> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२

'लोकमत'ला जळगावात माणसे मिळेनात!

जळगाव - दुप्पट पगाराचे आमिष दाखवूनही अखेर 'लोकमत'ला जळगावात 'दिव्य' किंवा 'सकाळ'मधला एकही माणूस फोडता आला नाही. शेवटी गेल्या महिनाभरापासून चालविलेली बहुचर्चित मुलाखत प्रक्रिया गुरुवारच्या मुलाखतीनंतर थांबविण्यात आली. विजय कोळी या 'देशदूत' मधील शिकाउ वार्ताहराला 6000 वरून 11000 रुपये पगार देण्यात आलाय.  याशिवाय 'दिव्य मराठी'मध्ये चकरा मारून व ग्रामीण आवृत्तीची वाट पाहून थकलेले 'पुण्यनगरी'तील ट्रेनी प्रशांत भदाणे यांनाही जेमतेम पाच आकडे गाठणारा दुप्पट पगार दिला गेलाय. शेवटी देशदूत व पुण्यनगरी अशा दुय्यम फळीतील माणसांना संधी देवून आता 'लोकमत' मैदानात उतरून 'दिव्य'शी दोन हात करू पाहणार आहे. 'दिव्य' आव्हानाशी मुकाबला करण्यात 'विजयी' होवू शकणारच संपादक हवा होता, अशी आता 'लोकमत'मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे व्यवस्थापनही गृपमधीलच कुणाला 'बावि' (सॉरी भावी) संपादक म्हणून सोयी'स्कर'पणे आणावे की नवा, ताज्या दमाचा गडी पाहावा, यावर खल करीत आहे. जळगाव-पुणे-औरंगाबाद गाजवून परतलेले आणि जळगाव-अकोला-अमरावती-नाशिक असे खानदेश-विदर्भ फिरून आलेलेही 'प्रवासी संपादक' होवू पाहताहेत... अशा स्थितीत मग घराच्या माणसांपेक्षा बाहेरचेच बरे, यातच 'विजय' मानणारीही  मंडळी आहे. शेवटी काय होते, ते लवकरच दिसेल...  

दिव्य मराठीमुळे खपावर परिणाम झाल्यामुळे लोकमतची तडफड सुरू झाली असून,त्यातून सावरण्यासाठी अंकाची किंमत 3 रूपयाऐवजी 2 रूपये केली आहे. शिवाय वृत्तपत्र विक्रेत्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक स्कीम राबविण्यास सुरूवात केली आहे.

आजपर्यंत क्र.1 वर असलेल्या लोकमतला दिव्य मराठी हा जबरदस्त स्पर्धक मिळाला आहे. दिव्य मराठीमुळे प्रिंट मीडियातील कर्मचाऱ्यांच्या पगारीही वाढल्या आहेत, हेही नसे थोडके...

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

जळगावात लोकमत व्यवस्थापन हादरले ! किंमत उतरविली !!

जळगाव -'दिव्य मराठी'ला जळगावात येत्या १० सप्टेबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळात 'दिव्य मराठी'ने सर्वच पातळ्यांवर प्रतिस्पर्धी 'लोकमत'ला मागे टाकले आहे. बातम्यांचा दर्जा, विश्वासार्हता, निर्भीडता यात तर 'दिव्य' सरस आहेच शिवाय घरकुल घोटाळा उघडकीस आणतानाच पालकमंत्री देवकर यांचाही भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. वृक्षतोडीबाबत 'दिव्य'ने निर्माण केलेली जनजागृती अतुलनीय आहे. जेव्हा या प्रश्नावर त्यांनी पोलीसा अधीक्षकांना झोडून काढले, तेव्हा समस्त जळगावकर वाचकांनी वृत्तपत्राला सलाम केला. वितरकांना वेळोवेळी मदत करण्यातही 'दिव्य' पुढे आहे. 35  हाजाराचे बुकिंग झाल्यानंतर वर्षभरात 45 हजारावर पोहोचलेल्या 'दिव्य'ची वार्षिक वर्गणी बुकिंग परवा, 23 ऑगस्टपासून सुरू झाली. (त्याची ही जाहिरात पाहा) ज्या धडाक्यात बुकिंगला पहिल्या दोन दिवसात प्रतिसाद मिळाला आणि एजंट/विक्रेते/हॉकर्सचा प्रतिसाद पाहता यंदा 50 हजाराचा टप्पा गाठला जाईल, ही चिन्हे आहेत. त्यामुळेच लोकमत व्यवस्थापन कमालीचे हादरले आहे. 
रिटर्नचे वाढते गठ्ठे, खपाचा घसरता आलेख आणि सर्वात महत्त्वाचे वाचकांमध्ये गमावलेली पत, खालावलेली विश्वासार्हता अशी अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. शहराशी नाळ जुळू न शकलेले सोलापुरी संपादक सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. धडाडीच्या, तरुण-तडफदार आणि या मातीतील नव्या संपादकाचा व्यवस्थापनाकडून जोरात शोध सुरू आहे. 'दिव्य'च्या बुकिंग धडाक्याने हादरलेल्या 'लोकमत' व्यवस्थापनाने 24 ऑगस्टच्या अंकात पहिल्या पानावर अगदी वर मास्ट हेडखाली आठ कॉलम जाहिरात छापलीय - वाचकांनो थांबा लोकमत घेवून येत आहे...
लोकमत काय घेवून येणार त्याचा दुसरे दिवशी 25 ऑगस्टला काही उलगडाच झाला नाही. लोकमत व्यवस्थापनाने विक्रेत्यांची दीर्घ बैठक घेतली. निर्णय झाला - अंकाची किंमत कमी करायची. रोज तीन रुपयात अंक देण्याऐवजी
आजपासून 'लोकमत'चा जळगावातील अंक दोन रुपयात मिळेल. एजंटचे 30  टक्के म्हणजे तीन रुपयात 90 पैसे हे कमिशन दोन रुपये किमतीतही कायम ठेवले जाणार आहे. 'दिव्य मराठी' बुकिंगला 199 रुपये घेते शिवायला महिन्याला 60 रुपये  ... त्या धोरणाला आम्हीही साठ रुपयातच महिन्याचा अंक देतो, या मार्गाने शह देण्याचा 'लोकमत'चा प्रयत्न आहे. मात्र, अंकाची किंमत कमी केलीय; मार्केटमधील पत आधीच संपलीय. 'दिव्य मराठी' कुणाच्या बापाला घाबरत नाही. ते 60 रुपये घेवून सुरेश जैन यांची दणक्यात वाजवू शकतात; ती हिंमत तुम्ही दाखवाल का, असा प्रश्न जर 'लोकमत'कारांना एखाद्या वाचकाने केला तर त्यांच्याकडे काही उत्तर आहे का? जर तुम्ही ते करू शकत नसाल तर आम्हाला तुमचा पेपर फुकटातही नको; हेच वाचक सांगणार. 'बेरक्या'ला विश्वास आहे की जळगावातील प्रत्येक वाचक हाच प्रश्न विचारेल आणि 'लोकमत'कडे त्याचे उत्तर नसेल. भोपाळच्या शेठने काय मस्त मारलीय नागपूरच्या शेठची! आजवर महाराष्ट्रातील लहान-मध्यम पेपर संपविलेत. किती माज आला होता; आता सारा नक्षा उतरलाय. अब आया उट पहाड के नीचे...

http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages/23082012/BP2660903-large.jpg

भामटा कोण आणि भामटे कोण ?

नगर - नगरमध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या रिपोर्टरमध्ये फूट पडली असून, त्यांच्यात शितयुध्द चालू आहे. हे रिपोर्टर ऐकमेकांना भामटे म्हणून बोट दाखवित असून, ऐकमेकांविरूध्द निवेदने देत आहेत.
समजलेले कारण असे की, माजी पोलीस अधीक्षक हे ठाम मत चॅनेलच्या रिपोर्टरचे खास मित्र होते.या ठाम मत रिपोर्टरच्या सांगण्यावरून पोलीस अधीक्षकांनी अनेक ठिकाणी छापे मारून अवैध धंदे बंद केले होते.त्यामुळे अन्य काही इलेक्ट्रानिक मीडिया रिपोर्टरचे हितसंबंध दु:खावले होते.नगरच्या या सिंगम पोलिस अधीक्षकांची मुंबईला बदली होताच, ठाम मतचा रिपोर्टर एकाकी पडला आहे. त्याच्याविरोधात सध्या अन्य रिपोर्टर एकत्र येवून,  विरोधात मोहीम उघडली आहे.त्याला भामटा म्हणून हे रिपोर्टर चिडवत असून, भामट्यावर कारवाई करावी म्हणून पोलिसांना निवेदनही दिले आहे.आता भामटा कोण आणि भामटे कोण, याबाबत नगरमध्ये उलट -सुलट चर्चेला ऊत आला आहे.

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

बेरक्याने गाठला सहा लाख हिटस् चा टप्पा...

 औरंगाबाद - 21 मार्च 2011 रोजी सुरू करण्यात आलेल्या बेरक्या उर्फ नारद ब्लॉगचे 30 सप्टेंबर 2011 रोजी वेबसाईटमध्ये रूपांतर करण्यात आले. ब्लॉगने 3 लाख 10 हजार तर नव्या वेबसाईने 3 लाख हिटस् चा टप्पा गाठला आहे. जुन्या व नव्या हिटस्ची संख्या सहा लाखापेक्षा अधिक झाली आहे.
मराठी ब्लॉग विश्वात सर्वाधिक हिटस् संपादन करणारा बेरक्या उर्फ नारद हा ऐकमेव ब्लॉग आहे.विश्वसनीय बातम्या, पडद्यामागच्या हालचालीबरोबर भविष्यात काय होणार, याबाबत देण्यात येणारा तंतोतंत अंदाज खरा ठरल्यामुळे बेरक्या उर्फ नारद हा सुपर - डुपर हिट ठरला आहे.लोकांना पत्रकारांच्या बातम्याची उत्सुकता आहे तर त्याच पत्रकारांना बेरक्याची बातम्यांची उत्सुकता आहे.
बेरक्या ब्लॉग बंद होण्यासाठी राज्यातील काही साखळी वृत्तपत्रांनी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले, मात्र बेरक्याने सर्व अडचणीवर मात करून पत्रकारांच्या हितासाठी सुरू केलेले हे शस्त्र कधीही निशस्त्र होवू दिले नाही. या यशात आजपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.बेरक्या हा ब्लॉग कोणत्याही एका व्यक्तीचा नाही.पत्रकरांनी पत्रकारांसाठी सुरू केलेला हा ब्लॉग आहे.आपणही आपल्या ठिकाणी बेरक्या बना व सरळ ई- मेल करा-berkya2011@gmail.com

आपलाच
पत्रकारांचा पाठीराखा
बेरक्या उर्फ नारद

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

डी.टी.पी.ऑपरेटर निघाला मोटारसायकल चोर

नगर - भोपाळशेठच्या पेपरमध्ये काम करणारा एक डी.टी.पी.ऑपरेटर चक्क मोटारसायकल चोर निघाला आहे.पोलिसांनी त्याला भर दिवसा कार्यालयातून उचलून नेले होते.त्याची या गुन्ह्यातून सुटका झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा दुस-या गुन्ह्यात अटक केली आहे. ऐवढे होवूनही हे प्रकरण दाबण्याचा  प्रयत्न भोपाळशेठच्या पेपरमधील एक चौकडी करीत आहे.
नावात सत्य असताना असत्य वागणारा भोपाळशेठच्या पेपरमधील एका डी.टी.पी.ऑपरेटरने आठ महिन्यापुर्वी एका मित्राचीच मोटारसायकल चोरून, त्याचे रंगरूप बदलले व नंतर हीच मोटारसायकल घेवून तो ऑफीसला येत होता.त्याची चोरी परवा उघडकीस आल्यानंतर तोफखाना पोलिसांनी काही दिवसांपुर्वी त्याला भर दिवसा कार्यालयातून उचलून नेले.नंतर त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्याला दुस-या गुन्ह्यात अटक केली आहे.त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ऐवढे होवूनही या डी.टी.पी.ऑपरेटरला वाचविण्याचा प्रयत्न भोपाळशेठच्या पेपरमधील काही मंडळी करीत आहेत.वरिष्ठांना अहवाल देताना काही नाही, आपसातील प्रकरण आहे म्हणून कळविण्यात आले.याबाबत उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे.

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

अशोक सुतारांची ' कर्नाळा ' ला सोडचिट्ठी !

मुंबई : रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारं, शेकाप  आमदार विवेक पाटलांच्या दै. ' कर्नाळा ' ला अशोक सुतारांनी सोडचिट्ठी दिलीय. आमदार पाटलांच्या कृपाशीर्वादाने कोणताही ' राम ' नसलेल्या ' राजा ' ला कंटाळून सुतारांनी आपला काढता पाय घेतला आहे. मितभाषी , शांत , साधे राहणीमान असलेल्या सुतारांनी दै. ' महानायक ' ला रामराम ठोकून चारएक महिन्यापूर्वी विवेक पाटलांच्या ' शाळेत ' प्रवेश केला . पण या शाळेतील ' इतर ' विध्यार्थानी सुताराना चांगलाच डीवचविण्याचा चंग बांधला होता. बेरक्याने ' मुंबई ठाण्यातल्या घडामोडी '  या मथळ्याखाली ' महानायक सोडून गेलेले  '' नायक ''  व्यंगचित्रकार अशोक सुतार सध्या '' कर्नाळा" दैनिकात. पौकेट कार्टून ची बहार पुन्हा फुलणार '  अशी बातमी पोस्ट केली होती, त्यानुसार ' कर्नाळा ' च्या अंकात सुतारांचे दर्जेदार पोकेट कार्टून रोज पहावयास मिळत होते. तर सुतारांची लेखमालाहि प्रसिद्ध होत होती . पण कर्नाळातील  ' कॉपी पेस्ट ' ( इतर दैनिकातील वेबसाईट वरून लेख चोरून स्वताच्या नावे खपविणारे ) आट्या - ' पाट्या '  लेखकांनी सुतारांची ' खाट ' कशी टाकता येईल याकडे आपला मोर्चा वळविला होता .  याच कारणामुळे ' गांधीवादी' असलेल्या सुतारांनी निमुटपणे आपला काढता पाय घेतला. सुतारांनी जवळपास मुंबई, ठाण्यातील १० एक दैनिकांत पत्रकार , व्यंगचित्रकार, लेखक , उपसंपादक अश्या पदावर काम केले आहे . तर मराठवाडा, विदर्भातील कित्येक दिवाळी अंकात त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहे.  तर ' नवाकाळ ' चे  मंत्रालय प्रतिनिधी राहुल लोंढेच्या ' बडव्या ' या पुस्तकात अनेक त्यांची  दिग्गज नेत्यांची विडंबनात्मक , खुमासदार व्यंगचित्र गाजली आहेत. तर व्यंगचित्रांचे उपासक असलेले हिंदुहृदय सम्राट  बाळासाहेबांनीहि सुतारांच्या व्यंगचित्रांवर कौतुकाची थाप देखील मारली आहे. 

 जाता- जाता : सद्या हा सुतार नामक ' अवलिया' तूर्तासतरी कुठल्याही दैनिकात रुजू नाही.       

मुंबईतील वेचक घडामोडी

१) कल्याणातील सुप्रसिद्ध अग्रवाला बिल्डरचे डोंबिवलीत लवकरच ' जनाधार ' नावाचं दैनिक सुरु होणार.
२)  ' जय महाराष्ट्र ' च्या गलबताला हेलकावे. चैनेलच्या व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ ; ओपनिंगचा मुहूर्त सापडेना 
३)  नवी मुंबईतल्या ' लोक नवनिर्माण ' दैनिकाची वर्षपूर्ती . जाहिराती नसूनही एकाकी झुंज देणारे संपादक कपिल ' घोरपडे अब तक ना गिरपडे '

४) आयबीएन लोकमतचे मंदार फणसेंची ' वरिष्ठां' कडून मनधरणी ' नाराज होणार राजी '
५) मुंबईतल्या अनेक दैनिकामध्ये डीटीपी ऑपरेटरची तंगी .
६) पंचविशीतल्या पत्रकारांमध्ये ' महाराष्ट्र टाइम्स ' च्या विश्वास पुरोहितची ' फिनिक्स ' भरारी. डोंबिवलीतील जमीन घोटाळा थेट विधानसभेत गाजला. क्राईमच्या  बातम्यांमध्ये चांगलाच हातखंडा.
७) मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी तरुणायीची झुंबड. ' मिशन आयडमिशन सक्सेस '
८) पुण्यनगरीच्या जयवंत बामनेंची पत्रकारांवर ' विशेष '  नजर, फोनाफोनी मध्ये दडलंय काय ?
९) मुंबईतील बंद पडलेले ' मेट्रो ७ डेज '  हिंदी दैनिक पुन्हा सुरु होण्याचे संकेत.
१०) मीरा - भाईंदरमधील अनेक साप्ताहिके गायब; निवडणुका संपल्या खेळ खल्लास. 

पुणे लोकमतमधील जाहिरात विभाग नाराज

पुणे - सकाळ सोडून लोकमतमध्ये आलेल्या पवन चासकर यास सहाय्यक व्यवस्थापकपद देण्यात आल्यामुळे लोकमतच्या जाहिरात विभागातील जुन्या मंडळींत असंतोष पसरला आहे.
लोकमतमध्ये भरपूर जाहिरात व्यवसाय देणारी मंडळी आहे, परंतु ते आहे त्या पदावर सडत आहेत.सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी हेमंत जोशी किंवा मयुर केमसे यांची वर्णी लागणे आवश्यक असताना सकाळमधून आलेल्या पवन चासकर यास अचानक पदोन्नती देण्यात आल्यामुळे अनेकजण नाराज आहेत.विशेष म्हणजे आजपर्यंत सर्व व्यवहार हेमंत जोशी यांच्या सहीनेच होत होते, हे विशेष.

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

पत्रकार मित्रने गाठला चार हजार हिटस् चा टप्पा

औरंगाबाद - पत्रकारांचे प्रश्न, समस्या व अडीअडचणी मांडण्यासाठी पत्रकार मित्र ही वेबसाईट दि.9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुरू करण्यात आली आहे.अवघ्या 10 दिवसांत या वेबसाईटने चार  हजार हिटस् चा टप्पा पार करून बेरक्याच्या पाऊलावर पाऊल ठेवले आहे.
सध्या या वेबसाईटला दिवसभरात चारशेहून अधिकजण भेट देत असल्याचे स्पष्ट आहे.बेरक्याला मात्र दिवसभरात किमान दोन ते अडीच हजार जण भेट देत असल्याचे स्पष्ट आहे.बेरक्याने सहा लाख हिटस् चा टप्पा पार करून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास रचला आहे.बेरक्याचा नवा साथीदार पत्रकार मित्रही असा टप्पा पार करेल,असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

पत्रकार मित्र

'लोकमत' नगर आवृत्तीच्या वर्धापनदिनाचा फज्जा

अहमदनगर- रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून मोठा गाजावाजा करतानाच एक कोटी रुपयांच्या बिझनेसचा चॉकलेट दर्डाशेठजींना दाखविणार्‍या लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचा पुरता बेंडबाजा वाजला. वर्धापनदिन (नव्हे, रौप्यमहोत्सवी वर्ष) कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा पुरता फज्जा उडाल्यानंतर वाचक मेळाव्यास गर्दी खेचण्यासाठी ‘गाणे मंगेशाचे’ हा कार्यक्रम ठेवूनही नगरकरांमधून प्रतिसाद मिळत नव्हता. जाहीरातदारांनी पाठ फिरवली. मात्र, मालक दर्डाशेठजींना (छोटेखानी करणबाबू) खूष करण्यासाठी मोठा आटापीटा करूनही काहीही साध्य झाले नाही.
सकाळने त्यांच्या अहमदनगर कार्यालयाचा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात आणि जवळपास एक कोटी रुपयांचा बिझनेस घेऊन साजरा केला. यानंतर तिसर्‍या वर्धापनदिनात (दि. १० ऑगस्ट) दैनिक देशदूतने संपादक शिवाजी शिर्के यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली सकाळपेक्षा सरस आणि उजवी कामगिरी करत १ कोटी २८ लाख रुपयांचा बिझनेस सारडाशेठला दिला. वर्धापनदिनाचा सोहळाही अत्यंत दिमाखदार आणि कार्पोरेट पद्धतीने केला. टीम वर्क म्हणजे काय हे अवघ्या तीन वर्षात श्री. शिर्के आणि त्यांच्या टीमने दाखवून दिले असताना इकडे लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अवघ्या ४३ लाख रुपयांचा बिझनेस करू शकले.
नंदू पाटलाच्या कोल्हापूर बदलीनंतर नगरमध्ये आलेल्या अनंत पाटील यांची धडपड असली तरी त्यांना स्थानिक सहकार्य करताना दिसत नाही. पाटील आणि व्यवस्थापक बंगाळे यांना असहकार्य करण्याची भूमिका संपादकीय विभागाने ठेवल्यानेच वर्धापनदिनाच्या बिझनेसचा फज्जा उडाला. सकाळपाठोपाठ देशदूतने दिमाखदार अंक आणि बिझनेस केल्यानंतर आपण कमी पडलो असल्याची जाणिव लोकमतला झाली. दरम्यान, वर्धापनदिनाच्या (दि.१५) आदल्या दिवशी विलासराव देशमुख यांचे निधन झाले. विलासरावांचे निधन लोकमतच्या नगर कार्यालयाच्या पथ्थावर पडले. ते कारण पुढे करीत वर्धापनदिन सोहळाच रद्द करण्यात आला. त्यासाठी छोट्या बाबूजींनाही (करण) पटविले गेले. अनंत पाटील मनापासून प्रयत्न करीत असताना संपादकीय विभागाने असहकार्याची भूमिका कायम ठेवली. त्यात विभागातील असंतुष्ट आत्मे पुढे राहिले. नंदू पाटलानंतर आपणच त्या खुर्चीत बसणार असे वाटणार्‍यांनीही संपादकीय विभागात असंतोष निर्माण करण्याचे काम केले. त्याला जाहीरातीसह वितरणातील काहींनी खतपाणी घातले. त्यातून संस्थेचा तोटा झाला. मालकाला कोटीचा शब्द देणार्‍या बंगाळे- पाटलांना अर्धा कोटीचाही बिझनेस करता आला नाही.

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१२

'नवशक्ती'ने काढले स्वत:च्या अक्कलेचे दिवाळे....

मुंबई - 'जनसामान्यांची महाशक्ती' म्हणणाऱ्या दैनिक नवशक्तीने काल व आज स्वत:च्या अक्कलेचे दिवाळे काढून, पत्रकारितेत चुकीचा व घातक पायंडा पाडला आहे.
घडले असे की, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे दि.14 ऑगस्ट रोजी निधन झाले.त्याची सर्वच वृत्तपत्रांनी 15 ऑगस्ट रोजी बॅनर न्यूज केली.नवशक्तीही त्याला अपवाद कसा राहणार? मात्र नवशक्तीने मथळ्यातच विलासरावांचा 'स' गिळला.ही गंभीर चूक संपादकांच्या लक्षात येताच, त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी दिलगिरी व्यक्त केली .मात्र दिलगिरी व्यक्त करताना एक नवी मेख मारली.व्यवस्थापकीय संपादकांनी त्याचे खापर मुख्य उपसंपादक दीपक परब यांच्यावर फोडून स्वत: नामानिराळे राहिले.
नवशक्तीच्या अंकात  दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली जी चौकट छापण्यात आली आहे,त्यात म्हटले आहे की, मुख्य उपसंपादक दीपक परब यांच्यामुळे विलासरावांच्या बातमीचा मथळा चुकला.गंमत म्हणजे बुधवार दि.14 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीत म्हटले आहे.काल 15 ऑगस्ट असताना खुलाश्यात पुन्हा तारखेची चूक करून नवशक्तीने स्वत:च्या अक्कलेचे दिवाळे पुन्हा वाजविले.
वास्तविक वृत्तपत्रातील कोणत्याही बातमी अथवा लेखात काही चूक झाली तर त्याला सर्वस्वी संपादक जबाबदार असतात.नवशक्तीच्या संपादकांनी मात्र त्याचे खापर मुख्य उपसंपादकांवर फोडून, त्याची जाहीर वाच्यता केली आहे.पत्रकारितेत अत्यंत चुकीचा व घातक पायंडा नवशक्तीने पाडला आहे.नवशक्तीच्या या खुलाश्याने राज्यातील पत्रकार संतप्त झाले आहेत.एखादी चूक घडली तर ती खुल्या दिलाने स्वीकारून, त्याची माफी मागणे अपेक्षित असताना,नवशक्ती कोणत्या थराला जात आहे,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सचिन परब यांनी नवशक्तीच्या संपादकपदाचा राजीनामा दिल्यानंतर तुषार नानल यांना संपादकपदावर बसविण्यात आले,मात्र सगळी सुत्रे मालकांचे विश्वासू व्यवस्थापकीय संपादक लखोटीया यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.खुलाश्याच्या चौकटीत संपादक ऐवजी व्यवस्थापकीय संपादक असे म्हटले आहे.याचा अर्थ असा आहे की, लखोटीया यांनीच चुकीचे खापर दीपक परब यांच्यावर फोडले आहे...नवशक्तीत दोन गट आहेत.जुना गट नविन माणसंाना टिकू देत नाहीत, म्हणून काही जाणीवपुर्वक चुका केल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

जाता - जाता : निखिल वागळे महानगरचे संपादक,मालक असताना ते अशाच प्रकारे खुलासा करीत असत.ज्या माणसांच्या हातून चूक घडली,त्याचे नाव ते देत असत.नवशक्तीच्या व्यवस्थापकीय संपादकांनी वागळेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, ही परंपरा सुरू केली आहे.संपादक सर्वच बाबीकडे लक्ष देवू शकत नाहीत.गलेलठ्ठ पगार घेवून मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक अशी चूक करीत असतील तर संपादकांनी ते स्वत:वर अंगावर ओढवून का म्हणून घ्यावे,असा एक मतप्रवाह निर्माण झाला आहे.

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

दै. व्हिजन वार्ताच्या कार्यकारी संपादकपदी फडके

कोल्हापूर - कोल्हापूरतून लवकरच सुरू होणाऱ्या दैनिक व्हिजन वार्ताच्या कार्यकारी संपादकपदाची सुत्रे मुकूंद फडके यांनी गुरूवार दि.16 ऑगस्ट रोजी सकाळी स्वीकारली आहेत.फडके यापुर्वी दैनिक सकाळच्या सातारा आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून काम पहात होते. दैनिक व्हिजन वार्ताच्या कार्यकारी संपादक पदाची सुत्रे मुकूंद फडके हाती घेणार असल्याचे वृत्त बेरक्याने यापुर्वीच दिले होते.
न्यूज पेपर नव्हे व्ह्यूज पेपर असे ब्रिदवाक्य असलेले दैनिक व्हिजन वार्ता लवकरच सुरू होत आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,बेळगाव, सोलापूर, अहमदनगर अशा आठ आवृत्त्या एकाच वेळी प्रसिध्द होणार आहेत.प्रसिध्द उद्योगपती रावसाहेब मगदूम यांच्या मालकीचे असलेल्या या दैनिकाचे सरव्यवस्थापक म्हणून एन.एस.पाटील रूजू झाल्यानंतर या दैनिकाच्या कार्यकारी संपादक पदाची धुरा कोण वाहणार याकडे सर्वांचे लक्ष होते.बेरक्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे कार्यकारी संपादकपदी मुकूंद फडके हे गुरूवारी रूजू झाले आहेत.फडके यांनी यापुर्वी दै.ऐक्य, बेळगाव तरूण भारत, लोकमत, सकाळ आदी दैनिकात विविध पदावर काम केले आहे.त्यांच्या आगमनामुळे दैनिक व्हिजन वार्ताची संपादकीय टीम अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सध्या दैनिक व्हिजन वार्तासाठी संपादकीय,वितरण, जाहिरात आदी विभागात भरती चालू असून,या आठही जिल्ह्यातील वृत्तपत्र व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
असो, मुकूंद फडके यांच्या नव्या इनिंगसाठी बेरक्याच्या शुभेच्छा...

बारामतीच्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम बंद आंदोलन

बारामती - बारामती येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी 14 आॅगस्ट पासून काम बंदचा पवित्रा घेत अंक उचलले नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी देखील अंक वाचकांपर्यंत पोचू शकला नाही. त्यामुळे सकाळ, लोकमत, पुढारी च्या वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
 वर्तमानपत्राची किंमती कमी केली जाते तेव्हा विक्रेत्यांचे कमीशन कमी केले जाते.  आता या तीनही  वर्तमानपत्रांनी
किंमती वाढवल्या असल्या तरी कमीशन वाढवले नाही. महिनाभर वितरण प्रतिनिधीनी चालढकल करत वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती दिल्याने वर्तमानपत्राच्या सांभाव्य नुकसानाला त्यांचे संम्बधीत वितरण प्रतिनिधीच जबाबदार आहेत. असा सुरू वृत्तपत्र विक्रेत्यांमधून होत आहे.    
   बारामती शहर वेगाने वाढत आहे. त्यामुळे वृत्तपत्रविक्रेते पहाटेपासून पेपरचे ओझे वाहतात. सध्या बारामती शहरात सकाळ चा सर्वाधिक खप आहे. त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रोज बारामती शहरात खपणारा 11000 सकाळ 3000 च्या आसपास येऊन पोचला. तर बर्याच ठिकाणी सकाळ फुकट वाटला गेला.  लोकमत ची तर दांडीच उडाली.
लोकमतने  नेमलेले पंटर वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप  रोखू शकले नाहीत.अगोदर तिसर्या क्रमावर असलेला लोकमतचे बरेच अंक परत गेले. लोकमतच्या ब्युरो चीफने काही पोरटोर गोळा करून प्रत्येकी दोनशे रूपये देऊन अंक वाटण्याचा प्रयत्न केला. मात्र भल्या पहाटेच काम करण्याची सवय नसलेल्या पंटरांनी काढता पाय घेतला.
सकाळने आपली उच्च व्यवस्थापन कौशल्य दाखवत चक्क बातमीदार मंडळींना भल्या पहाटे ताणलं. त्यांच्या दोन चारचाकी गाड्या बारामतीत घिरट्या घालत होत्या. त्यामुळे गाड्या खर्च व  इतर खर्च याचा ताळमेळ घातला तर विक्रेते वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला न  परवडणारे ठरत आहे. आम्ही दुसरी टीम तयार करू असे बळेच आव आणून बोलत होते.
पुढारीचा वितरण प्रतिनिधी आपल्या पैलवानकीच्या जोरावर वृत्तपत्र विक्रेत्यांना दमदाटी करत होता. पण त्याला कोणी भिक घातली नाही. पुढारी, लोकमतच्या कंपनी वितरकांनी सकाळी दहा वाजता घाशा गुंडाळला. पुण्यात प्रत्येक पुरवनी पाठीमागे दहा पैसे वृत्तपत्र विक्रेतांना मिळतात. तर बारामतीतील वृत्तपत्र विक्रेत्यांचे शोषण वर्तमानपत्र का करत आहेत. ज्यांनी अन्यायाला वाचा फोडायची तेच अन्याय करत आहेत असा प्रश्न विक्रेतांचा आहे.

रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

रिटायर्ड अरणकल्लेंना अचानक संपादकपद...

पुणे - सकाळ पुणेच्या संपादकपदी सा. सकाळच्या कार्यकारी संपादकपदावरुन रि(टायर्ड) झालेले अरणकल्ले यांची नेमणूक केलेली दिसते (कारण याची जाहीर घोषणा वा बातमी आलेली नाही) सोमवारच्या पुण्यातील सकाळमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख एका बातमीत सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक, असा आला आहे. मात्र प्रेसलाइनमध्ये नुकतेच राजीनामा दिलेले नवनीत देशपांडे यांचेच नाव सोमवारी होते.
अरणकल्ले यांच्याकडे सा. सकाळची जबाबदारी नाईलाजाने द्यावी लागली होती. रिटायर झाल्यावर त्यांनी मुदतवाढीचे प्रयत्न करुन पाहिले परंतु प्रशासनाने नाशिकच्या विश्वास देवकरांना तेथून अचानक हलवून जुलै महिन्यात सा. सकाळच्या संपादकपदी नेमले. अरणकल्ले यांना निवृत्तीनंतरही पुण्यात बातमीदारांचे प्रशिक्षण ही जबाबदारी देण्यात आली. आता अचानक धनलाभ झाल्याप्रमाणे त्यांना पुणे संपादकपदाचा टिळा लावला. मूळचे प्रूफरीडर असलेले अरणकल्ले पूर्वी केसरीत होते. सकाळमध्येही त्याच कामासाठी ते आले नंतर बातमीदार झाले. पुण्यात चीफ रिपोर्टरपदी बढती झाल्यानंतर अचानक त्यांना विजया पाटील यांनी कोल्हापूरचे संपादक म्हणून नेमले. कुवळेकरांच्या रिक्त जागी दिक्षित आल्यामुळे कोल्हापुरची गादी रिकामी झाली होती. मात्र सौ. पाटील सकाळमधून बाहेर गेल्यावर नव्या मालकांनी अरणकल्ले यांना हटवून पुण्यात आणले. लाल-पांढ-ची सवय असलेल्या कोल्हापुरात पुण्याची अळूभाजी काही रुचलीही नव्हती म्हणा. 2005 पासून जवळपास चार-पाच वर्षे अरणकल्ले विजनवासात होते. मात्र त्यांना औट घटकेचे का होईना संपादकपद मिळाले,त्याबद्दल अभिनंदन...

ता. क. - सकाळ आता पुणे, नाशिक, सातारा या रिकाम्या जागांवर व पाठोपाठ औरंगाबाद येथे नव्या संपादकांच्या शोधात आहे असे समजते.

सामची खबरबात

मुंबई -साम वाहिनीमध्ये दोन वर्षांपूर्वी चंद्रमोहन पुपाला आणि गणेश कनाटेंच्या नेतृत्वाखाली नवी भरती झाली होती. दोन वर्षांपूर्वी तिथं नव्यानं जॉईन झालेली मंडळी आता स्थिरावली आहे. तर आधीची जुनी मंडळी मोठ्या संख्येनं कधीच बाहेर पडली आहे. तर ज्यांचं कुठंच काम होत नाही ते अशोक सुरवसे, सचिन फुलपगारे, प्रफुल्ल साळुंखे ही मंडळी आधीचे सोनेरी दिवस आठवत येणारा दिवस घालवत आहेत. ई टीव्ही आणि झी 24 तासमध्ये आपण कशा शिफ्ट लावायचो याचे किस्से एंक जण सांगत असतो. इथंही आधी त्याच्याकडे हेच काम होतं. मात्र हे काम आता निलेश कारंजेला सोपवण्यात आलं आहे. तर अशोक सुरवसे एक महिन्यापूर्वी झी 24 तासमध्ये इनपूट एडिटर पदासाठी मुलाखत देऊन आले. तिकडून कधी बोलावणं येतं ? या कडे अशोकरावांचं लक्ष लागलंय. अशोक सुरवसे जर झी 24 तासमध्ये गेले तर आपलंही तिथं काम होईल अशी आशा प्रफुल्ल साळुंखेला लागून राहिली आहे. अशोक सुरवसे गटाचा असल्याने चंद्रमोहन पुपाला आणि अशोक कनाटे त्याला स्थान देत नाहीत. आणि अशोक सुरवसेंचा साम मधला प्रभाव कधीच संपला आहे. त्यामुळे ही जुनी मंडळी जुन्या आठवणीतच रममान होत, नव्या ठिकाणी प्रयत्न करत असतात.

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१२

पत्रकार मित्रला जबरदस्त प्रतिसाद

 औरंगाबाद - पत्रकारांचा नवा साथीदार पत्रकार मित्रला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यासह देशातील अनेक मराठी पत्रकारांनी या नव्या वेबसाईटचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.
कोणत्याही एका कॉम्प्युटरवरून कितीही वेळा लॉग ऑन केल्यास एकच आय.पी.अॅड्रेस ग्राह्य धरून प्रत्येकी एक क्रमांक मोजणारे हिटस् मीटर या वेबसाईटवर बसविण्यात आले आहे.तरीही एकाच दिवसात पाचशेपेक्षा अधिक हिटस् झाल्या आहेत.याचाच अर्थ बेरक्याच्या तोडीस तोड साथीदार मिळाला आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान असून, तुमच्या, आमच्या व सर्वांच्या या सच्चा मित्राचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे.
पत्रकार मित्र ही वेबसाईट कोणत्याही एका पत्रकाराची नाही.राज्यातील दिग्गज व मान्यवर पत्रकारांच्या मार्गदर्शाखाली सुरू करण्यात आलेली आहे.पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले म्हणून ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे.या व्यासपीठरावर कोणाचीही नाहक बदनामी होणार नाही,याची काळजी घेण्यात येत आहे, मात्र पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणाऱ्यांचा मात्र बेरक्याप्रमाणेच खरपूस समाचार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पत्रकार मित्र

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

नव्या साथीदाराचे स्वागत...

औरंगाबाद - बातमीदार आणि बोरूबहाद्दर ब्लॉग बंद पडल्यानंतर बेरक्या उर्फ नारद एकाकी पडला होता.मात्र पत्रकार मित्रमुळे त्याला पुन्हा एकदा खंबीर साथ मिळाली आहे.
फे्रन्डशिप डे रोजी घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसात पत्रकार मित्रचे स्वागत झाले आहे.राज्यातील अनेक दिग्गज व नामवंत पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली  पत्रकार मित्रचे काम चालणार आहे.वृत्तपत्र सृष्टीतील ताज्या घडामोडी,पडद्यामागच्या हालचाली, वेगवेगळे फिचर्स बरोबर टवाळकी, गुगली, फिरकी आदी सदरे राहणार आहेत. त्याचबरोबर औरंगाबादचे प्रसिध्द वात्रटिकाकार विलास फुटाणे यांचे खुमासदार फटका हे सदर या वेबसाईटचे वैशिष्ठ राहणार आहे.
तर मग चला, तुमच्या, आमच्या व सर्वांच्या या सच्चा मित्राचे स्वागत करू या. त्यासाठी क्लिक करा...


बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

मानवी हक्क वार्ता पुरस्कार जाहीर

कन्हैया खंडेलवाल

मुंबई - आ.विवेक पंडित कार्याध्यक्ष असलेल्या समर्थन संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानवी हक्क वार्ता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.मराठवाड्यातून हिंगोलीचे आय.बी.एन.-लोकमतचे रिपोर्टर कन्हैया खंडेलवाल यांचा समावेश आहे.
मुंबईच्या समर्थन संस्थेच्या वतीने 1996 पासून दरवर्षी राज्यातील तीन पत्रकारांना मानवी हक्क वार्ता पुरस्कार देण्यात येतो.दलित,अदिवासी समाजावर तसेच महिलावर होणाऱ्या अन्याय - अत्याचारासंदर्भात वार्तांकन करणाऱ्या तसेच कुपोषण,भ्रुणहत्त्या आदी गंभीर विषयावर बातम्या,लेख,फिचर्स देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.रोख 5 हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.सन 2011 च्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.त्यात जितेंद्र पराडकर (दै.सामना,संगमेश्वर) गजानन पाटील (दै.लोकमत,सांगली),कन्हैया खंडेलवाल (आय.बी.एन.-लोकमत, हिंगोली) यांचा समावेश आहे.उत्तेजणार्थ पुरस्कार,प्रदीप गरूड (दै.आपला महाराष्ट्र,नंदूरबार), सुर्यकांत नेटके (दै.सकाळ,अहमदनगर) यांना घोषित करण्यात आले.
परिक्षक म्हणून अलिबागच्या दैनिक सामनाच्या पत्रकार सौ.शारदा धुळप,सोलापूरचे लोकसत्ताचे पत्रकार एजाजहुसेन मुजावर,मुंबईचे सहारा समयचे रिपोर्टर संजय पिळणकर यांनी काम पाहिले.
मराठवाडयातून यापुर्वी उत्तम हजारे (बीड),सुनील ढेपे (उस्मानाबाद),जयप्रकाश दगडे (लातूर) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,हे येथे उल्लेखणीय.

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१२

शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीत ३ कोटीची वाढ

मुंबई- अडीअडचणीच्या तसेच दु:खाच्या प्रसंगी पत्रकारांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या विश्वस्त संस्थेच्या रकमेत ३ कोटी रुपरांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर या निर्णयाचे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी स्वागत करुन राज्यातील व जिल्हयातील समस्त पत्रकार बांधवांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
पत्रकारांचा आकस्मीक मृत्यु झाल्यास किंवा दुर्धर आजार झाल्यास याप्रसंगी त्यांचे कुटुंबिरांना मदत करण्राच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य अधिस्विकृतीचे पदाधिकारी तसेच श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय होवून १ ऑगष्ट २००९ ला शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत २ कोटी रुपयाची तरतुद असलेल्या या निधीच्या रकमेची व्याप्ती वाढवून त्वरीत आणखी ३ कोटीची वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्रमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी स्वागत करुन राज्यातील समस्त पत्रकार बांधवांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
 

कुमार केतकर को मिलेगा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार

बेलगाम- महाराष्ट्र के जेष्ठ पत्रकार एवं दिव्य मराठी अकबार के मुख्य संपादक कुमार केतकर को बेलगाम के सार्वजानिक वाचले क़ी तरफ से दिया जाने वाला  आचार्य अत्रे  साहित्य पुरस्कार  साहित्य पुरस्कार का ऐलान किया गया है |
बेलगाम के सार्वजानिक वाचनालय इस  १६४ वर्ष पुराने मराठी ग्रंथालय द्वारा गट ८ वर्षो से महाराष्ट्र के बड़े साहित्यिक एवं संपादक पत्रकार को यह पुरस्कार दिया जाता है | इस वर्ष यह पुरस्कार दिव्य मराठी अकबार के मुख्य संपादक कुमार केतकर को देने का फैसला किया गया है | २५ हजार  नगद एवं प्रशस्ती मानपत्र दे कर  केतकर  को सम्मानित किया जाने वाला है |
सार्वजनिक वाचनालय गणपत ग़ली के अध्यक्ष एवं पूर्व पार्षद नेताजी जाधव ने बताया क़ी सोमवार १३ अगस्त शाम ४ बजे मराठा बैंक के सभागार में हुबे एक समारोह में यह पुरस्कार दिया जाने वाला है | इस के पहले अरुण साधू ,डॉ जय सिंह पवार , उत्तम काम्बले ,को कृष्णा मेनसे ,सदानंद मोरे , मधु मंगेश कार्निक को यह पुरस्कार दिया गया है | सार्वजनिक वाचनालय के अनत लाड , अनंत जांगले,अड़ नागेश सातेरी,गोविदं राउत,सुनीता मोहिते एवं अन्य भी मौजूद थे|

प्रिंट मीडियात ले -आउट आरटीस्टची चलती...

मुंबई -  प्रिंट मीडियात सध्या ले -आउटची  चांगलीच चलती आहे. वर्तमानपत्रात मजकुरासोबत आखणी, मांडणी हे हि वाचकांचे आकर्षण असल्याने त्या कलेला उपजत असणाऱ्या  ले -आउट आरटीस्टचे ' सोनियाचे दिनू ' आहे. वर्तमानपत्रात दशकभरापूर्वी  विदर्भातील ' देशोन्नती ' ने   ले -आउट  मध्ये दमदार पाऊल टाकले. त्या पाठोपाठ मुंबईतील आपलं महानगर, नवभारत, मिड-डे यांनीही धडाकेबाज ले -आउट देण्यास सुरवात केली. महाराष्ट्र टाइम्सने हि त्यात उडी घेतली. मुंबईत ले -आउट मध्ये ' पट्टी ' चे असलेले ले -आउट आरटीस्ट  प्रदीप म्हापसेकर ( सध्या प्रहार मध्ये कार्यरत ) यांनी ले -आउटची ' रंगीन दुनिया ' अनेक वर्तमान पत्रांना दाखवली; अन मग सुरु झाली रस्सीखेच..! इंग्रजी वर्तमान पत्रासोबत मग मराठी वर्तमानपत्रात तोडीस तोड ले -आउटचा  कलगीतुरा रंगला.
 सध्या मुंबईत हातावरच्या बोटावर मोजण्या इतपत ' मास्टर माइंड ' ले आउट आरटीस्ट आहे. त्यात प्रामुख्याने नाव घेतले जाते प्रदीप म्हापसेकर यांचे. राणेंच्या ' शब्दाला सत्याची धार ' असलेल्या ' प्रहार ' मध्ये  त्यांनी   ले -आउटची रंगत चांगलीच  दाखवली सध्या तरी मराठी दैनिकात ' प्रहार ' ची चांगलीच चलती आहे. (तसा 'दिव्य मराठी' हि ले -आउटच्या रिंगणात आहे.)  म्हापसेकरांपाठोपाठ 'आपलं महानगर' चे दिलीप पवार, पहिले 'लोकमत' ला असलेले आणि आता मुंबई 'सकाळ'  मध्ये कार्यरत असलेले अनिल कुसुंबे, 'कृषीवल'चे सुनील आढाव यांच्याही कलेला तोड नाही. यांच्यासोबत आणखी नवे चर्चेत येतात ते म्हणजे बिपीन आडागले, कुणाल जाधव , नितीन शिंदे, चांदणी सावंत , अमर मर्ढेकर, अजय जाधव, संजय कदम, मिलिंद नार्वेकर हे हि मुंबई , ठाण्यातल्या दैनिकामध्ये आपल्या कलेचा कित्ता गिरवत आहे. मालकवर्गाने देखील आपल्या वर्तमानपत्रांच्या आखणी, मांडणीला प्राधान्य दिल्याने (काही ठोकळेबहाद्दर वर्तमानपत्र वगळता) ले -आउट आरटीस्टची चांगलीच दिवाळी आहे. मुंबईतील अनेक दैनिकांत उपसंपादक, मुख्य उपसंपादक, वृत्त संपादकांपेक्षा  ले -आउट आरटीस्टच्या पगाराची रक्कम सरशी आहे. त्यात अनेकांचे पगारपाणी विशी ते पन्नाशीच्या घरात आहे. त्यामुळे साहजिकच ले -आउट आरटीस्टला प्रिंट मीडियात चांगलीच चलती आहे....

 जाता - जाता : सध्याच्या काळात  बातमीसोबत ले -आउटला खूपच महत्व आल्याने या क्षेत्रात येणाऱ्याना चांगलाच वाव आहे. पण वर्तमानपत्रात  ले -आउट च्या बाबतीत बोलावे तर आरटीस्टने ' बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल ' अशी परिस्थिती आहे. 

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

दै. ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांना स्व. नारायण आठवले स्मृती पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार स्व. श्री. नारायण आठवले यांच्या स्मरणार्थ श्री. आठवले यांनीच ३० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या गोव्यातील ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’ तर्फे यंदापासून महाराष्ट्र व गोव्यातील पत्रकारांसाठी ‘स्व. नारायण आठवले स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार असून पहिल्यावहिल्या पुरस्कारासाठी गोव्यातील तरूण, धडाडीचे पत्रकार आणि दैनिक नवप्रभा (गोवा) चे संपादक श्री. परेश वासुदेव प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. काल पणजी येथे सिद्धार्थ बांदोडकर भवनात  घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अनुप प्रियोळकर यांनी ही घोषणा केली.
रू. ११,१११ रोख, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या दि. १६ ऑगस्ट रोजी फोंडा येथे लोकविश्वास प्रतिष्ठानच्या सिद्धार्थ बांदोडकर स्मृती सभागृहात संध्याकाळी ४.३० वाजता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण टिकेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात श्री. प्रभू यांना हा पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी गोव्याचे सार्वजनिक बांधकाम व वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, तसेच समाजकल्याण मंत्री महादेव नाईक हेही उपस्थित राहणार आहेत.
लोकविश्वास प्रतिष्ठानतर्फे या पुरस्कारासाठी एक निवड समिती स्थापन करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार व ‘सकाळ’चे माजी संपादक श्री. विजय कुवळेकर, गोव्यातील ‘राष्ट्रमत’ दैनिकाचे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार श्री. सीताराम टेंगसे, ज्येष्ठ समीक्षक श्री. रवींद्र घवी, तसेच मुंबई स्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रामकृष्ण नायक यांच्या समितीने या पुरस्कारासाठी श्री. प्रभू यांची निवड केली.
महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारितेमध्ये असलेले श्री. परेश प्रभू सध्या गोव्यातील ४२ वर्षांची परंपरा असलेल्या दैनिक नवप्रभाचे संपादक आहेत. धेंपो उद्योगसमूहाच्या मालकीचे हे मराठी दैनिक असून पत्रमहर्षी द्वा. भ. कर्णिक हे त्याचे पहिले संपादक होते. श्री. प्रभू यांनी कै. चंद्रकांत घोरपडे यांच्या हाताखाली दैनिक गोमन्तकमध्ये उपसंपादक म्हणून आपल्या पत्रकारितेतील पूर्णवेळ कारकिर्दीस प्रारंभ केला. उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, पुरवणी संपादक, दिवाळी अंक संपादक, वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक अशा विविध जबाबदार्‍यांवर काम करण्याचा त्यांना गेल्या वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘नवप्रभा’ च्या संपादकपदी आल्यानंतर त्यांनी त्या दैनिकाचा समूळ कायापालट केलेला आहे. सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतही ते सक्रिय असून गोव्यात युवा मराठी साहित्य संमेलनांची चळवळ त्यांनीच उभारली होती. सध्या गोवा सरकारच्या प्रेस एक्रिडिटेशन कमिटीचेही ते अध्यक्ष आहेत.

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

वृत्तपत्रसृष्टीत नवे व्हिजन...

कोल्हापूर - कोल्हापुरातून लवकरच व्हिजन वार्ता नावाचे दैनिक सुरू होत आहे.ख्यातनाम व्हिजन ग्रुपचे संस्थापक प्रा.डॉ.रावसाहेब मगदूम यांच्या संकल्पनेतून या दैनिकाचा जन्म होत आहे.या दैनिकाबद्दल कोल्हापूर,सांगली,सातारा आदी जिल्ह्यात जबरदस्त हवा निर्माण झाली असून, येत्या काही दिवसांत वृत्तपत्रसृष्टीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्तता वर्तविण्यात येत आहे.
एक सकारात्मक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून, प्रा.डॉ.रावसाहेब मगदूम यांनी वृत्तपत्र सृष्टीत पाऊल ठेवले आहे.शैक्षणिक,सामाजिक,पर्यावरण,संरक्षण आदी क्षेत्रात मोठे नाव कमावल्यानंतर प्रा.डॉ.मगदूम यांनी वृत्तपत्र सृष्टीतही नाव कमावण्यासाठी कंबर कसली आहे.त्यांना गेली अनेक वर्षे वृत्तपत्रसृष्टीत काम केलेले एन.एस.पाटील यांची मोलाची साथ मिळाली आहे.पाटील यांनी यापुर्वी लोकमत,पुण्यनगरी आदी बड्या वृत्तपत्रात सरव्यवस्थापक म्हणून काम केले असून, त्यांचा अनुभव या दैनिकासाठी कामी येणार आहे.प्रा.डॉ.मगदूम आणि एन.एस.पाटील ही जोडी आता कोल्हापुरात धूम करणार असल्याची चर्चा रंगली असून, वृत्तपत्र सृष्टीत या दैनिकाबद्दल कुतहल निर्माण झाले आहे.
केवळ वल्गना न करता कृती हा व्हिजन ग्रुपचे वैशिष्ठ आहे.शिक्षण क्षेत्रापासून त्याची सुरूवात झाली असून,महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ७०० हून अधिक कार्यालयातून ६० हजार कर्मचा-याकडून १५ लाखावर विद्याथ्र्यांना ज्ञानार्थी, स्वावलंबी व सुसंस्कारीत करण्यात येत आहे.तसेच शैक्षणिक, सामाजिक,पर्यावरण,संरक्षण क्षेत्रात उपक्रम रावबून देशाला महासत्ता बनविण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.तसेच भ्रष्ट्राचारमुक्त भारत होण्यासाठी या ग्रुपने कामही केले आहे.एक ध्येयवेडा माणूसच देशाच्या कार्यास हात घालू शकतो,असे डॉ.मगदूम यांचे म्हणणे आहे.देशाला आर्थिक व सामाजिकदृट्या सक्षम बनविण्यासाठी प्रत्येकाने आपले कार्य प्रामाणिकपणे करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.प्रत्येक माणूस,त्यांचे घर,गाव,तालुका,जिल्हा,राज्य सक्षम आणि स्वावलंबी झाल्यास देश महासत्ता का बनू शकत नाही,असा डॉ.मगदूम यांचा सवाल आहे.
व्हिजन वार्ता दैनिक प्रचलित व प्रथितयश दैनिकापेक्षा वेगळे असल्याचा विश्वास दैनिकाचे संस्थापक प्रा.डॉ.मगदूम यांनी व्यक्त केला आहे.या दैनिकात मटका कधीच छापला जाणार नाही.तसेच व्यसनांना प्रोत्साहन देणा-या जाहिरातीही स्वीकारल्या जाणार नाहीत,असे त्यांनी सांगितले.या दैनिकातील बातम्या किसळवाण्या व डोके भंडावून सोडणा-या राहणार नाहीत.सामाजिक दृष्टीकोण समोर ठेवूनच हे दैनिक वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे या दैनिकाची हवा मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, एक मोठी टीम कार्यरत होत आहे.
दैनिक व्हिजन वार्ता दैनिकास बेरक्याच्या मन:पुर्वक शुभेच्छा...

आपण लढणार आहोत,कारण आपण अजून जिंकलो नाहीत...

हाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन झाली त्या घटनेला शनिवारी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत.या दोन वर्षाच्या काळात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं  पत्रकार संरक्षण कायद्यासाठी जो लढा दिला,त्यासाठी जे सातत्या राखले ते अभूतपूर्व आहे.सरकारशी सातत्यानं संवाद साधताना हल्ला हा एकच विषय घेऊन आम्ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ऩऊ वेळा भेटलो.गृहमंत्री असलेल्या आर.आर.पाटील यांची  सात वेळा भेट घेतली,प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या.मार्कन्डेय काटजू यांना दिल्लीत जावून भेटलो,विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांची दोन वेळा भेट घेतली,चळवळीला अण्णा हजारे यांचा पाठिंबा मिळविला,आणि दिल्लीत जावून तत्कालिन  राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील याची भेट घेतली,रस्त्यावर उतरून आंदोलन करताना मोर्चे काढले,निदर्शनं केली,धरणे धरले,बहिष्काराचं हत्यार उपसलं,उपोषणं केली. हे सारं करताना कुठंही हिंसाचाराचं गोलबोट लागू दिलं नाही.शिवाय ही सारी चळवळ कोणाकडून पाच पैश्याची देणगी न घेता चालविली आहे.त्याच बरोबर पत्रकारांवरील हल्ल्याच्या संदर्भात एक श्वेतपत्रिका काढून पत्रकार संरक्षण कायद्याचं गांभीर्य राज्य सरकारच्या नेरेस आणून दिलं.हे सारं करूनही आपण ज्या उद्देशानं चळवळ सुरू केली होती तो उद्देश यशस्वी झालेला नाही हे मान्य करावे लागेल .याचं कारण सरकार निगरगठ्ठ आणि संवेदनहिन बनले आहे.अशा सरकारला वढणीवर आण्ण्यासाठी आणि जिकंण्यासाठी  ही चळवळ पुढं चालू ठेवण्याचा समितीचा निर्णय आहे.या लढ्यात राज्यातील सर्व पत्रकारांचे सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करीत दोन वर्षातील चळवळीचा हा लेखाजोखा समितीच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं इथ मांडत आहे.

एस.एम.देशमुख
निमंत्रक,महाराष्ट पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती


पुढीलमजकूर एस.एम.देशमुख यांच्या ब्लॉगवर वाचा....त्यासाठी क्लिक करा.... गुरुवार, २ ऑगस्ट, २०१२

'सकाळ'च्या संपादक-संचालकपदी उत्तम कांबळे

पुणे - सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक तसेच समूहाच्या संपादकीय सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी उत्तम कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. "सकाळ' समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि व्यवस्थापकीय संचालक-संपादक अभिजित पवार यांनी आज येथे ही घोषणा केली. श्री. कांबळे गेली तीन वर्षे मुख्य संपादकपदाची जबाबदारी सांभाळत होते.

श्री. कांबळे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत आहेत. गेली 33 वर्षे ते पत्रकारितेत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. कोल्हापुरात बातमीदार म्हणून त्यांनी कारकिर्दीस प्रारंभ केला. "सकाळ' समूहात त्यांनी उपसंपादक, ज्येष्ठ उपसंपादक, नाशिक आवृत्तीचे वृत्तसंपादक, संपादक तसेच सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 9 मे 2009 रोजी त्यांची मुख्य संपादकपदी नियुक्ती झाली.

सामान्यांच्या जगण्याच्या लढाईला बळ देण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने केले. अलीकडच्या काळात सर्व शिक्षा अभियान आणि पोषण आहारातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्याचे काम त्यांच्या कारकिर्दीतच "सकाळ'ने केले. याशिवाय शाळांतील बोगस पटसंख्या, बोगस ग्रंथालयांची शहानिशा, सिंचनातील त्रुटी, वसतिगृहांतील अनागोंदी, दुष्काळाची भीषणता आदी विषयही आक्रमकपणे मांडले व त्याची सरकारपातळीवर दखल घ्यावी लागली.

श्री. कांबळे यांचे पत्रकारितेच्या बरोबरीनेच साहित्य क्षेत्रातील योगदानही मोठे आहे. लेखसंग्रह, कथा, कादंबऱ्या, संशोधन ग्रंथ, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, ललित लेख, संपादने असे विविध लेखनप्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांची 40 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. देवदासी प्रथा, भटक्‍या जाती-जमातींचे वेगळेपण, कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या इथपासून ते जागतिकीकरण आणि त्याचे परिणाम असे विविध विषय आणि काळ त्यांच्या लेखनात हाताळला गेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचा शाळा आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, काही लेखनसंपदेचे हिंदी, कन्नड, इंग्रजी, मल्याळी आदी भाषांत अनुवाद झाले आहेत. सांगलीतील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व नंतर ठाण्यातील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही मानाची पदे त्यांनी भूषविली. साहित्य क्षेत्रातील 50 हून अधिक, तर पत्रकारितेच्या क्षेत्रातील 40 हून अधिक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

त्यांनी जर्मनी, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांचे अभ्यास दौरे केले आहेत. उपराष्ट्रपती तसेच पंतप्रधानांसमवेत अनुक्रमे जी-15 व जी-8 देशांच्या परिषदेसाठीच्या परदेश दौऱ्यात सहभागी भारतीय पत्रकारांच्या चमूत त्यांचा समावेश होता. याशिवाय साहित्य व संस्कृती मंडळासह विविध शासकीय व सामाजिक संघटनांवर त्यांनी काम केले आहे.

ई - सकाळवरून साभार नागपुरात वृत्तपत्र कर्मचा-यांची निदर्शने

नागपूर - न्या.मजिठीया वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी नापपुरात सर्व वृत्तपत्रातील कर्मचा-यांनी निदर्शने केली.त्यात लोकमत, देशोन्नती,हितवाद,सकाळ,तरूण भारत आणि लोकमत,लोकमत समाचार,लोकमत टाइम्सचे कर्मचारी सहभागी झाले होते.

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

"सकाळ'च्या मुख्य संपादकपदी श्रीराम पवार

कोल्हापूर - सकाळ माध्यम समूहाच्या मुख्य संपादकपदी श्रीराम जयसिंगराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. "सकाळ'च्या सर्व प्रकाशनांची संपादकीय जबाबदारी ते पाहतील. "सकाळ' समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज येथे ही घोषणा केली. मावळते मुख्य संपादक उत्तम कांबळे "सकाळ' समूहाच्या संपादकीय सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत राहतील.
श्रीराम पवार 19 वर्षे पत्रकारितेत आहेत. बीएस्सी, एमए, एमजेसी असे त्यांचे शिक्षण आहे. सध्या ते शिवाजी विद्यापीठात "मराठी वृत्तपत्रांतील विदेशी आशयाचे प्रतिबिंब' या विषयावर पीएचडीसाठी संशोधन करीत आहेत.

'सकाळ' समूहात मागील वर्षभर ते उपमुख्य संपादकपदावर कार्यरत आहेत. प्रशिक्षणार्थी बातमीदार म्हणून कारकिर्दीस सुरवात केलेल्या पवार यांनी वरिष्ठ बातमीदार, मुख्य बातमीदार म्हणूनही काम केले. "सकाळ' समूहात कोल्हापूर आवृत्तीत ते उपवृत्तसंपादकपदावर रुजू झाले. सातारा आवृत्तीचे सहयोगी संपादक, कोल्हापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

कोल्हापुरात त्यांनी विकासाच्या आणि सामजिक मुद्द्यांवर सातत्याने लेखन केले. पत्रकारितेला कृतिशील चळवळींशी जोडणारे अनेक उपक्रम कोल्हापुरात राबवले. "सकाळ' समूहाच्या वतीने राबवलेली वृक्षारोपणाची मोहीम, पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणणारी "चला पंचगंगा वाचवू या' मोहीम, गणशोत्सवातील ध्वनिप्रदूषण बंद करण्यास भाग पाडणारी डॉल्बीविरोधी मोहीम, कोल्हापुरातील रस्त्यांच्या प्रश्‍नावर केलेले जनसंघटन आदी उपक्रमांत त्यांचा पुढाकार होता.
त्यांनी अनेक वर्षे विधिमंडळाचे वार्तांकन केले आहे. राज्यातील तसेच देशातील अनेक निवडणुकांचे व कारगिल युद्धानंतरच्या काश्‍मीरचे त्यांनी वार्तांकन केले होते. "जिओ पोलिटिकल स्टेटस्‌ ऑफ काश्‍मीर' या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. राजकारण, पर्यावरण, नागरी प्रश्‍नांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. कोल्हापूर महापालिकेसह अनेक शासकीय कार्यालयांतील आणि योजनांतील गैरव्यवहार त्यांनी उघड केले. शोधपत्रकारितेतील कामगिरीसाठी त्यांना "कोल्हापूर भूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कोल्हापूर प्रेस क्‍लबचे ते माजी अध्यक्ष आहेत. कोल्हापूर आणि साताऱ्यातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशीही ते संबंधित आहेत.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमवेत निवडक पत्रकारांच्या चमूतून त्यांनी अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्सचा दौरा केला. न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे तसेच कार्न्स येथे झालेल्या जी-20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेचे वार्तांकनही त्यांनी केले आहे.

ई - सकाळवरून साभारचंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचे स्पर्धा पुरस्कार जाहीर

चंद्रपूर :चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणार्‍या स्पर्धा पुरस्कारांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात लोकशाही वार्ताचे सुशील नगराळे शुभवार्ता, तर गडचिरोलीचे वार्ताहर दिलीप घोडाम हे ग्रामीण वार्ता पुरस्काराचे तृतीय मानकरी ठरले आहेत.

स्व. छगनलाला खजांची स्मृतिप्रित्यर्थ ग्रामीण वार्ता पुरस्कारांचे प्रथम मानकरी संदीप रायपुरे (सकाळ गोंडपिपरी), द्वितीय मानकरी सचिन सरपटवार (लोकमत भद्रावती), तृतीय मानकरी दिलीप घोडाम (लोकशाही वार्ता-जोगीसाखरा), तर प्रोत्साहनपर बक्षिसात अमर बुद्धारपवार (पुण्यनगरी-नवरगाव), आणि सुनील बिपटे (देशान्नती-भद्रावती) यांचा समावेश आहे. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

लोकसेवा आणि विकास प्रतिष्ठानतर्फे प्रायोजित मानवी स्वारस्याच्या बातमीसाठी विशेष पुरस्कारासाठी आशीफ शेख (लोकमत समाचार-देसाईगंज) यांच्या बातमीची निवड करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी आयोजित शुभवार्ता पुरस्कारासाठी सुशील नगराळे (लोकशाही वार्ता) यांच्या बातमीची निवड करण्यात आली. इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. यात चिन्ना बामणहेटी, चंद्रपूर यांच्या छायाचित्राची निवड झाली आहे. रोख एक हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. पुरस्कार स्पध्रेत विजेत्या ठरलेल्या १ ऑगस्टला आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल, अशी माहिती स्पर्धा संयोजक रवी जवळे, साईनाथ सोनटक्के, प्रवीण बतकी, रमेश कलेपेल्ली, शंकर तडस यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

फेसबुक वर शेअर करा

Facebook