> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

अकोल्यात 'दिव्य'च्या मिटिंगमध्ये 'एनई'चा धिंगाणा

अकोलयात गुरुवारी चांगलेच 'दिव्य' घडले. भोपाळशेठच्या पेपरात रोज सकाळी आकाराला मीटिंग होते. गुरुवारी सकाळच्या मिटिंगमध्ये मराठीतील अ, आ, इ, देखील न कळणाऱ्या व मराठी पत्रकारितेचा गंध ही नसणाऱ्या वृत्तसंपादकाने (एनई) गलाच धिंगाणा घातला. अतिशय अश्लील भाषेत मध्यप्रदेशातील मूळ 'कुळ' असलेल्या या 'एनई'ने भर बैठकीत रिपोर्टर व फोटोग्राफरला शिविगाळ केली. मालकाच्या आविर्भावात त्याने मीच 'दिव्य' मालक असल्याचे सांगितले. "तुम्हाला येथून हाकलून देईल, मीच इथला हुकुमशहा आहे, मी म्हणेल तसेच काम करावे लागेल; अन्यथा निघून जा," अशा धमक्या त्याने दिल्या.

मुळात बाहेरच्या राज्यातील 'कुळ' अकोल्यात थेट वृत्तसंपादक सारख्या महत्त्वाच्या पदावर बसवल्याने अकोल्यात भोपाळशेठच्या पेपरची स्थिती 'दिव्य' झाली आहे. या 'एनई'सह आणखी दोघांच्या मनमानी कारभाराला व अंतर्गत गढूळ राजकारणाला कंटाळून गेल्या सात महिन्यात ८ रिपोर्टर व फोटोग्राफर पेपर सोडून गेले. नवीन एकही माणूस यायला तयार नाही. कार्यरत रिपोर्टर व फोटोग्राफर ही सोडून जायच्या मानसिकतेत आहेत.

पेपरला राजकारणाचा 'दिव्य' अड्डा बनवून टाकलेल्या मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारक बनलेल्या संपादकाला आपणच खुर्चीवर बसवलेल्या बगलबच्च्याची अरेरावी सहन होते का तेच आता बघायाचेय. महाराष्ट्रात कोणतीही मान्यता न मिळवू शकलेला हा संपादक पुन्हा रतलामी शेव खायला परत गेलाय. आता आपलीच माणसे असा धुमाकूळ घालताहेत म्हणाल्यावर यांना 'बोकडदाढी' खाजवण्याशिवाय पर्याय नाही.

जळगावात काही दिवसांपूर्वी 'फद्या' संपादकाच्या नादी लागून त्याच्या 'म्हमद्या'ला स्थापित करण्यासासाठी 'बोकडदाढी'ला पद्धतशीररीत्या वापरले गेले. कुठलीही शहानिशा न करता हे काँग्रेसप्रचारक संपादक महोदय कुचकामी 'फद्या'च्या नादी लागले आणि कामाच्या माणसाला घालवून बसले. तेव्हा सातत्याने चर्चेत असलेले 'दिव्य' उत्पादन आता केवळ प्रचारकी पत्र बनून 'छपाई' करीत आहे. सातत्याने बोल्ड आणि बिनधास्त बातम्या वाचण्याची सवय असलेल्या जळगावकरांना आता ही पुढारयांची 'पटवे'गिरी, चाटूगिरी आजीबात रुचत नाहीये. त्यामुळे वितरणाचे आकडे दिवसेंदिवस घसरत चालले आहेत; वर्गणीदार बनवायला समस्या येत आहेत. आता केवळ 'सेटर' आणि त्याच्या चमच्यांचे कोंडाळे उरले आहे. या 'फद्या'ला एकाही महत्त्वाच्या पेपरमधील माणूस फोडता आला नाही. जळगावकरांना त्यामुळे आता 'फद्या-म्हमद्या'चा तमाशा बघण्यावाचून पर्याय उरलेला नाही आणि प्रचारक संपादकाला इंदुरी-भोपाळी बसून आपली 'बोकडदाढी' कुरवाळीत हा फसलेला वग सहन करण्यावाचून काही उद्योग उरला नाही. मुळव्याध झाल्यागत 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही,' अशा वेदना आता 'बोकडदाढी'वाल्याला होत आहेत; पण आपलीच चूक, कबूल कशी करणार? मुळव्याधच्या वेदना काय असतात ते 'फद्या'च्या लंपट, चमच्याला विचारून दाढी खाजवा हो बोकड'बाबा'!

इंदापुरी हिरोची संत्रानगरीत हाणामारी!

'स्मार्ट' वृत्तपत्राच्या संत्रानगरीतील इंदापुरी हिरोने नुकतीच विद्यापीठाच्या प्रांगणातच हाणामारी केली. त्याने एका पत्रकाराला विद्यापीठातील अधिकारी व विद्यार्थ्यांसमोरच वाईट भाषेत शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन नुकतेच एका समारंभासाठी संत्रानगरीत आले होते. कस्तुरीरंगन माध्यमांशी बोलत असताना या हिरोने त्यांना मध्येच थांबविले. त्यावर कस्तुरीरंगन यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. इतकेच काय पण याने इंग्रजी वृत्तपत्रातील महिला पत्रकारालादेखील हैराण करुन सोडले. कस्तुरीरंगन जे बोलले त्यातील महत्त्वाची बातमी दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रात छापून आली; मात्र 'स्मार्ट'मध्ये नाही! तसे पाहिले तर हा हिरो पत्रकार शिक्षण सांभाळतो. परंतु विद्यापीठात एखादा अधिकारी असल्यासारखाच फिरतो व सर्वांना शहाणपणाचे सल्ले देतो.

मोठमोठ्याला जाहिराती, स्कीम्स यांच्यामुळे सुरुवातीला संत्रानगरीत 'स्मार्ट'चे  इंजिन सुरुवातीला जोरात धावले. परंतु काही काळाने संपादक सपशेल `पराजित` झाले आहेत. त्यांनी स्वतःच्या जवळच्या माणसांची अक्षरशः खोगीरभरती करुन ठेवली आहे. 'अतुल'नीय कामगिरीचे केवळ दावेच! या जोडगोळीने 'भविष्यपत्राच्या' उदयात स्वतःचे हात धुवून घेतले आणि तेथून सटकले. कावळ्याची नजर आणि कोल्ह्याची चतुराई दोघांतही भरलेली आहे.
'स्मार्ट'चा भर बातम्यांहून जास्त कॅम्पेनवरच दिसतो. मग इव्हेंट मॅनेजमेन्ट कंपनीच का काढली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. बरे येथील टीममध्येदेखील वर्चस्वाची लढाई सुरू आहे! आता तर मुंबईचेच पत्र पाठवा, अशी जोरदार मागणी होत आहे.


'राखी'चा बाय-बाय
'स्मार्ट'मधील राखी राजीनामा देऊन पुन्हा 'लोकमान्य लोकशक्ती'तील स्वगृही परतल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात 'लोकमान्य'ची नागपूर एडिशन गुंडाळून त्याचे काम मुंबईतून सुरू झाले होते. आता हीच एडिशन पुन्हा नव्याने लाँच केली जाईल, अशी चर्चा आहे.

तीन वर्षे पुर्ण झाली तरी चार जिल्ह्यात दिव्य दूरच

औरंगाबाद - दिव्य मराठीची पहिली आवृत्ती औरंगाबादहून तीन वर्षापुर्वी सुरू झाली.२९ मे रोजी दिव्य मराठीचा तिसरा वर्धापन दिन आहे.मात्र मराठवाड्यातील चार जिल्ह्यात अजूनही दिव्य मराठी पोहचला नाही.
नांदेड,परभणी,हिंगोली आणि लातूर अशी ही चार जिल्हे आहेत.उस्मानाबादला जो अंक जातो,तो सोलापूला छापला जातो.मुख्य बारा पानात ज्या जाहिराती असतात,त्या सोलापूरच्या असतात.उस्मानाबादच्या अंकावर सोलापूरची मोहर असते.
मराठवाडा छापचा अंक औरंगाबाद,जालना आणि बीड या तीनच जिल्ह्यात आहे.नगरचीही तीच बोंब आहे.नगर आवृत्ती औरंगाबादमध्ये छापली जाते.मात्र नगर जिल्ह्यात अजूनही अंक पोहचलेला नाही.सोलापूर आवृत्ती सोलापूर जिल्ह्यापुरती मर्यादित आहे.
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत.त्यामुळे मराठवाड्यातील उर्वरित चार जिल्ह्यात दिव्यचा अंक सुरू होणे कठीण आहे.

दिव्यचे लाँचिग रखडले

औंरगाबाद आवृत्ती चार जिल्ह्यात अजूनही पोहचली नाही.त्यानंतर नाशिक,जळगाव,अकोला आणि सोलापूर या आवृत्त्या सुरू झालेल्या असल्या तरी पुढच्या सर्व आवृत्त्या रखडलेल्या आहेत.त्यामुळे दिव्यकडे डोळा लावून बसलेल्या पत्रकारांचे दिव्य स्वप्न भंग पावले आहे.

केतकर गेले,नवा भिडू कोण ?
दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांचा तीन वर्षाचा करार संपला आहे.त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे.त्यांच्या जागेवर अजूनही मुख्य संपादक म्हणून कोणाचीही निवड झालेली नाही.प्रशांत दीक्षित यांचे नाव आघाडीवर असले तरी भोपाळशेठने अजूनही ग्रीन सिग्नल दिलेला नाही.
केतकर दिव्य सोडणार,हे लक्षात आल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक समर खडस चार महिन्यापुर्वी लोकमतला गेले,आता लोकमत सोडून म.टा.ला जात आहेत.प्रसाद केरकर कृषीवलमध्ये स्थिर झाले आहेत.अजूनही काही केतकर समर्थक दिव्य सोडण्याच्या विचारात आहेत.

लांबे म.टा.च्या वाटेवर

 दिव्य मराठीचे औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक धनंजय लांबे यांचा तीन वर्षाचा करार येत्या ३१ मार्च रोजी संपत आहे.त्यांना मुदतवाढ द्यायला भोपाळशेठ तयार नाहीत.त्यामुळे लांबे म.टा.च्या वाटेवर आहेत.लांबेच्या जागेवर संजीव उन्हाळे यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.
दिव्य मराठीच्या निवासी संपादकांसाठी उदय भविष्यपत्राच्या एका माजी कार्यकारी संपादकांचे नाव आघाडीवर होते,मात्र त्यांना सकाळ सोडून दिव्य मध्ये गेलेल्या चार जणांनी कडाडून विरोध केला,ऐवढेच नाही तर दिव्य सोडून जाण्याची धमकी दिली.त्यामुळे त्या उदय भविष्यपत्राच्या माजी कार्यकारी संपादकांचा पत्ता कटला आणि उन्हाळे यांचे क्रमांक दोनवर असलेले नाव एकवर आले.अखेर उन्हाळे यांना दिव्य मराठीचा 'दिलासा' मिळाला ...

रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४

लोकमतचा असाही विरोधाभास


काही दिवसांपूर्वी लोकमतला ७ फेब्रुवारीला अमरावती शहरात पाण्याचा सुकाळ अशी बातमी छापुन आली. त्यानंतर २२ फेब्रुवारीला बोअर खोदण्यासाठी कलेक्टरची परवानगी जरुरी अशी बातमी छापली. त्यामुळे अमरावतीत मुबलक पाणी आहे कि पाण्याची कमतरता हा पेच लोकमतनेच निर्माण केला आहे. बातम्यांची कामे सोडून कार्यालय प्रमुख एका पोलिस अधिका-यांसोबत त्यांच्या एसी केबिन मध्ये बसून राहतील तर असच होणार.या  अधिक-याची काही दिवसापूर्वी बदली झाली. साहेबांची बदली रद्द करण्यासाठी मोर्चा काढा असा दबाव या कार्यालय प्रमुखाने 'हेल्पलाइन' नावाच्या एका संघटनेवर टाकला. पोलिसाच्या बदली रद्दसाठी मोर्चा आणि त्यासाठीही पत्रकाराचा दबाव म्हणून हेल्पलाइनने मोर्चा काढला. नाईलाजाने पण मोर्चात फक्त १५ जण सामील झालेत. बातम्या सोडून ही कामे यांना बाबूजी सांगतात काय?

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र' बनले बदमाशांचे आश्रयस्थान!

"लोकशाहीच्या मंदिरात नंगानाच; आमदारांनी कपडे काढले; लाज सोडली!" अशी जोरदार लेखणी चालविणारे 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'च आता 'कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळायला' निघालेले आहे. विशेष म्हणजे खासदार असलेल्या संपादकाला चक्क इथल्या बदमाश त्रिकुटाने शेंडी लावली आहे. इथला 'बारावी नापास' म्होरक्या म्हणजे जणू पंढरपूरचा बडवाच आहे. तिथे तरी राज्य सरकारने खमकेपणाने बडव्यांचे राज्य मोडीत काढले आहे. मात्र, 'सदगुरु दर्शन' होउनही 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र' काही 'बारावी नापास' बडव्यापासून मुक्त होऊ शकलेले नाही.

खासदारांचेच या बडव्यावाचून पान हलत नाही, असा प्रचार हा बडवाच त्याच्या चमच्यांमार्फत करत राहतो. वास्तविक खासदारांना 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र' हाताशी धरून बाहेर कोण काय धंदे करतोय, याची कल्पनाच नाही. आताही बडव्याने त्यांना अंधारात ठेवून एका बदमाश आरोपीला हाताशी बाळगण्याचा, पावन करून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. आश्चर्य म्हणजे वर्षानुवर्षे इथे काहीही न करता खुर्ची उबवत असलेल्या खानदेशी आणि बडव्यामधून विस्तव जात नाही; पण या बदमाशाला पुनर्स्थापित करण्यात खान्देशीने बडव्याची मदत केली आहे. वर्षानुवर्षांचा निष्ठावंत असूनही 'ठाणे-नाशिक-कोकणापुरते मर्यादित' केले गेलेल्या जुन्या, हाडाच्या सैनिकाचा व रत्नागिरीवाल्या 'विशेष मर्जीतल्या माणसाचा' विरोध डावलून 'मराठी माणसांना फसविणारा बदमाश' आता 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये घुसविला जात आहे. 

अंधारात ठेवले म्हणून खासदारांची भूमिका नैतिकदृष्ट्या योग्य ठरविता येणार नाही. त्यांचे बडव्यावरचे प्रेम धृतराष्ट्राची आठवण आणल्याशिवाय राहत नाही. पण भल्या माणसाचे प्रेम मिळाले म्हणून काही दुर्योधन 'महाभारता'तही सुधारला नाही व आजही सुधारणार नाही. ती प्रवृत्ती आहे. आणि हीच प्रवृत्ती  'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये बदमाशांना घुसवून स्वत:ची व्यक्तिगत कामे मार्गी लावण्याची सोय करू पाहत आहे. या अशा दुर्योधनी प्रवृत्ती खासदारांनी वेळीच ठेचून काढून त्यांचे बदमाश मनसुबे उधळून लावले नाहीत तर त्यांचे सारे 'बाइटस' म्हणजे 'बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी' ठरतील. वर विरोधक 'दिव्याखाली अंधार' आणि 'मराठी माणसांना फसविणारा बदमाश' हाताशी धरणारे हे काय मराठी माणसाचे भले करतील', असे म्हणायला मोकळे! 

आश्चर्य म्हणजे, गोरेगावमध्ये ज्या मराठी माणसांची  "म्हाडाच्या घरांचे आमिष दाखवून" फसवणूक केली गेली, ती मंडळी न्यायासाठी 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र' प्रकाशित करणारयांच्या दारीही जावून आली. खरेतर ही सारी फसविली गेलेली मराठी माणसे मराठी माणसाचे भले करण्यासाठी झटणारी, 'प्रबोधन' करणारी कार्यकर्तेच आहेत. 'प्रबोधना'त गुंतलेल्या 'सैनिकांना' फसविणारे 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये आरामात शिरू शकतात, हा जर संदेश बाहेर गेला तर तो निश्चितच खासदारांच्या अन वृत्तपत्राच्या; तसेच पक्षासाठीही हितकारक ठरणार नाही. यात बडव्यांचे किंवा इतर कुणा 'भडवेगिरी' करणारयांचे काहीही नुकसान होणार नाही, पण 'प्रबोधन'च्या पाठीराख्यांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या कार्यकर्त्यांना, मराठी माणसाला फसविणारयांना 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये मुद्दाम घेतले जाते, त्यांना डिवचले जाते ... हाही संदेश घातकच ठरेल! आणि एकूणच इतरांकडून सदशील वर्तनाची अपेक्षा धरणारयांनी अंधारात राहून कसे चालेल? बडव्यांचे लाड अजून किती दिवस पुरविणार? 

नैतिकता हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, ज्याचा-त्याचा दृष्टीकोन आहे, 'विशेषाधिकार'ही आहे! मात्र, एरव्ही "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी" असा खणखणीत आणि 'रोखठोक' बाणा जपणारे 'बडव्या'पुढे इतके आगतिक का होतात; की त्याची काहीही थेरं खपवून घेतली जावीत? बडव्यांचा तर मूळ धंदाच दलालीचा; त्याच्याकडून 'नीर-क्षीर-विवेका'ची काय अपेक्षा कुणाला असणार? मात्र, हा बेरक्या, उभा महाराष्ट्र, देशाच नव्हे तर जगभरातील मराठी माणूस 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मधील 'रोखठोक'पणाला सलाम करतो! बेरक्याला या 'रोखठोक'पणाचा अतीव आदर आहे; पण 'बडव्या'ला आपण आवरायाला हवे! ही बडवी मंडळी बाहेर 'सारे काही आपल्यासाठी' करावे लागते, असे सांगत सुटते. आम्ही जाणतो, की हे असले धंदे आपले नव्हेत; आपला त्याला कसला आलाय आशिर्वाद आणि आदेश? ... आम्ही जाणतोय; मात्र इतर कुणाकुणाला सांगणार? ते तर बडव्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणार! 'भडवेगिरी' त्यांची आणि बदनाम मात्र नाहक आपण होणार! 'मराठी माणसांना फसवूनही बदमाश 'मराठी माणसाचे स्वत:चे वृत्तपत्र'मध्ये मिरवू लागला की मग मात्र जगालाही यात काहीतरी 'काळे-बेरे' वाटेल! कुणाकुणाचे प्रबोधन करणार? त्यापेक्षा बडव्यांना चापून, काळी कृत्ये करणारया काळ्यांना ढुंगणावर लाथ मारणे हाच 'रोखठोक' बाणा जपण्याचा मार्ग आहे. नाहीतर मग आम्हालाही म्हणावे लागेल की, "काळ्याच्या ढुंगणावर उगवलं बाभूळ!"

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०१४

समर खडस यांचा राजीनामा

मुंबई - अवघ्या चार महिन्यातच समर खडस यांनी लोकमतच्या सहाय्यक संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. लोकमतमधील अंतर्गत राजकारणाणाला कंटाळून खडस यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.खडस लवकरच महाराष्ट्र टाइम्समध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून जॉईन होणार आहेत.
खडस यांनी दिव्य मराठीचा राजीनामा देवून लोकमतमध्ये चार महिन्यापुर्वी प्रवेश केला होता.त्यांना सहाय्यक संपादक (राजकीय) पद देण्यात आले होते.मात्र त्यांची लोकमतमध्ये चांगलीच घुसमट सुरू होती.लोकमतमध्ये राजकीय बीटवर सुध्दा पक्षपात करण्यात आला होता.
खडस यांना रिपाइं,शिवसेना आणि मनसे तर अतुल कुलकर्णी आणि यदु जोशी यांना कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षावर लिहिण्याचे अधिकार देण्यात आले होते .त्यामुळे खडस नाराज होते.मला सर्व पक्षावर लिहिण्याचा अधिकार द्या,अशी खडस यांची मागणी होती,पण समूह संपादक दिनकर रायकर यांनी जोशी - कुलकर्णी यांची पाठराखण केली तर खडस यांना दुय्यम वागणूक दिली.त्यामुळे खडस यांनी लोकमतचा राजीनामा देणे पसंद केले.
खडस यांचा राजकीय अभ्यास चांगला असला तरी लोकमतमधील राजकारणाचा अभ्यास करण्यात ते कमी पडले.असो खडस लोकसत्ता.,दिव्य मराठी,लोकमत मार्गे म.टा.मध्ये जॉईन होत आहेत.

संदीप प्रधान नाराज
एकेकाळी समर खडस आणि संदीप प्रधान लोकसत्तामध्ये रिपोर्टर होते.प्रधान सध्या म.टा.मध्ये ब्युरो चिफ (राजकीय)आहेत.त्यांच्या डोक्यावर आता समर खडस यांना बसविण्यात येणार असल्यामुळे प्रधान नाराज आहेत.ते कदाचित म.टा.चा राजीनामा देवून लोकमतमध्ये जावू शकतात.

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

लोकमतचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांचा राजीनामा

औरंगाबाद -महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या.कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांचा अचानक राजीनामा घेण्यात आला.उन्हाळे यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांना काढून टाकण्यात आले,याबाबत चर्चेला ऊत आले आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स'चे प्रतिनिधी असलेले संजीव उन्हाळे हे दोन वर्षापुर्वी लोकमतमध्ये दाखल झाले होते.त्यांच्याकडून बाबूजींच्या फार अपेक्षा होत्या,मात्र त्या फेल गेल्या होत्या.त्यामुळे छोटे आणि मोठे बाबूजी उन्हाळेंवर नाराज होते.त्यांचा दोन वर्षाचा करार संपल्यानंतर,ते एक महिन्यापासून सुट्टीवर होते.मात्र एक वर्षाची त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.त्यानंतर दोनच दिवसांपुर्वी ते जॉईन झाले होते.तसे वृत्त बेरक्याने दिले होते.
मात्र शुक्रवारी अचानक काही घडामोडी घडल्या. सायंकाळी साडेसात वाजता संजीव उन्हाळे यांचा अचानक राजीनामा घेण्यात आला. काही निवडक रिपोर्टरच्या बैठकीत छोट्या बाबूजींनी उन्हाळेंचा राजीनामा घेण्यात आल्याची घोषणा केली आणि लोकमत भवनमध्ये मोठी खळबळ उडाली.
मावळते कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे अत्यंत हुशार आणि अभ्यासू पत्रकार आहेत.मात्र लोकमतचे व्यवस्थापन करण्यात त्यांना अपयश आले.त्यांनी ब्युरो कार्यालयात काही बदल केले होते,परंतु ते त्यांच्या अंगलट आले.स्थितप्रज्ञ असलेल्यांनी त्यांचे कान फुंकले आणि त्यांच्या ते अंगलट आले.ज्यांना त्यांनी चिफ रिपोर्टर केले तेही कुचकामी निघाले.त्यामुळे हॅलोचे बारा वाजले होते.आता उन्हाळे गेल्यामुळे ब्युरो कार्यालयात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

नाशिकच्या पत्रकारितेत उलथापुलथ!


नाशिकच्या पत्रकारितेत लवकरच मोठी उलथापुलथ होण्याची चिन्हे आहेत. गेली अनेक वर्षे तिथल्या पूर्वीच्या सर्वाधिक खपाच्या स्थानिक दैनिकात कार्यकारी संपादक असलेले आणि राजकारणात नसूनही नाशिकचे 'राजकारण' गाजविणारे देवळालीकर लवकरच बोरीबंदरच्या 'स्मार्ट मित्र'च्या हातात-हात धरून आपली नवीन इनिंग सुरू करू शकतात. तिथे ते मेट्रो एडिटर किंवा निवासी संपादक म्हणून बहुधा फेब्रुवारीच्या अखेरच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात रुजू होवू शकतात. त्यांनी 'उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिका'चा राजीनामा दिल्याचीही खात्रीलायक माहिती 'बेरक्या'कडे आहे. त्यांनी नोटीस दिली असून उद्या, शनिवारी बहुधा ते टिळकपथावर शेवटचेच दिसतील, असे सांगितले जात आहे. आता 'स्मार्ट मित्रा'ला नाशिकच्या पत्रकारितेतील 'सचिन' लाभला तर पूर्वी 'उत्तर महाराष्ट्राची खबरबात' घेणारा मालेगावचा खेळाडू काय करणार, याबाबत उत्सुकता आहे. 
 
'स्मार्ट मित्रा'ची नाशिकमधील आणि नंतर जळगावातील स्थिती फारशी समाधानकारक न राहिल्याने नव्या संपादकीय संचालकाने फेरबदलाचा निर्णय घेतला होता, असे समजते. आता दैनिक नाशिकच्या मातीशी कनेक्ट करतानाच जळगावातील अनागोंदी थांबविण्याचे मुख्य काम देवळालीच्या देशमुखांसमोर राहील.
 
नाशिकमधील पत्रकारितेत 'दादा' असलेल्या जुन्या नाशिकमधील 'समर्थ' ज्येष्ठ पत्रकाराचे चिरंजीव  आणि देवळालीच्या देशमुखांचे 'खास मित्र' असलेले पत्रकार मुंबईतील एका वाहिनीला 'जय महाराष्ट्र' करून 'निर्भीड जनमत'च्या संपादकपदाची सूत्रे हाती घेत आहेत. 
 
दुसरीकडे 'सीटू'ची सूत्रे सांभाळणारे नाशिकमधील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते पत्रकारितेत समांतर 'पर्याय' उभारण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी 'पर्याय'साठी मुलाखतीही सुरू केल्या आहेत. सिडकोत हॉटेल असलेल्या नगरसेवकाच्या मंगल कार्यालयात मुलाखतपर्व सुरू आहे. 

जाता - जाता 
देशदूतचे मुख्यसंपादक प्रकाश कुलकर्णी हे पुन्हा स्वगृही नवशक्तीमध्ये परतले. सारडाशेठला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका. कुलकर्णी हे देशदूतचे मोठे आर्थिक आधारस्तंभ होते. बँकिंग परिषदेसह इतर छोटेमोठे उपक्रम ते राबवित. मागच्या वेळच्या अशोकपर्वचा लाभ त्यांनीच देशदूतला मिळवून दिला होता. नवशक्तीचे संपादक नंदकुमार टेणीही स्वगृही लोकमतला परतले. ते ठाण्याचे निवासी संपादक झालेत. टेणी हे पूर्वी नाशिक देशदूतचे संपादक होते. टेणींचा प्रवास लोकमत-सामना-देशदूत-नवशक्ती व पुन्हा लोकमत असा झाला. कुलकर्णींच्या जागी जळगाव देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांची वर्णी लागली. ते देशदूतचे मुख्यसंपादक झालेत.

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

'मजीठिया आयोगाच्या शिफारशी अंमलात आणा'

नवी दिल्ली - वर्तमानपत्रे व वृत्तसंस्थांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार व इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वेतनसंदर्भात नेमण्यात आलेल्या मजिठीया वेतन आयोगाच्या शिफारशींचे पालन करण्यात यावे, असा निर्णय आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला.

या वेतन आयोगाच्या शिफारशींना वेगवेगळ्या वृत्तपत्र कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. मात्र आज न्यायालयाने यावर निर्णय देताना या वेतन आयोगाच्या शिफारशींचे एप्रिल 2014 पासून पालन करण्यात यावे, असा निर्णय दिला. यासंदर्भात पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनामधील फरक हा नोव्हेंबर 2011 पासून मिळणार आहे. हा फरक एका वर्षामध्ये चार हफ्त्यांमध्ये देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पी सदासिवम, न्यायाधीश शिवकिर्ती सिंह आणि न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला होता. टाईम्स ऑफ इंडिया चालविणारी बेनेट अँड कोलमन कंपनी; तसेच इतर कंपन्यांनी वेतन आयोगाच्या या शिफारशींना आव्हान दिले होते. वेतन आयोगाने आपला अहवाल डिसेंबर 2010 मध्ये मांडल्यानंतर केंद्राने नोव्हेंबर 2011 मध्ये यासंदर्भातील निर्देश दिले होते. मात्र, आज न्यायालयाने यासंदर्भातील स्पष्ट निर्णय सुनाविल्याने या वादास आता पूर्णविराम मिळाला आहे.


साभार - सकाळ  

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

कोल्हापूर,सांगली एक्स्प्रेस....

कोल्हापूरच्या भाऊसिंगजी रोडवरचा पद्मश्री आखाडा तसा लोकप्रिय. काही दिवसापूर्वी या आखाड्यात राजारामपुरी केसरी दिलीप लोंढे आणि भवानी मंडप केसरी वस्ताद सुरेश पवार यांची खडाखडी रंगली होती. लोंढे हे कार्यकारी तर पवार हे वरिष्ठ कार्यकारी. पै. लोंढे यांनी निवृत्ती पत्करली आणि प्रेस लाईनला मजकूर निवडीची जबाबदारी वस्ताद पवारांवर आली. आता गम्मत अशी कि राजारामपुरी केसरी पै लोंढे हे दादांच्या आग्रहास्तव पुन्हा आखाड्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे कुस्ती रंगणार अशी चर्चा अक्क्ख्या करवीरात सुरु आहे. या दोन मल्लांच्या कुस्तीत व्हिजन मार्गे पुढारीत आलेले मुकुंद फडके यांची चांगलीच गोची झाली आहे.
 ......................................................
पत्रकारांच्या सल्ल्याने भले भले भंगारात गेले. पण एका भल्या राजकारण्याने पत्रकारांना चक्क भंगार वाल्यांच्या पंक्तीत वाढून धमाल उडवून दिली... त्याची सांगलीत घडलेली हि गोष्ट. सांगलीत भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या एका नेत्याने पत्रकार परिषद बोलावली. हा नेता तसा सज्जन. सज्जन नेत्याकडे कार्यकर्ते तसे नसतातच. याच्याकडेही नव्हते. पत्रकारांना कार्यकर्ते कुठून दाखवणार??? म्हणून या नेत्याने शक्कल लढवली. त्याने चक्क आपल्या भागातल्या भंगारवाल्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. आणि हेच माझे कार्यकर्ते अशी थाप ठोकून दिली. पत्रकरनहि ते खरे वाटले. परिषद संपली. जेवणे आली. मग गप्पा सुरु झाल्या. "तुमच भंगाराच दुकान कुठे आहे'' अशी विचारणा काही भंगारवाल्यांनी पत्रकारांना केली. आणि सगळा उलगडा झाला. पत्रकार ज्यांना कार्यकर्ते समाजात होते ते भंगार वाले निघाले आणि भंगारवाले ज्यांना भंगारवाले समजत होते ते पत्रकार निघाले. कसेबसे हात पुसत निघायची वेळ पत्रकारावर आली.
...............................

बेरक्याचे वृत्त तंतोतंत खरे ठरले....दिव्य मराठीच्या प्रेस लाईनमधून कुमार केतकर यांचे नाव गायब

बेरक्याचे वृत्त तंतोतंत खरे ठरले.दिव्य मराठीच्या प्रेस लाईनमधून कुमार केतकर यांचे नाव गायब.याचा अर्थ स्पष्ट आहे की,कुमार केतकर यांना अग्रवाल शेठनी नारळ दिलेला आहे.
आता दिव्य मराठीच्या मुख्य संपादकपदासाठी भारतकुमार राऊत आणि प्रशांत दीक्षित यांचे नाव आघाडीवर...केतकर लोकमतच्या वाटेवर....
 

ज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

औरंगाबाद : दररोज कार्यालयातून बाहेर पडताना आमचे बासीतभाई म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार तथा लोकमतचे मुख्य उपसंपादक अब्दुल बासीत मोहसीन (रा. रेल्वेस्टेशन) हे आपल्या दोन-चार सहकार्‍यांची चेष्टा करीत कार्यालयातून 'एक्झिट' घेत असत. आजही त्यांनी अशीच हसत-खेळत कार्यालयातून एक्झिट घेतली आणि थोड्या वेळानंतरच त्यांनी जीवनातून कायमची एक्झिट घेतल्याची दुर्दैवी वार्ता कार्यालयात येऊन धडकली.
दररोज त्यांची एक्झिट कार्यालयातील प्रत्येकाला आनंद देऊन जात असे. आज मात्र त्यांची एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला कायमचीच चटका लावून गेली.
शनिवारी रात्री हृदयविकाराने राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ५९ वर्षांचे होते. नित्यनियमाप्रमाणे शनिवारी दिवसभर वार्तांकन करून ते सायंकाळी लोकमत कार्यालयात आले. ड्युटी संपल्यानंतर हसत-खेळत ते कार्यालयातून बाहेर पडले. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. बासीत मोहसीन यांनी १९८0 पासून औरंगाबाद टाईम्स या उर्दू दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. १९८५ मध्ये ते लोकमतमध्ये रुजू झाले. आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत विविध, सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी आदी विषयांवर सडेतोड लिखाण केले. निर्भीड, धडाडीचे व स्पष्ट वक्ते पत्रकार अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी क्राईम, मनपा, रेल्वे, आरटीओ, विमानतळ, राजकीय आदी बीटमध्ये उल्लेखनीय काम केले होते. शोधपत्रकारितेत तर त्यांचा हातखंडा होता. त्यांनी उघडकीस आणलेले विद्यापीठाचे बोगस डिग्री स्कँडल, कंडोम घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले.
या शोधमालिकेसाठी त्यांना जगन फडणवीस शोधपत्रकारिता पुरस्कार मिळाला होता. उर्दू,मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच तेलगू भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. मनमिळाऊ व मिश्कील स्वभाव असणारे बासीत मोहसीन हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. शहरातील मुस्लिम समाजाच्या विकास प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लिखाण केले. 'सिकंदर शास्त्री' या टोपण नावाने ते परिचित होते.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तथा पत्रकारांनी रुग्णालयात धाव घेतली.
अब्दुल बासीत मोहसीन यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. रविवारी, सायंकाळी असरच्या नमाजनंतर ५ वाजून १५ मिनिटांनी रेल्वेस्टेशन येथील मशिदीमध्ये नमाज-ए-जनाजा पढण्यात येईल. त्यानंतर शाहशोख्ता दर्गा परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येईल.

शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

प्रताप नलावडे पुन्हा लोकमतमध्ये

बीड - दैनिक लोकमतचे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रताप नलावडे हे दि. १ फेब्रुवारी (शनिवार) रोजी रूजू झाले.कार्यकारी संपादक चक्रधर दळवी यांच्या उपस्थितीत नलावडे यांनी शनिवारी सकाळी आपल्या पदाची सुत्रे घेतली.नलावडे पुन्हा लोकमतमध्ये परतल्यामुळे त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
प्रताप नलावडे हे मुळचे बार्शी (जि.सोलापूर) येथील रहिवासी आहेत.त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात लोकमतपासून झाली होती.सन १९९४ ते २००८ पर्यंत तब्बल बारा वर्षे त्यांनी लोकमतचे उपसंपादक तसेच पंढरपूर कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहिले.नंतर लोकमतचा राजीनामा देवून दैनिक एकमतमध्ये जॉईन झाले होते.सन २००९ ते २०१२ पर्यंत त्यांनी दैनिक एकमतच्या सोलापूर आवृत्ती प्रमुख काम पाहिले.नंतर त्यांनी एकमतचा राजीनामा देवून दैनिक सुराज्यमध्ये कार्पोरेट एडिटर म्हणून जॉईन झाले होते.पाच महिने सुराज्यमध्ये काम केल्यानंतर ते पुन्हा लोकमतमध्ये परतले आहेत.
प्रताप नलावडे यांचे सोलापूर लोकमतमध्ये पक्या सोलापूरकर या टोपण नावाने अकलेचा कांदा हे सदर लोकप्रिय झाले होते.आता हे सदर पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत.
नलावडे यांना नव्या इनिंगसाठी बेरक्याच्या शुभेच्छा.

 

फेसबुक वर शेअर करा

Facebook