> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

पुढारीचा पाळणा पुन्हा लांबला

औरंगाबाद - सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे पुढारीचे लॉचिंग लांबणीवर पडत आहे.दिवाळी पाडव्यादिवशी सुरू होणारा पुढारीचा पाळणा पुन्हा लांबणीवर पडला आहे.त्यामुळे पुढारी टीमचा उत्साह  मावळत चालला आहे.
गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर तिसर्‍या वेळी पुढारी नक्की सुरू होेणार,हे शंभर टक्के सत्य असले तरी पुढारीच्या अडचणी दूर व्हायला तयार नाहीत.प्रिटींग मशिन बरोबर काम करत नसल्यामुळे पुढारीच्या मॅनेजमेंटने लॉचिंग पुढे ढकलले आहे.
पुढारी कसल्याही परिस्थितीत दिवाळी पाडव्यादिवशी सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या.परंतु प्रिटींग मशिन साथ देत नाही.त्यामुळे दिवाळीचा मुहुर्त पुढारीला साधता आला नाही.लॉचिंग लांबणीवर पडल्याने कोल्हापूरहून आलेली टीम परत गेली आहे तर डोंगरधारी पुन्हा मुंबईला गेले आहेत.समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांचा पाय अजूनही दुरूस्त झालेला नाही.नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने ही म्हण पुढारीला लागू पडत आहे.
प्रिटींग मशिनमध्ये सतत व्यत्यय येत असल्यामुळे नविन प्रिटींग युनिट खरेदी करण्याचा निर्णय मॅनेजमेंटने घेतल्याचे कळते.तोपर्यंत अन्य वृत्तपत्राच्या प्रिटींग युनिटवर छपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी दिव्य मराठीबरोबर बोलणी सुरू आहे.दिव्य मराठी आपल्या प्रतिस्पर्धी दैनिकास अंक छापून देणार का,याकडे लक्ष वेधले आहे.

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

उन्मेष गुजराथी यांच्यावर भ्याड हल्ला


ज्येष्ठ पत्रकार व दैनिक 'कर्नाळा'चे संपादक उन्मेष गुजराथी यांच्यावर बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पनवेल येथील खांदा कॉलनीच्या सिग्नलजवळ अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. गुजराथी यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. 
गुजराथी हे रात्री १ वाजता ऑफिसचे कामकाज आटोपून घरी परतत असताना दोघांनी हा हल्ला केला. हे दोन हल्लेखोर यामा एफझेड या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले होते. गुजराथी यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. 

असा  होता प्लॅन :
गुजराथी यांची वॅग्नर गाडी रिपेअरींगला दिली होती, त्यामुळे ते ऑफिसमधल्या आर्टिस्टच्या टू व्हीलरवरून घरी जात असत. याची पूर्वकल्पना या हल्लेखोरांना आधीपासूनच होती. त्यांच्या गाडीची नंबर प्लेट, निघण्याची वेळ, जाण्याचा मार्ग हा त्यांना पूर्ण माहित होता, हे हल्ल्यातील तपशिलावरून स्पष्ट होते. या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा ऑफिसपासूनच पाठलाग सुरु केला होता. पनवेलच्या हायवेवरून खांदा कॉलनीच्या सिग्नलजवळ त्यांच्या गाडीला दोन अज्ञात हल्लेखोरांनी गाडीला मागून धडक देवून पाडण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांच्या मागे एक डंपर भरधाव वेगाने येत होता. गुजराथी यांची गाडी पलटी करून मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांना चिरडण्याचा प्लॅन असल्याची शक्यता आहे, मात्र सावध असलेल्या गुजराथी यांनी चालकाला त्वरित सूचित करून गाडी सावरण्यास सांगितले. हा प्रयत्न उधळून लावला, अर्थात तोपर्यंत हल्लेखोर डाव्या बाजूकडील रस्त्याने गाडीची  नेमप्लेट पिशवीने झाकत पळून जाण्यात यशस्वी ठरले. 

अशी आहे पार्श्वभूमी : 

बेरक्याच्या हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्याचा हात असल्याचा संशय आहे. हा नेता जवळपास सर्वच नामांकित पत्रकार संघटनांना जाहिराती, कार्यक्रमासाठी आर्थिक साहाय्य करत असतो. दरवर्षी महाराष्ट्रातील नामांकित छोट्या- मोठ्या पत्रकार संघटना  त्याच्याहस्ते पुरस्कार वाटतात .  किमान तीस- पस्तीस जणांहून अधिक पत्रकारांना हे पुरस्कार खिरापतीसारखे मिळतात. असे भुरटे पुरस्कार घेण्यासाठी पत्रकारही वर्षभर त्याची हाजीहाजी करण्यात धन्यता मानतात. यामुळे बहुतांशी पत्रकार संघटना या नेत्याच्या गैर कारभाराविरोधात आवाज उठवण्याची हिंमत करत नाही. त्याच्या विरोधात गेल्यास सुपारी देऊन अट्रोसिटी, खंडणी किंवा विनयभंगासारख्या गंभीर प्रकरणात नाहक अडकवले जाते. यामुळे कोणतीही पत्रकार या नेत्याच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत करत नाही. अर्थात यामुळेच सर्व पत्रकार संघटना मूग गिळून गप्प आहेत. 

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

मी मराठी अपडेट

मुंबई - मी मराठीने इंटनेटचे पैसे न भरल्यामुळे काल संपूर्ण एक दिवस जुने बुलेटीन चालविण्यात आले आणि दोन दिवसापुर्वी दिल्लीवरुन सर्व्हर डाउन झाल्यामुळे मी मराठी कर्मचाऱ्यांचा पोपट झाला. अशात दिल्लीवरुन मी मराठीचे जुने शो लावुन स्लॉट भरुन काढण्याचे काम केले, त्यात तुळशीदास भोईटे यांचा जुना शो क्रॉस फायर हा शो दिल्लीवाल्यानी लावला आणि मी मराठी कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. त्यामुळे एकंदरीत अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले ज्युनियर मी मराठीचा लंगडा कारभार सांभाळत असतील तोपर्यंत मी मराठीचा हाशा होतच राहील.. आधीच डबघाईला आलेली मी मराठी वाहिनी आता सर्वांसाठी विनोदाची वाहिनी बनली आहे.

वागळे मास्तरांना अल्टीमेटम

मुंबई - 'आता जग बदलेल' चॅनलच्या वागळे मास्तरांचा 'आजचा सवाल' हा डिबेट शो 'लाइव्ह' सुरू असताना,सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांना वागळे मास्तारांनी सर्वासमक्ष हाकलून लावले,त्यानंतर वागळे मास्तर आणि मॅनेजमेंटचे चांगलेच वाजले आहे.वागळे मास्तर आणि मॅनेजमेंटचे गेल्या काही दिवसांपासून 'तू -तू,मै -मै' सुरू होते,त्यात वर्तकांच्या मानापमान नाट्यानंतर त्यात चांगलीच टिण्णगी पडली आहे.चॅनेल आर्थिक डबघाईस आल्यामुळे वागळे मास्तरांचा मूड गेला आहे,त्यामुळे त्यांची चिडचिड सुध्दा अधिक वाढली आहे.
वर्तकांच्या मानापमानानंतर वागळे मास्तर रजा टाकून सुट्टीवर गेले आहेत.केव्हा परत येणार हे सांगायला ते तयार नाहीत.त्यामुळे मॅनेजमेंट आणि वागळे मास्तरांंतील तणाव वाढला आहे.अखेर मॅनेजमेंटने त्यांना 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे.2 नोव्हेंबरपर्यंत कामावर रूजू न झाल्यास वागळे मास्तारांना कायमचा नारळ देण्याची तयारी मॅनेजमेंटने केली आहे.त्यांच्या जागेवर संपादक म्हणून आशिष जाधव यांची निवड करून एका दगडात दोन पक्षी मारण्याची तयारीही मॅनेजमेंटने ठेवली आहे.
दुसरीकडे वागळे मास्तर गेल्यास आपले कसे होईल,या धास्तीने वागळे समर्थक चांगलेच धास्तावले आहेत.वागळेंची विकेट पडल्यास या पंटरना सुध्दा हाकलण्याची तयारी मॅनेजमेंटने केली आहे.त्यामुळे 'आता जग बदलेल' मध्ये दिवाळीनंतर फटाके फुटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र 1 आर्थिक डबघाईस ....

मुंबई - जानेवारी 2016 मध्ये सुरू झालेले महाराष्ट्र 1 न्यूज चॅनल आर्थिक डबघाईस आले आहे.ज्यांना 50 हजारापेक्षा जास्त पगार आहे,त्यांचा पगार गेल्या चार महिन्यापासून निम्माच दिला जातोय.राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टरना गेल्या सहा महिन्यापासून मानधन नाही.पुणे आणि नागपूरच्या ब्युरो ऑफिसचे भाडे थकल्याने मालकांनीं त्यांना ऑफीस सोडण्यास भाग पाडले.पुण्याचे ऑफीस तीन महिने बंद पडले होते.आता नव्या जागेत स्थलांतरीत झाले तरी त्याचे भाडे देण्यात आले नाही.नागपूरचीही तीच बोंबाबोंब सुरू आहे.नाशिकसह अनेक ठिकाणच्या व्हॅन बंद पडल्या आहेत.काही कॅमेरामनच्या पगारी थकल्याचेही कळते.
आर्थिक तंगाईमुळे वागळे मास्तर जाम भकडले आहेत.त्यांचे आणि मँनेजमेंटचे कडाक्याचे भांडण झाल्याचे समजते.सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांना डिबेट शोमधून हाकलून लावल्यानंतर वागळे मास्तर आणि मँनेजमेंटचे चांगलेच वाजले आहे.तेव्हापासून वागळे मास्तर रजा टाकून सुट्टीवर गेले आहेत.त्याचबरोबर अनेक अँकर दुुसर्‍या संधीच्या शोधात आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्र 1 साठी नव्या पार्टनरचा शोध सुरू आहे.कोल्हापूरच्या एका तंबाखू आणि गुटखा विक्रेत्यास 'घोड्या'वर बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यांच्यासोबत दोन मिटींगा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.हा नवा पार्टनर मिळाला तर महाराष्ट्र 1 ची आर्थिक बाजू सक्षम होईल अन्यथा चॅनलची अवस्था अधिक कमजोर होईल.

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

सुशीलकुमार वाठोरे यांचा राजीनामा


पुढारी सुरु होण्याआधीच जालना येथील जिल्हा प्रतिनिधी सुशीलकुमार वाठोरे यांनी राजीनामा दिला आहे. वाठोरे हे जालना येथे गेल्या चार- पाच वर्षांपासून पुढारीसाठी काम करीत होते. त्यांना पुढारीने कार्यालय सुरु करून दिले होते. त्यांच्यामार्फत जालन्याच्या एमआयडीसीतील काही जाहिरातीही पाठविण्यात येत होत्या. मात्र. गेल्या पाच - सहा वर्षांपासून काम करणाऱ्या वाठोरे यांना कायम ठेवून त्यांना काटशह देण्यासाठी पुढारीचे औरंगाबाद येथील युनिट हेड कल्याण पांडे यांनी त्यांच्या मर्जीतील बीडचा लोकप्रश्नचे काम करणाऱ्या सुहास कुलकर्णी यांना अचानक सेम पोस्टवर जालना येथे नेमणूक केली. त्यामुळे वाठोरे हे दुखावले गेले होते. त्यातच त्यांनी पुढारीचा राजीनामा देऊन त्यांनी देशोन्नतीचे काम सुरु केले.
पुढारीच्या कोल्हापूरच्या व्यवस्थापनाने सलेक्ट केलेल्या एकाही उमेदवाराला युनिट हेड कल्याण पांडे यांनी जालना येथे घेतलेले नाही. उलट मुलाखती न दिलेल्या मर्जीतील सुहास कुलकर्णी आणि त्यापूर्वी महेश कुलकर्णी यांना घेतले आहे.जाता  - जाता  

औरंगाबाद - बेरक्याचे भाकीत खरे ठरले ः लोकमतमधून बाहेर पडलेले विनोद काकडे पुढारीमध्ये जॉईन,सिटी न्यूज एडिटर म्हणून पदभार स्वीकारला...

जिजाऊंच्या लेकी धडकल्या 'लोकसत्ता' च्या कार्यालयावर

युवती व महीलांच्या नेतृत्वात निघालेल्या चंद्रपुर येथील मराठा कुणबी क्रांती मुक मोर्चा चे मानहानीकारक वृत्तांकन करणा-या दैनिक लोकसत्ता च्या कार्यालयावर मराठा कुणबी समाजातील महीला निषेध करण्यासाठी तोंडाला काळी फीत लावुन गेल्या होत्या. वर्तमान पञ परत करून निषेध करण्यात आला.यावेळी समाजात दूही निर्माण करणारी व मानहानीकारक बातमी लिहणारे लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी रवी जुनारकर यांनी माञ आधीच कार्यालयातुन पळ काढला.त्यामुळे ते महीलांच्या रोषापासुन बचावले. रणरागीनीं मुक होत्या पंरतु त्यांच्या डोळ्यातील मानहानीविरोधातील भावना एवढ्या तिव्र होत्या की निषेधाचे पञ देखील घ्यायला कुणी पुढे येत नव्हते


शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

डोंंगरधारीस फोडण्याचा प्रयत्न ...

औरंगाबाद - एकीकडे पुढारीने औरंगाबादेत जोरदार मुसंडी मारण्याची तयारी केली असताना,दुसरीकडे पुढारीची हवा काढून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या बाबूजींनी 'डोंगरधारी'ला फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्याचबरोबर लोकमत ते पुढारी (व्हाया सकाळ ) करणार्‍या रिपोर्टरला 'अभय' देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.दरम्यान,लोकमतमधून बाहेर पडलेला विनोद काकडे पुढारीच्या वाटेवर आहे.
महाराष्ट्राच्या मानबिंदूने कोल्हापुरात पुढारीला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पलटवार करण्यासाठी पद्मश्रींनी औरंगाबादेत पुढारीला सुरू करण्याचा निर्णय घेतला.गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर तिसर्‍या वेळी मात्र पद्मश्रींनी जोर लागला आहे.
सुशिल कुलकर्णी आणि मंगेश डोंग्रजकर यांनी ऐनवेळी धोका दिल्यानंंतर पुढारीने हुकमी एक्का काढला.मात्र हा हुकमी एक्काच पळवण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्राच्या मानबिंदूकडून सुरू आहे.यासाठी डोंगधारीला मुंबई आवृत्तीचे संपादकपद,दुप्पट पॅकेज आणि सर्व सुविधा देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचे कळते.जेव्हा डोंगरधारी महाराष्ट्राच्या मानबिंदूकडे चकरा मारत होता,तेव्हा किंमत करण्यात आली नाही,आता औरंगाबादेत पुढारी सुरू होत असताना आमिष दाखवण्यात येत आहे.या आमिषाला डोंगरधारी बळी पडणार का,याकडे लक्ष वेधले आहेे
.
विनोद काकडेे यास लोकमतमधून निरोप
चिफ रिपोर्टर पदावरून दूर करताच विनोद काकडे याने लोकमतचा राजीनामा दिला होता.तो राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे.त्यानंतर काकडेंना शनिवारी निरोप देण्यात आला तर नजिर शेख यास ब्युरोे चिफ करण्यात आले.
दुुसरीकडे काकडे पुढारीच्या वाटेवर आहे.त्यास न्यूज एडिटर (औरंगाबाद शहर) पद देेण्याचा आणि लोकमतपेक्षा दुप्पट पॅकेज देण्याचा पुढारीचा निर्णय झाल्याचे कळते.काकडे हा लोकमतचा विश्‍वासू व्यक्ती होता.त्यामुळे लोकमतला झटका बसला आहे.त्याचे उट्टे काढण्यासाठी पुढारीमधील एकास अभय देणे सुरू आहे.

पुढारीचा फटका लोकमतला...
पुढारीच्या बातम्या या आक्रमक असतात.कंटेंन्टपण चांगले असतात.त्यामुळे पुढारीचा कॉन्टरसेल चांगला होतो.मराठवाड्यातील लोकांना आक्रमक लिखाणाची आवड आहे.त्यामुळे पुढारी मराठवाड्यातील वाचकांच्या पसंदीस उतरेल आणि त्याचा सर्वाधिक फटका लोकमत,त्यानंतर पुण्यनगरीस बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामा येतोय...

पुणे - सकाळ मीडिया ग्रुपच्या राजकीय विषयावरील नव्या दैनिकाचे नाव सरकारनामा असून या दैनिकाचा शुभारंभ 1 डिसेंबर रोजी होणार आहे.या बहुप्रतिक्षेत दैनिकाची संपादकीय जबाबदारी जयंत महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कृषी विषयावरील अ‍ॅग्रोवन दैनिक यशस्वी झाल्यानंतर सकाळ मीडिया ग्रुपचे सर्वेसर्वा अभिजीत पवार यांनी राजकीय विषयावर दैनिक काढण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.त्यानंतर या दैनिकाचे नाव सरकार असावे,असे ठरले होतेे.मात्र सरकार नावात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे  त्यांना सरकारनामा सुरू करावा लागत आहे.
या दैनिकाची तयारी गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे.हे दैनिक अ‍ॅग्रोवन दैनिकाच्या आकाराप्रमाणेच 16 पानी (सर्व पाने रंगित) राहणार असून,त्यात अनेक कंटेन्ट राहणार आहेत.किंमत चार किंवा पाच रूपये राहणार आहे.मुंबई,पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या दैनिकाचा शुभारंभ होणार असून,या नव्या दैनिकाकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे.


शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

समीरण वाळवेकर यांचा राजीनामा

मुंबई - जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक समीरण वाळवेकर यांनी राजीनामा दिला आहे.या राजीनाम्याचे कारण स्पष्ट नसले तरी चंद्रमोहन पुप्पाला आल्यामुळे वाळवेकरांनी राजीनामा दिला असावा,अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
टीव्ही मीडियाचा दांडगा अनुभव असलेल्या वाळवेकरांची सप्टेंबर 2015 मध्ये जय महाराष्ट्रमध्ये एन्ट्री झाली होती.त्यानंतर वाळवेकर,प्रसन्न जोशी आणि निलेश खरे या तिघांनी चॅनेलचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु हे  चॅनल  अनेक केबल आणि डीटीएचवर दिसत नसल्यामुळे आणि अपुर्‍या यंत्रणेमुळे  टीआरपी वाढलाच नाही.त्याचबरोबर रिपोर्टरची टीम म्हणावी तितकी सक्षम नाही.अनेक रिपोर्टरना फोनो कॉल सुध्दा नीट देता येत नाही.
टीआरपी वाढवा म्हणून मालक सुधाकर शेट्टी यांनी अनुभवी चंद्रमोहन पुप्पाला यांना संचालक मंडळावर काही दिवसांपूवी घेतले आहे.पुप्पाला येताच वाळवेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

विनोद काकडे यांचा राजीनामा

औरंगाबाद -महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या  चिफ रिर्पाटर पदावरून दूर करताच,नाराज विनोद काकडे यांनी राजीनामा दिला असून,या राजीनामा पत्रात संपादक सुधीर महाजन आणि युनिट हेड संंदीप बिष्णोई यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये गेली तीन वर्षे चिफ रिपोर्टर म्हणून काम करणार्‍या विनोद काकडे यांची पुढारीच्या पार्श्‍वभूमीवर चिफ रिपोर्टर पदावरून दूर करण्यात आले आणि नजिर शेख यांना पुन्हा सिटी इन्चार्ज करण्यात आले.काकडे यांना दूर करताना एक तर डेप्युटी न्यूज एडिटर किंवा अन्य पदावर पदोन्नती देणे आवश्यक असताना त्यांना पुन्हा क्राईम रिर्पाटर करण्यात आलेे.फौजदाराचा पुन्हा कॉन्स्टेबल करण्यात आल्यामुळे काकडे कमालीचे नाराज झाले आणि या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला.
या राजीनामा पत्रात त्यांनी संपादक सुधीर महाजन आणि युनिट हेड संंदीप बिष्णोई यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.या दोघांच्या छळाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.विशेष म्हणजे हा राजीनामा त्यांनी संपादक सुधीर महाजन यांच्याकडेच दिला आहे.
काकडेंना चिफ रिपोर्टर पदावरून दूर करण्याचा निर्णय सुधीर महाजन यांचा होता की राजेंद्रबाबू यांचा होता,याबाबत लोकमत भवन परिसरात चवीने चर्चा सुरू आहे.


बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

पुढारीने अखेर हुकमी एक्का काढला...

औरंगाबाद - पुढारीचे समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार हे गेल्या दहा दिवसांपासून आजारी पडले आहेत.त्यांच्या पायाला दुःखापत झाल्याचे वृत्त आहे.त्यामुळे पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीचे काम पुन्हा रखडले होते.अखेर पुढारीने हुकमी एक्का काढत विवेक गिरधारी यांना मुंबईहून औरंगाबादला पाठवले असून,गिरधारी औरंगाबादेत दाखल झाले आहेत.त्याचबरोबर कोल्हापूरचे सहयोगी संपादक शिवाजी जाधव यांनाही काही दिवसांसाठी औरंगाबादेत पाठवण्यात आले आहे.एकंदरीत घडामोडीवरून पुढारी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर किंवा तत्पुर्वी सुरू होण्याची शक्यता आहे.
पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीचा प्रयोग गेल्या दहा वर्षात दोनदा फसल्यानंतर यावेळीही अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.सुशिल कुलकर्णी आणि मंगेश डोंग्रजकर यांनी नकार दिल्यांनतर निवासी संपादकपद न भरता पुढारीने विवेक गिरधारी यांना मुंबईहून औरंगाबादेत पाठवले आहे.गिरधारी हे मूळचे औरंगाबादचे असून,कामात बापमाणूस आहे.त्यांच्या फटकळ स्वभावामुळे अनेकजण दुःखावले असले तरी अंकाचे लेआऊट,बातम्यांची जाण आणि कोणता विषय कोणत्या वेळी हाताळावा यात ते तरबेज असल्यामुळे पुढारीला आता चांगलाच रंग भरणार आहे.त्यामुळे औरंगाबादेत काही दिवस तरी प्रतिस्पर्धी दैनिकाबरोबर पुढारीची स्पर्धा दिसणार आहे.गिरधारी आता औरंगाबादला किती दिवस थांबणार,यावर बरेच काही अवलंबून आहे.
पुढारीने संपूर्ण मराठवाड्यात दोनशे लोकांची टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.जिल्हा प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असले तरी प्रत्येक जिल्हा कार्यालयात टीम आणि यंत्रणा अपुरी आहे.सध्या औरंगाबाद शहर आणि जिल्हा,फार फार तर जालना आणि बीडमध्ये औरंगाबाद आवृत्तीचा अंक दिसेल.मराठवाड्यात सर्व ठिकाणी अंक देण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील.तेवढा पैसा ओतण्याची तयारी पद्मश्रींनी केली आहे.
पुढारीचे औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक सुंदर लटपटे हे आक्रमक लिखाण करण्यात माहीर आहेत.मात्र तेवढे स्वातंत्र्य पुढारीने द्यायला हवे.आक्रमक लिखाण केले तर पुढारीला बाजारात किंमत राहणार आहे.त्याचबरोबर सर्वांपेक्षा वेगळ्या बातम्या दिल्या तरच पुढारी मराठवाड्यात भारी होईल अन्यथा एका दैनिकात भर पडली,ऐवढेच म्हणावे लागेल.पुढारीचा सर्वाधिक फटका पुण्यनगरीस बसण्याची शक्यता आहे.


पुढारी काढणार हुकमी एक्का हे वृत्त बेरक्याने २८ ऑगस्ट रोजी दिले होते .... हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे ...
 

कायदा,पेन्शनसाठी फेब्रुवारीत मुंबईत महोमार्चाचे आयोजन

नांदेड - पत्रकार संरक्षण कायदा,आणि पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने फेब्रुवारीत मुंबईत महामोर्चा काढण्यात येत असून या मोर्चात राज्यातील पाच हजारांवर पत्रकार सहभागी होणार आहे.या मोर्चात सर्वशक्तीनिशी सहभागी होण्याचा निर्धार मराठी पत्रकार परिषदेच्या काल नांदेड येथे झालेल्या बैठकीत व्यक्त कऱण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख होते.तत्पुर्वी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका पत्रकार संघांच्या अध्यक्षांचा मेळावा 25 डिसेंबर रोजी नांदेड येथे होत असून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांवर यावेळी प्रकाश टाकला जाणार आहे.मेळाव्याचे उद्दघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे.कालच्या बैठकीस राज्याच्या 32 जिल्हयातून 70 वर प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील 350 तालुका पत्रकार संघ परिषदेशी जोडलेले आहेत.ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्य उग्रपणे समोर येत असून हल्ले,खोटे गुन्हे,तसेच अन्य प्रश्‍न ग्रामीण पत्रकारांना भेडसावत आहेत.या प्रश्‍नांवर चर्चा करून या प्रश्‍नांना सामोरे कसे जायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे.या मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांन निमंत्रित करण्यात येणार आहे.राज्याभरातून एक हजारांवर प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.
 25 डिसेंबरच्या मेळाव्याच्या निमित्तानं 23 तारखेला पत्रकार एकता रॅली काढण्यात येणार आहे.पुणे येथून ही रॅली निघेल.नगर,औरंगाबाद,जालना,परभणी मार्गे ही रॅली 24 ला संध्याकाळी नांदेडला पोहोचेल.या रॅलीत दोनशेवर पत्रकार सहभागी होणार आहेत.परिषदेच्या बैठकीस प्रत्येक विभागात एक मेळावा घेऊन कानून पे चर्चा म्हणजे पत्रकारांसाठीच्या कायद्याची माहिती पत्रकारांना देण्यात येणार आहे.
पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शन योजना सुरू करण्यात सरकारकडून होत असेलेली टाळाटाळ यावर बैठकीत सर्वच सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.या विरोधात मुंबईत फेब्रुवारी 2017 मध्ये पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चात राज्यभरातून किमान पाच हजार पत्रकार सहभागी होतील अशी समितीची योजना आहे.समितीच्या या मोर्चात परिषद शक्तीनिशी सामिल होईल असा ठराव एकमुखाने घेतला गेला.
ज्येष्ठ पत्रकार या श्रेणीत ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळणार नाही असा जाचक निर्णय अधिस्वीकृती समितीने केला आहे.त्याबद्दल उपस्थित सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.या विरोधात समितीच्या बैठका जेथे जेथे असतील तेथे समितीसमोर निदर्शने करण्याचा निर्णयही घेतला गेला.तसेच अधिस्वीकृती समितीची बैठक दिल्ली येथे होणार आहे.कार्यक्षेत्राबाहेर ही बैठक घेऊन सदस्यांना त्यांच्या खर्चाने दिल्लीस येण्यास भाग पाडले जात आहे.त्याबद्दलही उपस्थितांनी नाराजी व्यक्त करून परिषदेच्या सदस्यांनी या दिल्ली बैठकीवर बहिष्कार टाकावा असा निर्णयही बैठकीत घेतला गेला आहे.महासंचालकांनी यासंदर्भात लक्ष घालून दिल्लीत होणारी बैठक रद्द करून ती महाराष्ट्रातच घ्यावी अशी मागणीही यावेळी केली गेली.
मराठी पत्रकार परिषदेचं मुख्यालय मुंबईत असले तरी परिषदेची मुंबईत शाखा नाही.त्यामुळे मुंबई शाखा तातडीने सुरू कऱण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.3 डिसेंबर हा परिषदेचा स्थापन दिवस आहे.या दिवशी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेतली जाणार आहेत.तसेच परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा 3 डिसेंबर रोजी नागपूर येथे घेण्याचा निर्णयही बैठकीत घेतला गेला आहे.
6 जानेवारीला ओरोस येथे बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा होत असून या सोहळ्यासाठी राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे बैठकीत नक्की करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि परिषदेच्या पाठपुराव्यामुळे ओरोस येथे बाळशास्त्री जांभेकरांचे स्मारक होत आहे.त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत करण्यात आला.तसेच ऑनलाईन निवडणूक घेऊन राज्यात वेगळा प्रयत्न करणार्‍या शिरूर तालुका पत्रकार संघाचेही अभिनंदन बैठकीत केले गेले.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आयोजित 2 ऑक्टोबरच्या निर्धार मेळाव्याना राज्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.विविध संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या संघटना तसेच पत्रकारांनी सहकार्य केले त्यांच्या आभाराचा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला.
बैठकीस एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी,माधव अंभोरे,विभागीय सचिव विजय जोशी,हेमंत डोर्लीकर,राजेंद्र काळे,शरद पाबळे आणि 22 जिल्हयांचे अध्यक्ष तसेच अन्य जिल्हयातील परिषद प्रतिनिधी उपस्थित उपस्थित होते.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले,नांदेडचे परिषद प्रतिनिधी प्रदीप नागापूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.बैठकीनंतर नांदेड जिल्हयातील पत्रकरांची तालुका निहाय बैठक घेऊन एस.एम.देशमुख त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

मी मराठीमध्ये पोरखेळ सुरू


मुंबई - मी मराठी न्यूज चॅनलचा मालक महेश मोतेवार चिटफंड प्रकरणी अटक झाल्यापासून या चॅनलला चांगलीच घरघर लागली आहे.रवी आंबेकर,तुळशीदास भोईटे गेल्यानंतर या चॅनलचे सर्व बुलेटिन बंद झाले होतेे,मात्र लाइव्ह इंडियाच्या विजय शेखर यांनी कसेबसे हे चॅनल सुरू केले आहे,इनपूटची जबाबदारी राहूल पहुरकर तर आऊटपूटची जबाबदारी सोनम ढेपे- मोरे पहात आहेत.सुरूवातीस या दोघात चांगलीच मैत्री होती.
या चॅनलमध्ये सध्या पोरखेळ सुरू आहे.ज्यांना काहीच अनुभव नाही अश्या रिपोर्टर आणि अँकरवर डोलारा सुरू आहे.राहूल पहुरकर यांनी रात्रीच्या विशेष न्यूज बुलेटिनचे अँकरिंग सुरू केले होते.मात्र त्यास अँकरिंग  जमत नसल्यामुळे ते थांबवण्यात येवून एका नवख्या अँकरवर ती जबाबदारी देण्यात आल्यानंतर पहुुरकर आणि सोनम ढेपे -मोरे यांच्यात मोठी ठिणगी पडली आहे.
राहूल पहुरकर याने एका व्हिडीओ एडिटरशी मोेबाईलवरून बोलताना सोनम ढेपे -मोरे तसेच अनेकांबद्दल मुक्ताफळे उधळली आहेत.त्याची ऑडियो क्लीपच बेरक्याच्या हाती लागली आहे.या संभाषणामध्ये पहुरकर यांनी विजय शेखर यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधाने केली आहेत.तसेच सोनम ढेपे -मोरे यांच्याबद्दल वाईट विधाने केली आहेत.त्यामुळे या दोघांत आणखीच मतभेद वाढले आहेत.
दुसरीकडे मी मराठीच्या अनेक जुन्या रिपोर्टरना काढून टाकण्यात आले आहे.काम करायचे असेल तर फुकट करा अन्यथा काम सोडा म्हटल्यामुळे अनेकांनी काम सोडले आहे.दिवसभरात चार ते पाच बुलेटिन सुरू आहेत.रिपीट त्याच बातम्या फिरवल्या जात आहेत.केवळ नावापुरते हे चॅनल सुरू आहे.त्याचबरोबर हे चॅनल विक्रीस काढण्यात आले आहे.मात्र काही कोटी रूपये मोजून हे चॅनल विकत घ्यायला कोणीही पुढे येत नाही.मोतेवार सुटेपर्यंत मी मराठीचे बाराच वाजणार आहेत.

महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये बदल....नजिर शेख सिटी इन्चार्ज !


औरंगाबाद - पुढारीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये अचानक बदल करण्यात आले आहेत.विनोद काकडे याची चिफ रिपोर्टर पदावरून अचानक गच्छंती करण्यात आली असून,सिटी इन्चार्ज म्हणून नजिर शेख याची नियुक्ती करण्यात आली आहे.मंगळवारी 6 वाजता हा अचानक निर्णय घेण्यात आला  आणि अवघ्या काही मिनीटात बेरक्याच्या हाती ही माहिती आली.
नजिर शेख हा सन 2012 ते 2014 या काळात चिफ रिपोर्टर होता.सन 2014 मध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम केलेल्या विनोद काकडे यास चिफ रिपोर्टर करण्यात आले तर नजिर शेख यास विद्यापीठ बिट देण्यात आले होते.पुढारीच्या पार्श्‍वभूमीवर काकडेची चिफ रिपोर्टर पदावरून गच्छंती करण्यात आली आणि पुन्हा क्राईम रिपोर्टर करण्यात आले.फौजदाराचा पुन्हा कॉन्स्टेबल करण्यात आल्यामुळे  काकडे नाराज झाले आहेत तर दुसरीकडे हा बदल का करण्यात आला,याची माहिती बेरक्याच्या हाती लागली आहे.
नजिर शेख हे काही वर्षापुर्वी कोल्हापुरात पुढारीमध्ये रिपोर्टर होेते.त्यांचे आणि पद्मश्रीचे जुने संबंध आहेत.शेख यांना पुढारीमध्ये निवासी संपादकपदाची ऑफर होती.ते पुढारीत जावू नये म्हणून राजेंद्रबाबूनी नजिर शेख यास सिटी इन्चार्ज करून टाकले तर काकडेंना मूळ पदावर आणले.या अचानक बदलामुळे महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

दूरदर्शन स्ट्रिंजर व्हा !


महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांकरिता स्ट्रिंजर/कॅमेरामॅनचे पॅनेल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती, मालक, भागीदारी कंपन्या, व्यावसायिक संस्था/संघटनांकडून मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत.
            सिनेमॅटोग्राफी/व्हिडीओग्राफी/वृत्त संकलन/प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.  सध्या पॅनेलवर असलेल्या स्ट्रिंजर्सनाही नव्याने अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनेलसाठीच्या निवड प्रक्रियेतूनच जावे लागेल.
            मार्गदर्शक तत्त्वे/अटी याबाबतची सविस्तर माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  ज्या जिल्ह्याकरिता पॅनेलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जामध्ये उल्लेख करावा.
उमेदवारांनी Prasar Bharati (IPSB) Doordarshan, Mumbai या नावे एक हजार रुपयाच्या 'ना-परतावा' धनाकर्षासह (डीडी) अर्ज, ''प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, मुंबई येथे स्ट्रिंगर्सचे पॅनल <जिल्ह्याचं नाव> ''असा उल्लेख करुन अर्ज दि. 16 डिसेंबर, 2016 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावे.
००००
पत्ता
प्रसार भारती
भारत लोकसेवा प्रसारक,
प्रादेशिक वृत्त विभाग,
दूरदर्शन केंद्र,
पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी,
मुंबई - 400 030.औरंगाबादमध्ये एकमतचे रिलाँचिंग तर पुढारीमुळे स्पर्धा वाढणार

औरंगाबाद /लातूर -जनतेवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारे लोकनेते विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर लातूरकरांबरोबर दैनिक एकमत पोरका झाला आहे.ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस यांनी विलासरावांच्या निधनानंतर एकमतचे संपादकपद सोडल्यानंतर कुचकामी पांडुरंग कोळगे यांना संपादकपद देण्यात आले होते,त्यामुळे एकमतची अधोगती सुरू झाली.मराठवाड्यातील अनेक जिल्हा कार्यालये बंद करण्यात आली.आता एकमत लातूरपुरताच सिमीत राहणार की काय,असे वाटत असतानाच अमित देशमुख यांनी कोळगे यांची हकालपट्टी करून मंगेश देशपांडे - डोंग्रजकर यांच्यावर धुरा सोपवली.डोंग्रजकर यांनाही एकमतचा भार पेलवत नसल्याचे दिसून येत आहे.अंकात कसलाही बदल झालेला दिसत नाही किंवा खपात होणारी घसरण सुरूच आहे.
दुसरीकडे पुण्यनगरीतून बाहेर पडलेली जोडगोळी आर.टी.कुलकर्णी आणि सुशिल कुलकर्णी एकमतमध्ये प्रवेश करताच डोंग्रजकर अस्वस्थ झाले.आपल्या संपादकपदावर गंडातर येणार की काय असे त्यांना वाटल्याने त्यांनी पुढारीत जाण्याचा निर्णय घेतला होता,परंतु तो निर्णय सध्या तरी फिरवल्याचे दिसत आहे.डोंग्रजकर यांनी लातूरचा तर सुशिल कुलकर्णी यांनी औरंगाबाद आवृत्तीचा डोलारा संभाळण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
दैनिक एकमतची औरंगाबाद आवृत्ती रिलॉचिंग करण्याचा धााडसी निर्णय अमित देशमुख यांनी घेतला आहे.त्यासाठी बीडच्या ताई सुशिलच्या मदतीला आल्याचे कळते.
दैनिक एकमतचे औरंगाबादला प्रिंटींग युनिट नाही.छपाई लातूरला करणार की औरंगाबादला याबाबत अजून तरी निर्णय झालेला नाही.औरंगाबादला अंकाचे प्रिंटींग करायचे म्हटल्यास खर्च वाढणार आहे.

औरंगाबादमध्ये स्पर्धा वाढणार
औरंगाबादला बंद पडलेला गावकरी जून महिन्यात सुरू झाला.येत्या काही दिवसांत पुढारी सुरू होणार आहे. दोन महिन्यात एकमतही सुरू होणार आहे.पुढारीचे औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लागले आहेत.दैनिक पुढारी आता मराठवाड्यात भारी,अशी जाहिरातबाजी सुरू झाली असली तरी एकंदरीत टीम भारी वाटत नाही.संपादकीय विभागात अजून म्हणावी तशी भरती झालेली दिसत नाही.निवासी संपादक पद अजूनही रिक्तच आहे.सुंदर लटपटे यांच्या नेतृत्वाखाली पुढारी अन्य दैनिकास कितपत टक्कर देणार,हे येत्या काही काळात स्पष्ट होणार आहे.
एकमतची जोडगोळी आर.टी.कुलकर्णी आणि सुशिल कुलकर्णी यांनी एकमत असा राहील तसा राहील म्हणून हवा सोडली आहे.ही हवा टिकण्यासाठी आर्थिक बाजू मजबूत असणे आवश्यक आहे.अमित देशमुख यांनी सध्या दोन कोटी रूपये  औरंगाबाद आवृत्तीच्या रिलाँचिंगसाठी दिल्याचे कळते.त्यानंतर मात्र या जोडगोळीलाच एकमत फायद्यात आणावा लागेल.एकमत यशस्वी करण्यासाठी आर.टी.कुलकर्णी आणि सुशिल कुलकर्णी या जोडगोळीची मोठी कसोटी लागणार आहे.
लोेकमत,सकाळ,दिव्य मराठी,पुण्यनगरी,महाराष्ट्र टाइम्स,सामना,लोकसत्ता,गावकरी नंतर आता पुढारी आणि एकमत सुरू होणार असल्याने औरंगाबादमध्ये मोठी स्पर्धा होणार आहे.सध्या औरंगाबादमध्ये नव्या दैनिकास कसलाही स्पेस नाही.तरीही पुढारी आणि एकमत सुरू होत आहे.पुढारी आणि एकमतमुळे बेरोजगार लोकांना संधी मिळाली आहे.त्याचबरोबर पुढारीत जाणार्‍यास पगार वाढवूून मिळाला आहे,हे वृत्तपत्र कर्मचार्‍यासाठी एकप्रकारे चांगलेच घडले आहे.

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

वाचकांना नम्र आवाहन


बेरक्या ब्लॉग नियमित अपडेट होत नाही,कधी कधी महिनाभर अपडेट होत नाही,अश्या तक्रारी वाचकांनी बेरक्याकडे मेलव्दारे केल्या आहेत.
वाचकांच्या या तक्रारी आम्हाला मान्य आहेत,परंतु या वाचकांना आदरपुर्वक सांगू इच्छितो की, सध्या मराठी मीडियात काहीच घडामोडी घडत नाहीत.औरंगाबादेत पुढारी सुरू होत आहे आणि त्या पाठोपाठ एकमत....या दोन नव्या घडामोडी  सोडल्या तर सध्या काहीच नविन नाही.
मराठी मीडियात घडणार्‍या सर्व हालचालीवर बेरक्याचे बारीक लक्ष आहे.राज्यातील सर्व वृत्तपत्रात आणि न्यूज चॅनलमध्ये बेरक्याने आपला सोर्स तयार केला आहे.टाचणी जरी वाजली तरी बेरक्याकडे त्याची पुर्णपणे माहिती येते.याचा अर्थ ऊठसूठ कोणत्याही बातम्या देणे किंवा कोणालाही झोडपून काढणे असा नाही.ज्या बातम्या शंभर टक्के खर्‍या आहेत, वाचकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेेत,त्याच प्रसिध्द केल्या जातात.
बेरक्या चांगल्याचा साथीदार आणि वाईटांचा कर्दनकाळ आहे.कोणी कोणाला त्रास देवू नये,हाच हेतू आमचा आहेे.
राज्यात सध्या पत्रकारांवर हल्ला करून नंतर खोट्या केसेस दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.या प्रकरणी प्रत्येक जिल्ह्यात वकिल सेल तयार करून पत्रकारांना कायदेशीर साह्य करण्याची योजना सध्या सुरू आहे.त्यासाठी काही पत्रकार पुुढे आले आहेत.
पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा,यासाठी सर्व पत्रकारांनी वज्रमूठ आवळणे गरजेचे आहे.पत्रकारांतील आपापसातील मतभेदामुळे भ्रष्ट लोक पत्रकारांना टार्गेट करत आहेत.पत्रकारांनी एकजूठ दाखवली नाही तर पत्रकारितेचे क्षेत्र धोक्यात येणार आहे.तेव्हा सर्व पत्रकारांना आवाहन आहे की,एकत्र या....कोणत्या पत्रकारांवर अन्याय झाला तर आपली ताकद दाखवा अन्यथा आपले भविष्य अवघड आहे....
- बेरक्या उर्फ नारद

पुढारीतून शेठजीची हकालपट्टी

उस्मानाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूस लाखो रूपयास चुना लावून पुढारीच्या दारात गेलेल्या शेठजीची पुढारीतूनही  हकालपट्टी करण्यात आली आहे.जिल्हा प्रतिनिधी म्हणून भिमाशंकर वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहेे.
हा शेठजी स्वतः स्मार्ट मित्रचे काम करतो आणि भावाच्या नावावर पुढारीचे काम करत होता.महाराष्ट्राच्या मानबिंदूस लाखो रूपयाची टोपी घातल्यामुळे या शेठजीची हकालपट्टी करण्यात आली होती.त्या जागेवर विशाल सोनटक्के येताच,या शेठजीने सोनटक्केविरूध्द अनेक खोट्या तक्रारी बाबूजीकडे  केल्या होत्या,परंतु छोट्या बाबूजीनी त्यास भिक घातले नाही.नंतर या शेठजीने स्वतःचे दुुकान चालवण्यासाठी पुढारीचा आसरा घेतला होता.परंतु पद्श्रींनाही या शेठजीच्या करामती समजल्याने पुढारीतूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.
औरंगाबादहून लवकरच पुढारी सुरू होणार आहे.जिल्हा प्रतिनिधी म्हणून भिमाशंकर वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.वाघमारे यांनी यापुर्वी अनेक वर्षे सकाळमध्ये काम केले आहे.योग्य व्यक्तीची पुढारीसाठी निवड झाल्याने अनेकांनी अभिनंदन केले आहे.हा शेठजी आता वाघमारेविरूध्द खोट्या तक्रारी करू शकतो,अशी चर्चा सुरू आहे.
दिवाळीमध्ये पत्रकारांसाठी अनेक कारखान्याकडून आलेली साखर लाटणे तसेच लोकमंगलकडून आलेले तुपाचे डबे लाटणार्‍या शेटजीची स्मार्ट मित्रमध्येही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.तुळजापूरच्या एका आमदाराकडून जाहिरातील लाख रूपये घेवून ती जाहिरातच न छापणार्‍या आणि पैसे लाटणार्‍या शेठजी आणि आमदाराच्या पी.ए.मध्ये मागे चांगलीच हामरीतुमरी झाली होती,त्याची अजूनही चवीने चर्चा सुरू आहे.

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

‘सकाळ समूहा’चा आंतरराष्ट्रीय सन्मान

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ मंगळवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 

‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील यांनी वॅन-इफ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेअरफेल आणि मुख्य कार्यपालन अधिकारी थॉमस जेकब यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला.

‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार तसेच वॅन-इफ्राच्या रिसर्च अँड मटेरियल टेस्टिंग सेंटरचे प्रमुख आनंद श्रीनिवासन समारंभाला उपस्थित होते. सध्या येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पब्लिशिंग एक्‍स्पो २०१६ दरम्यान हा कार्यक्रम झाला. या एक्‍स्पोमध्ये प्रिंट वर्ल्ड २०१६ आणि डिजिटल वर्ल्ड २०१६ अशी दोन सत्रे 
होत आहेत.

या पुरस्कारामुळे जगभरातील उत्कृष्ट छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांच्या समूहात ‘सकाळ’चा समावेश झाला आहे. जगभरातील २६ देशांतील १२८ वृत्तपत्रांचा या स्पर्धेत सहभाग होता. भारतातून ३१ वृत्तपत्रांचा सहभाग होता. प्रादेशिक भाषेत ‘सकाळ’ने हा मानाचा पुरस्कार मिळविला. आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लब २०१६ ते २०१८ या वर्षासाठी एकूण ६४ प्रकाशनांच्या ८५ वृत्तपत्रांनी हे सदस्यत्व पटकावला. 

या वृत्तपत्रांना आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लबचे दोन वर्षांचे सदस्यत्व देण्यात आले. जागतिक पातळीवर गुणवत्तेचे निर्धारण करण्यासाठी वृत्तपत्रांना सल्ला व सेवा देण्यासाठी ‘वॅन इफ्रा’ संस्थेची १९६१ मध्ये स्थापना झाली. छपाईच्या गुणवत्तेचे मानांकन करण्यासाठी १९९४ पासून इफ्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लबद्वारे दर दोन वर्षांनी ही स्पर्धा घेण्यात येते.


इंटरनॅशनल न्यूजपेपर कलर क्वालिटी क्‍लब
‘इंटरनॅशनल न्यूजपेपर कलर क्वॉलिटी क्‍लब’ २०१६ - १८ ही स्पर्धा या आधीच्या स्पर्धांपेक्षा कठीण होती. यात प्रत्येक वृत्तपत्राने जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यांतल्या एका आठवड्यात छापलेले अंक परीक्षणासाठी जमा केले होते. छपाईचा दर्जा कायम राहावा, यासाठी ही स्पर्धा उपयोगी ठरते. या स्पर्धेत मिळालेले यश हे सहभागी प्रकाशन संस्था, वाचक आणि जाहिरातदारांना चांगल्या प्रतीचे वृत्तपत्र देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे निदर्शक मानले जाते.
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) - ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन-इफ्रा पुरस्कार’ देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना ‘सकाळ’चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील. या वेळी (डावीकडून) वॅन-इफ्राचे मुख्य कार्यपालन अधिकारी थॉमस जेकब, वॅन-इफ्राचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेअरफेल, भाऊसाहेब पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने.

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

डोंग्रजकर यांंचीही नकारघंटा !

औरंगाबाद- नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने,अशी मराठीत एक म्हण आहे.त्याचाच प्रत्यय पुढारीला वारंवार येत आहे.सुशिल कुलकणी यांनी  एक दिवस जॉईन होवून नंतर जसा नकार दिला,तसाच कित्ता आता मंगेश देशपांडे - डोंग्रजकर यांनी गिरवला आहेे.डोंग्रजकर यांनीही पुढारी जॉईन करण्यास नकार दिल्याचे समजते.
पुढारीसाठी कार्यकारी संपादक म्हणून सुशिल कुलकर्णी यांची निवड करताच निवासी संंपादक भालचंद्र पिंपळवाडकर यांनी पुढारीला सोडचिठ्ठी देवून पुण्यनगरी जॉईन केले,परंतु सुशिल कुलकर्णी यांनी पुढारी जॉईन न केल्याने सुंदर लटपटे यांंनी पुण्यनगरी सोडून पुढारी जॉईन केले.त्यानंतर निवासी संपादक म्हणून एकमतचे संपादक मंगेश देशपांडे - डोंग्रजकर यांनी निवड झाली,त्यांनी पुढारी कार्यालयात काही दिवसांपुर्वी समुह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांच्या हस्ते पुष्पहारही स्वीकारला,परंतु ते नंतर प्रत्यक्षात जॉईनच झाले नाहीत.शेवटची तारीख 10 ऑक्टोबर होेती,त्या दिवशीही ते जॉईन न झाल्यानेे आता डोंग्रजकर पुढारीत येणार नाहीत,हे स्पष्ट झाले आहेे.
याबाबत बेरक्या सुत्राने मंगेश डोंग्रजकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,मी पुढारीत जॉईनच झालो नव्हतो,फक्त बोलणी झाली होती,मी एकमतमध्ये आर्थिक व्यवहार पहात असल्याने येथील व्यवहार मिटल्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेे.सुशिल कुलकर्णी यांच्याकडे कोणते पद राहील,काय जबाबदारी राहील,हे अमित देशमुख साहेब ठरवतील,तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही....
डोंग्रजकर यांच्या म्हणण्यानुसार ते पुढारीत जॉईन होतील,याची शक्यता फार कमी आहे.डोेंग्रजकर यांनीही सुशिल कुलकर्णी यांचा कित्ता गिरवल्यामुळे पुढारीला मोठा झटका बसला आहे.
पुढारी औरंगाबादेत केव्हा सुरू होणार हे सांगणे अवघड आहे.कारण ग्रामीण भागात अजून टीम नाही.प्रिटींग मशिन अजूनही नीट काम करत नाही,डमी अंक सुरू असला तरी त्यात अनेक अडचणी आहेत.मालक पद्मश्रींना दीपावलीपुर्वी अंक सुरू करण्याची इच्छा आहे,परंतु समुह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांच्या एकछत्री आणि मनमानी कारभारामुळे पुढारीचा वारंवार फियास्को होत आहे.ते स्थानिक कार्यकारी संपादकावर सुत्रे सोपावयाला तयार नाहीत,सर्व कारभार कोेल्हापूरातून हाकत आहेत,मालकाचा पवारावर विश्‍वास आहे,परंतु उंटवरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.
जोेपर्यंत मालक स्थानिक कार्यकारी संपादकास सर्व अधिकार देणार नाहीत,तोपर्यंत पुढारीची गाडी रूळावर येणार नाही,हे मात्र नक्की...
पद्श्रींंना कोणी तरी सांगा रे....त्या सुरेश पवार यांच्यावर नका इतका विश्‍वास ठेवू.....
दोन वेळा तोंडघशी पडले.....एकदा सुशिल कुलकर्णी यांंच्यावेळी आणि आता मंगेश डोंग्रजकर यांच्या वेळी....
नविन माणसे यायला तयार नाहीत आणि जुने टिकायला तयार नाहीत...
पुढारीचा चांगभले !

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

चौथ्या दिवाळीपूर्वीच दिव्य मराठीचे दिवाळे

अकोला : मोठा गाजावाजा करून तीन वर्षांपूर्वी अकोल्यात सुरू झालेल्या दिव्य मराठीचे चौथ्या दिवाळीपूर्वीच दिवाळे निघाले. मागील दोन वर्षांत जिल्हा कार्यालयतील कर्मचारी कपात करूनही गुंतवणूक अाणि मिळकत यातील तूट भरून येत नसल्याने अखेर अकोला अावृत्तीतील पेज डिजाइनर, सर्व उपसंपादक, उपवृत्त संपादक अाणि कार्यकारी संपादकाची औरंगादला बदली करण्यात अाली. अकोल्याचे पूर्वीचे भव्य दिव्य अाॅफिसही एका छोट्या फ्लॅटमध्ये स्थलांतरीत करण्यात अाले.


औरंगाबाद अपडेट -

 सामनाचे दोन तर दिव्य मराठीचे तीन उपसंपादक सकाळमध्ये रुजू. पुण्यनगरीचे काही जण एकमतसाठी सुशील कुलकर्णी यांच्या संपर्कात. जानेवारीत एकमत नव्याने सुरू होण्याची शक्यता. सुंदर लटपटे यांच्या एंट्रीने पुढारीला बळकटी. परंतु संपादकीय विभागाचे कुठलीही ज्ञान नसलेल्या युनिट हेडने मधल्या काळात खोगीरभरती करून घेतल्याने लटपटेंसमोर मोठे अाव्हान. नाही म्हणायला पुढारीला सकाळमधून अालेल्यांची चांगली टिम मिळाली.  पण, त्यापूर्वी हौसे नवसे जाॅईन करून घेतले.

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

मंगेश देशपांडे - डोंग्रजकर पुढारीमध्ये

औरंगाबाद - एकमत टू पुढारी आणि पुढारी टू एकमत अश्या तीन चकरा मारल्यानंतर मंगेश देशपांडे - डोंग्रजकर चौथ्या वेळी पुढारीमध्ये निवासी संपादक म्हणून जॉईन झाले आहेत. पुढारी दीपावलीपूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
पुढारी औरंगाबादमध्ये सुरु होण्यापूर्वीच मोठ्या घडामोडी घडल्या, त्या बेरक्याने प्रसिद्ध केल्या आहेतच, आता कार्यकारी संपादक म्हणून सुंदर लटपटे जॉईन झाल्यानंतर मंगेश देशपांडे - डोंग्रजकर यांची एन्ट्री झाली आहे. मंगेश देशपांडे - डोंग्रजकर काही महिन्यापूर्वी लातुरात एकमतमध्ये संपादक म्हणून जॉईन झाले होते, पण एकमत मध्ये सुशील कुलकर्णी यांचा प्रवेश झाल्याने मंगेश देशपांडे - डोंग्रजकर अस्वस्थ होते, अखेर त्यांनी एकमतला रामराम  ठोकून पुढारीमध्ये जाणे पसंद केले. मंगेश देशपांडे - डोंग्रजकर यांच्या र चौथ्या प्रवेशास बेरक्याच्या शुभेच्छा...

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

सुंदर लटपटे पुढारीच्या कार्यकारी संपादकपदी रूजू...

औरंगाबाद : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लिखाणासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे पुढारीच्या कार्यकारी संपादकपदी रूजू झाले असून, त्यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी पुण्यनगरीला राजीनामा दिला. पुढारी सुरू होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, सध्या डमी अंक काढणे सुरू आहे. बहुधा दिवाळीपूर्वी पुढारी लाँqचग होईल, अशी शक्यता आहे.
 निवासी संपादक भालचंद्र पिंपळवाडकर यांनी सोडल्यानंतर पुढारीला कुणी वालीच उरला नव्हता. सुशील कुलकर्णी यांनी पुढारीच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे हाती घेतली, ती काही तासांचीच. अवघ्या काही तासांनी ते जे सुटीवर गेले ते थेट, एकमतमध्येच ते रूजू झाल्याची माहिती पुढारीवाल्यांना कळली. त्यानंतर अनेक संपादकांशी पुढारीने संपर्क केला. पिंपळवाडकर यांना परत आणण्याचेही प्रयत्न केले. पण यश आले नाही. अखेर काहीच दिवसांपूर्वी सुंदर लटपटे यांना पुढारी करण्यात त्यांना यश आले. त्यांच्यासारखा तगडा संपादक मिळाल्याने अर्थात औरंगाबादच्या वृत्तपत्रांत स्पर्धा वाढणार आहे.
लोकमत, सकाळ, दिव्य मराठी, पुण्यनगरी, गावकरी, महाराष्ट्र ट्राइम्स आणि आता पुढारी पुढारपण मिरवणार आहे. भरीसभर एकमतही सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. इकडची माणसं तिकडची माणसं इकडे जात कर्मचाऱ्यानाही सुगीचे दिवस आले आहेत. सुरू होण्याआधी पुढारीची गळती सुरूच पुढारीतून भालचंद्र पिंपळवाडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर एकूण तिघांनी पुढारी सोडला. त्यातील एक जण पुण्यनगरीत, तर दोघे पुन्हा सकाळमध्ये स्वगृही परतले.

फेसबुक वर शेअर करा

Facebook