> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

बेदरे कुटुंबीयांसाठी सरसावले मदतीचे हात


बीड - गेवराई येथील पत्रकार व ‘सकाळ’चे बातमीदार जगदीश बेदरे यांनी भूमाफियांकडून झालेल्या फसवणुकीमुळे मानसिक खच्चीकरण झाल्याने बुधवारी (ता. २०) आत्महत्या केली. साधारण परिस्थिती असलेल्या बेदरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी आता अनेकांनी हात पुढे केले आहेत.
जगदीश बेदरे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दादा घोडके अद्याप फरारी असून कृष्णा मुळे न्यायालयीन कोठडीत आहे. दादा घोडकेच्या अटकेच्या मागणीसाठी पत्रकार आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, जगदीश बेदरे यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची परवड होऊ नये यासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहे. विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी जगदीश बेदरे यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच गणेश बेदरे, माजी उपनगराध्यक्ष रघुनाथ बेदरे, राजेंद्र बेदरे, बप्पासाहेब बेदरे, सिनू बेदरे, ऋषिकेश बेदरे आदी त्यांच्या सध्याच्या राहत्या घरालगत नवीन घरखोली बांधून देणार आहेत. तर गेवराई तालुका पत्रकार संघ व राज्य पत्रकार संघाच्या गेवराई शाखेच्या पुढाकाराने त्यांच्या मुलीच्या नावे बॅंकेत फिक्‍स डिपॉझिट करणार आहे. दरम्यान, या आत्महत्येप्रकरणातील दुसरा फरार आरोपी दादासाहेब घोडके याला पोलिसांनी दोन दिवसांत अटक न केल्यास गेवराई तालुका पत्रकार संघ पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करणार आहे.

परळी पत्रकार संघाचे निवेदन 
बेदरे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या फरार आरोपीला त्वरित अटक करून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. बुधवारी (ता.२७) येथील शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक श्री. मानकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी परळी संघाचे तालुकाध्यक्ष संजय खाकरे, कार्याध्यक्ष रामप्रसाद शर्मा, शहराध्यक्ष मोहन साखरे, प्रकाश सूर्यकर, राजेश साबणे, रामप्रसाद गरड,  प्रकाश चव्हाण, प्रशांत जोशी, ओमप्रकाश बुरांडे, आत्मलिंग शेटे,  जगदीश शिंदे, धीरज जंगले, गोपाळ आंधळे, लक्ष्मण वाकडे, प्रा. रवींद्र जोशी, धनंजय आढाव, अनंत कुलकर्णी, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, संभाजी मुंडे,  किरण धोंड, महादेश शिंदे, संतोष जुजगर,  प्रवीण फुटके, महादेव गित्ते, शेख मुकरम आदी उपस्थित होते.

घोडकेला अटक करण्याची मागणी
पत्रकार जगदीश बेदरे यांच्या आत्महत्येच्या घटनेला आठ दिवस उलटूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दादा घोडकेला अटक करण्याची मागणी आष्टी येथील पत्रकारांनी बुधवारी (ता. २७) तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. पत्रकार जगदीश बेदरे प्रकरणातील आरोपींना काही पक्ष आणि नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. निवेदनावर उत्तम बोडके, बबन पगारे, दत्ता काकडे, शरद तळेकर, भीमराव गुरव, अण्णासाहेब साबळे, अशोक मुरकुटे, अविनाश कदम, अनिरुद्ध धर्माधिकारी, मुझाहिद्दीन सय्यद, अविशांत कुमकर, गणेश दळवी, सचिन रानडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

झी २४ तास नंबर १

झी २४ तास नंबर १
एबीपी माझा घसरला...
IBN लोकमतची वाताहत ...

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

देशोन्नतीच्या आकोट वार्ताहराला महिलेने सर्वांसमक्ष दिला चपलांचा प्रसाद

निवडणूक विभागाच्या व्हिडीओ मध्ये सर्व प्रकार कैद ?
 
अकोट--दैनिक देशोन्नतीचा आकोट येथील वार्ताहर चंद्रकांत श्रीराम पालखडे याला आकोट शहर पोलिसांनी मुंडगाव येथील एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग व ऑट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक केली आहे.
घटनेची हकीकत अशी की तक्रारकर्ती महिला ही सुल्तानपूर पो. मुंडगाव येथील रहिवाशी असून वणी गट ग्राम पंचायतच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत अनुसूचित जातिकरिता राखीव असलेल्या सरपंच पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परवा त्या अर्जाच्या छाननीचा कार्यक्रम सुरू होता,त्यादरम्यान चंद्रकांत पालखडे हा त्याठिकाणी आला व दारात उभे राहून शुक शुक करून हातवारे व हावभाव करू लागला.
त्याचा हा प्रकार सहन न झाल्यामुळे व त्याच्या हातवाऱ्या मागील भावना लक्षात येताच दारात जाऊन त्याच्या कानाखाली थप्पड लगावली व घाबरून आपल्या पतीला बाहेर येऊन शोधू लागली तेव्हढ्यात पुन्हा पालखडे त्याठिकाणी आला व  मी तुझ्या उमेदवारी अर्जातील सर्व त्रुटी दूर करतो व अर्ज कायम ठेवतो त्यासाठी तू संध्याकाळी माझ्या घरी ये असे म्हटले, त्याच्या बोलण्याचा मला त्यावेळी राग आल्यामुळे मी त्याला पायातील चप्पल काढून मारले.
वरील सर्व प्रकार हा तहसील कार्यालयाच्या आवारात घडला आहे,असे कथन करून पुढे म्हटले आहे की ती महिला त्याच दिवशी आकोट शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी निघाली परंतु पालखंडे व त्याच्या पत्नीने पोलीस स्टेशन जवळच तिला गाठून तक्रार न देण्या विषयी हातपाय जोडले व पुन्हा असे काही होणार नाही असे सांगितले.त्यावेळी तेथून ती महिला परत गेली परंतु रात्री गावात गेल्यानंतर पालखडेने तिच्या चारित्र्याचे हनन होईल अशा प्रकारच्या चर्चा केल्या,पालखंडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून त्याच्या वर बलात्कार,फसवणूक विनयभंग व लोकांच्या शेतातील पिकांना आग लावून नुकसान करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत.त्याच्यापासून जीविताला  काही त्रास होऊ शकतो म्हणून आज आकोट शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देण्याचा निर्णय घेतला .
आकोट शहर पोलिसांनी सदरहू महिलेच्या तक्रारी वरून चंद्रकांत पालखडे विरुद्ध गु.र.न.351/2017 भादवीचे कलम 354(अ)(ड)506 व सहकलम अनुसूचित जाती ,जमाती अत्त्याचार प्रतिबंधक सुधारणा कायदा 2015चे कलम 3(1)w(II),R नुसार गुन्हा दाखल केला असून पालखडे याला अटक करण्यात आली असून  पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे व ठाणेदार गजानन शेळके हे करीत आहेत.
     अशा प्रवृत्तीच्या वार्ताहर,पत्रकारांमुळे अकोल्यातील इमानदारीने पत्रकारिता करणारे लोक मात्र नाहक बदनाम होत असून जिल्ह्यातील वृत्तपत्र व्यवस्थापणानी वार्ताहर नियुक्त करताना त्याची चारित्र्य पडताळणी करण्याची मागणी जिल्ह्यातील अनेक पत्रकार व ग्रामीण भागातील वार्ताहर यानिमित्ताने करीत आहेत.

दरम्यान चंद्रकांत श्रीराम पालखडे याची दैनिक देशोन्नतीने हकालपट्टी केली आहे.

मराठी पत्रकार परिषदेवर प्रशासक ! एस.एम.देशमुख स्वयंघोषित अध्यक्ष !!

पुणे - मराठी पत्रकार परिषदेवर सन 2008 पासून प्रशासक नियुक्त असून,एस.एम.देशमुख आणि त्यांचे पंटर हे स्वयंघोषित अध्यक्ष आणि पदाधिकारी असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेवून मराठी पत्रकार परिषदेची सर्व  बँक खाती सिल करावी तसेच त्यांच्या अधिस्वीकृती समितीवरील नियुक्या रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेची सन 1972 मध्ये पुण्याच्या न्यास नोंदणी कार्यालयात नोंद झाली असून,त्याचा नोंदणी क्रमांक एफ 568 आहे.पहिले अध्यक्ष म्हणून वसंत काणे ( पुणे ) यांची नोेंद आहे.त्यानंतर सन 2006 सोलापूरच्या एम.डी.शेख यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद नावाची समांतर संघटना काढून ही संघटना बळकावण्याचा प्रयत्न केला.तशी परिशिष्ठ "अ " वर नोंद आहे.मात्र सन 2008 मध्ये एम.डी.शेख यांची न्यायालयाच्या आदेशावरून निवड रद्द करण्यात आली आणि धर्मादाय सहआयुक्त यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली.मात्र प्रशासक उठल्याची किंवा निवडणुका घेण्याचा आदेश असल्याची कसलीही माहिती न्यास नोंदणी कार्यालयात उपलब्ध नाही तसेच सन 2008 पासून कोणताही चेंज रिपोर्ट दाखल नाही.
असे असताना एस.एम.देशमुख आणि त्यांच्या पंटरनी  मराठी पत्रकार परिषदेवर बेकायदेशीर कब्जा करून ही संघटना ताब्यात घेतली आहे.तसेच एक नव्हे तीन बँक खाते परिषदेच्या नावावर काढली आहेत.इतकेच काय तर सन 2010 पासून न्यास नोंदणी कार्यालयात ऑडिट रिपोेर्ट दाखल नाही.मराठी पत्रकार परिषदेवर आजही प्रशासक नियुक्ती असून,एम.एम.देशमुख यांनी प्रशासक उठल्याचे किंवा निवडणुका घेण्याचा न्यायालयाचा  आदेश असल्याची प्रत जगजाहीर करावी,असे आव्हान परिषदेशी निगडीत असलेल्या सदस्यांनी दिले आहे.

स्वयंघोषित अध्यक्ष

एस.एम.देशमुख हे मराठी परिषदेचे स्वयंघोषित अध्यक्ष असून,त्यांचे सर्व पंटर स्वयंघोषित पदाधिकारी आहेत.त्यांनी पत्रकारांची मोठी फसवणूक केली असूून,त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
मराठी पत्रकार परिषदेची सर्व बँक खाती सिल करण्यात यावीत तसेच एस.एम.देशमुख आणि त्यांच्या पंटरच्या अधिस्वीकृती समितीवर करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.


सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

गणेश बच्छाव याचं निधन

मुंबई - IBN लोकमतचा हरहुन्नरी पत्रकार आणि स्पेशल क्राइम शोचा  सूत्रधार गणेश बच्छाव (37 वर्षं) याचं रात्री ठाण्यातल्या खासगी रूग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झालं.सुमारे एक महिना तो  हॉस्पिटलमध्येय होता. त्यांच्या मागे पत्नी, 8 आणि 4 वर्षांच्या 2 मुली आणि आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
गणेश म्हणजे एक उत्साही आणि हरहुन्नरी कलाकार. उत्तम निवेदक, गायक आणि वादनाचे ज्ञान असणारा गणेश पत्रकारितेच्या घबडग्यातही आपल्यात दडलेल्या कलाकाराला जपायचा. विशेष म्हणजे त्यानं लोककला, नाटक, लोकसंस्कृती, आंबेडकरी चळवळ यासारख्या आपल्या आवडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करून आपल्या कामात आनंद शोधला होता. या सर्व क्षेत्रात गणेशचा मुक्तसंचार असे. अफाट लोकसंग्रह हे त्याचं खास वैशिष्ट्य.
दर आठवड्यात तो क्राईम शो सादर करत असे.  त्यामध्ये त्याचं हे सारं कसब, कौशल्य दिसत असे... त्याच्या शोमध्ये तो ज्याप्रमाणात माणसं आणायचा, ते अनेकदा मन थक्क करणारं असे. काम करताना, कामात स्वतःला झोकून देताना गणेशचा चेहरा सतत हसरा असे... गणेश आपल्या सोबत ते निखळ हास्य घेऊन गेला आहे.  त्याच्या निधनाने मराठी पत्रकारितेची फार मोठी हानी झाली आहे. पण त्यापेक्षा जास्त, कशानेही न भरून निघणारे नुकसान त्याच्या लहानशा कुटुंबाचं झाले आहे.


गणेश  बच्छावबद्दल IBN लोकमतचे माजी संपादक मंदार  फणसे आणि कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी एक पोस्ट शेयर केली आहे. 

एक अत्यंत वाईट बातमी 

आमचा गणेश गेला...
 
 गणेश म्हणजे एक उत्साही आणि  हरहुन्नरी कलाकार.  उत्तम निवेदक, गायक आणि वादनाचे ज्ञान असणारा गणेश पत्रकारितेच्या  घबडग्यातही आपल्यात दडलेल्या कलाकाराला जपायचा.  विशेष म्हणजे त्यानं लोककला, नाटक, लोकसंस्कृती, आंबेडकरी चळवळ यासारख्या  आपल्या आवडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करून आपल्या कामात आनंद शोधला होता. या सर्व क्षेत्रात गणेशचा मुक्तसंचार असे. अफाट लोकसंग्रह हे त्याचं खास वैशिष्ट्य. यंदा प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल  यांना पद्य पुरस्कार मिळाला. तो जाहीर होताच गणेश धावत माझ्याकडे आला, म्हणाला, "आपण अनुराधा ताईंना  न्यूजरूम चर्चा साठी बोलवू या  का  ?"
मी विचारले, "त्या येतील का ?" त्या वेळी मोठया खात्रीने  गणेश ऊत्तरला होता,  "का नाही ?" आणि त्याच दिवशी  अनुराधा ताईं आल्या, गणेशच त्यांना आणायला गेला  होता... अनुराधा ताईंची मुलाखत छान रंगली. त्याच्यानंतर थोड्याच वेळाने गणेश  परत आला, कानाशी   असणारा  मोबाईल माझ्या हातात देऊन म्हणाला, कैलास   खेर  फोनवर  आहेत, त्यांना  मी मुलाखतीसाठी बोललोय, तुम्हीपण बोला... पलीकडून प्रसिद्ध गायक कैलासजी मोठ्या अदबीने बोलत होते, गणेशजीने  बुलाया है, तो हम ना नही  कह सकते... गणेशचा  लोक संग्रह आणि  लोक संपकॅ हा असा  आश्चर्यचकित करणारा होता... दर आठवड्यात तो जो क्राईम शो सादर  करत  असे  त्यामध्ये  त्याचं  हे सारं  कसब, कौशल्य  दिसत  असे... त्याच्या शोमध्ये  तो ज्याप्रमाणात माणसं  आणायचा, ते अनेकदा  मन  थक्क करणारं  असे. 
  काम करताना, कामात  स्वतःला  झोकून देताना  गणेशचा  चेहरा सतत  हसरा असे... गणेश  आपल्या सोबत ते निखळ हास्य घेऊन गेला आहे...   त्यांच्या  या दु:खात  आम्ही सारे  सहभागी  आहोत.

लोकमतमधील लेखापालाचा 27 लाखाचा अपहार


औरंगाबाद: लोकमतचा लेखापाल प्रशांत मुंदडा ( रा.मित्रनगर ) याने २७ लाखाचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.  मुंदडा विरुद्ध गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून या प्रकरणी लोकमतमधील लेखा विभागातील आणखी काही अधिकारी गुंतले आहेत. याच मुंदडाने औरंगाबादमधील आणखी एकास सहा लेखास चुना लावल्याचे समोर आले आहे.

प्रशांत मुंदडा हा लोकमतमध्ये अनेक वर्षांपासून लेखापाल होता. त्याने २७ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने १६ सप्टेंबरला अटक केली. या प्रकरणात लोकमतच्या लेखाविभागातील आणखी अधिकारी सामील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी मुंदडा अफरातफर करत होता.अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली. नंतर  नागेश्वरवाडीत राहणारे बावस्कर यांनाही मुंदडाने १ वर्षापूर्वी समर्थ मल्टीईंव्हेस्टमेंट या भावाच्या कंपनीत ९ लाख ३६ हजार ५५० लाख रु.गुंतवण्याचा सल्ला दिला.त्यापैकी २ लाख ३२ हजार वापस केले. पण ६ लाख ८१ हजार ही उरलेली रक्कम देण्यास मुंदडा टाळाटाळ करत असल्यामुळे बावीस्करांनी सरळ पोलिसांकडे धाव घेतली. ६ लाखांच्या फसवणूकीचा आणखी एक गुन्हा रविवारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.  .या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलास निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

मठ्ठ मटा आणि नेटिझन्सकडून झोड

स्मार्ट मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मटा ऑनलाईन मध्ये भल्या पहाटे एक न्यूज पडली...
शिवसेना नेते एकनाथ खडसे यांच्याकडून जैनमुनीचे कौतुक ...
यावर नेटिझन्सने चांगलीच झोड उठवली..
नंतर एकनाथ खडसे ऐवजी एकनाथ शिंदे करण्यात आले पण तोपर्यंत नेटिझन्सने मटाची पार इज्जत काढली..

वाचक किती सजग आहेत, हे यावरून दिसते आणि एक चूक किती महागात पडते हा त्याचा पुरावा
goo.gl/knBZ4m


स्टार अँकर मिलिंद भागवत यांचाही अखेर राजीनामा

मुंबई - विलास बडे पाठोपाठ स्टार अँकर मिलिंद भागवत यांनीही एबीपी माझाचा राजीनामा दिला आहे.याबाबतचे वृत्त बेरक्याने नुकतेच दिले होते. यामुळे एबीपी माझाला मोठा हादरा बसला आहे. बडे, भागवत दोघेही लवकरच IBN लोकमत जॉईन करणार आहेत.
एबीपी माझा १० वर्षांपूर्वी सुरु झाले, तेव्हापासून मिलिंद भागवत कार्यरत होते. रात्री १० च्या बातम्या म्हणजे मिलिंद भागवत असे सूत्र तयार झाले होते. एक शांत आणि संयमी अँकर असलेल्या  मिलिंद भागवत यांना चॅनलमधील लॉबिंगचा गेल्या काही महिन्यात मोठा  त्रास झाला होता, जेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तेव्हा दिल्लीचे मिलींद खांडेकर आणि मालकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करावा लागला.
एबीपी माझाचा खरा चेहरा मिलिंद भागवत गेल्यामुळं  माझाला मोठा हादरा बसला आहे. आता सारी मदार ज्ञानदा कदम , नम्रता वागळे आणि अश्विन बापट,यांच्यावर आहे. बाकी सर्व नवीन चेहरे आहेत.
तरुण भारत - नवशक्ती- नवभारत टाइम्स - सी न्यूज- ई टीव्ही मराठी- झी मराठी- झी 24 तास- असा प्रदीर्घ प्रवास करत गेली 10 वर्षे एबीपी माझा च्या यशासाठी झटणारा लोकप्रिय अँकर मिलिंद  भागवत यांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा 

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

विलास बडेचा अखेर एबीपी माझाला निरोप !

मुंबई - बेरक्याचे वृत्त नेहमीप्रमाणे तंतोतंत खरे ठरले आहे. युवा न्यूज अँकर विलास बडे याने अखेर एबीपी माझातून निरोप घेतला आहे. बडे यांनी स्वतःच्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट लिहून माझाचे आभार मानले आहेत. बडे लवकरच IBN लोकमतमध्ये जॉईन होणार आहेत ..

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

IBN लोकमतचा ABP माझा वर 'डोळा' !

मुंबई - टीआरपीमध्ये क्रमांक तीनवरून चारवर  गेलेल्या IBN लोकमतचा  ABP माझावर  चांगलाच 'डोळा' दिसतोय !  पुन्हा किमान तीनवर येण्यासाठी चांगले न्यूज अँकर भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी असलेल्या ABP माझाच्या तीन स्टार अँकरला बेस्ट ऑफर देण्यात आली.लॉबिंगला कंटाळलेल्या विलास बडेने तात्काळ होकार देत, ABP माझाचा राजीनामा दिला. रात्री १० च्या बातम्यांचा जुना जानता अँकरने होकार दिला असून राजीनामा दिल्याची  चर्चा आहे. मात्र एका लेडी अँकरने 'नम्र'पणे नकार दिला.
अनेक वर्ष नंबर वनवर राहिलेला ABP माझा आता दोनवर गेला आहे. त्यात काही स्टार अँकर सोडून जात असल्याने खांडेकरांचे धाबे दणाणले आहेत. चॅनलमध्ये काही विशिष्ठ  लोकांची  लॉबिंग सुरु आहे.. त्यात नव्या  लोकांची माती होत आहे.पूर्वी एकसंघ असलेला चॅनल आता गटबाजीने ग्रासला आहे.

चॅनलचे नाव एक ऑक्टोंबरला बदलणार
IBN लोकमतचे नाव आता 'न्यूज १८ लोकमत' होणार आहे. हा बदल १ ऑक्टोंबरपासून होणार आहे, केवळ आठ दिवस शिल्लक असताना अजून कसलीही जाहिरात नाही किंवा नवा प्रोमो नाही. नव्या संपादकांना नेमके काय करावे, हेच समजेनासे झाले आहे.

स्वदेशी ड्रेस कपाटात धूळ खात  पडले !
संघाच्या मुशीत तयार झालेल्या नव्या संपादकांनी महिलांनी अँकरिंग करताना स्लिव्हलेस ड्रेस घालायचा नाही असा फतवा काढला तसेच सर्व अँकरनी स्वदेशी कपडे वापरायचे असा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईत परस्पर घेण्यात आला, त्यानुसार सर्व अँकरचे मोजमाप घेऊन स्वदेशी कपड्यांचे ड्रेस शिवण्यात आले. ते आलेही पण दिल्लीवाल्यानी असे परस्पर करण्यास झापझाप झापले आणि कोणी सांगितला असा शहाणपणा ! असे खडे बोल सुनावले, मग काय स्वदेशी ड्रेस  कपाटात धूळ खात पडले असून खर्च अंगलट आला आहे. आता सर्व अँकरला हे ड्रेस दिवाळी भेट मिळणार का ? अशी कुत्सीत चर्चा सुरु झाली आहे.
संतापाची बाब म्हणजे कोणत्या लेडी अँकरकडे घरी कोणत्या रंगाच्या साड्या आहेत, हे ग्रुपवर टाकण्याचे फर्मान काढण्यात आले होते,काही महिलांनी ते टाकतेही ! पण स्वदेशी  प्लन अंगलट आला आहे.

आदरणीय / श्रीमती
चॅनलमध्ये नवे संपादक आल्यापासून 'आदरणीय / श्रीमती' हे दोन शब्द परवलीचे झाले आहेत. चहा आणणाऱ्या शिपायाला सुद्धा ' अहो आदरणीय, चहा आणता का ? हे वाक्य कानी पडत असल्याने सर्वजण हसून लोटपोट झाले आहेत. महिलांना 'श्रीमती ' हा शब्द वापरला जात असल्याने महिलाहि  चांगल्याच हिरमुसल्या आहेत. मध्यतंरी वजन, उंची मोजून वजन कमी करण्याचे सांगण्यात आले, त्यावरून चांगलाच गदारोळ झाला.
ग्रुपवर कसल्याही सूचना पडत असल्याने सर्वजण हैराण झाले आहेत.रात्री दोन वाजता घरी गेलेल्या एका अँकरला सकाळी आठ वाजता, अहो आदरणीय उठा, हा व्हायरल झालेला  मेसेज चांगलाच गाजला !
कन्टेन्ट पेक्षा अश्या फालतू गोष्टीवर लक्ष सुरु असल्याने चॅनल अजून खड्ड्यात जात आहे.

माणिक मोतीला एचआरची पाचर
माणिक मोतीने राजीनामा दिला खरा पण त्याचा राजीनामा किमान तीन महिने  मंजूर करायचा नाही अशी पाचर एचआरने मारली आहे. त्यामुळे चॅनल सोडायचे असेल तर माणिक मोतीला तीन महिन्याचा पगार द्यावा लागेल. राजीनामा मंजूर न झाल्याने टीव्ही ९ मध्ये माणिक मोती जॉईन होवू शकला नाही.
माणिक मोती बद्दल पाच महिलांनी विविध गँभीर तक्रारी केल्याने एचआरने चांगलीच पाचर मारल्याचे कळते ! उस्मानाबादी रिपोर्टरच्या शिफारशीनुसार 'फणस' ने माणिक मोतीला घेतले खरे पण 'फणस' जाताच माणिक मोती वेगळ्या गोष्टीत गुंतला ! आणि स्वतःची माती करून घेतला !
......
तरुण वार्ताहर बेदरे यांची खासगी कारणावरून आत्महत्या

गेवराई,-  एका दैनिकाचे गेवराई येथील वार्ताहर  जगदिश बेदरे ( वय ३२) यांनी शिवाजीनगर येथील राहत्या घरी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.  प्लॉटिंगच्या आर्थिक व्यवहारातून   आत्महत्त्या केल्याचे  समोर आले आहे 
       गेवराई येथील वृत्तपत्राचे जुने  विक्रेते महादेवराव बेदरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा व मुलगी आहे. घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा पर्यंत गेवराई पोलीस पंचनामा करत होते. दरम्यान या घटनेची माहिती समजताच गेवराई शहरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

मानबिंदूच्या इंग्रजी पेपरच्या संपादकांचा अवघ्या अडीच महिन्यात राजीनामा

नाशिक - मानबिंदूच्या पेपरच्या नाशिक आवृत्तीच्या संपादकांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. मानबिंदूतर्फे आयोजित करण्यात येणा-या महामॅरेथॉन स्पर्धेची नाशिक आवृत्तीकडून विशेष तयारी सुरू असताना त्यातच अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या तोंडावर टाईम्सच्या संपादकांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे नाशिकच्या आवृत्तीत गटातटाचे राजकारण सुरू असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
आधीच कर्मचारी पुरेशी वेतनवाढ न झाल्याने आणि मानबिंदू ऐवजी दुस-या अन्य कंपनीचे कर्मचारी म्हणून दाखविल्याने कर्मचा-यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली असताना इंग्रजी आवृत्तीच्या संपादकांनी १ जुलै २०१७ पासून कारभार हाती घेतल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यात दिलेला राजीनामा बराच काही सांगून जाणारा आहे. जुलै महिन्यापासून कार्यभार स्वीकारताना टाईम्स नाशिक आवृत्तीला नवा चेहरा द्यायचा या हेतूने या महाशयांनी अनेक कठोर निर्णय घेतले. जुन्या संपादकांचा अलगद कापलेला पत्ता, आपल्याच मर्जीतले कर्मचारी कायम ठेवून इतरांना घरून बातम्या भाषांतर करून पाठविण्याचा दिलेला अजब सल्ला, शहरातील मध्यवर्ती भागातून आपले कार्यालय मराठी आवृत्तीच्या ग्रामीण भागाचे तसेच प्रिंटिंग युनिट असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करणे, कर्मचा-यांवर वरच्या आवाजात बोलून धाकात ठेवण्याचा प्रयत्न करणे असा हर प्रकारचा खटाटोप करूनही ह्या महाशयांनी फोनवर राजीनामा देत असल्याचे तसेच उद्यापासून प्रेस लाईन मध्ये माझे नाव यायला नको अशी औरंगाबादस्थित 'भगवान' बालाजींना कळवून यांनी थेट पुणे गाठल्याचे कळते आहे. मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील एका नामांकीत हॉटेल मध्ये टी शर्ट अनावरण सोहळ्याला आपल्याला का बोलावले गेले नाही ?असा सवाल उपस्थित करत इंग्रजी आवृत्तीच्या महाशयांनी बाबूजींना अलविदा केले आहे.
टी शर्ट अनावरण सोहळ्यास शहरातील बडे प्रस्थ असलेल्या मान्यवरांसह क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यास कार्यालयातील सर्वच विभागातील प्रमुखांना बोलविण्यात आले होते. अनावरण सोहळ्याची वेळ जवळ येऊ लागताच विभागप्रमुखांनी इंग्रजी महाशयांसमोर आपल्या वाहनांना सेल मारत तळ ठोकला आणि इंग्रजी महाशयांना बरोब्बर कार्यक्रमापासून दूर ठेवण्याची खेळी यशस्वी करून दाखवली. रात्रीच्यावेळी सर्वकाही झाल्यानंतर कार्यक्रमाचा फोटो छापण्याची वेळ येते तेव्हा मात्र या फोटोकडे बघत इंग्रजी आवृत्ती महाशयांची तळपायाची आग थेट मस्तकात जाते आणि या अनोख्या राजीनामानाट्याला सुरुवात होते. स्वतःच्या वेगळ्याच तो-यात जगणा-या समूहाच्या प्रत्येक इव्हेंट मध्ये उसना भाव खाऊन जाणा-या सहाय्यक उपाध्यक्षाने अशी खेळी का खेळली ?, मराठी आवृत्तीच्या संपादकाला साजेसे व्यक्तिमत्व नसताना, आठवड्यातून एकदा लेख प्रसिद्ध होणा-या तसेच या लेखासाठी आठवडाभराच्या सर्वच पेपरच्या फाईल चाळून, आपल्या पदापेक्षा खालच्या पातळीतील परंतु आपल्यापेक्षा त्याची बौद्धिक पातळी जास्त असल्याने या आठवडाभराच्या लेखासाठी वरिष्ठ उपसंपादकाकडून टिप्स घेत प्रसंगी आपला लेख त्याच्याकडून फायनल करून घेत असलेल्या निवासी संपादकाला मात्र फुकट मिरवले जात असल्याने इंग्रजी टाइम्सचे कर्मचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

सकाळला पुरस्कार ! अभिनंदन !मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

'बेरक्या' ठरला तिच्यासाठी 'देवदूत' !


चॅनेलवल्यानी नाहक बदनामी  केल्यामुळे मी आत्महत्या करणार होते ! 

पण बेरक्याने सत्य बाजू मांडून धीर दिल्यामुळे विचार सोडून दिला !

पुण्याच्या भाग्यश्री होळकर यांचा खळबळजनक खुलासा !!  

पुणे - औरंगाबादच्या बँक कर्मचाऱ्यांच्या खून प्रकरणी आरोपी म्हणून चॅनेलवर जेंव्हा माझे फोटो पाहिले, तेव्हा माझाच माझ्यावरील विश्वास उडाला, प्रचंड मानसिक धक्का बसला, आत्महत्या करण्याचे डोक्यात विचार सुरू झाले, त्याच अवस्थेत मी हडपसर पोलीस स्टेशन गाठले, तिथे बेरक्या रिपोर्टरची भेट झाली, त्यांनी धीर देवून बेरक्याने तुमची बाजू लावून धरल्याने  सांगितले आणि न्यूज दाखवली ! काळजी करू नका, आम्ही तुमची सर्व बाजू मांडू असा धीर दिला, त्यानंतर मी आत्महत्याचा विचार सोडून लढायला शिकले,असा खळबळजनक खुलासा पुण्याच्या भाग्यश्री होळकर यांनी केला आहे...

आजपर्यंत मी बेरक्या ब्लॉग वाचला नव्हता किंवा बेरक्या कोण आहे हे मला माहित नाही पण बेरक्याने माझा जीव वाचवला आहे, नंतर मी बेरक्या ब्लॉगवर सर्व न्यूज पहिल्या, माझी बाईट पहिली , ज्यांनी माझी बदनामी केली त्यांना चांगले झोडपून काढले आहे, बेरक्या माझ्यासाठी देवदूत आहे, असेही भाग्यश्री होळकर म्हणाल्या !

कोणतीही खातरजमा न करता, केवळ नावात साधर्म्य लावून फोटो शोधणे, आरोपी म्हणून जगभर प्रसिद्ध करणे हे त्या पत्रकाराचे अत्यंत नीच कृत्य आहे, मी एबीपी माझा, IBN लोकमत चॅनेलवर गुन्हा दाखल केलाय , त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे .. ती कारवाई काय असेल हे आता सांगणार नाही, पण करून दाखवेन, असेही भाग्यश्री होळकर म्हणाल्या !

.....

मित्रानो, पुण्याच्या भाग्यश्री होळकर यांची चॅनेलवाल्यानी नाहक बदनामी केली, या जागी आपले कोणी असते तर काय केले असते, याचा कोणी गांभीर्याने विचार केला आहे का ?
बेरक्या रिपोर्टरने सदर महिलेची भेट घेवून तिची बाजू भक्कमपणे मांडली, बाईट घेवून तो बेरक्या ब्लॉगवर प्रसारित केला म्हणून भाग्यश्री शांत झाल्या ! यदाकदाचित त्यांनी जीवाचे बरेवाईट करून घेतले असते तर आज बदनामी करणारे जेलमध्ये गेले असते ! 
लक्षात ठेवा ! बेरक्या सत्य छापतो ! इतकेच काय एखाद्याचा जीव वाचवतो ! 
याचा धडा घेवून आता तरी बोध घ्या ! पूर्ण खात्री झाल्याशिवाय फोटो प्रसारित किंवा प्रसिद्ध करू नका !! 

- बेरक्या उर्फ नारद

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

उघडा डोळे, बघा नीट ! नव्हे कान बंद, डोळे मिट !!

खरी आरोपी
औरंगाबाद बँक कर्मचारी खून प्रकरणी खरी आरोपी महिला कोण आहे आणि त्याची न्यूज पहा...

मात्र इंटरनेटवर । फेसबुक वर सर्च करून, नावात साधर्म्य पाहून भलत्याच महिलेचे फोटो व्हायरल झाले, 
चॅनेलवरही तेच फोटो झळकले, ABP माझा, IBN लोकमत सारख्या प्रतिष्ठित चॅनेलने हे फोटो दाखवल्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि सोशल  मीडियावर हे फोटो झपाझप व्हायरल झाले, 
पण आपण चुकीचे फोटो व्हायरल करून एका चांगल्या आणि प्रतिष्ठित महिलेची नाहक बदनामी करीत आहोत, याचे भान कोणाला नव्हते!

कसलीही खातरजमा न करता, पोलिसांना न विचारता एखाद्या महिलेचे फोटो व्हायरल करणे , हा गंभीर गंभीर गुन्हा आहे, आपण एखाद्या महिलेला नाहक आयुष्यातुन उठवतोय, याची जरा सुद्धा लाज नव्हती, 

Lokmat News
औरंगाबादच्या काही पत्रकारांच्या चुकीमुळे अनेक नेटीझन्सला घाली मान घालण्याची वेळ आली आहे आणि चॅनेलच्या बातम्यावर कितपत विश्वास ठेवायाचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे ...

औरंगाबादचे काही पत्रकार स्वतः ला स्टार पत्रकार समजत होते, आम्ही इतक्या वर्षांपासून पत्रकारिता करतो, ही घमेंड होती, काही चॅनेल चे ब्युरो हवेत होते, त्यांचा मुखवटा गळून पडला आहे,

abp माझाने चुकीचा फोटो वापरला
मागे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वीज बिल संदर्भात उघडा डोळे, बघा नीट चॅनेलचा स्वतः ला स्टार पत्रकार  समजणारा "कुकर्मी"ने  ऑन एअर चुकीची माहिती सांगितली, वीज बिल तीन महिन्यांपासून थकले असताना, अनेक वर्षांपासून थकल्याचे सांगितले, त्यावेळी चॅनेल तोंडावर आपटले.
लातुरात ३०० मुलीची तस्करी, या बातमीतही चॅनलने माती खाल्ली ! या खोट्या बातमीमुळे चॅनल बदनाम झाले ! लोकांनी धो धुतले ! कुकर्मी पुन्हा एकदा उघडा पडला !
सनसनाटी बातमी देण्याच्या नादात आपण समोरच्याची किती नाहक बदनामी करतोय, याचे भान नसते, 
रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी चक्क तीन बातम्यामध्ये चॅनेल ने माती खाल्ली!
नंबर 1 चे यश पचवण्यात जड जातंय की ते राहण्यासाठी चुका घडताहेत, याचे खांडेकरांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे...

तुम्ही लोकांकडे एक बोट करता, पण लोकांचे तुमच्याकडे चार बोटे असतात!

चॅनलमध्ये सध्या डोळे झाकून काम सुरू आहे, बातम्याची "खिचडी" कच्ची शिजत असल्याने चॅनलचा टीआरपी घरसत आहे...

आता तरी
उघडा डोळे, बघा नीट

नाही तर 
कान  बंद, डोळे मिट

म्हणण्याची पाळी दर्शकांवर येईल ...
.....................

पीडित महिलेची बाईट ऐका

पीडित महिलेने पुण्यात दोन चॅनलविरुद्ध गुन्हा दाखल केला.

एबीपी माझाला नेमकं झालंय तरी काय ?

मुंबई - नंबर 1 दावा करणाऱ्या एबीपी माझाने काल रविवारी एकाच दिवशी तीन बातम्यांमध्ये मोठी घोडचूक केली, या तिन्ही बातम्याबाबत सोमवारी जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की चॅनेलवर ओढवली...

बातमी नं.1
14 भोंदू बाबाची जी यादी जाहीर करण्यात आली त्यात चुकीचे आणि भलत्याच बाबाचे फोटो वापरण्यात आले...

बातमी नं. 2
दोन महिन्यांत पेट्रोलचे भाव 16 रुपयांनी वाढले
- हे सफशेल चुकीचे निघाले , दोन महिन्यांत 6 रुपये भाव वाढले आहेत..

आणि 
बातमी नं. 3
औरंगाबाद बँक कर्मचारी खून प्रकरणात आरोपी म्हणून भलत्याच महिलेचे फोटो वापरण्यात आले ...
यामुळे एका महिलेची नाहक बदनामी झाली ..

पहिल्या दोन बातम्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी तिसऱ्या बातमी प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झालाय...

बातम्यांची "खिचडी" कच्ची शिजत असल्यामुळे संपादक राजीव खांडेकर यांना  मनस्ताप सहन करावा लागतोय ....
एव्हडे मात्र खरे आहे की, चॅनेलला नंबर 1 राहण्यासाठी  अतिजलद बातम्या द्यावा लागत आहेत,वेगळ्या स्टोऱ्या द्यावा लागत आहेत, त्यातून अश्या घोडचुका घडत आहेत ..

"उघडा डोळे बघा नीट" अशी चॅनेलची टॅगलाईन असली तरी, चॅनेललाच आता "डोळे" झाकून नव्हे उघडे ठेवून काम करण्याची गरज आहे...

"ABP माझा " ला आता मानसोपचारची गरज आहे !
"ABP माझा" चा आणखी एक पराक्रम.
मंत्री पांडुरंग फुंडकर यांना केले प्रतिनिधी !

रिपोर्टरचे नाव पांडुरंग रायकर असे आहे.
मात्र,
ABP माझा ने चक्क पांडुरंग फुंडकर केले....

पाहा टीव्ही 9 ची घोडचूक....

मुंबईच्या महापुरावर उपाय काय ?
पाहा टीव्ही 9 ची घोडचूक
ऑन एअर करताना जरा काळजी बाळगा रे !
आउटपुटचे जोशी बुवा आणि बेदम काय गोट्या खेळत होते का ?


रविवार, १० सप्टेंबर, २०१७

धक्कादायक ! उघडा डोळे, बघा नीट !!

औरंगाबाद मर्डर प्रकरणात टीव्ही चॅनेलवर झळकलेले महिला आरोपीचे ते फोटो नव्हेच ....

इंटरनेटवरून सर्च करून शोधलेले फोटो मीडियाच्या अंगलट येणार ....

औरंगाबाद - औरंगाबादच्या एका खासगी बँकेत काम करणाऱ्या जितेंद्र होळकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता, हा खून त्यांचीच पत्नी भाग्यश्री होळकर हिने सुपारी देवून केल्याचे निष्पन्न झाले...
या प्रकरणी पोलिसांनी भाग्यश्री आणि अन्य तिघे अश्या चौघाना अटक केली..त्याची बातमी रविवारी अनेक चॅनेलवर झळकली !
बातमी देताना उघडा डोळे, बघा नीट चॅनेल तसेच काही चॅनेल आणि वेबसाईटवर आरोपी भाग्यश्री होळकर यांचे फोटो भलत्याच भाग्यश्री होळकर यांचे देण्यात आले...
फेसबुकवर भाग्यश्री होळकर असे सर्च करून ते फोटो शोधण्यात आले आणि हा शोध मीडियाच्या अंगलट आला आहे...
ज्यांचे फोटो चॅनेलवर झळकले ती महिला बार्शीची असून ती सध्या पुण्यात राहते...
ज्यांनी चॅनेलवर तिचे फोटो आरोपी म्हणून दिले त्यांच्यावर कोटीचा दावा ठोकण्याची तयारी सुरू आहे ...
आरोपी भाग्यश्री होळकर हिचा खरा फोटो लोकमतने प्रकाशित केला आहे...
आम्हीही हा फोटो देत आहोत ...
काल चुकीचा फोटो प्रसारीत करणारे नेमके चॅनेल आणि त्यांचे पत्रकार कोण ?
ते चॅनेलवरून जाहीररीत्या माफी मागणार का ? याकडे लक्ष वेधले आहे ...
उघडा डोळे बघा नीट चॅनेलच्या रात्री साडेसातच्या बुलेटिन मध्ये भलत्याच भाग्यश्री होळकरचे फोटो प्रसारित झाले होते, उशिरा ही चूक लक्षात येताच त्यांनी यु ट्यूब मधून ते बुलेटिन डिलीट केले मात्र यांनी केलेला हा खोडसाळपणा भरून येणार आहे का ?

पुण्यात गृहिणी आलेल्या भाग्यश्री होळकर यांचा, औरंगाबाद मर्डर प्रकरणाशी संबंध जोडून काही चॅनेलने नाहक बदनामी केली, यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे,
या महिलेचे काय म्हणणे आहे ऐका ....

चॅनल वर आरोपी म्हणून फोटो दाखवणाऱ्या एबीपी माझा आणि ibn लोकमत विरुद्ध पीडित महिलेची पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तर्कार दाखल ... दोन्ही चॅनलविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार

अक्षता म्हात्रेच्या आत्महत्येचे नेमके कारण काय ?


अलिबाग - एका दैनिकातील लेखापाल अक्षता म्हात्रे ( अलिबाग ) हिने नुकतीच आत्महत्या केली आहे,
या आत्महत्येबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहे.
पोलिसांनी याचा छडा लावून नेमके कारण शोधून काढावे, अशी मागणी होत आहे.

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

अँकर विलास बडे याची लवकरच घर वापसी !

मुंबई - "एबीपी  माझा " चा युवा अँकर विलास बडे लवकरच घर वापसी करतोय. त्याने एबीपी  माझाकडे  राजीनामा सुपूर्द केला असून नोटीस परेड संपताच  IBN लोकमत जॉईन करेल. बडेला एबीपी माझा पेक्षा ३० टक्के पॅकेज वाढवून मिळाल्याची  चर्चा आहे.
पत्रकारितेची  पदवी घेतल्यानंतर मुंबई सकाळ मध्ये  काही काळ बातमीदार म्हणून काम केलेल्या विलास बडे यांनी नंतर  साप्ताहिक लोकप्रभा मध्ये  अनेक स्टोऱ्या गाजवल्या. त्यानंतर त्याने IBN लोकमत मध्ये एंट्री केली. टीव्ही मीडियाचा अनुभव घेतल्यानंतर जय महाराष्ट्र मध्ये  रिपोर्टींग केली. त्यानंतर "एबीपी  माझा " मध्ये अँकर म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होता.  मात्र बडेनी   पुन्हा त्यांनी घर वापसी  करण्याचा निर्णय घेतलाय. बडे यास IBN लोकमत मध्येही न्यूज अँकर आणि सिनियर प्रोड्युसर म्हणून पद देण्यात आले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

IBN लोकमत चे नामकरण  न्यूज १८ लोकमत असे  होणार आहे. त्यामुळे TRP आणखी घसरणार आहे. मात्र डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चॅनलने चांगली माणसे भरण्यास सुरुवात केली आहे. बडे सोबत "एबीपी  माझा"ची  आणखी  एक युवती अँकर IBN लोकमत जॉईन करणार असल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षभरात एकूण १५ जणांनी "एबीपी  माझा " सोडला असून चॅनल मध्ये  काही विशिष्ठ लोकांची लॉबिंग सुरु आहे. त्यामुळे अनेकांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळेच अनेकजण राजीनामा देत आहेत.

IBN लोकमत खड्यात घातलं कुणी ?

मंदार फणसे यांनी IBN लोकमतचा राजीनामा दिल्यानंतर सहा महिने संपादक पद रिक्त होते. त्यामुळे माणिक मोतीकडे जवळपास संपादक पदाचा चार्ज होता. मात्र माणिक मोतीने घाणेरडे राजकारण करून चॅनेल मातीत घातले. चॅनेल तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे नवीन संपादक येताच माणिक मोतीचे अधिकार कमी केले. त्यात काहीजण चॅनल सोडून गेले. एका प्रेम प्रकारणामुळे चॅनल बदनाम झाले.
त्यात नाव बदलले तर अजून TRP घसरेल हि भीती निर्माण झाल्यामुळे चॅनलने अनेक चांगल्या लोकांना स्वतःहून ऑफर दिली आहे. त्यामुळं अनेक चांगले लोक येत्या काही काळात जॉईन होतील, असे सांगितले जातंय.

माणिक मोती ने उघडा डोळे बघा नीट मध्ये संधीसाधू प्रकरण केल्यानंतर खरं तर परभणी गाठावी लागली होती. मात्र कसे तरी साम मिळाले होते. उस्मानाबादच्या एका स्टार रिपोर्टरच्या शिफारशीनुसार बदलून गेलेल्या संपादकांनी   माणिक मोतीला IBN लोकमत मध्ये संधी दिली होती. मात्र नेहमीच कुकर्मची सवय लागलेली असल्यामुळे अखेर मातीतच पाय गेले. आता चांगल्या समाजासाठी मध्ये माणिक मोती काय दिवे लावणार ? हे लवकरच कळेल.


जाता जाता

विलास बडे सांगतोय स्वतःची  कारकिर्द

बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

गौरी लंकेश हत्येचा मुंबईत तीव्र निषेध

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येचा आज मुंबईतील विविध पत्रकार संघटनांनी एकजुटीने निषेध केला. मुंबई प्रेस क्लबने निषेधासाठी आयोजित केलेल्या 'मेणबत्ती जागरा'ला मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती. निषेधाच्या घोषणा तसेच फलक झळकावत यावेळी पत्रकारांनी या कृत्याचा निषेध केला. गौरी लंकेश यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध होत आहे. दिल्ली, मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये या हत्येविरोधात निदर्शने करत विविध पत्रकार संघटना, सामाजिक संघटनांनी निषेध नोंदवला. मुंबईत प्रेस क्लबचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत प्रेस क्लबजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुंबई मराठी पत्रकार संघाकडून निषेध

मुंबई: निर्भिड  पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वाबळे यांनी म्हटले आहे की, 'गौरी लंकेश पत्रिके' या साप्ताहिकाच्या संपादिका असलेल्या गौरी लंकेश या निर्भिड आणि परखड लिखानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या या लिखानाने पिसाळलेल्या माथेफिरु प्रवृत्तीनेच त्यांचा बळी घेतला असावा असे दिसते. एका असहाय्य महिलेला एकांतात गाठून तिची निर्घूण हत्या करणे यासारखा दुसरा भ्याडपणा कोणता असू शकतो? पण व्यक्ती मारल्याने विचार मरत नसतात.
दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंतांची हत्या करणारे आरोपी अद्यापही मोकाट असताना गौरी लंकेश यांची झालेली हत्या धक्कादायक आहे. या हत्येची कसून चौकशी करुन आरोपींना त्वरीत गजाआड करावे अशी आमची मागणी आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ या भ्याड हत्येचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.

अकोल्यातील दिव्य मराठीच्या पाच कर्मचाऱयांच्या मजिठिया लढाईला मोठे यश

 कलेक्टर करणार रकमेची सक्तीने रिकव्हरी!

 ● अकोला सहाय्यक कामगार आयुक्त विजयकांत पाणबुडे यांनी डीबी कॉर्प'च्या 'दिव्य मराठी'तील पाच कर्मचाऱयांना मजिठिया आयोगाचे एरिअर्स लाभ मिळावेत म्हणून रिकव्हरी क्लेम प्रोसेस सुरू करण्याचे निर्देश जारी केले आहेत. 18 ऑगस्ट रोजी डीबी कॉर्प प्रशासनाला नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसीनंतरही कंपनीने पाचही कर्मचाऱयांना क्लेम रक्कम दिली नाही तर कलेक्टर महसूल विभागाच्या वसुलीसाठी जप्ती कारवाई करतात तशी दिव्य मराठी कार्यालयांची जप्ती करून रिकव्हरी क्लेम अदा केले जातील.
पाच कर्मचारी व त्यांचे मंजूर क्लेम असे -
दीपक मोहिते, पेजमेकर (13,52,252)
राजू बोरकुटे, पेजमेकर (12,66,275)
मनोज वाकोडे, डिझायनर (11,75,654)
संतोष पुटलागार, पेजमेकर (11,98,565)
रोशन पवार, डीटीपी इनचार्ज (6,17,308)
 
 
 न्यूज फ्लॅश
 
● 'पुढारी'च्या प्रस्तावित जळगाव आवृत्ती प्रमुख पदी धो. ज. गुरव यांची नियुक्ती, कार्यालयाच्या जागेसाठी शोध सुरू.

● जळगाव 'दिव्य मराठी'त अखेर दीपक पटवे पंटर चरणसिंह पाटील यांची मुख्य वार्ताहर म्हणून नियुक्ती; घरगुती संबंधांचा व चरणी निष्ठा वाहिल्याचा फायदा; विजय राजहंस यांना कामगिरी समाधानकारक नसल्याचे कारण दाखवून केले पदावनत, पटवे यांची मर्जी सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करूनही चरणसिंह यांच्यासारखी "सेटींग" करण्यात अयशस्वी ठरल्याने या वयात आली फील्डवर रिपोर्टींगची नौबत...

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

हल्ला आणि खोटा गुन्हा ...


एखादा पत्रकार प्रामाणिक पत्रकारिता करीत असेल तर त्यांच्यावर खोटे गुन्हे कसे दाखल होतात, पोलीस कसा छळ करतात हे आपण अमरावतीचा प्रशांत कांबळे प्रकरणात नुकतेच पहिले आहे. त्यापूर्वी उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांच्या बाबतीतही असेच घडले होते...

नेमके काय घडले. कसे घडले हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा...

अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग आहे..

पत्रकारांनी हा लेख हमखास वाचावा ...

संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लीक करा...
 
हल्ला आणि खोटा गुन्हा ... एक वर्ष पुर्ण !

IBN लोकमतचे लवकरच नामकरण !


मुंबई - "चला जग जिंकू" या अशी  टॅगलाईन घेवून आलेल्या IBN लोकमत मधून निखिल वागळे सह एक मोठी टीम बाहेर पडल्यानंतर "महाराष्ट्राचं महाचॅनल" अशी नवी टॅगलाईन करण्यात आली होती; आता चॅनलचे नावच बदलण्यात येत आहे. "न्यूज १८ लोकमत" असे चॅनलचे नाव राहील,
नेटवर्क १८ चे अधिकार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे गेल्यानंतर हिंदी न्यूज चॅनल IBN 7 चे नाव NEWS 18 इंडिया करण्यात आले होते. मराठी चॅनल IBN लोकमतचे नाव मागेच बदलण्यात  येणार होते. मात्र वागळे गेल्यामुळे अगोदरच TRP  घसरल्यामुळे अजून TRP  घसरेल म्हणून हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.  आता त्याचा मुहूर्त सापडला आहे."न्यूज १८ लोकमत" हे नवे  नामकरण  येत्या महिनाभरात होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

सध्या चॅनल मध्ये अनुभवी संपादक नसल्यामुळे TRP  अजून घसरला असून चॅनल चौथ्या क्रमांकावर गेले आहे. चॅनलचे नाव बदलल्यानंतर आणखी TRP  घसरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. चॅनेल मध्ये "काथ्याकूट" सुरु असल्यामुळे चॅनलची वाट लागत आहे.
गळती सुरु
नवे संपादक येताच, आऊटपुट हेड माणिक मुंडे टीव्ही ९ मध्ये गेले.त्यानंतर IBN लोकमतचा मुख्य कणा असलेले अनिल सरंगळे चॅनलला रामराम ठोकून टाइम्स नाऊला गेले आहेत. अनिल सरंगळे हे चॅनलमध्ये सुरुवातीपासून ग्राफिक्स हेड होते. ते गेल्यामुळे ग्राफिक्सची वाट लागणार आहे. त्याचबरोबर दोन वरिष्ठ लवकरच बाहेर पडणार आहेत. त्यामुळे "महाराष्ट्राचं महाचॅनल" फक्त नावापुरतं राहील अशी शंका व्यक्त केली जात आहे. 


News Update 
IBN लोकमत मध्ये गळती सुरूच...
मंगेश चिवटे यांचा राजीनामा ... जय महाराष्ट्र जॉईन करणार
चॅनेलमध्ये काथ्याकूट सुरूच  ... आणखी दोन वरिष्ठ राजीनामा देण्याच्या तयारीत


.....

जाता जाता

मुंबई - टीव्ही ९ मधून बाहेर पडलेले निलेश खरे अखेर साम चॅनल मध्ये संपादक म्हणून जॉईन  झाले आहेत.

ABP माझा, मी मराठी, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ असा प्रवास करीत खरे साम मध्ये जॉईन झाले आहेत.
बेरक्याचे वृत्त नेहमीप्रमाणे "खरे"  ठरले आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook