> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २६ जुलै, २०१२

बेळगाव तरूण भारत प्रकरणी पत्रकारांनी घेतली राज्यपालांची भेट...


मंगळवार, २४ जुलै, २०१२

'मुंबई लक्षदीप'च्या संपादकाचे बिंग फुटणार ...!!

मुंबईतून प्रकाशित  होणाऱ्या दैनिक मुंबई लक्षदीप चे  संपादक डी. एन. शिंदे ( दशरथशेठ शिंदे उर्फ जग्गू , जगन  शिंदे ) हा  छोटा राजन टोळीशी कार्यरत असल्याचे पुरावे मुंबई क्राईम बॅन्चकडे असल्याने पोलीस त्याच्या चांगल्याच मागावर आहेत.  
अंडरवर्ल्डच्या दुनियेत  'डी. एन.' हे नाव घेतले जाते. सध्या 'डी. एन.' वर २ खुनाचे गुन्हे आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. आणि एका आरोपातून 'बेल' मिळून 'डी. एन.' फरार आहे.  मुंबईतून गेल्या ८ ते १० वर्षापासून दैनिक मुंबई लक्षदीप नियमित प्रकाशित होतो.  या वृत्तपत्रासाठी दशरथ शिंदे हा नवा पुरता  संपादक आणि वाट्टेल तेवढा पैसा फेकतो. वृत्तपत्राच्या माध्यमातून '' व्हाईट कॉलर'' असल्याचा भासवितो. सर्वसामन्य कोणीही वाचक त्याच्या '' दरबारात'' आला तर भेट मिळतही नाही. हा त्याचा थाट. कधी कोणत्या कार्यक्रमात तर सोडाच पण कुठल्या समारंभ आणि चर्चासत्रात दिसत नाही . सध्या त्याच्या मागे एक धर्मा '' अधिकारी '' चांगलेच पाठी  लागलेत. आणि त्यांनी  'डी. एन.'  ची पळताभुई कमी केलीये. सध्या  'डी. एन.' कुठे आहे ? कसा आहे ? काय करतो ? याचा पत्ताच नाही. मात्र  हे  '' अधिकारी '' त्याचा मागोवा घेत आहे. गुन्हे दाखल असतना देखील 'डी. एन.'  बनावट पासपोर्टच्या आधारे परदेश ''वाऱ्या'' करून आला. आता हळू हळू  दशरथशेट शिंदे उर्फ जगन , जग्गू  म्हणजेच 'डी. एन.' च्या पाठी मिडियाहि लागलीये. मात्र मुंबई लक्षदीपचा संपादक असा असू शकतो का? यात बहुतेक पत्रकार संभ्रमात आहेत.  पत्रकारितेची धुंद म्हणजे काहीही करू शकते असा  'डी. एन.' चा भ्रम आहे. मुळात महत्वाचा मुद्दा असा कि,  तो महाराष्ट्र  संपादक परिषदेचा सदस्य देखील आहे . 


पुढारी, मुंबई  

'पत्रकार नियामक आयोग’ स्थापन करण्याची गरज

मध्यंतरी मुंबईतल्या एका प्रसिध्द टी.व्ही.चॅनलच्या कार्यालयात घडलेला किस्सा..! सकाळची वेळ.वृत्तसंपादक नुकतेच केबिनमध्ये येऊन स्थानापन्न झालेले.त्यांना भेटायला काही मंडळी आलेली आणि तेवढ्यात चॅनलची एक ‘मॉडेल कम रिपोर्टर’  तरूणी वादळासारखी त्यांच्या केबिनमध्ये घुसली. तिने थेट प्रश्न टाकला, ‘सर..कॅन आय गेट ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर्स’  फोन नंबर..प्लीज’ ? सगळेच गोंधळले.काय उत्तर द्यावं असा प्रश्न बॉसलाही पडला.त्यानेही जस्ट फन म्हणून तिला सांगितले, ‘जस्ट गो टू पब्लिसिटी डिपार्टमेंट अ‍ॅन्ड आस्क देम..’ सगळेच हसले. पुढे त्या तरूणीने त्या डिपार्टमेंटलाही फोन केला.तिथेही सगळे हसले.रिपोर्टर तरूणीचं चांगलंच हसं झालं होतं.हा किस्सा वाचून आणि हसून सोडून देण्यासारखा नाही. आज पत्रकारितेत जी काही नवी तरूणाई येते आहे,त्यांच्या पैकी काहींचं हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणावं लागेल. गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्राचं ग्लॅमर वाढतं आहे.चॅनलवर झळकायला मिळतं म्हणून किंवा कार्ड दाखवून भापिंगबाजी करता येते म्हणून प्रत्येकालाच हल्ली वाटायला लागलयं की आपणही पत्रकार व्हावं.पत्रकारितेसाठी काही बेसिक नॉलेज असावं लागतं,लोकांशी बोलायला आवडलं पाहिजे, सर्व विषयातली माहिती व ज्ञान असायला हवं, तारतम्य हवं, संयम हवा, माहितीचं विश्लेषण करण्याची बुध्दी हवी आणि सगळ््यात महत्वाचं म्हणजे सतत अभ्यास करण्याची मनाची तयारी हवी व त्याच बरोबर मिळालेली माहिती सुसंगतरित्या लिहिता किंवा बोलताही यायला हवी,असं कोणालाच वाटत नाही,हेच खरं दूर्दैव. या पैकी कोणतेही कौशल्य नसलेली मंडळी पत्रकारितेत वादळासारखी येतात आणि काळाच्या ओघात वावटळासारखी गुडूप होऊन जातात.आणि मग मोठ्या
मोठ्या चॅनल्स वरून रिपार्टर तरूणी पुरात वाहून जाणा-याला जेंव्हा विचारतात,‘..अब आपको कैसा लग रहा हैŸ।’ तेंव्हा ते पाहणा-याला हसावं की रडावं हेच कळत नाही.मुंबई-पुण्याच्या डिजिटल पत्रकारितेचीच जर ही अवस्था असेल तर पुरोगामी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पत्रकारिता कशी असेल?
सध्याच्या पत्रकारितेचं चित्र अत्यंत भयावह असंच आहे.वर्तमानपत्रात मोठी स्पर्धा लागलेली आहे आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गांवोगांवी आपल्या वार्ताहराचं जाळं भक्कम करण्याकडे सर्वच व्यवस्थापनांचा कल आहे.या गोंधळात वार्ताहर होण्यासाठी म्हणून जी पात्रता पूर्वी अंगी असावी लागत होती त्याचा आता कसलाच विचार होताना दिसत नाही.‘अंक वाढ आणि व्यवसायवृध्दी’  हे वार्ताहर होण्यासाठीचे अलिकडचे निकष आहेत.जसं हल्ली निवडणुकीचं तिकीट मिळविण्यासाठी ‘ निवडून येण्याची क्षमता’  आर्थिक निकषांवर तपासली जाते तसंच हेही.वार्ताहर म्हणून तुम्हाला कितपत लिहिता येतं? तुमचे समाजात स्थान काय? तुमची समाजात विश्वासार्हता आहे का? याच्याशी कोणालाच काही घेणं देणे राहिलेले नाही.तुम्ही जाहिरात किती देऊ शकता आणि अंकवाढ किती करू शकता? या दोन कळीच्या मुद्य्यांवर समाधानकारक ऊत्तर देता आलं की तो वार्ताहर बनण्यासाठी लायक समजला जातो. याचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात वेवेगळ्या त-हेचे लोक वार्ताहर म्हणून पाहण्याचं दूर्दैवी वेळ समाजावर आलेली आहे. काहींचे दोन नंबरचे व्यवसाय आहेत.काहींकडे गाड्या असतात. त्यातून बेकायदा प्रवासी वाहतुक सुरू असते.त्यांना पोलिसांना हप्ते द्यावे लागतात.शिवाय त्यांचा त्रास वेगळाच. या सर्व त्रासातून सुटका करून घ्यायची असेल तर पत्रकार होणं हा एक सर्वोत्तम मार्ग समजला जातो.आणि विशेष म्हणजे त्यासाठी दोन ओळी नीट लिहिता आल्याच पाहिजेत असं बंधनही राहिलेलं नाही.एकदा वार्ताहर म्हणून ओळखपत्र मिळाले की हा ‘बाबा’  अक्षरश: त्या भागात राजा म्हणूनच मिरवितो.त्याचे सर्व व्यवसाय जोमाने सुरू राहतात.पोलिसांची कटकट संपते.शिवाय समाजात राहून मानसन्मानही मिळता े(लोकांनाी तो नाईलाजाने द्यावा लागतो.)जाहिराती कशा मिळवायच्या हेही त्याला चांगलं माहित असतंच.अंकवाढ करून त्याचे पैसे स्वत:च्या खिशातून भरले तरी ते पोलिसांच्या हप्त्यापेक्षा कमीच असतात.ब-याचदा यातले काही वार्ताहर पोलीसांसाठी मध्यस्थ म्हणूनही काम पाहतात.दोघांचही कल्याण..! अर्थात याला बरेच सन्माननीय अपवाद आहेतच आणि त्यांच्याच जीवावर अजून पत्रकारिता टिकून आहे, असे म्हणावे लागेल. बरं..वर्तमानपत्र नव्याने सुरू करणंही तसं फारसं अवघड नाही.लिहिता-वाचता येत नसलं तरी देशाचा नागरिक म्हणून तो अर्ज करू शकतो आणि त्याला नव्या वर्तमानपत्राचा नोदणी क्रमांकही झटपट मिळून तो डायरेक्ट‘संपादक’  होऊ शकतो.कुणीतरी चार दोन ओळी खरडणारा एखादा पकडला की झाला अंक तयार..आणि तसंही शक्य नसलं तरी फारसं काही अडत नाही. कोणत्याही वर्तमानपत्राचा जुना अंक काढून कॉम्प्युटरला लावला की डीटीपी होऊन जातो.शुध्द लेखन, प्रभावी भाषा, मांडणीची पध्दत या सारख्या गोष्टी म्हणजे अगदीच गौण. फक्त ‘ पुढील अंकात वाचा..’  एवढी ओळ नीट लिहिता आली की बास्स..! एकट्या नगर जिल्ह्यात असे हजारोंनी अंक निघत असतील की ज्यांची माहिती फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सरकारच्या तत्सम कार्यालयांनाच असेल..! हे पत्रकारितेतलं चित्र खूपच व्यथित करणारं आणि समाज जीवन उध्वस्त करणारं आहे. पूर्वी म्हणजे साधारणत: इ.स.२००० पर्यंत पत्रकारितेचा दर्जा चांगल्यापैकी टिकविला गेला होता. शहरी भागात विविध वर्तमानपत्रातून उपसंपादक किंवा शहर वार्ताहर म्हणून काम करणारी मंडळी स्वत:चा आब टिकवून होती.बीट वार्ताहर म्हणून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , क्राईम अ‍ॅन्ड कोर्ट इ.ठिकाणी काम पाहणा-या मंडळींचा त्या - त्या क्षेत्राचा चांगला अभ्यास होता.दबदबा होता.पदाधिकारी आणि अधिका-यांना जेवढी माहिती नसे तेवढी माहिती या पत्रकारांच्या ओठावर होती.एखादा विषय खोदून काढणं, त्याचा सखोल अभ्यास करणं, त्याची व्यवस्थित मांडणी करणं ,आवश्यक त्याठिकाणी खुलासे मिळविणं आणि बातमीच्या प्रसिध्दीनंतर त्याचा सतत पाठपुरावा करत राहणं ही त्यांची खासियत होती.एखाद्या पत्रकारपरिषदेत या सगळ्या पत्रकारांपुढे बोलायचं म्हणजे परिषद घेणा-याला अक्षरश: घाम फुटत असे.राजकीय पुढा-यांनासुध्दा त्यांचा धाक वाटत होता.त्यामुळे ही सगळी मंडळी अगदी तयारीनिशी पत्रकार परिषदांना सामोरी जात असे.त्यामुळे माहिती व ज्ञानावर आधारीत त्यांची वार्तापत्रे किंवा राजकीय विश्लेषणे वाचणे म्हणजे वाचकांना वाचनानंद मिळवून देणारा भाग ठरायचा.
२००० नंतर हे चित्र हळूहळू बदलत गेलं आणि आज कशातच काहीच उरलं नाही, अशी स्थिती उदभवलेली आहे.कोणत्याही क्षेत्राचा कवडीचाही अभ्यास नाही.समाजाशी निगडीत प्रश्नांचा अभ्यास नाही. अभ्यास करायची तयारी नाही.चार-दोन महिने पत्रकारितेत काढले आणि एक दोनदा ‘बायलाईन’  प्रसिध्दी मिळाली की यांच्यासारखे पत्रकार दुसरे कोणीच नाहीत.पत्रकारितेत सतत विद्यार्थी म्हणून रहावं लागतं.आपलं ज्ञान अपडेट करावं लागतं. पण याचा गंधही या मंडळीना नाही.‘..त्याला काय कळतं!’  असा चेहे-यावरचा भाव. एक प्रकारची मग्रूरी आणि आपणच जगातले नंबर वन पत्रकार असा स्वत:बद्दलचा गोड गैरसमज.यांची पत्रकारिता चालते कशी हे पाहणं सुध्दा मोठं अजबच आहे.महानगरपालिका किंवा अन्य शासकीय कार्यालयात जाऊन, ‘आज काय बातमी?’  असं त्यांनाच विचारायचं. ते लेखी स्वरूपात देतील ती प्रेस नोट खिशात टाकायची आणि दुस-या बीटवर जायचं.दिवसभर कोर्टात बसून सरते शेवटी,‘ काय निकाल लागला?’  हे आरोपींच्या किंवा सरकारच्या वकीलाला विचारून ते देतील तीच माहिती घेऊन चालू पडायचं हा यांचा शिरस्ता.बातमी म्हणजे काय तर ज्याला कोणाला प्रसिध्दी हवी आहे,त्यात शासकीय अधिकारी आले, राजकीय पुढारी आले, नगरसेवक, पदाधिकारी ,जिल्हा परिषद सदस्य असे सर्व जण आले.त्यातही ज्याचे संबंध जास्त जवळचे त्याची मोठ्ठी बातमी, असला हा सगळा प्रकार.या सर्वांनी लेखी स्वरूपात कागदावर दिलेली माहिती म्हणजेच बातमी. त्या पलिकडे काही असूच शकत नाही आणिअसले तरी ती माहिती मिळवून लिहिण्याचे कष्ट घ्यायचे कोणी, हा प्रश्न आहेच. मिळेल तीच माहिती त्याने दिली तशीच दुस-या दिवशी प्रसिध्द केली की हे झाले पत्रकार..! समोरचा अधिकारी देईल ती माहिती सत्य आणि तीच बातमी.त्यात आपण डोकं लावायचं असतं.काही मागच्या तशाच घटनांचा अभ्यास करून आणि त्यातले रेफरन्सेस देऊन बातमी परिपूर्ण करायची असते,हे यांच्या ध्यानीमनीही नसतं.तसं करायचं म्हणजे नसती डोकेदुखीच नाही का? त्यापेक्षा ‘प्रेस नोट’  जर्नालिझम परवडतं. पुन्हा लिहायचा त्रास वाचतो.आहे त्यावरच खाडाखोड केली आणि हेडिंग दिलं की काम भागतं.पत्रकार परिषदा म्हणजे तर विनोदाचा उत्तम नमुना. पुर्वी पत्रकार त्यात प्रश्न विचारायचे, शंका उपस्थित करायचे.किमान तासभर चर्चा होऊन परिषदा संपायच्या. आता कोणी पत्रकार प्रश्न वैगेरे विचारायच्या भानगडीत पडतच नाहीत.‘प्रेस नोट’  तयार आहे का? हा पहिला प्रश्न आणि नंतरची काय व्यवस्था? हा दुसरा प्रश्न. झाली पत्रकार परिषद..! बरं..उपस्थितीचं म्हणाल तर ती प्रचंड असते.खांद्यावर कॅमे-याची बॅग टाकली की झाले पत्रकार.अशा अनेक बॅगा आणि नविन नविन चेहेरे दरवेळेला पहायला मिळतात.याची आता परिषद घेणा-यालापण सवय झालीय.त्यांना जे सांगायच ते छान लिहून आणायचं.आणि देऊन टाकायचं.कसला ताण नाही.टेन्शन नाही.बाकी व्यवस्था पहायला ‘इव्हेंट मॅनेजर’  असतातच.पोलिस अधिकारी किंवा शासकीय अधिकारी यांची नि आपली कशी ओळख आहे? हे इतरांना दाखवून देण्यातच यांना मोठं भूषण. अधिका-यांनाही तेच हवं असतं.त्यामुळेच हल्ली पोलिस अधिकारी कुठेही धाड टाकायला पत्रकारांना बरोबर घेऊन जातात. स्वत:ची छान प्रसिध्दी मॅनेज करवून घेतात.त्यांच्या बरोबर मिरविताना पत्रकारांनाही खूप समाधान मिळतं. पण त्या नादात समाजातील अन्य घटकांवर होणारे अन्याय मात्र दूर्लक्षिले जातात.त्यांच्याकडे पहायला, समाजाचं वास्तव जाणून घ्यायला या नव्या पिढीतल्या पत्रकारांकडे वेळच नसतो कारण हे पत्रकार कमी आणि ‘पत्रक’ कारच जास्त असतात.पत्रकारिता हा लोकशाहीचा चवथा स्तंभ आहे म्हणे..! त्याची देखील ही अशी अवस्था झालेली असताना लोकशाहीचा डोलारा फार लवकर ढासळल्याशिवाय राहणार नाही, हे जळजळीत वास्तव आहे.वरवर दिसतं तेच सत्य असं मानून पत्रकारिता करणा-यांची वाढती संख्या हाच खरा तर पत्रकारितेवरचा मोठा आघात मानायला हवा.आणि त्यापासून पत्रकारितेला आणि समाजाला वाचविण्यासाठी काही तरी ठोस पावलं ऊचलली जायलाच हवीत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पत्रकारांवर होणा-या हल्ल्यांपासून त्यांचे संरक्षण करावे, यासाठी कायदा करण्याची मागणी सर्व पातळीवरून होताना दिसते.अगदी राज्य स्तरावरील पत्रकार संघटनांपासून ते गांव पातळीवरील पत्रकारांच्या ढिगभर संघटनांपर्यंत सर्वांनीच ही मागणी लावून धरली आहे. मुळातच पत्रकार कोणाला म्हणायचं? हा खरा प्रश्न आहे.गांवोगांवी ही संख्या प्रचंड वाढलेली आहे.कुणीही उठतो आणि रात्रीतून पत्रकार होतो.दैनिकाचा होतो, साप्ताहिकाचा होतो, कुणी थेट संपादकच होतो.कोणाकोणाला आवर घालणार आणि कोणाला संरक्षण देणार? पत्रकारांमध्ये अनेक गट-तट, संघटना आहेत.त्यांच्यात आपापसात भांडणं आहेत.संघर्ष आहेत.ब्लॅकमेलिंग करणा-यांची संख्याही प्रचंड आहे आणि शेवटी समाजातले जे काही गूण-अवगूण असतात ते त्यांच्यातपण आलेले आहेतच.केवळ पत्रकार आहेत,म्हणून त्यांना कायद्याने संरक्षण देणार का?पत्रकारांशी वाईटपणा नको म्हणून कोणत्याच राजकीय पक्षाचे लोकं काहीच बोलत नाही याचा अर्थ यांना मोकळं रान दिलेलं आहे का? यावर कोणाचं नियंत्रण असायला नको का? या सर्व मुद्द्यांचा विचार जसा शासनाने करायचा आहे तसाच तो पत्रकारांचे नेतृत्व करणा-या राज्यस्तरावरच्या पत्रकार संघटनांनीही करण्याची गरज आहे.आणि या विचारांच्या पक्क्या पायावर आधारितच असा कायदा करायला हवा. नाहीतर
भविष्यात उगाचच कायदा केला असं म्हणण्याची वेळ येऊ शकते. आज सर्व व्यवसाय हे योग्य त्या आयोगामार्फत नियंत्रित केलेले आहेत.एखाद्याला वकील व्हायचं असेल तर त्याला आधी एल.एल.बीची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.त्यानंतर‘ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिल ’ कडून व्यवसायाचा योग्य ती सनद किंवा परवाना मिळवावा लागतो आणि त्यानंतरच संबंधित व्यक्ती आपला वकीलीचा व्यवसाय करू शकते.विमा प्रतिनिधी होण्यासाठीही ‘इर्डा’ (इन्शुरन्स रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेन्ट ऑथॉरिटी )ची परीक्षा देऊन लायसन्स मिळवावे लागते.एमबीबीएस झाल्यानंतर ‘मेडिकल कॉन्सिल’ कडे त्याची नोंदणी केल्यानंतरच व्यवसायाची परवानगी मिळते.सी.ए म्हणून व्यवसाय करण्यासाठीदेखील योग्य त्या परवान्याची आवश्यकता असतेच. त्याच धर्तीवर आता पत्रकारिता व्यवसायाचे योग्य नियमन करुन या व्यवसायाला पुन्हा गतवैभव प्राप्त
करुन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सहमतीने राज्यस्तरावर ‘पत्रकार नियामक आयोग’  स्थापन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. खरंतर पत्रकारितेच्या व्यवसायात येण्यासाठी आज कोणतेही कायदेशीर निकष अस्तित्वात नाहीत.दैनिक अथवा साप्ताहिकाचे ओळखपत्र मिळवून तात्काळ पत्रकार होता येते.त्यामुळे अलिकडच्या काळात वेगवेगळ्या आकर्षणामुळे बोगस पत्रकारांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचे विपरित परिणाम होताना दिसत आहेत.माध्यमांची विश्वासार्हताही त्यामुळे धोक्यात आली आहे.किमान शैक्षणिक अर्हता,परिसराचे भौगोलिक ज्ञान,विविध शासकीय कार्यालये व त्यांची रचना आणि कार्यपध्दती,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपध्दतीची माहिती,त्याअनुषंगाने व्यावहारिक ज्ञान याचा तर कुठे लवलेशही नाही.ग्रामिण भागाचे प्रश्न,तेथील अडचणी या विषयांवर लिहिण्यासाठी लेखणी सरसावणा-या पत्रकारांची संख्या त्यामुळेच रोडावत चालली आहे.काही विशिष्ठ हेतू डोळ्यांसमोर ठेऊन पत्रकारिता करण्याचे ठरविलेलेले असल्याने यशस्वी पत्रकारितेसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासू वृत्तीलाच तिलांजली देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी एकिकडे कायदा करीत असताना पत्रकारितेतील या अराजक वृत्तीला वेळीच लगाम घालण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्य सरकारने केन्द्र सरकारच्या सहमतीने याच धर्तीवर राज्यपातळीवर ‘पत्रकार नियामक आयोग’  स्थापन करुन त्याला घटनात्मक स्थान देण्याची गरज आहे. या आयोगाने प्रामुख्याने लायसन्सिंग ऑथॉरिटी म्हणून काम पहावे. पत्रकारांसाठी किमान शैक्षणिक अर्हता निश्चित करुन ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे,अशांसाठी वर्षभरात ठराविक कालावधीनंतर आयोगाच्या वतीने पात्रता परीक्षा घ्यावी व त्यात जे उत्तीर्ण होतील त्यांनाच पत्रकार म्हणून काम करण्याची मुभा द्यावी.या परिक्षेसाठी मान्यवर,तज्ज्ञ
पत्रकारांच्या सल्ल्याने स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करता येईल.असे लायसन्स प्राप्त पत्रकार कोणत्याही वृत्तपत्रात त्या-त्या व्यवस्थापनाच्या नियमांना अधिन राहून काम करु शकतील.अशा प्रकारच्या आयोगामुळे पत्रकारितेतील अनिष्ठ पवृत्तींना आळा तर बसेलच त्याशिवाय सुदृढ व सक्षम लोकशाही प्रस्थापित होण्यास मदत देखील होईल.वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनांनी देखील या प्रयोगाला चालना दिली तर भविष्यात चांगले दर्जेदार वार्ताहर त्यांनाही उपलब्ध होऊ शकतात. काळ झपाट्याने बदलतोय.नविन बदल सातत्याने होताहेत.त्यातून निर्माण होणा-या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लोकांना ताकद आणि बळ देण्याचे काम माध्यमांचे आहे.लोक काय बोलतात? लोक काय विचार करतात? आणि लोक काय कृती करतात? या तीन प्रश्नांचा मागोवा घेण्याची ताकद मनात बाळगली तरच माध्यमं सक्षम होतील आणि त्यातून सुदृढ राष्ट्र निर्मितीचा मार्ग मोकळा होईल.

अनिरूध्द देवचक्के,
अहमदनगर.
संपर्क: ९८९०६६४७७९ / ९५५२५८७००४

रविवार, २२ जुलै, २०१२

सिंधुदुर्ग पत्रकार भवनासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल - मुख्यमंत्री

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हा पत्रकार भवनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिले. सिंधुदुर्ग हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म जिल्हा असल्यामुळे खास बाब म्हणून मुख्यमंत्री निधीतूनही आर्थिक मदत देण्याची शक्यता पडताळून पाहू, असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळात आमदार दिपक केसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष किरण नाईक, संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सामंत, नंदकिशोर महाजन, एकनाथ पवार, किशोर जैतापकर आदींचा समावेश होता. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक प्रमोद नलावडे, संचालक श्रीमती श्रध्दा बेलसरे उपस्थित होते.

पत्रकार संघाच्यावतीने जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे भव्य स्मारक असलेले पत्रकार भवन बांधण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय मदतीची गरज आहे. २०१२ हे जांभेकरांचे द्विजन्मशताब्दी वर्ष असल्याने शासनाने खास बाब म्हणून जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी आग्रही मागणी श्री. नाईक यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांनी ज्या पत्रकार संघाकडे स्वत:ची जागा आहे, त्यांना देण्यात येणारे २० लाख रुपये नियमाप्रमाणे मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले. याशिवाय खासबाब म्हणून आणखी २५ लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून देता येतील का हे पडताळून पाहू, असेही सांगितले.

बुधवार, १८ जुलै, २०१२

नगरचे पत्रकार पैसे घेत असल्याचा आरोप

नगर - सर्वसाधरण सभेत अशोभनीय गोंधळ घालण्यासाठी राज्यभर बदनाम असलेव्या नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकांच्या सभेत यावेळी पत्रकारांवर आरोप झाले. हिशोबाची विचारणा सुरू असताना सत्ताधारी संचालकांनी पत्रकारांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून त्यासाठी पाच लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. 
यासंबंधीचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले. त्यावर नगरच्या पत्रकारांमध्ये मोठी खळबळ उडाली. प्रेस क्लबतर्फे याचा निषेध करण्यात येऊन बँकेला एक खरमरीत नोटीस वजा पत्र देण्यात आले. त्यावर बँकेने एकदम नमते घेत अशी काही चर्चाच झाली नसल्याचे प्रेस क्लबला आणि लोकमतलाही लेखी कळविले आहे. दरम्यान, प्रेस क्लबने यासंबंधी लोकमतकडूनही स्पष्टीकरण मागविले आहे. पत्रकारांची अशी बदनामी खपवून घेणार नसल्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी ठणकावून सांगितले आहे. 
सोबत प्रेस क्लबने बँकेला दिलेले पत्र.
(मन्सूर शेख यांचा नंबर 9422236333, किंवा 02412347866).

रविवार, १५ जुलै, २०१२

चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचा कर्मवीर पुरस्कार जाहीर

चंद्रपूर - चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या 'कर्मवीर' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा डॉ.अ.तु. काटकर आणि महेंद्रकुमार जिवाणी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी १ ऑगस्ट रोजी आयोजित सोहळ्यात कर्मवीर पुरस्काराचे वितरण केले जाते. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि पाच हजार एक रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी यंदा डॉ. अ.तु. काटकर आणि महेंद्रकुमार जिवानी यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. काटकर यांनी दैनिक महासागरपासून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर महाविदर्भ, लोकमतचे वार्ताहर, लोकमत समाचारचे पहिले जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी १0 वर्षे काम सांभाळले. पत्रकारितेसोबत त्यांनी सवरेदय शिक्षण मंडळात तब्बल ३५ वर्षे मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणूनही यशस्वी काम सांभाळले.
दुसरे मानकरी महेंद्रकुमार भिखालाल जिवानी हे कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील रहिवासी असून १९८0 पासून अतिदुर्गम तथा नक्षलग्रस्त कुरखेडा येथून वर्तमानपत्रात लेखन कार्याला सुरुवात केली. महाविदर्भ, चंद्रपूर समाचार, साप्ताहिक आदिवासी माणूस, जनवाद, नवभारत, लोकमत, लोकमत समाचार आदी वर्तमानपत्रातून त्यांनी लेखन केले. सद्य:स्थितीत 'विदर्भ चंडिका' या साप्ताहिकातून लेखन सुरू आहे. १९८0-९0 च्या दशकात साधन आणि संपर्काच्या सुविधा अल्प होत्या. त्यामुळे डोक्यावर वृत्तपत्रांचे गठ्ठे घेऊन नदीपार करून कुरखेड्यापर्यंत वृत्तपत्र पोहचवून पत्रकारिता जिवंत ठेवली. पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 'कर्मवीर' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

मुंबई - ठाणे न्यूज अपडेट

१) दै. ' संध्याकाळ ' च्या माजी कार्यकारी संपादिका अनघा धोंड्येनी पत्रकारिता सोडली, सध्या अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ' कंटेंट रायटर ' म्हणून घसघसीत पगाराची नोकरी मिळवली...
२) दै. ' मुंबई लक्षदीप' मधून राम - राम ठोकलेला ले-आऊट आर्टिस्ट संजय कदम सध्या मुंबईतून  नव्यानेच सुरु झालेले  दैनिक झालेले दै. ' सत्यवार्ता ' मध्ये...  दै. 'कोकण सकाळ' मधील जयवंत हाबलेही तेथील संपादकीय विभागात कार्यरत.
३) फ्री प्रेसचे पत्रकार  उन्मेष गुजराती यांचे  'क' करियरचा  या पुस्तकाची  तिसरी आवृत्ती  प्रकाशित... 
४) प्रहार मधून दोघेजण सकाळच्या वाटेवर....बेलापूर सकाळ भवनात मुलाखती  झाल्या...
५) हेमा मालिनीच्या  मराठी ' माझी सहेली ' मासिकातील  ले-आऊट आर्टिस्ट संतोष परड यांचा 
लवकरच 'सहेलीला' साष्टांग दंडवत. चित्रलेखाला जाणार. ऑफर लेटर, समाधानी पगार भेटला...
६) नवशक्तीतून ' नारळ ' भेटलेले  'ते'  अद्याप रिंगणात ; सर्चिंग वेगाने सुरु...
७) ठाण्यातील दैनिकामध्ये आता आणखी एक भर ...' महाराष्ट्र  सम्राट ' दैनिक लवकरच सुरु .
८) जळगावातून आलेल्या अन एका महिलीने चालवलेले दै. ' लोकशाही ' च्या ठाणे आवृत्तीची वाताहत.पेपर स्टॉलवर दिसणे झाले दुर्मिळ ...
९) अभिजित राणेंच्या ' गट्टम ' मुंबई मित्र' दैनिकात मिड- डे चे अभय मोकाशी... ' नवा भिडू -नवा राज ' सुरु झाला मात्र  ले-आउट ढापाळला.
१०)   यंदाच्या पावसाळी अधिवेशनात वार्ताहर ग्यालरीत नवख्या पत्रकारांची झुंबड... 
चकाचक मेकअप करून यायला जमतंय, मात्र बातमी करायला काय जमेना...   रुटीन वर्कचे पत्रकार घेतायत सांभाळून .
११)    ले-आऊट आर्टिस्ट बिपीन अडंगले यांचा गावकरीला राजीनामा ; दोन महिन्यांचे  वेतन थकविले. हलाखीची परिस्तिथी असल्यामुळे हताश झालेत...सद्या नवी मुंबईतल्या एका हिंदी दैनिकात कार्यरत.  
१२ ) मुंबईत आणखी एक दैनिक येणार ... ' ग्लोबल टाइम्स ', जोरदार तयारी सुरु. 


पाठीराखा...

हाती घेवून झेंडा
चालला दर्पणकरांचा
एकमेव पाठीराखा
झुंजार पत्रकारांचा !

ते सांगायला तुम्हाला

मी कशाला पाहिजे
सांगेल कोणीही तुम्हाला
झुंजार बेरक्या पाहिजे !!

तो आरतीकार कमी
भारतीकार जास्त
अवघ्या पत्रकारांचा
मित्र आहे मस्त !!!

By @ विलास फुटाणे

8446796557 

जागरण... ब्रेकिंग की फेकिंग न्यूज?

औरंगाबाद - औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात आणि जळगावसह संपूर्ण खान्देशात वृत्तपत्र सृष्टीत एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे जागरणने नाशिकच्या पोतनीसांच्या मालकीचे गांवकरी दैनिक जागेसह विकत घेतले आणि लवकरच जागरण समुहाचे मराठी दैनिक गांवकरी सुरू होणार...
ही ब्रेकिंग न्यूज आहे की, फेकिंग न्यूज आहे, याची खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या दोन दिवसांपासून सुरू केलेला आहे, मात्र अधिकृत दुजोरा अद्यापही मिळालेला नाही.
जिथे भास्कर तिथे जागरण, ही बातमी आम्ही गतवर्षी प्रसिध्द केली होती, त्यावेळी आम्हाला अनेकांनी मुर्खात काढले होते.मात्र आता या वृत्ताची खात्री पटू लागली आहे. जागरण वृत्तपत्र समुहाच्या काही अधिका-यांनी गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात विशेषत: औरंगाबादेत अनेकदा चाचपणी केली.या चाचपणीत त्यांनी महाराष्ट्रातील एखादया दैनिकाशी  भागिदारी करून, मराठी दैनिक सुरू करण्याची कल्पना पुढे आणली.त्यानुसार पुढारीच्या पद्मश्रींबरोबर त्यांची बोलणीही झाली होती, मात्र पद्मश्रींनी नकार दिल्यानंतर मोठया दैनिकाऐवजी छोट्या दैनिकांशी भागिदारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि त्यांनी गांवकरीशी भागिदारी करण्याचा निर्णय घेतला.पोतनीसांशी चर्चेच्या फे-या झडल्यानंतर आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा चालू आहे.
जागरणने औरंगाबाद आणि जळगावची गांवकरीची जागा विकत घेतली असून,अन्य ठिकाणची बोलणीही चालू असल्याची चर्चा वाढली आहे.
फक्त नाशिक वगळता अन्य ठिकाणी गांवकरी दैनिकाची मालकी जागरणची असेल, असा करारही झाल्याची चर्चा चालू आहे.या चर्चेनंतर आम्ही अनेकांशी चर्चा केली.गांवकरीमधील अनेक महत्वाच्या लोकांशीही चर्चा केली.मात्र आमच्याही कानावर आले आहे, मात्र खरे काय आहे, हे आम्हाला माहित नाही, अशी उत्तरे मिळाली.यावरून गावकरीशी भागिदारी झाली की नाही , याची आता तरी खात्री आम्ही देवू शकत नाही...
ऐवढे मात्र खरे की, जागरण लवकरच औरंगाबाद आणि जळगावहून एकदाच सुरू होईल, हे नक्की...मग ते गांवकरीशी भागिदारी करून किंवा स्वत:चे नविन नाव देवून....

जाता - जाता : वंदन पोतनीस यांनी जागरणशी भागिदारी करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.त्यामुळे ही ब्रेकिंग न्यूज आहे की फेकिंग न्यूज आहे, हे लवकरच कळेल...

गुरुवार, १२ जुलै, २०१२

वर्चस्व कमी झाल्याने 'ब्लैक कोब्रा' थाटतोय आपला दुसरा संसार...

जळगाव -  दोन वर्षा पूर्वी सकाळ मधून कमी केलेला हा 'ब्लैक कोब्रा'  बर्याच वर्षा पासून  काही मोजक्या खाउगुल्या फोटोग्राफर चा मुखिया होता. सेटिंग मध्येही त्याचा चांगलाच हातखंड होता.  त्याची टीम आणि तो आता कुठल्याही दैनिकात नसताना फोटो पत्रकारांचा  अध्यक्ष म्हणून मिरवीत होता  मात्र नव्याने आलेल्या फोटो पत्रकारांना हा प्रकार  मान्य नव्हता.  त्या मुळे दैनिकात  सध्या कार्यरत  असलेल्या  फोटो पत्रकारांनी वेगळी संघटना स्थापन केली. त्या मुळे या 'ब्लैक कोब्रा'  चे वर्चस्व कमी झाले. यातच शहरातील एका स्टूडीओ चालकास मारहाण झाली व पोलिसातील  हा प्रकार माझ्या मध्यस्तीने मिटवण्यात आला  या मुद्याचे भांडवल करून जिल्ह्यातील सर्व प्रेस फोटोग्राफर , स्टूडीओ, इन डोअर, आउट डोअर फोटोग्राफर यांची संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न  करून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करतोय.    संघटनेच्या नवीन कार्यकारणी वर  त्याच्या सोबतचे जुने एक दोन सडके आंबे आहेत. 'ब्लैक कोब्रा' व सडक्या आंब्यावर इतर सदस्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

मंगळवार, १० जुलै, २०१२

त्रिकुटामुळेच अरूण खोरेंचा राजीनामा

पुणे - पद्मश्रींच्या पुणे कार्यालयात गेल्या महिनाभरात एकाहून एक मोठे फटाके उडत आहेत.  त्यामुळे वरपासून खालपर्यंत अत्यंत अस्वस्थता आणि गढूळ वातावरण आहे. पुढारीतील कामकाजाला आणि नंदू,- संजू-अंजू या त्रिकुटाच्या राजकारणाला वैतागून संपादक अरुण खोरेंनी अखेर रामराम ठोकला.  नेहमीप्रमाणे कोणत्याही नव्या माणसाला टिकू न देता आपले स्थान बळकट करण्याच्या नंदू , संजू आणि अंजू मॅडमच्या कारस्थानांनी खोरे कमालीचे त्रस्त झाले होते. त्यामुळे सकाळ, लोकसत्ता,लोकमत अशा परंपरेतून आलेल्या आणि श्रेष्ठ संपादकांसमवेत काम केलेल्या खोरेंनी  अखेर राजीनामा दिला. दोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने संजय आवटे यांना पायउतार व्हावे लागले होते.अत्यंत अभ्यासू व दर्जेदार लिखाण करणारे संजय आवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर पद्मश्रींनी नंदु आणि संजुला चांगलेच फैलावर घेतले होते.

.पुणे कार्यालयातील या नेहमीच्या प्रकारांनी पद्मश्री आणि विशेषत: योगेशदादा कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. 

तरुण भारतच्या विदर्भ आवृतीची घोडचूक

नागपूर - समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या प्रथम स्मृतिदिनी सोमवार, ९ जुलै रोजी आनंदवनात वृक्षारोपण करून कार्यक्रम पार पडला. त्याचे वृत्त तरुण भारत च्या विदर्भ आवृतीने मुख्य अंकाचं पान २ वर सचित्र प्रकाशित केले. मात्र यात एक मोठी घोडचूक वरोरा येथील स्थानिक वार्ताहराने दिलेल्या बातमीत झाली आहे.
 या बातमीत त्यांनी बाबा आमटे यांचा तिसरा स्मृतिदिनी सोमवार, ९ जुलै रोजी पार पडल्याचा उल्लेख आहे. शिवाय बाबा आमटे यांचे ९ जुलै २००९  व साधनाताई आमटे यांचे ९ जुलै २०११ ला निधन झाले होते. त्यामुळे दोघांचाही स्मृतिदिन एकाच दिवशी होता. असा जावई शोध केला आहे. वास्तविक पाहता बाबा आमटे यांचे निधन ९ फेब्रुवारी २००८ रोजी झाले, हे सर्व जगाला ठाऊक आहे. मात्र हि बाब स्थानिक वार्ताहर, जिल्ह्य प्रतिनिधी, उपसंपादक यांना ठाऊक नाही हि शरमेची बाब आहे.  हि बातमी वाचून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

रविवार, ८ जुलै, २०१२

पत्रकारावरले हल्ले , अधिवेशनात मांडा...

पत्रकारावरले हल्ले
अधिवेशनात मांडा
हल्ले करणारे गुन्हेगार
तुरंगामध्ये कोंडा !

गुन्ह्यान्यांची नोंद होते
पण कारवाही शून्य
नुसत्याच घोषणेवर
मानावे लागते धन्य !!

आता घोषणा नको
त्यावर हवी अक्शन
नाहीतर पत्रकारवार
पुन्हा होईल रिअक्शन !!!
- विलास फुटाणे
   8446796557 

महिला बीडीओंना सळो की पळो करणारा वार्ताहर

घनसांगवी - भोपाळ शेठच्या पेपरच्या येथील वार्ताहरांने महिला बीडीओंला अनधिकृत कामे करण्यासाठी दबाब टाकला, मात्र त्यांनी नकार देताच, त्यांना त्रास देण्याचा उद्योग या लपूटसुंग्या वार्ताहराने सुरू केला आहे.
नावाला डॉक्टर असलेल्या या वार्ताहराने नेहमीच्या सवयीप्रमाणे महिला बीडीओना अनधिकृत कामे करण्यास सांगू लागला.जालना जिल्ह्यात सर्वात स्वच्छ प्रतिमा असलेल्या या महिला बीडीओने तत्कालीन जालना ब्युरो चिफकडे तक्रार केली.मग ब्युरो चिफने संबंधितांना झालेला प्रकार सांगितला, तर तुला काय करायचे आहे, त्याला काय करायचे आहे ते करू दे म्हणून त्यालाच झापण्यात आले.
मग काय, या वार्ताहराला अधिक बळ आले.मग त्याने या महिला बीडीओला सळो की पळो करून सोडले आहे.घनसांगवीचा वार्ताहर व औरंगाबादेत बसलेल्या संबंधितांमध्ये साटेलोटे असल्याची उघड चर्चा जालना जिल्ह्यात चालू आहे.घनसांगवीच्या वार्ताहराला कंटाळलेल्या या महिला बीडीओ आता चक्क स्टेट इडिटरकडेच तक्रार केल्याचे समजते.त्यानंतर मात्र संबंधिताचे धाबे दणाणले आहे.

न्यूज-फिचर्स एजन्सींना लागणारी घरघर आणि मिडिया प्लस

कोणतीही फिचर-न्यूज एजन्सी चालवायची म्हटली की, प्राथमिक टप्प्यात किमान सात ते आठ अनुभवी पत्रकार, तितकेच डिझायनर, एक-दोन मुद्रितशोधक एवढं मनुष्यबळ आवश्यकच ठरतं. त्यानंतर यांत्रिक दृष्ट्याही परिपूर्ण असणं गरजेचं असल्याने तो खर्चही सुरुवातीलाच करावा लागतो. साधारण लाखाच्या घरात हा संपूर्ण खर्च जातो. एवढं करूनही दैनिकं आपली सेवा घेतील, याची काही शाश्वती नसते. मग काम मिळविण्यासाठी प्रयत्न करणं आणि सुरुवातीची सहा महिने संस्था जेव्हा पैशाला भार ठरू लागते, तेव्हा तिला घरघर लागते...
कुण्याही दैनिकाच्या एका पानासाठी लागणारा खर्च हा किमान दहा हजारांच्या घरात जातो. एक उपसंपादक, एक डिझायनर, पानासाठी मजकूर लिहिणारे लेखक-रिपोर्टर, मुद्रितशोधक या सर्वांचा पगार आणि किरकोळ बाब विचारात घेता विजेचे बील...असा हा संपूर्ण खर्च किमान दहा हजारांत जातो. आजघडीला अनुभवी उपसंपादक मोठ्या दैनिकांनी काबीज केलेत. त्यामुळे मध्यम आणि छोट्या दैनिकांनी नवीन उपसंपादक घ्यायचा म्हटला तरी दहा ते बारा हजार पगार मागतो. डिझायनर तर मिळतच नाही, मिळाले तरी परवडत नाहीत म्हणून डिटीपी ऑपरेटरवर काम धकवले जाते. तोही पाच ते सहा हजार पगार मागतोच. यानंतर लेखक-वार्ताहरांचे मानधन, मुद्रितशोधकाचे मानधन हा सगळा खर्च असतो. एवढे सर्व मनुष्यबळ कामाला लावल्यानंतर त्यापासून आऊटपूट मात्र दोन qकवा फार फार झालेच तर तीन पाने मिळतात. अशा परिस्थितीत मध्यम आणि छोट्या दैनिकांच्या अत्यंत उपयोगी पडतात त्या फिचर्स संस्था. मिडिया प्लसचाच विचार केला तर अवघ्या दीड-दोनशे रुपयांपर्यंत मिडिया प्लस फिचर्स पान पुरवते. म्हणजे एक पान मिळण्याचा खर्च हा महिन्याकाठी चार-साडेचार हजारांपर्यंत जातो. अशा परिस्थितीत फिचर्स एजन्सीकडून पान घेणे कधीही मध्यम दैनिकांना परवडते.
मिडिया प्लसची सुरुवात करण्याचा विचार मी आणि माझ्या मित्रांनी केला, तेव्हा हे लक्षात घेतले की, आधीच्या फिचर्स संस्था बंद का पडल्यात? तेव्हा हे लक्षात आलं की, दहा हजार रुपये महिना खर्चून दैनिके पानं त्यांच्या कार्यालयात काढतील, पण फिचर्स एजन्सीला तीन- चार हजार रुपये देण्यालाही मागेपुढे पाहतील. काही दैनिकांनी तर महिनाभर पाने वापरून फिचर्स एजन्सीला हात दाखवला होता. वास्तविक फिचर्स एजन्सी चालवणारी मंडळी ही सुद्धा माणसेच. त्यांनाही पोट आहेच. पण तरीही काही दैनिकांनी त्यांचे पैसे बुडवणे हे जरा खटकणारेच होते. त्यानंतर मिडिया प्लस कशा पद्धतीने काम करेल, याचे एक नियोजनच आम्ही तयार केलं. आम्ही सर्व मिळून संचालक बारा जण. सर्वांनी ज्याचा त्याचा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाने कामासाठी लॅपटॉप घेतला आणि कार्यालयासाठी जो खर्च होता, तो सर्वांनी मिळून केला. त्यानंतर आम्हा सगळ्यांचे संपर्क आम्ही जमा केले आणि त्यांना आधी फिचर्स सेवा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या माध्यमातून आणखी काही दैनिके जोडली गेली. आता १८ दैनिकांना फिचर्स सेवा सुरू आहे. केवळ फिचर्स सेवेपुरते मर्यादित न राहता, ३२ दैनिकं वृत्तसेवा घेताहेत.  मिडिया प्लसच्या सहकार्याने अकोला, बुलडाणा आणि जालन्यात वृत्तपत्रेही सुरू झालीत. संस्था सुरू केली म्हणजे संलग्नित कामेही आपोआप मिळतात. पब्लिकेशनची कामेही मिडिया प्लसकडून सुरू असतात. कामं वाढल्याने मनुष्यबळही वाढवावं लागलं... पण हे करताना सुरुवात आम्ही शून्यापासून ठेवल्याने नुकसानीचं तितकंच टेन्शन आम्हाला आलं नाही. करणारे आम्हीच होतो, कुणी येऊन काम करेल आणि मग ते काम होईल, असं नव्हतं. त्यामुळे फायदा  झाला नाही तरी नुकसान होणार नाही, हे आम्हाला माहीत होतं. इतर फिचर्स संस्थांनी जसं केलं, आधी भलंमोठं भांडवलं जमा करून कामाची प्रतीक्षा केली, तशी गरज आम्हाला कधीच भासली नाही.
-मनोज सांगळे,
कार्यकारी संचालक, मिडिया प्लस
www.mediaplusabd.blog.com

शुक्रवार, ६ जुलै, २०१२

लोकमत कर्मचा-यांची नागपुरात निदर्शने

नागपूर - न्यायमुर्ती मजिठिया वेतन आयोगाची लोकमतने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी लोकमत श्रमिक संघटनेच्या वतीने लोकमत भवनसमोर निदर्शने करण्यात आली.या निदर्शनामुळे लोकमत प्रशासनची कोंडी झाली होती.
पत्रकार - गैरपत्रकार कर्मचा-यांच्या वेतनवाढी संदर्भात न्यायमुर्ती मजिठिया वेतन आयोग नेमण्यात आला होता. केंद्र सरकारने ११ नोव्हेबर २०११ रोजी या आयोयाची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश जारी केला.मात्र लोकमत प्रशासनाने त्याची अद्याप अंमलबजावणी केली नाही.
या आयोगाची अंमलबजावणी करावी,या मागणीसाठी लोकमत श्रमिक पत्रकार संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.त्याचाच भाग म्हणून, लोकमत भवन समोर जोरदार निदर्शने करण्यात आली व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय येवले यांनी, या वेतन आयोगाची अंमलबजावणी न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा दिला.यावेळी हितवाद श्रमिक संघटनेचे सरचिटणीस काशिनाथ मटाले यांनी मार्गदर्शन केले.

अखेर कोतकर च्या गळाला 'क्राइम' चा मासा लागला

जळगाव - सकाळ चा स्टार रिपोर्टर म्हणजे कोतकर, मिटिंग मध्ये साहेबांना  शहरातील छोट्या मोठ्या घटना बढून-चढून सांगण्यात मास्टर.  तर साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी सकाळ ला लागलेला अतिउत्साही रईस शेख.  शेख सकाळ ला लागल्या लागल्या माने यांनी कोतकर कडील क्राइम बीट काढून शेख यांच्या कडे सोपविला. शेख ला आव्हानात्मक बीट मिळाल्याने आनंद झाला तर कोतकरचा हिरमोड झाला. त्या दिवसापासून गेलेले  बीट मिळवण्यासाठी कोतकर ने सर्वोतोपरी प्रयत्न केले , माने यांचे कान हि कोरले मात्र काहीही उपयोग झाला नाही. बऱ्याच वेळेस माझे मानसिक संतुलन ठीक 
नाही अशी बतावणी करून सुटीवर निघून जायचा तर कधी मी लोकमतला जाणार असे पिल्लू सोडायचा. शेवटी माने यांची बदली चे निस्च्छित झाल्यावर त्यांनी बीट ची खांदेपालट करण्याचे ठरविल्यावर  रईस शेख ला महापालिका बीट दिला गेला आणि कोतकर ला क्रीम माफ करा  'क्राइम'.

गुरुवार, ५ जुलै, २०१२

ब्ल्यू फिल्म पाहणा-या रिपोर्टरला अभय तर ब्युरो चिफला नारळ

जालना - भोपाळ शेठच्या पेपरमधील एक रिपोर्टर रात्रीच्या वेळी ब्ल्यू पाहताना आढळून आला होता.त्याची तक्रार ब्युरो चिफने व्यवस्थापकांकडे केली होती.मात्र  रिपोर्टरला प्रमोशन तर ब्युरो चिफला नारळ देण्यात आल्याने पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येच्या गळ्यात मणिहार या म्हणीचा प्रत्यय येत आहे.
भोपाळ शेठचे येथील कार्यालय कामाऐवजी फालतू उचापतीचे केद्र बनले आहे. जालन्यात अंक सुरू झाल्यानंतर पिंपळगाव रेणुकाईच्या एका एजंटाने वितरण व्यवस्थापकाच्या विरोधात चार पानी तक्रार नोंदविली होती.त्याची शाई वाळते तोच, कार्यालयातील एक रिपोर्टर रात्रीच्या वेळी चक्क बातम्याऐवजी ब्ल्यू फिल्म पाहत असल्याचे उघडकीस आले होते. विशेष म्हणजे हा रिपोर्टर सेक्स विषयक माहितीचे प्रिंटही काढत असत.एकदा ही प्रिंट प्रिंटरमध्ये अडकली, ती अर्धवट प्रिंट ब्युरो चिफच्या हातात लागताच, त्याने रिपोर्टरचा हा प्रताप व्यवस्थापकांकडे कळविला.व्यवस्थापकांनी या रिपोर्टरकडून माफीनामा लिहून, प्रकरण आपसात मिटविले.कारण या रिपोर्टरचे हात लांब होते.
कालांतराने या प्रतापी रिपोर्टरने ब्युरो चिफचाच काटा काढला.त्याने ब्युरो चिफच्या काही गोष्टी गोळा करून, व्यवस्थापकांना कळविल्या.व्यवस्थापकांनी मग ब्युरो चिफला नारळ दिला, तर ब्ल्यू फिल्म पाहणा-या रिपोर्टरला पगारवाढ करून, प्रमोशन दिले.यालाच म्हणतात,  भोपाळ शेठच्या पेपरमध्ये वशिला लांब असेल की,कितीही दिवे लावले तरी,  काहीच वाकडे होत नाही.

ता.क.-  माफीनामा लिहून देणा-या या प्रतापी रिपोर्टरचे नाव आम्ही मुद्दाम डिलीट केले आहे.

बुधवार, ४ जुलै, २०१२

`आनंदी' ग्रुपला शेठजींची गचांडी.

पुण्यातील बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी ओवाळून टाकलेल्या `नेक्स्ट' पिढीचे जणुकाही आपणच ठेका घेतल्याच्या अविर्भावात वावरणा-या आनंद आणि त्याच्या अभयसह सर्व साथीदारांना आज का आनंदच्या शेठजींनी घरचा रस्ता दाखवला. त्यांनी मोठ्या विश्वासाने या ग्रुपला आपला नव इंग्रजी पेपर काढण्याचे पूर्णाधिकार दिले होते. त्यासाठी घसघशीत मोबदला मोजला. पण या नेक्स्ट ग्रुपने खाल्ल्या मीठाची जाणीव न ठेवता नागपूरच्या बाबुजींकडून सुपारी घेऊन या शेठजींनी इंग्रजी पेपरमध्ये गुंतवून गाफील ठेवले. त्यामुळे बाबुजींचा हिंदी पेपर पुण्यात जोरात झळकला. त्याचा मोठा दणका आज का आनंद ला बसला. एवढेच नव्हे तर संध्यानंदचे नवे रुपडे वाचकांच्या पसंतीस न उतरल्याने त्याचाही खप झपाट्याने खाली आला. मोठ्या आत्मविश्वासाने इंग्रजी पेपरमध्ये पदार्पण केल्यावर पहिल्या दिवसापासून त्यांना मोठा तोटा सोसावा लागतो आहे. अर्थात शेठजी चतुर आहेत. जुन्या अनुभवाच्या बळावर काही काळाने ते पुन्हा जोमाने उभे राहतील. त्यासाठी त्यांनी सुरुवातही केली आहे. सर्वप्रतहम त्यांनी इंग्रजी वृत्तपत्राची जबाबदारी दिलेल्या आनंद आणि त्याच्या साथीदारांना 1 जुलै पासून काढून टाकले. त्यामुळे संपादीका विनिताही फणकार्याने निघून गेल्या. गेल्या काही वर्षात या ग्रुपने वृत्तपत्र मालकांना लुबाडण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात केले. कायम `पाखमोडें' च्या सहवासात असलेल्या अभयच्या मदतीने आनंदने या नव्या ग्रुपची स्थापना केली. सकाळमध्ये त्यांनी दिड वर्षे भयंकर धुमाकूळ घातला. आपल्या मर्जीतल्या अमित आणि अपर्णाला जगभर फिरवून आणले. महिन्याकाठी लाखभर रुपये मानधन घेणारा अभय आणि केसरीत मोडक्या खुर्चीत  बसणारा अभय हे एकच व्यक्ती आहे यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. पण ती केवळ आनंदच्या मायेची कमाल होती. मात्र, या मंडळींचे उद्योग जसे उघड झाले तसे एका दिवसात सकाळमधील पॉवरबाज अभिजीतने त्यांना तेथून अक्षरश: पळवून लावले. त्यानंतर अशाच भारी गप्पा मारून या ग्रुपने पुढारीकारांनाही गंडा घातला. चाणाक्ष योगेशदादांच्या लक्षात ही फसवेगिरी आली. त्यांनी खास कोल्हापुरी इंगा दाखवून त्यांना तेथून हटवले. एवढेच नव्हे, तर त्यांचे मानधन(?)ही प्रलंबित ठेवून आपण कच्च्या गुरुचे चेले नाहीत हे दाखवून दिले. त्यापाठोपाठ आनंद ग्रुपच्या शेठजींनी या आनंदरावांना गचांडी दिली. आता नागपूरचे बाबुजी या ग्रुपच्या प्रेमात असून पुण्यात दिव्य मराठीला टक्कर देण्यासाठी आपला पेपर अधिक सक्षम करण्याची सुपारी या ग्रुपला देण्याबाबत त्यांची बोलणी सुरू आहेत. त्यामुळे येत्या 1 आगस्टपासून बाविस्करांना या ग्रुपशी सामना करावा लागणार आहे.

जय महाराष्ट्रच्या संपादकीय विभागात महत्त्वाच्या पदांसाठी अनेकांची लाँबिंग

जय महाराष्ट्र या चँनेलच्या संपादकीय विभागात अनेक महत्त्वाच्या पदांसाठी लाँबिंग सुरू झाले आहे. यामध्ये नवशक्तिचे माजी संपादक सचिन परब, झी चोवीस तासचे माजी संपादक मंदार परब यांची नावे आघाडीवर आहेत. अशातच राणे यांच्या प्रहारमध्ये दोन वर्षे राजकीय बीट सांभाळणा-या आणि सध्या दै. कृषीवलमध्ये राजकीय बातमीदार असलेल्या आनंद गायकवाड यांनाही जय महाराष्ट्रच्या संपादकीय विभागात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
 दोन्ही परब मंडळींचा मुंबई सोडून इतरत्र चँनेलसाठी पत्रकारितेचा अनुभव तसा कमीच आहे. त्यातुलनेत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात चँनेलसाठी पत्रकारिता केल्याचा अनुभव गायकवाडकडे अधिक आहे. मात्र, साम टिव्ही वगळता गायकवाड यांच्याकडे चँनेलच्या संपादकीय विभागात मोठ्यापदावर काम केल्याचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता कमीच आहे. परब मंडळींनी जोरदार लाँबिंग केले आहे. तर दुसरीकडे गायकवाड यांच्याकडे संपादकीय विभागातील महत्त्वाची जबाबदारी टाकावी, यासाठी काहींनी राणेंकडे शब्द टाकला आहे.

सोमवार, २ जुलै, २०१२

'लोकमत समाचार' पुणे आवृत्तीचा शुभारंभ

महाराष्ट्राच्या जनमनात वसलेल्या लोकमत समूहाचे हिंदी दैनिक ‘लोकमत समाचार’च्या पुणे आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज (सोमवारी) सकाळी झाले. स्वारगेटस्थित गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात सकाळी साडेअकराच्या सुमारास पार पडलेल्या या समारंभात लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खा. विजय दर्डा, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्यसभा सदस्य व वरिष्ठ स्तंभलेखक बलबीर पुंज, प्रख्यात शायर मुनव्वर राणा, द न्यू इंडियन एक्स्प्रेसचे संपादकीय सल्लागार प्रभू चावला, तहलकाचे संपादक तरुण तेजपाल हेही या समारंभास उपस्थित होते. यावेळी लोकमत समूहाचे कर्मचारी, तसेच लोकमतचे नियमित वाचक असणारे पुणेकरही मोठ्या संख्येने हजर होते.
स्वतंत्र विचारांच्या वृत्तपत्रांची देशाच्या प्रगतीसाठी गरज आहे. 'लोकमत'ने नेहमीच निर्भीड वृत्तपत्रकारिता केली आहे. 'लोकमत समाचार'च्या माध्यमातून या कामास आणखी बळ मिळेल, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पुणेकरांनी जसा मराठी आवृत्तीला भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद हिंदी आवृत्तीलाही मिळेल अशी आशा लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी व्यक्त केली. हिंदी भाषिक वृत्तपत्रे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाहीत, तरीही देशाला जोडण्याचे काम हिंदी वृत्तपत्रे करत असतात. युवा वर्गाची राजधानी असलेल्या पुण्यात हिंदी वृत्तपत्र सुरू करण्याचे स्वप्न मी पाहिले होते, ते आज पूर्ण झाले असे खा. विजय दर्डा यावेळी म्हणाले.
नागपूर, औरंगाबाद, अकोला, कोल्हापूर आणि जळगाव पाठोपाठ आता पुण्यातून प्रारंभ होत असलेल्या या राष्ट्रीय हिंदी दैनिकाची ही सहावी आवृत्ती आहे. झपाट्याने कॉस्मोपॉलिटीन रुपांतरीत होत असलेल्या महाराष्ट्रातील हिंदी भाषकांसाठी १४ जानेवारी १९८९ नागपूर येथून ‘लोकमत समाचार’ सुरू करण्यात आले.

रविवार, १ जुलै, २०१२

बेरक्याचा बेरकीपणा

बेरक्याचा बेरकीपणा
सत्यासाठी आहे
त्याची लढाऊ वृत्ती
नित्यासाठी आहे !

पत्रकारांचा आहे तो
झुंजार पाठीराखा
सूर्याजी पिसाळा सारखा
तो देत नाही धोका !!

बघा मधून मधून तो
वाजवीत असतो पुंगी
अन्याय करणाऱ्यांची
वर करीत असतो लुंगी !!!

- by विलास फुटाणे
8446796557
 
* विलास फुटाणे हे प्रसिध्द कवी असून, दिव्य मराठीत त्यांचे वात्रटिकांचे मिरची नावाचे सदर लोकप्रिय आहे.

न्यूज अपडेट...

1 ) ई टीव्हीमध्ये जीके गँग प्रसिद्ध होती. त्या गँगचा म्होरक्या एक महिन्यापूर्वी झी 24 तासमध्ये इंटरव्ह्यू देऊन गेला. ही गँग ई टीव्ही मध्ये प्रचंड स्ट्राँग होती. हा जीके झी 24 तासमध्ये आल्यावर त्या वजनदार व्यक्तीला आनंद झाला. ई टीव्हीतली जीके गँग पुन्हा झी 24 मध्ये भरवू, त्यात आयबीएनमधले बाईले आणू अशी स्वप्नं पाहिली जात होती. मात्र जीकेचं झी 24 तासमध्ये सलेक्शन झालं नाही.त्यामुळे जीके गँग हैदराबादच्या आठवणीत मग्न झाली आहे.
जीके झी 24 तासमध्ये आला असता, तर मजा झाली असती असा त्यांचा सुर आहे. तर तिकडे झी 24 तासमधली वजनदार व्यक्ती  जीकेरूपी विठ्ठलाला चंद्रभागेत बुडवून नव्या विठोबाच्या भक्तीत मग्न झाल्याचं कळतं आहे.

2) सोलापुर शहर वृत्तपञ विकेता संघटनेकडून मोफत वह्यांचे वाटप विकेत्यांच्या गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी कार्यकमाचे अध्यक्ष पुढारीचे हेमंत चौधरी, पृमुख उपस्थिती लोकमतचे नितीन खोत, बुरडे, राजेश केकडे, आडकी, दिव्यमराठीचे संतोष कांबळे, रोहित महिंदकर, सकाळचे अविनाश कानडे, पुण्यनगरीचे नाना कुलकर्णी, भरतकुमार मोरे यांची होती. यावेळी संघटने पदाधिकारी तसेच वृत्तपञ विकेते उपस्थित होते.

फेसबुक वर शेअर करा

Facebook