> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

बुधवार, २६ एप्रिल, २०१७

तुळशीदास भोईटे यांचा जनशक्तिला जय महाराष्ट्र

मुंबई - तुळशीदास भोईटे यांनी अवघ्या तीन ते चार महिन्यातच दैनिक जनशक्तिला जय महाराष्ट्र केला आहे. भोईटे १ मे पासून जय महाराष्ट्र चॅनलला कार्यकारी संपादक ( आऊटपुट हेड ) म्हणून जॉईन होणार आहेत. "आवारे पाटलांची विकेट, भोईटे व्हेंटिलेटरवर" हे वृत्त बेरक्याने १ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे.
मोजका खप असलेल्या जनशक्तिमध्ये भोईटे फार काळ रमले नाहीत. पुरुषोत्तम आवारे -पाटील यांच्या कामावर मालक कुंदन ढाके समाधानी नव्हते, म्हणून आवारे पाटलांच्या डोक्यावर तुळशीपत्र ठेवण्यात आले होते, पण तेल गेले आणि तूप गेले म्हणण्याची पाळी ढाकेवर आली आहे.
खरं तर तुळशीदास भोईटे यांचा पिंड टीव्ही मीडियाचा.टीव्ही ९, जय महाराष्ट्र, मी मराठी आदी चॅनलमध्ये काम केल्यानंतर मध्यंतरी टीव्ही मीडियात स्पेस नव्हता, म्हणून नाईलाजास्तव भोईटे जनशक्तिसारख्या छोट्या दैनिकात दाखल झाले होते, परंतु तेथेही सीईओबरोबर न जमल्यामुळे त्यांची कोंडी झाली होती, अखेर त्यांनी जनशक्तिला जय महाराष्ट्र करत जय महाराष्ट्र चॅनेल जॉईन करत आहेत. जय महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी बीबीसी मराठी ला गेल्यामुळे ही जागा रिक्त होती. याच जागेवर भोईटे जॉईन होत आहेत.

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

अखेर निखिल वागळे टीव्ही ९ मध्ये

निखिल वागळे  टीव्ही ९ च्या वाटेवर हे वृत्त बेरक्याने २० मार्च रोजी प्रसिद्ध केले होते . हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.   IBN  लोकमत, महाराष्ट्र १ (व्हाया मी मराठी ) करून  निखिल वागळे आता टिव्ही ९ मध्ये सल्लागार संपादक म्हणून  १ मे  पासून जॉईन होत आहेत. वागळे येणार हे कळताच  ढोकळा आणि बेदम यांची पाचावर धारण बसली आहे. ढोकळाची विकेट पडणार, अशी चर्चाही सुरु झाली आहे.

खायचे दात वेगळे आणि...
कोल्हापुरात बोलताना निखिल वागळे " मला पत्रकार म्हणून सांगायला लाज वाटते" असे वक्तव्य केले होते. तेच वागळे आता वसुली चॅनलला जॉईन होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वागळे यापूर्वी चिटफंड चॅनल मी मराठीला पॉइंट ब्लँक या डिबेट शोचे अँकर होते. चिटफंड आणि वसुली चॅनलला काम करणारे वागळे यांची  वैचारिक भूमिका संशयास्पद आहे, अशी टीका होत आहे.

वागळे टीव्ही ९ येत असल्याचा हा घ्या पुरावा ...
बेरक्याची न्यूज म्हणजे १०० टक्के खरी बातमी !!

रविवार, २३ एप्रिल, २०१७

कॉस्ट कटींगची टांगती तलवार !

प्रिंट  मीडियामध्ये सध्या अस्वस्थ करणारे वातावरण आहे. साखळी वर्तमानपत्रांमध्ये आणि अगदी छोट्या वर्तमानपत्रांमध्येही वाढणाऱ्या  खर्चाची आणि कमी होत जाणाऱ्या  उत्पन्नाची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यात साखळी वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटींग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनाने तर यावर कामही सुरू केले असून कमीत कमी मॅन पॉवर आणि जास्तीत जास्त वर्क, या फॉर्म्युल्यावर काम करण्याची तयारी सुरू झाली आहे. 

मुळातच गेल्या पाच-सहा वर्षात कार्पोरेटच्या मोहात अडकलेल्या बड्या वृत्तपत्रांनी आपल्या आवाक्याबाहेरचा खर्च वाढवून ठेवला आहे. व्यवस्थापनात अनेक पदांची नवनिर्मिती आणि त्यांच्या गलेलठ्ठ पगाराचे ओझे आता मालकांच्याही सहनशक्तीपलिकडे पोहोचले आहे. त्यामुळे बिझनेस पाहिजे...बिझनेस पाहिजे म्हणत मालकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. नोटाबंदीनंतर तर आधीच उल्हास आणि त्यात फालगून मास, अशी स्थिती बनली आहे. नोटाबंदीचा सगळ्यात मोठा फटका मीडिया इंडस्ट्रीला बसला आहे. कार्पोरेटच्या ३० ते ४० टक्के जाहिरातींचा व्यवसाय कमी झाला आहे. स्थानिक पातळीवरही व्यावसायिकांनी जाहिरातीसाठी हात आखडता घेतला आहे. या आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी आता केवळ कॉस्ट कटींग करून खर्च नियंत्रणात आणणे, इतकेच काय ते मालकांच्या हाती उरले आहे. याचा फटका अर्थातच कर्मचाऱ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही. 


बदला नाही तर.....

बड्या वर्तमानपत्रांची ही अवस्था तर छोट्या आणि स्थानिक वर्तमानपत्रांची अवस्था याहून बिकट आहे. आठ -आठ दिवस साधी सिंगल कॉलमची जाहिरात वर्तमानपत्रात दिसत नसताना खर्चाचा ताण सहन करणे या सगळ्यांना केवळ कठिण आहे. आता छोट्या वर्तमानपत्रांना तातडीने स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे नाही तर येणाऱ्या  काळातील सुलतानी संकटाचा सामना करणे मुश्कील होणार आहे. इतर उत्पन्नाच्या आधारावर वर्तमानपत्र चालविण्याचा काळ आता संपत आला आहे, हेही या निमित्ताने लक्षात घेणे आवश्यक आहे.

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

महाराष्ट्र १ ला पुन्हा भगदाड


मुंबई - मॅनेजमेंटच्या धोरणाला कंटाळून महाराष्ट्र १ मध्ये पुन्हा एकदा राजीनामा सत्र सुरु झालंय..पगार रेंगाळल्यानं क्राईम एडिटर सुधाकर काश्यपनं जानेवारीत सोडचिठ्ठी दिली. यानंतर चॅनेल मध्ये खऱ्या अर्थानं राजीनामा सत्र सुरु झालं. पाठोपाठ राहुल झोरी, शितोळेनं रिपब्लिकची वाट धरली. धुळप, चंपा गेल्यानं इंटरटेनर सावंतही घरी बसणं पसंत करु लागली. विनायक गेला तसा चॅनेलला भगदाड पडलं. तीन-तीन महिने पगार थांबल्याने कर्मचारी अत्यवस्थ आहेत. चॅनेल प्रोड्यूसर बढे, इनपूट हेड गणेश मोरे, एंकर अजिंक्य, सौरभनेही जय महाराष्ट्र केला. परचुरेही महिनाभरापासून घरीच आहे. श्रद्धा देसाई, कलीमनेही चॅनेलला जय महाराष्ट्र्र केलाय. दर्शनाचे दर्शनही कमी झालय. अचानक मॅनपॉवर कमी झाल्यानं मॅनेजमेंटने ट्रेनी भरायला सुरुवात केली. ट्रेनीसोबत काम करायला नाकी नऊ आल्यानं अनेकजण बाहेर पडू लागली, तर काहीजण सक्तीच्या सुट्टीवर गेले. काही दिवसापूर्वी संपादक हायपर टेंशनने हॉस्पिटलमध्ये होता. त्यामुळे दोन-तीन दिवस सवाल पुण्याच्या पंकज जर्नलिझम स्कूल ने केलं. दोन दिवसाआड अनेकांच्या सुट्ट्या पडू लागल्या. आता फक्त तीन फिमेल एंकर बातम्या वाचत आहेत. कामाच्या ताणामुळे अनेकजण बाहेर शोधमोहिम राबवत आहे. असं कळतंय की सुंबरान कर्ताही वैतागून सोडून गेलाय. येत्या आठवड्यात अनेकजण राजीनामा टाकणार असल्याचं खात्रीलायक वृत्त बेरक्याकडे आहे. मॅनेजमेंटला अनेकजण कंटाळले आहेत. पगार रखडल्याने काही जण मॅनेजमेंटकडे गेले आणि कामबंद आंदोलनाची हाक दिली. यावर मॅनेजमेंटने कामबंद केल्याने पगार मिळणार नाही असे स्पष्ट केलं.
येत्या आठवड्यात राजीनामा सत्राच्या ब्रेंकिंगसहीत पुन्हा भेटू ! तोपर्यंत वाचत राहा बेरक्याच्या बातम्या !!


IBN लोकमतला हवे आहेत, दोन संपादक !

IBN लोकमत मध्ये सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. चॅनलचा TRP प्रचंड घसरत चालल्यामुळे संपाद्क मंदार फणसे आणि कार्यकारी संपादक महेश म्हात्रे या जोडगोळीला प्रशासनाने घरचा रस्ता दाखवला आहे. मंदारची बदली वेब आवृत्तीला करताच त्यांनी राजीनामा दिला आता म्हात्रेंची बदली वेब आवृत्तीला करण्यात आली आहे.
आता प्रशासन चॅनेलसाठी संपादक आणि कार्यकारी संपादक अशी दोन पदे भरणार आहे. चॅनलच्या संपादक पदासाठी राहा एक पाऊल पुढे चॅनलचे  डॉक्टर पुढे -  पुढे करत आहेत.परंतु प्रशासनाने अजून ग्रीन सिग्नल दाखवला नाही. TRP आणि बिझिनेस मिळवून देणारा अजून तरी संपादक IBN लोकमतला मिळाला नाही... पाहू या ....

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

'सूर्यवंशी' प्रकरणी मास्टर माईंड मोकाटच

उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले!
पोलिसांच्या निष्क्रीयतेविषयी उच्च न्यायालयाची नाराजी
 3 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई- आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भावाने अन्य गुंडांच्या मदतीने ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यातील काही आरोपींना अटक केली असली, तरी पोलिसांनी आरोपींवर 307 कलम लावले नाही. तसेच या हल्ल्याचा मुख्य उद्देश व हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारापर्यंत (मास्टरमाइंड ) न पोहोचल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांवर तीव्र ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी उर्वरित आरोपींना अटक करून 3 मे पर्यंत अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
पत्रकार सुधीर सूर्यवंशींवरील हल्ल्याप्रकरणी पोलीस तपास योग्यरित्या न झाल्याने तो तपास नि:पक्षपातीपणे व्हावा, हल्ल्यामागील हेतू स्पष्ट व्हावा व हल्ल्यातील मास्टरमाईंडला अटक व्हावी यासाठी सुधीर सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात 10 एप्रिल रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होताना न्यायालयाने गुन्हे शाखा, खारघर पोलिसांना येत्या 3 मेपर्यंत संपूर्ण तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सत्ताधारी आमदारांच्या दबावामुळे पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाल्याने तपासात दिरंगाई होत होती. त्यामुळे न्यायालयाने संशयित आरोपींना अद्याप अटक का झाली नाही, याचीही विचारणा पोलिसांना केली आहे. 
     सूर्यवंशी हल्लाप्रकरणी पोलिसांनी आकाश कृष्णा पाटील, अशोक जोगनाथ भोईर, विश्‍वास आत्माराम काथारा, अनंता तुकाराम कथारा यांना अटक करून खारघर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 326,34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. 17 एप्रिल रोजी त्यांना जामीनही झाला; मात्र संतोष फताटे यांच्या जबानीतील या हल्ल्यामागचे सूत्रधार भार्गव ठाकूर, प्रशांत बाळाराम ठाकूर, मनोज आंग्रे, माजी नगरसेवक अनिल भगत यांची नावे वगळल्याने सुधीर सूर्यवंशी व संतोष फताटे यांनी उच्च नायालयात धाव घेतल्याचे त्यांचे वकील राहुल आरोटे यांनी सांगितले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलिसांना चांगले फटकारले आणि उर्वरित आरोपींना अटक करून 3 मेपर्यंत अहवाल सादर करा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी संशयाची सूई मास्टर माईंड म्हणून परेश ठाकूरकडे जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
...............

सुधीर सूर्यवंशींवर जीवघेणा हल्ला झाला आहे आणि ते त्यात गंभीर जखमी झाले आहेत. असे असताना पोलिसांनी गांभीर्याने तपास करायला हवा होता. मात्र तो केला नाही; म्हणून न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. 3 मेपर्यंत तापसाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
-    राहुल आरोटे, ज्येष्ठ वकील, उच्च न्यायालय

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

मंदार फणसे यांची अखेर विकेट


मुंबई -  बेरक्याने २७ जानेवारी रोजी दिलेले  वृत्त अखेर खरे ठरले आहे.IBN लोकमतमध्ये  संपादक मंदार फणसे किंवा कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यापैकी एकाची विकेट पडणार असे  वृत्त बेरक्याने दिले होते. अखेर संपादक मंदार फणसे यांची विकेट पडली आहे.
IBN लोकमतचा TRP दिवसेंदिवस घसरत चालला होता. त्याचे खापर संपादक मंदार फणसे यांच्यावर  फोडण्यात आले.प्रशासनाने फणसे याना निष्क्रिय ठरवत  वेबसाईटला बदली करताच फणसे यांनी राजीनामा देणे पसंद केले. दुसरीकडे IBN लोकमतचे संपादकपद रिक्त होताच 'राहा एक पाऊल पुढे'च्या डॉक्टरच्या हालचाली वाढल्या आहेत.
मंदार फणसे यांची विकेट पडणार हे लक्षात आल्यानंतर मंगेश चिवटे यांनी राजीनामा दिला होता. ते गेल्या सात दिवस रजेवर होते, परंतु त्यांना परत घेण्यात आले आहे. तसेच विनोद राऊत यांचा राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा पसरली आहे,परंतु त्यास दुजोरा मिळाला नाही.मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

सानप यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

उस्मानाबाद -सहकारी महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यावर कड़क कारवाई करावी , या मागणीचे निवेदन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले.
शासन नियमानुसार कोणत्याही महिलेस अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय कार्यालयामध्ये सायं. 6.00 च्या नंतर थांबविता येत नाही. श्री. सानप यांना याबाबत पूर्ण ज्ञान असून त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी कार्यालयात बोलावले , अशा विकृत मानसिक वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी, श्री. सानप यांच्यावर तातडीने कायदेशीर कार्यवाही न झाल्यास राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान, 3 दिवस झाले तरी सानप यांच्यावर आनंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शनिवार, १५ एप्रिल, २०१७

प्रिंटला चिंता आॅनलाईनची !

गेली काही महिन्यांपासून मोठमोठ्या साखळी वर्तमानपत्रातून एका वेगळ्या विषयाची चर्चा सुरू आहे. चर्चा आहे आणि त्यासोबत काळजीही आहे. सोशल मीडियाचे वाढते प्रस्त आणि त्याअनुषंगाने प्रिंट मीडियाचे भवितव्य काय, यासंदर्भात ही चर्चा आणि काळजी आहे. आपल्या आजुबाजुला आणि देशभरातच नव्हे तर जगभरातील घटना आणि घडामोडींची माहिती क्षणभरात आपल्या हातातील स्मार्ट फोनवर मिळू लागल्यानंतर आपोआपच वर्तमानपत्रातून (तेही दुसऱ्या  दिवशी सकाळी हाती येणाऱ्या ) बातमी जाणून घेण्याची आणि ती वाचण्याची उत्सुकता कमी होऊ लागली आहे. डिजिटलायझेशन झपाट्याने वाढताना दिसत आहे. यू टूबचा उपयोग करून ग्रामीण भागातूनही न्यूज चॅनल्स सुरू होऊ लागले आहेत. 

प्रिंटचे भवितव्य काय, याची चर्चा बड्या साखळी वर्तमानपत्रांच्या मालकांची झोप उडवू लागली आहे. नोटाबंदीनंतर कार्पोरेट जाहिरातीचा मंदावलेला धंदा मालकांना सतावत आहे. यातूनच कर्मचाऱ्याच्या डोक्यावर मालकांनी कपातीची टांगती तलावर ठेवली आहे. कमीत कमी कर्मचाऱ्याध्ये जास्तीत जास्त काम कसे करुन घेता येईल, याचे ‘मंथन’ सध्या सुरू झाले आहे. साखळी वर्तमानपत्रांचे मालक आता उघडपणे प्रिंटचे भवितव्य सांगता येत नाही, असे म्हणत असतानाच सर्वच साखळी वर्तमानपत्रांनी आधी बातमी आॅनलाईनवर आणि नंतर प्रिंटमध्ये हे धोरण अवलंबिले आहे.

संपादकीय मंडळींना आॅनलाईनला न्यूज देणे कम्पलसरी झाले आहे. त्यामुळे आता डिजिटल न्यूजपेपरचे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहे. साखळी वर्तमानपत्रांनी काळाची पावले ओळखत आॅनलाईनकडे लक्ष केंद्रीत केले असले तर छोट्या वर्तमानपत्रांनी अजूनही याकडे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. त्यांनाही आता काळानुरूप बदल करून घेणे आवश्यक आहे. जपानसारख्या प्रगत देशाने प्रिंट मीडिया गुंडाळायला सुरूवात केली आहे. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष डिजिटल न्यूजपेपरवर केंद्रीत केले आहे. अवघ्या काही महिन्यांमध्ये प्रिंट मीडिया जपानमधून कालबाह्य झालेला असेल.

मराठी वर्तमानपत्राच्या दुनियेतही आॅनलाईनला प्रचंड महत्त्व आलेले आहे. साखळी वर्तमनापत्रांच्या मालकांनी आॅनलाईनसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार केली आहे. 

प्रिंट मीडियाचे भवितव्य २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर असेल की नाही, याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. व्हाटस अ‍ॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ न्यूजच नाही तर फोटो आणि व्हुजवल्सही स्मार्ट फोनमधून समोर येऊ लागल्याने वाचकांना घटना घडल्याबरोबर त्याचा तपशील हाती मिळू लागला आहे.

प्रिंटसाठी आणखी एक धोका आहे तो हा की भविष्यातील वाचक निर्माण होण्याची प्रक्रिया सध्या थांबली आहे. घरात घेणाऱ्या  वर्तमानपत्राची घडी उघडण्याची तसदीही आजची तरूण पिढी घेत नाही. त्यांना काही जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी स्मार्ट फोन म्हणजे अल्लाऊदिनचा जादूचा दिवाच त्याच्या हाती आहे. त्याची भिस्त त्याच्यावर आहे, त्यामुळे अनेक मोठमोठ्या वर्तमानपत्रांच्या खपाचे गेल्या सहा महिन्यातील आकडे पाहिले तर खपाचा आकडा घसरू लागला असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. घसरणाऱ्या  खपाला बक्षीसांचे आमिष तरी किती दिवस दाखवणार आहेत. मोठमोठ्या जाहिरातदारांचा कलही आता गुगलकडे वळू लागला आहे. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची घाई असणाऱ्या  जाहिरात कंपन्या स्वत:चे इव्हेंट करून ग्राहकाशी थेट संवाद साधू लागल्या आहेत. सरकारी जाहिरातीनी आॅनलाईनचा सहारा कधीच घेतलेला असल्याने या जाहिरातींचा ओघही खूप मंदावला आहे. अशावेळी भवितव्याची चिंता प्रिंटच्या मालकांनी केली तर त्यात नवल ते काय?
- बेरक्या उर्फ नारद

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

जिल्हा माहिती अधिकारी सानप यांच्या त्रासाला कंटाळून महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

उस्मानाबाद - उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा sms .महिला माहिती सहाय्य्क आशा बंडगर यांनी गुरुवारी रात्री माहिती संचालनातील वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील पत्रकारांना पाठवला आणि आपल्या राहत्या घरी काही औषधी गोळ्या घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोज सानप हे आपणास मानसिक त्रास देत होते, तसेच रात्री १० पर्यंत ऑफिसमध्ये बसवून काम करून घेत होते, तसेच आपण घटस्फोटित असल्यामुळे वाकड्या नजरेने पहात होते, असा आरोप आशा बंडगर यांनी केला आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजता काम संपल्यानंतर आपण घरी गेले असता सानप यांनी, फोन करून मला न विचारता घरी का गेला म्हणून झापले आणि आताच्या आता ऑफिसमध्ये या म्हणून बोलावले. मी माझ्या मुलीला घेवून ऑफिसमध्ये गेले असता, सानप यांनी पाणउतारा केला तसेच मानसिक त्रास दिला त्यामुळे मी ऑफिसमध्ये बसून होते आणि मानसिक त्रासातून वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकारांना आपण आत्महत्या करीत असल्याचा sms पाठवला. तो sms वाचून सानप यांनी पोलिसांना बोलावले आणि आनंदनगर पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्धच खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे बंडगर यांनी सांगितले.
त्यानंतर रात्री १० नंतर घरी गेले असता, काही औषधी गोळ्या एकदाच घेतल्या त्यामुळे मला काही तास गुंगी आल्याचेही त्यांनी सांगितले..सानप यांच्याविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही बंडगर यांनी सांगितले.

कामानिमित्त बोलावले - सानप
माहिती कार्यालयाचे काम रात्री उशिरापर्यंत चालते, बंडगर याना कामानिमितच ऑफिसमध्ये बोलावले होते, यावेळी अन्य कर्मचारी होते, पण बंडगर यांनी रागाच्या भरात आत्महत्या करत असल्याचा sms पाठवल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे सानप यांनी सांगितले.. आपण त्यांच्याशी कधीही वाईट वागलो नाही किंवा त्या भावनेने बोललो नाही असे सानप यांनी खुलासा केला आहे.

साभार 
Osmanabad live 

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

दैनिक भास्कर समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे निधन

अहमदाबाद/भोपाळ - दैनिक भास्कर वृत्तपत्र समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे बुधवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. रमेशचंद्र अग्रवाल हे दिल्लीहून अहमदाबादला आले होते. विमानतळावर छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनाच्या वृत्तावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, भास्कर समुहाचे चेअरमन श्री रमेश अग्रवाल यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. संवेदनशील आणि तत्काळ निर्णय घेणारे म्हणून ते स्मरणात राहतील. श्री. रमेश अग्रवाल यांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी अशी प्रार्थना मी करतो. श्री रमेश अग्रवालजींचे कुटुंबीय आणि भास्कर समुहाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मध्य प्रदेशने खरंच आज एक अनमोल रत्न गमावला आहे.
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला. रमेश अग्रवालजी यांच्या दुर्दैवी आणि आकस्मिक निधनाने धक्का बसला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ, असे प्रभूंनी ट्वीटमध्ये पोस्ट केले.
- रमेशजींच्या निधनाचे वृत्त कळताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. श्रद्धांजली अर्पण केली.

देशातील 50 शक्तीशाली व्यक्तींमध्ये समावेश
- रमेशचंद्र अग्रवाल यांनी भोपाळ विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी पूर्ण केली होती. पत्रकारितेत त्यांना राजीव गांधी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
- 2003, 2006 आणि 2007 मध्ये इंडिया टुडेने त्यांचा समावेश भारतातील 50 सर्वात शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत केला होता.

1958 पासून केली होती सुरुवात
- रमेश अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातच भास्कर समुहाने यशाचे शिखर गाठले. त्यांनी 1958 मध्ये मध्य प्रदेशात दैनिक भास्करचा पाया ठेवला. आज देशातील 14 राज्यांत या वृत्तपत्राच्या 62 आवृत्ती आहेत.
- रमेशजी यांच्या नेतृत्त्वातच समुहाने हिंदी वृत्तपत्र दैनिक भास्कर, गुजराती वृत्तपत्र दिव्य भास्कर, इंग्रजी वृत्तपत्र डीएनए, मराठी वृत्तपत्र दिव्य मराठी, रेडिओ चॅनल माय एफएम आणि डीबी डिजिटलला मीडिया जगतात अव्वल स्थानी पोहोचवले.

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

एस. एम. बीडच्या पोस्टचे तर उत्तर देणार का ?

मराठी पत्रकार परिषदेचे स्वयंघोषित अध्यक्ष एस. एम. देशमुख मूळ बीडचे.. त्याच्यांच जिल्हयात एस. एम. यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी पत्रकारांत कधी भांडणे लावली, याचा लेख बीडच्या एका पत्रकारांने स्वतःचे नाव न लिहिता बेरक्याकडे पाठवला आहे.. एस.एम. यांचे पाय स्वतःच्या जिल्हयातच खोलात आहेत,
मागील काही पोस्टचे उत्तर एस. एम. यांनी बेरक्याकडे पाठवले नाही. या पोस्टचे उत्तर ते देतील ही  अपेक्षा. त्यांनी उत्तर दिल्यास ते प्रसिद्ध केले जाईल. या पोस्टशी बेरक्याचा काहीही संबंध नाही. बेरक्या म्हणजे  एस. एम. देशमुख आहेत  असा जो  गोड गैरसमज त्यांचे काही मूठभर समर्थक करत होते, त्यामुळे ही  पोस्ट आम्ही प्रसिद्ध करत आहोत. बाकी आमचा काहीही इंटरेस्ट नाही.
बेरक्या कोणत्याही व्यक्ती किंवा मालक यांच्या विरोधात
नाही . कृपया याची नोंद घ्यावी... 
........................................................... 


स्वत:च्याच बीड जिल्ह्यात लाथाडले गेल्याने आता पत्रकारांत फोडा-फोडीचा प्रयत्न

-एस.एम. नव्हे “शेम”sss“शेम”sss देशमुख म्हणाव्या अशाच कुरापती!


महाराष्ट्रात पत्रकारांचे जणू आपणच एकमेव कैवारी किंबहुना उद्धारकर्ते आहोत, अशा थाटात नेतेगिरी करत फिरणाऱ्या एस. एम. देशमुख यांचा खरा चेहरा आता गेल्या काही दिवसात त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर येत असलेल्या लिखाणामुळे सर्वांसमोर उघड होऊ लागला आहे. (त्यांच्याशी संबंध आलेले अनेक जण त्यांचा खरा चेहरा ओळखून आहेत. पण आता हळू-हळू तो सर्वांसमोरही येत आहे.) एकीकडे पत्रकारांच्या भल्याच्या, एकजुटीच्या गप्पा मारायच्या अन् दुसरीकडे पत्रकारांत भांडणे लावण्याचा, फोडाफोडीचा प्रयत्न करायचा! हा या “शेम” देशमुख यांचा खरा धंदा!

मराठवाड्यातील बीड जिल्हा पत्रकार संघ हा तसा एक चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या संघटनापैकी कायदेशीरपणे नोंदणीकृत असा संघ! गेल्या अनेक वर्षांपासून हा संघ कार्यरत आहे. या संघाकडून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारास स.मा. गर्गे पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. आतापर्यंत भारतकुमार राउत, मधुकर भावे, द्वारकानाथ संझगिरी, सुधीर गाडगीळ, निखील वागळे,  राजीव खांडेकर अशा अनेक ज्येष्ठ पत्रकारांना या बीड पत्रकार संघाने सन्मानित केले आहे. यावर्षी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खा. शरद पवार, पालकमंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह इतर मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा देखणा सोहळा पार पडला.

आता नेमक्या याच कार्यक्रमामुळे पत्रकारांचे (?) “नेते” एस.एम. देशमुख यांच्या पोटात दुखू लागले आहे. झाले असे की, बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात एस. एम. देशमुख यांना दूर ठेवणेच पसंद केले. हा संघ देशमुख यांच्याशी संबंध ठेऊन होता, पण देशमुख यांचा या संघातील पदाधिकाऱ्यांमध्ये फुट पाडून हा संघ आपल्या वर्चस्वाखाली घेण्याचा सुप्त हेतू लक्षात येताच या संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मग देशमुख यांना आपल्या कार्यक्रमापासून दूर ठेवणेच उचित मानले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आपले कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने आहेत, हे दाखवून शासनाची विविध पदे मिळवण्यासाठी हे देशमुख महाशय असे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे करीत आहेत.

पण, आपल्याच जिल्ह्यात झालेल्या या कार्यक्रमात आपल्याला अशाप्रकारे लाथाडण्यात आल्याने देशमुख यांचा जास्तच जळफळाट झाला; आपल्याच जिल्ह्यात झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात, इतक्या मोठ-मोठ्या नेत्यांसमोर नेता म्हणून मिरवता आले नाही याची सल त्यांना बोचू लागली. आणि त्यामुळेच त्यांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांत भांडणे लावण्यासाठी फोडाफोडी सुरु केली आहे. नोंदणीकृत असणारा बीड जिल्हा पत्रकार संघ कार्यरत असताना या देशमुख यांनी काही जणांना ‘उचकवून’ आता जिल्ह्यात दुसरा एक पत्रकार संघ स्थापन केला आहे. इतके दिवस जुना संघच आपला संघ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशमुख यांना लाथाडले जाताच आता दुसरा संघ स्थापन करावा वाटला आहे.

एकीकडे पत्रकार एकजुटीच्या गप्पा मारत राज्यातील पत्रकारांना भूलवत विविध पदं लाटत राहायची अन् दुसरीकडे स्वत:च्याच जिल्ह्यात एक नोंदणीकृत असा जिल्हा पत्रकार संघ कायदेशीरपणे कार्यरत असताना दुसरा संघ स्थापन करून पत्रकारांत भांडणे लावण्याचा प्रयत्न करण्याची ही वृत्ती अत्यंत किळसवाणी अशीच आहे. असेच प्रकार देशमुख हे अनेक ठिकाणी करीत असतात. प्रत्येक जिल्ह्यात आपले पत्रकार कार्यकर्ते आहेत, आपणच पत्रकारांचे नेते आहोत, असे दाखवून; शासनाची, संघटनेची विविध पदे उपभोगण्यासाठी देशमुख यांच्यासारख्या पत्रकाराकडून (?) सुरु असलेले हे प्रकार म्हणजे “शेम” देशमुख म्हणावे असेच आहेत. एक गेले तर दुसरे असावे अन् दुसरे गेले तर तिसरे असावे म्हणून एकाच वेळी विविध संघटनांची विविध पदं देशमुख यांनी आपल्या बुडाखाली ठेवलेली आहेत. विविध पत्रकार संघटनांचा राज्य पातळीवरही त्यांनी “शेम”sss“शेम”sss म्हणावा असाच धंदा बनवून टाकला आहे. आपल्याशिवाय इतर कुणाला कामच करता येऊ नये किंवा करूच दिले जाऊ नये असा देशमुख यांचा दुष्ट हेतू यातून स्पष्ट होतो. या देशमुखांनी आता अगदी हास्यास्पदरित्या पारदर्शकतेच्याही गप्पा सुरु केल्या आहेत. पण सतत मराठी पत्रकार परिषदेची आणि इतरही संघटनांची महत्वाची पदं लाटत आलेले देशमुख, कित्येक वर्षात शासनाकडून तसेच राज्यातील विविध पत्रकार संघ यांच्याकडून गेल्या किती- किती रकमा उकळल्या आणि त्याचे काय- काय केले? हे मात्र उघडपणे सांगायचे टाळतात.

त्यांच्याच जिल्ह्यात ते करीत असलेल्या फोडाफोडीच्या कुरापतीचे धंदे सर्व पत्रकारांना कळावेत म्हणून हा पत्र प्रपंच!

-एक सामान्य पत्रकार, बीड.

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

जेव्हा महिला अँकरनेच वाचली पतीच्या मृत्यूची बातमी...

नवी दिल्ली : पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या भावनांना मुरड घालावी लागते. अनेकवेळा तर पत्रकारांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागलो. छत्तीसगडमध्ये आज अशीच एक घटना समोर घडली, जिथे पत्रकारांना त्यांच्या भावनांवर किती प्रमाणात नियंत्रण ठेवावं लागतं, हे दिसून आलं.
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आज एका वृत्त वाहिनीच्या महिला अँकरला तिच्या पतीच्याच मृत्यूची बातमी वाचावी लागली. रायपूरहून प्रक्षेपित होणाऱ्या आयबीसी 24 न्यूज चॅनेलची अँकर सुप्रीत कौरला आपल्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी वाचावी लागली.
छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात आज एक रस्ता अपघात झाला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले होते. याची बातमी जेव्हा न्यूज चॅनेलकडे आली, तेव्हा सुप्रीत बातम्या वाचत होती. या घटनेत मृत्यू झालेल्या तीन मृतांमध्ये तिच्या पतीचाही समावेश असल्याची माहिती कुणालाही नव्हती.
पण सुप्रीत बातमी वाचत असतानाच जेव्हा या घटनेचा व्हिडीओ प्रक्षेपित झाला. तेव्हा तिला तिच्या पतीची डस्टर गाडी व्हिडीओत दिसली. यावेळी तिला या घटनेत तिच्या पतीचाही मृत्यू झाला असावा, अशी जाणीव झाली. तिने यानंतर कुटुंबियांना संपर्क साधला, यानंतर तिला मृतांमध्ये तिच्या पतीचाही समावेश असल्याचं समजलं.
यानंतर सुप्रीतला चॅनेल व्यवस्थापनाने तिच्या घरी पाठवलं.

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

याला चमकोगिरी नाही तर काय म्हणायचे ?

एस. एम. देशमुख यांच्या पदलोलूपतेबद्दल लिहितांना त्यांच्या चमकोगिरीच्या सवयीबद्दलही आम्ही लिहिले होते. याच चमकोगिरीचा प्रत्यय एस. एम. देशमुख यांनी शुक्रवारी पुन्हा दिला. या एस. एम. देशमुख यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत आपण आता सलग तीन दिवस मुंबईतच राहणार असून कायदा मंजूर करून घेण्यासाठी सर्वांच्या भेटी-गाठी घेणार असल्याचे लिहिले. आता, खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपण याच अधिवेशनात कायदा संमत करून घेणार असे अगदी जाहीरपणे सांगितलेले असल्याने कायदा होणार हे निश्चित मानले जात होते. तरीही जणू काही हेच सभागृहात ठराव मांडणार आहेत, अशा थाटात चमकोगिरीची संधी साधली.

इतकंच नव्हे तर, शुक्रवारी पत्रकार संरक्षण कायदा दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर या चमकोगिर महाशयांनी विविध राजकीय पक्षांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना बुके देत आभाराचा कार्यक्रम सुरु केला. लबाडीने “मराठी पत्रकार परिषदे”च्या विश्वस्तपदावर आणि मग अध्यक्षपदावर स्वत:च स्वत:ची नियुक्ती करून घेणारे हे दोघेच यात दिवसभर पुढे- पुढे करताना दिसले. अगोदर विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेतल्या; मोठी धडपड करूनही सायंकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची काही भेट होत नाही हे पाहून या महाशयांनी मंत्रालयातील काही पत्रकारांना गळ घालत मुख्यमंत्र्यांना मंत्रालयातील पत्रकार परिषदेत गाठले. आणि मग त्यांचे राज्यभरातील (?) पत्रकारांच्यावतीने बुके देऊन आभार मानण्याची आपली हौस भागवून घेतली. पत्रकार परिषदेत आभार मानले म्हणजे तिथे असणाऱ्या कॅमेऱ्यात आपण टिपले जाऊ आणि चमकू हा हेतू! पण त्यांना तिथे कुणीही भाव दिला नाही. त्याचठिकाणाहून मग आभार मानतानाचे फोटो धडा-धड सोशल मीडियावर टाकत यांचा चमकोगिरीचा धंदा सुरु झाला. आभार किती जणांनी मानले तर हे एस. एम. देशमुख आणि ‘हो’ ला ‘हो’ करणारे त्यांचे पिल्लू किरण नाईक, बस्स! दोघांनी बुके दिला आणि राज्यभरातील (?) पत्रकारांच्यावतीने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार! यांच्याबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या भानगडींवरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठीचा केलेला हा चमकोगिरी खटाटोप नाही का? 

आता मूळ प्रश्न असा आहे, ज्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीमुळे हा कायदा झाला, त्या समितीत पत्रकरांच्या एकूण १६ संघटना आहेत. इतर संघटनेचे मुंबईत असणारे पत्रकारही कायद्यासाठी सतत कितीतरी पाठपुरावा करीत असत. मग, आता मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना या १६ संघटनेतील काही संघटनांच्या तरी पत्रकारांना सोबत घेऊन एकत्रितपणे आभाराची औपचारिकता पार पडणे योग्य ठरले असते. पण, यांना चमकोगिरीची इतकी घाई, की उठले आणि पळायला लागले दोघेच फोटो काढत! कायदा मंजूर व्हावा यासाठी चमकोगिरी न करता प्रयत्न केलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतील इतर संघटनांशी केलेला हा कृतघ्नपणा नाही का? हा चमकोगिरीचा प्रकार नाही का?

श्रेय लाटण्यासाठी एस. एम. देशमुख यांनी इतकी वर्षे जे केले तेच अजूनही सुरु आहे. सतत प्रयत्न करणाऱ्या इतर पत्रकारांना बाजूला सारून स्वत:च राजकीय नेत्यांच्या पुढे- पुढे करीत चमकोगिरीचा केलेला हा प्रकार म्हणजे यांना ‘एस. एम”. नव्हे ‘शेम’ देशमुख म्हणावे असाच आहे.

तूर्त इतकेच...

-एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)


.....
ताजा कलम  

वरील पत्राशी बेरक्याचा काही एक संबंध नाही... 
जर  एस. एम. देशमुख यांनी या पत्राला उत्तर दिल्यास ते प्रसिद्ध केले जाईल... 
त्यांच्या उत्तराची अपेक्षा ... 
- बेरक्या उर्फ नारद

पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड

मुंबई : पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत विना चर्चेविना मंजूर करण्यात आले. यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार, हल्लेखोरास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि ५०,००० हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही अशा कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलीय.   

- विधेयकातील तरतुदीनुसार, पत्रकारावर कार्य बजावत असताना त्यावर हल्ला केल्यास हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा ५० हजार रुपये दंड अथवा दोन्ही होऊ शकतं 

- पत्रकारांना कार्य बजावण्यासाठी लागणाऱ्या मालमत्तेचं नुकसान केल्यास त्यांना नुकसान केलेल्या मालमातेच्या किंमतीच्या दुप्पट रक्कम द्यावी लागेल. 

- दुसऱ्या बाजूला कुठल्याही पत्रकारानं खोटी तक्रार केल्यास आणि हे सिद्ध झाल्यास त्या पत्रकारालाही तीन वर्षांपर्यंत कारावास आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही होऊ शकतो.

- पत्रकारावरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असेल.

- जखमी पत्रकाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च हा हल्ला करणाऱ्याला करावा लागेल.


फडणवीस सरकारचे मनःपूर्वक आभार..
पत्रकार संरक्षण कायदा हा कोणत्याही एका संघटनेमुळे किंवा एका व्यक्तीमुळे झालेला नाही. राज्यात १२ पेक्षा जास्त संघटना आहेत... प्रत्येक संघटनेनी ही  मागणी उचलून धरली होती... कोणी माझ्यामुळेच हा कायदा  पास झाला असे म्हणत  असेल तर त्यापेक्षा कोणी मूर्ख नाही... काहींना माझीच .... म्हणण्याची सवय असते...
खरं तर आपण फडणवीस सरकारचे आभार मानायला हवे... पहिला मुख्यमंत्री असा आहे, ज्यांनी हा कायदा पास होण्यासाठी पुढाकार घेतला ... तसेच त्यांनी पत्रकार पुरस्कार स्पर्धा नियमितपणे घेतल्या, अधिस्वीकृती समिती गठीत केली ..पत्रकाराचे अनेक प्रश्न तडीस नेले... फडणवीस सरकारचे मनःपूर्वक आभार..

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

पत्रकार संरक्षण कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई - पत्रकार संरक्षण कायद्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली  आहे. या कायद्याचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाईल , दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राज्यपालाच्या सहीसाठी जाईल आणि मग अंमलबजावणी होईल,
हा कायदा व्ह्यवा यासाठी बेरक्याने अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते, हे श्रेय राज्यातील सर्व पत्रकाराचे आहे, कोणत्याही एका संघटनेचे किंवा व्यक्तीचे नाही... खरं तर फडणवीस सरकारचे आभार मानायला हवेत. त्यांनी किमान  राज्य मंत्रिमंडळात मंजुरी दिली. तसेच त्यांनी पत्रकार पुरस्कार स्पर्धा नियमितपणे घेतल्या, अधिस्वीकृती समिती गठीत केली ..पत्रकाराचे अनेक प्रश्न तडीस नेले... फडणवीस सरकारचे मनःपूर्वक आभार..

चांगली बातमी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 6 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकार हल्लाविरोधी विधेयकाच्या मसुद्याला मंजूरी देण्यात आली. 

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाने या विधेयकासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याकडे झालेल्या बैठकांमध्ये हा विषय मांडला. तसेच योग्य आणि प्रामाणिक पत्रकारला या कायद्याचा लाभ मिळेल आणि बोगस पत्रकारांना या कायद्याचा गैरफायदा घेता येऊ नये अशा सुधारणा विधेयकाच्या प्रारूपात सुचविल्या होत्या.हे विधेयक उद्या दि. 7 एप्रिल रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले जाईल व सर्वपक्षीय सदस्यांकडून हे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे.मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचे मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ जाहिर आभार मानत आहे.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ

............


लढ्याला यश

गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासंदर्भात टी.व्ही. जर्नलिस्ट असोसिएशन सरकार दरबारी पाठपुरावा करत होती . मागच्या सरकारच्या काळात आणि या सरकारच्या काळात ही संघटना टीव्हीजेए पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची आंदोलन, आणि इतर मार्गाने मागणी करत  होती. त्याबरोबर राज्यातील पत्रकारांच्या सर्व संघटना हा कायदा व्हावा यासाठी आंदोलन, मोर्चे, धरणे करत होते.  टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनही त्यात अग्रक्रमाने सहभागी होती. कायदा व्हावा यासाठी सर्वच प्रयत्नशिल होते. अखेर त्याला यश आलं आहे.
कायद्याचा वापर योग्य प्रकारे व्हावा त्याचा गैरउपयोग होउ नये अशी जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. आम्हाला माहिती आहे आपण ती योग्य प्रकारे पार पाडू. या संदर्भातले बिल उद्याच अधिवेशनात येण्याची माहिती आहेत.आपल्या सर्वाच्या वतीने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे अभिनंदन. त्यांचे आभारही. कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ निर्भीडपणे काम करण्यात या कायद्याचा उपयोग होणार आहे.

- टी.व्ही. जर्नलिस्ट असोसिएशन

.....

पत्रकारांना निर्भीडपणे बातमी देण्यासाठी तसेच त्यांच्यावर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी त्यांना संरक्षण देणारा कायदा व्हावा याकरिता २००५ साली मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात माजी गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी आश्वासन दिले होते. 
  पत्रकारांना   संरक्षण नसल्यामुळे  हल्ल्याचे प्रमाण दिवसेन दिवस  वाढल्यामुळे मराठी पत्रकार परिषदेने २००५ पासून कायदा लागू करावा ही मागणी लावून धरली. व त्यानंतर २०१० मध्ये राज्यातील १६ पत्रकार संघटना एकत्र येऊन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन केली.
या समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख  यांची निमंत्रक पदावर तर समन्वयक म्हणून किरण नाईक यांची निवड झाल्यानंतर  समितीच्या माध्यमातून पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी राज्यातील पत्रकारांच्या पाठिंब्यामुळे मागणीचा  आंदोलनाच्या व इतर सनदशीर मार्गाने पाठपुरावा केला.अखेर राज्य शासनाने आज पत्रकारांना संरक्षण देणाऱ्या कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.
आता कायद्याचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाईल. १२वर्षे मागणी लावून धरल्यामुळे आज यश मिळाले.
हे यश राज्यातील पत्रकारांचे आहे.

- पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषद 

,,,,,,,,,,,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 6 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकार हल्लाविरोधी विधेयकाच्या मसुद्याला मंजूरी देण्यात आली. 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने या विधेयकासंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याकडे झालेल्या बैठकांमध्ये तसेच विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांचे उपस्थितीत पत्रकार संघाच्या शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात ठराव घेऊन हा विषय मांडला. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने मुंबई येथील आझाद मैदानावर देखील आंदोलन केले होते. या पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळणार आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे पत्रकार संघाचा हा लढा सुरु होता. या लढ्यात राज्यातील सर्व पत्रकार व पदाधिकार्‍यांनी एकत्रित येऊन हा कायदा पारीत करण्यासाठी प्रयत्न केले.
हे विधेयक उद्या दि. 7 एप्रिल रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले जाईल व सर्वपक्षीय सदस्यांकडून हे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे.
-  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

एस. एम.आणि तीन पोस्ट

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांच्यावर टीका टिप्पणी करणारी पोस्ट सध्या पत्रकारांच्या व्हाट्स अँप ग्रुपवर मोठ्या चवीने चर्चिली जात आहे, त्याला एस. एम देशमुख यांनी उत्तर दिले आहे तसेच या पोस्टमध्ये ज्यांचे नाव आले ते उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांनीही  वस्तुस्थिती मांडली आहे... या तिन्ही पोस्ट आम्ही जश्याच्या तश्या प्रकाशित करत आहोत... वाचकांनी काय तो अर्थबोध घ्यावा ...
....................

श्रेय आणि प्रसिद्धीसाठी धडपड...

-एस. एम. देशमुखांची पुन्हा चमकोगिरी !

पत्रकार संरक्षण कायद्य़ाचा मसुदा तयार करण्यात आला आहे; सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. झी २४ तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांना देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. आता या घोषणेनंतर लगेच, या संभाव्य कायदा होण्याचे श्रेय घेण्यासाठी पत्रकारांच्या(?) नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे दिसून येत आहे. सतत प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख यांची श्रेय घेण्यासाठीची धडपड तर अगदी केविलवाणी आहे.

आता याच अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार असल्याने पत्रकारांचे नेते म्हणून लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी काही तरी करणे आवश्यक होते. त्यामुळे मग या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख यांनी पुन्हा आंदोलनाची स्टंटबाजी सुरु केली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे हे विधेयक मांडणार असे जाहीर केल्यानंतर मध्येच उठून आंदोलनाची गरज नव्हती. पण, केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हा कायदा झाला हे छोट्या- छोट्या पत्रकारांच्या गळी उतरवण्यासाठी आणि त्या माध्यमातून मग पुढील नेतेगिरी करण्यासाठी मार्ग प्रशस्त करण्यासाठी एस. एम. देशमुख कामाला लागले आहेत. खारघर येथे “पत्रकारांची निदर्शने” आयोजित करण्यात आली आहेत. डॉ. उदय निरगुडकर, सुधीर सूर्यवंशी, विनोद यादव यासारख्या प्रसिद्ध पत्रकारांवरील हल्ला आणि धमकीच्या निषेधार्थ ही निदर्शने असल्याने याला चांगली प्रसिद्धी मिळणार हे स्पष्ट आहे. हाच लाभ मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली आहे.

इतकेच नव्हे! यानंतर, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही दिवसातच पत्रकारांच्या ह्ल्ल्याबाबतचे विधेयक मांडले जाईल आणि ते बहुधा मंजूरही होईल. स्वाभाविकपणे त्यावेळी विविध वृत्तवाहिन्यांवर याबाबत चर्चासत्र होणार! त्यावेळी मग, इतक्यात आंदोलन केलेले हे नेते एस. एम. देशमुखच वृत्तवाहिन्यांच्या नजरेत राहणार! आणि मग यांना चमकोगिरी करता येणार, हा यांचा खरा डाव! टी. व्ही. वर पत्रकारांचे नेते म्हणून सतत झळकत राहिले की, राज्यातील अनेक पत्रकार हाच आपला नेता म्हणून अशा कथित नेत्यांना भाव देऊ लागतात. पत्रकारिता न करताही पत्रकारांचे नेते म्हणून मिरवणाऱ्या एस. एम. देशमुख सारख्यांना हा असाच डाव साधून आपली नेतागिरीची दुकानदारी चालवायची असते. काही दिवसांपूर्वीच झी २४ तासच्या नवी मुंबई प्रतिनिधी स्वाती नाईक, उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर अत्यंत जीवघेण्या पद्धतीने हल्ला झाला. त्यावेळी हे नेते एस. एम. देशमुख यांना निदर्शने, मोर्चा असे आंदोलन करावेसे वाटले नाही. त्यावेळी त्यांना आपले हितसंबंध जपण्यातच स्वारस्य होते. त्यापुर्वीही अनेकवेळा असेच घडले आहे. प्रसिद्धी मिळू शकते असे वाटेल तिथे सोयीनुसार आंदोलन करण्याचा यांचा धंदा किळस आणणारा आहे.

मुळात पत्रकारिता न करताच पत्रकारांचे नेते म्हणून मिरवणाऱ्या या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुखांना मुंबईत कुणी कुत्रंही भिक घालत नव्हते. मुंबईतील पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, अनिकेत जोशी, प्रसाद काथे, देवदास मटाले, प्रसाद मोकाशी, विनोद जगदाळे, सुभाष शिर्के यासारख्या अनेक पत्रकारांना वेळो- वेळी सोयीनुसार वापरून या देशमुखांनी मुंबईत आपली नेतेगिरीची दुकान थाटली आहे. बरे, यातील काही जण केवळ संघटनेत मोठे होऊ लागले आहेत किंवा त्यांचे महत्व वाढू लागले आहे म्हणून हे देशमुख महाशय त्यांच्यावरच उलटल्याची उदाहरणेही ताजी आहेत. या पत्रकारांच्या अनंत उपकारांचाही विसर या देशमुख महाशयांना पडला आहे. प्रत्यक्ष पत्रकारिता करीत असल्याने मुंबईतील वरील पत्रकारांना तसेच राज्यातील इतरही पत्रकारांना श्रेयाची लढाई करण्यात वेळ आणि इच्छाही नव्हती. त्यामुळेच या देशमुखांना नेते म्हणून मिरवण्यासाठी मोकळीक मिळवण्याचा डाव साधता आला. ते अनेक वर्षे डल्ला मारून असलेले “पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्षपद”, काही चेल्या-चपाट्यांना हाताशी धरून नियमबाह्यपणे स्वत:च नियुक्ती करून घेतलेले “मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्तपद”, चंद्रशेखर बेहेरे सारख्या ज्येष्ठ पत्रकारास पदावरून अक्षरशः लबाडीने हाकलून “मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष” म्हणून करून घेतलेली नियुक्ती, मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वर्षानुवर्षांपासून मिळणारे “महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्यपद” अशा इतरही अनेक पदांवर डल्ला मारून बसण्यासाठी या सूर्यकांत माणिकराव देशमुखांचा सतत आटापिटा सुरु असतो. ‘पत्रकारांच्या हितासाठी लढणारा नेता’ अशा गोंडस प्रतिमेचा डांगोरा आपल्या चेल्या-चपाट्यांमार्फत पिटत हे सर्व सुरु आहे. तसं अनेक वृत्तवाहिन्या, प्रमुख वर्तमानपत्रांनी या देशमुखांची पदलोलूपता, उपद्रवीपणा ओळखून त्यांना दूर ठेवले असले तरी इतर खरेखुरे, प्रतिष्ठित, चांगले पत्रकार नेमक्या कुठल्या भीतीने याकडे दुर्लक्ष करतात हे कळत नाही.

इतरांचा मोठेपणाच न पाहवणारे हे देशमुख स्वत:कडची अशीच अनेक पदं टिकवण्यासाठी आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी अनेकवेळा ज्येष्ठ पत्रकारांवर अत्यंत हीन पातळीवर जाऊन टीका करीत असतात. कुमार केतकर, दिनकर रायकर, निखिल वागळे, कुमार कदम, यदु जोशी, देवदास मटाले, चंद्रशेखर बेहेरे यासारख्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह इतरही अनेक पत्रकारांवर हे महाशय गरळ ओकत असतात.

बरे, यांच्या कथित अखिल भारतीय पत्रकारांच्या संघटनेत यांच्याशिवाय इतर कुणालाही चर्चेसाठी कधीच पुढे येऊ दिले जात नाही. सर्वाना गुळाचा गणपती बनवून ठेवण्यात आलेले दिसते. पत्रकारांची अशी कशी ही संघटना जिथे इतर कुणालाच बोलता येत नसावे! असो, एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी काहीच केले नाही असे आमचे म्हणणे नाही; पण त्यांनी जे काही थोडेफार केले त्यामागचा हेतू प्रामाणिक अजिबातच नव्हता. मुंबईतील वरील नावे सांगितलेले पत्रकार आणि इतरही अनेक पत्रकार आपल्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, पण ते कधीच अशी चमकोगिरी करीत नाही, हे एस. एम. देशमुख आणि त्यांची चमचेगिरी करणाऱ्या मंडळींनी समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पत्रकारांसाठी होणारा संभाव्य कायदा यांच्यासारख्या उपद्रवींमुळे पुन्हा थंड्या बस्त्यात जाईल. तेव्हा, एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख सुधरा! अन्यथा तुमच्या अवती- भोवतीचे पत्रकारच (खरोखर पत्रकारिता करणारे) तुम्हाला वठणीवर आणतील...

तूर्त इतकेच!

-एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)...... 


एस. एम देशमुख यांचे उत्तर 


निनावी हितसंबंधियांची पोटदुखी
आणि 'मी एस.एम'.

उद्याचं आंदोलन होऊ नये म्हणून धनिकांची सुपारी घेतलेल्या मंडळीनी सुरू केलीय माझी बदनामी मोहिम
मी वाट पहात होतो,माझ्या बदनामीची एकही पोस्ट अजून कशी पडली नाही? मी परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा एका पत्रकाराला महाराष्ट्रात फिरवून देशमुख यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत याचा शोध घेतला गेला होता,नंतर ठाण्यात दिनू रणदिवे यांना यांचा सत्कार आणि 92 हजाराची थैली अर्पण केली तेव्हा मा . उध्दव ठाकरे यांनी या कार्यक्रमास येऊ नये म्हणून काही मठ्ठांनी जंगजंग पझाडले होते एवढेच कश्याला परवाचं पत्रकार प्रशिक्षण शिबिर होऊ नये यासाठीही काही पाताळयंत्री मंडळी प्रयत्न करीत होती.त्यामुळं दहा वर्षापासून जो लढा मी लढतो आहे त्याला आता यश येत असताना पत्रकारितेतील बदनाम आणि नतद्रष्ट मंडळी अजून गप्प कशी ? याचा मला प्रश्‍न पडला होता.मात्र माझ्या अपेक्षेप्रमाणे आत्ताच एक पोस्ट माझ्या पर्यंत आली आहे.मी किती प्रसिध्दीलोलूप आहे.मी पदांसाठी कशी धडपड करतो वगैरे आरोप या पोस्टमध्ये केलेले आहेत.या पोस्टला मी उत्तर देणार नाही कारण ही पोस्ट निनावी आहे.ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनी समोर येऊन चार हात करावेत एस.एम.देशमुख त्यासाठी तयार आहे.अशी लपून गोळ्या झाडणारे टोळके कोण आहे हे मी जाणतो.उध्याचं आदोलनास अपशकुन करण्यासाठी ही योजना आहे.ती कोणासाठी केली गेली आहे हे ही मला माहिती आहे.काही धनदांडग्यांच्या पेरोलवर असलेली मंडळी आडून गोळ्या मारत आहेत.त्यांनी कितीही बोंबा माराव्यात जोपर्यंत महाराष्ठातील पत्रकारांचा माझ्यावर विश्‍वास आहे तोपर्यंत या बदमाश्यांच्या भाषेतली चमकोगिरी मी करीत राहणार आहे.
द्या होणारं आंदोलन पहिलं नाही.ज्यांना ते माहिती नाही त्यांनी आजच माझ्या वेबसाईटवर टाकलेला घटनाक्रम जरूर पहावा.सुनील ढेपे यांच्यावेळेस मी काय प्रयत्न केले ते डॉ.अनिल फळे सांगू शकतील.शिवाय महाराष्ट्रात 2 ऑक्टोबर रोजी जे आंदोलन झालं होतं ते खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांना आयुष्यातून उठविणार्‍यांच्या विरोधातलं होतं.हे ज्यांना माहिती नाही त्याला मी काय करू ? मी त्यावर बोलण्याचं काऱण नाही.गेल्या वर्षभऱात 19 पत्रकारांना जवळपास 25 लाखांची मदत मिळवून दिलेली आहे ही रक्कम मी माझ्या खिश्यातून दिलेली नसली तरी त्यासाठी आम्ही सर्वानी प्रयत्न केलेले आहेत.जे काहीच करीत नाहीत,नुसत्याच खुर्च्या उबवत बसलेत ते जे काम करतात त्यांच्याकडं बोटं दाखवित असतात.माझ्यावर अशा बेताल बडबडीचा काहीच परिणाम होणार नाही.उद्याचं आंंदोलन होऊ नये म्हणून ज्यांनी सुपारी घेतली त्यानी ती घ्यावी पण उध्याचं आंदोलन हे होणार आहे तेव्हा काळजी नसावी.
माझ्याबद्दल या लोकांची काय पोटदुखी आहे हे महाराष्ट्रातील पत्रकारांना कळावे आणि त्यांनीच यावर आपली भूमिका ठरवावी यासाठी मला आलेली निनावी पोस्ट मी शब्दाचाही फेरफार न करता येथे टाकत आहेत.या पोस्टमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यातील काही तडीपाड मंडळी आहे,काहींनी नाशिकची पत्रप्रबोधिनीची वाट लावलेली आहे त्यांच्याबद्दल बोलून मी माझा वेळ वाया घालविणार नाही,राज्यातील पत्रकारांनीच त्यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हे ठरवावे.
माझ्याकडे आलेली निनावी पोस्ट वाचण्यासाठी कृपाय खालील लिंकवर जावे.ही पोस्ट जास्तीत जास्त पत्रकारांनी वाचावी,आणि निर्णय घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे.कायद्याच्या लढयाचं श्रेय मला मिळू नये यासाठीची हाी धडपड असली तरी या मित्रांच्या माहितीसाठी सांगतो,मित्रांनो श्रेय तुम्ही घ्या पण कायद्याला आडवा पाय घालू नका.
- एस. एम. देशमुख

त्यानंतर सुनील ढेपे यांनी त्यांच्या फेसबुक आणि वेबसाईटवर वस्तुस्थिती मांडली आहे... 

माझ्यावरील हल्ला,एस.एम आणि वस्तुस्थिती !

goo.gl/sBDtB2
आपण या वेबसाईटवरही हा लेख वाचू शकता...
https://www.dhepesunil.com
www.dhepe.in
तसेच फेसबुकवरही वाचू शकता..
https://www.facebook.com/sunil.dhepe


..................
थेट उत्तरं देण्याऐवजी एस. एम. देशमुखांचा ढोंगीपणा !

एस. एम. (सुर्यकांत माणिकराव) देशमुख यांच्या प्रसिद्धीलोलुप आणि पदलोलूपपणाबद्दल आम्ही जे लिहिले होते, त्याला या एस. एम. देशमुख यांनी अगदी हुशारीने थेट उत्तर देण्याचे टाळल्याचे सर्वांच्याच लक्षात आले आहे. एकीकडे पत्रकारांच्या भल्यासाठी निस्वार्थपणे काम करतो आहे असे म्हणणाऱ्या आणि चमकोगिरी करणाऱ्या स्वार्थी एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख यांनी, ते सतत इतक्या पदांवर नेमके कशासाठी डल्ला मारून बसले आहेत, ही इतकी सारी पदं त्यांना स्वत:च्याच ढूं.....खाली का ठेवावी वाटतात? आणखी काय- काय लाभ त्यांना यातून मिळवायचे आहेत? यासारखे इतरही प्रश्न आम्ही सातत्याने उठवत राहू. त्यांच्यासोबत केवळ आणि केवळ त्यांचा उदोउदो करीत चमचेगिरी करणाऱ्यांशिवाय, चांगले काम जमेल अशी माणसेच नाहीत का? ही पदे इतर कुणाकडे ते का सोपवीत नाहीत? या आणि इतरही साध्या प्रश्नांची उत्तरे ते देत नाहीत? राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी यांनी जीवाच्या आकांताने केलेले नसते खटाटोप आणि नंतर हे पद न मिळाल्याने यांचा झालेला जळफळाट, हे सर्व पत्रकारांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. मा.मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी त्या काळात नीचपणे टीका केली. आणि आता पुन्हा, जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने लाळघोटेपणाही सुरु केला आहे.

स्वत:ची लबाडी उघड होईल अशी शक्यता दिसताच, ते आणि वेग-वेगळ्या पदांचे हाडूक चाटत बसलेल्या त्यांच्या हुजऱ्यांनी त्यांची खरी लायकी दाखवत छात्या बडवून घेणे सुरु झाले आहे. पदाचे हाडूक मिळालेले आणि पदांचे हाडूक हवे असलेले, असे लोक यात आघाडीवर आहेत. आक्षेपांना उत्तर द्यायची हिंमत तर नाहीच. उलट, यांच्याविरुद्ध लिहिणारा म्हणजे सुपारीबाज पत्रकार, धनिकांच्या पे रोलवरील पत्रकार, आंदोलन दडपण्याचा डाव असलेले पत्रकार अशी हेटाळणी करीत गोंडस हाकाटी पिटत मूळ मुद्दाला बगल देत राहायची ही यांची चलाखी आहे. ही चलाखी अजूनही काही भाबड्या पत्रकारांच्या लक्षात आलेली नाही, याचाच पुरेपूर लाभ हे उठवत आहेत. आर्थिक आणि इतरही अनेक बाबींना तर आम्ही अद्याप हात घातलेलाच नाही.

आणि हो, आम्ही निनावीपणे हे सर्व लिहित आहोत, कारण आम्ही जर नावासहित लिहू लागलो तर एस. एम. (सुर्यकांत माणिकराव) देशमुख आणि त्यांचे ब्लॅकमेलर टोळके आमच्या जीवाचेही बरे-वाईट करू शकतात. आम्ही यांचे खरे हिडीस रूप पाहिलेले आहे. यांच्या एकंदर अशा सर्व गैरकारभाराबद्दल कुणी जर आवाज उठवला तर साम, दाम, दंड, भेद अशा कशाचाही वापर करण्यास मागे-पुढे न पाहता हे पुढच्यास आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करतात, हे मुंबई, पुण्यातीलच काय राज्यातील अनेक पत्रकारांना माहिती आहे. एखाद्यास पत्रकारिता क्षेत्र, संघटनात्मक क्षेत्र, सार्वजनिक जीवनातून उठवण्यासही हे टोळके मागे-पुढे पाहत नाही. अगोदरच पत्रकार संकटात असताना अशा नेत्यां(?)कडूनही जर पडद्याआडून पत्रकारांना छळण्याचे, संपवण्याचेच काम होत असेल तर त्याविरुद्ध लढणे गरजेचे आहे. आणि त्यामुळेच, यांच्या चेहऱ्यावरील बुरखा टरा-टरा फाडून यांचे खरे रूप सर्व पत्रकारांसमोर आणण्याची आमची लढाई सुरू आहे...

मराठी पत्रकार परिषदेची परंपरा आहे, पहिले कार्याध्यक्ष म्हणून निवडून यावे लागते, दोन वर्षानंतर अध्यक्ष होता येते,मग एस,एम, कार्याध्यक्ष म्हणून निवडून न येता डायरेक्ट अध्यक्ष कसे झाले,
ही नियुक्ती घटनाबाह्य आणि परंपरा पायदळी तुडवणारी आहे

परत, तूर्त इतकेच!

आपलाच

एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)


सावधान...! लोकशाहीचा पाचवा स्तंभ आलाय...!

काल-परवा मराठी मीडियात अभूतपूर्व अशी घटना घडली. मिडियाकर्मी म्हणून जबरदस्त घाबरवणारी सुद्धा. घाबरवणारी याच्यासाठी की आपल्याकडून जर वैयक्तिक स्तरावर असामाजिक किंवा लोकशाहीविरोधी काही कृत्य झालं तर आपलादेखील हॅशटॅग फेमस केला जाऊ शकतो आणि त्याने वैयक्तिक माझ्यावर किती मोठा परिणाम पडू शकतो, याची कल्पनाच करू शकत नाही. चॅनेलला यामुळे विशेष फरक पडला असेल की नसेल हे स्पष्ट नसेल तरी ही घटना मात्र विशेष नोंद घेणारी आहे हे निश्चित.  चॅनेलच्या विरोधात जो असंतोष बाहेर पडला तो माझ्यासाठी एक पत्रकार म्हणून मला अंतरबाह्य ढवळून काढणारा होता. लोकशाहीचे मुख्य तीन खांब होते मीडिया आल्यामुळे मिडियानेच आपण स्वतः चौथा खांबय म्हणू-म्हणू स्वताला एडजेस्ट केलं. मात्र जागतिकीकरण आणि व्यवसायिकरणाचा फार मोठा प्रादुर्भाव झाल्याने या चौथ्या खांबावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राह्यलंय. अपघाताने म्हणा किंवा रोजगाराच्या भुखेने म्हणा मी या चौथ्या खांबाच्या मातीतला लै लै बारीक कण झालो. म्हणजे माझं आस्तित्व अगदीच न दिसणाऱ्या कणाच्या अनेकाव्या भागाएव्हढंच.

पत्रकारिता शिकत असताना मीडियातील कल्पनाविश्वाच्या डोहात तरंगत आम्ही मिडियातली पोरं मार्कलिस्ट हातात पडताच एखादया चॅनेलचं बुम हातात घेऊन दिल्ली किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जांबाज रिपोर्टींग करत असल्याची स्वप्न पाहत राहतो. आम्हाला 'फाइव्ह डब्लू वन एच'च्या सिद्धांताचे उत्तर रटून-रटून पाठ करायला लावून मार्काची भीती घालणाऱ्या संस्था त्या सिद्धांताचे प्रॅक्टिकली महत्व मात्र फार कमी समजवून सांगतात. विदेशी हेरॉल्ड लासवेलपासून अजेंडा सेटिंग व्हाया टेक्निकल बाजू केवळ इंटरनल आणि एक्स्टर्नल परीक्षांसाठी आमच्या तोंडून वदवून घेतल्या जातात. मीडियातील स्टार माणसांना बोलावून आमच्या त्यांच्यासोबत फोटोबिटो काढून त्यांचा सत्संग घडवून आमच्या आभासी स्वप्नाला अजून विळख्यात अडकविले जाते. मात्र मीडियाची दुसरी बाजू आम्हाला अगदी कणभर देखील समजावली जात नाही. मीडियाच्या मार्केटमध्ये असलेल्या नोकरीसाठी लागणारं पॅकेज पोरांना कधी व्यवस्थित समजावून सांगितलं जात नाही. बातमीची बेसिक लेव्हलवर कॉपी कशी लिहावी? याचं ज्ञानसुद्धा दुर्दैवाने अनेक पत्रकारिता मास्टरधारी पोरांना नसतं. दुसरीकडं आज गल्लोगल्ली उभी राहत असलेली लघु मीडियासंस्थाने की ज्यामध्ये 'मीडिया' म्हणावं असं काही नसतं, त्यांचा मोठ्या प्रमाणावर झालेला उद्रेक हा भयानक आहे.आता प्रस्थापित असलेल्या मुख्यधारेच्या मीडियात ही शिकलेली माझ्यासारखी अनेक पोरं ही मीडियात आल्यावर बऱ्याच काळ मजूर पत्रकार म्हणूनच काम करतात. विचारधारा वगैरे गोष्टी हळू-हळू तो आचरणात आणतो. आणि विचारधारेवर ठाम असणाऱ्या पत्रकारांना नोकरी करत असताना बराच त्रास सहन करावा लागतो हे सत्य आहे. कुठला वाद किंवा विचारधारा पोटाचा प्रश्न सोडवू शकत नाही. अनेक चळवळीत काम करणाऱ्या थोर लोकांबाबत देखील असंच झालेलं असल्याची कित्येक उदाहरणं आहेत. मग कुठेतरी आपल्या विचारांना मुरड घालून पोटापाण्यासाठी आपले विचार वैयक्तिक लेव्हलवर जपत अनेक पोरं मीडियात काम करत आहेत. काहींना त्यांच्या सोयीच्या विचारांप्रमाणे स्वातंत्र्य देखील आहे व ते मर्यादितच. पत्रकार म्हणून प्रत्येकच विषयावर बोलावं अशी धारणा अनेकांची असते. पण ते अनेकवेळा शक्य होत नाही. चौथ्या खांबाच्या बळकटीसाठी नानाविध प्रयत्न करत 'मी इमानदार आहे' असं वेळोवेळी पत्रकाराला सिद्ध करून द्यावेच लागते. आता या खांबाच्या विश्वासनियतेवर प्रश्नचिन्ह उभं आहे. अर्थात हे प्रश्नचिन्ह आजिबात झूठ नाहीच. कारण मिडियातला उथळपणा फार बोकाळलाय. एकीकडे बोकाळलेपणाचा मोठा लोंढा वाहत असतांना दुसरीकडे कुठेतरी एक प्रवाह वाहतोय जो अजूनही मीडियाची विश्वसनीयता टिकवून आहे. अनेक मीडिया समूह कुठल्याना कुठल्या विचारधारेला फॉलो करतात. म्हणजे बायस असतात. तटस्थता ही क्वचितच एखाद्या समूहात पाहायला मिळत असावी. मात्र या समूहात पत्रकार म्हणून काम करणारे अनेक लोकं वैयक्तिक स्तरावर सामाजिक बांधीलकीला जपून पत्रकारिता करत आहेत. मीडियात वाढलेल्या बोकाळलेपणामुळेच चौथ्या खांबावरचा विश्वास उडू लागलाय. म्हणूनच या स्तंभावर अवलंबून कितपत आणि का राहायचं? असा सवाल करत लोकं सोशल मीडियावर  करत आहेत. तीन स्तंभांबरोबर चौथ्या स्तंभाची लक्तरे आता सोशल मिडियारूपी पाचवा स्तंभ काढू लागलाय असं चित्र आहे.नुकतच घडलेलं शेतकरी मारहाण प्रकरण आणि त्याच्या समांतर खासदाराकडून विमान कर्मचाऱ्याला मारहाणीची घटना  मीडियाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उठवते. खासदाराची कुत्री कशी भेटीसाठी हवालदिल झाली आहेत हे देखील मीडिया दाखवते आणि शेतकरी मारहाण प्रकरण आपोआप बाजूला सरते. पत्रकारितेत काम करता-करता खरंच न्यूज व्हॅल्यूसाठी आम्ही आमच्याच इमोशन्स विकू लागलोयत याची जाणीव 'खासदारांची कुत्री वाट बघताहेत!' अशा बातम्या पाहताना होते.  मिडियाकर्मी म्हणून टीआरपी साठी आम्ही संवेदनाच आम्ही विकतोय का? आता आमची प्रामाणिकता तपासायची वेळ येतेय का? न्यूज व्हॅल्यूसाठी आम्ही आमचीच व्हॅल्यू कमी तर करत नाही ना? आम्हाला आमची मानसिकता तपासण्याची वेळ आलीय का? अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. काहीजण प्रामाणिक संघर्ष मात्र निश्चितच लक्षात ठेवावा लागेल. मात्र तो अद्यापतरी म्हणावा असा दबाव बनवू शकलेला नाही. मात्र आता सरकार आणि चौथ्या स्तंभासाठी सावधानतेचा इशाराचा परवाच्या 'त्या'चॅनेलच्या ट्रोलिंगने दिला आहे. चौथ्या स्तंभावर अशा प्रकारचं कंट्रोल खरोखर गरजेचं आहे हे एक पत्रकार म्हणून मला तरी योग्य वाटत आहे. सदर चॅनलच्या विरोधातील ट्रेन्डनं अख्खा मिडीया गदगदून हादरला असं म्हणता येत नसलं तरी 'जागा' मात्र झाला असावा असं चित्र दिसत होतं. लोकशाहीचे केवळ चारच स्तंभ आहेत असं म्हणाणाऱ्यांना आता लोकशाहीचा 'पाचवा स्तंभ' देखील तितकाच सज्ज होतोयं हे मान्य करावेच लागेल. चार स्तंभाच्या मधोमध सोशल मीडियाचा हा मधला टेकू बनत असलेला स्तंभ आता अधिक ताकतवर होतोय हे नक्की. पत्रकार संजय मिस्किन म्हणतात त्याप्रमाणे लोकशाहीत लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकभावनेचा मजबूत व विश्वासार्ह पाचवा स्तंभ म्हणून 'सोशल मिडीया' स्थान पक्कं करतोय हे निश्चित. सुदृढ व सक्षम लोकशाहीसाठी इथून पुढं या पाचव्या स्तंभाची भूमिका ही प्रभावी ठरणार आहे.  

© निलेश झालटे
उपसंपादक
दैनिक जनशक्ती 

रविवार, २ एप्रिल, २०१७

ABP माझा मध्ये भूकंप ! गुजर बंधूना घराचा रस्ता !!

मुंबई-  एकीकडे सोशल मीडियावर ABP माझा बद्दल टीकेची झोड उठली असताना, याच चॅनेलमधील  टेक्निकल डिपार्टमेंटमधील प्रचंड आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी टेक्निकल डिपार्टमेंटचे हेड गजानन गुजर, त्याचे बंधू संजय गुजर आणि अन्य चौघांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
ABP माझा मध्ये जो टेक्निकल डिपार्टमेंट आहे,त्याचे हेड गजानन गुजर आहेत. त्यांचे बंधू संजय गुजर त्याच्या हाताखाली काम करत होते. या गुजर बंधूंनी स्वतःची कंपनी स्थापन करून ABP माझाच्या टेक्निकल डिपार्टमेंटला लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करून त्याची अव्वाच्या सव्वा बिले उचलली.  हे करत असताना कंपनीला अंधारात ठेवले होते. बाहेरून साहित्य खरेदी करण्याऐवजी गुजरांनी लाखोंची बिले उचलली.
या गैरव्यवहाराची कुणकुण कंपनीला लागताच गेली चार महिने त्याची चौकशी सुरु होती' अखेर मार्च एण्ड गुजर बंधूंचा अखेरचा दिवस ठरला. गुजर बंधूसह एकूण सहा जणांना कंपनीने नारळ दिला आहे.
दुसरीकडे कंपनीत कॉस्ट कटिंगची चर्चा रंगली आहे. गेल्या दहा वर्षात प्रथमच कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून अनेकांवर टांगती तलवार आहे.त्यामुळे दोघेजण अगोदरच BBC मराठीमध्ये लग्गा लावून ठेवला आहे. काहींनी शोध मोहीम सुरु केली आहे.
दुसरे असे की, येनकेन कारणामुळे ABP माझामध्ये मोठी गळती लागली आहे.माणिक मुंढे, प्रसन्न जोशी, निलेश खरे हे बिनीचे कलाकार मागेच निघून  गेल्यानंतर आता मयुरेश कोन्नूर आणि जान्हवी मुळे BBC मराठीच्या वाटेवर आहेत. काही अँकरनी आताच शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ABP माझासाठी येणारा काळ कठीण असणार आहे.

ABP माझासाठी सर्वात वाईट दिवस

मुंबई - ABP माझाच्या इतिहासातील आज ( २ एप्रिल ) सर्वात वाईट दिवस आहे. फेसबुक आणि ट्यूटरवर #BJPMAJHA हा हॅश टॅग तयार करून नेटिझन्सनी धो धुतले आहे. संपादक राजीव खांडेकरसह काही जणांची व्यंगचित्रे काढून चांगल्याच शिव्याही हासडल्या आहेत...
नेमके कारण काय ?
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आणि आल्यावर ABP माझा वर सतत भाजपच्या बाजूने बातम्या देण्यात आल्या आहेत. सर्व्हे करताना भाजपला फेव्हर राहील याची काळजी घेण्यात येते. ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येते.शेतकऱ्याच्या प्रश्नावर विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली तर एसी मधून संघर्ष यात्रा सुरु अशी टीका करण्यात आली तसेच या संघर्ष यात्रेचे कव्हरेज करण्यात आले नाही... सत्ताधारी मंत्र्याच्या चुकांवर पांघरून घालण्यात येते असा यांचा आरोप आहे.
यामुळे ABP माझा ला धडा शिकवण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेटिझन्सने ही मोहीम उघडली आणि गेले काही तास शिव्यांची लाखोली सुरु केली आहे.. मीडियासाठी हा सूचक इशारा आहे ..


पत्रकारानो सावधान
सोशल मीडियामुळे पत्रकारांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. चॅनल / पेपर किंवा त्यांच्या पत्रकारांनी एखाद्या पक्षाची किंवा नेत्याची बाजू घेऊन दुसऱ्यावर टीका केल्यास तुमच्यावर टीका झालीच म्हणून समजा.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संघर्ष यात्रा काढली. त्याचे वार्तांकन करताना ABP माझाने टीकेची झोड उठवली...
मग काय विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यानी फेसबुक आणि ट्यूटर वर #BJPMAJHA हा हॅश टॅग काढून ABP माझावर टीकेची झोड उठवली आहे... ही टीका इतकी घायाळ करणारी आहे की ABP माझावाल्याना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे...
हा सल्ला इतर चॅनेल आणि पेपरला लागू आहे बरं का ...
कुठे चुकला ABP माझा ?
ABP माझा साठी रविवारचा दिवस काळा दिवस ठरला...
आजवरच्या इतिहासात माध्यमाला इतक्या सामुदायिकपणे टार्गेट करण्याचे कधीच घडले नव्हते...
हे पत्रकारांसाठी अतिशय क्लेशदायक आणि आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे...
मराठी वृत्तवाहिनीत सतत नंबर १ राहणाऱ्या ABP माझाला यश पचवता आले नाही की नंबर १ चा वापर लायझनिंगसाठी करण्यात आला ?
कुठे चुकला ABP माझा ? आपण यातून काय बोध घेतला पाहिजे ?
 ब्रेकिंग न्यूज
..................
'उघडा डोळे बघा नीट चॅनेल' मध्ये प्रचंड आर्थिक घोटाळा...
टेक्निकल डिपार्टमेंट मधील दोन हेडसह ६ जणांना डच्चू ...

या कल्पना दारिद्र नारायणचे करावयाचे काय ?

सध्या जे काही मराठी माध्यमात सुरु आहे, ते पाहिले की या कल्पना दारिद्र नारायणचे करावयाचे काय असा प्रश्न पडू लागला आहे. अगदी मेन स्ट्रीम प्रवाहातही हे दारिद्र नारायण प्रचंड प्रमाणात जाणवत असून यामुळे वाचकांना फार काही नवे मिळत नसल्याचे दिसते. अनेक ठिकाणी संपादकांना बिझनेसच्या गणितात अडकविल्याने त्यांच्याकडून नवे काही होताना दिसत नाही तर डेस्कवरील मंडळीही निव्वळ पाट्या टाकण्याचे उद्योग करत असल्याने तोच तोच रटाळपणा माध्यमात आलेला दिसतो. आपल्याकडच्या बहुतांश साहित्यिकांनी इंग्रजी लिटरेचरची कॉपी मराठीत करुन फार काही वेगळे केल्याचा आविर्भाव आणला, बॉलिवूडमध्ये साऊथवाल्यांची कॉपी होते तसेच मराठी वृत्तवाहिन्याही इंग्रजी वाहिन्यांची कॉपी करताना दिसतात. आपल्या प्रतिभेच्या जोरावर इंग्रजी वाहिनीत स्क्रीनकर नवी एखादी फ्रेम तयार झाली रे झाली की तीची कॉपी मराठीत झालीच म्हणून समजा.. मधल्या काळात स्टुडीओच्या रचनाही बदलत गेल्या..तेच मराठी वृत्तपत्र सृष्टीतही सुरु असते. सध्या इकॉनॉमिक्स टाईम्समध्ये काही व्यक्तींचे फोटो हे स्केच स्वरुपात वापरण्यास सुरुवात झाली की मटा ने त्याची कॉपी केलीच.. याच पंक्तीतील काही दैनिके आता व्यंग चित्राचा वापर खुबीने करु लागली आहेत. परंतु हे वास्तविक या पुर्वीच घडायला हवे होते. आर्टिस्ट आणि उपसंपादकही याला अपवाद नाहीत. सब हेडिग आणि पॉईंटर या दोन्हीच्या पलीकडे ते जाताना दिसत नाही, आता कुठे कॅलिग्राफीचा वापर होतोय परंतु त्यातही जिवंतपणा आजिवात नाही. कॅलिग्राफीत शब्द बोलतात परंतु आपल्या मराठी माध्यमातली लीपी बोलायची दुरच नीट अक्षरांचा अर्थही लागत नाही..आपले आर्टिस्ट हे एकमेकांचे शिकूनच बिचारे वाट काढत असतात त्यांनी कलेचे नीट शिक्षण घेतलेले नसते हे खरे असले तरी ते प्रतिभेला चालना देताना दिसत नाहीत..आणि मुळात पानांचा लोडच ईतका की प्रतिभा असली काय नसली काय मॅनेजमेंटला पानांशी देणे घेणे असल्याने पाट्या टाकायचे उद्योग सुरु आहेत. रिर्पोटिंग स्टेजवर हीच स्थिती आहे. इन्व्हेस्टीगेटिव्ह टिम असो की आणखी काही संशोधनात्मक कामे होत नाहीत..मिड डे किंवा मिरर च्या जवळपासही फिरकताना दिसत नाहीत याबद्दल कुमार केतकरांपासून ते उत्तम कांबळेंपर्यंत खंत व्यक्त करताना दिसतात. मेन स्ट्रीममधली तर अनेक मंडळी 10-10 वर्षे एकाच संस्थेत काम करताना दिसून येत आहेत. स्वताःला सिध्द करायचे दूरच उलट आहे ते फक्त ढकलत राहवयाचे असेच या मंडळींच्या कामाचे स्वरुप आहे. हे दारिद्र नारायण वाहिन्यांमध्येही आहे.. तेच होस्ट... तेच गेस्ट...तेच चेहरे... तेच तेच कॉपीराईटिंग..तोच व्हॉईस यामुळे पाहणाऱ्यांही रटाळपणा जाणवत आहे. बिझनेस् गणित जुळवताना याकडे कोणाचे लक्ष जात नाही..हे दारिद्र नारायण खाईत लोटणारे आहे...

- एक वाचक

पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा तयार, लवकरच विधेयक मांडू : मुख्यमंत्री


पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा तयार, लवकरच विधेयक मांडू : मुख्यमंत्री

मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कायद्य़ाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी पत्रकारांच्या सुरक्षेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
गेल्‍या सहा वर्षात  17 हजार 682  अधिकाऱ्यांवर हल्‍ले झाले म्‍हणून जनतेच्‍या अधिकारांवर गदा आणत सरकारी अधिकाऱ्यांनी स्‍वसंरक्षार्थ आयपीसीच्‍या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक तात्‍काळ मांडले. तेच अधिकारी तीच तत्‍परता चार वर्षात 337 पत्रकार आणि 52 मिडिया हाऊसवर हल्‍ले झाले म्‍हणून पत्रकार संरक्षण कायदा करण्‍याबाबत का दाखवत नाही, असा सवाल आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
भारतीय दंड संहिता 1860 च्‍या कलम 332, 333 आणि 353 मध्‍ये सुधारणा सुचविणारे विधेयक आज विधानसभेत मांडण्‍यात आले होते. या विधेयकावर बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी हे विधेयक जनतेच्‍या घटनादत्‍त अधिकारावर गदा आणणारे तर नाही ना? असे सांगतच पत्रकारांवरील हल्‍याचा विषयही त्‍यांनी मांडला. गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा करा, अशी मागणी विविध पत्रकार संघटना करत आहेत. असे सांगत पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ आणावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

शनिवार, १ एप्रिल, २०१७

आवारे पाटलांची विकेट, भोईटेही व्हेंटिलेटरवर ....

मुंबई - व्हेंटिलेटरवर असलेल्या जनशक्तिमध्ये अखेर कार्यकारी संपादक पुरुषोत्तम आवारे पाटील यांची विकेट पडली आहे. 'आवारे पाटलांच्या डोक्यावर तुळशीपत्र' ही  बातमी बेरक्याने काही दिवसापूर्वी प्रसिद्ध करून आवारे पाटील यांची विकेट पडणार हे भाकीत व्यक्त केले होते, अखेर घडलेही तसेच...
आवारे पाटलांच्या हाती मालकांनी नारळ दिला असून आवारे पाटील प्रहारच्या नितेश राणेंच्या दरबारात गेले होते, पण तेथे अगोदरच जावून बसलेल्या बाबरानी खिंड आडवून ठेवली आहे. नवीन संपादक तुळशीदास भोईटे आणि आहे तो कर्मचारी वर्ग यांचेही  जमेनासे झाले आहे.एका डीटीपी ऑपरेटर बरोबर भोईटे यांचे चांगेलच वाजले. हा ऑपरेटर निघाला मालकाच्या जवळचा.. मालक कुंदन ढाके जेंव्हा ऑफिसमध्ये आले तेंव्हा भोईटे यांनी एक तर हा ऑपरेटर राहील किंवा मी राहील, अशी भीष्मप्रतिज्ञा केली, मालकाने सरळ सांगितले, हा ऑपरेटर राहील, ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे.. बिचाऱ्या भोईटे यांची भीष्मप्रतिज्ञा हवेत विरली. नाराज भोईटे दुसरीकडे शोधाशोध करू लागले आहेत. पेपर बरोबर भोईटेही व्हेंटिलेटरवर आहेत.
त्यानंतर कोणताही कर्मचारी भोईटे यांची पोथी ओळखत आहे. काही दिवसापूर्वी एक कर्मचारी लेट आला, भोईटे यांनी का लेट म्हणून विचारले ते मेरी मर्जी म्हणाला. पेपरचा खप दोन हजारच्या पुढे सरकत नाही, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा पॉईंट ब्लँक सुरु करण्यात आला आहे, परंतु पेपरचा खप जेमतेम असल्याने काहीच फायदा होत नाही.
कसलेही  व्हिजन नसलेला जनशक्ति मालकाचे व्यवहार सांभाळण्यासाठी सुरु  आहे. जळगाव वगळता मुंबई, पुणे,पिंपरी चिंचवड आवृत्तीची वाट लागली आहे. प्रचंड तोटा सहन करत हा पेपर व्हेंटिलेटरवरवर सुरु आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook