> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

खडसेच्या 'नथी'तून एकनाथी बाण...बातमी छापून आणण्यासाठी वृत्तपत्रांना "पाकिटे" द्यावी लागतात - महसूलमंत्री खडसे

http://goo.gl/bKojPm

आता खडसे याना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी कोणत्या पेपरला, पत्रकाराला कोणत्या बातमीसाठी किती पाकिटे दिली !
'

PI सादरे प्रकरणात जळगावातील काही वृत्तपत्रे, संपादक व पत्रकार पैसे घेऊन "मॅनेज" झाले हा आरोप विक्रांत पाटील यांनी किती वेळा पोटतिडकीने केला होता. आज ते सत्य जगासमोर आले आहे. पाटीलसाहेब, कळू द्या जगाला कोणता पेपर आणि कोणता संपादक कितीचे पाकीट घेतो ते.

अरे कुठे नेवून ठेवली पत्रकारिता माझी ?
 
 
 

शनिवार, ३० जानेवारी, २०१६

बेरक्याचे भाकीत खरे ठरले ...मी मराठीचा बाजार अखेर उठणार...

मुंबई - बेरक्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.मी मराठीचा बाजार आता काही दिवसांत उठणार आहे.तसे मुख्य संपादक रवी आंबेकर यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर करून टाकले आहे.
मी मराठी कर्मचाऱ्यांची काल शुक्रवारी मुख्य संपादक रवी आंबेकर यांनी मीटिंग घेवून सांगितले की, पेमेंट आता वेळेवर होणार नाही, जानेवारी महिन्याच्या पेमेंटला दोन ते तीन महीने उशिर होवू शकतो,
याचा अर्थ स्पष्ट आहे की, मोतेवार गजाआड झाल्यामुळे मी मराठी आता जास्त दिवस चालणार नाही, कर्मचाऱ्यांनी पर्याय शोधावा ...यामुळे मी मराठीच्या 100 हून अधिक कर्मचार्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय ...
मी मराठीचा मालक आणि समृध्दजीवन या चिटफंड कंपनीचा मालक महेश मोतेवार गजाआड झाल्यामुळे आणि या कंपनीची सर्व बँक खाते गोठवण्यात आल्यामुळे मी मराठी चॅनलच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी होण्याची शक्यता कमी आहे.सर्व महत्वाचे कर्मचारी/ अँकर अगोदरच सोडून गेले आहेत.आता उरले सुरले हळू हळू निघून जातील.

कर्मचारी कपात करण्यासाठी दैनिक लोकमतचा अजब फंडा

औरंगाबाद - प्रिंट मीडीयात सध्या मंदीचे वातावरण आहे.अश्या परिस्थितीत सकाळने औरंगाबादला अत्याधुनिक २० पाने एकाच वेळी सप्तरंगात छपाई करणारी प्रिंटींग मशिन बसवली आणि नांदेड आणि अकोला आवृत्ती लवकरात लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.मात्र दुसरीकडे लोकमत वृत्तपत्र समुहाने ४० टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अजब फंडा वापरण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा विभागात पडलेला दुष्काळामुळे जाहिरातीचे प्रमाण कमी झाले आहे,त्याचबरोबर कंपन्याकडून मिळणा-या व्यावसायिक जाहिरातीमध्ये घट झाल्याने लोकमतने कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आहे.
त्यासाठी नव्या लोकांची भरती न करणे,नव्या लोकांना कंत्राट वाढवून न देणे त्याचबरोबर ५५ वर्षाच्या पुढील कायमस्वरूपी लोकांना सक्तीने रजेवर पाठवणे असे निर्णय घेतले आहेत.त्याचबरोबर आणखी एक अजब फंडा वापरण्यात येणार आहे.
ट्रेनी रिपोर्टर ते वृत्तसंपादकांना आता एक पात्रता परिक्षा द्यावी लागणार आहे.जे या परिक्षेत नापास होतील,त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.औरंगाबादचे संपादक सुधीर महाजन यांना सर्वात कठीण  पेपर काढण्याचे आणि पेपर तपासण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.त्यामुळे सुधीर भाऊ दर्डाशेठच्या तालावर चांगलेच नाचत आहेत.आता बघा कसे एकाएकांना घरी पाठवतो,असे ते म्हणत आहेत.
ज्यावेळी  भरती करण्यात आली,त्यावेळी कोणते निकष वापरण्यात आले होते,त्यावेळी त्यांची पात्रता तपासण्यात आली नव्हती का ? आता मंदीचे वातावरण आल्यानंतर पात्रता आठवू लागली आहे का,असे प्रश्न लोकमतचे कर्मचारी विचारू लागले आहेत.दर्डाशेठच्या या अजब फंड्यामुळे लोकमतचे कर्मचारी त्रस्त झाले असून,हाबकून गेले आहेत.सकाळी १० ते रात्री ११ असे बारा ते १३ घंटे राबून त्यांच्या पदरात शेवटी निराशाच पडत आहे.
दुसरीकडे सकाळची नांदेड आवृत्ती सुरू होणार म्हटल्यानंतर दर्डा शेठना व्यावसायिक धर्म आठवला आहे.त्यांनी तेथील संपादकीय विभाग प्रमुख धर्मराज हल्लाळे यांना १२ लाखाची कार गिप्ट दिली आहे.अट एकच आहे,लोकमत सोडायचे नाही आणि सकाळला नांदेड,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये  पाय रोवू द्यायचे नाही.धर्मराज आता दर्डाशेठसाठी लंगोट काढून तयार झाले आहेत.
धन्य ते दर्डा शेठ...धन्य तो त्यांचा धर्म आणि धन्य तो त्यांचा राज ...

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

अधिस्वीकृती समिती कोर्टात

यदू जोशी यांनी एक कोरा कागद घेतला,त्यावर स्वतःसह तिघांची नावं लिहिली आणि त्यावर कोंबडा मारून  तो कागद दिला संचालक  शिवाजी मानकर यांच्याकडे.यदू जोशी कोणत्या संस्थेचे प्रतिनिधी  आहेत ?,त्या संस्थेत ते कोण आहेत? ,त्या संस्थेचा नोंदणी क्रमांक काय आहे ? याची कोठेही माहिती नाही.अधिस्वीकृतीसाठी जे पत्र दिलं गेलं त्यावर कोणताही शिक्का नाही,यदू जोशी यांच्या
स्वाक्षरीखाली ते अध्यक्ष असल्याचाही साधा  उल्लेख नाही.अन्य सस्थेला आपल्या कोट्यातील पत्रकारांच्या नावांची शिफारस करताना जो नियम लावला गेला तो यदू जोशींच्या बाबतीत शिथील केला गेला,किंबहुना काही नियम असतो हेच अधिकारी विसरले.या मनमानीशिवाय समितीवरील सदस्य निवडताना मोठी मनमानी झाली.संकेत,रूढी आणि मुळ म्हणजे नियम धाब्यावर बसविले गेले.गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले काही जण समितीवर आले,काहीजणाचा अनुभव कमी असताना त्यांना कमिटीवर घेतले गेले.महिलांचा कोटा नसताना खास जीआर काढून दोन महिलांना समितीवर घेतले गेले आणि ज्या वर्गातील सदस्यांसाठी कोटा आहे त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.अध्यक्षपदावर डोळा ठेऊन ही सारी मनमानी केली गेली.यात सीएमओ आणि "माज" विभागातील काही  'मान'कर्‍याची संतापजनक लुडबुड होती.या सार्‍या मनमानीबद्दल राज्यात पत्रकारांमध्ये संतापाची भावना होती.या भावनेला हिंगोली येथील पत्रकार नंदकिशोर  तोष्णिवाल यांनी कोर्टात जाऊन वाट मोकळी करून दिली आहे.तोष्णीवाल यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहितयाचिका दाखल केली असून ही सारी मनमानी सप्रमाण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.सारे नियम धाब्यावर बसवून तयार केलेली ही समितीच बेकायदा असल्याचा तोष्णीवाल यांचा आक्षेप आहे.जी समिती पत्रकारावर एक जरी गुन्हा दाखल असला तरी त्याला कार्ड देण्याचे नाकारते त्या समितीवर थेट तडीपार गुंड असल्याचेही तोष्णीवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे 'चंद्रशेखऱ बेहेरे याची समितीवरील नियुक्ती रद्द करावी आणि त्यांच्या कार्यकाळात समितीने घेतेलेले सारे निर्णयही रद्द करावेत' अशीही मागणी तोष्णीवाल यांनी केली आहे.तोष्णीवाल यांची जनहित याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून सर्व संबंधितांना नोटीसही पाठविली आहे.आता या जनहितयाचिकेवर 18 फेब्रुवारी 2016 रोजी न्या.बोराडे आणि न्या .चीमा सुनावणी घेणार आहेत.चंद्रशेखऱ बेहेरे यांच्यावर आजच तडीपारीची कारवाई झालेली असतानाच एका पत्रकाराने जनहित याचिका दाखल केल्याने स
मितीच्या स्थापनेपासून समितीच्या मागे सुरू झालेले शुक्लकाष्ट संपायला तयार नाही.ही समिती बराखास्त व्हावी आणि मध्यंतरी सहा वर्षे ज्या पध्दतीनं अधिकार्‍यांनी मनमानी पध्दतीनं कार्डांचे वाटप  केले ते बघता त्यांनाही ही समिती नको आहे.त्यामुळेच समिती बराखास्त व्हावी यासाठी अधिकारी छुप्या मार्गाने कारवाया करीत आहेत असं दिसते.अन्यथा एवढी बदनामी झाल्यावर तरी बेहेरे यांना या अधिकार्‍यांनी समितीवरून तडीपार केले असते.आता 'न्यायालयासमोर बेहेरेंना आम्ही घरी पाठवितो' असं निवेदन सरकार पक्ष करते की,'प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा बहाना करीत बेहेरे आणि अन्य बेकायदेशीर मार्गाने समितीवरआलेल्या सदस्यांना सरकार पाठिशी घालत समितीची उरली सुरली इज्जतही धुळीला मिळविते ते पहायचे आहे.

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

चंद्रशेखर बेहेरे अखेर नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार

आता अधिस्वीकृती समितीने त्यांचा सत्कार करावा

नंदुरबार - राज्य अधिस्वीकृती समितीचा एक सदस्य नामे चंद्रशेखर गोविंद बेहेरे याला नंदुरबार जिल्हयाच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश नंदुरबारचे उपविभागीय दंडाधिकारी सुनील गाडे यांनी आज पारित केल्याने अधिस्वीकृती समितीच संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.
राज्य अधिस्वीकृती समिती गठित होण्यापुर्वीच बेहेरे याच्यावर आठ-नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे वास्तव समोर आले होतो.राज्याच्या "माज" ( माहिती-जनसंपर्क) विभागाने नंदुरबार पोलिसांकडून बेहेरेवरील गुन्हयांची यादी ही  मागविली होती.ती आल्यानंतरही 14 ऑगस्टला जेव्हा समिती अस्तित्वात आली तेव्हा त्याला समितीवर घेतले गेले.त्यानंतर बेहेरे यांच्यामुळे नंदुरबारमधील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने त्यांला  जिल्हयाच्या हद्ीतून तडीपार करावे अशी विनंती नंदुरबार पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे केली होती.त्यावरही पाच-सहा तारखांना सुनावणी झाली.याची माहिती मराठी पत्रकार परिषदेला मिळाल्यानंतर परिषदेने महासंचालकांना वेळोवेळी पत्रं देऊन तसेच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बेहेरे यांची समितीतून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती.मात्र माजच्या काही अधिकार्‍यांनी आणि सीएमओमधील काही वतनदारांनी सातत्यानं तडीपार गुंडाची पाठराखण केली होती मराठी पत्रकार परिषदेने अधिस्वीकृती समितीच्या पुणे येथील बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता आणि नागपूरच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला होता.मात्र तरीही हट्टानं 'माज' विभाग बेहेरेला पाठिशी घालत होता.आता बेहेरेच्या तडीपारीचा आदेश निघाल्याने माहिती आणि जनसंपर्क विभागाची गोची तर होणार आहेच त्याच बरोबर या समितीच्या प्रतिष्ठेलाही मोठा तडा गेला आहे.ज्या पत्रकारावर एक जरी गुन्हा दाखल असेल त्या पत्रकाराला अधिस्वीकृती दिली जाऊ नये असा नियम आहे.येथे मात्र तडीपार गुंडच अधिस्वीकृती समितीत आहे.हा विरोधाभास पत्रकारितेचं किती अवमुल्यनं झालंय ते दाखविणारा होता.या तडीपार गुंडांचे सत्कार करताना अधिकार्‍याचे फोटोही उपलव्ध आहेत.आता बेहेरे यांला  अधिस्वीकृती समितीवरून तडीपार केले जाते की,त्याची पाठराखण केली जाते हे पहायचे आहे.
दरम्यान एका तडीपार गुंडाला समितीत ठेऊन माहिती आणि जनसंपर्कने  समितीची प्रतिष्ठाच धोक्यात आणली आहे.माज विभागाने आता बेहेरे यांचा जंगी जाहीर सत्कार करावा आणि समितीची उरली सुरली इज्जतही लिलावात काढावी अशी मागणी होणार आहे.बेहेरे सत्कार समितीच्या अध्यक्षपदी संचालक शिवाजी मानकर यांची नियुक्ती करावी अशी सूचनाही महासंचालक आणि मुख्यमंत्र्याकडं केली जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

'सकाळ' हा समाजाचा आरसा- पर्यावरणमंत्री कदम

वेब ऑफसेट युनिटचे थाटात उद्‌घाटन

औरंगाबाद : ‘सकाळ‘ समाजाला न्याय देण्याचे काम करत आहे. ‘सकाळ‘ हा सर्वसामान्यांचा असून तो समाजाचा आरसा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
प्रजासत्ताक दिनापासून (ता. 26) "सकाळ‘ची मराठवाडा आवृत्ती नव्या रंगात, नव्या ढंगात वाचकांसमोर येत आहे. त्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट छपाई युनिटचे उद्‌घाटन सोमवारी (ता.25) रात्री श्री. कदम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर आमदार संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, संदीपान भुमरे, सुभाष झांबड, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, माजी आमदार अण्णासाहेब माने आदींची विशेष उपस्थिती होती. "सकाळ‘ माध्यम समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील, मराठवाडा आवृत्तीचे उपसरव्यवस्थापक रमेश बोडखे उपस्थित होते.
पालकमंत्री कदम म्हणाले, माध्यम आणि लोकप्रतिनिधी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे काम आम्ही लोकप्रतिनिधींनी करायचे असते ते "सकाळ‘ करीत आहे. "सकाळ‘ हा कोणत्या पक्षाचा नसून सर्वसामान्यांचा आहे. तो समाजाचा आरसा बनला आहे. सामाजिक बांधिलकी जपून "जिथे शासन कमी, तेथे आम्ही‘ अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दहा कोटींची मदत दिली. बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत वीस हजार शेतकऱ्यांना धान्यांचे वाटप केले. शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. तो पुसून काढण्याची भूमिका घेतली पाहिजे. वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या उपक्रमांतून "सकाळ‘ ही भूमिका खंबीरपणे बजावीत आहे.
"सकाळ‘च्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी प्रास्ताविक केले. "सकाळ‘च्या वाटचालीची त्यांनी माहिती दिली. सर्व घटकांना बरोबर घेऊन "सकाळ‘ करीत असलेल्या कृतिशील पत्रकारितेचे अनेक दाखले दिले.


एका फोनवर आलो...
‘सकाळ‘ जनतेची सेवा करीत आहे. समाजाला न्याय देण्याचे काम करीत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत विधायक पत्रकारिता करीत आहे. त्यामुळे उद्‌घाटनासाठी फोनवर मिळालेले निमंत्रण क्षणार्धात स्वीकारले. मुंबईत आज कॅबिनेटच्या बैठकीसह महत्त्वाची कामे होती. तरीही कोणताही राजशिष्टाचार न पाळता या कार्यक्रमाला आलो, असे श्री. कदम यांनी सांगितले.


esakal 

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

बदलता सकाळ आणि दर्डाशेठच्या हालचाली

औरंगाबाद - प्रिंट मीडियात एकीकडे मंदीची लाट आली असताना,सकाळ वृत्तपत्र समुहाने आपला विस्तार सुरू केला आहे.औरंगाबादचे प्रिंटीग युनिट नांदेडला हलवण्यात आले असून,औरंगाबादला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रिंटीग युनिट बसवण्यात आले आहे.एकाच वेळी २० पाने सप्तरंगात छपाई करणारे हे युनिट आहे.अशी युनिट मराठवाड्यात फक्त सकाळकडे आहे.त्यामुळे औरंगाबाद शहर,औरंगाबाद ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात क्रमांक तीनवर असलेला सकाळ आता पुन्हा क्रमांक एकसाठी स्पर्धा करत आहे.
सकाळच्या नव्या प्रिंटीग युनिटचे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला उद्घाटन झाले.यानिमित्त सकाळने दोन दिवसात नविन कंटेंट घेवून अंक काढला.पहिल्या दिवशी ब्लॅक व्हॉईट आणि दुस-या दिवशी सप्तरंगात अंक काढला.त्या अंकाची जोरदार चर्चा सुरू आहे.औरंगाबादेत पाच वर्षानपुर्वी जेव्हा दिव्य सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत ७५ टक्के कर्मचारी सकाळ सोडून दिव्य आणि लोकमतला गेले आहेत.मात्र कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी नविन टीम तयार करून मुकाबला सुरू केला आहे.
सकाळच्या दोन दिवसाचे अवलोकन केले असता,कंटेंट उत्तम,फोटोग्राफी लाजबाब,प्रिटींग नंबर १ असे स्टार द्यावे लागतील.सकाळने औरंगाबादला करोडो रूपयाचे नवे प्रिंटींग युनिट बसवून मोठे धाडस केले आहे.त्यामुळे वरकड यांची कसोटी लागलेली आहे.
सकाळची नांदेड आवृत्ती मार्चअखेर सुरू होणार आहे.त्याचबरोबर अकोला आवृत्तीही याच दरम्यान सुरू होईल.या नव्या आवृत्तीमुळे अनेकांना संधी मिळेल.
सकाळने केलेले बदल आणि येवू घातलेला पुढारी यामुळे लोकमतचे दर्डा शेठ हादरले आहेत.रोज मिटींगवर मीटींग सुरू आहेत.विजय दर्डा काही दिवसापुर्वी औरंगाबादला येवून गेले.मंत्रीपद आणि आमदारकी गेल्यामुळे राजेंद्र दर्डा लोकमतमध्येच गुंतून पडले आहेत.स्वत: रोज मीटींगवर मीटींग घेत आहे.सोबत करण आणि ऋषी दर्डा त्यांना साथ देत आहेत.सकाळवर घाव घालण्यासाठी दर्डाशेठच्या हालचाली सुरू आहेत.कोणते सावज हाती लागते का,याबाबत चाचपणी सुरू आहे.मात्र कोणीच हाती लागत नाही.
पुढारीने औरंगाबादला पाय ठेवण्यास खूप उशिर केलेला आहे.दिव्य येण्यापुर्वी त्यांनी सुरूवात केली असती तर पुढारी किमान ३ वर राहिला असता.नवे युनिट मँनेजर कल्याण पांडे आणि सिटी एडिटर अभय निकाळजे यांनी नविन टीम उभा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.मात्र त्यांना हवी ती माणसे मिळत नाहीत.लोकमतमध्ये जे ट्रेनी आहेत,तेच त्यांच्या संपर्कात आहेत.त्यामुळे दर्डा शेठनी ट्रेनी लोकांना पगार वाढवण्याचा फॉम्र्युला सुरू केला आहे.
काहीका असेना,सकाळ बदलला,पुढारी येवू पहात आहे,यामुळे मराठवाड्यातील पत्रकारांना पुन्हा सुगीचे दिवस येत आहेत....

प्रवीण बर्दापूरकर यांचे बेरक्यास पत्र


   स.न. 
  'लोकसत्ता'चे आणि आमचे माजी संपादक डॉ . अरुण टिकेकर यांच्या निधनानंतर लिहिलेल्या धनंजय कर्णिक आणि माझ्या पोस्ट बेरक्याने आम्हाला कल्पना न देता पुनर्मुद्रित केल्या आहेत . आज म्हणजे मंगळवार , २६ जानेवारीला त्या वाचण्यात आल्या . त्यात शेवटी "एकीकडे संबंध महाराष्ट्रातील पंत्रकार टिकेकर यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत असताना,लोकसत्तात काम केलेले धनंजय कर्निक आणि प्रविण बर्दापूरकर यांनी टिकेकर यांच्याबद्दल जे लिहिले आहे,ते योग्य आहे का ?" अशी विचारणा केलेली आहे .
एक मुद्दा- 'लोकसत्ता'चा राजीनामा दिल्यावर मी ; माधव गडकरी , सुरेश द्वादशीवार , अरुण टिकेकर आणि कुमार केतकर या चार संपादकांची 'वर्किंग प्रोफाईल' रेखाटली . त्यात माझे टिकेकर यांच्याविषयीचे मतप्रदर्शन विस्ताराने आहे आणि टिकेकर हयात असतानाच 'दिवेस असे की ...' या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकात समाविष्ट झाले ; पुस्तक आजही उपलब्ध आहे . 
शिवाय या टिकेकर यांच्यासह अन्य तिघांसंबंधी असलेला हा विस्तृत मजकूर 'युगांतर'च्या दिवाळी अंकात (२०११) अंकातही प्रकाशित झालेला आहे . 'युगांतर' मधील मजकूर वाचल्यावर अरुण टिकेकर आणि माझ्यात बरीच 'एसएस बाजी' झाली होती पण , ते संदेश पुढे डिलीट झाले . मात्र त्यानंतर आम्हा दोघात संवाद मात्र राहिला नाही ; किंबहुना - 'मी तुमचा नंबर डिलीट करतोय , माझाशी संपर्क साधू नये, असे टिकेकर यांनी मला कळवले होते हे खरे ! त्यामुळे नंतर दोन-तीन वेळा समोरासमोर भेट झाल्यावर शिष्टाचाराचा भाग म्हणून असणाऱ्या अभिवादना व्यतिरीक्त संवाद घडला नाही ; घडणे शक्यही नव्हते . 'युगांतर' दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर सुमारे दोन-अडीच महिन्यांनी या पुस्तकाचे नागपूर आणि मुंबईत रीतसर प्रकाशन झाले .
त्यामुळे किमान मी तरी टिकेकर यांचे निधन झाल्यावर त्यांच्यासंबधी प्रतिकूल लिहिले या म्हणण्यात मुळीच तथ्य नाही .  
     राहता राहिला प्रश्न दिनकर रायकर यांच्या संबंधीचा पण ,तो  नंतर कधीतरी म्हणजे योग्य वेळ आल्यावर !
कळावे ,

-प्रब  
9822055799 / 9011557099
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
कृपया वाचा- www.praveenbardapurkar.com/newblog

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

भास्करची खांडेकरवरील 'अभिलाषा' संपली

"भास्कर"ने नॅशनल पॉलिटिकल एडिटर पोस्ट बरखास्त केली, अभिलाष खांडेकर यांची सुट्टी!!
"भास्कर"; "दिव्य मराठी"त कॉस्ट कटिंगचे धोरण; टॉप मॅनेजमेंटच्या 35 सीनिअर्सचे घेतले राजीनामे!
भास्करची खांडेकरवरील 'अभिलाषा' संपली 😏
औरंगाबाद 'भास्कर'मध्ये पण कॉस्ट कटिंगची शक्यता..!!
पटवेसारख्या निर्बुद्ध चाटयांच्या शेंड्या कापल्या जायला हव्यात... ही असली सुमार दर्जाची माणसे या खांडेकरनेच आणून बसविलीत... त्याच्यासमोर शेपटी हलविणारी!!


वृत्तपत्रांच्या ‘सरकारी हापिसात’ उपसंपादक नावाचे कारकुंडे !


● ‘वृत्तपत्राच्या कार्यालयातील सर्वांत मोठा माणूस म्हणजे उपसंपादक !’
● ‘रोजचं वृत्तपत्र (चांगलं किंवा वाईट) आकाराला येतं, ते उपसंपादकांच्याच  खोलीत!!’
… पत्रकारितेचा, अर्थात वृत्तविद्येचा औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कोणत्याही पत्रकाराला ही दोन विधानं नक्कीच माहीत असतील. थेट पत्रकारितेशी संबंध नसलेल्या, पण या क्षेत्राचा अभ्यास वा निरीक्षण करणाऱ्यांनीही हे कदाचित वाचलं असेल. वरील दोन्ही विधानांशी ते सारे सहमत असतील किंवा नसतील, हा भाग वेगळा.
शेकडो वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या असंख्य उपसंपादकांचं महत्त्व अधोरेखित करणारी ही विधानं. ठळक अधोरेखन.
वर्षानुवर्षं चाललेला हा “थॅंकलेस जॉब’ आहे. उपसंपादकाचं नाव सहसा वृत्तपत्रात चमकत नाही. अंक चांगला झाला असेल, तर सामान्य वाचकाच्या नजरेत त्याचं स्वाभाविक श्रेय संपादकाच्या खाती जमा होतं. बातमीवर ती लिहिणाऱ्याचं नाव असतं; त्यामुळे त्याबद्दलचं (बरे-वाईट) श्रेय त्याच्या पदरात पडतं. चांगल्या संपादनाचं, चांगल्या शीर्षकाचं, छायाचित्रांच्या जमलेल्या ओळींचं, चांगल्या मांडणीचं श्रेय उपसंपादकाला मिळतं, ते त्याच्या कार्यालयीन वर्तुळापुरतं. बाजारपेठेत त्याचं नाव जात नाही. कार्यालयीन वर्तुळातलं हे कौतुकही तत्कालीक, तेवढ्यापुरतं असतं. त्या उलट अंकात झालेल्या चुकांबद्दल त्याला आणि प्रामुख्यानं त्यालाच जबाबदार धरलं जातं. या चुकांची जबाबदारीही अर्थात वाचकांपुढे जाहीर केली जात नसते.
‘वृत्तपत्राला चेहरा देणारा’ अशी उपसंपादकांची ओळख होती. प्रश्‍न असा आहे की, सध्या ही ओळख टिकून आहे काय ? भविष्यात तशी ती राहील काय ?
अलीकडे, विशेषतः गेल्या दीड-दोन दशकांपासून बरीच वृत्तपत्रे ‘रिपोर्टर्स पेपर’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. म्हणजे बातमीदारांचं वर्चस्व असलेली, ते ठळकपणे जाणवणारी. बाजारात आलेलं उत्पादन अनेकदा असं असतं, की उपसंपादकाचा त्यावरून हात फिरला आहे, की नाही, याची शंका यावी ! बातम्यांचं संपादन, शब्दांचा चोख वापर, शीर्षकं, बातम्यांची निवड आदी साऱ्याच बाबींमध्ये हा फरक लक्षणीयरीत्या जाणवतो आहे.
उपसंपादकांच्या या ‘कर्तृत्वा’बद्दल अजून बरंच काही सांगता येईल. पण त्याच वेळी ही जमात अशी का झाली, याकडेही पाहावं लागेल. संपादनाचं धारदार हत्यार या मंडळींनी म्यान केलं आहे. तसं का, याचं कारण शोधावंच लागेल. हातचं हत्यार असं सहजासहजी कोणी ठेवून का द्यावं, ते गंजू का द्यावं? त्यांना तसं का करावं लागलं ? वृत्तपत्रांच्या संगणकीकरणानंतर हळुहळू हा फरक होत गेला. बातम्यांचं संपादन आणि  पानं (स्वतः) लावणे, अशी दुहेरी जबाबदारी उपसंपादकांवर आली. अंतिम उद्दिष्ट काय ? तर पान लावणे. जाब कशाबद्दल विचारला जातो ? तर पाने उशिरा गेली तर ! त्यामुळंच साऱ्या उपसंपादकांचं लक्ष प्रामुख्यानं या कसबी कामावर केंद्रित झालं. पानं वेळेत लावणं, एवढंच उद्दिष्ट ठरलं. त्यात काय भरलं आहे, हा दुय्यम भाग. सारा भर सजाटीवर, रंगरंगोटीवर. ती खरवडल्यावर सुरकुत्या उघड्या पडल्या तरी हरकत नाही. संपादनाबद्दल कोणी काही म्हणत नाही. प्रभावशाली बातमीदारांची बातमी त्यांना हव्या त्या जागी, हवी तशी प्रसिद्ध झाली म्हणजे ती मंडळी संपादकांच्या कानाला लागत नाहीत. कानगोष्टी केल्याच तर त्या संबंधित बापडा उपसंपादक ‘कामसू आहे. अजिबात डोकं लावत नाही, सांगेल ते ऐकतो’ असं स्तुतिपर सांगण्यासाठीच.
वृत्तपत्रात उपसंपादक आणि वार्ताहर यांचा दर्जा आणि वेतनश्रेणी समान होती, तेव्हाही उपसंपादकाला अधिक मान, अधिक अधिकार होते. एखादी बातमी नाकारण्याचा, ती संबंधिताला पुन्हा लिहायला लावण्याचा अधिकार तो वापरत होता. अंकाचं स्वरूप ठरविण्यात त्याचा शब्द महत्त्वाचा मानला जाई.  अलीकडे तसं राहिलं नाही. आता उपसंपादकाचा निव्वळ सरकारी कार्यालयातील कारकून झाला आहे. सांगेल ते आणि पडेल ते काम कुरकुरत, निरुत्साहाने करणारा कारकून ! कोणती बातमी कोणत्या पानावर, अँकर काय आणि मुख्य बातमी काय, याचे आदेश वार्ताहरच काढू लागले. संपादक ते शिरसावंद्य मानू लागले आणि उपसंपादक त्यापुढे निमूटपणे मान तुकवू लागले. वृत्तपत्रांमध्ये अर्थकारण अधिक महत्त्वाचं झालं आहे. व्यवस्थापनातील बड्यांचा दैनंदिन संपादकीय कामातील हस्तक्षेप वाढला आहे. त्यांच्या दृष्टीने बाहेर हिंडणारा, थोरा-मोठ्यांशी ओळखी असणारा वार्ताहर अधिक महत्त्वाचा. सात-आठ तास खुर्ची उबवून ‘चिंता करितो विश्वाची’ म्हणणाऱ्या उपसंपादकाचा आवाका तो काय ? त्यामुळे तो उपेक्षित ठरू लागला.
– तातेशान
(मैत्री 2012 अनुदिनी दिवाळी अंक; पूर्वप्रसिद्धी दैनिक उद्याचा मराठवाडा)

"महाराष्ट्र टाईम्स"वाले जळगावातून लवकरच गाशा गुंडाळण्याची शक्यता...

"टाईम्स ऑफ इंडिया"चे स्वामित्व असलेल्या बेनेट-कोलमन कंपनीने आपल्या धोरणात अमूलाग्र बदल करण्याचे ठरविले आहे. "टाईम्स" समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व ब्रांड आणि बिझिनेस धोरण पाहणारे राहुल कन्सल नुकतेच राजीनामा देवून बाहेर पडले आहेत. त्यांचा मुख्यत्वे अनप्रॉडकटीव्ह एकस्पान्शन्स आणि एक्स्पेन्सेसला विरोध होता. "टाईम्स" हा कोअर इंग्रजी बिझनेस आणि टाईम्स इंटरनेटचा डिजिटल बिझनेस यावरच यापुढील काळात भर दिला जाणार असल्याचे समजते.
व्हर्नाकुलर म्हणजेच भाषिक बिझनेस फारसा लाभदायी न ठरता यंत्रणेवर ताण देणारा आणि लॉस मेकिंग होत चालल्याचा निष्कर्ष फायनान्स विभागाने काढल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई-पुणे वगळता मराठी प्रकाशन म्हणजेच "महाराष्ट्र टाईम्स"वर फारसा खर्च करायचा नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचीही चर्चा आहे. "नवभारत टाईम्स"बाबतही प्रॉफीटेबल आणि फ़ायनान्सिअली स्टेबल असलेल्यालाच ठिकाणी जोर लावला जाणार आहे.
सध्या कमकुवतपणे चालू असलेल्या नागपूर, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या आवृत्तीना सावरण्याचा शेवटचा प्रयत्न केला जाण्याचीही शक्यता आहे. त्यात बहुधा नाशिक व औरंगाबादला पानांची संख्या वाढविली जाण्याची शक्यता आहे. नगर, सांगली-सातारा, जळगावसारखे प्रभावहीन आणि अपयशी ठरलेले ब्युरो व छोट्या आवृत्त्याही गुंडाळल्या जाण्याची शक्यता आहे. स्ट्रीन्जर्स व सेवाभावी, मानधनावरील वार्ताहर तसेच तालुका प्रतिनिधीनाही रामराम केला जाण्याची शक्यता आहे.
"टाईम्स"च्या जोडीने अॅड ऑन धंदा करून अनेक "मटा"च्या आवृत्त्या स्वत: बिझनेस उभा केल्याचा जो दावा करीत होत्या, तोही आता फुटला आहे. ही सारी बनवाबनवी राहुल कन्सल यांच्या कार्यकाळातच उघड झाली होती. नाशिकमध्येही बिझनेस व रेव्हेन्यूची पार बोंब आहे. राजकीय जाहिरातींच्या रेव्हेन्यूमध्ये जी वाढ अपेक्षित गृहीत धरली जात होती, तोही फुगा फुटला आहे.
"मटा"ने "हायपर लोकल"च्या नादात आपला पूर्वीचा अभिजात,अभिजन असा अप्पर मिडल क्लास, मिडल क्लास आणि श्रीमंत, नवश्रीमंत असा पेईंग क्षमता असलेला वाचक कधीच गमावला आहे. आता जो वाचक स्कीममधून जोडला जातोय तो निम्नमध्यमवर्गीय, कामगार-कष्टकरी, रिक्षावाले, हातगाडी-फेरीवाले असा आहे. त्यांची खर्चण्याची क्षमता नाही. त्यामुळे "टाईम्स"च्या जोडीने मिळविलेल्या ऑडी, मर्सिडीज, कार्स, आयफोन व इतर ब्रांडच्या अॅड ऑन जाहिरातींचा फायदा होत नाहीये. रिस्पॉन्स नसल्याने जाहिरातदारांची रिपीट रिलीज निरंतर घसरत चालली आहे.
"टाईम्स"ने म्हणूनच लॉस मेकिंग "उद्योग" गुंडाळण्यावर भर दिला आहे. बेनेट विद्यापीठाने ऑनलाईन कोर्सेससाठी 'एड-एक्स'शी करार केलाय. दुसरीकडे, "टाईम्स इंटरनेट"ने "व्हायरल शॉर्ट" ही "न्यूज इन शॉर्ट"च्या धर्तीवरील मायक्रो कंटेंट कंपनी अधिग्रहीत केली आहे. जून 2016 अखेर, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांमध्ये "व्हायरल शॉर्ट"द्वारे 30 ते 150 शब्दांच्या बातम्या घटना घडताच तात्काळ उपलब्ध केल्या जाण्याची योजना आहे. बेनेट-कोलमन कंपनी त्यासाठीचे नेटवर्क विस्तारणार आहे आणि जोडीला 'क्राऊड सोर्सिंग'द्वारे कंटेंट गोळा करून व्हेरिफिकेशनसाठी सध्याचा फिजिकल स्टाफ वापरला जाण्याची शक्यता आहे. सध्याची मायक्रो कंटेंट पुरवणारी अव्वल कंपनी "इन शॉर्टस"मध्येही 'बेनेट-कोलमन'ने गुंतवणूक केली आहे. याशिवाय Get Me A Shop (GMAS), Taskbucks, CarDekho, Gaadi, Pricedekho, Zigwheels यामध्येही "टाईम्स"ने मेजर स्टेक खरेदी केले आहेत. Get Me A Shop (GMAS)ला लवकरच मेट्रोज तसेच टायर 1, 2 व 3 शहरानुसार हायपर लोकल केले जाईल.
"टाईम्स इंटरनेट"ने, दैनिक "जनशक्ति"चे संचालन करणाऱ्या, सिद्धिविनायक समूहाचे मेजर होल्डिंग असलेल्या आयकस्टममेडइट www.icustommadeit.com/ यातही नुकतेच मोठे स्टेक खरेदी केले आहेत. "लोकलबनिया"तही www.localbanya.com/ "टाईम्स इंटरनेट"ने मोठे गुंतवणूक करून त्याच्या रिलाँचची जबाबदारी "आयकस्टममेडइट"कडे दिली आहे. हे ऑनलाईन हायपर लोकल ग्रॉसरी स्टोअरही (किराणा दुकान) लवकरच मेट्रोज तसेच टायर 1, 2 व 3 शहरात काही टप्प्यात कार्यरत होईल.
एकूणच कोअर स्ट्रेंग्थ (म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया) वाढवून बेनेट-कोलमन कंपनी "टाईम्स इंटरनेट"मार्फत डिजिटल व्यवसायावर अधिक लक्ष करीत आहे. 4Gनंतर भारतात नवे डिजिटल पर्व सुरू होईल. एन्टरटेनमेंट मीडिया व न्यूज मीडिया हाऊसेसनाही या स्पर्धेत टिकण्यासाठी बदलावे लागणार आहे. त्याचाच भाग म्हणून "टाईम्स"ची पावले सर्वप्रथम पडू लागली आहेत. नाहीतरी तोट्याचा धंदा करण्यात मतलब काय? असो.
"टाईम्स"ने जळगावचा ब्युरो गुंडाळल्यास पूर्वीप्रमाणेच जहागीरदार व पाठक इथला कारभार पाहू लागतील. नाही म्हणायला त्यांच्या जोडीला एखाद-दुसरा संपादकीय/मार्केटिंग/सर्क्युलेशन असा माणूस राहू शकतो. कार्यालय बंद केले जावू शकते. जळगावातील काही स्टाफ नाशिक किंवा इतरत्र सामावून घेतला जावू शकतो, तर काहींची सुट्टी केली जावू शकते. कदाचित एप्रायझल्सपर्यंत म्हणजे मार्चअखेरपर्यंत कुणाला डच्चू दिला जाणार नाही. नाशकात सध्या वेगवेगळे असलेले नाशिक व जळगाव हे संपादकीय डेस्क एकत्र केले जावू शकतात. खरा औत्सुक्याचा मुद्दा राहील तो, जळगावचा "मटा" इथे जळगावातच छापला जाईल की नाशिक/औरंगाबादहून येईल. "जळगाव"ची स्वतंत्र आवृत्ती, "जळगाव टाईम्स" राहील की नाही? की नाशिकच्याच अंकात जळगाव/खान्देशची एखाद-दोन पाने ठेवून कॉमन अंक निघेल?
अर्थात, कंपनीची धोरणे केव्हाही बदलू शकतात. असे होईलही किंवा नाहीही! एक मात्र नक्की की, जहागीरदार व पाठक असतानाचा जेव्हढा "मटा"चा व "टाईम्स"चा जळगावातील बिझनेस होता,तितकाच आवृत्ती व ब्युरो ऑफिस सुरू झाल्यानंतरही राहिला असावा. उलट त्यात स्टाफ, इन्फ्रास्ट्रक्चर व अतिरिक्त प्रशासकीय खर्च अफाट वाढले असावेत. आता समजा ऑफिस बंद केले न स्टाफ कमी केला तरी बिझनेस जेव्हढा होता व जेव्हढा व्हायचा तेव्हढाच राहील! जर "मटा"ने जळगाव ब्युरो ऑफिस बंद केलेच तर ते अपयश कुणाचे,यावर मात्र खल होत राहील. जळगाव शहरात आपली छाप उमटविण्यात "मटा"चा अंक पूर्णतः निष्प्रभ ठरला, हे कदाचित संपादकीय अपयशच ठरावे!!  शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

'टिकेकर'वर आताच 'टीका' का ?

प्रविण बर्दापूरकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार....
Praveen Bardapurkarटिकेकर , धनंजय कर्णिक आणि मी ....

'लोकसत्ता'चे माजी संपादक डॉ अरुण टिकेकर यांचं काल निधन झालं .
त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम करुनही मी काल काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही
म्हणून अनेकांना आश्चर्य वाटलं
पण , कारण वेगळं होतं - टिकेकर एकाच वेळी विद्वान संपादक आणि
वाईट्ट बॉस म्हणून आम्हा अनेकांच्या वाट्याला आले .
अनेकांना तर त्यांच्या या खुनशी स्वभावामुळे रस्त्यावर यावं लागलं ..
फक्त चांगलं बोलता आलं नसतं म्हणून काल मी गप्प राहिलो .
आज धनंजय कर्णिकने लिहिलेली पोस्ट आणि त्यावरची माझी प्रतिक्रिया सोबत देत आहे ...अर्थात धनंजय कर्णिकच्या म्हणण्याशी मी पूर्णपणे नाही पण बहुतांशाने सहमत आहे
एक दिवस याहीपेक्षा स्पष्टपणे दिनकर रायकर यांच्याबद्दलही लिहावं लागणार आहे .
दुर्दैवाचा भाग म्हणजे माझं 'दिवस असे की...'हे पुस्तक मी ज्या संपादकांना अर्पण केलं
त्यात हे टिकेकर आणि रायकर हे दोघेही आहेत ...
दुरून डोंगर साजरे असतात , हेच खरं !

Dhananjay Vinayak Karnik
4 hrs · Mumbai ·
गळे काढून झाले. उदोउदो करून झाला. डोळ्यात पाणी येत नसले तरी बळेबळे अश्रूही ढाळून झाले. त्यांनी पाडलेल्या पुस्तकांना अचानक साहित्यमूल्य प्राप्त करून देणारे लेखही लिहून झाले. परंतु जे लिहिले गेले नाही, बोलले गेले नाही ते म्हणजे तो एक अत्यंत हीन प्रवृत्तीचा, शिवाय चारित्र्यहीन माणूस होता. प्रथेनुसार मेलेल्या माणसाबद्दल वाईट लिहिता येत नाही. तो एक संकेत आहे. परंतु ज्या माणसाने पत्रकारितेतील अनेक संकेत पायदळी तुडवले,अनेकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला त्याच्याबद्दल हा संकेत पाळण्यात औचित्य नाही. दिलेल्या बातमीचा सोर्स विचारून रिपोर्टरने ते सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांना तुम्ही ही बातमी कशी दिलीत असे विचारण्याचा थोर मूर्खपणा अंगी असणारा अरूण टिकेकर याच्यासारख्या संपादक पदासाठी लायक नसलेल्या माणसाबरोबर मी सात वर्षे काम केले. शेवटी संयमाच्या मर्यादा संपल्यामुळे मी राजीनामा दिला. त्याला माझ्याबद्दल वाईटसाइट बोलता आले नाही कारण माझ्या अंगावर लोकसत्तात काम करताना चिखलाचा एक शिंतोडाही मी उडू दिलेला नव्हता. परंतु कार्यालयात काम करणाऱ्या कारकून मुलीकडेही वाईट नजरेने पाहणाऱ्या या गलिच्छ माणसाच्या तावडीतून इतर कोणी सुटणे शक्यच नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकाळात निरलसपणे किंवा मनात कोणताही हेतू न ठेवता एकही काम केले नाही. मी एका विद्वान माणसाच्या विरोधात बातम्या देत असे. त्या प्रशासकीय स्वरुपाच्या असत. मला त्या द्यायला टिकेकराने हरकत घेतली. मी विरुध्द बातम्या देणे बंद केले. त्या विद्वान माणसाचा विरोधक हा दलित होता. त्या विद्वान माणसाच्या विद्वत्तेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. परंतु प्रकरण संपल्यानंतर टिकेकराने त्या विद्वान माणसाला त्यांचे पुस्तक आपल्याला अर्पण करण्यास सांगितले हे मला कळल्यानंतर टिकेकराच्या दळभद्रीपणाचा राग येण्याऐवजी मला किळस आली.
त्यांनी ज्या प्रकारे तानाजी कोलतेची ससेहोलपट केली, नागेश केसरीला, अरुण खोरेला किंवा मोरेंसह इतर अनेकांना अगतिक व्हायला भाग पाडले हे कुणीही लिहिणार नाही. गंमत अशी की प्रकाश कुळकर्णीसारख्या कष्ट करणाऱ्या संपादकाला त्यांनी ज्या प्रकारे हीन पातळीवर नेऊन लोकसत्तातून बाहेर पडायला भाग पाडले तेच त्यांच्या प्रेतावर अश्रु ढाळायला गेले. चार लोकांत दाखवण्यासाठी हे सारे करीत रहातात काही लोक. सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचे तंत्र टिकेकराने एवढे विकसित केलेले होते की पत्रकारितेत करियर करण्याच्या हेतूने कष्ट करणाऱ्या एखाद्याला ते जेव्हा, काय रे, नागपूरला जायचे आहे का- असे विचारत तेव्हा तो बापडा भांबावून जात असे. बदलीचे शस्त्र वापरून अनेकांचे कणे मोडायचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. ते मेल्यामुळे अनेकांना दुःखही वाटले नाही, नसेल. सहसा कुणाच्या बाबतीत असे होत नाही. त्यांच्या कुटुंबियांना दुःख झाले असेल. परंतु त्यांच्या जवळ किंवा बरोबर काम करणारे अनेकजण आपल्याला हळहळ वाटली असे खोटे खोटेच दाखवत होते हे निश्चित.
लिहिण्यासारखे बरेच आहे. सध्या एवढेच.

Dhananjay Vinayak Karnik यांच्या या पोस्टवर माझी प्रतिक्रिया- धनंजय , बरोब्बर लिहिलंयस तू . एकिकडे प्रयोगशील , विद्वान संपादक मात्र दुसरीकडे खुज्या उंचीचा आणि किरट्या वृत्तीचा असं त्यांचं दुहेरी-दुभंग व्यक्तिमत्व होतं...स्तुतीप्रियता ही देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणखी बाजू होती आणि ती तशी स्तुती करणारांना त्यांनी कायम उत्तेजन दिलं . ते स्वत:ला स्पष्टवक्ता म्हणवून घेत पण, समोरच्याचा स्पष्टवक्तेपणा पूर्णपणे अमान्य असाणारा हा बॉस होता . त्यांच्या दुसऱ्या दुखऱ्या व्यक्तिमत्वाचे अनेक बळी आहेत हेही खरं आहेच . अरुण खोरेचा तू उल्लेख केलास म्हणून; त्याची कशी फरपट केली टिकेकरांनी आणि अखेर त्याला मी माझ्या मनोरातील रुममध्ये कसा राहण्यासाठी घेऊन गेलो हे तुला तर चांगलंंच ठाऊक आहे! संपादक म्हणून मला अनुभवायला मिळालेले माधव गडकरी , कुमार केतकर , सुरेश द्वादशीवार आणि अरुण टिकेकर ही मी लिहिलेली या चार संपादकांची वर्किंग पोर्ट्रेट प्रकाशित झाली तेव्हा टिकेकर यांनी व्यक्त केलेला संताप त्यांचं बुटकेपण दाखवून देणारा होता आणि तेव्हापासून त्यांनी माझ्याशी बोलणंही बंद केलेलं होतं . काल फक्त चांगलच बोलणं मला तरी शक्य नव्हतं आणि वाईट बोलणं शिष्टाचाराला धरून झालं नसतं म्हणून मी कोठेही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही...असो !


बेरक्याची टीप्पणीएकीकडे संबंध महाराष्ट्रातील पंत्रकार टिकेकर यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत असताना,लोकसत्तात काम केलेले धनंजय कर्निक आणि प्रविण बर्दापूरकर यांनी टिकेकर यांच्याबद्दल जे लिहिले आहे,ते योग्य आहे का ?
यावर आता वाचकांनी आपली मते व्यक्त करावीत...
बेरक्या कोणाचीही कमेंट डिलीट करणार नाही...
वाचकांच्या प्रतिक्रिया....
> निधन पावलेल्या व्यक्तीबद्दल असे लिहिणे योग्य नाही....
> जीवंत असताना लिहिले असते तर योग्य ठरले असते...
> दिनकर रायकर यांच्याबद्दलही आताच लिहावे...नंतर लिहू नये...
आता आपण काय म्हणाल ?

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांचं निधन

 मुंबई  -  निर्भीड पत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. जवळपास एक दशकाहून अधिक काळ त्यांनी ‘लोकसत्ता’चे संपादकपद भूषवले. लोकसत्ताला नवं रूप देण्यात टिकेकरांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत ‘लोकसत्ता’ दैनिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कल्पक संपादक म्हणून सर्वसामान्य वाचकांना अरुण टिकेकर हे नाव परिचित आहे. पण याव्यतिरिक्त इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. टिकेकरांनी ‘लोकसत्ता’च्या प्रत्येक पुरवणीची एक वेगळी ओळख निर्माण करून त्यांचा बाज बदलला. लोकसत्तेतील त्यांचे ‘तारतम्य’ आणि ‘जन-मन’ हे स्तंभ खूप गाजले. केवळ लिखाण नव्हे; तर पत्रकारितेच्या पेशाची तांत्रिक बाजू, त्याचे व्यवस्थापन याची त्यांना सखोल माहिती होती. एका अभ्यासू पत्रकाराच्या पलीकडे ग्रंथप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या स्वत:च्या संग्रही प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा होती.
डॉ.अरूण टिकेकरांचे प्रकाशित साहित्य
अक्षरनिष्ठांची मांदियाळी
ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
काल मीमांसा
फास्ट फॉरवर्ड (शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन)
मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ
रानडे प्रबोधन-पुरुष
शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव
स्थल काल
ऐसा ज्ञानगुरू
बखर मुंबई विद्यापीठाची


> तत्ववेत्ते; लेखक; साहित्यिक; विष्लेशकास मराठी मुकली....
> मोठा माणूस, वाचक संपादक गेले...
> ठाणे येथे 6 जानेवारी 2016 रोजी झालेला मराठी पत्रकार परिषदेचा शेवटचा कार्यक्रम ठरला...


तथाकथित मंडळींना एक खुले पत्र....

पत्रकारांबद्दल हजारो शंका, कुत्सीत प्रतिक्रिया घेऊन जगणार्‍या तथाकथित मंडळींना एक खुले पत्र....
महोदय,,
पत्रकार, म्हटले की अंगावर झुरळ पडल्यागत कपडे झटकणार्‍यांची जमात आपली. ‘पत्रकार म्हणजे साले एकजात सारे सारखेच’, ‘त्याने निवडणूकीत गब्बर पैसा कमावला असणार’, ’पत्रकार नसते तर फार बरे झाले असते’, ‘किती फीडबॅक घेतात हे पत्रकार? यांना फक्त पैसा पाहिजे’ अशा कितीतरी प्रतिक्रिया पत्रकार म्हटल्यावर उमटतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि पुण्यापासून ठाण्यापर्यंत या सार्‍या प्रतिक्रिया सारख्याच. मात्र खरेच पत्रकार असा आहे का? पत्रकार किंवा आजची माध्यमं नसती तर खरेच आपले जीवन आजच्यापेक्षा अधिक सुसह्य झाले असते का? जरा शांतपणे आपल्या मनाला हा प्रश्‍न विचारून बघा, जरा आपली आतली गाठ सैल करून पत्रकारांकडे बघा. आपण त्याच्या तोंडावर त्याला ‘या प्रतापराव’ असे म्हणता आणि त्याच्यामागे त्यालाच शिव्या हसडतात, तेव्हा त्याला त्या कळत नाही असे वाटते का तुम्हाला? अरे ज्याचा प्रांतच इन्व्हेस्टिगेशनचा आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय आकस आहे हे त्याला कळणार नाही का? तरीही तो शांत असतो. तुमच्याबरोबरची लाख दुष्मनी असू देत तरीही वर्तमानपत्रात तुमच्याबद्दल कौतूकाचे शब्द लिहितांना त्याचा हात कचरत नाही. सांगा मग मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवता का तो? तुमच्या एका प्रतिक्रियेसाठी तो तुम्हाला १० वेळा फोन करतो हा त्याचा गुन्हा आहे का? आणि या बदल्यात काय देता तुम्ही त्याला पाच-दहा हजारांची एक जाहिरात? त्या जाहिरातीपोटी मिळणार्‍या हजार रुपड्यांच्या कमिशनसाठी तो तुमच्याशी संबंध ठेवतोय असे म्हणायचेय का तुम्हाला? एखाद्या ठिकाणी अपघात झाला, आग लागली, दुर्दैवी घटना घडली तर तो कोणताही विचार न करता असेल त्या अवस्थेत घटनास्थळी पोहोचतो, पोलिसांना इन्फॉर्म करतो, मदत करू लागतो, त्याची बातमी करतो, आवृत्ती थांबवायला लावतो हा त्याचा गुन्हा आहे का? तुमच्या नळाला पाणी येत नाही, शेजारी पाजारी कचरा साचलाय, तेव्हा प्रशासनाला जाग आणन्यासाठी त्याची लेखणी सज्ज होते, हा नेमका कोणता गुन्हा आहे? खरेतर तो तुमच्या बुडाजवळ आग लावतोंना म्हणून त्याचे अस्तित्व तुम्हाला सहन होत नाही. हे सारे करण्यासाठी वर्तमानपत्राकडून काय मिळते हे एकदा विचारा त्याला? आयुष्याचं अर्धशतक पत्रकारीतेत घातल्यानंतर अवघे दोन-पाच हजार मानधन मिळवणारे हजारो पत्रकार आज ग्रामीण महाराष्ट्रात आहे. चौदाशे-पंधराशे मानधनात आजही ग्रामीण महाराष्ट्रातली तरुण पत्रकारांची पिढी काम करते. अनेकांना तर मानधनही मिळत नाही, शहरात राहणारा पूर्णवेळ पत्रकार दहा-पंधरा हजार पगाराच्या वर कमवत नाही, हे वास्तव एकदा जाणून घ्या. मग त्याच्याबाबतीत पैशांच्या गप्पा मारा, त्याच्यावर टीकेची झोड उठवा. डेस्कवर काम करणार्‍या लाखो पत्रकारांच्या नशिबी ती रम्य संध्याकाळ आणि नितांत सुंदर पहाट नसते याचा अंदाज तुम्ही कधी केलाय का? एका सुटीसाठी किती भांडावे लागते, दिवाळीत त्याला एखादी सुटी मिळते तेव्हा कुठे जाते तुम्हा सोफेस्टिकेटेड मंडळींचे शहाणपण, स्वत:च्याच लग्नाला दोन दिवसांची कशीबशी रजा मंजूर होते तेव्हा का नाही वाटत तुम्हाला त्याच्याबद्दल कळकळ. जगण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो ते एकदा त्याला विचारा, बायको-मुलांची हेळसांड या एका शब्दाचा अर्थ तो तुमच्यापेक्षा अधिक जाणतो. वर्तमानपत्र, मिडिया हाऊस यांच्या मुख्य कार्यालयात काम करणार्‍या पत्रकारांना एकदा विचारून बघा त्यांची व्यथा? दररोज डेडलाईनची टांगती तलवार घेऊन काम करतांना मन कधी कठोर झालं हे ते देखील विसरलेले असतात. स्वतंत्र केबीनमध्ये बसणार्‍या संपादकांबद्दल का कोण जाणे मात्र आपल्या मनात प्रचंड आकस घेऊन आपण जगतो. संपादक होण्याचा अर्थ ठाऊक आहे का आपल्याला? चिरीमिरी देऊन तो संपादक झालेला नाही, कोणाच्या तरी चिठ्ठीवरनं त्याला संपादक पदी बसविलेलं नाही, आयुष्याची कितीतरी वर्षे त्यांने लेखनी प्रज्वलीत ठेवली आहे. दिवस-रात्र तो लिहिता राहिला, ज्या वयात आपला अभ्यास संपतो त्या वयात त्यांने पुस्तकांशी मैत्री केली. तळहातावर शीर घेऊन तो भिडला, लढला, रांगडेपणा दाखवत अनेकांना वठणीवर आणले, मला नाही वाटत हा त्यांचा गुन्हा आहे. हो कालौघात संपादकीय केबीनमध्ये व्यवसाय घुसला, टार्गेट्‌स आले. मात्र १० रुपये छपाई खर्च असलेला अंक तुम्हाला दोन रुपयात द्यायचा असेल तर त्यांना ते करणे भाग आहे.
असो, बोलता आम्हालाही येतं, लोकांच्या व्यथा मांडतांना आम्हीही आमची व्यथा तुमच्या डोळ्यात पाणी येऊस्तोवर मांडू शकतो, पण खरे सांगतो ‘कि घेतले न व्रत हे आम्ही अंधतेंने’, ठरवून पत्रकार झालोय, ठरवून आम्ही आमची बांधिलकी निभावतो. हो, आणि महत्वाचं म्हणजे ठरवून आम्ही समाजाच्या भल्यासाठी एखाद्याचा गेमही करतो.
तुम्ही पत्रकारांना पुरस्कार नाही दिले तरी चालतील, हार तुरे देऊन त्यांचे सत्कार नाही केले तरी चालतील, मात्र मनाचा सच्चेपणा दाखवत त्यांचा सन्मान करा, त्यांना प्रतिष्ठा द्या. कारण एक सत्य डोळे आणि कान उघडे ठेऊन ऐका, ज्या समाजात पत्रकाराला सन्मानाची वागणूक मिळते त्याच समाजाला सन्मानाने जगता येते. तो लिहितो म्हणून तुमचे जगणे सुरक्षित आहे, त्याच्या लेखनीवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्यावर हल्ले करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करू नका, पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांना पाठीशी घालू नका नाहीतर, समाज म्हणून आपल्या जगण्याची राख-रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही.
 
-तुमचाच एक पत्रकार मित्र

रविवार, १७ जानेवारी, २०१६

मराठी सेवा विभागाचे उद्घाटन

पुणे -  ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून पत्रकारिता करणे हि आजची गरज असून, भारतीय वृत्त संस्थेच्या मराठी सेवा विभागाची स्थापना ही एक नवसर्जन असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि पत्रकार अभय टिळक यांनी व्यक्त केले.
भारतीय वृत्त संस्थेच्या मराठी सेवा विभागाचे उद्घाटन कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक संजय तांबट आणि कायदेतज्ञ असीम सरोदे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने संचालक ज्ञानेश्वर राउत, निलेश खरमरे, ओंकार दीक्षित उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने मुकुल पोतदार यांनी संस्थेची भूमिका मांडताना सांगितले कि, सध्या ग्रामीण आणि महत्वाच्या आंतराष्ट्रीय विषयांवर खूपच कमी प्रमाणावर वार्तांकन होत असल्याचे चित्र आहे. यामुळे मुख्य प्रसारमाध्यमांपर्यंत ग्रामीण भारतातील स्थानिक आणि आंतराष्ट्रीय घडामोडींसह इतर सर्व महत्वाच्या बातम्या पोहचवण्याचे काम संस्था करणार आहे. 
भारतीय वृत्त संस्थेची स्थापना दि. १ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्यात करण्यात आली असून, संस्थेच्या मराठी वृत्त सेवा विभागाचे उद्घाटन युवा दिनाचे औचित्य साधून दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. संस्था लवकरच दृक श्राव्य मध्यम सेवा देखील सुरु करणार आहे. आंतराष्ट्रीय विषयांवर वार्तांकनासाठी संस्था काही परदेशातील संस्थाशी भागीदारी करार करत आहे.   

संपादकीय निवेदन  
श्रमिक पञकारीतेच्या क्षेञामध्ये गेली काही वर्ष नोकरी करताना विविध अनुभव आले. त्यामुळे कुठेतरी ही भावना निर्माण झाली किहीतरी वेगळे करावे. पण नेमके काय ? 

त्यामुळे हा प्रयोग सुरु करण्यापूर्वी आम्ही केलेल्या अभ्यासामध्ये हे जाणवले कि, जगभरामध्ये अविकसित व ग्रामीण भागाचे तुलनेने खूपच कमी वार्तांकन केले जाते. त्यामुळे स्वाभाविकच ग्रामीण भाग मुख्य प्रवाहापासून दूर राहतो. म्हणून मग वृत्तसंस्था स्थापन करून प्रामुख्याने ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्था या विषयावर विशेष भर देऊन काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असे असले तरी एक वृत्तसंस्था म्हणून अभिप्रेत असलेल्या इतर महत्वाच्या विषयांवर ही संस्था काम करत आहे.    

बर मग हा विचार व्यक्त केल्यानंतर पहिला प्रतिसाद असा कि, हे कशासाठी ? नवीन प्रयोग, मग गुंतवणूक किती आहे ? मालक कोण ?, आधीच आहेत ना मोठमोठ्या संस्था, इ. हे सगळे खरे आहे. त्याजोडीला इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे. मग या सगळ्या प्रश्नाचं काय ?

ही वस्तुस्तिथी आहे कि, आज वर्तमान पत्र व्यवसायासमोर अनेक प्रश्न आहेत. मात्र या जीवघेण्या स्पर्धेच्या पत्रकारितेत श्रमिक पत्रकारांचे आयुष्य नेमके कुठल्या पातळीवर आले आहे, हा प्रश्न देखील आहेच. 

असो. आम्ही हा प्रयोग स्वबळावर स्वतंत्रपणे करत आहोत. आम्ही आर्थिक दृष्ट्या नक्कीच बलाढ्य नाही. पण कुठल्याही प्रसार माध्यम संस्थेची सर्वात मोठी ताकद ही विश्वासार्हता, सर्वसामावेशक-परिपूर्ण-तठस्थ वार्तांकन असते. भारतीय वृत्त संस्था देखील याच निकषांवर काम करून शिखर गाठेल. हे काम करताना आमच्याकडून चुका होऊ शकतात, मात्र आमच्या भूमिकेमध्ये सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

वसतिगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणात जेलची हवा खावून आलेला आरोपी झाला पत्रकार ..!!


थेट मुख्यमंत्र्यांच्या सभेत पोलीस अधीक्षकाची पास छातीला लावून बसला पत्रकारांच्या पहिल्याच रांगेत!!

जालना जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील मुलीच्या लैंगिक शोषनाचे प्रकरण तीन महिन्यापूर्वी  संपूर्ण मराठवाडयात चांगलेच गाजले होते. वसतिगृहाच्या अधीक्षकेसोबत असलेल्या मैत्रीचा गैरफायदा उठ्वुन संभाजी ब्रिगेडचा तथाकथित स्वयंघोषित कार्यकर्ता भरत मानकर याने आँक्टोबर २०१५ मध्ये मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यामध्ये भरत मानकर व त्याची मैत्रीण अधीक्षका या दोघांना पोलीस कोठडीची आणि जेलची हवा मिळाली होती. मानकर हा जेलची हवा खावून आल्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या स्थानिक  अध्यक्षाच्या क्रुपेने औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक जनपत्रचा जालना येथील प्रतिनिधी झाला. भरत मानकर याच्याविरुद्ध ज्या पत्रकारांनी रकानेच्या रकाने भरून मोठया - मोठया बातम्या छापल्या होत्या, त्याच पत्रकारांच्या पहिल्या रांगेत दि. ११ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत मानकर हा ताठ मानेने बसला होता. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीचा पास त्याने स्वतःच्या छातीवर लावला होता. त्यामुळे पत्रकारांना आश्चर्याचा धक्काच बसला तर पोलीस यंत्रणाही गोंधळून गेली.

पोलीस प्रशासन आणि माहिती कार्यालयाची गंभीर चूक!

मुख्यमंत्र्यांसारख्या महत्वाच्या व्यक्तीच्या सभाचे पास देतांना पोलिसांकडून अनेकदा पत्रकारांची हिस्टरी तपासल्या जाते. एखादा गुन्हा असेल तर त्याची पास नाकारण्यात येते. मात्र, मानकरला पास देतांना जालना पोलिसांनी असे कोणतेही रेकॉर्ड तपासले नाही, ही गंभीर चूक आहे.
याप्रकरणात पोलीसांबरोबरच  जालनाच्य जिल्हा माहिती अधिकार्यांची बेपर्वाईही तेवढीच कारणीभूत आहे. वसतिगृह मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाला वर्तमानपत्रानी मोठी प्रसिद्धी दिलेली माहिती असताना त्यातील आरोपीला पास देण्यासाठी पोलिसांकडे शिफारस करण्याचा जिल्हा माहिती अधिकार्यांचा हेतु काय ? असा सवाल निर्माण होत आहे.

महाराष्ट्रनामा ...

जळगावात "पुण्यनगरी"चे एक पाऊल पुढे!!
एका नामांकित न जुन्या TV न्यूज चॅनेलचा शहरातील जाँबाज न निर्भीड प्रतिनिधी लवकरच संपादकपदाची धुरा सांभाळणार ...!!!

 ..................

जळगावातील एका रेतीसम्राटाने शहरातील चार वृत्तपत्रांच्या संपादक व व्यवस्थापकांची भेट घेऊन सोपविला रिपोर्टर व फोटोग्राफर्सचा "पे रोल" .... 
संबंधितांच्या, "डील"च्या खासगी संभाषणाच्या ऑडियो क्लीप्स ऐकविल्या ....
काही संपादक व व्यवस्थापकांना फुटला दरदरून घाम!!!
...................


 जालना येथील प्रकरण 
 वसतिगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणात जेलची हवा खावून आलेला आरोपी झाला पत्रकार ..!!


मकोटे हा कोल्हापुरातील पत्रकार असून तो शासकीय कार्यालयाच्या पीआर चे हि काम करतो
हि बातमी आजच्या पुढारी मध्ये आली आहे ...
 

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

रवींद्र बऱ्हाटे यांच्या व्यवहार अन मालमत्तांच्या चौकशीचे आदेश -रवींद्र बऱ्हाटे यांच्या व्यवहार अन मालमत्तांच्या चौकशीचे आदेश -
http://epaper1.esakal.com/16Jan2016/Normal/PuneCity/page6.htmपुण्यातील काही RTI कार्यकर्ते डोळे न उघडता, नीट न बघता चक्क जग जिंकायला निघाले आहेत. दोन नावाजलेल्या टीव्ही पत्रकाराना हाताशी धरून "आरटीआय"च्या धमक्या देऊन खंडणी ऊकळायची आणि यांच्या व अंकांच्या तुंबड्या भरतात. RTI वाल्यांना वरून कुठून तरी नेमके लीड मिळतात आणि बिल्डर्सचे "रेव्हेन्यू" व सर्व अंतर्गत माहिती असते त्यांना. असे अनेक जण एकत्र करून या लोकांनी आपली टोळी उभी केली आहे, ज्यात काही पोलीस अधिकारीही सामील असल्याची पुण्यातील बिल्डर्स आणि सामान्य नागरिकांत चर्चा आहे.
काही पत्रकारांच्याही प्रॉपर्टीच्या चौकशा व्हायला हव्यात. तसे होत नाही, म्हणून भामटे पत्रकार सुटतात!!
 
 
 

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्रकाराचा मृत्यू


- गंभीर जखमी असूनही उपचार झाला नाही
- मेयो रुग्णालयातील संतापजनक प्रकार
नागपूर : अपघातानंतर उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टर व संबंधित परिचारिकांनी वेळेवर योग्यरित्या उपचार न केल्यामुळे एका तरुण, तडफदार पत्रकाराचा आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. हा धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे घडला. गंभीर रुग्णाला वेळेवर आणि योग्य उपचार रुग्णालयात मिळणार नसतील तर देवाचा दर्जा असलेल्या डॉक्टरांचा उपयोग काय] असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
चंद्रशेखर गिरडकर (४३) रा. पारशिवनी असे या मृतक प्रत्रकाराचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या काम आटोपून गावाकडे परत जात असताना पंचशील चौकात एका भरधाव टँकरने गिरडकर यांच्या दुचाकीस धडक दिली. यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी तत्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाला जबर मार लागला होता. दरम्यान त्यांचे पाय व छातीचे एक्स-रेही काढण्यात आले. यात त्यांच्या पायाचे हाड मोडल्याचे स्पष्ट झाले, तर छातीतील हड्डीला किरकोळ मार असल्याचे सांगण्यात आले. अधिक उपचारार्थ त्यांना कॅज्युअल्टीत दाखल करण्यात आले. यावेळी गिरडकर यांनी छातीतही दुखत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. परंतु, याकडे डॉक्टरांनी लक्षच दिले नाही. पोटाच्या खाली मार लागल्याने रक्त जमा झाले होते. मात्र, याकडेही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले.
डॉक्टरांकडून वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडली. घाबरलेल्या डॉक्टरांनी कृत्रिम श्वासोच्छवास लावला. परंतु, प्रकृती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात हलविले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अखेर आज पहाटेच्या सुमारास गिरडकर यांची प्राणज्योत मालवली.
उपचारावरून दोन डॉक्टरांमध्ये बाचाबाची!
गिरडकर यांना मध्यरात्री उपचारार्थ दाखल केले असता त्यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) उपस्थित नव्हते. गिरडकर यांच्यावर निवासी डॉक्टरांनीच उपचार केला. दरम्यान, आॅर्थोचे डॉक्टर आले आणि पाहणी करून निघून गेले. नंतर ‘सीएमओ’ आले. ‘सीएमओ’ने विचारणा केली असता आॅर्थोच्या डॉक्टरांनी आपले काम केल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर अतिदक्षता विभागात रुग्णास हलविल्यात आले. परंतु, हाताबाहेर रुग्ण गेल्यावर अतिदक्षता विभागातील महिला डॉक्टर चांगल्याच भडकल्या. मात्र, आॅर्थोच्या डॉक्टरांनी मी आपले काम केले असून, सीएमओना विचारा, असे सांगत हात झटकले. दोन डॉक्टरांमध्ये झालेल्या बाचाबाचीतील वेळ उपचारात खर्च झाला असता तर कदाचित गिरडकर वाचले असते, असे बोलले जात आहे. याशिवाय कॅज्युअल्टीमधील परिचारिकांनीही उपचारात मदत केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मेयोत धागासुद्धा नाही; दुर्देवी स्थिती
उपचारासाठी फक्त कापूस व सलाईनच पुरविण्यात आली. जखमेवर ंटाके लावण्यासाठी मेयोत धागासुद्धा नव्हता. टाके लावण्यासाठी धागा बाहेरून आणण्यास भाग पाडले. मेयोत टाके लावण्यासाठी धागासुद्धा असू नये, अशी दुर्देवी परिस्थिती रुग्णालयात आहे. मृत्यूस जबाबदार डॉक्टरांची चौकशी करून कारवाईची मागणी केली जात आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook