> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

अतिरेकी पञकारितेचा दहशतवाद

याकूबला झालेली फाशी आणि त्या निमित्तानं वृत्तवाहिन्यांनी केलेला नंगानाच आपण सगळ्यांनी पाहिला. यावर सोशल मीडियात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये तीव्र संताप आहे.
खरंतर कसाबची फाशी सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली नाही याचं वृत्तवाहिन्यांना बरंच शल्य होतं. म्हणून याकूबची संधी सोडायची नाही, असा जणू चंगच चॆनेलवाल्यांनी बांधला होता. 
मग काय? सुरु झालं, फाशीचं सुपरफास्ट कव्हरेज.
राञभर हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्यांच्या डोळ्याला डोळा नव्हता. फाशी देणार हे जाहीर होताच यांच्या नाकात जणू वारं भरलं आणि त्यानंतर यांनी सात- आठ तास जो काही ब्रेकिंगचा हैदोस घातला, तो पञकारितेला शरमेनं मान खाली घालायला लावणारा होता.
भल्या पहाटेपासून तुमच्या आमच्या TV वर ब्रेकिंग आदळायला लागल्या.
"फाशीची सगळी तयारी पूर्ण... थोड्याच वेळात याकूब फासावर लटकणार"
"याकूब दोन दिवसांपासून उपाशी"
"याकूबने आज नाश्ता केला"
"याकूबने कुराण वाचलं, नमाज अदा केली"
" अखेर याकूबला फासावर लटकवलाच"
" याकूबला अर्धातास फासावर लटकतच ठेवणार"
" अखेर याकूब मृत घोषीत, आता पोस्टमॉर्टेम"
"याकूबच्या फाशीचं शुटिंग केलं"
"याकूबचा मृतदेह विनामतळाकडे रवाना, थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार" वगैरे वगैरे वगैरे...
TRP च्या नशेत बेधुंद झालेले हे लोक कव्हरेज करताना आपण ते कुणासाठी करतोय? कुणाची बातमी देतोय? कशी देतोय? कशासाठी देतोय? त्यातून समाजमनावर काय परिणाम होतोय? याचं कसलंही भान त्यांना नव्हतं... होती ती फक्त स्पर्धा... सगळ्यात पुढे राहण्याची...
याकूबच्या बातमीचं कव्हरेज करताना चेकाळलेल्या वृत्तवाहिन्यांनी काही दिवसातच समाजाचं प्रचंड मोठं नुकसान केलं. थुतराट स्पर्धेपायी अप्रत्यक्षपणे समाजात दूही पसरवण्याचं पाप केलं. एवढंच नाही तर या अर्धवटरावांनी पञकारितेच्या मुल्यांना आणि लोकांच्या विश्वासाला पायदळी तुडवत पञकारितेलाच शरमिंदा केलं.
याकूबनं फासावर जाण्याआधी कुराण वाचलं, नमाज अदा केली ही ब्रेकिंग देऊन यांना काय साधायचं होतं? ही बातमी दिल्यावर कुराणावर श्रद्धा व्यक्त करणाऱ्यांच्या मनात याकूबबद्दल काय भावना निर्माण होईल, याचा एकदाही मनात विचार आला नसेल? आपण दाखवतोय त्याचे समाजाच किती गंभीर आणि खोलवर दूरगामी परिणाम होतात याची साधी जाणीवही नसावी, हे स्वत:ला पञकार म्हणवून घेणाऱ्यांसाठी लांच्छनास्पद आहे.
याकूबला अर्धातास फासावर लटवतच ठेवणार ही ब्रेकिंग न्यूज होती. कशासाठी? त्याला खायला दिलं, आंघोळ घातली, कपडे दिले, केक दिला हे सगळं सगळं सांगितलं जात होतं आणि सगळा देश हे घरात बसून बघत होता.
फिल्डवर तर पञकारांनी कहरच केला. याकूबला फाशी झाल्यानंतर त्याच्या भावांचा "बाईट" घेण्यासाठी जे पाठलाग करून छळलं जात होतं ते संतापजनक होतं. ते दोघे हात जोडून विनंती करत होते. "प्लिज आम्हाला एकटं सोडा, आम्हाला काहीही बोलायचं नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर, अल्लावर पूर्ण विश्वास आहे." पण ऐकतील ते पञकार कसले? सांगा! बोला! काही तरी बोला! असा धोशा सुरुच होता. समजा उद्या या पञकारांच्या भावालाच जर काही तासात फाशी दिली जाणार असेल तर अशावेळी ते काय बोलतील? काय प्रतिक्रिया देतील? किती हा असंवेदनशीलतयपणा?
फाशीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉटेलमधून बाहेर आलेल्या दोन भावांच्या चेहऱ्यावर काय भावना होत्या असा प्रश्न एँकर रिपोर्टरला विचारत होता. 
याकूबचा मृतदेह घेऊन जाणारी अँम्ब्यूलन्स दिसताच रिपोर्टर अक्षरश: तुटून पडले, राञी गाडीच्या मागे कुञे धावतात तसे. एम्ब्युलन्सच्या काचांवर आदळणारे आणि आतल्या मृतदेहाला जवळून शूट करण्याचा प्रयत्न करणारे चॅनेलवाल्यांचे कॅमेरे म्हणजे किळसवाणा प्रकार होता.
याकूबच्या मृतदेहाला तुरुंगापासून फॉलो केलं जात होतं. एका नंबर वन वृत्तवाहिनीच्या बड्या पञकारांनी तर लाजच आणली. हे महाशय थेट विमानात घुसले. याकूबचे भाऊ विमानातून मुंबईला कसे येत आहेत, हे सांगत सुटले. त्यांच्या शोध पञकारितला खरोखर सलाम. हे सगळं पाहून घरातल्यांची सर्वसामान्य भावना होती, अरे कोणीतरी आवरा रे यांना. मृतदेह कसा येणार, कुठून येणार, कधी येणार याची प्रत्येक अपडेट मिळत होती.
इकडे मुंबईत परिस्थिती सामान्य होती. सगळं काही सुरळीत सुरु होतं. ते कोणीच दाखवलं नाही. उलट रॅपिड अॅक्शन फोर्सच्या गाड्या कशा तैनात केल्या जाताहेत हेच वारंवार दाखवलं जात होतं. जणू कुठल्याही क्षणी दंगल भडकेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आभास TVतून होत होता. हे खरोखरंच भीषण होतं.
इकडे बडा कब्रस्तानमध्ये तर पञकारांची आणि त्यांच्या ओबी व्हॅन्सची जञाच भरली होती. याच बडा कब्रस्तानमध्ये याकूबला कसं दफन केलं जाणार, याचं रसभरीत विश्लेषण केलं जात होतं. काही चॆनेल्सनी तर दिल्लीहून खास कबरस्तानात मेकअप करून अँकर उतरवल्या होत्या. हे सगळं उबग आणणारं, कोणत्याही विवेकी माणसाला अस्वस्थ करणारं, चीड आणणारं होतं..
या बेताल नंगानाचात वेगळी वाट निवडली ती एरवी आक्रस्ताळेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या टाईम्सनं. त्यांनी आश्चर्यकारकरित्या योग्य संयम बाळगला. कठोर निर्णय घेतला. त्याचं खरंच कौतूक आहे. इकडे मराठीतलं सनसनाटी चॅनेल अशी ओळख असलेल्या टीव्ही नाईननं आम्ही देशद्रोह्याची बातमीच दाखवणार नाही असा वेगळाच बाणा दाखवला. याची प्लेट चालवून त्याचंही वेगळं मार्केटिंग केलं. पण तरीही या बेताल गर्दीत ते वेगळे वाटले. म्हणून हजारो लोकांनी त्यांच्या भूमिकेचं कौतूक केलं.
एकीकडे या दोन चॅनेल्सचं ट्विटर, फेसबूक, वॉट्सअॅप या सोशल मीडियावर कौतूक होत होतं तर दुसरीकडे याकूबच्या बिभत्स, बिनडोक कव्हरेजवरून इतर चॅनेलवाल्यांची फूल टू धुलाई सुरु झाली होती. या सगळ्यांचं वस्ञहरण सुरु झालं, तेव्हा कुठे ही मंडळी थोडी भानावर आली. मग त्यांना डॉ. कलाम यांच्या अंत्यविधीच्या बातमीची आठवण झाली. त्यातच मुंबई पोलिसांचं उशीराचं शहाणपण अर्थात अॅडवायझरी आली. त्यानंतर त्यांना बोऱ्याबिस्तरा उचलावा लागला. त्यामुळे आपल्या सुदैवानं याकूबला कसं कबरमध्ये टाकलं हे चॅनेलवाल्यांना शूट करता आलं नाही. तरी काहीजणांनी याकूबच्या अंत्यविधीतले गर्दीचे फोटो दाखवण्याचा निर्लज्जपणा केलाच.
अशा प्रकारे चॅनेलवाल्यांनी फाशी सेलिब्रेट केली. याकूबची महायोद्ध्यासारखी बित्तंबातमी दाखवून एकप्रकारे त्याला हिरो केला. त्यातून याकूबला विनाकारण सहानुभूती मिळाली. या गदारोळात मुस्लिम तरूण दुखावला गेला. दोन समाजात द्वेशाची बीजं पेरली गेली, हे नाकारता येणार नाही.
खरंतर याकूबच्या फाशीची बातमी आलेल्या दिवसापासूनच चॅनेलवाले भानावर नव्हते. सत्तेच्या खुर्चीसाठी प्रेतांवर राजकारणाचे डाव मांडणारे, फुटकळ प्रसिद्धीसाठी मिरवणाऱ्या बिनडोक माथेफिरूंचे बाईट घेऊन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुच होता. त्याला अनावशक प्रसिद्धी दिल्यानं वेगळं वातावरण तयार झालं. दुर्दैवाची बाब ही की, याकूबच्यापुढे यांना कलामही खुजे वाटले असावेत कदाचित. कारण ते आम्हाला अधुनमधूनच दिसले. यातच या माध्यमांचं बौद्धिक खुजेपण दिसून आलं. हे सगळं करणारे पञकार कुठलं जर्नलिझम करताहेत हेच कळत नाही. आता ज्यांनी कंबरेचं काढून डोक्याला गुडाळलंय त्यांना नैतिकता सांगायची कुणी आणि कशी हा प्रश्न आहे.
यांना सालटून काढलं की, हा व्यवसाय आहे, यात अर्थकारण आहे, इथं स्पर्धा आहे अशी नेभळत कारणं सांगितली जातील. पण असं असेल तर इथूनपुढे माध्यमांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला म्हणू नका. आमच्या धंद्यावर झालेला हल्ला म्हणा. मग इतरांना उपदेशाचे आणि तत्वज्ञानाचे डोस पाडण्याच्या भानगडीत पडू नका. पतीव्रतेचा आव तर आणूच नका.
लोकांची चामडी सोलून काढता काढता यांची संवेदना त्या अतिरेक्यांइतकीच बोथट झालीय. काही माणसांना मारून दहशत पसरवणं, समाजात दुही माजवणं हा दहशतवाद्यांचा हेतू असतो. आज माध्यमांचा हा अतिरेक फक्त माणसं मारत नाही इतकंच.
- एक प्रेक्षक

गुरुवार, २३ जुलै, २०१५

'रंगीला औरंगाबादी'ने रिपोर्टरला वाऱ्यावर सोडले ...

मुंबई : मीरा रोड मध्ये डान्सबार वाल्यांनी केलेल्या मारहाणीत एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या घटनेची बातमी दैनिक पुढारीने आपल्या मुंबई आवृत्तीत अगदी पाहिल्यापानावर हेडिंगला छापली होती. दरम्यान, दैनिक पुढारीचे रिपोर्टर नरेंद्र राठोड यांनी डान्सबार विरुद्ध झापलेल्या बातमीबद्दल राग आल्याने चक्क पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यानेच राठोड यांना तू रोज कुठल्या रस्त्याने जातो, कधी जातो याची माहिती घेवून त्या फोन कॉलची रेकॉर्डिंग करून ती एका डान्सबार मालकाला पाठवली. पोलिस जनसंपर्क अधिकार्याने केलेली ही रेकॉर्डिंग सोशल मिडियावर व्हायरल होताच मुंबई, ठाण्यातील सर्व पत्रकारांनी व संघटनांनी या घटनेचा निषेध केला.
या घटनेची बातमी बहुतेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली. मात्र मीरा रोडच्या हत्येची बातमी पहिल्या पानावर छापनाऱ्या पुढारीनेच आपल्या रिपोर्टर सोबत घडलेल्या प्रकारची एक ओळही बातमी छापली नाही. पुढारीचे रंगीला औरंगाबादी हे आपल्या पत्रकारांना पाठींबा देण्यासाठी सदैव पुढे असतात अशी पत्रकारिता क्षेत्रात आख्यायिका प्रसिद्ध आहे. मग त्यांनी आपल्याच रिपोर्टरला वाऱ्यावर का सोडले ? याबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहे .

.................

ठाणे - दैनिक पुढारीचे रिपोर्टर नरेंद्र राठोड यांचे फोन रेकॉर्ड करून डान्सबार मालकाला पाठवणाऱ्या पोलीस जनसंपर्क अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व पत्रकारांच्या फोन टपिंगचा जो प्रकार पोलिसांकडून सुरु आहे तो बंद करावा या मागणीसाठी ठाण्यातील सर्व पत्रकार संघांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी फोन टपिंगच्या झालेल्या प्रकारचा निषेध करीत राठोड यांच्या सुरक्षेची मागणी देखील पत्रकारांनी केली.
 

मंगळवार, २१ जुलै, २०१५

ठाणे पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा प्रताप

डान्सबार विरुद्ध बातमी प्रसिद्ध केली म्हणून पोलिसांकडूनच पत्रकारांची रेकॉर्डिंग

ठाणे : डान्स बारवर पडलेल्या छाप्याची बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकाराला डान्सबार वाल्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच डान्सबार विरुद्ध बातमी प्रसिद्ध का केली याची फोन वरून विचारणा करतांनाच त्या फोनची रेकॉर्डिंग करून ग्रुपवर टाकण्याचा प्रताप चक्क ठाणे पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने केला आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्या रस्त्याने जातात? कधी जातात? अशी सगळी माहिती संबंधित पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्याने संबंधित पत्रकाराकडून घेतल्याने व ती सर्व माहिती रेकॉर्ड केल्याने ही रेकॉर्डिंग नेमकी कुणाला पाठवण्यात येणार होती? असा सवाल उपस्थित होत आहे.
दैनिक पुढारीचे क्राईम रिपोर्टर नरेंद्र राठोड यांनी २० जुलै रोजी शिळडायघर मध्ये छमछम पुन्हा जोरात या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याच शिळडायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसापूर्वी एका डान्सबार वर पडलेल्या छाप्यात एक डायरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हाती लागली होती. त्या डायरीत पोलीस हप्ते घेत असल्याची नोंद आढळून आली होती. याची दखल घेवून ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी तब्बल ५८ पोलिसांच्या मुख्यालयात बदली केली होती. या कारवाई नंतर देखील बार पुन्हा सुरु झाल्याचे सविस्तर वृत्त संबंधित बातमीत प्रसिद्ध करण्यात आला होता. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ठाणे पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी गजानन काब्दुले यांनी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता फोन केला आणि बार विरुद्ध बातमी प्रसिद्ध का केली याबाबत जाब विचारला. इतकेच नव्हे तर संबंधित पत्रकार कुठल्या रस्त्याने घरी जातो, किती वाजता जातो अशी सविस्तर माहिती घेवून त्याची रेकॉर्डिंग केली व ती एका ग्रुपवर टाकली. मात्र ही रेकॉर्डिंग चुकून पत्रकारांच्याच ग्रुपवर पडल्याने जनसंपर्क अधिकाऱ्याचा बनाव उघड झाला. पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्याने संबंधित पत्रकाराला तू कार्यालयातून कधी जातोस, किती वाजता जातोस, कोणत्या रस्त्याने जातोस? असे विचारण्याचे कारणच काय ? आणि ते ही रेकॉर्डिंग कोणाला पाठवणार होते याबाबत सवाल उपस्थित होत आहे. मात्र मीरा रोडची पत्रकार हत्येची घटना ताजी असतांनाच असा धक्कादायक प्रकार दस्तुरखुद पोलीस अधिकाऱ्याकडून झाल्याने या घटनेचा सर्व पत्रकारांनी निषेध केला आहे.

बेरक्याचा दणका : नव जागृतीच्या कर्मचा-यांना पगाराचे वाटप सुरू

बेरक्याच्या दणक्यानंतर नव जागृतीचे राज गायकवाड पुन्हा एकदा वठणीवर आले आहेत.मंगळवारी दुपारी त्यांनी पुण्यातील कल्याणीनगरमधील नव जागृतीच्या ऑफीसमध्ये कर्मचा-यांची बैठक घेवून,पगार देण्याबाबत विलंब झाल्याबद्दल माफी मागितली. चूक झाली आणि अशी चूक पुन्हा होणार नाही अशी  ग्वाही त्यांनी दिली. जे झाले ते विसरा आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी  केले  त्याचबरोबर यापुढे पगार ठरलेल्या तारखेला होतील,अशी ग्वाही दिली.

त्याचबरोबर खालील आश्वासने दिली...


१) कर्मचा-यांचा  मेअखेर पगार बुधवार आणि गुरूवार (दि.२२ आणि २३ जुलै)पर्यंत होतील.नाही झाल्यास पुन्हा विश्वास ठेवू नका...
(८० टक्के कर्मचा-यांना एप्रिलचा आणि ३० कर्मचा-यांना  मे चा पगार मिळालेला आहे)

२) जूनच्या पगाराबाबत कर्मचा-यांना पोस्ट डेटेड चेक वाटप करण्यात आले असूून,त्यावर १६ ऑगस्ट तारीख टाकण्यात आलेली आहे...

३) चॅनल १५ ऑगस्टपासून पुर्ववत सुरू होईल,ज्यांचा विश्वास आहे त्यांनी पुन्हा कामावर ज्वाईन व्हावे आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी राजीनामा देवून जुलैचा पोस्ट डेटेड चेक घेवून जावा...

> केवळ बेरक्याने कर्मचा-यांची पाठराखण केल्यामुळे कर्मचा-यांना मे अखेर पगार मिळाला आहे.हा कामगार एकजुटीचा आणि बेरक्याच्या बातम्यांचा दणका आहे.
- आता पाहू या पुढे काय होते ते...सर्व अपडेटस् आपणास पुन्हा मिळतीलच...

भंपक पत्रकारांची शाई 'वाळली' का ?

माझी 'शेळीचे कलम 420' ही कादंबरी येणार आहे आणि त्यातील हा सारांश असे सांगणाऱ्या एका भंपक पत्रकाराला दीड लाख रूपये मिळताच त्यांची शाई वाळली का,असा प्रश्न नव जागृतीचे कर्मचारी विचारत आहेत....
नव जागृतीच्या मालकाने वरिष्ठांना हाडूक टाकून त्यांना गप्प केले असले तरी,बेरक्या गप्प बसणार नाही.
सर्व कर्मचाऱ्यांना आणि स्ट्रींजरचा जून अखेर पगार झालाच पाहिजे आणि अचानक चॅनल बंद केल्यामुळे तीन महिन्याचा पगार दिला पाहिजे,ही कर्मचाऱ्यांची भूमिका आहे, आणि या भूमिकेला बेरक्याचा पाठींबा आहे...


...............

'जागृती फुड्स' च्या नावाखाली हजारो गुंतवणूकदरांना कोट्याधीश बनण्याची स्वप्न दाखवणारे आणि चॅनलच्या माध्यमातून थेट पत्रकारांनाच ठकवणारे राज गायकवाड यांनी स्वत;चे बिंग फुटू नये यासाठी नवी "आयडियाची कल्पना". 
विरोधात तसेच भांडाफोड करणाऱ्या बातम्या येऊ नये म्हणून सरळ काही मराठी न्यूज चॅनलवर जागृती अग्रो फूडच्या जाहिराती झळकवायला सुरुवात...

.............

नव जागृतीच्या राज गायकवाड यांनी आपली वाकडी चाल अजूनही सोडलेली नाही.सोमवारी कर्मचा-यांचे आणि स्ट्रींजरचे पेमेंट केले जाईल असे आश्वासन दिलेल्या गायकवाडांनी सोमवारी काही मोजक्याच कर्मचा-यांचे पेमेंट केले आणि अन्य कर्मचा-यांना ताटकळत ठेवले आहेत.
बिचारे कर्मचारी अजूनही आशेवर आहेत,परंतु खोटी कारणे सांगून गायकवाडांनी त्यांची जीवाशी खेळणे सुरू ठेवले आहे.
अनेक कर्मचा-यांना अजूनही एप्रिल,मे आणि जून महिन्याचे पेमेंट मिळाले नाही.काही ना एप्रिलचे मिळाले आहे.त्यांच्यात फुट पाडण्याचा कुटील डावही गायकवाड खेळत आहेत.
दरम्यान नव जागृती चॅनल बंद पडल्यामुळे जागृती अ‍ॅग्रो फुडस्मध्ये पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहे.आपले पैसे परत मिळावावेत म्हणून ते सांगलीत ठाण मांडून आहेत.
ज्यांचे पैसे जागृती अ‍ॅग्रो फुडस्मध्ये अडकले आहेत,त्यांनी पोलीसांत सरळ तक्रार द्या,तसेच राज्याच्या आर्थिक फसवणूक विभागाकडे तक्रार नोंदवा.त्याचबरोबर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे निवेदन पाठवा...

...................

बेरक्याचा फेसबुक Account आणि ई मेल हॅक करण्याचा अयशस्वी प्रयत्न सांगलीत करण्यात आला.असे कितीतरी अयशस्वी प्रयत्न यापुर्वी झालेले आहेत.
सांगलीत एक चिटफंड कंपनी आहे.या कंपनीचे वतीने पुण्यात न्यूज चॅनल चालवण्यात येत होते.मात्र सहा महिन्यातच चॅनल बंद पडले .. कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे पेमेंट मिळाले नव्हते तसेच अनेक देणी थकली आहेत म्हणून डबा गुल झाला .. 
या चॅनलमध्ये जवळपास 70 कर्मचारी आहेत.10 ते 12 लोचट कर्मचारी सोडले तर सर्व मालकांच्या विरोधात गेले आहेत.त्यात आय.टी.टीम मालकांचे पाय चाटते म्हणे.त्यांनीच हा उद्योग केला असावा असा आमचा संशय आहे.
अरे मुर्खानो,तुमच्यासारखे आय.टी.शिकणारे किती तरी बेरक्याने कोळून पेले आहेत.असा धंदा यापुढे केला तर बेरक्या तुम्हाला पुरून उरल्याशिवास राहणार नाही,हे ध्यानात घ्या ....
थू तुमच्या लोचटपणावर...

हाच तो अलर्ट मेसेस...
Hi बेरक्या उर्फ,
Your Facebook password was reset using the email address berkya2011@gmail.com on Saturday, July 18, 2015 at 8:37pm (UTC+05:30). 
Operating system: Windows
Browser: Chrome
IP address: 117.200.216.84
Estimated location: Sangli, MH, IN
  

शुक्रवार, १७ जुलै, २०१५

गायकवाडांचा खोटारडेपणा उघड


नव जागृती चॅनलच्या संदर्भात बेरक्यावर वारंवार बातम्या झळकल्या आहेत.दोन बातम्यावर मालक राज गायकवाड यांनी कमेंट लिहिली आहे.त्यात म्हटले आहे की,सर्व कर्मचारी आणि स्ट्रींजरचे एप्रिल आणि मेचे पेमेंट आज जमा करत आहेत.पंरतु गायकवाड किती खोटे बोलतात,हे पुन्हा एकदा सिध्द झालेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना एप्रिलच्या पगारापोटी पाच हजार अॅडव्हान्स देण्यात आले होते.उर्वरित रक्कम काही मोजक्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.सर्व कर्मचाऱ्यांना पेमेंट न देता केवळ मोजक्या कर्मचाऱ्यांना देवून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा डाव रचण्यात आला.परंतु ज्यांना पेमेंट मिळाले,तेही आंदोनलात सहभागी झालेले आहेत.स्ट्रींजरला तर दमडाही मिळाला नाही.मोजक्या कर्मचाऱ्यांना तेही एप्रिल महिन्याचे उर्वरित पेमेंट देण्यात आले आहे.जवळपास 70 कर्मचारी असताना,मोजक्या कर्मचाऱ्यांना तेही एप्रिलचे उर्वरित पेमेंट देण्यात आलेले आहे.
सर्व कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा उर्वरित पगार,मे,जून आणि जुलैचा पुर्ण पगार आणि पुढील 3 महिन्याचा पगार देण्यात यावा,यासाठी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत.स्ट्रीजरचाही एप्रिल,मे आणि जूनचे पेमेंट मिळाले नाहीत.तेही कर्मचाऱ्यांच्या आंदोनलास पाठींबा देत आहेत.
राज गायकवाड,अश्या खेळ्या करून कधीच यशस्वी होणार नाहीत.तुमचा खोटेपणा पुन्हा एकदा सिध्द झालेला आहे.तुमच्या शब्दावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही,असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

नव जागृतीच्या कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने

पुणे - नव जागृतीच्या कर्मचाऱ्यांनी थकीत तीन महिन्याचे पेमेंट मिळावे,यासाठी शुक्रवारी तोंडाला काळ्या फिती लावून मूक निदर्शने केली.त्यांच्या या आंदोलनानंतर मालक राज गायकवाड यांना जाग येणार का,याकडं लक्ष वेधलं आहे.
नव जागृतीचे मालक राज गायकवाड यांच्या शब्दावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही.त्यांनी अनेक तारखा दिलेल्या आहेत.जोपर्यंत एप्रिल,मे आणि जून चे पेमेंट बँक खात्यावर जमा होणार नाही,तोपर्यंत लढा सुरू राहील,असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
चॅनलचे मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी आपण कर्मचाऱ्यांबरोबर असल्याचे सांगितले.कर्मचाऱ्यांच्या लढ्यास त्यांनी उघड पाठींबा दिला.

गुरुवार, १६ जुलै, २०१५

नव जागृतीच्या गायकवाडांविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुणे - नव जागृतीसाठी रात्रंदिवस मेहनत करूनही कामाचा मोबादला न देता,चॅनल बंद करणा-या राज गायकवाड यांच्याविरूध्द काही रिपोर्टरंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ई-मेद्वारे तक्रार केली आहे.त्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून,हे प्रकरण चौकशीसाठी लेबर कमिशनरकडे सोपवण्यात आले आहे.
नव जागृती चॅनल जानेवारी २०१५ मध्ये सुरू झाले होते.राज्यातील अनेक रिपोर्टरंनी चांगल्या बातम्या आणि स्टो-या देवून हे चॅनल नावारूपास आणण्याचा प्रयत्न केला.मात्र मालक गायकवाड यांनी त्यांचे पेमेंटच दिले नाही.एप्रिल,मे आणि जूनचे पेमेंट वारंवार मागणी करूनही न दिल्यामुळे यासंदर्भात काही रिपोर्टरनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे तक्रार पाठवली होती.त्याची या कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे.
नव जागृती चॅनलचे कर्मचारी एकीकडे रस्त्यावर उतरले असताना,दुसरीकडे थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक कर्मचारी आणि रिपोर्टर आता पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करणार आहेत.त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

नव जागृतीच्या कर्मचाऱ्यांची शुक्रवारी निदर्शने

नव जागृतीचे मालक राज गायकवाड यांनी तारीख पे तारीख देवूनही पेमेंट न केल्यामुळे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत.शुक्रवारी दुपारी दोन वाजता पुण्याच्या कल्याणीनगर ऑफीससमोर कर्मचारी मूक निदर्शने करणार आहेत.याबाबत कर्मचाऱ्यांनी जारी केलेले निवेदन
नमस्कार पत्रकार मित्रांनो,
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला आजकाल वाईट दिवस आलेत. कधी जीवघेणे हल्ले तर कधी माध्यमसम्राटांची मुजोरी यामुळे पत्रकार त्रस्त झालेत. सामन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणा-या पत्रकारांवर आपला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतय यापेक्षा मोठ दुर्दैव ते काय? आम्ही नवजागृति न्यूजचे कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून आमच्या पगारासाठी संघर्ष करत आहोत. मुजोर संचालक आमच्या पदरात केवळ पोकळ आश्वासनांची खैरात देत आहेत. वारंवार मागणी करूनही आम्हाला पगारासाठी नेहमीच तारीख पे तारीख देण्यात आली. आमच्या हक्काचा पगार मिळावा किंवा आमच्या सारख्या पत्रकारांची फसवणूक थांबावी यासाठी आम्ही नवजागृति न्यूजच्या कल्याणी नगर येथील कार्यालयासमोर उद्या दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मूक निदर्शने करणार आहोत. तरि आपण याचे वृत्तांकंन करावे अशी विनंती आपल्यातलाच एक पत्रकार म्हणून करत आहे.
विनीत,
वीरधवल पाटील 9970001105
नितिन रिंढे 9028351083
निलेश खरमरे 9921440544

बुधवार, १५ जुलै, २०१५

संवेदनाशून्य आणि माणुसकीहीन पत्रकारितेचं हे रूप संतापजनक...मित्रांनो,

हा अर्ध्या मिनिटाचा व्हीडीओ जरूर पाहा...
आजच्या विकृत, झिंगारलेली, चित्कारलेली, चेकाळलेली, चवचाल आणि संवेदनाशून्य आणि माणुसकीहीन पत्रकारितेचं हे रूप संतापजनक आहे !! 
जळगाव महापालिकेच्या लिफ्टजवळ काही महिन्यांचे वेतन थकल्याने हा पालिका उर्दू शाळेचा शिक्षक विष प्राशन करतोय. 15 जुलै रोजीची ही घटना!! अनेक फोटोग्राफर्सच्या कॅमेराचे फ्लॅश चमकताहेत, क्लीअर/HD व्हीडीओ शूट होतोय!!! आत्महत्येचा तमाशा लाईव्हली कॅमेराबंद होतोय... त्या माणसाला वाचवायला कुणी पुढे येवू नये?? फोटो काढताहेत त्याला विष घेण्यास रोखाण्यापासून?? ही कुठली पत्रकारिता?? याचा मनस्वी निषेध!! चीड़ येतेय; लाज वाटतेय या पेशातल्या "बाईटी" अन "स्टील" झिंगेची!!!
आता दुसरी बाजू....
एव्हढी सर्व तयारी करून जर आत्महत्येचा प्रयत्न होतोय तर ही कुणाच्या तरी "आईडियाची कल्पना" तर नसेल?? तसे असेल तर हा विकृतीचा कहर! आमच्या पेशातील नीतिमत्ता इतकी खालावलीय??
त्रिवार निषेध!! चौकशी करा अन् गुन्हे दाखल करा सर्व दोषीवर!!

यासंदर्भात युवा पत्रकार नीलेश झाल्टे याची FB पोस्ट विचार करायला लावणारी आहे. मात्र त्याने "पूर्वनियोजित" दुसरी शक्यता दुर्लक्षित केलीय!!

झाल्टे यांची हीच ती पोस्ट 
.
माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही याची प्रचीती आज आली. तस तर बऱ्याच गोष्टींमुळे पत्रकार असल्याची भयानक लाज वाटून जाते. आजही वाटली. पण यापूर्वीच्या घटना आपल्या पाठीमागे घडल्या असल्याने ही लाज थोड्या कालावधीने नष्ट व्हायची. पण आज खूप जास्तच वाटली. मी, तुषार आणि नीलेश भाऊ जळगाव मनपाच्या इमारतीच्या कडेनी चालत निघालो असताना अचानक आरडाओरड सुरु झाली. आम्ही खाली होतो, सहज खालून एका स्टुलावर चढून पाहिलं तर एक माणूस ओरडत खाली पडलेला दिसला. त्याच्याभोवती २०-३० लोकं होती. त्यात ५-६ मेनस्ट्रीम मिडीयाला काम करणारे फोटो जर्नलिस्ट. ते सर्व फोटो काढण्यात व्यस्त होते. तो माणूस मनपा शाळेतला एक शिक्षक होता. १४ महिन्यापासून मनपा शाळातील शिक्षकांचे अर्धे वेतन न मिळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनानंतर कोणताही तोडगा न निघाल्याने डॉ. या शिक्षकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर इतर शिक्षकांनी तातडीने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केलं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्याला दोन बड्या खात्याचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाथाभाऊ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सारखे नेते, सगळीकडे जवळपास एकाच पार्टीची म्हणजे सत्ताधारी सरकारचीच सत्ता आहे. असे असताना ही आशिया खंडातली सर्वात उंच प्रशासकीय इमारत असलेली मनपा कर्जाच्या ओझ्याने खुजी झाली आहे. विरोधी असताना नाथाभाऊ ज्या पद्धतीने आवाज उठवत होते तो आवाज आता कुठे गेला, गिरीशभाऊंची सर्व समाजसेवा कुंभमेळ्यातच बीजी आहे का? असे प्रश्नही उपस्थित होतात. १५ दिवसापासून आपल्या कष्टाचे, विद्यार्जनाचा मोबदला मागायला बसलेल्या गुरुजनाचे वेतन देण्यावर साधी चर्चा होऊन दाखल घेतली जात नाही, हे महान दुर्दैव. असे अनेक किस्से हया मनपाचे आहेत, हा भाग वेगळा आहे. असो हा झाला वृतांत. सदर घटनेच्या वेळी आम्ही एक व्यक्ती म्हणून तिथे होतो. (आम्ही खालच्या भागात असल्याने तिथपर्यंत पोचुच शकलो नाही) काहीच करू शकलो नाही. खालून वर जाईपर्यन्त आंदोलनात सामील इतर शिक्षकांनी त्या शिक्षकाला रिक्षात घालून दवाखान्यात हालवले. सदर शिक्षक ज्यावेळी विष पीत होता त्यावेळी किमान २० ते ३० लोकं पाहत होते. तिथे हे पत्रकार उर्फ माध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांविषयी किती कणव आहे हे आम्ही नेहमी आमच्या पेपर मधून छपून किंवा फोटो काढून दाखवून देत असतो. मग ही कणव अशा वेळी नेमक काय खायला निघून जाते? विष पीत असताना फोटो काढत असताना या लोकांमधील माणुसकी नावाचा प्रकार नेमकी कोणती भाड खात असतो? खरोखर अशी लोक्स विकृत डोक्याची असावीत अशीच शंका येते आहे. हे लोक्स नंतर बघ मी बाटली तोंडात असल्याचा फोटो घेतला, बघ मी तो खाली पडतानाचा फोटो घेतला. अशी चर्चा करत असतील काय. आणि यांचे संपादक असे फोटो घेऊन गेल्यावर वा शाब्बास पठ्ठेहो, असेच काम करत रहा, अशी शाबासकी देत असतील काय? हे देखील सवाल माझ्या मनात येऊन गेले. आपल्या घरातला किंवा जवळचा एखादा व्यक्ती विष पीत असेल किंवा मरत असेल तर मिडीयाचा माणूस म्हणून आपण बातमीसाठी थांबणार की रोकणार? असेल अनेक सवाल या लोकांसाठी आहेत. माझ्याकडेच एक्सक्लुझीव आले पाहिजे केवळ हीच घाणेरडी भावना अशा वेळी लोकांच्या मनातून जायला तयार होत नाही. एक बातमी नाहीच झाली किंवा त्या शिक्षकाला विष पिण्याअगोदर थांबवले असते आणि नंतर संपादकाला ही गोष्ट सांगितली असती किंवा कळली असती तर? वगेरे प्रश्न फोटोग्राफरच्या समोर उभा ठाकला असेल काय. स्त्रीवाद वगेरे पाहिल्यापासून आई-माई वरच्या शिव्या बंद झाल्या आहेत, पण खेडवळ व्यक्ती असल्याने कितीही कंट्रोल केला तरी अशा शिव्या तोंडातून निघून जातातच. या शिव्या निघाल्याशिवाय भडास पूर्णच होत नाही. आज खूप शिव्या दिल्या काही त्यांना काही स्वताला देखील. शरम वाटते आहे पत्रकार म्हणून घ्यायची... पत्रकार, पत्रकारिता, जर्नलिस्ट सारख्या शब्दांचा आजच्या खासकरून युवकांना भलता मोह लागला आहे. जर पत्रकारिता अशी असेल तर काही दिवसातच पत्रकारितेच्या धंद्याला फाट्यावर मारले जाईल हे नक्की... 


(हे लिहिताना देखील लाज वाटत आहेच. हरामखोरा लिही, बदल व्हायचा तेव्हा होईल या अपेक्षेनेच लिहीले आहे... सोबत त्या शिक्षकाची चिठ्ठी लावत आहे, कदाचित पत्रकारांना त्यातल्या वेदना दिसून आल्या त आल्या..)

Nilesh Zalteमहाराष्ट्रनामा ...

> मुंबई - जय महाराष्ट्रचे आऊटपूट हेड सुनील बोधनकर यांचा राजीनामा मंजूर...


> जळगाव लोकमतचे रिपोर्टर सुधाकर जाधव यांचा लोकमतला राम राम.... 
उद्यापासून दिव्य मराठीला ज्वाईन करणार...> कोल्हापूर - 'पुण्यनगरी'तून बाहेर पडलेले विजय जाधव 'महाराष्ट्र टाइम्स' तर 'पुढारी'तून बाहेर पडलेले मुकुंद फडके 'न्यूज टेल'च्या वाटेवर...

> नव जागृती चॅनलच्या पत्रकारांच्या पाठीशी नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्र


> बेरक्याची उर्फ नारदची नक्कल करणारा 'नविन बेरक्या उर्फ नारद' झाला गारद...:!
 


   

समीरण वाळवेकर यांची आगामी कांदबरी - '' शेळीचे कलम ४२०"


ज्येष्ठ पत्रकार आणि 'नव जागृती'त काही महिने सल्लागार संपादक महणून काम केलेले समीरण वाळवेकर यांची नवी कादंबरी 'शेळीचे कलम ४२०' लवकरच (अ)प्रकाशित होणार आहे...
त्यातील काही सारांश,त्यांच्याच फेसबुक वॉलवरून......

'' शेळीचे कलम ४२०"

आटपाट नगरी तील एका माणसाला कसे कोणास ठाऊक, पण "टी व्ही न्यूज चैनेल" काढायची दुर्बुद्धी सुचली !! 
तसे त्याने काढले सुद्धा ! 
त्यामुळे लोकांची बुबुळे कपाळात गेली ती अजून खाली आली नाहीत !!
परवाने नव्हते तर दुसर्या वाहिनीचा परवाना भाड्याने घेऊन काढले !
बालपणीचे चारपाच मित्र सुद्धा आपल्या मित्राचे हे अचाट साहस पाहून आपले काम धंदे नोकर्या सोडून त्याच्या चैनेल मध्ये रुजू झाले ! 
त्या सर्वांना त्याने संचालक, उपाध्यक्ष वगैरे करून टाकले !
पण हाय रे दैवा !! 
ते टी व्ही न्यूज चैनेल सहा महिन्यातच बंद पडले, कारण चार महिने कोणाचे पगारच झाले नाहीत !!
आता सध्या ते चारपाच मित्र ठार वेडे झाले आहेत म्हणे ! 
तेल गेले, तूप गेले, आधीच्या नोकर्या गेल्या,
आता तर बिनपगारी सहा महिने झाले ! करायचे काय ?
या मालक माणसाविरुद्ध आज पर्यंत न कोणती चौकशी झाली, न कोणी त्याला अटक केली !! 
कारण कोणाची अद्याप लेखी तक्रारच गेली नाही !!
त्या मालकाचा एकाच प्रोब्लेम होता , त्याला एक मानसिक आजार होता आणि आहे !! 
श्रीमंती थापा ठोकणे, कोटी कोटी च्या बाता थापा मारणे, भपका मिरवणे !! 
प्रत्यक्षात सारी बोंब !!
पण त्याची त्याला कल्पना नव्हती आणि नाही !! तो आपल्याच धुंदीत थापा लावतो, आणि रोज नवी गाजरे आपल्या कंपन्यान मधील कर्मचाऱ्यांना कामाला लावतो !!
ती ही मुकी बिचारी शेळ्या मेंढरे नोकरीच्या आशेने कामे करीत राहतात, चार चार महिने पगारा शिवाय !!
त्याला वाटते, की "शेळी " या विषयातील तो जागतिक तज्ञ आहे !!
या विषयावर त्याने महाराष्ट्रातील एका केंद्रीय मंत्र्याचे काही तास डोके खाल्ले आहे !! 
तो जो पळून गेला तो अजून सावरला नाही !!
त्या नंतर पण अनेक भोळ्या भाबड्या लोकांनी त्याच्या बोलबच्चनगिरी ला भाळून त्याच्या कडे काही कोटींच्या ठेवी सुद्धा ठेवल्या म्हणे !
तो सतत कोट्यावधी रुपयांच्या गोष्टी करतो ! त्याच्या काही वल्गना खालील प्रमाणे !!
"पाच हजाराचे अमुक महिन्यात पाच लाख देतो, अमुक वर्षात वीस लाख देतो" 
"कारण माझ्याकडे हजारो शेळ्या आहेत। प्रत्येक शेली मला २७ लाख रुपयांचे उत्पन्न देते"
""माझे रोजचे उत्पन्न तीन चार कोटींचे आहे !"
""मला चैनल वरून जाहिराती नकोत, रेस नको। दोनशे कोटी मी राखून ठेवले आहेत !""
""माझ्याकडे हजारो शेळ्या आहेत। प्रत्येक शेली मला २७ लाख रुपयांचे उत्पन्न देते ।!""
"लवकरच मी सांगलीचा साखर कारखाना विकत घेणार आहे !!"
""पाकिस्तान चे एक मटणाचे कंत्राट मला मिळाले आहे, त्यानंतर महिन्याला ६०० कोटी येणार आहेत !"
"सगळी देणी एक रकमी फेडतो , आणि परत चैनेल सुरु करतो !! आहे काय नाही काय !!"........वगैरे वगैरे।
खरी परिस्थिती अशी आहे, की यातील काहीच खरे नाही !! सारे मनाचे खेळ !!
यातील एकाही शेली , मेंढी कोणी कधी पहिली नाही !
या माणसाला हे कळात नाही, की आपल्याला आपण कोट्याधीश आहोत असे सतत वाटत राहणे, आणि प्रत्यक्षात तसे काहीच नसणे, हा एक मानसिक आजार आहे. त्याचे सारे मित्र त्याला हे सांगून ठाकले, की त्याला खरोखर मानसिक उपचार घेण्याची गरज आहे,, पण त्याला हे पटत नाही ! 
त्याच्या डोक्यात घोळ निर्माण झाला आहे.
आता त्याचे टी व्ही चैनेल बंद पडले आहे, 
कारण सुमारे सव्वाशे कर्मचार्यांचे सव्वा कोटी आणि 
इतर दोन कोटी अशी तीन कोटी रुपयांची देणी थकली आहेत।
शिवाय कित्येक कोटींच्या गरिबांकडून घेतलेल्या ठेवी वेगळ्या !! 
त्या ठेवीदारांचे तर फोन घेणे सुद्धा बंद केले आहे आहे !!
आता तो सर्व जवळच्या मित्रांवर खापर फोडतो आहे,
त्याला वाटते की सगळ्यांनी त्याला फसवले आहे…. सारे जग त्याच्या विरुध्द आहे ।
पण ८०० कोटी ची ओर्डेर पाकिस्तान मधून मिळाली की सारे कसे मस्त होणार आहे, असेच या स्वयंघोषित "सरकारांना" वाटते आहे !!
काही काळातच त्याची दुभंग ( स्कीझोफ्र्निक) मनोवस्था होणार आहे !! 
त्या अवस्थेच्या एक दोन टप्पे फक्त अलीकडची स्थिती आहे !!
आता मात्र वेळ आली आहे, सर्व कर्मचारी कायदेशीर कारवाई करून 
त्याला गजा आड करणार आहेत म्हणे !!
आता कुठे या कर्मचार्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये, पत्रकार आणि संबंधित कर्मचार्यांमध्ये नवी जागृती आली आहे !!
असो !! आली ना ? मग झाले तर !!
आता काही पत्रकार सुद्धा कामाला लागले आहेत, 
कारण त्यांना आता कुठे या प्रकरणात धासू स्टोरी दिसते आहे !!
काहींनी केंद्रातील एका खासदाराशी संपर्क केला आहे !! 
काहीतरी होऊन आपले पगाराचे थकीत पैसे परत मिळतील अशे सार्यांना आशा आहे !!
अर्थात त्या आधी "तो" परदेशात पळून गेला नाही तर !! 
____________________________________________________
वरील सर्व आशय आणि मजकूर माझ्या येऊ घातलेल्या " शेळीचे कलम ४२०" या नव्या कादंबरीच्या सारांशा मधील असून 
त्याचा प्रत्यक्षातील अथवा वास्तवातील कोणाशीही संबंध किंवा साधर्म्य असल्यास , 
तो निव्वळ योगायोग असेलच किंवा कसे, हे सांगता येणार नाही !!
शिवाय या कादंबरीचे काही सिक्वेल्स येणारच नाहीत असे सांगता येणार नाही !
कारण "शेळी मालका" च्या जागी "म्हशी मालक", "इमारत कंत्राटदार", "शेतकरी", "कोंबडी चालक",ल "गुंठा मंत्री " वगैरेंनी सुद्धा हेच , असेच टी व्ही चैनेल काढायचे प्रयोग यशस्वी केल्याचे हल्ली अनेक मोठे सल्लागार संपादक, पत्रकार छातीठोक पणे अभिमानाने आणि रोज चर्चांमध्ये मध्ये झळकत सांगत आणि मिरवत असतात म्हणे !!
त्यामुळे माझी दुसरी कादंबरी प्रकाशित होईपर्यंत आता मी काहीच बोलणार नाही किंवा लिहिणार नाही !!त्या साठी ती प्रकाशित झाल्यावर 
ती विकत घेऊनच वाचावे लागेल !!
इति अलम !!

मंगळवार, १४ जुलै, २०१५

नव जागृतीच्या गायकवाडांकडून कर्मचा-यांची घोर फसवणूक

पुणे - अवघ्या सहा महिन्यात गाशा गुंडाळणा-या नव जागृती न्यूज चॅनलच्या राज गायकवाड यांनी कर्मचा-यांची घोर फसवणूक केली आहे.१४ जुलै रोजी कसल्याही परिस्थितीत पेमेंट दिले जाईल,असे आश्वासन देणा-या गायकवाडांनी आश्वासन पाळले नाही.त्यामुळे संतप्त कर्मचा-यांनी कामगार न्यायालय गाठले असून,गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सांगलीच्या राज गायकवाड यांची जागृती अ‍ॅग्रो फुडस् लिमिटेड ही चिटफंड कंपनी आहे.ही कंपनी शेळ्या पालन तसेच मत्स पालन करते,अशी भूलथापा देवून गायकवाड यांनी कंपनीचे जाळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात विणले आहे.१० लाख भरा आणि ४८ महिन्यात १ कोटी मिळवा,अशी जाहिरातबाजी करून त्यांनी करोडो रूपये गोळा केले आहेत.त्याचबरोबर मीडिया मागे लागू नये म्हणून त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये नव जागृृती न्यूज चॅनल पुण्यातून सुरू केले होते.पत्रारितेतील अनेक तरूण मोठ्या उत्साहाने या चॅनल मध्ये ज्वाईन झाले होते.परंतु अवघ्या सहा महिन्यातच गायकवाड यांनी कोलांटी उडी घेतली आहे.चिटफंडचा पैसा जमा करण्यासाठी हा फंडा वापरण्यात आला होता.परंतु पैसे गोळा होताच गायकवाडांच्या पोटात गोळा उठला आहे.
गायकवाड यांनी कर्मचा-यांचे एप्रिल,मे आणि जूनचे पेमेंट दिले नाही,तसेच स्ट्रींजर रिपोर्टरचेही याच महिन्याचे मानधन थकवले आहे.पेमेंट देवू,देवू म्हणून त्यांनी अनेक तारखा दिल्या,काही दिवसांपुर्वी कर्मचारी आक्रमक झाल्यानंतर १४ जुलै रोजी पेमेंट देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.या दिवसांकडे कर्मचारी मोठ्या आशेने पहात होते.परंतु या दिवशीही त्यांचे पेमेंट दिले नाही.कर्मचा-यांच्या जीवनाशी खेळण्याचे काम गायकवाड यांनी केले आहे.अशा भूलथापा देणा-या आणि कर्मचा-यांचाही फसवणूक करणा-या राज गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
नव जागृती न्यूज चॅनलसाठी जागृती मल्टिमीडीया कंपनी स्थापन करण्यात आली होती.मुळात नव जागृतीला केंद्र सरकारची मान्यता नाही.NSN ही वहिनी रजिस्टर्ड आहे. मात्र नव जागृती नाव देण्यात आले.वरती नव जागृती आणि खालती NSNअसा लोगो होता.NSNआणि नव जागृती यांची संयुक्त नोंदणी अजूनही करण्यात आलेली नाही.त्याचबरोबर नव जागृतीची महाराष्ट्र शासन,पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदणी नाही.हा ४२० चा गुन्हा ठरू शकतो.दुसरे असे की या कंपनीच्या डायरेक्टर  राज गायकवाड यांच्या पत्नी जाई गायकवाड आणि भाऊ भास्कर गायकवाड आहेत.त्यांच्यावरही भादंवि ४२० प्रमाणे दाखल होवू शकतो.कर्मचारी आणि स्ट्रींजर राज्यातील विविध कामगार न्यायालयात भादंवि ४२०अन्वये गुन्हा दाखल करणार आहेत.याबाबतच्या नोटीसा वकिलामार्फत पाठवण्याचे काम सुरू आहे.
राज गायकवाड यांच्या जागृती अ‍ॅग्रो फुडस् या चिटफंड कपंनीची आणि नव जागृतीच्या बोगस कारभाराची सखोल चौकशी करावी,या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी भाजपाचे किरीट सोमय्या यांना पत्र पाठवण्यात आले आहे.त्याचबरोबर नव जागृतीच्या ऑफीससमोर आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे.गायकवाड यांच्यावर कारवाई न झाल्यास काहीजण आमरण उपोषण करणार आहेत.

सोमवार, १३ जुलै, २०१५

महाराष्ट्रनामा ...

बेरक्याचा दणका
अकोला - दिव्य मराठीचे चिफ रिपोर्टर सचिन देशपांडे यास दिव्य मराठीच्या प्रशासनाने केले बडतर्फ...
कंत्राटदारास पाच लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप....
बेरक्याने दिले होते काही दिवसापूर्वी वृत्त्त ...

..................................कोल्हापूर - पुण्यनगरीच्या कोल्हापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक विजय जाधव यांचा पुण्यनगरीचा राजीनामा..जाधवांच्या पुढच्या इनिंगकडे कोल्हापूरकरांचे लक्ष...

...............................
रविराज पाटील
भक्तीच्या ऐलतिरावरुन शक्तीच्या पैलतिराकडे...!
‘पंढरीभूषण’च्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी
निभावून, आता रायगड (अलिबाग) पुढारीला जॉईन्ड.

.............

पत्रकार संरक्षण कायदा करावा आणि पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी,या मागणीसाठी काल राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.सर्व पत्रकार संघटना गट- तट सोडून एकत्र आल्या होत्या....त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन...अशीच एकी पत्रकारांनी दाखवली तर राज्यकर्ते नक्कीच वठणीवर येतील...
पत्रकारांमधील गट आणि तट पाहून मी व्यस्थित होतो.पत्रकारांचा खरा शत्रू पत्रकारच झाला आहे.त्यामुळे आपण आणि आपले काम बरे,अशी भूमिका मी घेतली आहे.बेरक्याच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रत्यक्ष अडीअडचणी सोडण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मी सध्या कोणत्याही पत्रकार संघटनेत सक्रिय नाही.याबाबत कोणाचा गैरसमज असल्यास काढून टाकावा...
जे चांगले काम करतील त्यांना फक्त पाठींबा देण्याचे काम मी करत आहे आणि करत राहणार आहे...
- बेरक्या उर्फ नारद

मुकुंद फडके यांचा पुढारीला रामराम

कोल्हापूर - पुढारीचे दोन वरिष्ठ कार्यकारी संपादक दिलीप लोंढे आणि सुरेश पवार यांच्यातील अंतर्गत गटबाजी,पद्श्रीचे होणारे दुर्लक्ष आणि काहीच नविन करण्याची संधी मिळत नसल्यामुळे सहाय्यक संपादक मुकुंद फडके यांनी आज पुढारीला रामराम केला.
पद्श्रीच्या कोल्हापूर आखाड्यात सध्या 'राजारामपुरी केसरी' दिलीप लोंढे आणि 'भवानी मंडप केसरी' सुरेश पवार यांच्यात तुंबळ शीतयुध्द सुरू आहे.त्यात पंत नव्हे पंच मुकुंद फडके यांची मोठी पंचायत झाली होती.याची बाजू घ्यावी तर त्याचा त्रास आणि त्याची बाजू घ्यावी तर यांचा त्रास अशी दुहेरी कोंडी झाली होती.
मुकुंद पंतांचा पुढारी प्रवेश पावने दोन वर्षापुर्वी नव्याने झाला होता.त्यावेळी 'राजारामपुरी केसरी' दिलीप लोंढे पुढारीत नव्हते.त्यांनी नुकताच राजीनामा दिला होता.फडके आल्यानंतर एक महिन्यात ते परत आले.त्यानंतर काही दिवसांपुर्वी राजीनामा देवून पुन्हा आले.त्याच्या 'आओ जावो घर तुम्हारा 'यामुळे पंतांची चांगलीच पंचायत झाली होती.पद्मश्री मात्र कोंबडीला दाणे टाकून,झुंज पहावी तसे मजा घेत आहेत.त्याचा त्रास अनावर झाल्याने पंतांनी अखेर पुढारीला सोमवारी कायमचा रामराम केला.
पंत पुन्हा बेळगाव तरूण भारतमध्ये जाणार,अशी अफवा कोल्हापूरात पसरली आहे.पण पंतांनी त्यास नकार दिला आहे.

शनिवार, ११ जुलै, २०१५

बेरक्या इफेक्ट : नव जागृतीच्या मालकाचे लेखी आश्वासन

पुणे - नव जागृती चॅनल दोन ते तीन महिने बंद ठेवून,पुन्हा रिलॉचिंग करण्याचे तसेच कर्मचारी आणि स्ट्रींजरचे पेमेंट १४ जुलै रोजी करण्याचे लेखी आश्वासन मालक राज गायकवाड यांनी दिले आहे.
जानेवारी २०१५ मध्ये सुरू झालेले 'नव जागृती' चॅनल अवघ्या सहा महिन्यातच बंद पडले आहे.दोन संचालकांनी चुना लावल्यामुळे आणि नको तिथे खर्च केल्यामुळे हे चॅनल आर्थिक अडचणीत सापडले आहे.
कर्मचा-यांच्या आणि स्ट्रींजरच्या पेमेंटबाबत बेरक्याने अनेक वेळा बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत .परवा प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेवून,मालक राज गायकवाड यांनी कर्मचारी आणि स्ट्रींजरचे एप्रिल आणि मे चे पेमेंट १४ जुलै रोजी आणि जूनचे पेमेंट २५ जुलै रोजी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.तसा ईमेल आज कर्मचारी आणि स्ट्रींजर रिपोर्टरला पाठवण्यात आला आहे.
काय आहे हा ई - मेल ? 

Dear All,
As all of you are aware of the meeting conducted at Sangli Head Office. As per the discussion with Rajdada Gaikwad, we are declaring a gap of 2 to 3 months in the functioning of Nav Jagruti News Channel. Nav Jagruti News Channel will be relaunched with full strength & updated machinery & distribution all over the Maharashtra, as assured by Rajdada Gaikwad.
Employees are permitted for search of Job & joining in the other concern organization.
Management of Nav Jagruti News Channel has decided to credit the salary of the employees for the month of April’2015 & May’2015 on 14th July’2015 and salary for the month of June’2015 will be cleared on or before 25th July’2015.
Thanks & Regards,
Asst. HR Manager

शुक्रवार, १० जुलै, २०१५

अरे वा, केवढे नॉलेज आहे यांना...

गेल्या काही वर्षांपासून मराठीमध्ये ज्यांना पत्रकार म्हणून करियर करायचे आहे, त्यांच्यासाठी काही पात्रतेच्या अटी ठरल्या आहेत.
१. संबंधित व्यक्तीला यस सर, यस सर करण्याची सवय हवी.
२. त्याच्याजवळ स्वतंत्र दृष्टिकोन नसला तरी चालेल.
३. गल्लीच्या बाहेर जग किती मोठे आहे याचा विचार करताना तो त्याला क्राईम, क्रिकेट, सिनेमा एवढ्या पातळीवरच करता आला पाहिजे.
४. गल्लीतल्याच राजकारणावर अधिकारवाणीने लिहिता-बोलता आले पाहिजे.
५. कधी-कधी एकदमच मला संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतरही जड विषय किती सहज हाताळता येत आहेत याचा साक्षात्कार होत राहिला पाहिजे.
६. मग अशा विषयांवर लिहिताना-बोलताना चुका करा पण दामटून लिहा-बोला हा नियम पाळता आला पाहिजे. इत्यादी-इत्यादी.
एक काळ असा होता की मराठी न्यूज चॅनेल्स आणि पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, दर्जेदार माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत असे. मात्र अलीकडच्या काळात विशेषतः राज्यातल्या गल्लीबोळात रमलेल्या आणि टीआरपीच्या आकड्यांच्या खेळात रमलेल्या आक्रस्ताळे मराठी माध्यमांवर आता विश्वास बसत नाही. म्हणूनच आजच्या विद्यार्थ्यांना मराठी पेपर-न्यूज चॅनेल नियमित वाचा-पाहा आणि अपडेट राहा असे सांगणेही कठीण होऊन बसले आहे. ज्यांची क्षमता नाही असे बरेचजण आज स्वतःला धडाडीचे पत्रकार म्हणवून घेत आहेत आणि हमखास प्रेझेंटेशनमध्ये चुका करतआहेत.या चुका विशेषतः वर उल्लेख केलेल्या विषयांमध्ये प्रकर्षाने होताना दिसताहेत. या चुका लक्षात आणून दिल्या तरी त्याची त्यांना स्वतःला आणि त्यांच्या मालकांना खंतही नाही याचे वाईट वाटते. हे विषय मराठी माणसाला समजतात कोठे अशी त्यांची भावना असते. त्यामुळे त्यात चुका झाल्या तरी हरकत नाही, असे त्यांचे मत बनलेले असते. या विषयांचा वापर त्यांच्यासाठी फक्त स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यापुरताच असतो. चार लोकांना सांगितले की, ते अरे बापरे हा विषय... असे उग्दार काढतात, तेव्हा असे पत्रकार एकदम हुरळून जात असतात. त्यामुळे आतरराष्ट्रीय घडामोडींचा अर्थ आजच्या मराठी माद्यमांसाठी कसा आहे,
१. अमेरिकेत काही खुट्ट झाले की ती आंतरराष्ट्रीय महत्त्वाची घटना.
२. युरोप, जपान आणि गेल्या काही वर्षांपासून चीन येथे कोणी कोणतेकपडे घातले आहेत, कोण किती किलो जेवण करते, इत्यादी-इत्यादी म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना.
३. अलीकडच्या काळात, चीन भारताला घेरतोय हे वाक्य मराठी पत्रकारांना पाठ झाल्यामुळे चीनही आंतरराष्ट्रीय घडामोडींमद्ये येऊ लागला आहे.
४. मराठी पत्रकारांच्या नकाशामध्ये अमेरिका, ब्रिटन, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया असे ठराविकच देश आहेत. त्यामुळे अन्य जगाची त्यांना माहितीच नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी पत्रकारितेत एक प्रथा रुढ झाली आहे. जे विषय आपल्याला झेपत नाहीत, समजत नाहीत, ते विषय वाचकाला दर्शकाला आवडत नाहीत असे म्हणायचे आणि तिकडे दुर्लक्ष करायचे. अशा गुणवैशिष्ट्यपूर्ण मराठी पत्रकारितेची क्षमता पाहू.
१. एप्रिल 15 मध्ये येमेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यावर तेथून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने तातडीने पावले उचलली. काही पेपर्सनी आज किती भारतीयांची सुटका करण्यात आली अशा छोट्याशा बातम्या दिल्या, तर काहींनी ग्लॅमरस बातम्यांमधून जागा-वेळ शिल्लक राहिल तशा दाखवल्या-छापल्या.काही दिवसांनी भारताच्या या अजब कारवाईचे अमेरिकेने कौतुक केल्यावर या माध्यमांना अचानक त्यातलं महानपण लक्षात आलं आणि त्याला महत्त्व मिळू लागलं. त्याआधी लिबिया, लेबनॉनमधील अशाच मोहिमांच्यावेळीही झाले होतं.
२.मराठी पत्रकारांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक म्हणून मिरवायचे असेल, तर ओबामांच्या दौऱ्याच्यावेळी त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवलं म्हणजे झालं. फारफार तर चीन भारताला कसा घेरतोय याची फक्त उदाहरणं पाठ झाली म्हणजे आपली पत आणखी वाढते.उरलेल्या वेळात मग आहेच, उथळ बातम्यांच त्यांना दिसत राहतात. जसे, अमेरिकेतल्या कोणी एकाने आपल्या प्रेयसीला कसे प्रपोझ केले, ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनानुसार लोक अमूक एक खाऊन कसे ताजे जवाने राहतात इत्यादी-इत्यादी. पण त्याच चीनला शह देण्यासाठी भारताची शूर सैन्यदले करत असलेल्या उपाययोजना त्यांना दिसत नाहीत. कारण त्यांची दृष्टीच कूपमंडूप असते. ते हाडाचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक असतात आणि न्यूज चॅनेल्सवर तावातावाने बोलूही लागलेले असतात.
३. भारतीय नौदलासाठी मुंबईत बांधल्या जात असलेल्या स्कॉर्पिन पाणबुडीची बातमी देताना मराठी न्यूज चॅनेल्समध्ये भारी स्पर्धा पाहायला मिळाली. कोणी या पाणबुडीच्या गोदीतील एका विभागातून दुसऱ्या विभागात पाठविण्याला जलावतरण म्हटले, तर कोणी तिला चक्क अणुपाणबुडी ठरवून टाकले, आणखी कोणी या पाणबुडीला थेट ५० दिवस पाण्याखाली राहण्याचा मान मिळवून दिला.आणि असे सांगितले जाते की, म्हणे या बातम्यांनंतर या पाणबुड्यांच्या फ्रेंच कंपनीने भारतातील संरक्षण मंत्रालयाला फोन करून माहिती घेतली की, आमच्या पाणबुड्या एकदम ५० दिवस पाण्याखाली ठेवण्याचे तंत्रज्ञान कसे आत्मसात केले आहे. आम्हालाही द्या की ते तंत्रज्ञान. आणि त्यांनी मराठी माध्यमांचे आभारही मानले की, त्यांची पाणबुडी अणुपाणबुडी असल्याची माहिती त्यांना करून दिल्याबद्दल.
४. पाठोपाठ आणखी एक बातमी आली. भारतीय नौदलासाठी मुंबईत बांधल्या जात असलेल्या विशाखापट्टणम या अत्याधुनिक युद्धनौकेच्या जलावतरणाची. आता इथे मराठी न्यूज चॅनेल्सनी तिला चक्क नौदलात दाखलही करून टाकले. वा किती छान वाटले हे ऐकून की ज्या युद्धनौकेवर अजून एकही शस्त्र नाही, तिची बांधणीही अजून अर्धवट आहे ती थेट नौदलात दाखल झाल्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
प्रत्येक न्यूज चॅनेल स्वतःची निष्पक्ष, निर्भीड, अचूक, बेधडक इत्यादी-इत्यादी विशेषणांची स्वतःच जाहिरात करत असतात. पण सगळेच एकाच माळेतील मणी झाले आहेत. आचार-विचारापासून प्रेझेन्टेशनपर्यंतसगळंच कसं साचेबद्ध, उथळ. आणि अशा चुका करणाऱ्यांचीच परत चलती. कारण लोकांना कुठं समजतंय.एकच ताल, एकच लय, एकच सूर, एकच दृष्टी यामुळे सर्वच पेपर-न्यूज चॅनेल रटाळ झालेले आहेत.
आजही मराठीमध्ये या विषयांचे खरे जाणकार, अभ्यासक अस्तित्वात आहेत. पण त्यांची संख्या अत्यल्प आहे आणि या विषयांची लई भारी क्रेझ असणाऱ्यांच्यामध्ये त्यांचा आवाजच येत नाही. बातमी देण्यापेक्षा सगळेच सगळ्या विषयांमधले विश्लेषक झालेले आहेत.

आणखी एक-दोन ताजी उदाहरणे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला मध्य आशिया आणि शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्स शिखर परिषदांच्या निमित्ताने रशियाचा दौरा केला. मात्र या दौऱ्याकडे देशातील प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष केले. त्याचे ठळक कारण म्हणजे त्या दौऱ्यातील देशांना ग्लॅमर नाही. सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे संबंध वाढवणारा हा दौरा असला तरी ग्लॅमर नसल्याने आमच्या माध्यमांनी लोकांना त्यात इंटरेस्ट नाही अशी स्वतची समजूत करून घेत आपल्या बौद्धीक अक्षमतेवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. ग्लॅमरस दौऱ्याच्यावेळी यांना तास-न-तास, पानंच्यापानं कमी पडतात. वाट्टेल तिथं जागा शोधून त्या बातम्या घुसडल्या जातात. पण मध्य आशियासारख्या गंभीर दौऱ्याच्या वृत्तांकनासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. पण या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आले आणि या माध्यमांना पुन्हा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा पुळका आला. कारण त्या पलीकडे त्यांची वैचारिक झेप जात नाही. त्यांच्या जगाच्या नकाशावर दोन-चार देशच आहेत ना. मग बसले की सूट-बूट घालीन आणि पेनं आणि खुर्च्या पकडून. त्याच दिवशीशांघाय सहकार्य संघटनेचे सभासदत्व भारताला मिळाले, तरी त्याचे महत्त्व त्यांना समजले नाही आणि मग नेहमीचीच कारणं - लोकांना त्याच्यापेक्षा या भेटीत इंटरेस्ट जास्त होता. प्रत्यक्षात मध्य आशियाचा दौरा ग्लॅमरस नसल्याने त्याचे महत्त्व समजण्यासाठी आणि ते प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी डोक्याचा वापर करावा लागणार होता. अरे बापरे.... इथंच तर खरी अडचण आहे आमच्या खासगी माध्यमांची. त्यांना ते जमत-समजत नाही म्हणून ते प्रेक्षकांनाही आवडत नाही.
त्या आधी काही दिवस भारताच्या युद्धनौका आग्नेय आशिया, सेशल्स आणि मॉरिसशमध्ये काही काळ तैनात आहेत. पण त्याचीही बातमी द्यायला जागेची अडचण. एकीकडे चीन भारताला घेरतोय या पलीकडे यांची वैचारिक झेप जात नाही तर दुसरीकडे अशा बातम्या दिसण्याची क्षमता नाही, हेच खरे.
आम्हाला सामान्य प्रेक्षक-वाचकांना यापेक्षा वेगळी सर्वांगीण बातमीपत्र आवडतात. पण ते या खासगी प्रसारमाध्यमांना कोण पटवून देणार ?- एक वाचक

फेसबुक वर शेअर करा

Facebook