> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, ३१ जुलै, २०१७

प्रसाद काथे अखेर जॉईन

मुंबई - बेरक्याचे भाकीत नेहमीप्रमाणे खरे ठरले आहे. प्रसाद काथे यांनी एन.डी. टीव्ही इंडियास राम राम करून IBN लोकमत जॉईन केले आहे. त्यांच्याकडे संपादक तथा व्यवस्थापकीय  कार्यकारी संपादक  पद देण्यात आले आहे.
मंदारची जागा प्रसाद काथे  घेणार हे वृत्त बेरक्याने १८ जुलै रोजी दिले होते. हे वृत्त खरे ठरले आहे. काथे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे.
त्यांच्या निवडीबद्दल IBN लोकमत मधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रविवार, ३० जुलै, २०१७

उमेश कुमावत यांचा अवघ्या एक महिन्यात राजीनामा

मुंबई -   टीव्ही 9  ( मराठी ) चे सल्लागार संपादक निखिल वागळे यांच्या पाठोपाठ व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांची विकेट पडली आहे.  कुमावत यांनी अवघ्या एक महिन्यात राजीनामा दिल्याने उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे.
टीव्ही 9 ( मराठी ) चे सल्लागार संपादक म्हणून निखिल वागळे १ मे रोजी जॉईन झाले होते. त्यांना अवघ्या तीन महिन्यात चॅनेल सोडावे लागले. पाठोपाठ कुमावत याना अवघ्या एक महिन्यात चॅनल सोडावे लागले आहे . तत्पूवी आऊटपुट हेड अभिजित कांबळे आणि इनपुट हेड प्रीती सोमपुरा यांनाही चॅनल सोडावे लागले आहे. वागळे यांचे कारण सध्या चर्चेचा विषय झाला असताना कुमावत यांच्याबद्दल सध्या मीडियात  मोठे गॉसिफ सुरु आहे.

नेमके काय घडले ?
टीव्ही 9  ग्रुप मध्ये सल्लागार म्हणून विनोद कापरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कापरी यांनी यापूर्वी इंडिया टीव्ही आणि न्यूज एक्स्प्रेस मध्ये संपादक म्हणून काम केले आहे. तीच कार्यपद्धती त्यांनी टीव्ही 9 मध्ये सुरु केली आहे. त्यामुळे कुमावत त्रासून गेल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे कुमावत यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे त्यांच्याबद्दल एक गॉसिफही  तिखट मीठ लावून चर्चेले जात असून त्यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे मीडियात चर्चा सुरु आहे.
"खरे"  खोटे  कुमावत यांनाच माहित आहे. कुमावत यांनी खुलासा केल्यास तो खुलासा बेरक्यावर प्रसिद्ध केला जाईल.
कुमावत आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा करणार का ?

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

लढा पत्रकार एकजुटीचा...

मुख्यमंत्र्यांनी दिले स्वतंत्र चौकशीचे आदेश,

10 आमदारांनी केली लक्षवेधी दाखल, पत्रकारांचा लढा निर्णायक वळणावर.....

पत्रकार प्रशांत कांबळे ,अभिजित तिवारी व बुलढाणा येथील प्रताप कौसे यांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवून, त्यांची  पत्रकारिता संपवण्याचा प्रयन्त अमरावती बुलढाणा पोलिसांनी केला होता. मात्र प्रशांतवरील अन्यायाच्या विरोधात  राज्यभरातील सर्व पत्रकार एकत्र आले आणि जोरदार लढा उभारला गेला. राज्यात ठीक ठिकाणी पत्रकार बांधवांनी निवेदनं दिली, आंदोलन केली.सर्वच पत्रकारांनी जमेल त्या पध्दतीनं या लढ्याला साथ दिली आणि हळूहळू या लढ्याला एक व्यापक स्वरूप आलं.

*अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार , समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले* यांनी स्वतः लक्ष घालून प्रशांतला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक संवेदनशील लोकप्रतिनिधींनी प्रशांतची बाजू घेतली आणि विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करण्याचं आश्वासन दिलं, *आज प्रशांतसंदर्भात तब्बल 10 पेक्षा जास्त आमदारांनी लक्षवेधी दाखल केली आहे.* दुसऱ्या बाजूने कायदेशीर लढाईसुद्धा सुरु झाली आहे.

आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही सर्व पत्रकार बांधव पुन्हा एकत्र जमलो आणि विधिमंडळाकडे मोर्चा वळवला. *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली,त्यांना निवेदन दिलं, *या प्रकरणी स्वतंत्र पोलीस चौकशीचे आदेश देत, प्रशांतला न्याय मिळवून देईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल.* त्यानंतर *गृहराज्यमंत्री रणजित पाटील* यांची भेट घेतली, या प्रकरणी दोषी आढळून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करेल असं आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी उपस्थित पत्रकारांना दिलं.

*विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे* यांची भेट घेतली, लक्षवेधीद्वारे प्रशांतचा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितल आणि त्याची प्रक्रियासुद्धा तात्काळ पूर्ण केली. *यावेळी पत्रकार विलास आठवले, यदु जोशी, दिलीप सपाटे, धर्मेंद्र झोरे, विवेक भावसार, रणधीर कांबळे, मनोज भोयर, विनोद राऊत, गोविंद तुपे, भारत भिसे, ,राजू सोनवणे, एहसान अब्बास, सुशांत सावंत, चौधरी, राहुल पहुरकर* यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. 

दुसरीकडे *शेकापचे नेते भाई जगताप, आमदार रवी राणा, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, प्रकाश गजभिये* यांच्यासह तब्बल दहा आमदारांनी या प्रकरणी लक्षवेधी दाखल केली आहे. पुढच्या आठवड्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रशांतचा मुद्दा समोर येईल. या प्रकरणात *यदु जोशी, विनोद राउत, ऍड.विवेक ठाकरे, राहुल पहुरकर* या चार पत्रकारांची चौकशी समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. राज्यातील सर्व पत्रकारांच्या एकजुटीतून सुरु झालेला हा लढा अजूनही पूर्णत्वास आलेला नाही, मात्र तो  निर्णायक टप्यात आलाय. यापुढे पोलीस कुणाचाही प्रशांत कांबळे, अभिजित तिवारी प्रताप कौसे करणार नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार आहे.
*राज्यातील पत्रकार संघटीत होवून हा लढा लढत आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या सर्वाना यश मिळेल.*

गुरुवार, २७ जुलै, २०१७

मंदार फणसे यांचा निखिल वागळेबाबतचा खुलासा...

 ( मंदार फणसे यांची फेसबुकवरील पोस्ट)


अलीकडेच निखिल वागळे सरांनी एक पत्र लिहून काही एक उल्लेख केला,की त्यांच्या नंतर ज्या दोघांना कार्यकारी संपादक IBN लोकमत,या पदावर नेमलं, ते एका भाजप नेत्याच्या सांगण्यावरून.हे वाचून माझी करमणूक झाली. दुसरं म्हणजे माझं त्यांना आव्हान आहे कि त्यांचा हा पोकळ गौप्यस्फोट त्यांनी सप्रमाण सिद्ध करावा, मी माझी पत्रकारिता सोडून माझ्या गावी जाईन.
उगीच उठसुठ उठून आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना बदनाम करायचं हा उद्योग मला किळसवाणा वाटतो.कीव येते. याबाबत माझ्या कडे अनेक तपशील आहेत.अनेक प्रतिवाद आहेत. गरज पडली तर तेही लिहीन लवकरच.कारण मी ही पत्रकार आहे,आणि लिहायला घाबरत, कचरत नाही. माझी IBN लोकमत ला पुन्हा लागलेली वर्णी ही माझ्या वकुबावर आणि माझ्या आतापर्यंतच्या मेहनत,कर्तृत्व आणि माझ्यावरील विश्वासावर होती. मी साम वाहिनी अभिजित पवारांच्या परवानगी ने सोडून IBN लोकमत ला पुन्हा रुजू झालो ते माझ्या जुन्या मित्रांनी (जे झी वाहिनी मध्ये होते,2000 साली सोबत आणि एक जण जो IBN ग्रुप च्या सुरुवातीला आम्ही सोबत काम केलं होतं त्याने )जेव्हा त्यावेळच्या रिलायन्स व्यवस्थापनाला सांगितलं तेव्हा माझ्या 2 बैठका झाल्या तेव्हा मला जबाबदारी देण्यात आली. हे या महाशयांनी लक्षात ठेवले तर बरे होईल. खरं तर लिहिण्यासारखं खूप आहे. पण संयम ठेवतो. आता आदर संपत आलाय. मी आणि महेश म्हात्रे या माझ्या ज्येष्ठ मित्राने जी जबाबदारी दिली होती ती आमच्या परीने उत्तम निभावली.खोटे धंदे केले नाहीत. मी माझ्या लहानपणापासून खूप मोठे ताकदीचे संपादक जवळून पाहिलेत.आणि त्यांचा व्यासंग,कळकळ,संपर्क हे सुद्धा बारकाईने पाहिलंय.2 ते 4 संपादक पाहून या व्यवसायात आलो नाही. आमच्या पिढीत झालेल्या पत्रकारितेतल्या एकूण पडझडीची जबाबदारी आमच्यावर सुद्धा आहे असंही मी मानतो. प्रामाणिकपणा ,बेधडक पत्रकारिता,आम्ही आमच्या परिघात आणि आमच्या संस्कारात करत आलो आहोत,आणि करूच. माझी पत्रकारितेतली बांधिलकी हि भारतीय संविधानाशी कटिबद्ध आहे.कुणाच्या बडबडीवर आणि धादांत खोट्या आरोपांवर नाही . इतकंच माझ्या मनातून जनात आणतोय,कारण खदखद मी जोमबाळून ठेवत नाही.तुम्ही किती चारित्र्यवान आहात हे सांगतांना उगीच दुसऱ्यांची चारित्र्य डागाळू नका इतकंच तूर्तास सांगतो.

- मंदार फणसे


लोकमत कर्मचाऱ्यांना यंदा वेतनवाढ नाही

औरंगाबाद - लोकमतच्या कर्मचाऱ्यांना यंदा वेतनवाढ मिळणार नाही, असे लोकमतचे मालक आणि मुख्य संपादक राजेंद्रबाबू दर्डा यांनी गुरुवारी जाहीर केले.पुढच्या वर्षी वेतनवाढ मिळेल पण कामाचा दर्जा आणि गुणवत्ता पाहूनच दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकमतने मजिठिया वेतन आयोगाला मूठमाती देत वेरिएबल पे लागू केला आहे, त्यामुळे लोकमतचे कर्मचारी अस्वस्थ झाले  आहेत.
चिकलठाणा भागातील दर्डा यांच्या मालकीच्या मंगल कार्यालयात गुरुवारी दुपारी कर्मचारी , कर्मचारी नेते, संपादक प्रशासकीय अधिकारी आणि मालक यांची मिटिंग झाली.
लोकमत मीडिया कंपनीला नोटाबंदीमुळे चालू वर्षी प्रचंड तोटा झाल्याचे सांगत खपही  कमी झाल्याची कबुली राजेंद्र दर्डा यांनी या मिटिंग मध्ये दिली. त्यामुळेच यंदा वेतनवाढ मिळणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच पुढच्या वर्षी कामाचा दर्जा आणि गुणवत्ता पाहून वेतनवाढ दिली जाईल, त्यासाठी पूर्ण युनिटचा परफॉर्मेंस  पाहिला जाईल, असे दर्डा यांनी सांगितले..
वेरिएबल पे नेमका काय आहे हे सांगण्यासाठी मुंबईहून दोघेजण आले होते. तसेच करण दर्डा, कापोर्रेट जनरल मॅनेजर राजीव अग्रवाल, जनरल युनिट मॅनेजर संदीप बिष्णोई, एच. आर. व्हाईस प्रेसिडेंट बालाजी मुळे आदी उपस्थित होते. राजीव अग्रवाल आणि संदीप बिष्णोई यांच्या सुपीक डोक्यातूनच वेरिएबल पे ची संकल्पना पुढे आल्याची चर्चा सुरु आहे...

बुधवार, २६ जुलै, २०१७

फक्त प्यादे बदलले!

टीव्ही ९ मराठीवरून निखिल वागळे यांचा 'सडेतोड' कार्यक्रम बंद झाला आणि चर्चा सुरु झाली. खरंतर अशा चर्चांमध्ये फार कुणाला रस नसतो. पण ज्यांच्या बुडाखाली जाळ पेटलाय त्यांना मात्र आगपाखड करावीच लागते. एक विकेट पडली की पुढचा नंबर कुणाचा, याची धास्ती लागून राहते. त्यामुळे जे घडले त्याला तात्त्विक मतभेदांचे अधिष्ठान द्यावे लागते. उद्या न जाणो आपली वेळ आलीच तर तेवढी ढाल सोबत असलेली बरी! एवीतेवी पदभ्रष्ट होणारच आहोत तर किमान त्यागमूर्ती म्हणून स्वतःची प्रतिष्ठापना करायला काय हरकत आहे? 


पत्रकार निखिल वागळे यांचंही सध्या असंच काहीसं झालंय. भाजपच्या विरोधात जाणारा शो केल्यामुळे माझा राजीनामा घेतला,  असा त्यांचा दावा आहे. गोरक्षकांना आवर घालण्यासाठी कायद्यात सुधारणा केल्या पाहिजेत का, या विषयावर त्यांनी १९ जुलैला डिबेट शो केला. यावरूनच टीव्ही ९ वर राजकीय दबाब आल्याचं सांगितलं जातंय. पण खरंच एका दिवसात असा शो बंद करता येतो का? याचं उत्तर मिळत नाही. 'सडेतोड' टीआरपी रेटिंगमध्ये नंबर वन होता, असंही त्यांचे म्हणणे आहे. पण चॅनलच्या म्हणण्यानुसार या शोचे रेटिंग काही खास नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात यावी, अशी चॅनलच्या टीमची इच्छा होती. हा शो रात्री ९ ते १० ऐवजी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत व्हावा, असे वागळेंना सुचवले गेले होते. पण वागळेंना ते मान्य नव्हते, म्हणून रेटिंग सुधारण्यासाठी त्यांना एक पूर्ण महिना दिला. तरीदेखील काहीच घडले नाही म्हणून शेवटी चॅनलने आपल्या अधिकारात वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आणि वागळेंना तसे कळवले. त्या इमेलचा स्क्रीन शॉटसुद्धा सोशल मीडियावर फिरतो आहे. मग या सगळ्या गोंधळात तत्त्व - निष्ठा असल्या गोष्टी येतातच कुठे? 


शेवटी चॅनल म्हणा किंवा वृत्तपत्र, हे त्यांच्या मालकांचे व्यवसाय आहेत. टीआरपी घसरला तर जाहिराती घसरतात. कोण स्वतःचे नुकसान करून घेणार? एक काळ होता जेव्हा निखिल वागळे हे नाव बऱ्यापैकी आदराने घेतले जायचे. आयबीएन लोकमतवरचा त्यांचा 'आजचा सवाल' गाजत होता. त्याआधीही 'आपलं महानगर' मधून त्यांनी काही काळ गाजवला होता. पण तो भूतकाळ झाला. त्या भूतकाळाच्या जोरावर - तेव्हाच्या प्रसिद्धीच्या बळावर त्यांचं सगळंच खरं म्हणता येणार नाही. निखिल वागळेंनी एके काळी आक्रमक पत्रकारिता केली खरी, पण नंतर त्यांनीच महेश मोतेवारसारख्या 'समृद्धी जीवन' चिट फंड घोटाळ्यातील आरोपीला साथ दिली. लाखो गोरगरिबांची आयुष्यभराची पुंजी लुटून उभारलेल्या साम्राज्याचे ते भागीदार झाले. काळ्या धंद्याच्या बचावासाठी सुरु झालेल्या 'मी मराठी' चॅनलचे सल्लागार झाले. लोकसत्तेचे माजी संपादक व कथित ज्येष्ठ विचारवंत म्हणून महाराष्ट्रात आदराने ज्यांचे नाव घेतले जाते, ते कुमार केतकरसुद्धा यात सामील होते. मग तेव्हा कुठे होते यांचे आदर्श? यांची तत्व? सामान्यांप्रती कळकळ? जमिनीपासून दोन बोटे वर चालणारे यांचे रथ असे धाडकन आपटले त्याला सगळेच साक्षीदार आहेत? मग आत्ताच का मीडियाची पवित्रता, निष्ठा वगैरेंचा साक्षात्कार व्हावा? 


निखिल वागळेंच्या नावावर टीआरपी मिळतो हे खरे असेल तर, महाराष्ट्र १ चे काय झाले? ' मी मराठी'ची नौका बुडायला आली तेव्हा वागळे आणि टीम सुमडीत बाजूला झाली. त्यांनतर वागळेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र १ चे लॉन्चिंग झाले. मग गाजले का ते चॅनल? चार चार महिने तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार नाही? टीम लीडर म्हणून किमान त्यांना तरी दिलासा देऊ शकले का हे तथाकथित निर्भिड - आक्रमक व्यक्तिमत्त्व? थकीत पगारासाठी न्यायालयाचे दार ठोठावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणेही यांना जमले नाही. मग आत्ताच कशाला पत्रकारितेचा - पत्रकारांचा पुळका आलाय? 


म्हणे विचारांची - अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय! अरे कसले आलंय स्वातंत्र्य? कसले विचार? तळागाळातल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा आव आणणाऱ्या पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, कुणी माई का लाल आहे का इथे? स्वतःला श्रेष्ठ समजणारे सगळेच ज्येष्ठ - श्रेष्ठ पत्रकार, मालकांच्या दावणीला बांधलेले. पॅकेज आणि ग्रुपिझमच्या नादात यांनीच पत्रकारिता विकायला काढली. मग मालक बदलले - त्यांच्या निष्ठा बदलल्या तर तुम्हालाही बदलले जाणारच ना? पत्रकारितेपेक्षा पैसा महत्वाचा ठरल्यावर एवढा बदल तर होणारच. तुमच्या फुकटच्या फेसबुक वॉलवर कुणी विरोधी सूर लावून धरला तर तुम्ही त्याला ब्लॉक करता. मग ज्या मालकाने लाखो - करोडोंची गुंतवणूक केलीय तो स्वतःचेच विचार - हितसंबंध पुढे आणणार ना? तुमच्या विचारांचा - तुमच्या दैवतांच्या 'सत्यनारायण पूजे'चा खर्च ते कशाला करतील?


कालपर्यंत काँग्रेसच्या हातात सत्ता होती म्हणून हिंदुत्ववाद्यांना झोडपून काढणे, यालाच निर्भीड पत्रकारिता ठरविले गेले. आज जिकडे तिकडे संघाच्या लोकांची भरती होतेय, हा यांचा आक्षेप. पण कालपर्यंत संघ विचारांच्या लोकांना - सावरकर - हिंदुत्त्ववाद्यांना परिघाबाहेर ठेवण्यात तुम्हीच पुढे होतात,  त्याचं काय? 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणारा कन्हैयाकुमार चालतो, याकूब मेमन न्यायालयात दोषी सिद्ध होऊनसुद्धा त्याच्यासाठी अश्रू ढाळले जातात. पण सनातनवर विनाचौकशी बंदीची मागणी होते. साध्वी प्रज्ञा सिंग निर्दोष सिद्ध झाली तरी हिंदू दहशतवादीच असते, अशी यांची पत्रकारिता. यांचे 'डिबेट शो' म्हणजे सुद्धा विनोदच असतो. आपल्याच विचारांना रेटत बसायचं, विरोधात नाममात्र कुणाला तरी बोलावून त्याची मुस्कटदाबी करायची, यालाच का चर्चा - वादविवाद म्हणायचं? 'सनातन'च्या समीर गायकवाडवर चार्जशीट दाखल झाली म्हणून, संपूर्ण सनातन संस्था गुन्हेगार. पण 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आर्थिक व्यवहारांवर चौकशी लागली. मृत माणसांच्या नावावर देणग्या - खर्च दिल्याचे ताशेरे ओढले गेले. धर्मादाय आयुक्तांनी विरोधकांचे आरोप मान्य केले', तरीही ते निर्दोष - स्वच्छ अशी सरसकट वर्गवारी. 


'शितावरून भाताची परीक्षा' वगैरे म्हणायला ठीक आहे. पण प्रत्यक्षात सगळेच वाईट किंवा सगळंच चांगलं असं काही प्रत्यक्षात नसतंच, याचंही यांना भान राहिलं नाही. 'खरं ते माझं' म्हणता म्हणता, ही मंडळी 'माझं ते खरं' मोडवर पोहोचली आणि तिथेच यांच्याच नव्हे तर पत्रकारितेच्या विश्वासार्हतेच्या अध:पतनाला सुरवात झाली. ३५ - ४० वर्षे एकाच बाजूची तळी उचलल्यानंतर, आज एकाएकी अनपेक्षित सत्ताबदल झाल्याने यांच्या नशिबाचे वासे फिरले, त्याला दुसरे कोण काय करणार? आधीच एकाच बाजूची तळी न उचलता संयत राहिला असता, तर कशाला ही वेळ आली असती? पॅकेज थोडे कमी मिळाले असते कदाचित पण जनमानसातील प्रतिमा तरी कायम राहिली असती. 

उन्मेष गुजराथी 

वागळेंनी टीव्ही 9 का सोडले ?


IBN लोकमत, मी मराठी, महाराष्ट्र 1 असा प्रवास करून टीव्ही 9 मराठीत आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना अवघ्या तीन महिन्यात चॅनल सोडावं लागलं...
1 मे रोजी वागळेचा टीव्ही 9 वर "सड़ेतोड" हा डिबेट शो सुरु झाला होता, यासाठी त्याना दरमहा 2 लाख रुपये मानधन दिले जात होते, शिवाय शनिवार आणि रविवार हा शो बंद होता, म्हणजे एका "शो" ला त्यांना 10 हजार मानधन मिळत होते...
निखिल वागळे म्हणजे मराठी टीव्ही  मिडियातील नंबर 1 नाव... कोड्यात टाकणारे प्रश्न विचारून भल्याभल्यानाच्या तोंडाला फेस आणणारे एक जबरदस्त पत्रकार.. एक उत्तम मुलाखतकार... वाद ओढवून घेणे आणि नेहमी चर्चामध्ये  राहणे हा त्यांचा स्वभावगुण ..
IBN लोकमत मधील "आजचा सवाल" आणि "ग्रेट भेट" हे दोन शो त्यांचे सुपर हिट झाले होते...
मी मराठी मध्ये पॉईंट ब्लॅक हा शो जेमतेम होता, पूर्वीपेक्षा टीआरपी घसरणारा होता.. 
महाराष्ट्र 1 मध्ये "आजचा सवाल" आणि "ग्रेट भेट"पुन्हा सुरु झाला पण म्हणावा तितका टीआरपी नव्हता...
टीव्ही 9 मध्ये तर  "सडेतोड़"ला टीआरपी मिळण्याअगोदरच त्यांची विकेट पडली...अवघ्या तीन महिन्यात वागळेंना टीव्ही 9 सोडावं लागलं..
चॅनेलने हा शो अचानक बंद केल्याचे ट्यूट पहिल्यांदा राजदीप सरदेसाई यांनी केलं  आणि नंतर वागळे यांनी दुजोरा दिला..
आपला आवाज कोणी बंद करू शकत नाही, आपला आवाज बंद करण्यासाठी  मोदी सरकार मधील काही जण टपले आहेत, असेही वागळे यांचे म्हणने आहे ..
पण वागळे यांचा शो बंद केला नव्हता तर वेळ बदलली गेली होती, पण बदललेली वेळ वागळे यांना मान्य नव्हती, असे समोर येत आहे...
विनोद कापरी यांनी वागळेचा भांडाफोड केला आहे ...
त्यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे आणि हि पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..
मोदी के नाम पर शहीद बनने वालों .....
कुछ मित्रों को मेरी इस पोस्ट पर आपत्ति हो सकती है पर नरेंद्र मोदी के विरोध के नाम पर कैसे कैसे खेल हो रहे हैं और कैसे लोग खुद को ज़बरन शहीद बनाने की कोशिश कर रहे हैं - ये सामने लाने के लिए इस पोस्ट को लिखना बहुत ज़रूरी है।
ताज़ा मिसाल है निखिल वागले की TV 9 मराठी से विदाई की।वागले जी का मैं तब से प्रशंसक हूँ , जब मैं पत्रकारिता में आया भी नहीं था। 90 का दशक रहा होगा। मैं कॉलेज में था और इसी दौरान निखिल वागले और उनके अखबार पर शिवसेना के गुंडों ने हमला किया था।लेकिन वागले डरे नहीं। तब से मै वागले को एक निडर और निष्पक्ष पत्रकार समझता रहा। लेकिन मेरा ये भ्रम अब जाकर टूटा है तकरीबन 25-26 साल के बाद।
मैं सबकुछ बर्दाश्त कर सकता हूँ। पर कोरे झूठ के नाम पर सहानुभूति बटोरने को सहन नहीं किया जा सकता। आप सब जानते होंगे कि वागले की हाल ही में TV9 मराठी से विदाई हुई है और इस विदाई को उन्होने जिस तरह से बीजेपी और मोदी से जोड़कर प्रचारित किया , वो हैरान तो करता ही है , साथ ही अंदर तक दुख पहुँचाता है जब आप अपने ही एक हीरों और आदर्श को अपनी आँखों के सामने धराशायी होते देखते हैं।
सच ये है कि वागले की TV9 मराठी से विदाई और उसमें मोदी- बीजेपी की भूमिका की वागले जी की फैलाई कहानी ना सिर्फ पूरी तरह झूठी है बल्कि मनगढ़ंत भी है। ये सब मैं इतने दावे से इसलिए कर रहा हूँ कि मुझे ना केवल सबकुछ पता है , बल्कि इसमें मेरी पूरी भूमिका भी है। तो सच कुछ यों है।
मेरा एक 21 साल पुराना दोस्त है रविप्रकाश, जो कि TV9 group का CEO भी है और promoter भी। मई के महीने में रवि ने मुझसे कहा कि यार विनोद तुम मुंबई आते जाते रहते हो , ज़रा कुछ वक्त निकाल कर टीवी 9 मराठी की टीम से मिल लो और देख लो कि चैनल में क्या दिक़्क़त है। सात आठ साल हो गए - कुछ बात बन नहीं रही। रवि पुराना दोस्त है , मेहनती है , जुझारू है -तो मना नहीं कर पाया । सोचा कि फिल्म के काम के दौरान जब समय मिलेगा तो जाऊँगा। इसी दौरान जून में धाकड़ रिपोर्टर रहे उमेश कुमावत ने बतौर मैनेजिंग एडिटर join कर लिया। उमेश से मैने पूरे चैनल की FPC ( fixed Programing chart ) और पिछले तीन चार हफ़्तों की रेटिंग माँगी।
रेटिंग का अध्ययन करके पता चला कि चैनल लगातार चार नंबर पर है , तकरीबन हर शो की रेटिंग खराब है और सबसे बुरा हाल है निखिल वागले के शो Sade Tod का। मैंने टीम के साथ बैठकर नई FPC को तैयार किया और सुझाव दिया कि वागले के शो को रात नौ से दस बजे के बजाय आप शाम पाँच से छह बजे करो। और नई FPC 21 जून से लागू करो।
21 जून से नई FPC लागू हो गई और दो ही हफ़्ते में चैनल नंबर चार से नंबर तीन पर आ गया।FPC में सिर्फ एक ही बदलाव नहीं हो पाया और वो था निखिल वागले का शो। वागले जी ने 19 जून को उमेश से कहा कि उन्हें एक महीने का और वक्त दिया जाए , वो शो को और बेहतर और आक्रामक बना रहे है। वागले जी का सम्मान करते हुए उन्हें एक महीने का और समय दिया गया। पर सुधार के बजाय रेटिंग और गिरती रही। इतना बुरा हाल कि आखिरी के आठ हफ़्तों में पाँच हफ़्ते तो वागले जी का शो Top 100 में भी नहीं आ पाया ( pls check BARC ratings Marathi News Channels week 19- week 28) ।
इसके बावजूद उमेश ने ठीक एक महीने बाद 19 July को उनसे फिर प्यार से कहा कि अब आपके शो की टाइमिंग बदलनी ही होगी लेकिन वागले जी ने फ़रमान सुना दिया कि मैं शो करूँगा तो सिर्फ रात के नौ बजे, वर्ना नहीं करूँगा और अगले दिन हम क्या देखते हैं कि वागले जी Twitter में कूद पड़े कि : " देखिए मेरे साथ क्या नाइंसाफ़ी हो गई , TV 9 ने अचानक मेरा शो बंद कर दिया..मेरे शो को सेंसर कर दिया गया "
और फिर देखते ही देखते तमाम "liberal और Secular" पत्रकारों की पूरी बटालियन Twitter में मोर्चा लेकर खड़ी हो गई कि देखिए बीजेपी और मोदी ने एक और निष्पक्ष और निडर आवाज़ को चुप करा दिया। कुछ English websites में ख़बरें भी छपने लगीं और इन सबके बीच आदरणीय वागले जी सच जानते हुए भी बहुत भोले बनकर
"आपके सहयोग के लिए धन्यवाद "
और " ये जंग जारी रहेगी " "सेंसरशिप से लड़ेंगे " जैसे tweet करते रहे।
दूर से बैठा मैं ये सब देख रहा था और बेहद दुखी था कि कैसे मेरा एक हीरो मेरे ही सामने दम तोड़ रहा है। वागले के शो के बंद होने का दूर दूर तक ना मोदी से वास्ता था और ना बीजेपी से। पर दो दिन में Twitter पर ऐसा माहौल बना दिया गया कि : "मोदी ने एक बार फिर लोकतंत्र की हत्या कर दी। मोदी हर उस आवाज़ को दबा रहे हैं जो मोदी के विरोध में उठती है। "
देखिए बाकी आवाज़ों के बारे में कुछ नहीं कह सकता क्योंकि मैं जानता नहीं पर वागले जी के शो पर मैं पूरे विश्वास और दावे के साथ लिख रहा हूँ और डंके की चोट पर कह रहा हूँ कि शो बंद होने का एकमात्र कारण मैं था और मैं भी इसलिए क्योंकि मेरी जगह कोई भी व्यक्ति बदहाल चल रहे शो को या तो बंद करने का सुझाव देता या टाइमिंग बदलने की बात करता। जो मैंने किया। और मुझे खुलेआम ये मानने में कोई संकोच नहीं है। हो सकता है कि इस पोस्ट के बाद कुछ लोग मुझे कहें कि मैं भी मोदी की गोद में जाकर बैठ गया। कहने वाले कहते रहे , मुझे अपना सच पता है और वो मै लिखता रहूँगा।
अंत में ..
वागले जी , आपने झूठ फैलाकर और झूठ के नाम पर खुद को शहीद बनाकर अच्छा नहीं किया। आपने मेरा एक हीरो मुझ से छीन लिया। Twitter पर मैं आपको 5-6 साल से फ़ॉलो कर रहा हूँ। आपके tweets को आँख बंद करके RT करता रहा , यही सोचकर कि बाल ठाकरे से लड़ने वाला आदमी निडर और निष्पक्ष ही होगा लेकिन अब खुद को प्रासंगिक बनाने के लिए जिस तरह आप झूठ का सहारा ले रहे हैं , वो व्यक्ति मेरा हीरो नहीं हो सकता।
प्लीज़ मोदी के कंधे पर बंदूक़ रखकर खुद पर ही गोली चलाना बंद कीजिए । कुछ दिन के लिए आप शहीद ज़रूर बन जाओगे लेकिन मेरे जैसे आपको चाहने वालों का जब भ्रम टूटेगा तो आपकी बची खुची विश्वसनीयता भी ख़त्म हो जाएगी।
PS
Apologies for tagging.
Feel free to remove tag.
नोट :
इस पोस्ट के साथ कई tweets भी संलग्न हैं और TV 9 मराठी की वो मेल भी संलग्न है , जिसमें वागले जी को बताया गया था कि खराब रेटिंग की वजह से उनके शो की सिर्फ टाइमिंग बदली जा रही है , ना कि शो बंद किया जा रहा है।
 Vinod Kapri FB

मग वागळेंनी लिहिलेल्या सर्व पोस्ट खऱ्या होत्या का? 
जनतेची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता का ? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे..

सोमवार, २४ जुलै, २०१७

डिजिटल मीडियाचे वारे ...

प्रिंट मीडियात नंबर 1 चा दावा करणार्‍या लोकमतचे मालक आणि मुख्य संपादक राजेंद्रबाबू दर्डा यांनी सोलापूरात काही दिवसांपुर्वी एक सत्य विधान केले आहे. येणारा काळ हा प्रिंट मीडियासाठी अवघड असून,प्रिंट मीडियाची जागा डिजीटल मीडिया घेईल असे त्यांचे विधान होते.याचाच अर्थ प्रिंट मीडियाचे दिवस भरले हे त्यांना सांगावयाचे आहे.
सन 2000 मध्ये म्हणजे सतरा वर्षापुर्वी जेव्हा मी एकमत सोडले तेव्हा टीव्ही मीडिया नव्हता.दूरदर्शन हे ऐकमेव चॅनल होते.नंतर ईटीव्ही सुरू झाला आणि टीव्ही मीडीयाचा खर्‍या अर्थाने उदय झाला.नंतर ईटीव्ही बंद पडला आणि झी 24, एबीपी माझा,आयबीएन लोकमतसह सात - आठ चॅनल सुरू झाले.यातील किती चॅनल चांगल्या पध्दतीने सुरू आहेत ? काही चॅनलची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून,दोन चॅनल तर बंद पडण्याच्या वाटेवर आहेत.
लोकसंख्या तर वाढली आहे.वाचक पण वाढला आहे मग हा वाचक गेला कुठे ? तर याचे एकमेव उत्तर आहे- डिजिटल मीडिया...
पुर्वी वृत्तपत्र आणि पत्रकारांची मक्तेदारी होती,ती आता राहिली नाही.वाचकांना स्वतःचे मत मांडायला सोशल मीडिया पर्याय आहे.फेसबुक,टयुटर,ब्लॉग आणि व्हॉटस अ‍ॅप च्या माध्यमातून ते आपले मत जगासमोर मांडू शकतात.यु-ट्युबवर व्हिडीओ अपलोड करून जगासमोर ते येवू शकतात.आज प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात न्यूज पोर्टल सुरू झाले आहे.अनेकांनी यू ट्युब चॅनल सुरू केले आहे.यामुळे प्रस्थापित वृत्तपत्रे आणि चॅनलची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश करू शकता.
नोटाबंदीनंतर जाहिरात व्यवसाय 30 ते 40 टक्के घटला आहे.त्यात जीएसटीमुळे वृत्तपत्रे आणि चॅनल अधिक अडचणीत आले आहेत.येत्या पाच वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील.त्याची जागा ई -पेपर घेतील.
अमेरिकासारख्या प्रगत देशात आता वृत्तपत्रे छापली जात नाहीत,वाचकांना ई-पेपर वाचावा लागतो.काही ठराविक रक्कम भरून युझर नेम आणि पासवर्ड घ्यावा लागतो आणि ई- पेपर वाचता येतो.तीच पध्दत आपल्या देशात येईल.याला किमान दहा वर्षे लागतील.पण येणारा काळ प्रिंट मीडियासाठी अवघड आहे.
उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात सन 2011 मध्ये मी उस्मानाबाद लाइव्ह या ऑनलाईन न्यूज पोर्टलची सुरूवात केली होती.त्याच वर्षी सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागात मला गेस्ट लेक्चर म्हणून मला बोलावण्यात आले होते.त्यावेळी मी येणारा काळ प्रिंट मीडियासाठी अवघड असून वृत्तपत्रांची जागा ई- पेपर घेतील,असे विधान केले होते.
http://www.dhepe.in/2011/03/
त्यावेळी माझ्या या विधानाची अनेकांनी मस्करी केली होती.काहींनी टींगल केली होती.आता टींगल करणारे तेच विधान करू लागले आहेत.
जाहिरात व्यवसाय कमी झाल्यानेे सर्वच मोठ्या वृत्तपत्रात कॉस्ट कटींग सुरू आहे.त्यात मजिठीया आयोगाचा बडगा येत असल्याने मालक मंडळी बैचेन आहे.त्यांना आता 45 वयाच्या पुढे पत्रकार नको आहे.त्यामुळे ज्यांनी 25 ते 30 वर्षे मीडियात घालवली त्यांना उतारवयात नेमके काय करावे हा प्रश्‍न पडलेला आहे.चांगले लिहिणारे अनेक संपादक आणि पत्रकार सध्या जॉब नसल्याने बसून आहेत.अनेक जुन्या पत्रकारांना हातात माऊस पण धरता येत नाही.त्यांच्यासाठी काळ अवघड आहे.
मीडीयात टिकायचे असेल तर कॉम्प्युटर.डीटीपी,पेजीनिअशन,इंटरनेट आणि सोशल मीडियाचे ज्ञान हमखास हवे.बातमी जशी चांगली लिहिता आली पाहिजे तसे आता सर्व संगणक ज्ञान पाहिजे.तरच तुम्ही या क्षेत्रात टीकाल...नाही तर तुमच्यासाठी मीडियाची दारे बंद झाली म्हणून समजा...
- सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
www.osmanabadlive.in
9420477111
7387994411


सुनील ढेपे यांचे याच विषयांवरील लेख वाचण्यासाठी क्लीक करा

पत्रकारितेचे बदलते तंत्र आणि मंत्र...  

साभार - उस्मानाबाद लाइव्ह   

गुरुवार, २० जुलै, २०१७

जुगार अड्डा चालवणार्‍या लोकमतच्या पत्रकारासह 25 जणांवर कारवाई

 सोलापूर : महाराष्ट्राचा मानबिंदू अशी बिरुदावली मिरवणार्‍या लोकमतमध्ये  बातमीदारी करता करता जुगार अड्ड्याचा साईड बिझनेस करणार्‍या बेगमपुरातील पत्रकारासह 25 जणांवर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई  केली. या आरोपींमध्ये माचणूर गावचा सरपंच आणि बेगमपूरच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाचाही समावेश आहे.
 सोलापुरातून प्रसिध्द होणार्‍या दैनिक लोकमतसाठी बेगमपूर वार्ताहर म्हणून काम करणारा राजगोपाल खांडेकर याची बेगमपुरातील शिक्षक कॉलनी शेजारी जागा आहे.  या जागेवर  पत्राशेड उभारले असून त्यामध्ये जुगार अड्डा चालू असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे प्राप्त झाली होती.  त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी 6 लाख 45 हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य सापडले.  याप्रकरणी  आरोपी अप्पा सिद्राम पाटील, दगडू मारुती कांबळे, नवनाथ नारायण वाघमारे, सिध्देश्‍वर जनार्दन जगताप, समाधान सिध्देश्‍वर गवळी, दिगंबर गंगाधर माने, अमोल पुंडलिक कपडेकर, एकनाथ मच्छिंद्र सरपळेे, उत्तम माधव भोसकर, अब्दूलगफार जब्बार जहागीरदार, सुनील मारुती पाटील, समद गनी बागवान, गजानन गंगाधर लाड, पुंडलिक शामराव पाटील, शिवाजी नागनाथ प्रक्षाळे, गणेश विश्‍वास धनवे, रियाज सादिक बागवान, नानासाहेब पिराजी डोके, बिरूदेव नागनाथ व्हनमाने, सहदेव भाऊ यादव, सरदार गनी बागवान, संभाजी भगवान सावजी, प्रकाश केशव चौगुले, नागनाथ हरिबा माने, वसीम मेहबूब बागवान, दत्तात्रय पाटील व जागा मालक राजगोपाळ खांडेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली असून  त्यांच्याविरोधात कामती पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अप्पा सिद्राम पाटील हा बेगमपूरचा तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष असून सुनील मारुती पाटील हा माचणूरचा सरपंच आहे.

 तीन त्रिकूट
 दत्तात्रय पाटील हा बेगमपूरचा पाटील आहे. वसिम बागवान हा स्वत:ला जुगार व्यवसायातला किंग समजतो. राजगोपाल खांडेकर हा लोकमतसाठी बेगमपूरमधून बातमीदारी करतो. या तिघांनी मिळून हा जुगार अड्डा सुरू केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार या तिघांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

नितीनबद्दल चॅनेलनने माणुसकी दाखवली नाही...

एका प्रतिष्ठित चॅनेलमध्ये PCR मध्ये साउंड इंजीनियर म्हणून कार्यरत असलेल्या नितीन शिर्केनं लोकलखाली आत्महत्या केली. नितिन अतिशय सवनेदंशील आणि हळव्या मनाचा म्हणून ओळखला जायचा. मृत्युपूर्व त्याने चॅनेलमधल्या एका महिला अँकरने प्रेमात आपली  फसवणूक केल्यामुळे आत्महत्या करत  असल्याचं  फेसबुकवर पोस्ट केल होतं.मात्र चॅनेलच्या वरिष्ठानी हे प्रकरण अत्यंत असवेंदनशीलपणेे हाताळल्याचं स्पष्ट झालय. ज्या रात्री ही घटना घडली त्यापूर्वी कार्यालयात नितिन आणि या महिला अँकरच भांडण झालं, यावेळी ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या वारिष्ठानी नितिनला समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. कुणीतरी मध्यस्थी केली असती तर नितिनने हे टोकाचं पाउल उचललं नसतं अस अनेकजण सांगताहेत. महत्वाच म्हणजे गेल्या एक वर्षापासून या दोघामध्ये काही तरी सुरु आहे, हे न्यूजरूममधल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. पण चॅनेल चालवत असलेल्या वरिष्ठाना याची माहिती नव्हती का ? हा खरा प्रश्न आहे. 


ज्या रात्री नितिननं आत्महत्या केली त्या रात्री आउटपुट विभाग प्रमुख माणिक मोती याने नितिनबद्दल एकही कॉल केला नाही,या उलट त्याला त्या महिला अँकरची काळजी पडली होती. या अँकरची साक्ष उशिरापर्यंत पोलिस घेत होते, त्यामुळे चॅनेल प्रमुख असलेल्या या रावने बाहेर असलेल्या कर्मचार्याला या अँकरला घरी सोडून ये असे आदेश देतं आपल्या असवेदनशीलतेचे दर्शन दिलं.मात्र त्या कर्मचाऱ्याने हा आदेश धूड़कावून लावला.आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशी या वादग्रस्त अँकरने माणिक  मोतीला फोन करुन  मी आज कामावर येते, मला बुलेटिन करायला काही  प्रोब्लेम नाही अस सांगितलं,  त्यावर ठंड रक्ताच्या या मोतीने काही विचार न करता, ये कामावर, तुला अँकरिंग करता येईल अस बिनधास्तपणे सांगून टाकल. वारिष्ठापर्यंत ही बाब  पोहोचल्यावर त्यांनी सदर अँकरला पुढच्या सूचनेपर्यन्त आफिसला  पाऊल ठेऊ नकोस अस सांगितलं आहे, त्यामुळं या वादग्रस्त अँकरची खाट पडण्याची शक्यता आहे.

निखिल वागळे यांचा 'सडेतोड' बंद

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा टीव्ही ९ वरील सडेतोड हा डिबेट शो आजपासून बंद झाला आहे. वागळे यांनी  याबाबत  ट्यूटरवर पोस्ट अपलोड करून चॅनलने हा शो अचानक बंद केल्याचे म्हटले आहे.
तीन महिन्यापूर्वी वागळे यांनी टीव्ही ९ जॉईन केले होते. त्यांना सल्लागार संपादक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. रात्री ९ वाजता त्यांचा सडेतोड हा डिबेट शो चालत असे. शेतकरी संपात त्यांनी पुलतांबा गावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट केला होता,त्यामुळे चॅनलचा टीआरपी वाढला होता. चॅनेल तिसऱ्या क्रमांकावर आले होते..
परंतु वागळे यांचा डिबेट शो आजपासून बंद करण्याचा निर्णय टीव्ही ९ ने घेतला आहे. टीव्ही ९ वर राजकीय दबाव होता म्हणूनच डिबेट शो बंद केल्याचे सांगितले जात आहे.
वागळे यांचा  डिबेट शो पाहणारे अनेक चाहते आहेत . हा शो बंद झाल्याने टीव्ही ९ चा टीआरपी घसरणार, अशी चिन्हे आहेत 

निखिल वागले यांचे ट्यूट

आजपासून माझा 'सडेतोड' हा कार्यक्रम TV9 वर होणार नाही. चॅनेलने तडकाफडकी तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे !
- निखिल वागळे.


निखिल वागळे  यांची विकेट का पडली  ?

टीव्ही ९ मराठीवर रात्री ९ वाजता निखिल वागळे यांचा सडेतोड हा डिबेट शो सुरु होता, तो आज चॅनलने अचानक बंद करून निखिल वागळे यांना नारळ दिला, वागळे पाठोपाठ इनपुट हेड अभिजित कांबळे यांनीही राजीनामा दिला आहे...
नेमकं काय घडले ?
काल दि, १९ जुलै रोजी सडेतोड मध्ये

गोरक्षकांना आवर घालण्यासाठी कायद्यात सुधारणा केल्या पहिजेत का?

हा डिबेट शो झाला होता, यावरूनचं टीव्ही ९ वर राजकीय दबाव आणण्यात आला, यावरूनच मालकाने वागळे याना नारळ दिल्याचे सांगितले जात आहे. 

बुधवार, १९ जुलै, २०१७

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात उभी फूट

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात उभी फूट पडली असून, बहुसंख्य पत्रकार एकत्र येत नवीन कार्यकारिणी निवडली आहे. अध्यक्षपदी गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे कालिदास जहागीरदार  आणि सरचिटणीसपदी देशोन्नतीचे अनिल कसबे यांची निवड करण्यात आली आहे.
संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कांबळे यांची जुलै २०१६ मध्ये मुदत संपली असताना  त्याना सहा - सहा महिन्याची  दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्या  कारभाराविरुद्ध पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत नवीन कार्यकारिणी निवडली आहे. यात ७५ टक्के जुने सदस्य आहेत..
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ नोंदणीकृत नाही, त्यामुळे नव्या कार्यकारिणीने धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे... नवीन कार्यकारिणी जाहीर होताच परिषदेचे सरचिटणीस  यशवंत पवार यांनी एक पोस्ट लिहिली, ( ही  पोस्ट कुणी लिहिली हे जगजाहीर आहे ) .. त्याला नूतन उपाध्यक्ष अमृत जाधव यांनी जोरदार प्रतिउत्तर  दिले आहे. 
..................
नवनियुक्त पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे अभिनंदन

पत्रकारांत भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका!


जिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड केल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखू लागल्याचे दिसत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस यशवंत पवार महाशयांनी त्यांच्या ‘साहेबांनी’ लिहून दिलेली फाॅरवर्ड केलेली पोस्ट तर अकलेचे तारे तोडणारीच आहे. मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील इतक्या मोठ्या संख्येने पत्रकारांनी निवडलेली बिनविरोध कार्यकारिणी यांना चार-चौघात निवडलेली वाटू लागली आहे. या महाभागांना काय वाटायचे ते वाटत राहो! पण या महाभागांनी आमच्या जिल्ह्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करून नये.

तुमचे ‘साहेब’ एस. एम. देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषद ताब्यात घेण्यासाठी स्वत:च स्वत:ची मुख्य विश्वस्त पदावर आणि नंतर अध्यक्षपदावरही कशी नियुक्ती करून घेतली आहे, ते अगोदर सगळ्या पत्रकारांना सांगा. आणि मग आम्हाला ज्ञान शिकवा. मराठी पत्रकार परिषद म्हणजे जणू यांच्या घरची प्राॅपर्टी असल्यागत यांची रडारड सुरु झाली आहे. तुम्ही म्हणाल त्यांचीच निवड करायला, तुम्ही नांदेड जिल्ह्यातील  पत्रकारांचे मालक आणि सर्व पत्रकार तुमचे गुलाम आहेत, असे समजताय् कि काय?

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे जमा असलेल्या पैशांवर डोळा ठेऊन, तुम्हाला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघावर ताबा मिळविण्याची इच्छा आहे, हे आम्हाला चांगलेच माहित आहे. पण तुमचे हे डाव आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आणि आम्ही तुमची बाष्कळ बडबडही विनाकारण ऐकून घेणार नाही.

अमृत जाधव,

उपाध्यक्ष- नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ
आणि नवनियुक्त कार्यकारिणी


.......................

जाता जाता
मराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक जिल्ह्यात शाखा असल्या तरी त्या नोंदणीकृत नाहीत. काही संघानी स्वतंत्र नोंदणी करून परिषदेशी संबंध तोडून टाकला आहे. सर्व ठिकाणी गटबाजी आहे. काही लोकांनी प्रायव्हेट लिमिटेड संघटना केली आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. अनेक संघात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पुरावे देवूनहि परिषद काहीच कारवाई करीत नाही, त्यामुळे अनेकांची दुकानदारी सुरु आहे...

मंगळवार, १८ जुलै, २०१७

मंदारची जागा प्रसाद काथे घेणार ?

मुंबई - एकीकडे IBN लोकमतमध्ये प्रेम प्रकरणावरून चॅनलची बदनामी सुरु असताना, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चॅनलने कार्यकारी संपादक पद भरण्याचा निर्णय घेतला आहे. मंदार फणसे यांच्या जागी एनडीटीव्ही  ( इंडिया ) चे  पॉलीटिकल एडीटर  (मुंबई )   प्रसाद काथे यांचे नाव फिक्स झाले असून, ते १ ऑगस्टपासून चॅनलची सूत्रे घेणार असल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे.
प्रसाद काथे हे १९९९ पासून टीव्ही मीडियात आहेत. सुरुवातीला आल्फा मराठी, नंतर ई - टीव्ही, सहारा समय असा प्रवास करीत ते गेल्या १०  वर्षांपासून एन. डी.TV इंडिया मध्ये कार्यरत आहेत. काथे हे कार्यकारी संपादक असले तरी चॅनेल हेड म्हणून त्यांच्याकडे सूत्रे राहणार आहेत.

IBN लोकमतच्या चॅनल हेड साठी झी २४ च्या डॉ. उदय निरगुडकर यांचे नाव आघाडीवर होते, पण नंतर ते मागे पडले. त्यानंतर निलेश खरे, मंदार परब, यांची नावे आली, पण  काथे यांनी कासव गतीने बाजी मारली आहे.

रविवार, १६ जुलै, २०१७

महिला न्यूज अँकरने प्रेमात धोका दिल्याने कर्मचाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

मुंबई - IBN लोकमत मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने प्रेमात धोका झाल्याने रविवारी रात्री रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. नितीन शिर्के असे या कर्मचाऱ्याचे नाव असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या आत्महत्येस कारणीभूत कोण आहे, हे स्पष्ट लिहिले आहे. आरोपीना कडक शासन करण्याची मागणीही  त्याने या पोस्टमध्ये केली आहे. या अत्यंत धक्कादायक आणि भयानक घटनेमुळे  IBN लोकमत आणि टीव्ही चॅनलमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

नितीन शिर्के (वय २८  ) हा  तरुण  IBN लोकमत मध्ये पीसीआर युनिट मध्ये ऑपरेटर होता. त्याचे चॅनलमधीलच  एका महिला न्यूज अँकर बरोबर तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र तिने नितीनबरोबर  फारकत घेऊन अन्य दोघांशी जवळीक केली.

त्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत, असे नितीन शिर्के याने फेसबुकवर लिहिले आहे. सदर न्यूज अँकरने तीन वर्ष आपला वापर केला  मात्र शेवटी  ती बदलली आणि खोटे बोलली असेही त्याने नमूद केले आहे.


फेसबुकवर पोस्ट लिहून अवघ्या एका तासात नितीनने रविवारी रात्री परळ रेल्वे स्थानकावर  रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सदर महिला अँकरचा जबाब नोंदविला असून, आत्महत्येस जबाबदार असलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Nitin Shirke Facebook 


आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट अपलोड केली. त्यात त्याने त्या महिलेला जबाबदार धरले आहे. 'त्या महिलेचे एका पत्रकाराबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. असं असतानाही गेल्या तीन वर्षापासून ती प्रेमाच्या नावाखाली मला खेळवत होती. तिनं माझा अक्षरश: वापर केला. तिच्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा मिळायला हवीय,' असं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.


शनिवार, १५ जुलै, २०१७

पञकारितेचा हाच का "धर्म" ?

मुंबई - "उघडा डोळे बघा नीट " चॅनेलचे अँकर कधी काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही बुवा... परवा रेल्वेमध्ये एका माथेफिरू तरुणाने काही तरुणींसमोर हस्तमैथुन केले, त्याची व्हिडीओ क्लिप या तरुणीने सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यावर "उघडा डोळे, बघा नीट" चॅनलने बातमी चालवली. यावेळी पञकारितेचा "धर्म" अधिकारवाणीने शिकवणाऱ्या एका औरंगाबादकर महिला अँकरने पीडित तरुणीला विक्षिप्त प्रश्न विचारून हद्दच केली.
समोरचा तरुण हस्तमैथुन करत असताना तुला कसं वाटलं? असा संतापजनक प्रश्न या अँकरने तिला विचारला. यावेळी समोरची पीडित तरुणी चांगलीच गडबडली. तिच्याकडून बाईंना काय उत्तर अपेक्षित असेल बुवा? असाच प्रश्न ऐकणाऱ्याना पडला होता. किमान बाईने बाईला प्रश्न विचारताना तरी भान ठेवायला हवे होते,
बाईंच्या या प्रश्नाने सध्या सोशल मीडियात चॅनेलची अब्रू काढण्यात येत आहे. याच औरंगाबादकर महिला अँकरने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सलीमने 50 दहशतवाद्यांना वाचवलं असं बरळल्या होत्या...
चॅनेलच्या पडद्यावरून नटूनथटून लोकांना पञकारितेचा "धर्म"शिकवणाऱ्या या महिला अँकरवर नेटिझन्स चांगलेच तुटून पडले आहेत. बाई आपण अक्कल गहाण ठेवून काम करता का ,असा टोला नेटिझन्सने मारला आहे.

धन्य ते "उघडा डोळे, बघा नीट" चॅनेल  आणि धन्य त्या औरंगाबादकर महिला अँकर... !

जाता जाता -
आणखी एक संतापजनक बाब म्हणजे, चॅनलवर पीडित तरुणीचा चेहरा दाखवण्यात आला आहे. चेहरा उघड करणे योग्य आहे का ? 
...............


दूध का दूध पानी का पानी ...

बरोबर सहा वर्षे, एक महिना आणि सहा दिवसांपूर्वी म्हणजे 11 मे 2011 रोजी मी आणि माझ्या सहकार्‍यांवर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात लाच देण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी आरोपांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी फिर्याद दिली होती विजापूर नाका पोलीस ठाण्याचेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांनी. पोलीस ठाणे त्यांचेच, फिर्यादी ते स्वत:च, गुन्ह्यातील साक्षीदार सर्वजण त्याच पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी आणि कर्मचारी. या गुन्ह्याचा तपास करणारेसुध्दा याच ठिकाणचे पोलीस अधिकारी. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार लाचेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास स्थानिक पोलिसांनी न करता तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवणे आवश्यक असते. मात्र याठिकाणी रामुगडेसाहेब आणि त्यांच्या वरिष्ठांनी तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवलाच नाही. कारण त्यांनी आमच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला होता, अशावेळी हा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवला असता तर रामुगडेसाहेब आणि त्यांच्या वरिष्ठांचे पितळ उघडे पडले असते. त्यासाठी त्यांनी हा खटाटोप केला होता.
जेव्हा याच मुद्यावरून मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा न्यायालयाने दणका देताच रामुगडेसाहेब आणि त्यांच्या वरिष्ठांची अक्षरश: सोलापूर ते मुंबई अशी धावपळ उडाली. अधिकार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई का करू नये? अशी विचारणा उच्च न्यायालयाकडून होताच या अधिकार्‍यांची घाबरगुंडी उडाली. शेवटी उच्च न्यायालयापुढे बिनशर्त लेखी माफीनामा सादर केल्यामुळे हे पोलीस अधिकारी बचावले.
मित्रांनो, या प्रकरणात आम्हाला पोलिसांनी जाणीवपूर्वक गुंतवले होते. या घटनेपूर्वी मी माझ्या ‘सुराज्य’ या दैनिकातून सोलापूर शहर पोलिसांच्या कार्यपध्दतीवर परखड, सडेतोड लिखाण केले होते. त्यामुळे पोलिसांची दुकानदारी बंद पडली होती. म्हणून पोलीस माझ्यावर आणि ‘सुराज्य’वर चिडून होते. मला अडकावण्याची ते संधीच शोधत होते. पण मी सरळ, स्वच्छ, पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे पोलिसांच्या तावडीत कधी सापडलोच नाही. माझ्या दुर्दैवाने आणि पोलिसांच्या सुदैवाने 11 मे 2011 रोजी एका असाध्य रोगाने पछाडलेल्या युवकाची कैफियत घेऊन मी विजापूर नाका पोलीस ठाण्याला गेलो आणि आयताच पोलिसांच्या तावडीत सापडलो. त्या रुग्णाच्या जागेवरचे वीज मीटर चोरीला गेले होते. त्याची फिर्याद दाखल करून घेऊन फिर्यादीची प्रत देण्यासाठी विजापूर पोलीस ठाणे अंकित औद्योगिक चौकीचे पोलीस पैसे मागत होते. ते देणे त्या रुग्णाला शक्य नव्हते. म्हणून या कामी मदतीची याचना पत्रकार या नात्याने त्या रुग्णाने माझ्याकडे केली होती. मी माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी या प्रकरणात सहभाग घेतला आणि पोलिसांच्या पूर्वरोषाला बळी पडावे लागले. मी त्या दिवशी फोनवरून रामुगडेसाहेबांना संपर्क साधून त्यांना औद्योगिक चौकीच्या पोलिसांचा प्रताप सांगितला. तेव्हा रामुगडेसाहेबांच्याच बोलावण्यावरून मी माझ्या सहकार्‍यांसह पोलीस ठाण्यात गेलो. त्याठिकाणी आमची तक्रार ऐकून घेऊन औद्योगिक चौकीच्या पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी उलट आमच्यावरच रामुगडेसाहेब यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खुद्द रामुगडेसाहेब यांनीच दाखल केला. प्रत्यक्षात त्या रुग्णाकडे लाचेची मागणी करत होते ते औद्योगिक चौकीचे पोलीस, लाच देण्याची आमची इच्छा आणि त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी त्या पोलिसांची तक्रार करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ असणार्‍या रामुगडेसाहेबांकडे गेलो. तेव्हा त्यांनीच तक्रार देण्यासाठी पूर्वपरवानगी घेऊन गेलेल्या माझ्यासारख्या पत्रकारावर त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात मला तसा प्रचंड त्रास झाला. पत्रकार म्हणून ज्या समाजात ताठ मानेने प्रामाणिकपणे काम केले; त्याच समाजात ‘आरोपी’ म्हणून वावरण्याची वेळ पोलिसांनी माझ्यावर आणली. इतरवेळी इतरांसाठी पळणार्‍या माझ्यासारख्या पत्रकाराला पोलिसांनी कोर्टकचेरीच्या फेर्‍यात अडकावले होते. एवढ्यावरच न थांबता मी आणि आमचे संपादक महोदय आदरणीय राकेश टोळ्ये सरांवर याच रामुगडेसाहेबांनी पोलीस खात्यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द करून पोलिसांमध्ये अप्रितीची भावना चेतावल्याचा दुसरा एक गुन्हा दाखल केला. त्रास देण्याची एकही संधी त्यावेळी पोलिसांनी सोडली नाही.
आम्हाला पत्रकारितेतून संपवण्याचाच घाट पोलिसांनी घातला होता. पण आमच्यावर विश्‍वास असणारे ‘सुराज्य’चे तमाम वाचक, हितचिंतक, सोलापूरकर, सोलापुरातील पत्रकार, पत्रकार संघटना आणि त्यावेळचे शहरातील आमदार दिलीप माने, विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, माजी आ. आडम मास्तर यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी आमच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्यामुळे आम्हाला पहिल्यापेक्षाही अधिक बळ आले. ही ताकद खचून न जाता पुन्हा एकदा भरारी घेण्याची उभारी देऊन गेली. म्हणून आम्हीही उठलो संघर्ष करण्यासाठी. दुसर्‍यांवरील अन्यायाच्याविरोधात आवाज उठवणारे आम्ही पत्रकार आमच्यावरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सिध्द झालो.
सोलापूरच्या सेशन कोर्टापासून मुंबईच्या हायकोर्टापर्यंत न्यायासाठी लढा दिला. शेवटी या लढ्याला यश आले. पोलिसांनी आमच्याविरोधात दाखल केलेला खटला हा पोलिसांचा कल्पनाविलास असून खोट्याचे खरे करण्यासाठी पोलिसांनी केलेला बनाव आहे, हा खटला विश्‍वास ठेवण्यालायक नाही, असे मत नोंदवून न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले. आमची बाजू सत्याची होती म्हणून न्यायालयाने आम्हाला साथ दिली. दूध का दूध, पानी का पानी केले. सहा वर्षांपासून आमच्या कपाळी लागलेला कलंक न्यायालयाने पुसून टाकला.
या संपूर्ण संघर्षाच्या वाटेवर वडीलकीच्या नात्याने आमचे संपादक महोदय आदरणीय टोळ्ये सर माझ्या पाठीमागे डोंगरासारखे खंबीरपणे उभे राहिले. किंबहुना या संपूर्ण खटल्यात ते माझ्यामागे सावलीसारखे सातत्याने वावरले. त्यांची भक्कम साथ आणि न्यायालयाने दिलेला ‘न्याय’ यामुळे माझ्या माथ्यावर लागलेला ‘आरोपी’ हा डाग पुसला गेला.
- राजकुमार नरूटे
 (कार्यकारी संपादक, दैनिक सुराज्य, सोलापूर)

बुधवार, १२ जुलै, २०१७

मुंबईत महिला पत्रकाराचा विनयभंग

मुंबई - इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराचा सोमवारी रात्री विलेपार्ले येथे विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

३० वर्षीय महिला पत्रकार विलेपर्ले येथे नातेवाईकांकडे गेली होती. तिथून एम. जी. रोडवरून विलेपार्ले रेल्वे स्टेशनकडे चालत जात असताना या तरुणाने तिला मागून धक्का दिला व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पत्रकार महिलेने मोठ्या धाडसाने प्रतिकार करत तरुणाला पकडून जवळच्याच पोलीस चौकीत नेले. चौकीत ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबलने पोलीस व्हॅनला पाचारण करून नंतर या तरुणाला विलेपार्ले पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर पत्रकार महिलेने या तरुणाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी भा.द.वि. कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव संजय वर्मा असे असून तो एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस अधिकार्‍यास लाच देण्याचा प्रयत्नाच्या आरोपातून पत्रकाराची सुटका

 सोलापूर : पोलीस अधिकार्‍याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा म्हणजे पोलिसांचा कल्पनाविलास असून पद्धतशीरपणे केलेला नियोजनात्मक बनाव आहे, असे मत व्यक्त करून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश यू.बी. हेजिब यांनी या खटल्यातील पत्रकार राजकुमार नरूटे आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांना निर्दोष मुक्त केले.
  असाध्य रोगाने पिडीत असणार्‍या एका रुग्णाच्या जागेतील वीज मीटर चोरीची फिर्याद नोंदवून फिर्यादीची प्रत देण्यासाठी विजापूर नाका पोलीस ठाणे अंकित औद्योगिक पोलीस चौकीचे पोलीस लाचेची मागणी करत होते, या संदर्भातील तक्रार करण्यासाठी पत्रकार राजकुमार नरूटे आणि त्यांचे सहकारी बलराम जोगदंड, कल्याण लाळे हे 11 मे 2011 रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गेले होते. तथापि त्यावेळी नरूटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी फिर्यादीची प्रत मिळवण्यासाठी आपणास तीन हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांनी दिली होती. त्यावरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात नरूटे आणि त्यांच्या सहकार्‍यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 12 व 7 आणि भा.दं.वि. 353, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. त्याप्रमाणे त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
  या प्रकरणाचा तपास सुरुवातीला शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त शिरीष तांदळेकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्याविरोधात नरूटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर हा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपाधीक्षक शंकरराव चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांच्या तपासामध्ये कोणताही पुरावा आढळून येत नाही असा निष्कर्ष निघाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने आरोपींना गुन्ह्यातून मुक्त करण्यासंबंधीचा अहवाल विशेष न्यायालयात सादर केला होता. मात्र न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेऊन खटला पुढे चालविण्याचा आदेश पारित केला.
  या खटल्यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीमध्ये आरोपींविरोधात कोणताही पुरावा समोर आला नाही. लाचेची मागणी ही औद्योगिक पोलीस चौकीच्या पोलिसांनी केली होती. त्याविषयीची तक्रार करण्यासाठी आरोपी हे पोलीस ठाण्याला गेले होते. त्यावेळी आरोपींची तक्रार ऐकून घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी तत्कालीन पोलीस निरीक्षक रामुगडे यांनी उलट तक्रारकर्त्यांनाच या गुन्ह्यात अडकावले. तत्पूर्वी पोलिसांविरोधात वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे नरूटे यांच्यावर भयंकर राग होता. त्या रागाचा वचपा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून काढला. शिवाय त्यांनी तपास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपणे आवश्यक असताना तत्कालीन पोलीस आयुक्त हिंमराव देशभ्रतार यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त शिरीष तांदळेकर यांच्याकडे सोपवला. रामुगडे यांची ही कृती कायद्याला अनुसरून नाही. शिवाय रामुगडे यांनी कधीही लाच मागितली नव्हती, त्यामुळे त्यांना लाच द्यायचा प्रश्‍नच नव्हता. केवळ औद्योगिक चौकीच्या पोलिसांना वाचवण्यासाठी रामुगडे यांनी नरूटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनाच या खोट्या गुन्ह्यात अडकावले, असा युक्तिवाद आरोपींचे वकील शशी कुलकर्णी यांनी केला.
  या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने लाचेची मागणी करणार्‍या औद्योगिक चौकीच्या पोलिसांना लाच न देता त्यांच्या वरिष्ठांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा पोलिसांचा निव्वळ कपोलकल्पित असून अत्यंत नियोजनात्मकरितीने केलेला खटाटोप आहे. रामुगडे यांचे हे कथानक म्हणजे इंग्रजीतल्या ङ्गकॉक अँड बुलफ या कथेसारखे आहे. रामुगडे यांना लाच देण्याचा आरोपींचा कोणताही उद्देश नव्हता. तसा प्रश्‍नही उपस्थित होत नाही. नरूटे आणि रामुगडे यांच्यात झालेल्या बोलण्यात लाचेसंदर्भात कोणताही उल्लेख आढळलेला नाही. पूर्व बोलणीशिवाय लाच देऊ करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे रामुगडे व सरकार पक्षाचे कथानक न्यायालयाला विश्‍वासार्ह वाटत नाही, किंबहुना हा खटला विश्‍वास ठेवण्यालायक नाही. त्यामुळे या खटल्यात आरोपींना दोषी ठरवता येत नाही, असे मत नोंदवत न्यायालयाने नरूटे आणि त्यांच्या सहकार्‍यांना दोषमुक्त केले.
  या खटल्यात सरकारतफेर् ऍड. प्रदीपसिंह रजपूत आणि नरूटे यांच्यावतीने ऍड. शशी कुलकर्णी, ऍड. प्रशांत नवगिरे, ऍड. गुरुदत्त बोरगावकर, ऍड. देवदत्त बोरगांवकर, ऍड. अभिषेक गुंड, ऍड विश्‍वास शिंदे, ऍड. स्वप्निल सरवदे यांनी काम पाहिले.

सोमवार, १० जुलै, २०१७

डोक्यावर पदर घेऊन लाईव्ह शोची सुरुवात


चंदीगड : हरियाणातील एसटीव्ही वृत्तवाहिनीच्या अँकरने डोक्यावर पदर घेऊन लाईव्ह चर्चासत्राची सुरुवात केली. हरियाणा सरकारच्या महिलांच्या डोक्यावरील पदरासंदर्भातील भूमिकेचा निषेध करण्यासाठी एसटीव्ही हरियाणा या वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक आणि अँकर प्रतिमा दत्ता यांनी लाईव्ह शोची सुरुवात डोक्यावर पदर घेऊन केली.
काही दिवसांपूर्वी हरियाणा सरकारने डोक्यावर पदर हा महिलांचा आन बान असल्याचं म्हटलं होतं. यानंतर सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती.
हरियाणा सरकारच्या या विधानावर प्रसिद्ध पैलवान गीता फोगाटनेही तिखट शब्दांनी प्रहार केला. आम्ही चार भिंतीमधून बाहेर पडून कुस्तीमध्ये देशाचं नाव उज्ज्वल केलं, तिथेच महिलांना पदराची सक्ती केली जाते.
काय आहे प्रकरण?
हरियाणा सरकारच्या कृषी संवाद नावाच्या मासिकाच्या नुकत्याच आलेल्या अंकात पदर घेतलेल्या महिलेचं छायाचित्र छापलं आहे. ही महिला आपल्या डोक्यावर चारा घेऊ जात असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “घूंघट की आन-बान, म्हारे हरियाणा की पहचान’
हे मासिक राज्य सरकारच्या हरियाणा संवाद मासिकाची पुरवणी आहे. मासिकाच्या मुखपृष्ठावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं छायाचित्रही छापलं आहे.
हरियाणामध्ये हा मुद्दा एवढा वाढला की, टीव्ही अँकरने सरकारवर निशाणा साधत डोक्यावर पदर घेऊन आपल्या लाईव्ह डिबेट शोची सुरुवात करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केलं.
पाहा व्हिडीओ :


साभार - ABP माझा  

रविवार, ९ जुलै, २०१७

टीव्ही 9 मध्ये जोरदार घडामोडी

मुंबई -  टीव्ही 9 मध्ये जोरदार घडामोडी सुरु आहेत . निलेश खरे आणि उमेश कुमावत यांनी धडाकेबाज कामाला सुरूवात केली आहे. चॅनेल टीआरपीत तिस-या क्रमांकावर आला आहे.
अरविंद सिंगचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला आहे. गजानन कदम, अनिरूद्ध जोशी यांचीही लवकरच सुट्टी होण्याची शक्यता आहे. निखिला म्हात्रेची गँग आणि आळशी अँकर यांच्यावरही
कु-हाड पडण्याचा अंदाज आहे. नवीन पाच कर्मचारी भरले जाणार आहेत. सर्वांना कामाची संधी दिली जात असल्यानं चॅनेलमध्ये आनंदाचं वातावरण आहे. फक्त एक महिन्यांची लावलेली नाईट शिफ्टची पद्धत बंद करावी अशी मागणी आहे.

गुरुवार, ६ जुलै, २०१७

मानबिंदुतून १८६ जणांना नारळ

औरंगाबाद - मानबिंदूसाठी गेल्या पाच ते दहा वर्षापासून जीवाचे रान करून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऐनकेन कारणामुळे घरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. परीक्षेच्या नावाखाली संपादकीय विभागातील एकूण ५२ जणांना तर सर्व डिपार्टमेंट मधील मिळून १८६ जणांना नारळ देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ही सर्व आकडेवारी मानबिंदूच्या सर्व आवृत्तीतील आहे.
 एकीकडे GST लागू होण्यापूर्वी मालकाचे चिरंजीव सव्वा दोन कोटी रुपयांची नवी  आलिशान गाडी खरेदी करून फिरत असताना दुसरीकडे काटकसरीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कपात करण्याचे धोरण सुरु आहे.
नोटाबंदीनंतर प्रिंट मीडियात आर्थिक मंदीचे दिवस आले आहेत. खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात सुरु आहे. मजिठिया आयोग लागू करावा म्हणून न्यायालयात एकीकडे आदेश देत असताना दुसरीकडे कर्मचारीच घरी पाठ्वण्याचा नवा फंडा सुरु आहे. ज्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले त्याना मागील सर्व फ़ंडही  देण्यात येत नाही. आपणास काय -काय फंड मिळतो यापासून कर्मचारी अज्ञानी आहेत. कर्मचारी मागील फ़ंड मागत नाहीत आणि मालकही देत नाही... जागो कर्मचारी जागो !

मानबिंदूतिल कर्मचा-यांना आणखी कोणते दिवस पहावे लागणार देव जाणे ?
मानबिंदूंच्या बाबूजींनी गेल्यावर्षी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या तसेच काही बातम्या न छापल्याने विशिष्ठ वर्ग दुखावला गेला. याचा विपरीत परिणाम सर्वच आवृत्यांच्या खपावर झाल्याने मानबिंदूंच्या बाबूजींनी वाचक वर्गा पर्यंत पोहचण्याचा दृष्टीने नामी शक्कल लढविली आहे. यात गेल्यावर्षी महिला दिनी प्रत्येक कर्मचा-याच्या हाती १० प्रमाणपत्रे थोपवून शहरातील महिलांना त्याचे वाटप करायला लावले. हेच कमी की काय म्हणून यावर्षी पितृदिनाला ज्येष्ठ व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन झाल्यानंतर आगामी गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कर्मचा-यांकडे झाडाचे रोपटे देऊन शाळा शाळांमध्ये जाऊन याचे वाटप करायला लावले आहे. त्यामुळे लोकमतच्या कर्मचा-यांना पत्रकारिता आणि बाबूजींनी सोडलेले फर्मान यापैकी काय निवडावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मानबिंदूंच्या बाबुजींचे उपक्रम जरी चांगले असले तरी तहान भूक जेवण आणि झोप विसरून असली कामे केली जात असल्याने मानबिंदूत कर्मचारी तग धरतील का हा प्रश्न कायम आहे.

मंगळवार, ४ जुलै, २०१७

वृत्तपत्र कर्मचाऱयांसाठी...

रजिस्टर कोणत्याही वृत्तपत्रातील हंगामी, कायम, कॉन्ट्रॅक्ट वा इतर वृत्तपत्र कर्मचाऱयांसाठी
● आपली 'पे स्लिप' अशी आहे का? 'पे स्लिप' हा आपला मूलभूत हक्क आहे, ती जरूर मागा. *'मजीठिया वेतन आयोगा'चे लाभ सर्व वृत्तपत्र कर्मचाऱयांना लागू आहेत* सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, आपली 'पे स्लिप' / सॅलरी स्लिप (वेतन) चिठ्ठी कशी असावी, ते या मेसेज पोस्टसोबतच्या (वर/खाली) आहे.
● आपल्या वृत्तपत्र व्यवस्थापनाकडून अशाच पद्धतीने 'पे स्लिप' मागा... कुणी देत नसेल, किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार देत नसेल तर आपल्या नजीकच्या कामगार आयुक्त (लेबर कमिशनर) कार्यालयात लेखी तक्रार करून पोहोच घ्या. आपण राज्य सरकारच्या "आपले सरकार"मार्फत ऑनलाईन कामगार मंत्रालयालाही तक्रार करू शकता किंवा सुप्रीम कोर्टाला साध्या अर्जाद्वारे अवमानाबाबत कळवू शकता.
● अधिक माहितीसाठी किंवा मदत हवी असल्यास, मजीठिया अंमलबजावणीबाबत गठीत वृत्तपत्र कर्मचाऱयांच्या संयुक्त कृती समितीशी 022-22816671 या क्रमांकावर दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधता येईल.
*लक्षात ठेवा, ही भीक नव्हे; आपला हक्क आहे. कोणत्याही वृत्तपत्राच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला हे लागू आहे. कुणी देत नसेल तर त्याची RNI नोंदणी रद्द होऊ शकते. एकटे राहू नका, एकत्र या; संघटीत व्हा!

शनिवार, १ जुलै, २०१७

पत्रकार प्रशांत कांबळेची सुटका.

लढा अजुन संपलेला नाही, संघर्षाचा सूर्योदय अजुन बाकी आहे.
 अखेर तो दिवस आज उजाड़ला ज्या दिवसाची प्रतीक्षा राज्यातील तमाम पत्रकार बांधव करत होते. तो अमरावती जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त पत्रकार प्रशांत कांबळे अखेर आज बंदिस्त पिंजऱ्यातुन बाहेर तर पडला, पण राज्यातील पत्रकारांनी उभारलेल्या संघर्षाला आणि प्रशांत व प्रशांत सारख्या असंख्य बळी पडलेल्या पत्रकारांना संपूर्ण न्याय अजुन मिळालेला आहे असे म्हणता येणार नाही तर न्याय व हक्काचा हा संघर्षशील लढा इथुन पुढे आपल्या सर्व पत्रकारांना ज्वलंत ठेवावा लागणार आहे.

गेले कित्येक दिवस झाले प्रशांत कांबळे संदर्भात राज्यातील कानाकोपऱ्यातील पत्रकारांनी पोलिसी अत्याचारा विरोधात निषेध नोंदवून, निवेदने देऊन, आंदोलने करुन, प्रशांतला न्याय देण्याकरिता प्रयत्न केले. सोशल मीडियावर सुद्धा प्रशांतचा आवाज बुलंद करण्याकरिता रान उठवले आणि आज ती प्रतीक्षा अखेर संपली मात्र प्रशांत बाहेर तर पडला पण ही लढाई अजुन संपली का? तर नाही मित्रांनो, कारण आपल्या खऱ्या लढाईला आता कुठे सुरुवात झाली आहे. प्रशांत बाहेर येणे हा आमचा शेवट नाही तर प्रशांत सारख्या असंख्य पत्रकारांवर अशी वेळ पुन्हा कधीही येणार नाही अशी परिस्तिथी आम्हाला येत्या काळात निर्माण करावी लागेल.

प्रशांत संदर्भात जे जे काही खोटे आरोप झाले, गुन्हे दाखल करण्यात आले त्याबाबत संबंधित पोलिस प्रशासनाला आज ना उद्या जाब द्यावाच लागणार आहे. याकरिता या पुढील न्यायालयीन लढा आपल्याला शेवट पर्यन्त लढावाच लागेल. एक दिवस नक्कीच सत्याचा विजय होईल. प्रशांतच्या मागे राज्यातील सर्व पत्रकार एकत्र आले. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या पत्रकारांनी या लढ़यात आपला सहभाग नोंदवून प्रशांतला पाठिंबा दिला त्या सर्व पत्रकारांच्या एकीला खरच दाद द्यावी लागेल. इथुन पुढे प्रशांत सारखे अनेक पत्रकार जर अत्याचाराला बळी पडून शिकार होताना दिसत असतील तर पुन्हा एकदा पेटून उठून ज्वालामुखी सारखा ज्वलंत लढा आपल्या सर्वाना उभा करावा लागेल, कुणाचीही वाट न बघता. अत्याचाराचा अंधार कितीही दाट असला तरी संघटित होवून लढलेल्या संघर्षाचा सूर्योदय हा कुणी ही रोखू शकत नाही. 

रात्र घनदाट आहे
पण इतकीही नाही
की ती उद्याचा 
सूर्योदय रोखु शकेल,

संघटित व्हा 🤝आणि संघर्ष करा👊🏻
राज्यातील पत्रकार एकजुटिचा विजय असो.🙏🏻

राहुल पहुरकर.
 पत्रकार, मुंबई.
9987855550

पत्रकार संघटनेतील वाद अधिकाऱ्यांच्या पथ्यावर !

प्रशांत माफ कर आम्हाला !!
अमरावतीच्या प्रशांत कांबळेवर पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. एक संघर्ष करणारा पत्रकार पोलीसांना गुन्हेगार वाटला. व्यवस्थेविरूध्द आवाज उठवणारा प्रत्येक आवाज असाच दाबून टाकण्याची पध्दत प्रशासनात आली आहे. पोलीसांना मारहाण अथवा वाद झाल्यास त्याला माध्यमातून जोरदार प्रसिध्दी मिळते पण पोलीसांनी नाहक कोणास मारले तर लोक त्यावर नाना त-हेच्या शंका घेऊ लागतात. एका पत्रकाराने खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी केलेला प्रयत्न हा गुन्हा कसा काय ठरू शकतो? 
प्रशांतवर गुन्हा दाखलल झाल्यानंतर दोन तिन पत्रकार संघटना व हल्ला विरोधी समिती यात सहभाग घेईल असे वाटले होते. मात्र फारसं कोणी पुढे आले नाही. शेवटी प्रशांतच्या जवळच्या अथवा ओळखणा-या पत्रकारांना यात सहभागी व्हावं लागलं. त्यामुळे विषय जामिन मिळण्यापर्यंत तरी आला. आमचे मित्र अनिरूध्द जोशी यांनी व्हाटसअप वर सेव्ह प्रशांत असा डीपी ठेवत एक सद्भावना दाखवली त्यावरूनच हा विषय लिहावा वाटला. त्या सोबत एक पुरस्कारपप्राप्त पत्रकार गुन्हेगार कसा ठरतो हा प्रश्न देखील मनात सतत येत होताच.
या दुर्लक्षाला जातीय किनार असल्याची चर्चा देखील समाज माध्यमातून झाली. पत्रकार संघटनांवर दोन वेगवेगळ्या जातींचे वर्चस्व आहे. आणि त्यामुळेच प्रशांतला न्याय देण्यासाठी संघटना पुढे आल्या नाहीत हे देखील आरोप झाले.त्यात तथ्य किती माहित नाही पण दुर्लक्ष झाले हे खरे आहे. मागच्या कांही दिवसात प्रशांतला सोडविण्यासाठी सर्वंकश प्रयत्न झाले नाहीत.हे वास्तव आहे. या विषयात खरच जातीय कारण असेल तर ते तपासले पाहिजे आणि दूर केले पाहिजे. 
पत्रकार सतत पोलीस आणि प्रशासनाच्या बॅडबुक मध्येच असतो. कोणाला सन्मान मिळत असेल तर तो देखील तोंड देखला असतो हे लक्षात घेतले पाहिजे. तशी कांही उदाहरणे देखील आहेत. अनिरूध्द जोशी एकमतचे वरिष्ठ वृत्तसंपादक एकदा शेअर रिक्षाने सिडको चौकातून कार्यालयाकडे येत होते. एका साध्या गणवेशातील पोलीसाने ती रिक्षा अडवली. तो पोलीस दमदाटीची भाषा करत होता. म्हणून जोशीनी फक्त ओळखपत्र मागितले. ओळखपत्र मागितल्यामुळे पोलीस महोदयांना राग आला. आणि त्यांनी जोशीची रवानगी थेट पोलीसठाण्यात केली. ही करताना वायरलेस वर एक जबरदस्त गोंधल माजविणारा व्यक्ती पकडल्याची वर्दी देखील देऊन टाकली. फक्त ओऴखपत्र मागणे हा शांततेचा भंग होता. शेवटी अनेकांना हस्तक्षेप करत सोडण्यासठी प्रयत्न करावे लागले. प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडले.
असाच प्रकार उस्मानाबादेत घडला. दीपाली  घाडगे या महिला पोलीस अधिका-याने सुनिल ढेपे या पत्रकाराचा सरकारी गेमच केला.पंकज देशमुख, राजतिलक रोशन या अधिकाऱ्याच्या मदतीने ढेपे यांना खोट्या गुन्ह्यात गोवले. त्यांची अनेक दिवस तुरूंगात गेली. यावेळी देखील पत्रकार संघटनातील स्थानिक वाद एकी दाखवू शकले नाहीत. या आधी निवडणुकीच्या काळात एका वृत्तवाहिणीचा कार्यकृम परवानगी शिवाय घेतल्याची बतावणी करत याच पोलीस अधिका-यांनी त्या वृत्तवाहिण्याच्या वरिष्ठ पत्रकारावर गुन्हा दाखल केला होता. त्याच बाईंनी औरंगाबादच्या पत्रकारांना देखील धमकी दिली आहे. हे सगळं घडत आहे. आणि आपण एकमेकाच्या कागाळ्या करण्यात मग्न आहोत का हे तपासले पाहिजे
मी मुद्दाम तीव उदाहरणे दिलीत तीव वेगवेगळ्या जातीची आहेत पण भोगलं मात्र सारखच आहे. ते त्या जातीचे म्हणून नाही तर ते पत्रकार होते म्हणून सहन करावे लागले. मी पुण्यनगरीत असताना केज तालुक्यातील युसुफ वडगाल मध्ये शाळेतील भ्रष्टाचार बाहेर काढणा-या दलीत पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जात होता.त्याच वेळी मी संपादक म्हणून भुमिक गेत माझ्या पत्रकारावर गुन्हा दाखल होऊ दिला नव्हता. पाटोद्यातील अमिरशेख सोबत असाच प्रकार घडला त्यावेळी संपादक म्हणून त्याच्या मागे उभा राहिलो. रेणापूर तालुक्यातीलदर्जी बोरगावच्या नामदेव शिंदे सोबत असच कांहीस घडलं होतं. तेव्हा प्रत्येक वेळी पत्रकार ही एकच जात समोर दिसली. 
पत्रकाराची जात फक्त पत्रकार असते. वेगवेगळ्या प्रसंगात तो वेगवेगळ्या बातम्या करत असतो आणि त्या बातम्यामुळे ज्याचे नुकसान अथवा फायदा होतो तो त्या पत्रकाराची जात काढून जगासमोर आणत जातो आणि पत्रकाराचे करीयर या जातीय लढाईत अडकून जाते. प्रशांतच्या बाबतीत असेच तर झाले नाही ना याचा विचार करावा लागेल. प्रशांत कांबळे म्हणून कुलकर्णी जोशी पाटील देशमुख त्याच्या मदतीला आले नसतील तर ते खुपच गंभीर आहे. एक कुलकर्णी म्हणून प्रशांत तुझी माफी मागतो. मी कारण माझं आडनाव कुलकर्णी आहे पण मी एक पत्रकार आहे. प्रशांत पत्रकार आणि सुशील पत्रकार अशी आपली ओळख आहे. माझ्या बांधवापैकी कोणावर खरच अन्याय होणार असेल तर समोर यायलाच हवं. 
प्रशांत आम्ही तुझ्यासोबत आहोत. प्रशांतला या गोवलेल्या गुन्ह्यामधून बाहेर काढायला आपण सगळ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा.


- सुशील कुलकर्णी
संपादक, दैनिक एकमत
औरंगाबाद

फेसबुक वर शेअर करा

Facebook