> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३१ मार्च, २०१६

पुढारी औरंगाबादेत सुरू होणार

औरंगाबाद - पुढारी औरंगाबादेतून सुरू होणार,अशी हवा गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे.मात्र आता दिव्य मराठीत दि.30 मार्च रोजी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार पुढारी आता खरच औरंगाबादेतून सुरू होणार,अशी चिन्हे दिसत आहेत.
संपादकीय विभागाची मेगाीभरतीची जाहिरात 25 मार्च रोजी पुढारीमध्ये प्रकाशित झालेली आहे.आता प्रिंटीग युनिट, प्रशासन आणि इतर काही विभाग भरतीसाठी दिव्य मराठीच्या 30 मार्च रोजीच्या अंकात जाहिरात प्रकाशित झालेली आहे.
यापुर्वी दोनदा लॉंचिंग लांबल्यानंतर आता तरी पुढारी औरंगाबादेत सुरू होणार का,असा प्रश्न लोकांना पडला आहे.

बुधवार, ३० मार्च, २०१६

विठोबा सावंत आणि संदीप साखरेंना झी २४ तासमध्ये 'नो एन्ट्री' !

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख हे पुर्वी पुण्यात अधिकारी असताना,त्यांच्याविरूध्द झी २४ तासने एक खोटी न्यूज प्रसारीत केली होती,तेव्हा देशमुखांनी झी २४ तासवर दोन कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
याच देशमुखांची मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमाची चांगली बातमी झी २४ तासने काही दिवसांपुर्वी दाखवून बाईटही दाखवला,त्यामुळे संपादक असलेले डॉक्टर उदय निरगुडकर संतप्त झाले असून, न विचारता देशमुखांची चांगली बातमी का दिली म्हणून इनपूट आणि आऊटपूट हेडला कामावर न येण्याची सक्त ताकीद दिलेली आहे,इतकेच काय तर सुरक्षा रक्षकास या दोघांना आत प्रवेश देवू नये,असे फर्मान काढले आहे.
विठोबा सावंत आणि संदीप साखरे यांना हे आदेश देण्यात आलेत.ऑफीसमध्ये पुन्हा पाय ठेवू नका,असे आदेश भर न्यूजरूममध्ये देण्यात आले.इतकेच काय तर सुरक्षा रक्षकांना यांना आत सोडू नका,असे बजावण्यात आले आहे.
चांगली बातमी देवून विठोबा सावंत आणि संदीप सारखे यांनी कसलाही गुन्हा केलेला नाही,मात्र डॉक्टराच्या डोक्यात कायम दुश्मनी भरलेली असते.विठोबा सावंत आणि संदीप साखरे हे भले काही चुका करत असतील,त्याचा समाचार बेरक्याने अनेकवेळा घेतलेला आहे,मात्र या प्रकरणी आम्ही दोघांसोबत आहोत.डॉक्टरांची ही एकाधिकारशाही नव्हे का ?

मंगळवार, २९ मार्च, २०१६

"रंगीला औरंगाबादी" आणि "रंगीला मुलुंडबादी" मध्ये रंगीलापणावरून भांडण

पद्मश्री यांच्या पेपरची मुंबईत यंदा मोठी घसरण झाली. एबीसीने जाहिर केलेल्या खपाच्या आकड़यानुसार पद्मश्री यांचा पेपर थेट 6 ते 7 क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यानंतर खड़बडून जागे झालेल्या पद्मश्रीनी मुंबईत तातडीने बैठक घेवून मुंबई टीमचा आढावा घेतला. मात्र या बैठकीत पेपर कसा वाढेल यावर चर्चा होण्यापेक्षा मुंबई टीम मध्ये जास्त वरचढ़ कोण याचीच स्पर्धा जास्त दिसून आली. रंगीला औरंगाबादीच्या मानसिक विकृतीमुळे कोणीही चांगला रिपोर्टर अथवा संपादकीय कर्मचारी येथे टिकत नाही. त्यातच पद्मश्रीचे जुने "तान" मारून आणि "फाटक" लावून बसलेले शिलेदार व रंगीला औरंगाबादी यांच्यातून सध्या विस्तव देखील जात नाही. हे विस्तव का जात नाही याला कारण  देखील तसेच मजेदार आहे. आधीच औरंगाबादी याच्या 'रंगीला'पणाने बदनामीचा कळस गाठलेल्या या पेपर मध्ये सध्या नवीन 'रंगीला मुलुंडबादी"च्या एका लेडी फोटोग्राफर सोबत असलेल्या संबंधाची जोरदार चर्चा रंगत असून त्यावरूनच "औरंगाबादी" आणि "मुलुंडबादी" यांच्यात जोरदार जुम्पली आहे. या दोघांचा वाद थेट पद्मश्री यांच्यासमोरच रंगल्याने पेपर वाढवणे तर राहिले दुरच मात्र अंतर्गत कलहामुळेच पद्मश्री यांची बैठक जास्त चर्चेत राहिली. रंगीला औरंगाबादीची मानसिक विकृती आणि रंगीला मुलुंडबादी याची "तानफाटक" तानाशाही यामुळे इतर नवखे रिपोर्टर मात्र विनाकरण भरडले जात आहेत. त्यामुळे तब्बल तीन तीन वेळा जाहिराती देवून देखील कोणीही पद्मश्री यांच्या पेपर मध्ये नोकरिसाठी यायला तयार नाही. ठाण्यात तर या पेपरची स्थिती अजुन बिकट असून गेल्या वर्षभरापासून एक दोनच माणसे काम करीत आहेत. तर येथे लोकल पेपरचे आणि नवखे रिपोर्टर देखील जॉबसाठी यायला तयार नाहीत. मुंबई आणि ठाण्यासाठी जम्बो भर्तीची जाहिरात देवून देखील शून्य प्रतिसाद असल्याने करावे तरी काय असा पेच पद्मश्री समोर निर्माण झाला आहे. पद्मश्रीच्या पेपर मधील विकृत लोकांची मक्तेदारीचे किस्से सर्वत्र प्रसिद्ध असल्याने 'जॉब नसेल तर चालेल पण येथे काम नको' अशी लोकांमध्ये प्रतिक्रया आहे.

शनिवार, २६ मार्च, २०१६

'पुढारी'मध्ये मेगाभरती !


वृत्तसंपादकापासून वार्ताहरापर्यंत 88 जागा

पद्मश्रीच्या 'पुढारी'मध्ये 'मेगाभरती' निघाली असून,मुंबई,पुणे,कोल्हापूरसह सर्व आवृत्त्यामध्ये काल दि.25 मार्च रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली आहे.ही जाहिरात पाहिल्यानंतर पुढारीमधील पुर्वीचे कर्मचारी दुसरीकडे निघून गेले की,अशी शंका येवू लागली आहे.
आधीच अनेक दैनिकांत गुणवंत कर्मचार्‍यांची मारामार असताना पुढारीने त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. सैन्यात जशी मेगा भरती होते, तशीच मेगा भरती पुढारी करणार असून, त्यासाठी 25 मार्चच्या अंकात जाहिरात दिली आहे. राज्यभरातील विविध कार्यालयांत वृत्तसंपादकापासून वार्ताहरापर्यंत तब्बल 88 जागा भरण्यात येणार आहेत. पद्मश्रींच्या या दणक्याने सर्वच वृत्तपत्रांच्या संपादक, मालकांची भंबेरी उडून गेली नसेल तर नवल!
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, पणजी, बेळगाव, रत्नागिरी, कणकवली (सिंधुदुर्ग), सोलापूर या कार्यालयांत ही भरती होणार आहे. त्यात वृत्तसंपादक 10, मुख्य उपसंपादक 15, वरिष्ठ उपसंपादक 15, उपसंपादक 20, मुख्य वार्ताहर 8, वार्ताहर 20 या जागा भरण्यात येणार आहेत.
ज्यांना भरतीत सामील व्हायचे आहे, त्यांनी मॅनेजर, एचआर अँड अ‍ॅडमिन, पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि. 2318, सी वॉर्ड, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर या पत्त्यावर अर्ज करावेत. ई-मेलने अर्ज करताना jobs.hr@pudhari.co.in वर करावेत.

गुरुवार, २४ मार्च, २०१६

भाऊनीही काढले 'मी' म्हणणा-या संपादकांचे वाभाडे

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनीही,बंद पडलेल्या मी मराठी चॅनलच्या आणि सतत मी - मी म्हणणा-या संपादकांचे चांगेलच वाभाडे काढले आहेत.लंडनमधील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली इमारत खरेदी करायला निघालेल्या मालकांकडे इतका पैसा कुठून आला,हे विचारणा करण्याऐवजी त्यांची स्तुती करण्यात हे महाशय गर्क झाले होते,आता मालक जेलमध्ये गेल्यावर अवघ्या तीन महिन्यांत हे चॅनल बंद पडले,मग इतका पैसा कुठे गेला,याचे उत्तर हे महाशय मालकांना विचारतील का ?
खरचं हा मालक ती इमारत विकत घेणार होता की संपादकांनी सोडलेली पुडी होती ? उत्तर उपेक्षित !

भाऊच्या ब्लॉगमधील अंशत: भाग - 

अनेकांना काहीही लिहीता येत नाही किंवा व्यासंगही नसतो. जाहिरातीच्या वा अन्य मार्गाने भांडवली कारभार भरभराटीला आणण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जातो. किंबहूना त्यासाठीच अन्य व्यवसायातील पैसा माध्यमात गुंतवला जातो. एका मराठी वर्तमानपत्र व वाहिनीचा मालक सध्या अफ़रातफ़रीच्या आरोपाखाली तुरूंगात जाऊन पडला आहे. त्यामुळे चार महिने तिथल्या पत्रकार संपादकांना पगारही मिळू शकलेला नाही. छापायचे काय आणि प्रक्षेपित काय करायचे, याची भ्रांत आहे. परंतु त्याच वाहिनीच्या संपादकांच्या काही महिन्यापुर्वीच्या गमजा कोणी आठवून बघाव्यात. लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वा़स्तव्य झालेली इमारत राज्य सरकारने विकत घेतली नाही तर ह्या वाहिनीच्या मालकाने विकत घेण्याची घोषणा केली होती. त्याचा गौरव करण्यात त्याचे संपादक गर्क होते. तेव्हा त्यांना आपल्या मालकाकडे इतका पैसा कुठून आला, असा साधा प्रश्न पडला नाही. आताही मालक गजाआड जाऊन पडला आहे, त्याविषयी अवाक्षर हे संपादक बोलणार नाहीत. ही आजकालच्या संपादक पत्रकारांची लायकी झाली आहे. पैशाला पासरी पत्रकार व संपादक विकत मिळतात. आपापल्या स्वातंत्र्याची द्रौपदी वस्त्रहरणाला सादर करण्यासाठी रांग लावून अनेक बुद्धीमान संपादक पत्रकार ताटकळत उभे आहेत. पुरेसे दु:शासन दुर्योधन पैसा ओतून बाजारात येत नाहीत, याचे अनेकांना दु:ख आहे. कारण आता वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे ही समाज प्रबोधनाचे साधन राहिलेल्या नाहीत. आपापले अजेंडे घेऊन लोकांच्या गळी मारणारी यंत्रणा म्हणून माध्यमे वापरली जातात. त्यासाठीचा येणारा अवाढव्य खर्च जो भागवणार, त्याचाच अखेरचा शब्द असेल ना? 

काय म्हणतात भाऊ ते त्यांच्या ब्लॉगवर वाचा....

मंगळवार, २२ मार्च, २०१६

मंगेशाने सुत्रे घेतली,आता चौकशीचे भुंगे सुरू

लातूर - पुरोगामी विचारसरणीच्या दैनिकातून पांडू हवालदारची हकालपट्टी झाल्यानंतर याच दैनिकातून पुढारीमध्ये दोनदा फेरी मारणा-या मंगेशाची तिस-यांदा नियुक्ती करण्यात आली असून,या मंगेशाने आपल्या पदाची सुत्रे शनिवारी घेतली आहेत.आता हा मंगेशा शनी होवून एका-एकाच्या मागे लागणार असल्यामुळे पांडू हवालदारच्या पंटरनी धास्ती घेवून अंथरून धरले आहे.
१९९१ मध्ये साहेबांनी पुरोगामी विचारसरणीच्या दैनिकांची मुहूर्तमेढ रोवली.तुकाराम कोकजे,गुरूनाथ नाईक,मधुकर भावे,राजा माने आणि शेवटी -शेवटी शरद कारखानीस या नामांकित पत्रकारांनी संपादकपद भूषवलेल्या या दैनिकाच्या संपादकपदी पांडू हवालदारची नियुक्ती झाली आणि या दैनिकाची रयाच गेली.या बहाद्दराने कधी बातमी नीट लिहिली नाही तर अग्रलेख कसा लिहिणार ? सर्व अग्रलेख जोशी आणि गवळीच लिहित होते.नाव मात्र पांडु हवालदारचे.संपादक होताच पांडू हवालदारचा इतका रूबाब आणि मग्रुरी वाढली की,साहेबांची गाडी ऑफीसला आली की, गाडीचे डोअर उघडायला शिपाई,बॅग उचलायला शिपाई, कॅबिनच्या बाहेर शिपाई थांबलाच पाहिजे,नंतर गाडीत बॅग ठेवायला शिपाई,जिमहून येईपर्यत बॅग धरायला शिपाई,इतकी पिळवणूक सुरू होती.शिपायाने एक मिनीटात पाणी नाही आणले की शिव्या,गाडी जवळ आल्यानंतर शिपाई नाही आला शिव्या,अशी मग्रुरी सुरू होती.डीटीपी ऑपरेटर महिलांचाही छळ या पांडू हवालदाराने मांडला होता.पांडू हवालदारची हकालपट्टी होताच आणि त्याची बातमी बेरक्यावर येताच पंटर सोडून सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पांडू हवालदारची ऑफीसने गाडी काढली असून,ही गाडी आता नव्या संपादकांना देण्यात आली आहे.पांडू हवालदार आता नविन गाडी घेण्याची शक्यता आहे.परंतु आता रूबाब मात्र पहिल्यासारखा राहणार नाही.गाडीच्या खालून कुत्रे चालते,कुत्र्याला वाटते आपणच गाडी चालवतो,तसे या पांडू हवालदारचे झाले होते.आता मुळ अवकातीवर हा पांडू हवालदार आला आहे.या दैनिकात काही जण संस्थानिक झाले आहेत.जेव्हा जॉईन झाले तेव्हा भाड्याच्या घरात होते,आता यांच्याकडे गाड्या,बंगले,प्लॉटिंग,शेती आली.या संस्थानिकाच्या मागे आता ससेमिरा लागलेला आहे.
असो,मंगेशाने तिस-यांदा सूत्रे हाती घेताना,छोट्या देशमुखांना काही अटी सांगितल्या होत्या.त्या अटी मान्य झाल्या असून,चौकशीचे भुंगे येत्या काही दिवसांत सुरू होणार आहेत.त्यामुळे पांडू हवालदाराच्या पंटरमध्ये खळबळ उडाली आहे.

सोमवार, २१ मार्च, २०१६

मी मराठीच्या पतनाला रविंद्र आंबेकरच जबाबदार

जून २०१३ मध्ये फक्त अर्धा तास बुलेटीन चालवणाऱ्या मी मराठी वृत्तवाहिनीत आंबेकरांची एका राजकीय पुढाऱ्याच्या वशिल्याने कशीबशी वर्णी लागली. जय महाराष्ट्र मधून बेरोजगार झाल्यानंतर आंबेकरांसाठी हा मोठा आधार होता,त्यानंतर महेश मोतेवारानी मी मराठी चॅनल २४ तास करण्याचा निर्णय घेतला पण आंबेकरांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसल्याने त्यांनी सुरुवातीला कुमार केतकर आणि नंतर भारतकुमार राऊत यांना चॅनलमध्ये सामावून घेतले. त्यानंतर निखिल वागळे बेरोजगार झाल्यानंतर आंबेकरानीच या वरिष्टांना आवर घालण्यासाठी वागळेची मी मराठीत सोय लावली. आता वागळे केतकर यांचा ३६ चा आकडा सर्वश्रुत आहे.त्यानंतर आंबेकरांनी कसेबसे मी मराठीत पाय रोवले आणि मग मालकाची काही खासगीतील कामे करून त्यांचा कसाबसा विश्वास संपादन केला.
हा झाला मी मराठीचा उत्कर्ष काळ, ज्याचं क्रेडीट आंबेकर घेतात, मग उतरत्या काळात सर्वसामान्य पत्रकारांची झालेली ससेहोलपट, तीन - तीन महिने लांबलेले पगार, ऑफिस मधून मशिनरी उचलणे, चॅनलचा दर्जा खालावणे आणि सरते शेवटी चॅनल बंद पडणे याच क्रेडीट आंबेकर यांना कसे काय बरे टाळता येईल. संपादकाचे काम हे काही फक्त मालकाकडून पैसा घेणे आणि चॅनल चालवणे हे तर नक्कीच नसते. तर ते चॅनल आर्थिक दृष्ट्या पायावर उभ करणे हे असते. ज्यात आंबेकर पूर्णपणे अपयशी ठरलेत. परिणामी अनेक पत्रकारांच्या नशिबी ससेहोलपट आली.
यामागचं उकल अशी… 
सर्वच चॅनलवर डॉक्टरांचा विविध आजारावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम चालतो,हा कार्यक्रम एक तर पेड असतो किंवा सरळसोट त्याची जाहिरात घेतली जाते, मी मराठीत मात्र मयांक भागवत याने घेतलेल्या मुलाखती अगदी फुकट होत्या. इथपर्यंत ठीक पण एखादा प्रथितयश डॉक्टर जाहिरात देऊन जर मुलाखत द्यायला तयार असेल तर सरळ सरळ त्याची मुलाखत नाकारली जात होती, याचा अर्थ व्हाईट मनी नको होता, असा घ्यायचा का ?
सर्व tv चॅनलवर रिलीज झालेल्या अथवा रिलीज होणाऱ्या चित्रपटांची शो चालतात, ज्या शोला सुद्धा चित्रपट निर्माते लाखो रुपये देत असतात. ज्याचं स्वरूप जाहिरात असच असत, पण मी मराठीत मात्र कित्येक दिवस हे पैसे सरळ मार्गाने स्वीकारलेच जात नव्हते. अगदी शेवटी याची चर्चा झाल्यानंतर मात्र हे पैसे स्वीकारले जाऊ लागले. मग तोपर्यंतच्या पैश्यांचा हिशोब काय ?
आता मशिनरी आणि कॅमेरे रेंटवर घेण्याच्या प्रकारातले गौडबंगाल …
मुळात या मशिनरी आणि कॅमेरे ज्या दरात भाड्याने घेतले होते. त्याच दराने फक्त त्या वस्तूंची instolment भरली असती तर कदाचित मी मराठीने त्या सगळ्या वस्तू किमान चार -चार वेळा तरी विकत घेतल्या असत्या. पण कमिशन सिस्टीमने मी मराठीचा आज बळी घेतला.
याच आंबेकारांनी मी मराठीचे महेश मोतेवार लंडनमधले बाबासाहेबांचे स्मारक विकत घेणार आहेत अशी पुडी सोडली होती,
स्मारक विकत घ्यायला निघणारे आज पगारासाठी इतके बेहाल होतील असे वाटले नव्हते.
आंबेकरानी जर मी मराठी चॅनल इमाने इतबारे चालवले असते तर आज ही वेळ आली नसती. आंबेकरांनी लाखो रुपये कमावले आहेत पण बिचाऱ्या कर्मचार्याचे काय ? याची आंबेकर यांना कधी काळजी वाटली आहे का ?

कुबेरांचे अज्ञान हेच माफीनाम्याचे कारण...

असंतांचे संत हा अग्रलेख लिहून नंतर दुस-या दिवशी कुबेरांनी माफीनामा मागितला असला तरी,त्यांचे भक्तगण कुबेरांचे समर्थन करताना कुबेर किती हुशार,बुध्दीवादी,अभ्यासू आहेत,याचा डांगोरा पिटत आहेत.व्यवस्थापकांनी त्यांच्यावर दबाब आणला,त्यामुळे कुबेरांना माघार घ्यावी लागली असा जावाई शोधही लावला आहे.मात्र कुबेरांचे अज्ञात या अग्रलेखात उघडे पडल्यानेच त्यांनी माफीनामा मागितला आहे.
दि.१७ मार्च रोजी कुबेरांनी लोकसत्तामध्ये असंतांचे संत हा ज्येष्ठ समाजसेविका मदर तेरेसा यांच्यावर जो अग्रलेख लिहिला आहे,तो अपु-या माहितीवर आधारीत आहे.या अग्रलेखानंतर वाचकांनी त्यांना अनेक पत्रे पाठवली,त्यापैकी चार पत्रे दि.१८ मार्च रोजी लोकसत्तामध्येच अग्रलेखाच्या पानावर लोकमानस सदरात प्रकाशित करण्यात आलेली आहेत.त्या चार वाचकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे कुबेरांकडे नव्हती.जेम्स लेन या हरामखोरांने जसे विकृत लिखाण केले आहे,तसेच मदर तेरेसा यांच्यावर काही जणांनी विकृत लिखाण केले आहे,ते वाचून कुबेरांनी आपले दिवे पाजळले आहेत.एक दिवस लोकसत्ताच्या एसी ऑफीसच्या बाहेर पडून कुष्ठरोग्याची सेवा करून दाखवा मग समजेल काय असते समाजसेवा असे थेट आव्हान देणारे पत्रही लोकसत्तेकडे आले.त्याची उत्तरे कुबेराकडे नव्हती.
या अग्रलेखात कुबेरांचे अज्ञान बाहेर पडलेले आहे.त्यांची बौध्दीक दिवाळखोरी त्यातून निघालेली आहे.म्हणूनच त्यांनी अग्रलेखच मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.तरीपण त्यांचे भक्तगण कुबेरांचे गोडवे गात कुबेरांची री ओढत आहेत.त्यांचे भक्तगण जाणीवपुर्वक चर्चा घडवून कुबेरांना मोठे करण्याचे आणि त्यांना समर्थन देण्याचे काम करत आहेत.विशेषत: त्यात काही  विशिष्ठ जातीचे लोक आघाडीवर आहेत.
शरद पवार यांच्यावर टीका झाली की जातीयवाद होत नाही,रामदास आठवलेवर टीका झाली तर जातीयवाद होत नाही.छगन भुजबळावर टीका झाली तरी जातीयवाद होत नाही मात्र बाबासाहेब पुरंदरेवर टीका झाली की जातीयवाद होतो.मीडीयात विशिष्ठ लोकांची मक्तेदारी झाली असून,ही न दिसणारी जातकुळी बहुजणांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.आता कुबेरांंचे अज्ञात बाहेर पडले असताना,त्यांना सपोर्ट करत आहे,यापेक्षा आश्चर्य दुसरे नाही.
ज्यांनी कुबेराची बाजू घेतली आहेत,त्यांच्यासाठी आम्ही लोकसत्तामधील चार पत्रांची लिंक देत आहोत.त्या प्रश्नाची उत्तरे कुबेराकडे नव्हती.तुमच्याकडे असतील तर नक्की द्या मग कळेल कुबेर शहाणे की आपण शहाणे...
कुबेराच्या अग्रलेखाकडे त्यांच्या भक्तगणाचे लक्ष गेले परंतु लोकमानसमध्ये प्रकाशित झालेल्या चार पत्राकडे कोणाचे लक्ष गेले नाही,हे त्यांच्या भक्तगणांचे अज्ञातच म्हणावे लागेल.

- एक सजग वाचक

रविवार, २० मार्च, २०१६

'बेरक्या' ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण

'बेरक्या' ब्लॉग सुरु होवून बघता - बघता पाच वर्ष पूर्ण झाली, सहाव्या वर्षात पदार्पण करताना आम्हाला आनंद तर होत आहेच पण  मराठी मीडियात एक नवीन प्रयोग करुन तो यशस्वी करुन दाखवला याचा सार्थ अभिमान वाटत आहे.
21 मार्च 2011 रोजी 'बेरक्या'ची सहज निर्मिती केली,पत्रकारांच्या बातम्या देणारा पत्रकार म्हणून बेरक्या उदयाला आला. बेरक्या हे नाव सुरुवातीस लोकांना पचनी पड़त नव्हते, बेरक्या म्हणजे काय ? असे लोकांना वाटत होते, परंतु नंतर बेरक्याचे काम लोकांना हळू हळू माहीत झाले,
'बेरक्या' ब्लॉगने गेल्या पाच वर्षात 15 लाख पेक्षा अधिक हिट्सचा टप्पा गाठलेला आहे, महाराष्ट्र, देश आणि विदेशातील मराठी वाचक बेरक्या वाचत असतात,महाराष्ट्रातील तमाम पत्रकार, पत्रकारिता शिकत असलेले विद्यार्थी, वृत्तपत्रात काम करणारे सर्व कर्मचारी, शासकीय अधिकारी - कर्मचारी,पोलीस इतकेच काय तर राजकीय पुढारी, मंत्री आणि आम जनता बेरक्या वाचत असतात,
मराठी मीडियात नेमके काय घडत आहे, नवीन काय येत आहे, याची माहिती बेरक्याच्या माध्यमातून कळते, त्यामुळे बेरक्या मराठी मीडियाचा पी.टी.आय. तसेच गॅझेट झाला आहे, बेरक्यावर प्रकाशित झालेली बातमी 100 टक्के सत्य असते, हा विश्वास पत्रकारामध्ये निर्माण झालेला आहे.
'बेरक्या' कोणाचा मित्र किंवा शत्रू  नाही,जे घडते आहे , जे घडत आहे किंवा घडणार आहे, तेच  बेरक्या देतो,'बेरक्या' गेल्या पाच वर्षात कोणापुढे झुकलेला नाही किंवा झुकणार नाही,कोणतेही बातमी दबली नाही किंवा दबली जाणार नाही, जे असेल ते सड़ेतोड़ मांडणे हे आमचे काम आहे,
आम्ही चांगल्या पत्रकाराच्या पाठीमागे आजपर्यन्त खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत,आणि यपुढेही राहू, मात्र वाईट आणि पत्रकारितेला काळीमा फासणाऱ्याच्या विरुद्ध नेहमी आहोत आणि राहूत, त्यांची अजिबात गय केली जाणार नाही.गेल्या पाच वर्षात अनेक अडचणी येवून देखील बेरक्या सुरु राहिला, तो बंद पाडण्याचा खटाटोप अनेकांनी केला, परंतु आम्ही पुरुन उरलो आहोत.
बेरक्या असाच अखंड सुरु राहणार आहे.मग त्यासाठी कोणतेही किंमत मोजावी लागली तरी ती द्यायला आम्ही तयार आहोत.
पत्रकारांच्या कल्याणासाठी बेरक्या आहे, त्यांच्या कल्याणासाठी जेलमध्ये जावे लागले तरी त्याची पर्वा नाही. आमचा वकील आणि सातबारा तयार आहे. आणि आमच्या पाठीमागे असंख्य पत्रकार खंबीरपणे उभे आहेत.
असो,
आपले प्रेम, स्नेह आणि सहकार्य असेच कायम राहो, ही सदिच्छा !
आपला,
बेरक्या उर्फ नारद

शनिवार, १९ मार्च, २०१६

निवेदन देणा-या अंबोजोगाईच्या पत्रकारांना सहआरोपी करा

अंबाजोगाई शहरात ब्लॅकमेल करणारी पत्रकारांची एक टोळी आहे.या टोळीतील म्होरके काल बीडच्या एस.पी. साहेबांना भेटायला गेले होते.त्यांनी एस.पी.साहेबांना एक निवेदन देवून हेड कॉन्स्टेबल संतोष चाटे आत्महत्त्या प्रकरणात पुण्यनगरीच्या अ.र.पटेल आणि विवेक सिंधुच्या अभिजीत जगतापचा काही संबंध नाही,असे निवेदन देवून त्यांच्यावर गुन्हे नोंदवू नये,असे त्यात म्हटले आहे.
आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून आता यांना सहआरोपी करायला हवे.कारण हेड कॉन्स्टेबल संतोष चाटे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये पुण्यनगरी आणि विवेक सिंधुच्या पत्रकारांनी खोट्या बातम्या दिल्या म्हणून आपण आत्महत्त्या करत आहोत,असे स्पष्ट लिहिले आहे.सुसाईड नोटमध्ये सरळ सरळ  नावे लिहिले असताना, आरोपींना साथ देण्याचा आणि त्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न कायदेशीर गुन्हा होवू शकतो.
संतोष चाटे यांनी अत्यंत तरूण वयात आत्महत्त्या केलेली आहे.कारण स्पष्ट आहे.संतोष चाटे हा या पत्रकारांना आपला भाऊ वाटत नाही मात्र पत्रकारितेत दलाली करणारे,ब्लॅकमेल करणारे अ.र.पटेल आणि अभिजीत जगताप यांना भाऊ वाटले.हरामखोरांनो स्वत:ला थोडे लाजा.जनाची नाही तर मनाची लाज बाळगा.
एक तरूण पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी,त्यांचा लहान मुलगा आणि त्यांच्या परिवाराचे आसू या हरामखोरांना दिसले नाहीत,परंतु ब्लॅकमेल करणारा पत्रकार अ.र.पटेल आणि अभिजीत जगताप जेलमध्ये जाणार ही यांना काळजी वाटत आहे. चोराला, चोरांनी दिलेली ही साथ आहे.
एस.पी.साहेंबाना आमची विनंती आहे,अंबाजोगाईच्या ब्लॅकमेल पत्रकारांच्या दबावाला बळी पडू नका.गुन्ह्यात सहभागी असलेल्या पटेल आणि जगतापला ताबडतोब बेड्या ठोका आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून निवेदन देणा-या पत्रकारांना सहआरोपी करा.
अंबोजोगाईमध्ये दलाल आणि ब्लॅकमेल करणा-या पत्रकारांची टोळी निर्माण झाली आहे,ती उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आता पोलीस आणि जनतेची आहे.म्हातारी मेल्याचं दु:ख नाही,काळ सोकावतोय.

असहिष्णुता दबाव गटाची, गळचेपी माध्यम स्वातंत्र्याची !

“करेज ऑफ जर्नालिझम” असे घोषवाक्य मिरविणाऱ्या दि इंडियन एक्सप्रेस वृत्त समुहाच्या लोकसत्ता या मराठी वृत्तपत्रात गुरुवार दि. १७ मार्च २०१६ रोजी “असंताचे संत” हे संपादकीय प्रसिद्ध झाले आहे. या संपादकीयात मदर तेरेसा यांना चमत्कारामुळे मिळणाऱ्या घटनेवर टिका केली आहे. यासाठी काही पुस्तकांचा संदर्भ दिला आहे. मात्र, शुक्रवार दि. १८ मार्च २०१६ रोजी दै. लोकसत्ताच्या संपादकांनी पहिल्या पानावर वरच्या भागात ठळक अक्षरात ( Bold Type ) क्षमस्व अशी चौकट प्रसिद्ध केली आहे. त्यात संपादकांनी आपल्या दि.१७ च्या संपादकीयाने भावना दुखावल्याबद्दल मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हेतर, सदर संपादकीय मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. दै. लोकसत्ताच्या वेबसाईट वरून सदर संपादकीय काढून टाकण्यात आले आहे.
शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियासह सर्वत्र या “संपादकीय मागे घेण्याची” चर्चा सुरु होती. ती अद्याप संपलेली नाही. दि. १८ रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. तरीही, मंत्रालय-विधिमंडळ परिसरात या ऐतिहासिक घटनेविषयी बोलणे सुरु होते. वृत्तपत्र सृष्टीच्या इतिहासात संपादकीय मागे घेणे हे पहिल्यांदाच घडले आहे. परकीय ब्रिटीश राजवटीत संपादकांनी ब्रिटीश विरोधात केलेल्या लिखाणासाठी शिक्षा भोगली आहे. पण, संपादकीय मागे घेण्याचा दबाव झुगारला होता. आणीबाणीच्या काळात कॉंग्रेसच्या जुलमी राजवटीचा निषेध म्हणून अग्रलेखाची जागा काही वर्तमानपत्रानी रिकामी ठेवून निषेध केला होता. इंडियन एक्सप्रेस ग्रुपने त्यावेळी सर्व दबाव नाकारून आणीबाणी विरोधात लढा दिला होता. त्याच ग्रुपच्या मराठी दैनिकाने अग्रलेख मागे घेऊन आपल्याच निर्भीड परंपरेला हरताळ फासला आहे, हे निश्चित.
याप्रकारामुळे समाजमानस अस्वस्थ झाले आहे. लोकसत्ताच्या वाचकांच्या मनात एकाचवेळी संताप आणि भय अश्या संमिश्र भावना उमटल्या आहेत. संपादकीय मागे घेणे हे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. सुधारकांचा महाराष्ट्र लोकसत्ताच्या या निर्णयामुळे मागे गेला आहे. केवळ लोकसत्ता नव्हेतर संपूर्ण वृत्तपत्र सृष्टीसमोर एक भयंकर आव्हान उभे ठाकले आहे. वृतपत्र स्वातंत्र्याचा संकोच सुरु होण्याची शक्यता या घटनेत आहे. अभिव्यक्तिचे प्रकटीकरण धोक्यात आले आहे. एक भयानक असहिष्णुता आ-वासून उभी राहिली आहे.
लोकसत्ताचे संपादकीय मदर टेरेसा यांच्यावर टिका करणारे असल्याने स्वाभाविकच त्यांचा समर्थक समूह जो ख्रिश्चन आहे त्याच्या भावना दुखावल्या असणार. त्यामुळे तो संतप्त झाला असणार. एका माहितीनुसार दि. १७ रोजी ख्रिश्चनबहुल वसई-विरार परिसरात त्यादिवशी लोकसत्ता विरोधी मेसेज सोशल मीडियात फिरत होते. दबावाची कृती जाणून घेण्यासाठी काही ठिपके समजून घेण्याची गरज आहे. हे ठिपके जोडले की एक आकृतिबंध तयार होतो. त्यातून दबावाचे “सेक्युलर” नाट्य उघड होत जाते. ख्रिस्ती समूह हा “अल्पसंख्य” असलातरी त्याची पहुच खूप मोठी असल्याचे या घटनेतून सिध्द होते. चर्च-मिशनरीच्या शक्तीचा यातून अंदाज येऊ शकतो. चर्च-मिशनरी स्वयंसेवी संस्थांमार्फत ( NGO’s) कश्या प्रकारे दबाव टाकू शकतात हे यातून लक्षात येते. भांडवली वृत्तपत्राला कोण वित्त पूरवठा करते याचा अंदाज येऊ शकतो. पांढऱ्याशुभ्र पोशाखाच्या आतील मन किती धोरणी असते याचा वेध घेता येतो. या सगळ्याला डावे, समाजवादी आणि हिंदू असण्याची ज्यांना लाज वाटते, भय वाटते अश्या समूहांनी जोड दिली असणार. अन्यथा, अवघ्या चोवीस तासात माफी नाट्य आणि संपादकीय वापसी होणे शक्य नव्हते. अत्यंत संघटितपणे, सूत्रबद्ध रीतीने दबाव उत्पन्न केला असणार यात शंका नाही. हा सगळा प्रकार एका थरकाप उडविणाऱ्या अदृश्य सामर्थ्याचा प्रत्यय देणारा आहे. संपादकीय मागे घेण्याचे कारण देता न येणे हे भयावह आहे.
माध्यमजगतात एका धोकदायक वळणावर आपण उभे आहोत. लोकशाहीची चाड आणि माध्यम स्वातंत्र्याचा आदर बाळगणाऱ्यांनी वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे. समस्त वाचक वर्गाने आपल्या हक्कांसाठी जागरूक झाले पाहिजे. लोकसत्ताचे नियमित ग्राहक या नात्याने आपल्यावर झालेल्या अन्याया विरूद्ध लढा दिला पाहिजे. संपादकीय मागे का घेतले? हे जाणून घेणे वाचकांचा मुलभूत अधिकार आहे. दबावाला बळी पडलेले व्यवस्थापन वाचकांचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. यासाठी वाचकांनी संघटित होणे गरजेचे आहे. या घटनेतून व्यवस्थापनाचा संपादकीय विभागावर असलेला वरचष्मा उघड झाला आहे. मोठ्या वृत्तपत्रात हे अनेकदा घडले आहे.
भविष्यात अश्या झुंडशाहीमुळे किंवा उन्मादी वृत्ती मुळे अथवा आक्रमक अल्पसंख्याक गटांमुळे संपादकीय मागे घेण्याची वेळ येऊ शकते. हे टाळायचे असले तर बहुसंख्य वाचकांनी लोकसत्ताला जाब विचारला पाहिजे. हा जाब माध्यमांच्या हिताचा असेल. आज लोकसत्ता जात्यात आहे आणि बाकीचे सुपात आहेत. संपादकीयातून नैतिकतेचे डोस पाजणे, उपदेशाचे वाण वाटत फिरणे आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की शेपूट घालणे हे माध्यम सृष्टीला शोभणारे नाही. हा कलंक पुसण्यासाठी वाचकांनी या दबाव गटा विरोधात आणि त्याच्या पुढे झुकणाऱ्या लोकसत्ता विरोधात विधायक बंड पुकारणे योग्य ठरले. हे करण्यात वाचक कमी पडले तर पुन्हा महाराष्ट्र अंधारयुगात जाईल. ज्या निष्पक्ष पत्रकारांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपली लेखणी खर्ची घातली त्यांचा होणारा अपमान स्वस्थ बसून बघणे हे “भाबडया” वाचकांच्या पुढिल पिढीसाठी घातक ठरेल.
यासाठी जो पर्यंत दै. लोकसत्ता संपादकीय मागे घेण्याचे खरे कारण आणि दबावगटाचे नाव जाहीर करत नाही तो पर्यंत माध्यमहितैषी ठोस कृती करावी लागेल. व्यावसायिकला फायदा-तोटा कळतो. खपाचे आकडे घसरले की, जाहिरातीवर परिणाम होतो. जाहिरातीचा परिणाम नफ्यावर परिणाम करतो. आणि व्यवसाय नुकसानीत जातो. असे नुकसान कुणालाच परवडत नाही. किंबहुना, नुकसान नको म्हणूनच तडजोडीचा संपादकीय मागे घेण्याचा मार्ग निवडला गेला असणार हे लक्षात घेतले पाहिजे.
एका सजग वाचक मंचाने केवळ लोकसत्ता नव्हेतर, संपूर्ण माध्यम जगताचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून किमान एक दिवस ठरवून सामुहिकपणे लोकसत्ता-इंडियन एक्सप्रेस नाकारण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाची चर्चा जोरात होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यात सरकारने हस्तक्षेप करून दबावाचे नेमके कारण शोधावे आणि राज्य भयमुक्त करावे असे आवाहन करणार असल्याचे समजते.
या प्रकरणात समजा संपादकांनी दिलगिरी व्यक्त केली नसती, संपादकीय मागे घेतले नसते तर, “तो” दबाव गट हिंसक झाला असता का ? त्याने लोकसत्ताच्या कार्यालयावर हल्ला केला असता का ? संपादकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता का ? आणि हे होऊ नये म्हणून दिलगिरी “विथ” संपादकीय मागे असे काही डील झाले असावे का ? अशी शंका घेण्याइतकी जागा आहे.
काही महिन्यापूर्वी लोकमत या दैनिकाने असेच एका पंथांध जमवाकडून फटके खाल्ले होते. त्या दैनिकानेही गुपचूप माफी मागून प्रकरण मिटवले होते. तीच भीती लोकसत्ताला वाटली असेल का ? याठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे सदर दोन्ही गट “अल्पसंख्याक” म्हणून ओळखले जातात.
हे प्रकरण जेवढे दिसते त्यापेक्षा अधिक गंभीर आहे. आणि त्याचे द्योतक म्हणजे एरवी वाहिन्यांवर चर्चा घडविणारे, स्तंभ लिहिणारे, अग्रलेख खरडणारे, धर्मनिरपेक्षता-मानवीहक्क याची पोपटपंची करणारे मुग गिळून गप्प आहेत. हीच त्या दहशतीची ताकत आहे.
यापार्श्वभूमीवर भारतीय अशी ओळख असणाऱ्या प्रत्येकाने यातून बोध घेतला पाहिजे. आपली मूळ सोडून वहावत जाऊन आपण समाज म्हणून एक संकट ओढवून घेत आहोत. आत्मभान सोडून अराजकाला निमंत्रण देत आहोत. ढोंगी पुरोगामी-सेक्युलरपण फँशन म्हणून स्वीकारण्याच्या मोहात उद्याचे आपले स्वातंत्र्य दबावगटांकडे गहाण टाकत आहोत. हिंदुनी आपल्या बेसावधपणाची किंमत यापूर्वी मोजली आहेच. परकीय आक्रमण म्हणूनच झाले. आणि त्यानंतर फसव्या आधुनिकतेला कवेत घेताना मानसिक गुलामगिरीशी मैत्री केली आहे. लोकसत्ताची दिलगिरी आणि संपादकीय मागे घेणे ही एक हिंदू समाजाला स्वतःला सावरण्याची संधी मिळाली आहे. आपला कडेलोट थांबवायचा असेलतर कृतीची जोड हवी. अन्यथा...माफीनामा आणि अग्रलेख परत घेण्याची सवय लावून घ्यावी लागेल.
- मकरंद मुळे ©
( पत्रकार, सामजिक-राजकीय विश्लेषक, माध्यम सल्लागार)

ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर यांना अरविंद आत्माराम वैद्य पुरस्कार

औरंगाबाद - लातूर येथील स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर यांना अरविंद आत्माराम वैद्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. एकवीस हजार रुपये रोख, मानपत्र आणि शालश्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अरविंद आत्माराम वैद्य यांचा 29 मार्च हा स्मृतीदिन आहे. दरवर्षी 29 मार्च रोजीच या पुरस्कार वितरण समारंभ होतो. यावर्षी पहिल्यांदाचा 27 मार्चला लातूर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार वि.वि. करमरकर, निळू दामले, शांताराम बापू जोशी आणि विद्याभाऊ सदावर्ते यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री. शहरकर (वय 87) यांचा जन्म शिरूर अनंतपाळ येथे झाला. त्यांनी बी.ए, आणि एसटीसीचे शिक्षण हैदराबाद, अमरावती आणि लातूर येथे केले. त्यांचे हैदराबाद मुक्‍तिसंग्रामात मोठे योगदान आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मुक्‍तिसंग्राम लढ्यात सहभाग घेतला होता गुंजोटी आणि बार्शी कॅम्पवर शस्त्रे आणि दारुगोळा पुरविण्याचे काम गुप्तपणे करीत असे. पोलिसांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांना तीन वर्षे भूमिगत व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी लोकप्रबोधनासाठी पत्रकारितेचे वृत्त स्वीकारले. सुमारे 25 वर्षे त्यांनी साधना मासिकाचे काम पाहिले. दैनिक सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता, केसरी, अजिंठा, विश्‍वसमाचार, प्रवाह आणि पुढारी यांसारख्या वर्तमानपत्रांसाठी त्यांनी पत्रकारिता केली. सकारात्मक पद्धतीने लोकांना माहिती देणे आणि वैचारिक मंथन घडवून आणण्याचे काम निरंतर केले. त्यांच्यावर सानेगुरुजी आणि एस.एम. जोशी यांचा प्रभाव राहिला. ज्या काळात संपर्काची साधने नव्हती, तरीसुद्धा त्यांनी मुंबई आणि पुण्याच्या दैनिकांना बातम्या पुरविण्याचे काम केले. जुन्यांसह नव्या पिढीशींही त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. आरोग्यासाठी उपकारक शिवांबू चिकित्सा पद्धती आणि महात्मा गांधींच्या चरख्याचा वापर करून सूत कातण्याचे काम सुरुच आहे. गांधीजीच्या खादीचे व्रत आजतागाय त्यांनी कसोशीने पाळलेले आहे. वयाच्या 87वर्षी ते दररोज पायी चालण्याचा व्यायाम करतात. यापूर्वी 1989मध्ये त्यांना अखिल भारतीय मराठी वृत्तपत्रकार परिषदेने नागोजीराव दुधगावकर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यासह लातूर फेस्टिवल, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघानेही त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

खोट्या बातम्यांचा बळी

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका प्रामाणिक पोलीस हेड कॉन्स्टेबलने तीन दिवसांपुर्वी विष पिऊन आत्महत्त्या केली आहे.संतोष चाटे (वय ३२) असे या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव.दि. १३ मार्च रोजी रात्री १.१० वाजता रात्रीची गस्त घालत असताना एक मेडिकल चालवणारा योगेश गुजर नावाचा व्यक्ती संशयितरित्या दिसला असता,या पोलीस हेड कॉन्स्टेबलने त्यास हटकले,तेव्हा दोघांत बाचाबाची झाली आणि नंतर गुजरने चाटे यांना वर्दी फाटेपर्यत बेदम मारहाण केली.त्याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न केला असता,तेथील पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक यांनी अर्थपुर्ण व्यवहार झाल्याने तक्रार नोंदवू दिली नाही. त्याचबरोबर पोलीस उपअधीक्षकांनी चाटे यांना बोलावून त्यांचा अपमान केला.त्याचबरोबर यासंदर्भात स्थानिक दैनिक विवेक सिंधु आणि पुण्यनगरीमध्ये खोट्या बातम्या छापून आल्या,त्यामुळे अखेर संतोष चाटे या प्रामाणिक हेड कॉन्स्टेबलने विष पिऊन आत्महत्त्या केली.
चाटे यांच्या आत्महत्त्येस तीन पोलीस अधिकारी जसे जबाबदार आहेत,तसेच विवेक सिंधु दैनिकाचा संपादक,त्याचा मुलगा तसेच पुण्यनगरीचा स्थानिक वार्ताहर आणि संपादक जबाबदार आहेत. खोट्या बातम्यांचा हा बळी आहे.
पुण्यनगरीचा स्थानिक वार्ताहर अ.र.पटेल हा नेहमीच खोट्या बातम्या देत होता.मागेही एकजण आत्महत्त्या करण्यास निघाला होता.या हरामखोराला ताबडतोब बेड्या ठोकण्याची गरज आहे.विवेक सिंधुच्या संपादकाचा मुलगा अभिजीत जगताप याचाही विवेक संपला आहे.पत्रकारितेला काळीमा फासण्याचा उद्योग या हरामखोरांनी केला आहे.त्याला माफी नाही.पटेलाबरोबर जगतापही गजाआड करा.
पुण्यनगरीचा अ.र.पटेल हा अंबाजोगाईमध्ये खोटया बातम्या देण्यात क्रमांक एकवर आहे.संपादकाच्या मर्जीतील तो खास वार्ताहर आहे.तो जिल्हा प्रतिनिधीला न विचारता डायरेक्ट ऑफीसला बातम्या पाठवत होता.संपादक आणि पटेलामध्ये खास संबंध कशामुळे होते,याची चवदार चर्चा सध्या सुरू आहे.अश्यांची पाठराखण संपादक करतातच कसे हे एक मोठे कोडे आहे.पटेल जसा चाटे यांच्या मृत्यूस कारणीभूत आहे,तसाच या दैनिकाचा संपादक जबाबदार आहे.त्यालाही या प्रकरणात सहआरोपी करा.
त्याचबरोबर आरोपी योगेश गुजरचा भाऊ डॉक्टर आहे म्हणे.त्यानेच पोलीस अधिकारी आणि पत्रकारांना पैसे वाटप केल्याची चर्चा आहे.या हरामखोर डॉक्टरलाही सहआरोपी करा.या प्रकरणाची वरिष्ठ अधिका-यामार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे.कोणत्या पत्रकाराला किती पैसे वाटले,याची माहिती उघड झाली पाहिजे.
आम्ही चाटे कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत.पत्रकारितेतील या हरामखोरांना बेड्या ठोकेपर्यंत हा बेरक्या गप्प बसणार नाही.महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनो या घटनेचा निषेध करा.कुबेरांनी अखेर 'गुडघे' टेकवले !

'लोकसत्ता'च्या इतिहासात प्रथमच एक आक्रीत घडले आहे.बातम्याबद्दल नेहमीच 'दिलगिरी' व्यक्त करून माफी मागणा-या 'लोकसत्ता'ला चक्क अग्रलेखाबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी लागली आहे.यावरून संपादक गिरीश कुबेर यांची 'बौघ्दीक दिवाळखोरी' जाहीर झालेली आहे.
नेहमीच 'वादग्रस्त' अग्रलेख लिहून चर्चेत राहणा-या गिरीश कुबेरांनी दि.१७ मार्च रोजी 'असंतांचे संत' असा अग्रलेख लिहून ज्येष्ठ समाजसेविका 'मदर तेरेसा' यांच्या कार्यावर गरळ ओकले होते.हा अग्रलेख प्रसिध्द झाल्यानंतर ख्रिस्ती धर्मात प्रचंड असंतोष पसरला होता.त्यामुळे व्यवस्थापकांनी कुबेरांवर दबाव आणून माफी मागण्यास सांगितले.त्यानंतर दि.१८ मार्च रोजी पहिल्या पानावर या अग्रलेखाबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागण्यात आली आणि हा अग्रलेख मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.लोकसत्ता ऑनलाईनवरून हा अग्रेलेख डिलीट करण्यात आला आहे.मात्र जो अंक प्रिंट झाला,त्याचे काय ?
'लोकसत्ता'च्या इतिहासात अग्रलेख मागे घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.गिरीश कुबेरांचा अकलेचा कांदा झाला असून,त्यांची बौध्दीक दिवाळखोरी निघालेली आहे.
मागे दुष्काळग्रस्त शेतक-यांबाबत 'बळीराजाची बोगस बोंब' लिहिणा-या कुबेरांनी महाराष्ट्रात प्रचंड टीका होवूनही माफी मागितली नव्हती.यावेळी मात्र त्यांनी गुडघे टेकवले.त्यांच्या दुप्पटी भूमिकेबद्दल वाचकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

नेहमीच वादग्रस्त अग्रलेख लिहून चर्चेत राहणाऱ्या गिरीश कुबेरांनी माफी मागून अग्रलेख परत घेण्याऐवजी राजीनामा मालकाच्या तोंडावर फेकला असता तर आम्ही त्यांचे स्वागतच केले असते आणि उलट त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो असतो.परंतु केवळ नोकरीसाठी जो लाचारीपणा पत्कारला आहे,त्याचे आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना हसू येत आहे.कुबेरांना आता पत्रकारांना उपदेशाचे डोस पाजण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही.
महाराष्ट्रातील आदर्श संपादकाची फळी केव्हाच संपलेली आहे,आता कुबेरासारखे व्यावसायिक संपादक तयार झालेले आहेत.कुमार केतकर नंतर एक अभ्यासू संपादक म्हणून गिरीश कुबेर यांच्याकडे पाहिले जात होते,परंतु केतकरांनी मी मराठीत जावून स्वत:चे जसे हासू करून घेतले तसेच अता कुबेरांनी अग्रलेख मागे घेवून स्वत:चे हसू करून घेतले आहे.
अग्रलेख परत घेण्याची लोकसत्ताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.इतकेच काय तर मराठी वृत्तपत्र सृष्टीत असे कधी घडले नव्हते.कुबेरांनी ज्या पध्दतीने गुडघे टेकवले  आहेत,त्याचे कोणीच समर्थन करणार नाही.उलट त्यांनी सरळ राजीनामा देवून बाहेर पडायला हवे होते.
बळीराजाची बोगस बोंब असा अग्रलेख लिहिण्यानंतर विधीमंडळासह महाराष्ट्रात गदारोळ झाला असताना,कुबेरांनी अग्रलेख मागे घेतला नव्हता,मात्र मदर तेरेसा यांच्या लिखाणाबाबत मात्र त्यांनी गुडघे टेकवले.आता त्यांनी आपण केवळ व्यावसायिक संपादक आहोत,मालक सांगेल तसे वागतो असे एकदाचे जाहीर करावे,म्हणजे आम्ही त्यांना कधीच काही म्हणणार नाही.गुरुवार, १७ मार्च, २०१६

पांडू हवालदारच्या हकालपट्टीमुळे पंटरमध्ये खळबळ

लातूर - पुरोगामी विचारसरणीच्या दैनिकांतून पांडू हवालदारची हकालपट्टी झाल्यानंतर त्याच्या पंटरची चड्डी पिवळी झाली आहे.त्यात छोट्या देशमुखांनी जाहिरात बिलामध्ये झालेल्या घोळाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे काही जणांनी अंथरून धरले आहे.
चार ओळीची बातमी कशी लिहावी याची अक्कल नसलेला पांडू हवालदार संपादक झाला खरा पण त्याचा खरा चेहरा आता उघड झाला आहे.ज्या देशमुखांनी त्यास मोठे केले त्याच देशमुखांच्या डोक्यावर मि-या वाटण्याचे काम पांडू हवालदारने सुरू केल्यानंतर त्याच्या ढुंगणावर लाथ मारण्यात आली. आता त्यास बाभुळगावमध्ये जावून देशमुखांच्या गढीची हातात झाडू घेवून साफसफाई करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.कारण दुसरा पेपर याला दारात उभे करत नाही.
असो,दुसरीकडे छोट्या देशमुखांनी जाहिरात बिलामध्ये झालेल्या घोळाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून,जाहिरातीची पै ना पै वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे जाहिरात बिले गिळंकृत करणा-या जिल्हा प्रतिनिधीमध्ये विशेषत: पांडू हवालदारच्या पंटरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पांडू हवालदारच्या जोरावर काहीजण संस्थानिक बनले होते.ज्यावेळी जॉईन झाले तेव्हा भाड्याच्या घरात रहात होते.आता बंगले बांधून भाड्याने देत आहेत.या दैनिकामध्ये जिल्हा प्रतिनिधीस २० हजाराच्या आत पगार आहे.सध्याच्या महागाईचा निर्देशांक काढला तर यांच्याकडे बंगला,गाडी,प्लॉटिंग,शेती कुठून येते हा संशोधनाचा विषय आहे.देशमुखांनी यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे यांची चड्डीच पिवळी झाली आहे.
जे एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे आहेत,त्यांच्या लातूरला बदल्या करून चौकश्या केल्यास जाहिरात बिलातील घोळ उघडकीस येणार आहे.नवे मंगेश याचा शोध घेणार का,पांडू हवालदारच्या पंटरची हवा ते काढणार का,याकडे आता लक्ष वेधले आहे.

सोमवार, १४ मार्च, २०१६

लातूरच्या पांडू हवालदारची अखेर हकालपट्टी

लातूर - चार ओळीची बातमीही लिहिता न येणा-या पांडू हवालदारची पुरोगामी विचारसरणीच्या दैनिकातून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे.ज्या देशमुखांनी या पांडू हवालदारला मोठे गेले होते,त्याच देशमुखांनी त्यांच्या ढुंगणावर लाथ मारत गढीच्या बाहेर लावले.काळाचा महिमा अगाध असतो,हेच खरे आहे.
१९९१ ला सुरू झालेल्या या दैनिकात पांडू हवालदार उपसंपादक म्हणून जॉईन झाला होता.जेव्हा या दैनिकात आला तेव्हा त्याला चार ओळीची बातमीही नीट लिहिता येत नव्हती.त्यावेळी त्याच्याकडे सायकलही नव्हती.नंतर बंगला,गाडी आणि वृत्तसंपादकपद आले.या दैनिकांत अनेकजण आले आणि गेले परंतु खप काही वाढला नाही.देशमुखांचे मुखपत्र अशीच या दैनिकाची ओळख राहिली.साहेब अचानक गेले आणि या देनिकाचा आधारवड कोसळला,त्यामुळे आर्थिक घरघर सुरू झाली.एक ज्येष्ठ संपादक गेल्यानंतर या दैनिकाच्या संपादकपदी पांडू हवालदारची नाईलाज म्हणून निवड करण्यात आली.संपादक झाले तरी या पांडू हवालदारच्या पत्रकारितेत काही सुधारणा नव्हती,संगणकाचे कसलेही ज्ञान नाही.कागदावर बातमी लिहिण्याची जुनी सवय.एक बातमी लिहिण्यासाठी दहा कागद फाडून कच-याच्या टोपलीत टाकणारा पांडू हवालदार आर्थिक घोटाळ्यात सापडला आणि छोट्या देशमुखांनी त्याची परवा हकालपट्टी केली.लायकी नसताना,पांडू हवालदार मोठा झाला होता.तेही केवळ जात फॅक्टरमुळे.परंतु त्याच पांडू हवालदाराची अखेर हकालपट्टी करण्यात आली.काळाचा महिमा अगाध आहे,हेच खरे.पांडु हवालदाराच्या जागेत, याच दैनिकातून पुढारीत दोन वेळा आणि या दैनिकात दोन वेळा काम करणा-या मंगेशाची निवड करण्यात आली आहे.आता पुरोगामी दैनिकाच्या मागे मंगेश उभा आहे.हा मंगेश आता काय दिवे लावतो,याकडे लातूरकरांचे लक्ष वेधलय.

गुरुवार, १० मार्च, २०१६

मी मराठीचा बाजार अखेर उठला

मुंबई - समृध्द जीवन या चिटफंड कंपनीचा मालक महेश मोतेवार गजाआड झाल्यानंतर मी मराठीचा बाजार अखेर उठला आहे.बेरक्याने वर्तवलेले भाकीत अखेर तंतोतंत खरे ठरले आहे.
जवळपास 90 टक्के कर्मचारी सोडून गेले आहेत.कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे.सध्या आहे त्या कर्मचाऱ्यांवर फक्त एक किंवा दोन बुलेटीन सुरू आहे.कॅप्टन आता दुसरीकडे शोधाशोध सुरू करत आहेत.परंतु सगळीकडे 'नो एन्टी'चा बोर्ड झळकला आहे.मालक सुटण्याची सुतराम शक्यता नाही आणि कॅप्टनने नौका अखेर बुडवली आहे.
आपले चॅनल नंबर 1 वर आहे असा डांगोरा पिटणारा कॅप्टनचा मालक गजाआड झाल्यानंतर अखेर फुगा फुटला आहे.जर नंबर एक चॅनल होते तर मालक गेल्यानंतरही ते व्यवस्थितरित्या सुरू राहायला हवे होते.याचा अर्थ मी मराठी चॅनलसाठी चिटफंडचा पैसा येत होता,हे निर्विवाद सत्य आहे.
तिकडे मोतेवारच्या एक नव्हे तीन बायकां सध्या संपत्तीसाठी आपापसात भांडण असल्याच्या बातम्या येत आहेत.

भारतकुमार राऊत यांच्यासह तिघांना कारावास

मुंबई: वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव कोकीळ यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर छापल्याप्रकरणी 'महाराष्ट्र टाईम्स'चे तत्कालीन संपादकभारतकुमार  राऊत, पत्रकार संजय व्हनमाने, प्रकाशक श्याम दस्तूर यांना शिवडीच्या दंडाधिकार्‍यांनी सहा महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. मात्र, दंडाधिकार्‍यांनी त्यांची तातडीने जामिनावर सुटका केली. या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अपिलात जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. २00३ मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव कोकीळ यांच्यासंदर्भात 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये मजकूर छापून आला होता. हे लिखाण बदनामीकारक असल्याचे म्हणत कोकीळ यांनी राऊत, व्हनमाने आणि दस्तूर यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला  होता.  

शनिवार, ५ मार्च, २०१६

‘देशदूत’च्या संपादक संचालकपदी विश्‍वास देवकर

नाशिक : देशदूत वृत्तपत्र समुहाच्या संपादक संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार विश्‍वास देवकर यांची नियुक्ती सारडाशेठने केली आहे. दुसरीकडे, नगर ‘सार्वमत’च्या प्रेसलाईनमध्ये अखेर 1 मार्चपासून अनंत पाटील यांचे कार्यकारी संपादक म्हणून नावही सारडाशेठने टाकले आहे. या बाबत ‘बेरक्या’ने पाटील यांची भावनिक कोंडी चव्हाट्यावर आणली होती.
दैनिक गांवकरीमध्ये विश्‍वास देवकर हे संपादक संचालक म्हणून काम करत असताना, त्यांचा फारसा फायदा गांवकरीला झाला नव्हता. सद्या नाशिकमध्ये गांवकरी अन् देशदूत दोन्ही वृत्तपत्र शेवटची घटका मोजत आहेत. सकाळ वृत्तपत्र समुहात काम केलेले देवकर यांचा फायदा होईल, असे गांवकरीचे मालक-संपादक वंदनराव पोतनीस यांना वाटले होते. परंतु, संपादन, व्यवसाय व अंकवाढीसाठी देवकर यांचा गांवकरीला काहीही फायदा झाला नाही. आता हेच देवकर देशदूत वृत्तपत्र समुहात त्याच पदावर आणि थोडा जास्त पगार घेऊन ज्वॉईन झाले आहेत.
देशदूतचे संचालक विक्रम सारडा आणि वंदनराव पोतनीस हे वर्गमित्र आणि व्यवसायबंधू आहेत. तरीही या दोघांचे हाडवैर सर्वश्रुत आहे. त्याचा अचूक फायदा देवकर यांनी उचलून आपले इप्सित साध्य केले असले तरी, घसरलेल्या देशदूतला त्यांचा फारसा फायदा होईल, अशी परिस्थिती नाही.
दुसरीकडे, अनंत पाटील यांचे नाव या एक तारखेपासून सार्वमतच्या प्रेसलाईनमध्ये कार्यकारी संपादक म्हणून आले आहे. तसेच विश्‍वास देवकर यांचेही नाव प्रेसलाईनमध्ये आहे. सार्वमत पहिल्यांदाच बालेकिल्ला असलेल्या उत्तरेत घसरणीला लागल्याचे दुर्देवी चित्र आहे. नगर आणि नाशिकमध्ये व्यवसाय कसा टिकवावा, अंकाची घसरण कशी रोखावी, ही चिंता सद्या सारडाशेठला सतावत आहे.

बुधवार, २ मार्च, २०१६

ज्येष्ठ पत्रकार विजय पवार यांना पीएच.डी.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अलीकडेच ज्येष्ठ पत्रकार विजय कृष्णराव पवार यांना समाजशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान केली.
"वैदर्भीयांच्या सामाजिक विकासात प्रसारमाध्यमांची भूमिका" या त्यांच्या संशोधनाला रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या निरंतर, प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभागाच्या संचालक डॉ. जयमाला डूमरे (dumre) यांचे मार्गदर्शन लाभले. नागपूर लगतच्या फेटरी येथील मूळ निवासी पवार गत 22 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत  आहेत. त्यांनी अर्थशास्त्र, लोकप्रशासन, मराठी, समाजशास्त्र  (चौथा मेरीट), राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान (दुसरा  मेरीट), आंबेडकर  विचारधारा आणि  भारतीय  इतिहास, संस्कृती व  पुरातत्त्वशास्त्र या नऊ विषयांत एम .ए . तसेच इतिहासात एम. फिल. सह 14 पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. त्यांचे  "स्वातंत्र्य चळवळीत नागपूरच्या वृत्तपत्रांची भूमिका " हे इतिहासावरील संशोधन संदर्भ ग्रंथ ठरले. या यशाचे श्रेय ते आपले मार्गदर्शक, गुरुजन, मित्रमंडळी आणि पत्नी अर्चना यांना देतात. कामगार चळवळीत सक्रीय विजय पवार यांनी नागपूर पत्रिका, सामना, देशोनत्ती, नवराष्ट्र आदि वृत्तपत्रांमध्ये काम केलेले आहे.

‘पुढारी’ची औरंगाबाद आवृत्ती मे-जूनमध्ये!

- पद्मश्रींकडून वेगवान हालचाली सुरु
- पुणे प्रिटींग युनीटमधील एक मशीन औरंगाबादला हलविणार
- संपादकपदासाठी ज्येष्ठ संपादकाशी बोलणी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर :
अखेर दैनिक पुढारी औरंगाबादेत येत आहे. दिव्य मराठीचा वाजलेला बोर्‍या, लोकमतचा घसरलेला खप आणि इतर वृत्तपत्रांची फारशी नसलेली स्पर्धा पाहाता, पद्मश्रींनी तातडीने औरंगाबाद आवृत्ती सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार 1 मेपासून अंक देण्याचे नियोजन असून, तांत्रिक कारणाने उशीर झालाच तर 1 जूनपासून तरी अंक देण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे (कात्रज प्रेस) येथील एक प्रिंटींग मशीन औरंगाबादला हलविण्यात येणार असून, त्यासाठी घाई केली जात आहे.
दुसरीकडे, औरंगाबाद आवृत्तीसाठी एक वरिष्ठ संपादक पद्मश्रींच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. दैनिक सकाळला वरिष्ठ बातमीदार राहिलेले अभय निकाळजे पुढारीत ज्वाईन झाले खरे; परंतु त्यांच्या परफॉर्मन्सविषयी अत्यंत निगेटीव्ह रिमार्क पद्मश्रींना मिळालेले आहेत. त्यामुळे संपादकीय टीम निवडताना घाई न करण्याचा निर्णय पद्मश्रींनी घेतला आहे. ‘पुढारी’ औरंगाबाद येत असल्यामुळे ‘देशोन्नती’ने औरंगाबादेतून प्रिंटींगचा आपला निर्णय बदलला असून, विदर्भावरच लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, पद्मश्रीनेदेखील नागपुरात तूर्त तरी न जाण्याचे ठरवून आपले ‘सोयरे’पण जोपासले आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook