> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

चंद्रकांत वानखडे, विश्‍वास पाटील यांना पुरस्कार

बाळासाहेब ऊर्फ बाळाजी तोंडे
नागपूर - लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या लोकमतचे पहिले संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ स्मृती सामाजिक-आर्थिक, विकासपर लेखन स्पर्धेचा २0११ सालचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांना त्यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचा चष्मा’ या ‘इत्यादी मनोविकास दिवाळी अंक २0११’मधील लेखासाठी देण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचा प्रथम पुरस्कार लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे वरिष्ठ पत्रकार विश्‍वास पाटील यांना त्यांच्या ‘कोल्हापूरच्या पोलीस दलातील लैंगिक शोषणाचा पर्दाफाश’ या वृत्तमालिकेसाठी देण्यात येत आहे. रुपये २१ हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे.
पां.वा. गाडगीळ स्मृती द्वितीय पुरस्काराचे मानकरी पुण्याचे डॉ. दीपक शिकारपूर हे आहेत. त्यांच्या ‘संगणक आणि मोबाइल यांचे दूरगामी परिणाम’ या ‘संस्कृती विशेषांक-२0११’मधील लेखासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. बाबा दळवी स्मृती द्वितीय पुरस्काराचे मानकरी दै. पुण्यनगरीचे बीडचे पत्रकार बाळासाहेब ऊर्फ बाळाजी तात्याभाऊ तोंडे हे आहेत. त्यांच्या दै. पुण्यनगरीमधील ‘धरण नव्हे शेतकर्‍यांचे मरण’ या वृत्तमालिकेसाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. रोख रु. ११ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे.
पां.वा. गाडगीळ स्मृती तृतीय पुरस्काराचे मानकरी नाशिकच्या मेघना ढोके या आहेत. यांना त्यांच्या ‘लोकमत दीपोत्सव २0११’मधील ‘लडते नही तो क्या करते’ या लेखासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. बाबा दळवी स्मृती तृतीय पुरस्काराचे मानकरी दै. उद्याचा मराठवाडाचे नांदेडचे पत्रकार संदीप काळे हे आहेत. त्यांना ‘जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वाळवी प्रकरण’ या वृत्तमालिकेसाठी पुरस्कार दिला जात आहे. रोख ५ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या दोन्ही स्पर्धांसाठी पुण्याचे विजय कुवळेकर, मनोहर कुळकर्णी व विजय लेले, नागपूरचे दि.मा. ऊर्फ मामासाहेब घुमरे, सुधीर पाठक व चिपळूणचे निशिकांत जोशी हे परीक्षक होते.


जाता - जाता : पुरस्कार पत्रकार बाळासाहेब तोंडे हे सध्या पुण्यनगरीमध्ये नाहीत.त्यांनी स्वत:चा समर्थ लोकनेता नावाचे वृत्तपत्र सुरू केले असून, त्याचे प्रकाशन दि.4 नोव्हेबर रोजी आहे.

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

नारदाची भ्रमंती...

मुंबई - सध्या  पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्यात. डॉ.रावसाहेब मगदूम यांचे दै.व्हिजन वार्ताची चांगलीच सफर सुरु झालीये. महाराष्ट्रातील अख्या प्रिंट मिडियाचे  दै.व्हिजन वार्ताकडे  लक्ष लागून आहे. तिकडे मुंबई पुढारीत गिरधारी हि चांगलेच रूळलेत . तर अदलाबदली झालेले विनायक पाथ्रुडकर मुंबई लोकमत च्या खुर्चीवर बसून आपल्या पत्रकारांना मार्गदशन करताय. स्टार माझाचा ' प्रसन्ना '  सध्या चांगलाच आघाडीवर आहे . त्याचा तजेलदार चेहरा , अभ्यासही दांडगाच आहे म्हणा.. इतर ' पुचाट  ' टोक शो  पेक्षा त्याच्या  ' टोक शो ' ला अनेकांची पसंती आहे. मिलिंद भागवतला हि तशीच कला आहे म्हणा.  ' जय महाराष्ट्र ' चॅनेल दीपावलीत सुरु होत असल्याची राळ आहे. पण त्यांचेहि गेल्या वर्षभरापासून ' लांडगा आला रे आला ..' असेचसे काही होणार आहे. मात्र या चॅनेलममध्ये असलेल्या प्रितीच्या राज्यामुळे अनेकांनी जय महाराष्ट् केलाय. सध्या प्रितीही झी 24 तासमध्ये संधी मिळते का म्हणून प्रयत्न करीत आहे.
 गोंडखैरी येथील देशोन्नती पिंट्रिंग प्रेससमोरील गोळीकांडप्रकरणी देशोन्नतीचे एडिटर इन चीफ आरोपी प्रकाश गोपाळराव पोहरे यांना पोलीस कोठडी दिली. यावरून अकोला परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. तर  महाराष्ट्र संपादक परिषद हि काहीसी अस्वस्थ आहे . तिकडे मुंबईत मंत्रालयातील पत्रकार नुकताच औरंगाबाद दौरा करून आलेत. सुप्रिया सुळेच्या लेक लाडकी अभियानाच्या समारोपाला अगदी खास विमानाने पत्रकार जाऊन आले. फेसबुकवरहि बेरक्या पेज ची पसंती वाढलीये. जर्नालीसमचे अनेक विध्यार्थी त्याला लायिक करत आहे.  नवशक्तीने पैश्याच्या बाबतीत जरासा आकसता हाथ घेतला आहे . अनावश्यक खर्चाच्या भानगडी कमी केल्यात. अमेरिकेतील बहुचर्चित अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वार्तांकनासाठी दिव्य मराठीचे संपादक कुमार केतकर, प्रहारचे महेश म्हात्रे  अमेरिकेच्या दौर्यावर गेलेत... मुंबईत  टीव्ही ९  ने अनेक शकला लढवून  सर्वसामान्यांशी चांगलीच नाळ जोडलिये... त्याच्या पावलावर पाऊल झी २४ तासने ठेवले आहे. प्रिंट मीडियात नेहमीप्रमाणे डीटीपी ऑपरेटरची तंगी कायम आहे.  सध्या पत्रकारीतले अनेक मंडळी कंटेंट रायटिंग , पीआर क्षेत्राकडे वळतायत. कारण तिकडे पगारपाणीहि भरपूर मिळतोय. ( काय करणार महागाईच्या जमान्यात पत्रकारितेतला तुटपुंजा पगार लगेच खपतो ) ठाण्यात झटपट सुरु झालेल्या दैनिकांची चमकेशगिरी कमी झालीये. आले तेवढे  लागलीच आर्थिक टंचाईत आहेत. दुसरीकडे रायगडच्या दै कृषीवल मध्ये जरा कामगारांची  काहीतरी गडबड दिसतेय.... पुण्यात दै. लोकनायकला  हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दै. बहुजन  महाराष्ट्रला ओवरटेक करायचा लोकनायकचा डाव फसलेला दिसतोय ? सध्या डिग्र्या घेऊन नवखी आलेली पत्रकार मंडळी साप्ताहिके अन जिल्हा दैनिकात  रुजू झालीत. स्टार पत्रकार होण्याचे अनेकांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय. कारण सध्या मोठ्या दैनिकांत गेल्या वर्षभरापासून जागा निघाल्या नाहीत. महाराष्ट्र टाईम्स च्या मेट्रो एडिटर असलेले प्रवीण मुळ्ये मुंबई टाईम्स हि पुरवणी चांगलीच गाजवत आहे . तरुणाईच्या त्या पुरवणीसाठी उड्या पडत आहे. पण मटाला 'कॉलेज क्लब रिपोर्टर ' महाग पडण्याची शक्यता आहे. कारण सार्वजनिक जीवनात हे  'कॉलेज क्लब रिपोर्टर '  मटाचे कार्यालयीन प्रतिनिधी सारखे वावरत असल्याचे आमच्या कानावर आहे. तूर्तास तरी एवढेच !  
- नारायण .. नारायण ..!   

 - नारद

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

दैनिक व्हिजन वार्ताच्या रत्नागिरी आवृत्तीचे प्रकाशन

सिंधुदुर्ग पाठोपाठ दैनिक व्हिजन वार्ताच्या रत्नागिरी आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष महेंद्र मयेकर, राजाभाऊ लिमये,व्हिजन ग्रुपचे चेअरमन प्रा.डॉ.रावसाहेब मगदूम, सरव्यवस्थापक एन.एस.पाटील,कार्यकारी संपादक मुकुंद फडके,  आणि अन्य.

पत्रकारांचा बिहार दौरा...

मुंबई - मंत्रालय वार्ताहर संघाचे पत्रकार नुकतेच बिहारच्या दौ-यावर जाऊन आले. दौरा यशस्वी झाला. नितीशकुमार यांनी विकासाचा ढोल महाराष्ट्रात पिटला जावा म्हणून मुंबई प्रतिनिधींवर प्रभाव टाकला खरा पण यात नेमकी मेख अशी की बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, हा मुद्दा ते पुढे करत आहेत, म्हणजे, विकासाच्या नावाने उद्या लालूंनी बोंब मारली की केंद्र हा दर्जा देत नसल्याची पळवाट काढायला नितीशकुमार मोकळे. पण हे आमच्या महाराष्ट्राच्या पत्रकांच्या लक्षात आले नाही, म्हणून त्यांनी त्यावर भाष्य केलेले नाही. लालूंनी मात्र फिरक्या घेतल्याचे कानावर आले. राजन पारकर यांनी ट्रेनिंग घेण्याचा सल्ला दिला तर शकील यांना अजून काही. दुबे, मिश्र, तिवारी यांनी तर आपल्या राज्यात मनसोक्त मजा केली. या शिष्टमंडळात सामनाचे योगेश त्रिवेदी, नवशक्तीचे प्रकाश सावंत, लोकसत्ताचे  स्वप्न सौरभ, महानगरचे प्रवीण पुरो, युगधर्माचे अशोक शिंदे, विनय खरे, पब्लिसिटी चे नितीन शिंदे, मसुरकर आदी सहभागी होते. विशेष म्हणजे मंत्रालय वार्ताहर संघाचा एकही पदाधिकारी सोबत नव्हता. त्यामुळे बिहार दौरा हा तिथे गेलेल्या प्रतिनिधींनी स्वत: नेता असल्याचे समजून पार पडला. त्यांनी बिहार चा अभ्यास केला खरा पण तितकीच मजादेखील. अधिक माहिती विन्या सांगेल. अजून काही गोष्टी आहेत. आतल्या गोटातून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच सांगू.

शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१२

प्रकाश पोहरे यांची तुरुंगात रवानगी

नागपूर - गोंडखैरी येथील देशोन्नतीच्या प्रिंटिंग प्रेससमोर केलेल्या गोळीबारात सुरक्षा रक्षक राजेंद्र दुपारेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी देशोन्नतीचे एडिटर इन चीफ प्रकाश पोहरे यांची सावनेर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आशिष अयाचित यांच्या न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची मध्यवर्ती करागृहात रवानगी केली.
या प्रकरणी प्रकाश पोहरे यांना २३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथील फॉर्म हाऊसमध्ये अटक केली होती. त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कळमेश्‍वर येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी विक्रमसिंग भंडारी यांच्या न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज दुपारी कळमेश्‍वर येथील न्यायालयात हजर करायचे होते.
मात्र, येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी भंडारी अवकाशावर असल्याने कळमेश्‍वर पोलिसांनी प्रकाश पोहरे यांना सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आयाचित यांच्या न्यायालयात आज दुपारी हजर केले.
दरम्यान, पोलिसांनी पोहरे यांची पोलीस कोठडी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून द्यावी, अशी न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने ही विनंती फेटाळली आणि प्रकाश पोहरे यांची न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावला.

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

माध्यमाच्या डोळ्यात धूळ फेकून वसूली

चंद्रपूर : राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पूत्राने सुरू केलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या येथील जिल्हाध्यक्षाने चक्क माध्यमाच्या डोळ्यात धूळ फेकून वसुलीसाठी स्वाभिमानी भूल दिल्याचा प्रकार उघड झाला आहे.  
नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासह माताभक्तांना आपले कलागुण प्रदर्शित करण्याची संधी प्रदान करण्यासाठी स्वाभिमान संघटनेने एका बड्या दैनिकाला हाती घेत १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान भव्य धमाल दांडिया उत्सव व स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यक्रमाचा खर्च भागविण्यासाठी या संघटनेच्या अध्यक्षाने इतर दैनिकाची कोणतीही परवागनी न घेता पैसे वसुलीच्या रेटकॉर्डवर नावे लिहली. इतकेच नव्हेतर कार्याक्रमाला राणे परिवार सिने-नट्यासह उपस्थित राहणार असल्याचा देखावा केला. याच रेटकॉर्डवर त्यांची पानभर छायाचित्रे छापून उद्योगांकडून वसुली केली.
स्थानिक मयुर हॉटेलजवळील इंडिस्टिड्ल एरिया परिसरात आयोजित या दांडिया उत्सवात एकल, युगल, बालगट व ज्येष्ठ नागरिकांच्या समुहाची स्पर्धा घेण्यात येईल आणि स्पर्धकांसाठी विविध बक्षिसेही राहणार असून सप्तमी, अष्टमी व नवमीला विजेत्यांना आकर्षक पुरस्कार देण्याची ही योजना नागरिकांच्या दृष्टीने स्वप्नविलासी ठरली आहे. एखादी संघटना हातात पकडायची. भाड्याने माणसं आणून वेगवेगळ्या समस्यांवर निवेदने द्यायची. माध्यमांमध्ये बातम्या छापून आणायच्या आणि याच भांडवलावर  महोत्सव घेऊन वसुली करायची, असा  प्रयोग सध्या शहरात एका संघटनेने राबविला आहे. वसुलीसाठी या संघटनेच्या म्होरक्याने बेमालूमपणे माध्यमांचा वापरही त्यांच्या नकळत करण्यास मागेपुढे बघितले नाही. 
राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मोठ्या नेत्याच्या मुलाची ही संघटना आहे. या संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षाने दांडिया महोत्सवाचा अर्थपूर्ण वापर केला आहे. दांडिया महोत्सवाला प्रायोजक मिळविण्यासाठी त्याने यावेळी नवीच शक्कल लढविली. एखाद्या कार्पोरेट कंपनीलाही लाजवेल, असे माहितीपत्रक त्याने तयार केले. या माहितीपत्रकात हिंदी  सिनेसृष्टीतील किमान अर्धा डझन तारका दांडियाला उपस्थिती राहतील, असे त्यांच्या छायाचित्रांसह प्रकाशित करण्यात आले आहे. सोबतच त्या नेमक्या कोणत्या दिवशी येणार याचाही तारखेसह उल्लेख यात आहे. मात्र, आजच्या दिवसापर्यंत यातील एकही अभिनेत्री या दांडिया महोत्सवात फिरकली नाही. ज्या अभिनेत्रींचा यात उल्लेख आहे, त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक़्रमात पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. त्यांचे मानधनही लाखांच्या घरात आहे. त्यामुळे लाखोंचे बजेट असलेल्या या दांडियासाठी प्रायोजकांकडून या जिल्हाध्यक्षाने किती रक्कम उकळली असेल, याची चर्चा आता सुरू आहे. एवढ्यावरच हा स्वाभिमानी नेता थांबला नाही. संघटनेचा प्रमुख, त्याचे मंत्रिमंडळातील वडील आणि त्याचा खासदार भाऊ एकाच दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचेही या माहितीपत्रकात म्हटले आहे. त्यांची पूर्ण पान छायाचित्रेही छापली आहेत. त्यामुळे या परिवाराच्या नावावरही दांडियाच्या निमित्ताने उद्योगांकडून रक्कम वसूल केली असावी, अशीही चर्चा आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. काही प्रादेशिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांची नावे त्यांची परवानगी न घेताच या माहितीपत्रकात प्रकाशित करण्यात आली आहे. दांडियाचे रोज वृत्तांकन माध्यमांमध्ये राहील. सोबतच खासगी दूरचित्रवाहिन्यांवरही ते दाखविले जाईल, असा दावा करतानाच या माध्यमांना आम्ही जाहिराती देऊ, असा दावाही त्याने माहितीपत्रकात केला आहे. दरम्यान, काही माध्यमांनी आता त्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली आहे.

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२

धन्यवाद बाबूजी ....

औरंगाबाद - पत्रकारितेतील आमचे गुरू डॉ.अनिल फळे यांचा 'विलास इनामदारला मरणोत्तर इनाम ते काय' हा आत्मचिंतन करणारा व काळजाला भीडणारा लेख आम्ही दोन दिवसांपूर्वी प्रसिध्द केला होता.त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला आहे की, लोकमतचे सर्वेसर्वा राजेंद्र बाबूजी रविवारी दिवंगत विलास इनामदार यांच्या पत्नीची भेट घेवून सांत्वन केले.ऐवढेच नाही तर विलासच्या मुलाचा शिक्षणाचा तसेच कपड्याचा पुर्ण खर्च लोकमत मीडीयाच्या वतीने करण्याचे आश्वासन दिले.या आश्वासनाबद्दल आम्ही बाबूजीचे आभार मानतो व धन्यवाद देतो.
दुसरे असे की, विलासला प्लॅट देतो म्हणून चार लाखाला ज्या बिल्डरने टोपी घातली, ते वसूल करण्याचे काम लोकमत हेल्पलाईनच्या वतीने चालू आहे.बिल्डरने महिनाभरात रक्कम परत करण्याची ग्वाही दिली आहे.
विलास इनामदार याच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. सौ.इनामदार यांना मदत करण्यासाठी लोकमतमधील काही कर्मचारी तसेच अन्य काही पत्रकार, हितचिंतक पुढे सरसावले आहेत.

बेरक्या इफेक्ट

 धुळ्याचे प्रेस फोटोग्राफर राजेंद्र सोनार यांचे पेडींग बिल अखेर लोकमतने दिले.

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२

विलास इनामदारला मरणोत्तर 'इनाम' ते काय ?

‘बाबूजी’  पावले नाहीत, म्हणून तू थेट तिरुपतीच्या बालाजीकडे धावला होतास. विलास तू ज्या दैनिकात सध्या होतास. तसा त्या दैनिकाचा किंवा मालकांचा तुला काही त्रास होता असं नाही. पण सालं मधल्या फळीतल्या  पत्रकारांच्या आयुष्यात तणतण, चणचण ही असतेच. त्या चिंतेत जळणा-या मनाचा रोज अपघाती मृत्यू होतच असतो. तसा बाकी खाली आणि वरच्या पत्रकारांचा होत नाही असंही नाही. प्रत्येक पातळीवरची कारणे वेगवेगळी असतात. पण ते जाऊ देत.  तूला बालाजी तिरुपतीनंही खरंच का नाकारलं बरं? कदाचित तू पत्रकार, तोही आपल्या ख-या-खु-या मध्यमवर्गातला म्हणूनच रे !  ‘हायर मिडल वेल सेटेलड’  अस्सं काही अजून जोडलं जाण्याइतपत तू प्रगती केली नव्हतीस. आपलं स्वत:च हक्काचं छोटंसं का होईना घर असावं, आपल्या मालकीचं असावं म्हणून तुझी धडपड चालू होती. तो फ्लॅट अगर कोणतंही आपल्या हक्काचं घर व्हावं म्हणून साकडं घालण्यासाठी तू थेट तिरुपतीच्या बालाजीला जावू लागला होतास. तेही अर्थातच यावेळी मित्राच्या मेहेरबानीमुळे गेला होतास. कुणा एका बिल्डरनं तूला किफायतशीर किंमतीत फ्लॅट द्यायचं कबूल केलं, त्याला तु तुझ्याकडे होती नव्हती तेवढी सगळी पुंजी काढून दिलीस. नंतर तूला कळाले, या फ्लॅटची रजिस्ट्रीच होऊ शकत नाही. काय असेल तो ‘इलिगल’  मामला. त्याच्याकडून अ‍ॅडव्हान्स दिलेले पैसे वसूल करायचे होते. घरात किराणा भरायचा होता. पोराच्या शाळेची, क्लासची फी भरायची होती. घरभाडं व बाकी होतंच. 
देशाचं, राज्याचं, प्रदेशाचं अर्थकारण काय आहे, त्यातल्या घडामोडीच्या बातम्या रोज द्यायच्या. ज्या आवृत्तीच्या पानांची जबाबदारी आहे, निदान त्या कार्यक्षेत्रातील खालचे-वरचे सगळे अर्थकारण आपल्याला पाठ. जरा तिथे कुठे हिशोब चुकला, त्याबरोबर शब्द चुकला तर मालकाचा संपादकामार्फत मेमो आपला ठरलेलाच. इकडे मात्र आपल्या बायको अन पोराच्या आर्थिक स्थैर्याची वाट लावायला आपण केव्हाही मोकळे!  च्यायला, दुसरं करणार तरी काय?  पॅकेज पॅकेज, मोठं पॅकेज मालक देतो. पण गुणवत्तेपेक्षा इतरत्र राहून होणा-या कोणत्या ना कोणत्या उपद्रव्य मूल्यामुळे. जाऊ देत त्याबद्दल वेगळं बोलता येईल. पण, तू साला कमनशिबीचं म्हणावा रे! आणि तूच काय आपल्या पत्रकारांच्या जमातीला लागलेला शापच म्हण.  अर्थात अपवाद आहेत. त्यांना तू १०% मध्ये ठेव! बाकी नव्वद टक्क्यांमध्ये तू होतास.
आमचं बूड एक तर कुठे टिकलं नाही. जिथे तिथे स्वाभिमान आडवा आला. पण गेल्या २० वर्षांमध्ये तू अनेकदा बरोबर होतास. मला आठवतं. ‘सामना’ मध्ये तू कटपेस्ट आर्टिस्ट म्हणून काम करायचास. तेव्हापासून तूला तसा शब्दांशी लळा. तु घरखर्चाला हातभार म्हणून शब्दकोडे करुन द्यायचास. छोटं-मोठं कर्ज, हातउसने तर कायमचेच. त्यातून कधी सुटका झाली नाही. तू जाण्याचं दु:ख आपल्या सगळ्याच पत्रकारांना झालं. जिल्हा पत्रकार संघाने श्रद्धांजली वाहिली. त्यात सगळेच पोटतिडकेनं बोलले. आपण विलास इनामदारच्या कुटुंबासाठी काहीतरी करायला हवं. वहिनींच्या नावावर काही रक्कम डिपॉझिट करावी, त्या बिल्डरकडून तो अ‍ॅडव्हान्स वसूल करावा, बाकी रेल्वे अपघातामुळे नुकसानभरपाई, वैयक्तिक पातळीवर मदत, सहका-यांकडून वर्गणी असं बरंच काही ठरलं. त्यादिशेने कामही सुरु झालंय. आपण पत्रकार सामाजिक भावनेच्या हिंदोळ्यावर हालत असतो. बाकी घरच्या पातळीवरही वेगळं काही नसतं. सुरक्षा म्हणाल तर ग्रुप इन्शुरन्सपुरती. त्या त्या मालकांना दैनिकाच्या खपाचे आकडे हवेत तसे फुगत असतात. पत्रकारांची वेठबिगारी मात्र आपली कायम. स्पर्धा वाढली म्हणून खेचाखेच होती. त्यात बोलावणे आले तर पगारात ‘डिमांड’  करता येते. नाहीतर एवढे घ्या अन्यथा तुम्ही तिथेच बरे असे सांगितले जाते. त्या विचार करण्याच्या नादात आणि नोक-या बदलण्यातच सगळे करिअर खल्लास होऊन जाते. जे कायम चिकटून राहतात. त्यांना पीएफ, इएसआयची पेन्शन मिळते. तेही तुम्ही त्या वेळेला ड्युटीवर असाल तर. नाही तर वर गेल्यावरही बोंबलत बसा. तुमच्या कुटुंबासाठी सहकारी पत्रकारांच्या सदभावनेतून जेवढी ताकद निर्माण होते तेवढीच. आपल्या मराठवाड्यात अजून तरी श्रमिक पत्रकार म्हणून हक्काचे भांडण करणारी संघटना नाही. आहे तो पत्रकार संघ श्रद्धांजली वाहण्यापुरता. त्या श्रद्धांजलीच्या ओंजळीत जेवढी आर्थिक मदत लाभेल तेवढी घ्यायची आणि मयत पत्रकाराच्या कुटुंबाने गुपचूप बसायचे. अनेक पत्रकारांचे अपघात होतात, कुणाला असाध्य आजाराने घेरले जाते अशावेळी तरी वेगळं काय घडतं. ड्युटीवर आहे की नाही हे पाहिले जाते, पुन्हा तो नियमात बसतो की नाही हेही महत्वाचे असते म्हणे. एखाद्याची बायपास सर्जरी किंवा अन्य ऑपरेशनची वेळ आली तर मालकाच्या मर्जीनुसार थोडीफार मदत. ज्या पुढा-यांच्या पखाल्या वाहिल्या त्यांच्याकडून काही मिळाले तर. दिन दीन असला किंवा दिवाळी असली काय याच पद्धतीने बहुसंख्य पत्रकारांना अशा अस्थिर स्थैर्याला सामोरे जावे लागते. ते पाहून याच अवस्थेतून वर गेलेल्या संपादकाचे डोळे कधी पाणावले तर तेवढेच नशिब. मालकाला प्रिटिंग मशिनमधील स्क्रू आणि कर्मचारी यामध्ये फरक करायला सवड मिळत नसते बरेचदा. एरवी म्हणायला तो आपला परिवार म्हणत असतो. पण या परिवारातला माणूस दगावला तर हातातली कामे सोडून यायला त्याला वेळ नसतो. त्यांच्या ‘प्रायोरिटिज’  वेगळ्या असतात. त्यांना जिवंतपणी मिळणा-या हारांची ओढ असते. त्यातला एखादा हारही कर्मचा-याच्या मयत झाल्यानंतरही नशिबी नसतो. सगळेच यंत्रवत झाले आहे. तिथे दोष तरी कुणाला द्यायचा?  राज्य पातळीवरुन कृतज्ञता निधी मिळतो, पण त्यासाठी अधिस्वीकृती ओळखपत्र हवे असते. मालक काय किंवा सरकार काय हे नियमाची चौकट सोडून कधीच वागायला तयार नसते. तेव्हा सामूहिक वा वैयक्तिक स्तरावरच सहानुभूतीची ज्योत तेवत असते. विलास तू कंत्राटी कामगार होतास, यापेक्षा तुझी ओळख काहीच नव्हती रे लेका!  सगळे जण आपापल्या परिने जरुर ते प्रयत्न करतील, तुझ्या घरी नियमित किराणा भरला जाईल, मुलाचे शिक्षण होईल, वहिनींना नोकरी मिळेल किंवा छोटा-मोठा व्यवसाय करता येईल. त्या अर्थाने असंघटित पत्रकारांकडून तूला आवश्यक ते इनाम त्यांच्या सांघिक भावनेतूनच मिळेल.
दैवाने प्रत्येकाच्याच मरणाचा पत्ता लिहून ठेवलेला आहे, तो कधी कुणाला सांगितला जात नाही एवढेच. तुझ्यासारखे अनेक  पत्रकार, वार्ताहर तिथे वर तमाम सहका-यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी परमेश्वराला साकडे घालत असतील! 

 डॉ.अनिल फळे,
मुक्त पत्रकार, संचालक, अप्रतिम मीडिया 
anilphale@apratimmedia.net


                      

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

इलनाच्या अध्यक्षपदी परेश नाथ यांची फेरनिवड

ऋषिकेश - भारतीय भाषा वृत्रपत्र संघटना तथा इलनाच्या अध्यक्षपदी सरस सलिल समुहाचे संपादक परेश नाथ यांची फेरनिवड करण्यात आली.उत्तरांचलमधील ऋषिकेश येथे पार पडलेल्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी देशभरातून ९० प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी नविन कार्यकारिणीही घोषित करण्यात आली.त्यानुसार रवीकुमार बिश्नोई (उत्तर), राजकुमार कोटी (दक्षिण), दिनबंधु चौधरी (पश्चिम) यांची उपाध्यक्षपदी,चंद्रकांत भावे यांची कोषाध्यक्षपदी तर विवेक गुप्ता, प्रकाश पोहरे व अंकित बिश्नोई यांची महासचिवपदी निवड करण्यात आली.
१८६७ च्या प्रेस रजिस्टेशन ऑफ बुक्स कायद्यातील दुरूस्तीचा प्रस्ताव लोकशाहीचा विरोधात असून, तो मागे घेण्यात यावा तसेच केवळ प्रेस रजिस्टार किंवा संबंधित राज्याच्या राजधानीतील नियुक्त उप प्रेस रजिस्टारकडे डिक्लेरेशन करण्याची तरतूद असावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

बिझनेस मिटमध्ये 'व्हिजन'वार्ताचे व्हिजन...

डॉ.रावसाहेब मगदूम
कोल्हापूर - १ कोटी वाचकांच्या विचारातून जन्माला येत असलेल्या दै.व्हिजन वार्ताची सकारात्मक भूमिका व्यवस्थापकीय संपादक डॉ.रावसाहेब मगदूम यांनी  येथे अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज बिझनेझ मिटमध्ये मांडली.आस्माच्या वतीने आयोजित जाहिरात व्यवसाययिकांच्या राज्यव्यापी परिषदेचा समारोप आज येथे झाला.यावेळी डॉ.मगदूम यांनी मांडलेल्या भूमिकेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
व्हिजन प्रकाशनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे करूनही प्रस्थापित दैनिकांनी त्याची योग्य दखल घेतली नाही.दैनिकात जाहिरातदारांना बातमीच्या स्वरूपात योग्य स्थान दिले जात नाही,याचे दु:ख मी क्लाएंट म्हणूनही भोगले आहे,असे सांगून डॉ.मगदूम यांनी व्हिजन वार्तामध्ये मात्र जाहिरातदार आणि त्यांचे क्लाएंटस् यांची प्रगती साधण्यासाठी योग्य प्रसिध्दी दिली जाईल,अशी ग्वाही दिली.व्हिजन वार्तामध्ये गुन्हेगारी बातम्या,सेक्सच्या जाहिराती, मटका,लॉटरी अशा गोष्टी नसतील, अशी माहिती डॉ.मगदूम यांनी देताच, उपस्थितांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
महाराष्ट्रामध्ये १ कोटी १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा सव्र्हे करून,त्यांच्या मागणीप्रमाणे अंकाची रचना करण्यात आली आहे.गुन्हेगारी बातम्या नको, ही ९५ टक्यापेक्षा जास्त लोकांची मागणी आहे.म्हणूनच आम्ही हा प्रयोग करीत आहोत.अंक बुकींगच्या माध्यमातून आहाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद म्हणजे आमचे धोरण योग्य असल्याची पावतीच आहे, असेही डॉ.मगदूम यांनी स्पष्ट केले.सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हिजनवार्ताची मुहूर्तमेढ रोवून,वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात सकारात्मक विचाराचे हे दैनिक पोहोचेल,अशी माहितीही डॉ.मगदूम यांनी यावेळी दिली.
आस्माचे अध्यक्ष अमर पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी एक महत्वाची बिझनेस मिट कोल्हापुरमध्ये घेतली, याबद्दल डॉ.मगदूम यांनी त्यांचे अभिनंदन केले.दोन दिवस चाललेल्या या बिझनेस मिटमध्ये महाराष्ट्रातील नामांकित अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

गावकरीच्या रावांचे दुर्लक्ष

औरंगाबाद -गेल्या तीन  महिन्यांपासून पगार होत नसल्याने दैनिक गावकरीचे  कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत - वंदनराव पोतनीस यांनी  दुर्लक्ष केल्यामुळे  औरंगाबाद युनिट शेवटची घटका मोजत आहे. दोन दिवसात पगार न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा  आणि बेमुदत उपोषण करणार असल्याचा FAX  कर्मचार्यांनी पोतनीस यांना केला आहे.
गावकरीचे मालक पोतनीस यांनी ठोस भूमिका न घेतल्यास कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्याचाही निर्णय कर्मचार्यांनी घेतला आहे.

पोहरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल

मयत सुरक्षा रक्षक राजेंद्र  दुपारे
नागपूर - देशोन्नती या दैनिकाच्या गोंडखैरी येथील प्रिटिंग प्रेसमध्ये सुरू असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला आज शनिवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. देशोन्नतीचे एडिटर इन चीफ प्रकाश पोहरे आणि त्यांच्यासोबतच्या सुरक्षा रक्षकाबरोबर आंदोलकांची बाचाबाची झाली. यावेळी पोहरे यांच्या सुरक्षा रक्षकाने आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकावर १२ बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडली. परिणामी गंभीर जखमी झालेल्या या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे गोंडखैरी पिंट्रिंग प्रेसमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रात्री उशिरा कळमेश्‍वर पोलिसांनी प्रकाश पोहरे आणि त्यांच्या पाच साथीदारांविरूद्ध खून आणि गैरकायद्याची मंडळी जमविल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. यात दुपारे यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी द्विवेदी आणि अन्य चार सुरक्षा रक्षकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथील पिंट्रिंग प्रेस परिसरात देशोन्नती या दैनिकातील कामगार संघटनेने गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.
आज येथे पोहरे येणार असल्याचे आणि ते नवीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणार असल्याचे आंदोलकांना कळले होते. त्यामुळे आंदोलकही सतर्क झाले. या पार्श्‍वभूमीवर, आज सायंकाळी ५ च्या सुमारास देशोन्नतीचे एडिटर इन चीफ प्रकाश पोहरे आणि त्यांचे बंदूकधारी सुरक्षा रक्षक आंदोलनस्थळी पोहोचले.
दगडफेकीनंतर सुरक्षा रक्षकाने गोळी झाडली
नागपूर - प्रकाश पोहरे यांनी तेथील जुने सुरक्षा रक्षक तसेच सुपरवायझर राजेंद्र कृष्णराव दुपारे (वय ४९) यांच्याशी चर्चा करून नवीन सुरक्षा रक्षकांनी प्रेसचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक चिडले व वातावरण तापले. दोन्हीकडून एकमेकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाल्यामुळे बाचाबाची वाढली आणि संतप्त आंदोलक पुढे सरसावले. प्रकाश पोहरे आणि नवीन सुरक्षा रक्षकांनी प्रेसचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे आंदोलकांनी पोहरे व त्यांच्या साथीदारावर दगडफेक केली. त्यामुळे सुरक्षा रक्षक हरिप्रसाद रामप्यारे द्विवेदी याने आपल्या १२ बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडली. ती आंदोलनकर्ते सुरक्षा रक्षक राजेंद्र कृष्णराव दुपारे, रा. वाडी यांना लागली. गंभीर जखमी झालेल्या दुपारेंना तातडीने मेडिकलमध्ये हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नातील आरोपीला संतप्त आंदोलकांनी पकडले आणि बेदम चोप दिला.माहिती कळताच कळमेश्‍वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला.
पोहरे म्हणतात रक्षकाने स्वसंरक्षणार्थ झाडली गोळी
या संदर्भात देशोन्नतीचे एडिटर इन चीफ प्रकाश पोहरे म्हणाले की, काही कामगार नेत्यांच्या चिथावणीमुळे कामगारांची सातत्याने दिशाभूल होत आहे. यामुळे तेथील वातावरण बिघडले आहे. पिंट्रिंग प्रेसमधील कामगार बरोबर काम करीत नव्हते. करार पाळत नव्हते. वरून मुजोरी करायचे. वेस्टेज वाढत होते. यामुळे आम्हाला मोठे आर्थिक नुकसान होत होते. हे जे आंदोलन सुरू होते त्याबाबत आपण पोलिसांना वेळोवेळी कल्पना दिली होती. ९ ऑक्टोबरला कामगारांची सर्व देणी देऊन टाकली. आज नवीन सिक्युरिटी लावण्यासाठी आपण प्रेसवर गेलो होतो. त्यावेळी कामगार आतमध्ये दडून बसले होते. ते बाहेर आले व आमच्यावर दगडफेक सुरू केली. माझ्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वरक्षणार्थ सुरक्षा रक्षकाने गोळी झाडली. दहा दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार येथे घडला होता. मात्र, आम्ही संयम पाळल्याने तेव्हा अनर्थ टळला. 
नागपूर श्रमिक पत्रकार संघाची मागणी
आज देशोन्नतीच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये झालेल्या या घटनेचा नागपूर श्रमिक पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेधकेला असून प्रकाश पोहरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी आणि मृत राजेंद्र दुपारे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशीही मागणी श्रमिक पत्रकार संघाने केली आहे.


साभार - लोकमत, नागपूर


Newspaper editor shoots worker dead in Nagpur

Nagpur: An employee of the Marathi daily Deshonnati, which is a leading language paper in the region, died after being shot by its editor-in-chief and owner Prakash Pohare at 5.15pm on Saturday. Rajendra Dupare, a security guard at the paper’s printing press unit at Gondkhairi, in the outskirts of the city, and other employees were having a meeting with Pohare when the gruesome incident took place.
    Some of the employees had suddenly been asked to quit by Pohare. It resulted in the printing press being shut down since the last month. The paper was being printed in another press.
The striking employees were trying to work out a deal with Pohare, who had arrived for the meeting with 5 private security guards, including a gunman.
    A scuffle ensued following which Pohare allegedly shot Dupare in the stomach. The security guard died after being brought to the Government Medical College and Hospital in the city.
    While the enraged workers alleged that Pohare snatched the gun and fired at Dupare, the editor claimed that he was at least 100 feet away when the incident took place.
The police, however, have booked Pohare for murder.
    So far, Kalmeshwar police have arrested gunman Harikrishna Dwivedi who is believed to have been in an inebriated condition. Pohare, who fled the scene, is still at large. Outraged by the incident, Deshonnati workers gathered at GMCH and raised slogans for the immediate arrest of Pohare.
    According to the employees, around 205 people work at the Deshonnati printing press. Since the last few months, they have been protesting for non-payment of salaries. On September 7, the workers found the printing press shutter closed. Fearing loss of jobs, they staged a protest in front of the printing unit.
    On Saturday morning, before staging the protest, the employees even submitted a
letter to the cops claiming that Pohare has “threatened” them for protesting and would take “harsh action”. “Since he threatened us, we informed the police,” said one of the workers.
    On Saturday evening around 5pm, Kalmeshwar police inspector S Maitre visited the press. Finding everything to be in order, he left. The firing took place 20 minutes after Maitre returned to the police station.
    “Pohare asked Dupare to leave as he had been paid his salary. Later, the security guards too threatened Dupare. We tried to help him and during the tiff Pohare ordered the gunman to fire, which he did while pointing to the ground. Pohare then took the weapon and shot Dupare,” said Kamlakar Belekar, an eyewitness and a colleague of Dupare.
    Rural SP Manoj Sharma said that the shot was fired from a 12 bore rifle. “Prima fa
cie it’s clear that two rounds have been fired. We are investigating whether the rounds were fired by Dwivedi or Pohare,” he said.
    “I heard the shot being fired and fled from the spot. I immediately informed Manoj Sharma who asked me to leave the scene immediately,” said Pohare.
    Pohare started Deshonnati in Akola in 1986. The paper is being published from Nagpur since the last 10 years. Known for taking up the case of farmer welfare, Pohare also runs a bank (Nishant Multi-State Cooperative Bank) and a cable network (Nishant Satellite Communications Network). He was earlier the general secretary of cotton growers’ association. A couple of years ago, Pohare was alleged to have abetted the suicide of Deshonnati city reporter Manoj Padmagiri who claimed harassment from the editor in his personal notes. 

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२

मोहन मस्कर-पाटील यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

सातारा  - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य विभागातर्फे व्यसनमुक्ती कार्याबद्दल पत्रकार गटातून देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार लोकमतच्या सातारा आवृत्तीचे उपसंपादक मोहन मारुती मस्कर-पाटील यांना पुण्यात झालेल्या पहिल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. पंधरा हजार रुपयांचा हा पुरस्कार आहे.

संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सामाजिक न्याय राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आ. उल्हास पवार, समाजकल्याण सचिव आर. डी.  शिंदे, समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, जिल्हाधिकारी विकास देशमुख, किरण मस्कर-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहन मस्कर-पाटील मुळचे चिंचेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली येथील असून सध्या ते लोकमत सातारा कार्यालयात उपसंपादक आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी व्यसमुक्तीच्या अनुषंगाने केलेले लेखन आणि व्यसनमुक्ती चळवळीतील सहभाग याचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
ग्रामीण विकास, महिला सबलीकरण, पाणी, कृष्णा-खोरे, शेतकरी आत्महत्या, एचआयव्ही-एड्‌स, राजकारण, पर्यावरण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. यापूर्वीही त्यांना सीएसई मीडिया फेलोशीप, व्यंकटेश चपळगावकर युवा प्रेरणा ऍवॉर्ड तसेच लोकमतअंतर्गत देण्यात येणारे चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

कोल्हापुरात पुढारी नं.1

कोल्हापूर - सध्या राज्यात खपावरून लोकमत, सकाळमध्ये शीतयुध्द पेटले आहे. या वादाची सुरूवात पुण्यापासून सुरू झाली.सकाळने खप दर्शविणारा तक्ता प्रसिध्द करताच, लोकमतने औरगाबाद,नागपूर आणि सोलापूरात क्र.1 वर असल्याचा दावा त्या - त्या आवृत्तीत केला.आता या वादात पुढारी पण पडला आहे.

कोल्हापुरात क्र1 वर पुढारी असल्याचा तक्ता प्रसिध्द झाला आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार पुढारीची वाचकसंख्या 11 लाख 59 हजार, लोकमतची 5 लाख 71 हजार तर सकाळची 5 लाख 91 हजार आहे. एका पेपरमागे दहा वाचक असतात असे गृहीत धरून ही वाचकसंख्या ठरवली जाते. मग प्रत्यक्ष खप किती, याची आकडेवारी लक्षात येते.

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

'लोकमत'चे विलास इनामदार यांचा दुर्देवी मृत्यू

औरंगाबाद - दैनिक लोकमतचे उपसंपादक विलास इनामदार (वय ३५ )यांचा आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुत्ती रेल्वे स्टेशनवर गुरूवार दि.११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूमुळे लोकमत परिवार तसेच अनेक पत्रकारांना मोठा धक्का बसला आहे.
विलास इनामदार व त्यांचे मित्र काही दिवसांपुर्वी तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गुरूवारी  रेल्वेने औरंगाबादला परतत असताना, आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुत्ती रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता, इनामदार हे पाणी पिण्यासाठी खाली उतरले.मात्र याचवेळी रेल्वे सुरू झाल्यानंतर ते घाईत रेल्वेमध्ये चढत असताना, त्यांचा पाय खाली निसटला व रेल्वेखाली सापडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
कै.विलास इनामदार हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच, अनेकांना मोठा धक्का बसला. रिपोर्टर ते उपसंपादक पदावर ते सामना,लोकमत, देवगिरी तरूणभारत पुन्हा लोकमतमध्ये कार्यरत होते.लोकमतमध्ये त्यांनी एकूण आठ वर्षे सेवा केली.त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.कै.इनामदार यांच्या परिवाराच्या दु:खात बेरक्या व बेरक्याचे असंख्य वाचक सहभागी आहेत.

काय खरं ? काय खोटं ?

सोलापूर - औरंगाबादप्रमाणे सोलापूर लोकमतनेही वाचक संख्या दर्शविणारी जाहीरात दि.11 ऑक्टोबरच्या अंकात प्रसिध्द केली आहे. लोकमतने दावा केला आहे की,लोकमतचे 1 लाख 54 हजार, सकाळचे केवळ 31 हजार तर दिव्य मराठीचे 22 हजार वाचक आहेत.
खरं, खरंच असतं असे लोकमतकार म्हणणात...मात्र  खरी परिस्थिती अशी आहे की, दिव्य मराठी सोलापूरात येण्यापूर्वी शहरात येणाऱ्‍या सर्व भाषिक पेपरचे मिळून जेम तेम 60 हजार वाचक होते तसेच दिव्य मराठीचे आत्ताचे 60 हजार वाचक आहेत. यानंतर दिव्य मराठीचा परिणाम सर्व दैनिकांच्या वाचकांवर झाला आहे. साहजिकच इतर दैनिकाचे खप घटल्यानंतर सोलापूरात सर्व दैनिकांचा खप एक लाखापर्यंत आहे तर मग लोकमतचा खप दिड लाखावर कसा आहे? असा सवाल  शहरातील विकेते, पञकार तसेच सर्व स्तरावरून विचारला जात होता. तसेच इतका खप असूनहि वाचक व विकेत्यांसाठी एका मागून एक योजना राबवण्याची लोकमतला  गरजच काय? अशी  चर्चा  शहरात सुरु आहे.

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२

लोकमत नं.1 ?


औरंगाबाद - लोकमतची औरंगाबाद आवृत्ती अन्य दैनिकापेक्षा नं.1 असल्याचा दावा लोकमतने दि.10 ऑक्टोबर रोजी केला आहे.आयआरएस आणि एबीसीनुसार लोकमतचे वाचक 15 लाख 76 हजार, सकाळचे 7 लाख 69 हजार तर दिव्य मराठीचे केवळ 2 लाख 17 हजार असल्याचे लोकमतचे म्हणणे आहे.
* ही जरी वाचक संख्या असली तरी प्रत्यक्ष खप किती, याची आकडेवारी मात्र लोकमतने दिली नाही.

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

सरकार निष्क्रीय आणि नालायक - देशमुख

बीड ( गणेश सावंत)-
पत्रकारावर होणा-या सर्वाधिक हल्ल्यात राजकीय पक्षाच्या कार्यकत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे या कायद्याला राजकीय विरोध होत आहे. सरकार निष्क्रीय आणि नालायक असून त्यामुळेच कायद्याला ऊशीर होत आहे. आता कायद्यासाठी मागणी नव्हे तर अमरण उपोषण करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी केले.
पत्रकार संजय मालाणी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.नऊ) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात दिल्ली प्रेस क्लबचे पंकज कुमार, महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे किरण नाईक, यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे आमदार, जिल्हाप्रमुख, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करतांना एस. एम. देशमुख बोलत होते.
पुढे देशमुख म्हणाले की, पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा असावा अशी मागणी केली जात आहे. हा कायदा होणे गरजेचे आहे. मात्र राज्यकर्ते या कायद्याप्रती निरुत्साही आहेत मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक दोघेही या कायद्याच्या विरोधात आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षआपल्यासमोर या कायद्याला पांठिबा दर्शवतात. प्रत्यक्षात मात्र तेही या कायद्याला विरोध करत आहेत. कारण आजपर्यत महाराष्ट्रात पत्रकारांवर जेवढे हल्ले झाले. त्यापैंकी ८० टक्के हल्ले हे राजकीय पक्षाशी संबधित व्यक्तींनी केलेले आहेत. या हल्ल्यांने किंवा यापुढे होणा-या हल्ल्यामुळे पत्रकारांनी नाऊमेद होऊ नये. आपली लढाई सत्याची आहे त्यामुळे यापुढेही हल्ले होत राहतील. मात्र या कायद्यासाठी आता यापुढे सरकारकडे मागणी, निवेदन किंवा चर्चा आणि बैंठका होणार नाहीत. तर निष्क्रीय आणि नालायक असलेल्या या सरकारला वटनीवर आणण्यासाठी नागपूर आधिवेशनात अमरण उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हीही या उपोषणात सक्रीय सहभाग घ्यावा आणि शासनावर दबाव आणावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मालाणी यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला असून असे हल्ले लोकशाहीला मारक आहेत. त्यामुळे पोलीसांनी या हल्ल्यातील हल्लेखोर नव्हे तर मुख्य सुत्रधार शोधून काढावा. अन्यथा हे प्रकरण मी विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे आमदार पंकजा पालवे-मुंडे म्हणाल्या. यावेळी आ. मुंडे यांनी मालाणी यांना ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली. तर मालाणी यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ पत्रकारांवरचा नसून तो लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी पत्रकारांच्या मोठ्या संघटनाची गरज आहे. पत्रकार होणे सोपे नाही. कारण लोकशाहीच्या संरक्षणाची शपथ घेतलेली व्यक्ती म्हणजे पत्रकार आहे. जीव धोक्यात घालून लोकशाहीचे रक्षण करण्याचे काम पत्रकार करतो. त्यामुळे पत्रकार हल्ला विरोधी कायद्याला विरोध करणा-या राज्यकत्र्यांचा पर्दाफाश करावा असे प्रतिपादन दिल्ली प्रेस क्लबचे सदस्य पंकज कुमार यांनी केले. आता हल्याचा निषेध नव्हे कायद्याची गरज आहे. त्यासाठी पत्रकारांनी मुक मोर्चा नव्हे रस्त्यावर उतरून राज्यकत्र्यांच्या गाड्या अडवाव्यात. राजकीय पक्षासोबतचे हितसंबध तोडून तसेच आपआपसातील मतभेदाचे जोडे बाजूला सारुन या कायद्यासाठी सर्वानी लढा उभारणे गरजेचे झाले आहे. असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे किरण नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानूरकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश वाघमारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंढे, भाजयुमोेचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, भाजयुमोचे प्रदेशउपाध्यक्ष स्वप्नील गलधर, अजय सवाई, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, महेश चौंधरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व दैंनिक, साप्ताहिक, पाक्षीक, मासीक, त्रैंमासीकाचे संपादक, उपसंपादक, बातमीदार, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व वार्ताहार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मालाणी हल्ला प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना हद्दपार करावे, तसेच या हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधून काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुक मोर्चा बसं, आता जशास तसे उत्तर हवे
मालाणी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी निषेधासाठी मुक मोर्चा नव्हे हल्लेखोरांना जशास तसेच उत्तर हवे अशा भावना जिल्ह्यातील सर्व भागातून आलेल्या पत्रकारांनी व्यक्त केल्या.

साभार : बीड लाइव्ह 

पत्रकार संरक्षण कायद्यासाठी राज्यातील शंभर पत्रकार हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणास बसणार--एस.एम.देशमुख
बीड  - पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा या मागणीसाठी राज्यातील शंभर पत्रकार येत्या हिवाळी अधिवेशन काळात नागपूर येथे आमरण उपोषणाला बसतील असा इशारा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी मंगळवारी बीड येथे झालेल्या पत्रकार मोर्चासमोर बोलताना दिला .
बीड येथील पत्रकार संजय मालानी य़ांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.त्याचा निषेध करण्यासाठी आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील पत्रकारांचा एक भव्य मूकमोर्चा एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता.मोर्चात आठशे पत्रकार सहभागी झाले होते.
जिल्हधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी एस.एम.देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत असताना त्यांच्या संरक्षणासाठी सरकार कोणतीच भूमिका घेत ऩसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.राज्यात गेल्या तीन वर्षात 228 पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतरही सरकार निर्लज्जपणे बघ्याची भूमिका घेणार असेल तर सरकारला आता पत्रकारांची ताकद दाखविण्याची वेळ आली असून येत्या हिवाळी अधिवेशन त्याची प्रचिती सरकारला येईल असा इशाराही देशमुख यांनी दिला.पत्रकारांवर साऱ्याच राजकीय पक्षांकडून कधी ना कधी हल्ले झालेले असल्याने कायदा करण्याच्या बाबतीत कोणताच राजकीय पक्ष पुढाकार घेत नाही किंंवा आग्रही नाही असा आरोप करून देशमुख म्हणाले ज्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून पत्रकारांवर हल्ले होतील त्या पक्षाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.ज्या पत्रकारांवर हल्ले झाले आहेत अशा पत्रकारांना आर्थिक मदत करता यावी यासाठी एक ट्रस्ट निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणाही देशमुख यांनी केली.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी सरकाच्या निर्ष्कियतेवर हल्ला चढविला.सरकारला पत्रकारांचे कोणतेच प्रश्न सोडवायेचे नसल्याने सरकारला आता आपल्या लेखणीची ताकद दाखविण्याची वेळ आली असल्याचे मत श्री.नाईक यांनी व्यक्त केले. पकारांनी आपसातील मतभेद बाजूला ठेऊऩ एकत्र यावे असेआवाहनही त्यांनी केले.यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने संजय मालानी यांना 11000ची मदत देण्याची घोषणा किरण नाईक यांनी केली.दिल्ली येथील पत्रकार पंकज कुमार यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील पत्रकारांची स्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षाही वाईट असल्याचे मत व्यक्त केले. छरळीच्या आमदार पंकजा मुंडे यांनी पत्रकारांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आपण येत्या हिवाळी अधिवेशनात खाजगी विधेयक मांडणार असल्याचे सांगितले.यावेळी बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश वाघमारे,जिल्हा पत्रकार संघाचे संतोष मानूरकर,वसंत मुंडे आदिंची भाषणे झाली.मोर्चात जिल्ह्यातील साऱ्याचे दैनिकांचे संपादक आणि पत्रकार सहभागी झाले होते.

बीडमध्ये पत्रकारांचा मोर्चा

 बीड - पत्रकार संजय मालाणी मारहाण प्रकरणी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पत्रकारांचा काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात होता.यावेळी आ.पंकजा मुंडे - पालवे यांच्यासह सर्व पत्रकार संघटना सहभागी झाल्या होत्या.
वर्तमानपत्रांची (अ) वाचनसंस्कृती...

वाचनसंस्कृतीच्या प्रश्नाचा माग काढायचा, शोध घ्यायचा, पाठलाग करायचा आणि झाडाझडतीचं हाती सत्र घेण्याची मालिका ‘अनुभव’ मासिकानं सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत ज्येष्ठ पत्रकार, माध्यम समीक्षक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील प्रपाठक जयदेव डोळे यांनी सप्टेंबरच्या ‘अनुभव’मध्ये घेतलेली वर्तमानपत्रांच्या वाचनसंस्कृतीची झाडाझडती. 

प्रत्येक शनिवारी सायंकाळी वृत्तपत्र विक्रेत्याकडून माझी खरेदी झाली की मी पुस्तकांच्या एका दुकानात अर्धा-पाऊण तास बसतो. मामांबरोबर (दुकानाचे मालक) चहा आणि गप्पा चालू असताना त्यांचा मुलगा व दुकानाचा तरुण मालक माझ्याकडील वृत्तपत्र व साप्ताहिकांमध्ये काही तरी शोधत असतो. ‘एशियन एज’मध्ये इंग्रजी पुस्तकांबद्दल काही छापून आल्यास त्याची तो नोंद घेतो. ‘तहलका’, ‘शुक्रवार’, ‘आऊटलुक’, ‘ओपन’ यातूनही त्याची हिंदी-इंग्रजी पुस्तकांची शोधाशोध चालू असते. आपलं दुकान देशाच्या पुस्तक व्यवहारात मागे पडू नये म्हणून त्याची ही धडपड असते. त्यासाठी त्याचा एकमेव आधार म्हणजे दैनिकं आणि साप्ताहिकं यात प्रसिद्ध होणारी पुस्तकविषयक दुनिया. पाठ्यपुस्तकांची गिर्‍हाइकं सोडल्यास उर्वरित मोठी गिर्‍हाइकं वृत्तपत्रांतील पुस्तकांच्या जाहिराती, परीक्षणं आणि परिचय वाचूनच दुकानात येतात. 
वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या हा सध्याचा पुस्तकविषयक माहितीचा पुरवठादार. ‘मराठी साप्ताहिकं’देखील पुस्तक परिचय आणि जाहिराती याद्वारे पुस्तकांविषयी माहिती देत असतात. आपला वाचक इतरांसाठी मोकळा करून देण्याचा हा प्रकार म्हटला तर बावळटपणाचा, म्हटला तर फार शहाणपणाचा. कोणता दवाखाना आपल्या परिसरात दुसऱ्या प्रतिस्पर्धी दवाखान्याची जाहिरात करतो? कोणी हलवाई असं सांगतो का, आमच्यापेक्षा हे हे पदार्थ दुसऱ्या हलवायाकडे छान मिळतात म्हणून? कोणतंही महाविद्यालय आपल्याबरोबरच अमुक-तमुक महाविद्यालयतही चांगलं शिक्षण दिलं जातं असं येता-जाता सांगत बसत नाही. मग वृत्तपत्रं आणि साप्ताहिक यांना काय पडलं आहे वाचकाला नवा पर्याय सतत सांगत बसायला? वर्तमानपत्रंही वाचा आणि पुस्तकंही वाचा; आम्हाला काही फरक पडत नाही, अशी भूमिका कशी परवडते त्यांना?
या शंकांना उत्तर असं, की दीड-दोन रुपयांच्या वृत्तपत्रांना शंभर-दोनशे रुपयांची पुस्तकं स्पर्धक ठरू शकत नाहीत. दोघांची ताकद वेगळी, दोघांचा परिसर वेगळा आणि मुख्य म्हणजे दोघांची उपयुक्तता भिन्न. एक वृत्तपत्र वाचायला काही मिनिटं पुरतात, शिवाय लक्ष अर्धवट असलं तरी चालतं. पुस्तक मात्र लक्षपूर्वक वाचावं लागतं आणि ते वेळ फार मागतं. वृत्तपत्राला ना पावित्र्य, ना माहात्म्य. पुस्तकांना शालेय जीवनापासूनच दप्तराचा देव्हारा मिळालेला अन् टेबलाचा टापू राखीव लाभलेला. त्यामुळे पुस्तकं जपून वापरायची असतात, पुस्तकं मळवायची नसतात, पुस्तकं ज्ञान देत असतात, अशी सोवळी प्रतिमा त्यांची झालेली. पुस्तकांना असं थोरपण शिक्षण नामक चौकटबंद प्रक्रियेत प्राप्त होतं. वृत्तपत्रं बिचारी पानापानांतून सुटी होत घड्यांत आकसून जात विसविशीत होऊन जातात, कुठेही लोळत राहतात, टाकून दिल्यासारखी! म्हणजे कोणत्याच अर्थाने वृत्तपत्रांना पुस्तकांची सर नाही. पाच-दहा वृत्तपत्रं एकीकडे, एक पुस्तक दुसरीकडे. पुस्तकांना आदर एवढा, की ‘चार बुकं वाचली की झाला शहाणा’ असंही आपल्याकडे म्हटलं जातं. ‘चार पेपर वाचले म्हणून झाला बुद्धिमान’ असं कोणी म्हणणार नाही. उलट, ‘पेपर वाचण्यात वेळ किती घालवला’ अशी बोलणी त्यामुळे खावी लागणार.. तर असं हे दोन मुद्रित माध्यमांचं स्वरूप. मग त्यांनी एकमेकांना एवढा आधार का द्यायचा? त्यांचं खरोखर प्रेम असतं परस्परांवर? की वैरी आहेत ते एकमेकांचे? मराठी पत्रकारितेचा इतिहास असं सांगतो, की मूळचे ग्रंथकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिलं पत्र काढलं. ते हैंद शाळा पुस्तक मंडळीचे नेटिव्ह सेक्रेटरी होते. ‘दर्पण’च्या आधी एक वर्ष त्यांनी ग्रंथरचना केल्या. म्हणजे मराठी पत्रकारितेचा जनक अर्धा ग्रंथकार व अर्धा पत्रकार होता. ‘दर्पण’च्या पहिल्या अंकात त्यांनी लिहिलं होतं, ‘...विलायतेतील विद्या, कला, कौशल्ये याविषयीचे व त्यातील ज्या भागांचा उपयोग या देशात झाल्यास फार हित आहे त्याविषयीचे लहान लहान ग्रंथ लिहिले जातील.’ याचा अर्थ असा, की केवळ ‘दर्पण’ छापून वा वाचून ज्यांची भूक भागणार नाही त्यांना असे ग्रंथ स्वत: संपादकच उपलब्ध करवून देतील. ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यात द्वैत नसल्याचा हा तिच्या जन्मावेळचाच पुरावा. नंतरचा इतिहास बघितल्यावर कळतं, की महाराष्ट्रीय ग्रंथव्यवहार व पत्रकारिता बरोबरच चालली. लोकांना ज्ञान देण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते ते त्यावेळी देण्यात आलं. लोकहितवादी, कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आदी मंडळी दोन्ही लिखाणांत तरबेज होती. पुस्तक प्रकाशन व पत्रकारिता यांचा व्यवसाय एकाचवेळी करणारे लोकही त्या वेळी होते. छपाईयंत्र, कागद, शाई, कुशल कामगार यांचा योग्य वापर करून आणि शिक्षणाचं वाढतं प्रमाण पाहून हे दोन्ही व्यवसाय ठाकठीक चालले असणार. मराठी कादंबरीचा जन्मही असाच झाला. ‘मोचनगड’ कादंबरी लिहिणारे रा. भि. गुंजीकर हे ‘विविधज्ञानविस्तार’ मासिकाचे निर्माते असून त्यात त्यांनी तिचं १८६७ पासून लिखाण सुरू केलं. ‘मुक्तमाला’ कादंबरीचे लेखक लक्ष्मणशास्त्री हळबे हे १८६२ साली सुरू झालेल्या ‘इंदुप्रकाश’ पत्राच्या व्यवस्थापकांपैकी एक होते, तर पहिली कादंबरी   (यमुना पयर्टन, १८५७) लिहिणारे बाबा पदमनजी यांनी तिच्यात वृत्तपत्रांचे उल्लेख केलेले होते. पुनर्विवाहाविषयी लिहिताना बाबा म्हणतात, ‘गुजराथी लोकांत या कामाची बरीच वृद्धी होत आहे असे दिसते. नुकताच एक विवाह त्यांजमध्ये झाला. त्याविषयी ‘सुबोधपत्रिके’त जो मजकूर आला आहे तो आपणांस पाहण्याकरिता पाठविला आहे. पत्रिकाकाराने यासंबंधाने फार उत्तम विचार प्रकट केले आहेत तेही आपण वाचलेच. विधवांचे वपनाविषयीही लोकांचे विचार कसे बदलत चालले आहेत हे समजण्याकरिता ‘आर्यपत्रिका’ नामक पत्राचा एक अंक आपणाकडे पाठविला आहे तो पाहावा. मी पंढरपुरात असताना बडवे वगैरे लोकांमधे जो अनाचार चालत असे तसाच अद्याप चालत आहे. याविषयी एक पत्र ‘सुबोधपत्रिके’त छापले आहे. तेही आपणाकडे पाठविले आहे.’
सुमारे शंभर वर्षं ग्रंथ व पत्रं यांचं साहचर्य आणि एकी महाराष्ट्राने बघितली. १९३२ साली ‘सकाळ’ सुरू झाल्यावर साहित्य व पत्रकारिता यांचा संसार आटोपला. ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक नानासाहेब परुळेकर यांनी भाषा, आशय, वितरण, तंत्रज्ञान यात बदल करीत मराठी पत्रकारिता नव्या रस्त्यावर नेली. ग्रंथकार, साहित्यिक आणि जाडे जाडे विषय यांना फाटा देत ‘सकाळ’ थेट निघाला तो जुजबी शिक्षण घेतलेल्या वाचकाकडे, ब्राह्मण्याकडून बहुजन समाजाकडे, शहराकडून ग्रामीण महाराष्ट्राकडे. राजकीय अभिनिवेशाचाही त्याने त्याग केला आणि सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी असं धोरण अंगीकारलं. स्वत: परुळेकर ग्रंथलेखक नव्हते. ‘सकाळ’चा व त्याच्या अन्य प्रकाशनांचा वाचक वाढवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांची टाय व सूट परिधान करणारी प्रतिमा मराठी लेखकांसारखी नव्हती. ती उद्योगपतीसारखी होती. त्यांनी अमेरिकन दैनिकांचा कित्ता पुण्यात गिरवला. पुढे आयुष्यात मोठे लेखक झालेले अनेकजण आरंभीच्या काळात पत्रकारिता करताना अमेरिकेत पाहिले होते. तसं काही मराठीत घडलं ते प्र.के. अत्रे, वि.वा. शिरवाडकर, साने गुरुजी, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, अरुण साधू, ह.मो. मराठे आदी थोड्यांच्या बाबतीत. ‘केसरी’, ‘ज्ञानप्रकाश’ आदींची जुनी पत्रकारिता परुळेकरांनी मोडून टाकली. तसं होताच दैनिकांनी अथवा साप्ताहिकांनी आपल्यापुरता वाचक वाढावा व टिकवावा, अशी व्यावसायिक आत्मकेंद्री मराठी माणूस बघू लागला. या पत्रांपुरतीच निष्ठा वाचकांत उत्पन्न करण्याचे प्रयोग व उपक्रम सुरू झाले आणि वाङ्मय व वृत्तपत्रं यांच्यात खडाजंगी आरंभली. वाङ्मयाच्या स्वतंत्र पत्रकारितेलाही याच काळात बहर आला. ‘चित्रा’, ‘वीणा’, ‘झंकार’, ‘नवयुग’, ‘सत्यकथा’, ‘मौज’ आदी नियतकालिकांशी ना.सी. फडके, अनंक काणेकर, आचार्य अत्रे, उमाकांत ठोमरे, पु.शि. रेगे, श्री.पु. भागवत, मं.वि. राजाध्यक्ष, माधव कानिटकर, अनंत अंतरकर आदी साहित्यिक जोडले गेले. साहित्यात कलावाद की जीवनवाद असा एक तुंबळ संघर्षही याच दरम्यान उसळला. त्यामुळे कलावाद्यांचं साहित्य व ते स्वत: ‘जीवननिष्ठ’ पत्रकारितेपासून खूप दूर गेले. पत्रकारितेविषयी नाकं मुरडणंही तेव्हापासूनच सुरू झालं.
कलावाद्यांचा पत्रकारितेबद्दलचा तिटकारा एका मध्यमवर्गीय भूमिकेचा परिपाक होता. स्वातंत्र्यासाठी (राजकीय व सामाजिक) पत्रकारितेने जेवढी प्रखर भूमिका घेतली तेवढी मराठी साहित्याने घेतली नाही. अनेक पत्रकार तुरुंगात गेले, ब्रिटिशांकडून छळले गेले. मराठी साहित्यिकांपैकी साने गुरुजी, वामन चोरघडे, वि.दा. सावरकर आदी मोजक्यांची नावं त्यानुषंगाने समोर येतात. त्यामुळे झालं असं, की प्रतिष्ठा, मान, लोकमान्यता आणि सत्ता यामध्ये पत्रकार एकदम पुढे गेले. साहित्यिकांना तो मान लाभेना. हे मानभंगाचं प्रकरण साहित्य विरुद्ध पत्रकारिता या अंगाने प्रकटू लागलं आणि त्याची परिणती पुस्तकं, त्यांचा प्रचार, त्यांचं स्थान या बाबतीत वृत्तपत्रांकडून कंजूषी करण्यात झाली. तुम्ही आम्हाला मोजत नाही ना, मग आम्हीही तुम्हाला मोजणार नाही, असं शब्दांची दुनिया बांधणाऱ्या दोन श्रमिकांचं युद्धच जणू पेटलं! एक मध्यमवर्ग नव्या स्वातंत्र्यात सुस्थिर होऊन सुख शोधणारा होता. त्याला सत्तास्थानांशी झगडा नको होता. दुसरा मध्यमवर्ग मात्र ‘अजून स्वातंत्र्य पुरतं मिळावयाचं आहे’ या मताचा होता. तो सत्तास्थानांवर अंकुश ठेवू पाहत होता. त्याच्यासाठी पत्रकारिता अद्यापही ध्येयवादी व लढाऊ होती. सुखाची नोकरी व व्यवसाय टाळून गरिबांसाठी व समस्यांच्या विरोधात त्या काळी पत्रकारितेत कोण येत होतं? कनिष्ठ मध्यमवर्गीय, अर्धशिक्षित, ध्येयवादी सुशिक्षित असे मराठी तरुण. त्याला तेव्हाचं कलावादी, पलायनवादी, रोमांचवादी वाङ्मय आवडेनासं झालं. आपलं पत्रकार म्हणून राबणं लेखकांच्या कल्पनारम्य निर्मितीपेक्षा अधिक ठोस आहे असं तो मानत चालला. जीवनाचं दाहक वास्तव आपण पाहतो अन् हा मराठी लेखक मात्र अवास्तव खरडतो असं त्याला वाटू लागलं. आपण कष्टतो, मान मात्र या साहित्यिकाला, असा मत्सर पत्रकाराला पेटवू लागला. या अशा विषम वातावरणात साहित्य व पत्रकारिता एकमेकांच्या विरोधात उभी न राहती तरच नवल! चिं. वि.जोशी यांनी अनेकदा पत्रकार-संपादक यांची थट्टा केली आहे. त्यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची मस्करी मुकुंद टाकसाळे यांच्यापर्यंत चालूच आहे. जोतिरावांनी केलेली पत्रकारितेची बिंगफोड मामा वरेरकर, नाथमाधव, श्री. व्यं. केतकर यांच्या कादंबऱ्यांमधूनही प्रकटते. अशा वातावरणात इंग्रजी वृत्तपत्रांतील एक पद्धत अथवा पठडी साहित्याला लाकडाने शिवण्यासाठी उपयोगी पडली. रविवार पुरवणीत पुस्तकांची परीक्षणं, पुस्तकांच्या जाहिराती, लेखकांच्या मुलाखती, कविता, नव्या पुस्तकांचं स्वागत, अनुवाद छापण्याची इंग्रजी पत्रांची प्रथा असे. त्याची नक्कल मराठी वृत्तपत्रांनी सुरू केली आणि साहित्याला स्थानमान देत असल्याची ग्वाही दिली. परंतु साहित्याचं अग्रस्थान पत्रकारितेने हिरावलं ते हिरावलंच. इंग्रजी पत्रकारितेत संपादक मंडळी काही वाङ्मयीन मातबर नसत. निदान भारतात तरी. पण त्या पत्रांत स्वतंत्र ‘लिटररी एडिटर’ जसा असे तसा वाङ्मयीन भान असणारा पत्रकार नेमण्याची परंपरा मात्र मराठीत पडली. शंकर सारडा, दिनकर गांगल, महावीर जोंधळे, ह. मो. मराठे, प्रसन्नकुमार अकलूजकर, अरुणा अंतरकर, मनोहर शहाणे, सुरेशचंद्र पाध्ये, विद्याधर गोखले यांच्यापासून ते आजचे श्रीकांत बोजेवार, अपर्णा वेलणकर, मुकुंद कुळे, मुकेश माचकर आदीपर्यंतच्या रविवार पुरवणी संपादकांनी वाङ्मयीन वसा घेतलेला दिसतो. मात्र वाङ्मयीन मातबरी त्यांनी होऊ दिली नाही. मराठी पत्रकारिता साहित्यिक सावलीतून बाहेर पडताना तिने आपली एक भाषा, निर्मितितंत्र आणि आशयाची निवड इतकी ठोस करून टाकली, की एके काळी मराठी साहित्याची जाण नसलेल्यांना पत्रकारितेचं दार बंद होतं हे आज खरंच वाटत नाही. का? कारण जो साहित्य वाचतो तो सजग, सुजाण व सगुण असून पत्रकारितेसाठी लाभदायक आहे, असा मुळी संपादकांचाच समज होता. पुन्हा का? कारण साहित्याचं वाचन बरं असणाऱ्यांचं मराठी लेखनही बरं असणार, असाही एक समज होता. पत्रकारितेत येण्यासाठी निदान धड मराठी तरी नको का यायला? हे असं साहित्य डोक्यावर चढवून ठेवलेल्या पत्रकारितेने ते ओझं उतरवलं खरं, मात्र उतरवताना डोक्यातीलही थोडा हिस्सा सांडला हे तिच्या ध्यानी आलं नाही!
या वर्षाच्या जूनमधील एक प्रसंग. पुण्यात एका बड्या प्रकाशनसंस्थेने पत्रकार परिषद बोलावली - एका दिवंगत मराठी लेखकाच्या चार डझन पुस्तकांच्या प्रचारासाठी. पत्रकारांशी बोलणं आटोपल्यावर प्रकाशकांनी उपस्थितांसाठी पुस्तकांचा संच भेट देऊ केला. फुकट म्हटल्यावर तो ते घेऊन जातील अशी अपेक्षा होती. कसलं काय! अनेक संच उरले. आजच्या तरुण पत्रकाराला मराठी साहित्याशी काही देणं-घेणं नाही हे या प्रसंगातून सिद्ध झालं. तेही चक्क पुण्यात! पुण्यातच नव्हे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे आदी शहरांतील असंख्य मराठी पत्रकार वाङ्मयविमुख आहेत. त्यांना वाचनाची आवडच नाही. साहित्य नसेना का, आपल्या आवडीच्या विषयात तरी त्यांना गोडी असावी ना! पण नाही. बहुसंख्य तरुण मराठी पत्रकार ‘साहित्यसपाट’ असून वाचनाची नावड असणारे आहेत. मग तेच जर असे, तर त्यांचे वाचक कसे असावेत? औरंगाबादेत श्याम देशपांडे हे एक ‘पत्रकार मित्र’ सर्व प्रकारच्या साहित्यिक पृच्छा-शंका-समस्या यांचं निवारण करीत असतात. ते काही दिवस आजारी पडले तर शहरातील पत्रकारांचं साहित्यविश्वच वैराण होऊन गेलं! मी ज्या पुस्तकांच्या दुकानात जातो तिथे मराठी पत्रकारांचा वावर शून्यवत आहे. प्रदर्शनं लागली की दोन-चार नेहमीचे भेटतात. बाकीचे साहित्यविश्वात कायम अडखळत, ठेचाळत चालतात. प्रकाशन समारंभ, गौरव पुरस्कार-निवडीनिमित्त सत्कार, साहित्य संमेलन अध्यक्षांची निवडणूक एवढ्यापुरता ज्यांचा साहित्याशी संबंध, त्यांच्याकडून मराठी वाचनविश्व समृद्ध व्हावं अशी कशी अपेक्षा ठेवणार? कोणी साहित्यिक दगावला की यांची धावपळ, धांदल बघण्यासारखी असते. कारण फार थोड्या वृत्तपत्रांच्या कार्यालयात सध्या ग्रंथालय असतं. असलं तरी ‘कोणी वाचत नाही’ अशा सबबीखाली त्यात भर पडलेली नसते. त्यामुळे दिवंगताचं साहित्य, मिळालेले पुरस्कार, थोडा इतिहास अशा माहितीसाठी संदर्भग्रंथांऐवजी संदर्भपुरुष गाठले जातात आणि बातम्या दिल्या जातात. त्यामुळे होतं असं, की भरपूर, विविध लिखाण करणारा साहित्यिक त्याच्या मृत्यूच्या बातमीतून मात्र साचेबंद पद्धतीने लोकांना समजतो. एकच बातमी साºया वर्तमानपत्रांत छापून येते. मजकूर तर सारखा असतोच पण ‘प्रतिक्रिया’ देणारेही तेच असतात! ‘तुम्ही आणून द्या लेख, आम्ही छापतो’ असा तोडगा काढून पुण्यतिथी, जयंती, श्रद्धांजली यांचा सोपस्कार पार पाडला जातो. पारितोषिकं, पुरस्कार, नामांकन यांच्या बातम्या तर अक्षरश: त्या देणाऱ्यावर विश्वास ठेवून छापल्या  जातात. पारितोषिकांचा दर्जा, लेखकाचा वकूब आणि प्रसिद्धीची जागा यात अजिबात ताळमेळ नसतो. त्यामुळे अनेक कवी व लेखक वृत्तपत्रांतून पारितोषिकविजेते म्हणूनच झळकत राहतात. हे लोक काय लिहितात, त्यांची लायकी काय, पारितोषिक देणाऱ्यांची प्रतिष्ठा काय, वगैरे बाबी तपासण्याच्या भानगडीत कोणी जात नाही. अशी बेफिकिरी ज्या साहित्यविश्वात, त्यात वाचनाची गोडी कोणी कोणाला लावायची? सुमार कुवतीचे लेखक-कवी प्रसिद्धीच्या कामात वाकबगार असतात. ते पत्रकारांचा पाहुणचार, आदरातिथ्य नियमित करत असतात. असं साहित्यविश्व पत्रकारांच्या मागे-पुढे झुलत असताना अस्सल साहित्य आपोआपच नजरेआड होणार. ते लोकांनाही तसंच असणार. पत्रकारांना समोर जे येतं तेच द्यावं लागतं. अबोल, भिडस्त, एकटे परंतु चांगले लेखक-कवी अशा व्यवहारात कायमचे मागे पडतात. हे लेखक पुढे पत्रकारितेच्या अशा एकतर्फी व्यवहारावर इतके रागावतात की पत्रकारितेचं नावच टाकतात, तिला नावं ठेवत राहतात. बस्स, सारा मामला ‘हमसे आया न गया, तुमसे बुलाया ना गया, फासला प्यार में दोनोंसे मिटाया ना गया’ असा होऊन जातो.   ‘गरज असेल तर येतील’ अशी सज्जता दोन्ही बाजू ठेवून असतात. तरीही या तुटकपणाला पत्रकार जबाबदार असल्याचं मी मानतो. लेखक-पत्रकार हे समानधर्मी असल्याचं तो विसरतो आणि दोन्ही जगं उपाशी ठेवतो. समान असं म्हणणंही आगाऊपणाचं होईल. साहित्य पत्रकारितेपेक्षा मोठं आहे असं मानलं तरच काही बदल होतील. पत्रकारितेचं महत्त्व भरपूर असलं तरी ते अन्यत्र. तिने साहित्यापुढे कमीपणाच पत्करायला हवा. कमीपणा म्हणजे दुय्यम दर्जा असा नव्हे. गुटेनबर्गच्या उदरातून जन्मलेली ही थोरली-धाकटी भावंडं होत, असा व्यवहार राहिला तरच काही लाभ होण्याची शक्यता आहे.
पण आपला अहंकार पत्रकारिता बाजूला ठेवत नाही आणि मामला पुन्हा फिसकटतो. शिवाय अडाणीपणातून आलेला हा अहंकार असतो. साहित्यापेक्षा संगणक, राजकारण आणि सामान्यज्ञान, एवढी जुजबी पुंजी बाळगणाऱ्याला आज पत्रकार होता येतं. मला चांगल्या कथा-कादंबऱ्या लिहायच्या असल्याने मी पत्रकार झालो, असं म्हणणारा कोणी भेटला नाही मला. किंबहुना ‘साहित्यजगत’ असं वार्ताक्षेत्र मराठी वृत्तपत्रांत असतं का? ते साहित्यसंस्थांपुरतंच असतं. तरुण पिढी काय वाचते आहे, तिची वाङ्मयीन जाण किती, साहित्यिक वाद व तत्त्वचर्चा यांचं भान एम.ए. मराठीच्या वर्गाबाहेर कितीजणांना असतं. मराठी साहित्यविषयक नियतकालिकं कितीजणांपर्यंत पोहोचतात, ग्रंथालयांमध्ये पुस्तकांची देवाणघेवाण कशी चालते, असे किती तरी प्रश्न पत्रकारांना पडायला हवेत; मात्र तशी प्रचिती फार दुर्मिळ. एखाद्या पुस्तक प्रदर्शनात जायचं, संयोजकांशी बोलून आकडे घ्यायचे आणि ‘यंदा बच्चे कंपनीसाठी बालसाहित्याची रेलचेल’ अशी बातमी छापून टाकायची. झाला यांचा साहित्यिक संपर्क!  बरं, अशी बातमी देताना मनात कायम एक धाकधूक, की प्रदर्शनवाल्याने जाहिरात दिली आहे का? उद्या वृत्तपत्राच्या व्यवस्थापकाने विचारलं तर काय? प्रदर्शकसुद्धा आता तरबेज झाले आहेत. ते कित्येकदा आधी जाहिराती देतात व मग जाहिरात विभागाकडून बातम्या छापून आणतात. अशा बातम्या उरका पद्धतीच्या असतात. त्यात ना जीव असतो, ना रस. असा धंदा होऊन बसल्यावर पत्रकारांना तरी कशी गोडी वाटणार? दोन-चार पत्रकार असले पुस्तकविश्वात रमणारे, तरी अंत होतो तो जाहिरात दिली नाही तर प्रसिद्धी कशाला द्या, या मालकी युक्तिवादात. एका मालकाने पुस्तक प्रकाशनाच्या बातम्यांवरच बंदी घातली. त्याचा दावा असा, की पुस्तकांचं ‘लाँचिंग’ व्यापारासाठी असतं, मग कशाला बातमी द्या? जाहिरातीचा रेट लावा अशा बातम्यांना! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत पुस्तकांच्या व्यवसायाचीही राजधानी दडल्याचं त्याच्या अभिजात बुद्धीला माहीत नव्हतं. अन्य स्पर्धकांनी अशा घडामोडी फारच प्रेमाने टिपणं सुरू केल्यावर मालकपुत्र समजून चुकले व यथावकाश प्रकाशन समारंभ त्या पुस्तकात झळकू लागले. मालक आणि मालकासम वागणारे संपादक मराठी साहित्यविश्व भिकार मानतात. एक पानभर साहित्यिक मजकूर आठवड्याला तयार करण्याची जबाबदारी एक-दोघांवर सोपवली की ती दोघं एक मुलाखत, एक पुस्तकविषयक, एक पुस्तकेतर पण साहित्यिक, एक साहित्यिक वैचारिक, एक परीक्षणात्मक असे लेख छापून मोकळे होतात. शक्यतो पडीक, पढीक आणि पडेल लेखक कविमंडळींना गाठून त्यांच्याकडून मजकूर घ्यायचा व छापायचा, असा बिनडोक साहित्यविश्वाचा प्रवास ती दोघं वाचकांना प्रत्येक आठवड्याला घडवतात. एकदा एकाचा मला फोन आला. बहुधा त्याच पानासाठी. सध्या काय वाचताय, काय लेखन चाललं आहे, कोणतं पुस्तक आवडलं, वाचन कसं महत्त्वाचं असतं वगैरेच्या निमित्ताने. अशा पत्रकारांना बहुधा उलट उत्तर ऐकायची सवय नसते. सतत प्रसिद्धिलंपटांच्या सान्निध्यात राहिल्याचा हा परिणाम! त्यांना एक तर होकार अथवा वाहवा ऐकायची असते. एकदा मला त्यापैकी एकाचा फोन आला. मी त्या पत्रकाराला झिडकारलं. आपल्या वाचनाचा खासगी आनंद जाहीरपणे व्यक्त करणाऱ्यांचं खरं तर आश्चर्य वाटायला हवं. त्यांनी वाचलेली पुस्तकं कधी आपण वाचलेली असतात, तर कधी ती पाहू शकणारही नसू इतकी विचित्र, दुर्लभ असतात. वाचन हा माझ्या अध्यापकीय व्यवसायाचा फार मोठा पाया आहे. तो मी जाहीर करणं म्हणजे व्यावसायिक कुस्तीगिराच्या रोजच्या व्यायामाचं कौतुक करणं जणू! अशा पत्रकारांनी चांगल्या वाचकांचा शोध घेऊन, त्यांच्या संग्रहामधील वेगळ्या पुस्तकांची नोंद घेऊन, पुस्तकं जमविण्याचा प्रयत्न कसा केला जातो हे सांगून नीट काही लिहायला पाहिजे. फोनवरून पुस्तकांचं सदर चालवायचं म्हणजे ‘नासा’च्या तळावरून चंद्रयान चालवण्यासारखंच! आव मात्र शास्त्रज्ञासारखा. पुस्तकं अथवा वाचन यामध्ये व्यक्तिगत आवडनिवड फार असते. ज्या पत्रकाराकडे वाचनसंस्कृतीची वृद्धी व्हावी म्हणून काही कार्य सोपवलेलं असतं त्याची स्वत:ची आवडनिवड पक्की हवी. मराठी प्रकाशनविश्वात हरतऱ्हेचे लेखक व पुस्तकं उपलब्ध असतात; परंतु वृत्तपत्रीय परीक्षणविश्वात बाबा कदम, स्नेहलता दसनूरकर, व.बा. बोधे अशा दर्जाच्या साहित्यिकांची  दखल घेतली नाही. याचा अर्थ मराठी प्रसारमाध्यमांची चोखंदळवृत्ती शाबूत आहे. निवडीचं काम तिने आधीच इतकं हलकं करून टाकलं आहे. उरलेल्या पुस्तकांत डझनभर प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थांची उत्पादनं सामील असतात. फिरून त्यांच्याच पुस्तकांची परीक्षणं कोणत्या ना कोणत्या माध्यमांत छापली जात असतात. वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांत आपणहून पाठवणाऱ्या प्रकाशनसंस्थांच्या पुस्तकांना सुलभपणे परीक्षण प्राप्त होत असतं. किती समीक्षक दुकानात जाऊन, चाळून, निवडून पुस्तकांची परीक्षणं करतात? प्रकाशक धाडत आहेत म्हणजे परीक्षणं करणं कर्तव्यच आहे, असा केविलवाणा समज वृत्तपत्रीय कर्मचारी करवून घेत असतात. बातम्यांसारखी शोधून, पारखून परीक्षणं का लिहिली जात नाहीत, कळत नाही. गोविंद तळवलकर यांना जसा कोणतीही पुस्तकं विकत आणून त्यांची परीक्षणं ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये करण्याचा हक्क होता (कंपनीच्या खर्चानं बरं का!) तसा आज मराठी वृत्तपत्रांत सरसकट कोणालाही नाही. किंबहुना अशा प्रकारच्या पुस्तक परीक्षणांना वावच नाही. ‘म.टा.’ने असंख्य चांगले वाचक घडवले ते त्यात छापून येणाऱ्या परीक्षणांमुळे, परिचयांमुळे. तळवलकर फार मितभाषी, एकलकोंडे व न हिंडणारे संपादक असूनही त्यांनी त्यांच्या व्यासंगानिमित्ताने ‘वाचलं पुस्तक की कर परीक्षण’ या खाक्याने वाचकांना परीक्षणांची सवय लावली. ‘म.टा.’ने दैनिकाच्या वाचनाबरोबर पुस्तकांच्या वाचनास मोठंच उत्तेजन दिलं. संपादक ‘वाचस्पती’ म्हटल्यावर हाताखालच्यांनाही लाज वाटते व ते वाचू लागतात. त्याप्रमाणे ‘म.टा.’मधून अनेकांनी पुस्तकांचा परिचय घडवला. सध्या ‘लोकसत्ते’चे संपादक गिरीश कुबरे हे तळवलकरांची पानं पुढे चाळतात आणि वाचकांना निवडक कसं वाचावं याचे आदर्श घालून ठेवतात. ते स्वत:ही अभ्यासू लेखक आहेत. म्हणजे संपादक अभ्यासक असला की आपसूक तो चांगला होतो व वाचकांनाही आपल्या समवेत नेत राहतो. 
‘सकाळ’च्या रविवार पुरवणीत तीन सदरं पुस्तकविषयक असतात (कदाचित उत्तम कांबळे यांच्या आग्रहामुळे). त्यात पुनरुक्ती आणि नीरसता अधिक असते. शिवाय समीक्षेपेक्षा परिचय, ओळख असा मैत्रीपूर्ण रोख असल्याने त्यात वाचनीयता कमी असते. कांबळे कसलेले लेखक-कवी होते, म्हणून त्यांना पुस्तकांचं विश्व आवश्यक होतं. सध्याचे संपादक श्रीराम पवार यांनी स्वतंत्र पुस्तक परीक्षणाचं साप्ताहिक सुरू केल्यास तो नवा उपक्रम होईल. पत्रकार-लेखक दिलीप पाडगावकर यांनी ‘टाइम्स’मधून बाहेर पडल्यावर ‘बिब्लिओ’ नामक अत्यंत छानसं पुस्तकविषयक मासिक सुरू केलं; पण त्याकडे बहुधा इंग्रजी सधन वाचकांनीच पाठ फिरवली आणि दोन-तीन वर्षांत ते थांबलं. पण तो त्यांचा एकट्याचा उपक्रम होता. ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ (टीएलएस) व ‘न्यूयॉर्क टाइम्स रिव्ह्यू आॅफ बुक्स’ या धर्तीवरचा दिलीपरावांचा हा उपक्रम असूनही तो काळाच्या मानाने फार लवकर झाला. शिवाय त्याला इंटरनेटची स्पर्धा सोसावी लागली. वृत्तपत्रं फार कमी जागा देतात म्हणून प्रकाशकांनी स्वत:ची परिचय, परीक्षणं, प्रचार करणारी मुखपत्रं सुरू केली आहेत. त्यांच्यापुढेही वाचक टिकवण्याची समस्या आहे. कारण समीक्षेची ओळखच मराठी वाचकांना नाही. परिचय, परीक्षण आणि धावता आढावा एवढ्यावरच पुस्तकांचं जग समाप्त केलं जातं. समीक्षा, टीका हा व्यवसाय म्हणून अजून समाजाला मान्य नाही. प्रकाशकांनाही नाही. समीक्षेची पुस्तकं ते पाठ्यक्रमासाठी काढतात. त्यामुळे वाचकांना उत्तम समीक्षा अंगवळणी पडल्याखेरीज वाचनसंस्कृतीचा परीघ वाढणार नाही. त्यासाठी प्रचंड खर्च करण्याची तयारी हवी. आचरट व विनोदी ‘इव्हेंट्स’वर खर्च करण्यापेक्षा पुस्तकं आणि वाचनसंस्कृती यावर वृत्तपत्रांनी खर्च करावा. आपापल्या आॅनलाइन आवृत्त्यांमध्ये चांगली समीक्षणं भरवून वाचकांना वाचायची सवय लावली तरी खूप होईल.
आणखी एक उपक्रम मराठी पत्रकारितेने करण्यासारखा आहे. हिंदी साप्ताहिकं तो करताना दिसतात. आता मासिक झालेल्या ‘आऊटलुक’ (हिंदी) पत्रिकेने ‘पाठक साहित्य सर्वे’चे दोन विशेषांक काढले. आॅक्टोबर (२००९) आणि जानेवारी (२०११) या दोन्ही अंकांत हिंदीतील बड्या लेखक-लेखिकांचं साहित्य, मुलाखती, आढावा, वाचकप्रियता याबद्दल लेख आहेत. ‘तहलका’ या हिंदी साप्ताहिकाने ३० जून२०१० चा विशेषांक ‘पठनपाठन’ असा काढून हिंदी वाचकांना उत्तम साहित्याचा एक छानसा धावता आढावा दिला. ‘शुक्रवार’ या साप्ताहिकाने २४ फेब्रु. ते १ मार्च २०१२ च्या अंकाची मुखपृष्ठकथा ‘हिंदी प्रकाशन की कडवी सच्चाइयाँ’ अशा शीर्षकाची देऊन वाचकांना थोडी उत्साहजनक व थोडी निराशाजनक माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील विसाव्या पुस्तक मेळ्याच्या ‘शुक्रवार’ने हा उपक्रम केला. किती मराठी साप्ताहिकांनी त्या ‘बुक फेअर’ची दखल घेतली? ‘लोकराज्य’ या सरकारी मासिकाने मात्र तमाम मराठी पत्रांच्या थोबाडीत मारली. त्याचा जून-जुलै (२०११)चा अंक चक्क ‘वाचन विशेषांक’ म्हणून बाहेर आला आणि तो फार चांगला चालला. १५४ पानांचा हा मौलिक व संग्राह्य अंक केवळ दहा रुपयांत महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिला. ‘लोकराज्य’ने तसा हा प्रयत्न पारंपरिक नजरेतूनच केला असला तरी त्याची दखल घेऊन कौतुक करायलाच हवं. मराठी पत्रकारितेत अलीकडच्या इतिहासात असं कोणाला सुचलं नव्हतं म्हणून! हिंदीत साहित्यिक पत्रकारिता चांगली तग धरून आहे. ‘कथादेश’ मासिकाने एप्रिल (२०११ )चा अंक ‘मीडिया वार्षिकी’ असा काढून आम्हा पत्रकारांना महत्त्वपूर्ण मजकूर सादर केला. ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेचं ‘नया ज्ञानोदय’ नावाचं मासिक असून त्याचा ‘मीडिया विशेषांक’ जानेवारी (२०१०) मध्ये निघाला होता. हिंदीच्या अनेक नामवंत पत्रकारांनी त्यात लिखाण केलं आहे. ‘दिनकर’ या कवीची जन्मशताब्दी (२००८)मध्ये झाली. त्याची कव्हरस्टोरी ‘प्रथम प्रवक्ता’ या पाक्षिकाने आॅक्टोबरात केली होती. लेखक होते प्रभाष जोशी. तेही आता हयात नाहीत. जाता जाता हिंदी पत्रकारितेचा साहित्यधर्म कसा चिरेबंद आहे त्याची दोन उदाहरणं. ‘इंडिया न्यूज’ या   साप्ताहिकाने ४ सप्टेंबर २००९ चा अंक ‘साहित्य के खिलाडी’ असा काढून हिंदीतील लेखकांची गटबाजी, विचारधारा, अनुयायी वर्ग, गुरुपीठं यांची फार छान हजेरी घेतली होती. त्याचीच आवृत्ती ‘तहलका’मध्ये दिसली. त्याच्या ३१ आॅगस्ट २०११च्या  अंकाने ‘साहित्य के सामंत’ अशी कव्हरस्टोरी छापून डॉ.नामवरसिंह, अशोक वाजपेयी, राजेंद्र यादव, रवींद्र कालिया आदींचं कार्य आणि त्यांची सत्ताकेंद्रं यांच्यावर उत्तम नेम धरला होता. या लोकांच्या जवळिकीनेच हिंदी नवलेखकांना मानमरातब मिळतो, असा लेखाचा रोख होता. वाचकांचं इतकं छान उद्बोधन हिंदी पत्रकारिता करीत असताना मराठी पत्रकारिता अजून कशी साहित्याच्या आरत्या ओवाळण्यात, लेखकांची चापलुसी करण्यात अथवा उपेक्षा करण्यातच रमली आहे याचं दु:ख होतं- लाजही वाटते. हिंदी पत्रकारितेला तिच्या धाडसाबद्दल दाद दिली जाते. मात्र, नुसतं धाडस यामागे नसतं. स्वत:चं ज्ञान, चिंतन, भूमिका, विचार यांची जोड तिला लाभली आहे. बव्हंश मराठी पत्रकार या विषयात नापास झालेला आहे. मग उगाच वाचकांच्या ज्ञानाचा उहापोह कशाला करायचा? आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार पाणी?
- जयदेव डोळे
13, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद - 431001
मोबाइल : 9422316988

फेसबुक वर शेअर करा

Facebook