक गोष्ट सांगणे गरजेचे आहे की संजीव माझा पती सुंदर याचा कायम तिरस्कार करत असे. त्याच्या गैरसमजाला दूर करण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला, सुंदरने काहीच केले नसतानाही त्याची प्रत्यक्ष माफी मागितली पण त्याच्या भावनेत फरक पडला नाही. पुन्हा काही काळानंतर मी एक प्रोजेक्ट त्याच्यासमोर मांडला. हा कॉन्सिलिंगचा व्यवसाय मी एका व्यक्तीसोबत भागीदारीत करणार होते. त्यात मी अडीच लाख रुपये लावणे आवश्यक होते. पण माझ्या भावाने आपल्याला भागीदाराची गरज नाही. मी तुला हा प्रोजेक्ट सुरु करून देतो, असे सांगितले. नंतर काही दिवसांनी मी त्याला विचारले असता मी सध्या मुलीचे लग्न होईपर्यंत कोणतीही गुंतवणूक करणार नाही, असे सांगून विषय संपवून टाकला. मग शैक्षणिक संस्थांना कन्सल्टींग आणि मित्रांकडून उसने पैसे घेऊन आम्ही दिवस काढू लागलो. पण माझा विश्वास होताच की संजीव मला मदत करेलच. मग मी त्याला फोन करायची, कधी तो फोन घ्यायचा, कधी नाही. कधी दोन मिनिटात कॉल करतो असे सांगायचा. मी एवढी डिस्टर्ब असे की मी आधी गुंगीच्या दोन गोळ्या खाऊन मगच त्याला फोन करत असे.मी एकदा त्यला इतकेसुद्धा बोलले होते की यू मेड मी अ बेगर. माझे ना नवऱ्याकडे लक्ष असे ना घराकडे. मग मी दिवसदिवस झोपून राहत असे. पण पैशाचा प्रश्न फक्त पैशानेच सुटतो. मी परत फोन केल्यावर तीन-चार दिवसांनी तो त्याच्या ड्रायव्हरच्या हाती कधी पाच, कधी दहा, कधी पंधरा हजार असे पैसे चार-पाच वेळा पाठवले. दोनदा त्याने मला पन्नास हजाराचे चेक दिले. आमचा दोघांचा फक्त औषधांचा खर्चच दर महिन्याला पंधरा हजाराच्या आसपास जातो हे मी त्याला विनवून सांगत असे. शेवटी परिस्थिती एवढी बिघडत गेली की मी नाईलाजाने उधारी करायला सुरुवात केली. मध्यंतरी संजीवचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले. तेंव्हा तो जरा बरा झाल्यावर मी त्याला उधारीविषयी आणि माझ्यासाठी एखादा जॉब पाहण्याची विनंती केली कारण त्याच्या ओळखी खूप आहेत. मी त्याला विनवले की काहीही करून तुम्ही दोघे भाऊ माझी उधारी फेडा. मग मी जी मिळेल ती नोकरी करेन. माझे पती पण नोकरी करतील आणि आमचा तुम्हाला त्रास होणार नाही. त्यावर त्याने तुला नोकरीची गरज नाही कारण तू माझी बहीण आहेस आणि तुझी उधारी मी आठवडाभरात क्लिअर करतो असे सांगितले. परत काहीच केले नाही. त्याने मधल्या काळात माझ्या वयस्कर आईला ‘वंदा मला सारखी पैसे मागते आणि मला त्याचा त्रास होतो’ असे सांगितले. परिणामी माझे येणेजाणे आईकडे बंद झाले. माझी बाकीची भावंडेही मला त्याला त्रास का देतेस, असे दटावू लागली. मी मग माझ्या पतींना सगळे सांगितले आणि आपण आपली एक एकर शेती विकू असे सुचवले. आधी मी त्यांच्या अपरोक्ष हे सगळे केल्यामुळे ते माझ्यावर चिडले. नंतर त्यांनी संजूला शिव्या दिल्या. मला त्यांनी सांगितले की इथून पुढे तू त्याला कधीही पैसे मागायचे नाहीत. आणि मी एक दिवस त्याला चांगला मारणार आहे. मी यावर घाबरले आणि तू संजीवला हात जरी लावलास तरी मी जीव देईन असे सांगितले. इतक्या वर्षात आमच्यात भांडणे झाली नव्हती पण या कारणावरून आमची चीडचीड होऊ लागली. पुन्हा एकदा माझ्या पतीने संजीवला शिव्या दिल्या आणि तू तुझ्या बहिणीला जो मानसिक त्रास देत आहेस त्याबद्दल मी तुला चांगला मार देणार आहे, असे सांगितले. मला न सांगता त्याने संजीवला काही एसेमेसही पाठवले. शेवटी मी माझ्या पतीला शपथा घालून त्याच्याकडून वचन घेतले की तो संजीवला हातही लावणार नाही. मला आईला भेटावे वाटायचे पण माझी बहीण किंवा भाऊ मला आईकडे अजिबात जायचे नाही, असे रागावून सांगत.
दुसरीकडे आमची परिस्थिती बिकट होऊ लागली आणि माझ्या पतीने जरी मला वचन दिले तरी तो फार डिस्टर्ब झाला आणि त्याच्या डोक्यातला संताप कमी झाला नाही. आमचे नॉर्मल बोलणेही कठीण होऊन बसले. अशातच म्हणजे १५ सप्टेंबरला रात्री सुंदर त्याच्या एका मित्रासोबत घरी दारू पीत आणि पुढे काय मार्ग काढता येईल याची चर्चा करत बसला होता. मध्येच त्याने मला भावाबद्दल शिव्या द्यायला सुरुवात केली मी गप्प बसले. मी विचार केला की सकाळी शांतपणे बोलता येईल. पण अचानक त्याने मला माझ्या आईवरून वाईट शिवी दिली आणि माझा संयम संपला. त्यांना जेवायला वाढून मी रात्री साडेअकरा वाजता मी माझ्या आणि सुंदरच्या डिप्रेशन आणि झोपेच्या गोळ्या, मोबाईल आणि पर्स घेऊन गाऊनवरच घर सोडले. जाताना ते चर्चेत असल्याचे पाहून मी दाराला बाहेरून कडी घातली आणि माझ्या ओळखीच्या एका रिक्षावाल्याला मला भावाकडे नेऊन सोड, असे विनवले. कारण रात्री मला बाहेर भीती वाटत होती. मी भावाला फोन करून मी घर सोडल्याचे सांगितले. तो खूप लांब राहत असल्याने मला पोचायला वेळ लागला. अखेर मी त्याच्याकडे, म्हणजे संजीवकडे पोचले. तो मला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि मी सारखी रडत होते. त्यादिवशी मी काहीच खाल्ले नव्हते. एकूणच हे पैसे मागणे सुरु झाल्यावर मला अन्न पहिले की मळमळ होत असे. मी थोडे पाणी मागून माझ्याकडच्या दोन गोळ्या खाल्ल्या.यावर संजीवने विचारले की या कशाच्या गोळ्या आहेत? मी सांगितले की या डिप्रेशन आणि झोपेच्या गोळ्या आहेत.नंतर मी गोळ्यांची पिशवी भावाकडे दिली आणि त्या नीट सांभाळून ठेव,असे सांगितले. त्यानंतर मी कॉफी मागितली.मी सारखी रडत-ओरडत होते की मला सुंदरला फोन करायचा आहे आणि त्याला झापायचे आहे.त्याने माफी मागितलीच पाहिजे.पण माझा फोन आधीच त्यांच्यापैकी कुणीतरी काढून घेऊन बंद केला होता. मी ओरडत होते की माझा फोन तरी दे नाहीतर तुझा तरी दे. मला सुंदरला बोलायचे आहे.यानंतर संजीव आणि अनघा यांनी मला जबरदस्तीने अजून पाच-सहा गोळ्या गिळायला लावल्या. ते म्हणाले की आता तू कसलाही विचार करू नकोस. तुला आता शांत झोप येईल. सात-आठ गोळ्या पोटात गेल्याने मला काही सुचत नव्हते. उठून उभे राहिले तर तोल जात होते. मग त्या दोघांनी मला धरून जिन्यावरून वरच्या खोलीत नेले आणि झोपवले. मी गोळ्यांच्या प्रभावामुळे तुटक तुटक बोलत होते. मला झोपायचे नाही, मला सुंदरला बोलायचे आहे असे म्हणत होते. संजीवने परत मला पाण्यासोबत चार-पाच गोळ्या दिल्या. त्यानंतर मी झोपले असावे किंवा बेशुद्ध झाले असावे. नंतर मला संजूने हलवून, गालावर थापट्या मारून जागे केले आणि सांगितले की बाहेर गाडी आणि ड्रायव्हर तयार आहे. तुला आता बीडला राजूकडे जायचे आहे. मी अजिबात भानावर नव्हते. मी साधे तोंडही धुतले नाही. अनघाने दिलेले कपडे तिच्याच आधाराने घातले आणि कॉफी घेतली. माझे हात इतके थरथरत होते की मला कपही नीट धरता येत नव्हता. मला बीडला आणि तेही रात्री का जायचे आहे हा साधा प्रश्नही मला सुचला नाही. संजीवने मला प्रॉमिस करायला लावले की मी फोन सुरु करणार नाही. अनघाने तिचे दोन ड्रेस घालून एक पिशवी माझ्याकडे दिली आणि दोघांनी मला दोन्ही बाजूंना धरून गाडीत बसवले. माझी गोळ्यांची छोटी पिशवी आधीच त्यांनी पर्समध्ये टाकली होती. गाडीत बसताच मी लगेच कलंडले. वास्तविक माझा डावा हात मोडल्यामुळे त्यात रॉड आहेत आणि झोपताना त्याला जराही धक्का लागला तरी प्रचंड वेदना होतात.पण मला यावेळी काहीच जाणवले नाही.बहुतेक मी अर्धबेशुद्ध असावी किंवा पूर्ण बेशुद्ध असावी. कारण गाढ झोपेतही हाताची वेदना मला जाणवलीच असती. नंतर ड्रायव्हरने मला खूप हाका मारून मारून उठविले आणि सांगितले की राजूदादाचा दवाखाना आला आहे. राजू बाहेरच उभा होता म्हणजे त्या ड्रायव्हरचे संजीव आणि राजूशी सतत बोलणे सुरु असावे. त्याने मला आधार देऊन गाडीतून खाली उतरवले आणि आधार देत त्याच्या दवाखान्यात नेले. माझे डोके अजिबात चालत नव्हते. तो म्हणाला की तुझा बीपी पाहू का? मी नको म्हणून सांगितले. तो म्हणाला की आता आपण नास्टा करू. मी सांगितले की मला खूप मळमळ होत आहे आणि प्लीज मला खायचा आग्रह करू नकोस. त्याने मला घरी न नेता जवळच्या हॉटेलमध्ये नेले आणि काहीतरी मागवले. मला उलटी येत होती पण तिथे इतके लोक खाताना कुठे उलटी करू असा मला प्रश्न पडला.शेवटी मी एक ग्लास घेऊन बाहेर येऊन उलटी केली.पोटात काहीच नसल्याने नुसते कडू पाणी पडले.मग मी राजूला सांगितले की मी काहीच खाणार नाही. फक्त मला कॉफी मागव. नंतर मी माझी गोळ्यांची पिशवी पर्समधून बाहेर काढली. त्याने ती त्याच्याकडे घेतली, गोळ्या पाहिल्या आणि त्यातल्या पाच-सहा गोळ्या मला कॉफीआधी घ्यायला लावल्या. तो म्हणाला की आता तुला बरे वाटेल. तो एमडी म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसीन आहे. मग त्याने मला परत गाडीत बसवले आणि ड्रायव्हरला गाडी लातूरला न्यायला सांगितले. मी परत झोपी गेले. पुढे कुठेतरी खूप डोके दुखून मी जागी झाले. कसेतरी उठण्याचा प्रयत्न करत मी ड्रायव्हरला किती वाजले असे विचारले. त्याने काहीही उत्तर दिले नाही. मधेच अचानक थोडी शुद्धीवर आल्यानंतर मी मोबाईल ऑन केला.पण वेळ बघण्याआधीच काही सेकंदातच सुंदरचा फोन आला.तो मला म्हणाला की तू कशी आहेस,कुठे आहेस?मला माफ कर.मी पुन्हा भांडण करणार नाही.संजीवचे नावही घेणार नाही.पण तू कुठे आहेस ते प्लीज सांग. मी ड्रायव्हरला विचारले की आपण कुठे आहोत. यावरही त्याने काहीही उत्तर दिले नाही. मी सुंदरला सांगितले की मी खूप लांब आहे पण नेमकी कुठे आहे हे मला सांगता येत नाही. मी संजीवच्या गाडीत आहे आणि त्याचा ड्रायव्हर माझ्यासोबत आहे. त्यावर तो म्हणाला की तू ड्रायव्हरला विचार आणि मला सांग. तू बीडला आहेस का? मी सांगितले की मी बीडहून निघून खूप वेळ झाला असावा. तो म्हणाला की तुझ्या पाया पडतो, माफी मागतो पण तू बीडला परत ये. मी तुला न्यायला येतो.मी त्याला नको येऊ असे सांगितले कारण एकतर त्याची प्रकृती चांगली नाही आणि वाटेत चुकामूक होण्याची मला भीती वाटत होती. परत मी झोपी गेले. मला ड्रायव्हरचीही भीती वाटू लागली होती कारण तो एकदाही माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नव्हता किंवा साधे मागे वळून पाहत नव्हता. मला नेमके कुठे ते आठवत नाही पण मला पुन्हा जोरदार उलटीची भावना होऊ लागली. तोल जात असल्याने मी गाडीतूनच बाहेर उलटी केली. मी खूप प्रयत्न करून जागी राहिले आणि एक गाव दिसताच ड्रायव्हरला पैसे देऊन पाण्याच्या दोन बाटल्या आणायला सांगितले. योगायोगाने मला रस्त्याच्या उलट बाजूला एक साधा दवाखाना दिसला. मी कशीतरी खाली उतरले आणि कशीतरी तोल सावरत तिकडे निघाले. ड्रायव्हरने मला मदत करण्याचा किंवा सोबत येण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही. सुदैवाने तिथे डॉक्टर होते. मी त्यांना अडखळत सांगितले की मला उलट्या होत आहेत. प्लीज मला उलटी थांबविण्याचे इंजेक्शन द्या. त्यांनी माझे बीपी पाहिले आणि ते म्हणाले की तुमची अवस्था सिरीयस आहे. तुमचे बीपी लो झाले आहे. तुम्हाला इथे राहावे लागेल. मी म्हणाले की मी राहणार नाही. तुम्ही फक्त मला इंजेक्शन द्या. इंजेक्शन्स दिल्यावर डॉक्टरांनी सांगितले की मी तुम्हाला झोपेचेही एक इंजेक्शन दिले आहे पण तुम्ही जाऊ नये असे मला वाटते. मी परत कशीतरी गाडीत बसले आणि ड्रायव्हरला जोरात विचारले की आपण कुठे आहोत? त्याने सांगितले की आपण लातूरजवळ आहोत. तुम्ही झोपी जा. मी त्याला सांगितले की ताबडतोब गाडी मागे फिरवा. मला डायरेक्ट औरंगाबादला जायचे आहे. आधी एवढ्या गोळ्या आणि नंतर तीन इंजेक्शन्स यामुळे मला गरगरत होते. त्याने मला काहीच उत्तर दिले नाही. मी पुन्हा ओरडून त्याला तेच सांगितल्याचे पुसट आठवते कारण नंतर माझी शुद्ध हरपली. माझे डोके कशावर तरी जोरात आदळले पण मी काहीच करू शकत नव्हते. पुन्हा एकदा ड्रायव्हरने जोरजोरात हाका मारून मारून मला जागे केले आणि सांगितले की नंदाताईचे घर आले आहे. माझी बहीण आणि भावजी दारातच उभे होते. मी म्हणाले की मला औरंगाबादला जायचं आहे, असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना? पुन्हा काही उत्तर मिळाले नाही. बहिणीने आधार देऊन मला घरात नेले. तू थोडी साबुदाण्याची उसळ खातेस का, असे तिने विचारले. मला उलटीही येत होती, चकराही येत होत्या आणि डोके बधीर झाले आहे असे वाटत होते. मी तिला सांगितले की खाण्याचे नाव काढू नकोस. आधी बाथरूमला घेऊन चल कारण तोल जात आहे. पुन्हा उलट्या सुरु झाल्या. तीन-चार उलट्यांनंतर मी तिला सांगितले की त्या ड्रायव्हरला थांबव कारण मला लगेच परत जायचे आहे. यावर तिने आता आठ-दहा दिवस कुठे जायचे नाही, असे म्हटले. मी म्हणाले की ड्रायव्हर नसला तर मी बसने जाईन. अशीच १०-१५ मिनिटे गेली आणि मी बसल्याजागी झोपी गेले. मला जाग आली तेंव्हा संध्याकाळ झाली होती. मी बहिणीला विचारले की तू मला का उठवले नाहीस? त्यावर तिने सांगितले की संजीवच्या परवानगीशिवाय तू कुठेही जाणार नाहीस. मी मोबाईल मागितला. पण तिने टाळाटाळ केली. मी फार मागे लागल्यानंतर तिने फोन दिला. तिने परत काहीतरी खा असा आग्रह केला पण मी नकार दिला आणि फक्त चहा किंवा कॉफी घेईन असे सांगितले. दरम्यान पुन्हा उलट्या सुरु झाल्या. तिने माझ्या पर्समधून गोळ्या काढल्या आणि एकदम सात-आठ गोळ्या जबरदस्तीने माझ्या तोंडात कोंबल्या.घेतल्या.माझ्या अंगात विरोध करण्याचीही ताकद नव्हती. मी त्याही अवस्थेत ती मला कोंडून ठेवील अशी शंका आल्यामुळे कशीतरी झोकांड्या खात घराबाहेर येऊन बसले आणि मोबाईल सुरु केला. काही सेकंदातच सुंदरचा फोन आला. तो खूप रडत होता. तो म्हणत होता की तू अशी का करते आहेस? दुपारी येते म्हणालीस आणि पुन्हा फोन बंद केलास. मी सांगितले की मी परत झोपले होते आणि बहुतेक नंदाने फोन बंद केला असावा. तो म्हणत होता की तुझी इच्छा नसेल तर तू माझ्यासोबत राहू नकोस. फक्त मला एकदा तुला पाहू दे. नंतर तू म्हणशील तिथे मी तुला स्वतः नेऊन सोडतो. मी सांगितले की मी अजून अर्ध्या तासात निघते आणि साधारण मध्यरात्री तिथे पोचते. मी निघाल्यावर लगेच तुला फोन करीन. पण नाही उचलला तर मी झोपले आहे असे समज. बहिणीच्या गयावया करून मी तिला गाडी आणि ड्रायव्हर आहे का ते विचारले. मी रडत होते, माझे झोक जात होते, मी बोबडे बोलत होते. तिने आधी सांगितले की गाडी परत गेली. मी म्हणाले की ठीक आहे. मी कसे जायचे ते पाहते. यावर तिने आत जाऊन काही फोन केले आणि सांगितले की गाडी आहे आणि ती इथे अर्ध्या तासात येईल.मी म्हणाले की मी त्यापेक्षा जास्त वाट पाहणार नाही.तिकडे सुंदर मरून जाईल. शेवटी साधारण साडेसातला मी निघाले. सुंदरला फोन केला आणि परत झोपी गेले. तसे पाहता लातूर ते औरंगाबाद हा प्रवास मोठा आहे. पण मी फक्त उलटी आली तरच प्रयत्नपूर्वक उठत होते. पुन्हा एकदा ड्रायव्हरने मला हाका मारून मारून उठवले आणि म्हणाला की आपले घर आले आहे. मी बाहेर पहिले तर गाडी संजीवच्या दारात उभी होती. मी म्हणाले की मला माझ्या घरी एन-४ ला जायचे आहे. त्यावर त्याने सांगितले की मला तर इथेच परत आणायला सांगितले होते. मी म्हणाले की एकतर मला माझ्या घरी सोडा नाहीतर मी गाडीतून खाली उतरते. कसे जायचे ते मी बघते. त्यावेळी रात्रीचे दोन वाजले होते. तो कदाचित घाबरला असावा कारण त्याने गाडी परत फिरवली आणि माझ्या घरापासून बरीच लांब उभी केली. तुमच्या साहेबांनी पाहायला नको, हे स्पष्टीकरणही दिले. नंतर पाच मिनिटांनी मी माझ्या घरी पोचले. प्रत्येक पायरी चढताना मला आता मी पडणार असे वाटत होते. सुंदरने दार उघडले तेंव्हा तो विश्वास नसल्यासारखा माझ्या चेहऱ्याला, हाताला हात लावून पाहात होता. जणू मी जिवंत येण्याची आशा त्याला नसावी.
आदरणीय महोदय/ महोदया, ही कथा- कादंबरीतील गोष्ट नाही. मी केलेला प्रेम-विवाह, सुंदरची वंजारी जात असणे आणि मी कथित ब्राम्हण, आणि म्हणून माझ्या रक्ताच्या नात्यांनीच मला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. माझा भाऊ संजीवने आमच्या लग्नानंतर स्वतः आंतरजातीय विवाह केला आणि त्याची बायको माझ्या नवऱ्याच्या जातीची म्हणजे वंजारी, याला काय म्हणावे? मी मुलगी म्हणून वेगळा न्याय? मला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, वरील सर्व आरोपींविरोद्ध झोपेच्या गोळ्या जबरदस्तीने खाऊ घालून, लग्नानंतर ३३ वर्षांनी हा ऑनर-किलिंगचा हा प्रयत्न होता याची दखल घेऊन वरील सर्व आरोपींविरूद्ध कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आणि तक्रार आहे.माझा भाऊ, संजीव हा स्वतःला पुरोगामी विचारांचा पत्रकार समजतो शिवाय तो दिलासा नावाच्या एनजीओचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवतो. अनेक मराठी वृत्तवाहिन्यांवरूनही पुरोगामित्वाच्या चर्चा करतो.माझा भाऊ असला तरी अशा ढोंगी कार्यकर्त्याला अधिक कडक शिक्षा झाली पाहिजे अशी माझी तक्रार आहे.स्वतः पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता आणि मानधनावर काम करणारा पत्रकार आज शहरातील एक श्रीमंत आणि प्रतिष्ठीत व्यक्ती कसा झाला याविषयी मला घेणेदेणे नाही.पण मनात आंतरजातीय लग्नाचा द्वेष ठेवूनच माझ्या खुनाचा प्रयत्न करणारांना शिक्षा झाली तरच समाजात मुलींविषयी भेदाभेद करणार्यांना धडा मिळेल. आणि मला संपवून माझा नवरा सुंदर याला माझ्याच खुनाच्या कटात किंवा आत्महत्या करायला भाग पाडले म्हणून अडकवायचे असा दुहेरी कट होता हे माझ्या लक्षात आले.त्यामुळे माझा नवरा सुंदर याला वरील प्रकारच्या कटात अडकविण्याचा प्रयत्न केल्याबद्दलसुद्धा वरील आरोपींविरूद्ध वेगळा गुन्हा दाखल करून या सर्व संबधितांना शिक्षा मिळावी अशी माझी मागणी आणि तक्रार आहे.मी कोणी कायद्याची वकील नाही. तरीही मी तक्रार करण्यास उशीर केला हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. परंतु अंदाजे २५-३० झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्यानंतर मला चार-पाच दिवस सुसंगत विचारही करता येत नव्हता.त्यानंतर मला सर्व घटनाक्रम हळूहळू आठवत गेला.आठवडाभरानंतर मला वारंवार सर्व आरोपींनी [श्री.दिलीप भातलवंडे सोडून] जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि गाडीतच माझा मृत्यू व्हावा यासाठी गाडी फिरवत राहिले या सत्याचा मला जबरदस्त मानसिक धक्का बसला.अगदी कालपर्यंत मी मधूनच सर्व काही विसरून जात होते.त्यावेळी मी माझ्या नवऱ्यालाही काही क्षण ओळखत नव्हते. अत्यंत अस्थिर मनःस्थितीमुळे व मानसिक धक्का बसल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यास मला उशीर झाला आहे. त्यातच मी तक्रार दाखल केली तर माझ्या वयोवृद्ध आईला धक्का बसेल या विचारानेही मी तक्रार करावी की नाही या संभ्रमात सापडले होते.पण दुसरीकडे अजूनही आमच्या दोघांच्याही जीवाला धोका आहे,त्यामुळे शेवटी तक्रार दाखल करण्याचा मी निर्णय घेतला.
आदरणीय महोदय/ महोदया, माझ्याकडून फिर्याद देण्यास उशीर झाला असला तरी आमच्या नवराबायकोच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्हाला संरक्षण द्यावे अशीही मागणी मी या फिर्यादीद्वारे करीत आहे. आमच्यापैकी कोणाला काही अपाय झाल्यास त्याला वरील आरोपी जबाबदार असतील.आम्हाला संरक्षण देऊन आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून शिक्षा करावी हीच माझी मागणी,तक्रार आणि फिर्याद आहे.
 
फिर्यादी,
वृन्दा पंढरीनाथ उन्हाळे 
तिरुपती पार्क,जी बिल्डींग,घर नं.८, सिडको-एन ४,औरंगाबाद, मोबाईल – ९६२३६९५३३९ 
 
सहफिर्यादी,
तिरुपती पार्क,जी बिल्डींग,घर नं.८, सिडको-एन ४,औरंगाबाद, मोबाईल – ९९२२६१४४४१


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

चांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये म्हणून..

हाराष्ट्रातील वयोवृध्द पत्रकारांना आम्ही पेन्शन का मागतो आहोत ? याचं कोडं ज्यांना पडलं असेल अशा शहाण्यांनी  ज्येष्ठ पत्रकार दिनू ऱणदिवे यांच्या घरी जाऊन त्यांची मुद्दाम भेट घेतली पाहिजे. दादरमधील घुमट हाऊसमध्ये गेली अनेक वर्षे ते वास्तव्य करून आहेत.आपल्या लेखणीच्या बळावर एकेकाळी महाराष्ट्र दणाणून सोडणारा, निधड्या छातीचा हा पत्रकार आज  एकाकीपणे जगतो आहे.90 वर्षाचे दिनू रणदिवे आणि 85 वर्षांच्या सविताताई  असा दोघांचा संसार दहा बाय दहाच्या दोन खोल्यात "बंदिस्त" झाला आहे.जगाशी त्यांचा फारसा संबंध येत नाही.जगालाही त्यांच्याकडं ढुंकुन बघायला सवड नाही.त्यामुळं खिडकीतून भलेही दादरमधील गर्दीचा गोंगाट ऐकायला येत असेल पण या गोंगाटाशी आता या दाम्पत्याच काही देणे घेणे उरलेले नाही .घरात पाऊल ठेवताच या दाम्पत्याच्या एकाकीपणाची जशी जाणीव होते तशीच त्यांची आर्थिक स्थितीही समजून येते.अस्ताव्यस्त पडलेल्या पुस्तकांनी  आणि वर्तमानपत्रांनी घर खचाखच भरून गेलेय .दोन पलंग आहेत पण त्यावरही पेपर पडलेलं असल्यानं बसायलाही जागा नाही अशी स्थिती.कधी काळी महाराष्टानं या पत्रकाराला डोक्यावर घेतलं असावं याचं स्मरण करून देणार्‍या काही टॉफीज दिसतात पण त्याचंही मूल्य शून्य झाल्यानं त्याही धन्या सारख्याच एकाकी आणि धुळ खात पडलेल्या आहेत.   धिम्या गतीनं फिरणारा पंखा सोडला तर आधुनिक जगाला अत्यावश्यक  झालेल्या कोणत्याही वस्तू घरात दिसत नाहीत.आदरातिथ्यात मात्र कोणतीच टंचाई नाही.दाराची कडी वाजविल्यावर स्वतः रणदिवे दारात येतात.अंगावर पांढरा सदरा,सदर्‍याची  वरची बटणं उघडी,खाली विजार.दाढी वाढलेली आणि केस विस्कटलेले.चेहर्‍यावर विषण्णतेचे भाव.ओळख नेसल्याने आम्हाला पाहून कोण आपण ? असा प्रश्‍न त्यांच्या चेहर्‍यावर स्वाभाविकपणे उमटतो. मात्र बरोबर असलेल्या अभय मोकाशींना ते ओळखतात. मग थोडे सैल होतात.चेहर्‍यावरचे भावही बदलतात.थोडं हास्य उमलतं.आम्हाला मग आपलेपणानं आत घेतात. दोन खोल्यातच रस्ता काढत आम्ही त्यांच्या मागोमाग मग आतल्या खोलीत जातो.त्यांच्या समोर तिघेही नतमस्तक होतो. (अनेकजण भाषणात टाळी  मिळविण्यासाठी म्हणत असतात, "ज्यांच्या पायाला स्पर्श करावा असे पाय आता दिसत नाहीत" .दिनू रणदिवे यांच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही).आम्ही आमची ओळख करून देतो.,सोबत नेलेला पुप्पगुच्छ त्यांना दिला.येण्याचं प्रयोजन थोडक्यात सांगितो.."मराठी पत्रकार परिषदेने आपणास जीवन गौरव पुरस्कार देण्याचं ठरविलं असून आपण तो स्वीकारावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत" असं त्यांना किऱण नाईक सांगतात.त्यावर हा तत्वनिष्ठ माणूस म्हणत होता "कश्यासाठी हे सारं करताय.?" हे बोलताना उसणेपणा नाही.मी तृप्त आहे,कोणतीही आसक्ती नाही हे त्यांना यातून सूचवायचं असतं.पुरस्कारांसाठी लॉबिंग कऱणारे कुठे आणि कश्यासाठी करताय  हे सारं? असा आपलेपणाचा प्रश्‍न विचारणारे दिनू रणदिवे कुठे.पत्रकारितेत आजही अशी माणसं आहेत हे पाहून आम्हीही धन्य झालो."आपण महाराष्ट्रासाठी जे केलंय,जे भोगलंय त्यातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळं कृपया आपण नाही म्हणू नका" अशी वारंवार विनंती केल्यानंतर ते कसे तरी तयार होतात.
त्यानंतर मस्त तासभर गप्पा रंगतात. त्यांच्या मुखातून जे अनुभव बाहेर पडत होते ती आमच्यासाठी मेजवाणीच होती.किती बोलू आणि किती नाही अशी दिनू रणदिवेंची अवस्था झाली होती.एक जाणवलं त्यांच्या वयानं नव्वदी पार केलेली असली तरी त्यांची स्मरणशक्ती मात्र साबुद आहे.बारिक सारीक तपशीलही त्यांना बरोबर आठवतात.दिनू रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात स्वतःला झोकून देत लेखणीच्या माध्यमातून मोठी जनजागृती केली होती.त्यावेळेस त्यांना अनेकदा अटक झाली,लाठ्या काठ्याही खाव्या लागल्या होत्या.तरीही अथकपणे त्याचीं लेखणी आग ओकत होती.संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेच्या माध्यमातून सरकारला सोलून काढण्याचं काम त्यांनी केलं .त्यांची रोख-ठोक भूमिका आणि महाराष्ट्राबद्दलचं निस्सीम प्रेम यामुळं संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेवर वाचकांच्या उडया पडायच्या.तेव्हा या पत्रिकेचा खप 50,000 एवढा होता.दिनू रणदिवे हाडाचे पत्रकार जसे होते तसेच ते हाडाचे कार्यकर्तेही होते."पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे" असाही त्यांचा आग्रह होता.आहे .  ती जपताना प्रसंगी पत्रकारांनी रस्त्यावर उतरायचीही तयारी ठेवली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्यांनी आयुष्यभर प्राणपणाने जपली."रस्त्यावर उतरणं पत्रकारांचं काम नाही" असं म्हणणार्‍या आजच्या कातडीबचाव पत्रकारांनी दिनू रणदिवेंचं संघर्षमय आयुष्य पाहिलं पाहिजे."टेलिफोन पत्रकारिता"ही त्यांना मान्य नव्हती.घटनास्थळावर जाऊन घटना अनुभवून त्याचं वार्ताकन करणं त्यांना आवडायचं.त्यामुळं एखादा मोर्चा असेल,एखादं आंदोलन असेल किंवा संप, उपोषण असेल तर ते घटनास्थळावर जाऊन ते कव्हर करीत.सामान्य माणूस हा रणदिवे यांच्या पत्रकारितेचा आत्मा होता.सामांन्यांची दुःख पाहून ते व्यथित होत आणि त्यांच्या लेखणीतून त्यांच्या वेदना व्यक्त होत.त्याबाबतचा  एक किस्सा त्यांनी सांगितला.तो आजच्या मंडळींना फारसा महत्वाचा वाटणार नाही पण एका बातमीचा परिणाम ( आजच्या भाषेत इफेक्ट ) काय होऊ शकतो ते माहिती करून घेण्यासाठी तो किस्सा महत्वाचा आहे.  एका रात्री ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी रणदिवे  ऑफीसमधून बाहेर पडले.  फुटपाथवर कुडकुडत पडलेले काही माणसं त्यांना दिसली..कडाक्याच्या थंडीमुळं त्यांची चाललेली तगमग त्यांनी पाहिली.त्यांच्यातला संवेदशील मनाचा पत्रकार मग जागा झाला आणि त्यांनी व्हीटी ते दादर पर्यत रात्रभर पायपीट करीत किती लोक अशा अवस्थेत रात्र काढत आहेत हे अनुभवलं.ही पायपीट चालू असताना अचानक एक कुत्रं आलं आणि त्यांनं रणदिवेंच्या पायाचा चावा घेतला.ते तसेच घरी आले,कुत्रा चावल्याचं पत्नीला कळल्यास ती काळजी करीत बसेल म्हणून त्यांना कुत्रं चावल्याचं  कळू नये म्हणून हातपाय न धुता किंवा कपडे न बदलता ते  तसेच झोपले.दुसर्‍या दिवशी त्यांच्या पत्नी शाळेत गेल्यानंतर ते डॉक्टरांकडे गेले तर जखम वाढलेली होती.त्रासही सुरू झाला होता.पण तशाही अवस्थेत रात्रीच्या अनुभवावर आधारित मोठी स्टोरी त्यानी तयार केली. ती दुसर्‍या दिवशी छापून आल्यावर  रस्त्यावर रात्र काढणार्‍यांना ब्लॅकेट देणार्‍यांची रीघ लागली. हा किस्सा  सांगतानाचा त्यांच्या चेहर्‍यावर आजही समाधान आणि आनंद जाणवत होता. दुसरा असाच किस्सा त्यांनी सांगितलां.ते म्हणाले,रात्रीच्या वेळेस प्रवास कऱणार्‍यांना पोलिस त्रास देत असत.त्याच्या तक्रारी येत पण डोळ्यांनी पहावं म्हणून मी एक रात्र  दादरच्या स्थानकावर  जागून काढली आणि डोळ्यांनी जे पाहिलं ते लोकांसमोर मांडलं.रणदिवे सांगतात,नंतर लोकांना होणारा त्रास बंद झाला.ऑन दि स्पॉट रिपोर्ट म्हणत कल्पनेच्या भरार्‍या त्यानी कधी मारल्या नाहीत.दिनू रणदिवेंची बातमी म्हणजे केवळ सत्य आणि सत्यच असायचं.त्यांच्या बातमीवर आणि कथनावर लोकांचा विश्‍वास असायचा. "रणदिवे म्हणजेच विश्‍वासार्हता " अशी तेव्हा त्यांची ख्याती होती.
आम्ही हे सारे किस्से मनलावून एकत असतानाच त्यांच्या वयोवृध्द पत्नी सविताताईंचा प्रश्‍न काय घेणार ? कॉफी,सरबत? खरं म्हणजे त्यांना कोणताही त्रास देण्याची आमची तयारीच  नव्हती.पण काही केल्या त्या ऐकनात.त्यामुळं आम्ही सरबत घेतलं.त्यानंतर बर्‍याच गप्पा झाल्या.गप्पा मारताना मनात एक प्रश्‍न सारखा घुटमळत  होता, एकाकीपणे हे दाम्पत्य जीवन कसं जगत असेल? .त्यावर रणदिवे  म्हणाले,डबा येतो.दुधही घरी येते.  पण भाजी, औषध आणायला मलाच जावं लागतं.त्यावेळचे त्यांचे चेहर्‍यावरचे भाव आमच्य ह्रदयाला विदीर्ण करून गेले.उत्पन्नाचं कोणतही साधन नसलेल्या रणदिवेंचं पैश्याचं कसं भागत असेल ? हा आणखी एक प्रश्‍न. पण तो प्रश्‍न विचारण्याचं धाडस झालं नाही.सामांन्यांसाठी आयुष्य झोकून दिलेल्या आणि आयुष्यभर निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता केलेल्या रणदिवे यांना विस्मृतीआड लोटण्याचा कृतघ्नपणा खरं तर समाजानं करायला नको होता.परंतू तेवढा वेळ आता ना समाजाकडं आहे ना सरकारकडं.त्यामुळे असे अनेक रणदिवे महाराष्ट्रात जीवन कंठीत आहेत. अर्थात केवळ समाजाला दोष देत बसण्यापेक्षा आपल्याला जे शक्य आहे ते आपण करू असा आम्ही निर्धार केला.त्यातून एक लाखाची थैली दिनू ऱणदिवे यांना अर्पण करून त्यांच्या कार्याबददल आपण कृतज्ञता व्यक्त करू असं आम्ही ठरविलं आहे. 3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीनं त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जात आहे. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा निधी त्यांना अर्पण करण्याची योजना आहे. मराठी पत्रकार परिषद 25 हजार रूपये देत आहे.नांदेडचे पत्रकार संजीव कुलकर्णी आणि प्रफुल्ल मारपकवार प्रत्येकी अकरा हजार रूपये देणार आहेत. आ.निलमताई गोर्‍हेही मदत करीत आहेत.उर्वरित रक्कम उभी करायची आहे. समाजासाठी आयुष्य झोकून देणार्‍यांना किंवा निष्ठेनं पत्रकारिता करणार्‍यांच्या मनात  हेच काय प्रामणिकपणाचं फळ असा प्रश्‍न उपस्थित होऊ नये,चांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये यासाठीच हा सारा अट्टाहास.
सरकारची पत्रकार कल्याण निधी नावाची व्यवस्था आहे.या समितीनं ज्या पत्रकारांना मदत केली त्यांची यादी आणि नावं पाहिली तर कपाळाला हात लावण्याची वेळ येईल.समितीला दिनू रणदिवे दिसणार नाहीत  कारण त्यांच्याकडं अधिस्वीकृती नाही ना. नियम सांगतो अधिस्वीकृती नसणार्‍यांंना मदत देता येत नाही.म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे अधिस्वीकृती नाही असा हा भंपक मामला आहे.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीला माझी विनंती आहे की,भंपकपणाचे नियम  बदलावेत आणि दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकारांना मदत कऱण्यासाठी पुढं यावं.असं होईल का माहित नाही पण आपण मात्र रणदिवे यांच्यासाठी काही तरी करू...त्यासाठी आपलीही मदत आम्हाला हवी आहे..प्लीज..
दिनू रणदिवे यांच्यासारख्या किमान शंभर पत्रकारांची यादी माझ्याकडे आहे.ज्यांनी आयुष्यभऱ निष्ठेने पत्रकारिता केली मात्र आज त्यांची अवस्था दननीय झाली आहे.या वयोवृध्द तपोवृध्द आणि ऋुषीतुल्य पत्रकारांसाठी पेन्शन योजना तयार करावी अशी मागणी वीस वर्षांपासून आम्ही करीत आहोत.सरकार ढिम्म आहे."सरकारकडं पेन्शन मागणं म्हणजे सरकारकडं भीक मागणं" असं काही पत्रकारांना वाटतं.ज्यांची मुलं परदेशात आहेत आणि ज्याचंं सारं भागलंय त्यांना अशी पोपटपंची करायला काहीच जात नाही.ते असं बोलतात कारण त्यांनी दिनू रणदिवे यांची भेट घेतलेली नसते.त्यांनी थोडं आपल्या विश्‍वातून बाहेर यावं म्हणजे जगाचं वास्तव त्यांना कळेल.

 एस.एम.देशमुख

फेसबुक वर शेअर करा

Facebook