> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२

नारदाची भ्रमंती...

मुंबई - मुंबईत नवाकाळच्या मंत्रालय प्रतिनिधी राहुल लोंढे यांना खाडिलकर मॅडम यांनी नारळ दिलाय. राहुल लोंढेने अनेक वेळा अतिरेक केलाय. तशी चर्चा देखील मंत्रालय पत्रकार कक्ष मध्ये आहे.  नवाकाळची हवा घेऊन लोंढे वागायचे. स्वताची मार्केटिंग करण्यातही ते पटाईत होते.

मुंबईत मटाचा जोर कायम आहे. मटाकडे यंगब्रिगेड चांगलीच आहे म्हणा.. दिवसेंदिवस हि यंगब्रिगेड अनेक आघाडीच्या ' जेष्ट ' पत्रकारांना टक्कर देत आहे. मटाने आपला ले-आउट पूर्णता बदललाय. सामन्याचे गजानन सावंत मटा ऑनलाईनला रुजू झाल्यापासून मटाच्या मुंबईच्या , सेनेच्या राजकीय गोटातल्या ' आतील ' बातम्या मध्ये आणखी भर पडली आहे. 

पुढारीतून सोडून गेलेले ' त्या ' पैकी एक महाराष्ट्र टाइम्स तर एकजण सामन्यात रुजू झालेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाच्या दिवशी सामनात इतरांप्रमाणेच अत्यंत शोकाकुल वातावरण होते. डेस्कवर हुंदके देत अनेक जन काम करीत होते. ' आपले साहेब गेले ' ह्या बातमीचे शीर्षकाकडे पाहून तेथील अनेकांच्या हृदयाची कोलाहल होत होती,  तर शिवसैनिकापर्यंत वेळेत सामन्याचा अंक जावा यासाठी अवघ्या ५ तासात सामना अंक " प्याकप " करण्यात आला. मागणी जास्त असल्याने जेणेकरून प्रिंटींगला वेळ ज्यादा जाणार हाच हेतू . 

मुंबई सकाळ आता लवकरच आपला ले-आउट पूर्णता बदलतंय. त्या संबधी एक मिटिंग हि झालीये. 

तिकडे रायगड मध्ये कृषीवलला बोनस नाही, काहींचे पगार नाहीत, काहींचे चेक बाउन्स... अश्या असंतोषाचे वातावरणामुळे  लवकरच भगदाड पडणार आहे. डेस्कवरच्या मंडळीनी कृषीवल सोडण्याचा निर्णय घेतलाय. वाट पाहतात ती योग्य संधीची. 

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रालयातील पत्रकार सज्ज झाले आहे. तर अनेकजन  ' विमान प्रवास ' कोणता आमदार घडवतोय का ? याची वाट पाहतायत.  

टीव्ही ९ ने मराठी मीडियात नामचीन होण्याचा चंगच बांधला आहे. एखाद्या स्टोरीसाठी अपार मेहनत घेतली जात आहे. नव्याने पारख करून  भरती झालेली मंडळी नक्कीच आपला करिष्मा दाखवतील. बुलेटीनची संख्याही वाढविली असून हिंदी बुलेटीन हद्दपार करण्यात आली आहे.  गांवकरीच्या श्रध्दा पवार टी.व्ही. 9 मध्ये...प्रिंट मीडियातील अनेकजण टी.व्ही.9 च्या वाटेवर..

' दिव्य मराठी मुंबईत येणार ..' अशा आशावाद मुंबईत अनेकांना आहे. पण ' दिव्य' मुंबईत येण्याची शक्यता तूर्तास तरी नाहीये. मुंबई, ठाण्याच्या मार्केटमध्ये पुण्यनगरीचा ' जलवा ' कायम आहे.

नारायण...नारायण...आम्ही पुन्हा येतोय...वाट पहा... 

लोकमतचे रवी गाडेकर दिव्य मराठीत...

औरंगाबाद - स्त्री भ्रूण हत्येसारखा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर आणणारे लोकमतचे उपसंपादक रवी गाडेकर हे लोकमतमधून दिव्य मराठीत जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तीन वर्षाहून अधिक काळ लोकमतमध्ये रवी गाडेकर कार्यरत होते. अचानक त्यांनी राजीनामा देऊन, दिव्य मराठीत जाण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या लोकमतमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी निर्माण झाली असून, या गटबाजीला कंटाळूनच गाडेकरांनी दिव्य मराठी जॉईन केल्याची सूत्रांची माहिती आहे. स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न सातत्याने मांडून प्रशासनच नव्हे तर सरकारचेही लक्ष्य त्यांनी या विषयाकडे वळवले होते. त्यानंतर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर स्त्री भ्रूण हत्या करणा-यांवर कारवाई सत्र सुरू झाले होते. गाडेकरांच्या या बातम्यांची दखल राज्यभर घेतली गेली होती हे विशेष. याच बातम्यांमुळे त्यांना एकाच वर्षात तीन पुरस्कार मिळाले. त्यात लाडली मीडिया ग्रुपच्या राष्ट्रीय पुरस्काराचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यात गाडेकरांना वाळूज कार्यालयाचे इन्चार्ज बनविण्यात आले होते. दिव्य मराठीने त्यांना चांगल्या पगाराची ऑफर दिली होती. एकीकडे लोकमतमध्ये गटबाजीमुळे होणारी कोंडी आणि दुसरीकडे एका राष्ट्रीय दैनिकात काम करण्याची संधी यामुळे गाडेकर यांनी लोकमतला राम राम ठोकला आणि दिव्य मराठीत जॉईन होण्याचा निर्णय घेतला. १ डिसेंबरपासून ते दिव्य मराठीच्या डीबी स्टारसाठी काम करणार आहेत.

दै.व्हिजन वार्ताच्या बेळगाव आणि सातारा आवृत्तीचे शानदार प्रकाशन


मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

'झी'च्या दोन संपादकांना अटक


नवी दिल्ली - कोळसा खाणपट्टे वाटपाच्या संदर्भात विरोधी बातम्या प्रक्षेपित न करण्यासाठी १00 कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून झी बिझनेस वृत्त वाहिनीचे संपादक समीर अहलुवालिया आणि झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांना मंगळवारी रात्री दिल्ली पोलिसांनी अटक केली. 'टीआरपी'च्या मागे झपाट्याने फोफावलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना अशा गुन्ह्यासाठी अटक होण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे.
काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टील अँण्ड पॉवर या कंपनीने दाखल केलेल्या फिर्यादीवर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. जिंदाल कंपनीने उलटे 'स्टिंग ऑपरेशन' करून विरोधातील बातम्या न देण्यासाठी हे संपादक जाहिरातींच्या पॅकेजच्या रूपाने १00 कोटींची मागणी करीत असतानाचे चित्रण केले होते. पुरावा म्हणून कंपनीने ही कॅसेट सादर केली होती. मात्र ही कॅसेट बनावट नसल्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे वैद्यक प्रयोगशाळेने दिल्यानंतर या संपादकांना अटक केली.
दोघांना बुधवारी दुपारी दोन वाजता साकेत येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
झीविरुद्ध फिर्याद.. 
१ जिंदाल कंपनीने झी वृत्त वाहिन्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे रीतसर फिर्याद दाखल केली असून, त्यात पुराव्यादाखल याच टेप सादर केल्या होत्या.
२जिंदाल कंपनीच्या फिर्यादीत झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी व झी बिझनेसचे प्रमुख समीर अहलुवालिया यांनी विरोधातील वृत्तमालिका थांबविण्यासाठी पैशांची सौदेबाजी केल्याचा आरोप जिंदाल कंपनीच्या फिर्यादीत केला गेला आहे.
----------------------------------------------------------------------------
झी समूहानेही आक्रमक पवित्रा घेऊन आमच्या बातम्यांनी घाबरून गेलेल्या जिंदाल यांनीच आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला. आम्हीच जिंदाल कंपनीला सापळ्यात पकडण्यासाठी त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे नाटक केले, असा प्रतिदावा केला आहे.
---------------------------------------------------------------------------
 प्राथमिक पुराव्यानुसार खंडणी व कट रचल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांची मंगळवारी चार तास कसून चौकशी केली. आमच्या प्रश्नांना दोघेही समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने त्यांना रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अटक केली. तत्पूर्वी दोघांना अटकेची कल्पना देण्यात आली होती.
- एस.बी.एस. त्यागी, डीसीपी, क्राइम ब्रांच 
----------------------------------------------------------------------------------------------
आरोप झाल्यानंतर ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने दोघाही संपादकांना पदाधिकारी तसेच सदस्यपदावरून काढून टाकले होते.
साभार : दै.लोकमत

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

'त्या' वादळातील काही कण...

मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सामनाचे माजी संपादकीय प्रमुख डॉ.अनिल फळे यांनी शिवसेनाप्रमुखांबद्दल सांगितलेल्या काही आठवणी पत्रकार मित्रवर आवश्य वाचा...
त्यासाठी क्लिक करा...
'पत्रकार मित्र'

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

हवाई सफरवरून दिव्य मराठी - लोकमतमध्ये युध्द पेटले

जळगाव - जळगावांत दिव्य मराठी आणि लोकमतमध्ये साप - मुंगूसाचे नाते आहे.गेल्या एक वर्षापासून उभयतांत शह - काटशहाचे राजकारण चालू आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिव्य मराठी आणि लोकमतमध्ये हवाई सफरवरून चांगलेच युध्द पेटले आहे.
जळगावात लवकरच सिल्व्हर जुबिली कंपनीच्या  वतीने विमान सुरू होणार आहे. त्यासाठी पाहणी करण्यासाठी कंपनीचे एक हेलिकॉप्टर काही दिवसांपुर्वी जळगावांत आले होते. आता हेलिकॉप्टरच आले म्हटल्यानंतर, त्याचे जणू भाडे वसूल करण्यासाठी कंपनीने एक फंडा वापरला. या हेलिकॉप्टरमधून 8 मिनिटांची जळगाव हवाई सफर केवळ 2700 रूपये ठेवली.श्रीमंत बापाच्या पोरांना हौस पुर्ण करण्यासाठी नामी संधी मिळाली.अनेकांनी मस्त एन्जॉय केला.

असो, ही सफर वृत्तपत्रांच्या संपादकांसाठी मात्र मोफत होती.मात्र सकाळ आणि लोकमतचे संपादकांनी त्याचा लाभ घेतला नाही.मात्र दिव्य मराठीचे निवासी संपादक, सरव्यवस्थापक,चिफ रिपोर्टर, आणखी दोन रिपोर्टर आणि दोन प्रेस फोटोग्राफर असे आठ- दहाजण बायकोसह हवाई सफर केली.हवाई सफर करताना वरून जळगाव शहराची मस्त छायाचित्रे टिपली.ही छायाचित्रे दिव्य मराठीत दि.23 नोव्हेंबर रोजी दिव्य सिटीत प्रसिध्द झाली. दिव्य मराठीने दिवे लावताच लोकमतचे इंडिकिटर लागले. ऋषीबाबूपर्यंत वार्ता गेली.ऋषीबाबूनी फैलावर घेतले,मग काय लोकमतने उलट्या बातम्या देणे सुरू केले आहे .लोकमतने 24 नोव्हेंबर रोजी हवाई सफरीत नियम धाब्यावर म्हणून लोकमत स्पेशल वार्ता दिली आहे.
दिव्य मराठीच्या संपादकांनी ऐकटे जायला हवे होते, मात्र सोबत अनेकांना नेले. ही चूक आहे.मात्र लोकमतला दिव्य मराठीची हवाई सफर रूचली नाही,हेही सत्य आहे.आता कोण बरोबर आणि कोण चूक,हे वाचक आणि चौकशी अधिकारी ठरवतील.मात्र हवाई सफरवरून पुन्हा एकदा दिव्य मराठी आणि लोकमतमध्ये युध्द पेटले आहे,हे नक्की...


दोन्ही पेपरमधील बातम्या वाचा 
 

दिव्य मराठी
लोकमत

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने यावर्षीपासून ज्येष्ठ संपादकाला पुरस्कार

मुंबई  - ज्येष्ठ व्यंगचित्रकार तथा दै. सामना, मार्मिक’चे संपादक आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने यावर्षीपासून राज्यातील एका ज्येष्ठ संपादकाला पुरस्कार दिला जाणार आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई येथील कार्यालयात गुरुवारी (ता. 22) झालेल्या  कार्रकारिणीच्या  बैठकीत हा निर्णय  घेण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या  निधनाने पत्रकारसृष्टीची मोठी हानी झाली आहे. बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून दरवर्षी राज्यस्तरीय  कार्यक्रमात एका ज्येष्ठ संपादकाला पुरस्काराचे वितरण केले जाईल. रोख 25 हजार रुपये , स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या  पुरस्काराचे स्वरूप असेल, असे ते म्हणाले.
बाळासाहेबांसारख्रा महान तथा झुंजार पत्रकाराला श्रद्धांजली अर्पण करण्रासाठी मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्र राज्य  तथा राज्याबाहेर जिल्हा मराठी पत्रकार संघाने आज  शनिवारी (ता. 24) शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहनही माधवराव अंभोरे, कार्याध्यक्ष किरण नाईक, सरचिटणीस सिद्धार्थ शर्मा आदींनी केले आहे.

मंदार फणसे यांचा वेब मीडियात प्रवेश

मुंबई - आय.बी.एन.-लोकमतमध्ये अनेक वर्षे वृत्तसंपादक म्हणून काम केल्यानंतर मंदार फणसे यांनी चार महिन्यापुर्वी राजीनामा दिला होता. पुढे फणसे कुठे जाणार,याकडे मीडियातील बोरूबहाद्दरांचे लक्ष वेधले होते .

फणसे यांनी कोणत्याही चॅनलमध्ये न जाता, आय.बी.एन.-लोकमत सोडून गेलेल्या काही सहकारी आणि रिपोर्टरना हाताशी धरून इंटरनेट न्यूज चॅनल सुरू केले आहे. http://bharat4india.com   असे त्यांच्या वेबसाईटचे नाव आहे.प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर आता वेब मीडियाला चांगले दिवस येत आहेत. मंदार फणसे यांनी काळाचे पाऊले ओळखूण वेब मीडियात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा...

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२

बारामतीत शहरात पुढारीच पुढारपण धोक्यात

बारामती - बारामतीत शहरात पुढारी पेपरच पुढारपण आता धोक्यात आल्याची
चिन्हे दिसत आहेत. बारामतीमधील वर्तमानपत्र विक्रेत्यांनी गेल्या 15
दिवसांपासून पुढारीचे अंक न उचल्याने ऐन दिवाळीत पुढारींनी आपले वितरण
प्रतिनिधीनाच स्टाॅल देऊन पुढारीची विक्री सुरू केली आहे. काही
महिन्यापूर्वी सकाळ चे अंक विक्रेत्यांनी टाकणे बंद केल्यावर सकाळला मदत
करण्यासाठी पुढारी वितरण विभागाने अंक वाढवले नाहीत. परंतु आता पुढारी
टाकणे विक्रेत्यांनी बंद केल्यावर सकाळ ने पुढारीला मदत करणे सोडाच परंतु
अंक वाढवून पुढारी वाल्यांना खिजवले आहे. त्यामुळे राज्यात सुरू असलेले
ऊसदर आंदोलनाच्या परखड बातम्या वाचकांपर्यंत पोचल्या नाहीत. या सर्व
कारभार पुण्यातील जोशीकाकांच्या ठाम भूमिकेमुळे सुरू झाल्याचे समजते.
जोशी काका पुढारी दोन रूपयाला असल्यावर 30 टक्के कमिशन देतात. तर तीन
रूपयाला अंक असल्यावर 25 टक्क्यावर बोळवण करतात. त्यामुळे विक्रेते चिडले
आहेत.
         बारामतीतील सक्षम संपादकीय माणुस नसल्याने पुढारीची बारामतीत
चांगलीच गोची झाल्याचे स्पष्ट होते. बारामती कार्यालयाच्या पिचकार्यांनी
रंगलेल्या भिंती व सुजलेला चेहरा घेऊन संगणावर बोटे चाळवत असलेल्या
टायपिस्टवर महाराष्ट्राच्या राजकीय राजधानीतील बातम्या देण्याचा भार
टाकण्यात आल्याने बारामतीच्या सडेतोड बातम्या पुढारीत वाचायला मिळत
नाहीत. पूर्वीचे काका कार्यालयात आठवड्यातून एक दोन वेळाच येत असतात.
मात्र त्यांना का प्रश्न कोणी विचारायला तयार नाही. पुढारीच्या काही
बातमीदारांना आता स्वातंत्र्य मिळाल्याने बारामती पेक्षा खेड्यापाड्यातील
बातमीदारांच्या बातम्या चांगल्या असतात.पुण्यावरून बातमीदारांना सतत ताप
देणारे संपादकीय मंडळीचा वरदहस्त बारामतीतील संगणकाच्या किबोर्ड खडखड
करणार्या बोटांना आहे. असे बोलले जात आहे. यथेच्छ जेवणावळी ओल्या
पार्ट्या करून हवे त्या बातम्या लावण्याची बारामतीतील पुढारीची प्रथा
जूनीच परंतु ही परंपरा आता एका टायपिस्टवर आल्याने पुढारीचे पुढारपण
धोक्यात आले आहे. आता यावर पद्मश्री काय उपाय योजतात. हे देवच जाणे...

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

वेब मीडिया असोसिएशनची लवकरच स्थापना

औरंगाबाद - प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर आता वेब मीडिया उदयास आला आहे. येत्या काही दिवसांत वेब मीडिया चांगला हंगामा करेल, अशी चिन्हे दिसत आहेत.म्हणून आता अनेक जिल्ह्यात ऑनलाईन न्यूज पेपर सुरू झाले आहेत.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची जशी संघटना आहे, तशीच वेब मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची संघटना असावी, असा विचार पुढे आला आहे.त्यादृष्टीने  पाऊले उचलण्यात आली आहेत .त्याकरिता महाराष्ट्र पातळीवरील वेब मीडिया असोसिएशनची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे.
वेब मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण देणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे,शासन दरबारी मागण्या मांडणे आदी हेतूने ही असोसिएशन स्थापना करण्यात येणार आहे. या असोशिएशनचे सदस्य होण्याकरिता औरंगाबाद न्यूज लाइव्हचे मुख्य संपादक मनोज सांगळे ( मो.9049313465 ) आणि  बीड लाइव्हचे  मुख्य संपादक प्रा. गणेश पोकळे मो. ९५२७८१५१५१, ९५५२५५६३९७ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीकांत पवार, राहूल बागमार,सुनील बनसोडे यांनी केले आहे.

पत्रकारांना कुणी घर देता का घर?


पुणे श्रमिक पत्रकार म्हणजे वर्तमानपत्राच्या गळेकापु स्पर्धेत स्वत:ला सदैव सज्ज ठेवत समाजाची हीताची पत्रकारिता करणारा पत्रकार ! पुणे श्रमिक पत्रकार अशीच भुमीका यथाशक्ती यथामती सतत पार पाडीत असतात.त्यासाठी त्यांनी कधीही कोणत्याही लोभाची अपेक्षा ठेवली नाही.कुणाचीही मुलाहीजा न ठेवल्याने उलट बिल्डरलॉबी,सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते यांची त्यांनी नाराजी ओढवुन घेतली आहे.वर्तमानपत्रांना मिळायच्या त्या जाहीराती मिळत गेल्या.पण पत्रकारांचा गृहप्रकल्प टांगता आजवर कुणी ठेवला आहे?पत्रकारांना घर मिळायची शेवटची आशा होती ती आताही धुळीला मिळाल्याची वंदता आहे.या जागेवर सरकारी संस्थेने हक्क बजाविला आहे.सत्य कोणालाच नकोय का?समाजात तळागाळाची समस्या मांडणारा पत्रकार आपली कुठेच समस्या मांडु शकत नाही .यात सामान्य पत्रकारांना कुणी घर देता का घर अशी म्हणायची वेळ आली आहे.सत्य मांडलय याची किंमत पत्रकार भोगत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काय?
-  एक वार्ताहर

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१२

वृत्तवाहिनीच्या पत्रकारांचा कारनामा ; सेक्स टेपच्या आडून वीस लाखांची मागणी

नवी दिल्ली - देशातील दोन प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवर सेक्स टेपच्या नावाखाली एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दक्षिण दिल्लीच्या एका गॅरेज मालकाने इंडिया टीव्हीच्या पत्रकार भूमिका शर्मा आणि एबीपी न्यूजचे प्रदीप श्रीवास्तव यांनी एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याचा खटला दिल्लीतील एका कनिष्ठ न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने खटला दाखल करुन घेत, पोलिसांना  या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी पत्रकारांविरोधात गुन्हा नोंदवला असून तक्रारदार विजयकडून मिळालेल्या टेपची सत्यता पडताळून पाहाण्यासाठी, ती टेप फॉरेंन्सिक लॅबमध्ये पाठवली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार यात आणखी एक पत्रकार गुंतला असण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१२

दिव्य मराठीची कासवगती...

औरंगाबाद - एका बाजूला उशिरा का होईना महाराष्ट्र टाइम्सने महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या इडिशन सुरू केल्या असताना, प्रिंट मीडियात वादळ निर्माण करणा-या दिव्य मराठीची वाटचाल कासवगतीने चालू आहे. ससाच्या वेगाने धावणा-या भोपाळशेठची वाटचाल अचानक कासव गतीने सुरू का झाली,याचे कोडे तमाम बोरूबहाद्दरांना पडले आहे.

मार्च २०११ मध्ये भोपाळशेठने औरंगाबादेत पाऊल ठेवले आणि महाराष्ट्राच्या प्रिंट मीडियात मोठे वादळ निर्माण झाले.प्रस्तापित म्हणणारे लोकमत,सकाळ ग्रुपसुध्दा हादरला.लोकमत,विशेषत: सकाळची अनेक माणसे फोडून, भोपाळशेठने हादरा दिला.औरंगाबाद पाठोपाठ नाशिक, जळगाव,नगर नंतर सोलापूर इडिशन सुरू झाली.मात्र औरंगाबादला दीड वर्षापुर्वी प्रथम आवृत्ती सुरू झालेली अजनूही मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पोहचलेली नाही.नांदेड, लातूर,परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यात अजूनही दिव्य मराठीचे दिवे लागलेले नाहीत.नगर आवृत्ती सुरू होवून एक वर्षे झाले तरी, नगर जिल्ह्यात अजूनही अंक पोहचलेला नाही.
अकोला इडिशनचा सव्र्हे झालेला असला तरी प्रत्यक्षात अजूनही इडिशन सुरू झालेली नाही.कोल्हापूरची नुसतीच हवा चालू आहे.दिव्य मराठीच्या अगोदर महाराष्ट्र टाइम्सने आपले पाय रोवले आहेत.पाठोपाठ डॉ.रावसाहेब मगदूम यांच्या व्हिजन वार्तानेही चांगलीच हवा निर्माण केली आहे. त्यामुळे दिव्य मराठीची चांगलीच कोंडी निर्माण झाली आहे.
दिव्य मराठीची औरंगाबाद इडिशन चांगली चालू असली तरी, नाशिक, जळगाव आणि सोलापूर इडिशन म्हणाव्या तशा झेप घेतलेल्या नाहीत.त्यामुळे भोपाळशेठ रूष्ठ झाल्याचे कळते.त्यामुळे स्टेट इडिटर अभिलाष खांडेकर हतबल झाल्याचे समजते.

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२

बेरक्याने घडविला इतिहासावर इतिहास...

औरंगाबाद  -बेरक्या उर्फ नारद ब्लॉग 21 मार्च 2011 रोजी सुरू झाला.जुन्या ब्लॉगची आकडेवारी 3 लाख 34 हजार 656 आहे. तर नव्या ब्लॉगची 3 लाख 58 हजार आहे. म्हणजे जवळपास 7 लाख हिटस् मिळाल्या आहेत. हा मराठी ब्लॉग विश्वात एक इतिहास आहे.हे केवळ आपणामुळेच शक्य झाले.'
बेरक्या उर्फ नारद नव्या ब्लॉगने 3 लाख 59 हजार हिटस् चा टप्पा पार केला असला तरी मोबाईलवरील हिटस् ची आकडेवारी येथे गृहीत नाही.शिवाय एका व्यक्तीने दिवसभरात शंभर
वेळा ब्लॉगला भेट दिली तरी, 24 तासात एकच आय.पी.अॅड्रेस गृहीत धरून एक हिटस् पकडली जाते. तसेच हा ब्लॉग केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशातही वाचला जातो. काय सांगते ही आकडेवारी...खालील आकडेवारी नविन ब्लॉगची आहे.
India  
1134982

United States
21319

United Kingdom
3765

France
1848

Singapore
1527

Sweden
1072

Russia
885

Germany
537

United Arab Emirates
301

Philippines
178

फेसबुक वर शेअर करा

Facebook