> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

शशिकांत सांडभोर अनंतात विलीन

राजगुरूनगर -  ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सांडभोर यांच्यावर आज सकाळी त्यांच्या खेड तालुक्यातील वेताळे गावी अंतिम संस्कार करण्यात आले.शशिला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव भीमा नदीच्या तिरावर एकवटला होता.शशिकांत सांडभोर यांचे काल दुपारी 4 वाजता मुंबईत निधन झाले.त्यांचे पार्थिव सकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या मुळ वेताळे गावी आणले गेले.सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाने त्यांच्या चितेस अग्नि दिला.यावेळी अनेकांना शोक आवरला नाही.यावेळी मराठी पत्रकार परिषेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सुभाष भारव्दाज,पुणे शहर पत्रकार संघाचे सचिव सुनील वाळुंज,तसेच राजगुरूनगर येथील पत्रकार राजेंद्र सांडभोर,अन्य पत्रकार,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.--

रविवार, २९ जानेवारी, २०१७

भास्कर के अफसरों में मचा हड़कंप

मजीठिया मामले में अब तक की सबसे बड़ी खबर महाराष्ट्र के औरंगाबाद से प्रकाशित होने वाले दैनिक भास्कर के अखबार के मराठी अखबार दिव्य मराठी से आई है। यहाँ प्रबंधन की लगातार धुलाई कर रहे हेमकांत चौधरी ने अबकी बार प्रबंधन के चमचों को पटखनी देते हुए एक ही दांव में न केवल धूल चटा दी है बल्कि चारों खाने चित्त कर दिया है। मजीठिया वेजबोर्ड के लिए सुप्रीम कोर्ट में केस लगाने पर मैनेजमेंट ने चौधरी का डेपुटेशन के नाम पर रांची ट्रांसफर कर दिया था। इसके खिलाफ औरंगाबाद इंडस्ट्रियल कोर्ट से चौधरी को स्टे मिल गया था। इसके बावजूद ताकत के खोखले नशे में चूर भास्कर के अहंकारी के अफसरों ने चौधरी को ऑफिस में घुसने नहीं दिया और धक्के देकर बाहर कर दिया था। इससे आहत चौधरी ने अपने अधिवक्ता के माध्यम से कोर्ट की अवमानना का केस दायर कर दिया था। मामले में भास्कर के वकील पिछले लगभग एक साल से तारीख पर तारीख ले रहे थे। कुछ दिन पहले हुई सुनवाई में भी जब भास्कर के वकीलों ने तारीख लेने की कोशिश की तो हेमकांत चौधरी के वकीलों ने इसका जोरदार विरोध करते हुए कोर्ट से मामले में आरोपियों पर अवमानना कार्रवाई शुरू करने की अपील की थी। तब कोर्ट बाद में आदेश जारी करने का कहते हुए सुनवाई स्थगित कर दी थी। अंततः पिछले हफ्ते कोर्ट ने दिव्य मराठी महाराष्ट्र के सीओओ निशित जैन और सीनियर एचआर एग्जीक्यूटिव अनवर अली को अवमानना का दोषी मानते हुए दोनों के खिलाफ अवमानना की कार्रवाई शुरू करने का आदेश जारी कर दिया। मामले में आरोपियों को तीन महीने जेल की सलाखों के पीछे काटना पड़ेंगे साथ ही 5 हजार रुपए जुर्माना भी भरना पड़ेगा। उधर, इसकी खबर लगते ही कर्मचारियों का शोषण कर रहे भास्कर प्रबंधन के चमचों के खेमे में हड़कंप मचा हुआ है। अब उन्हें भी जेल जाने का डर सता रहा है।

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

आयबीएनमध्ये उडाली दाणादाण

चॅनेलमध्ये नवे सीईओ आले आहेत. त्यामुळे म्हात्रे-फणसे जोडी कधी नव्हे ती कामाला लागली आहे. मात्र या दोघांपैकी एकाची खाट पडणार हे नक्की. ( खाट हा इथला फेमस शब्द आहे. आतापर्यंत एकमेकांची खाट पाडण्याच्या नादात चॅनेलची कधीच खाट पडली आहे ) तर फणसेंचे डावे-उजवे हात उशीर, तोडकमोडक कामाची सवय नसतानाही जोरदार कामाला लागले आहेत. ई टीव्हीतल्या आंबट गँगचे हे दोघेही सदस्य होते. इथंही राजकारण करण्याचं त्यांचं काम सुरू आहे. फणसे ज्या चॅनेलला जातील तिथे हा तोडकमोडक जातो. या निष्ठेपायी त्याला इनपूटची मोठी जबाबदारी देण्यात आली. यामुळे तर अनेक रिपोर्टर चक्कर येऊन पडायचे बाकी राहिले होते.
दिवसाला तीन पॅकेजही न करणारी मंडळी आता दिवसाला १५ ते २० पॅकेज करत आहेत.माणिकमोती, हुसाणे नव्या साहेबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. राजाभाऊ, बाबा मंडळीही थकेपर्यंत काम करत आहेत.
अर्थात नेहमी काम करणा-या मंडळींना कामाचं काहीच वाटत नाही. पण आता कधीही काम न करणारी मंडळी कामाला लागली आहे.

वाचकांना बक्षीसांची लालूच

औरंगाबादमध्ये सध्या पेपरवॉर सुरू झाले आहे. यातूनच वाचकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढविणे सुरू आहे. पुण्यनगरीप्रमाणेच पुढारी आणि लोकमतनेही बक्षीस योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे लाखोंची बक्षीसे यात ठेवण्यात आल्याने वाचकांचीही चांदी होणार आहे. कारपासून फ्लॅटपर्यंत बंपर लॉटरी भाग्यवान वाचकांना लागणार आहे. पुण्यनगरी कायम अशी बक्षीस योजना चालवते. त्यामुळे पुण्यनगरीच्या खपात राज्यात लक्षणीयरित्या वाढ होत गेली. हा फंडा नंतर इतर वृत्तपत्रांनीही गिरवायला सुरुवात केली. पुढारीने औरंगाबादेत पाऊल ठेवल्याबरोबर बक्षीस योजना जाहीर केली. यातून पुढारीशी किती वाचक जोडले जातील, हे बघणे उत्सुकतेचे राहणार आहे. पुढारी आल्यानंतर पुण्यनगरी, सकाळचा वाचक तुटेल, असे बोलले जात होते. मात्र पुण्यनगरीला फारसा फरक पडला नाही. पुढारी अवघ्या दोन रुपयांत उपलब्ध आहे तर सर्वाधिक qकमत सध्या बाजारात पुण्यनगरीची आहे. चार रुपये पुण्यनगरीसाठी मोजावे लागतात. तरीही पुण्यनगरीचा खप कमी झालेला नाही, हे विशेष.
रंगारंदुनिया
सर्वच मोठ्या वृत्तपत्रांनी सर्वच्या सर्व पाने रंगीत केली असून, पान १ पासून शेवटपर्यंत रंगीत पाने वाचायला मिळत आहे. पूर्वी पुण्यनगरीची काही पाने कृष्णधवल असायची. आठ दिवसांपासून पुण्यनगरीने सारीच पाने रंगीत केली आहेत. पानांच्या संख्येत सध्या दिव्य मराठी आणि पुण्यनगरी पुढे आहे. २४ पानांचे वृत्तपत्र सध्या हे दोन्ही वृत्तपत्र देत आहेत. तर सकाळ आणि लोकमत २० पानांचा आहे.
पुढारीचा मजकुराचा दर्जा सुमार
पुढारीचा तथाकथित तज्ज्ञ बसलेले असले तरी, मजकुराचा दर्जा मात्र अत्यंत सुमार असाच आहे. पुढारीत प्रकाशित अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊन गंमतीचा भाग बनत आहेत.

दिव्य मध्ये पुन्हा 'दिव्य'...
मराठी वृत्तपत्रात हिंदी हेडलाईन ... 
 

गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

मालकाच्या निर्णयाला केराची टोपली

औरंगाबादेत अखेर  पुढारी सुरु झाला , परंतु शाहू महाराजांचा वारसा सांगणाऱ्या पुढारीत पेशवाई अवतरल्याचे चित्र सद्या पाहायला मिळत आहे.युनिट हेड कल्याण पांडे यांच्या हेकेखोर स्वभावामुळे जाहिरात ,वितरण व संपादकीय विभागात असंतोषाचे वातावरण आहे.मीच सर्व काही अशा अविर्भावात  पांडेजी वागत  असून त्यांनी आता व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव व मुख्य व्यवस्थापक नवल तोष्णीवाल यांनी घेतलेल्या निर्णयांनाही केराची टोपली दाखवत आहेत.
दि.१६ जानेवारी रोजी योगेश जाधव व नवल तोष्णीवाल औरंगाबादला आले होते.त्यांनी यावेळी विविध पदांसाठी १७ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या,त्यात त्यांनी बाळासाहेब लिंगायत व इतर ५ जणांची निवड करून त्यांना जॉईन करून घेण्याचे सांगितले होते,परंतु जाधव व तोष्णीवाल परत गेल्यानंतर कल्याण पांडे यांनी मालकाच्या  निर्णयाला केराची टोपली दाखवत पुढारीचा सर्वेसर्वा मीच आहे,अशी टर्रेबाजी सुरु केली आहे.
याशिवाय वितरण व्यवस्थापक अनिल सावंत व कल्याण पांडेची वितरण विभागात जागा भरण्यावरून तू ..तू ..मैं ..मैं झाल्याचेही समोर आले आहे.जाहिरात विभागात सुद्धा सावळा गोंधळ सुरु  आहे. काही दिवसापूर्वी कार्यकारी संपादक सुंदर लटपटे व पांडे यांच्यातही चांगलीच बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

तुटलेल्या फांदीवर खेळू किती ?


झी न्यूज.
आर्ची बसलेली फांदी मोडली. अस करू एक सुगम संगीताचा कार्यक्रम दाखवू. डाॅक्टर स्वत असतील. तसही डाॅक्टर आज शेरवाणी घालूनच आलेत. चांगल पॅकेज होइल.

IBN लोकमत.
काय म्हणतां फांदी तुटली अस करा. सरांना दोन चार साहित्यिकांच्या घरी पाठवा. 'तूटलेल्या फांद्या विस्कटलेले मन' म्हात्रे सर चांगल बोलतील त्यावर.

ABP माझा.
बेस्ट न्यूज.... अस करा तूम्ही मराठवाड्यातनं ड्रोन घेवून निघा. आपण तूटलेली फांदी ड्रोनने शूट करू. नागराजचा बाइट घ्या. आणि हो तोपर्यन्त पंकज उदासच गाणं कापून घ्या रे.
साॅरी खांडेकर सरांचा निरोप आलाय, तूटलेली फांदी कट्यावर घेवून यायला सांगितलय त्यांनी.

टीव्ही 9-
आरे असाईनमेंट त्या abp वर बघ काय दाखवतायत. आर्ची बसलेली फांदी तुटली. आऊटपुटच्या कोपऱ्यातून "बेदम" आवाज येतो. सर रिपोर्टर नाही म्हणतोय! असाईनमेंटवरुन उलटा आवाज येतो. रिपोर्टर नाही म्हणत असतानाही "खातो मक्याचं आणि गाणं गातो तुक्याचं" यावर विश्वास असलेल्यानं बातमी चालवली
" अबब- फांदी तुटली"

jm

निलेश सरांना विचारून स्पेशल पॅकेज करू, नाही तर नेहमीच शो आहेच ...

 

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

राम खटके यांचे निधन

उस्मानाबाद - 'दिव्यमराठी'चे बातमीदार राम खटके यांचे मंगळवारी (दि.१७) दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे.
सप्टेंबर २०१५ रोजी उस्मानाबाद येथील नीरज गॅस एजन्सीजवळ राम खटके यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती काही प्रमाणात सुधारली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यापासून त्यांची प्रकृती खालावली. मंगळवारी त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ, बहीण, असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ लिखाण धारदार होते. शासकीय कार्यालयासह राजकीय बातमीदारीत त्यांचा हातखंडा होता. त्यासाठी 'दिव्य मराठी'कडून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

कामचुकारेची नाहक धावपळ


आर्ची बसलेल्या 'त्या' झाडाची फांदी तुटली, ही बातमी येताच 'चला जग बदलू या' सॉरी 'निर्भीड बातम्याचं व्यासपीठ' ( घंटा ) चॅनल मध्ये एका डेप्युटी #न्यूज एडिटरने चांगेलच दिवे पाझळले, त्याची ही कहाणी मांडली आहे त्याच चॅनेल मधील एका सहकारी मित्राने ... जणू काही घरचा आहेर दिला आहे ...

आता म्हणाल हा डेप्युटी #न्यूज एडिटर कोण ? आहो तोच तो कामचुकारे...

वाचा काय आहे ही पोस्ट ...
........

#फांदीची #न्यूजरुम धावपळ

असाईनमेंटला #फांदी तुटल्याची #बातमी पडली कशी मेलबॉक्स just now ची नोटीफिकेशन झळकवत होता.
'अरे आपल्याकडेही फांदीची बातमी आली' म्हणत डेप्युटी #न्यूज एडिटर ओरडला.
ताजी करा लवकर ताजी! त्याचा सहाय्यकही ओरडला.
इकडे #बुलेटीन_प्रोड्यूसर त्याच्या सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसरला सूचना करत म्हणाला 'हातावरचं बाकी सगळं सोड फांदीची बातमी तेव्हढी कर!'
सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसर काँग्रेस-सपा महागठबंधनची ब्रेकिंग करत होता, त्यानं मुव्ह होऊन फांदी घेतली. मनातच 'च्युत्या साले' म्हणत कामाला लागला.
बुलेटीन प्रोड्यूसरनं पीसीआरला कमांड दिली.. 'चालू बातमीवर थांब, एक #ताजी देतोय, या बातमीवर खेळायचंय...'
'#रिपोर्टर किंवा डिरेक्टरचा फोनो जोडून देतो प्लेट टाका!' असाईनमेंट हेड बोलला. काही सेकंदातच असाईनमेंटहून आवाज आला 'फोन लागत नाही प्लेन बातमी घ्या' त्यावर बुलेटीन प्रोड्यूसर ओरडला.
'फोनो लागत नाही तर बातमीवर खेळायचं कसं..?'
'फांदी ज्याच्या #शेतात पडली त्याचा फोनो मिळतो का बघा, कोणी प्रत्यक्षदर्शी मिळतोय का बघा..' बुलेटीन प्रोड्यूसरनं सूचनावजा #आदेश जारी केला..
पलिकडून व्हर्च्युअल टीव-टीव करणारी रिपोर्टर बोलली अरे 'सोशल मीडिया सेलिब्रिटीचा घ्या फोनो? नंबर टाकते!
फोनो लावणारा जाम वैतागला होता.. तिकडे स्डुडिओत #अँकर चालू बातमीचे साठ-एक शब्द तीन-तिनदा वाचून कंटाळली होती. 'पीसीआर पुढे काय करायचं सांगा' वारंवार म्हणत होता. तर बुलेटीन प्रोड्यूसर फोनो शिवाय बातमी न घेण्यावर ठाम होता.. इकडे सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसर ताजी गरमा-गरम बातमी तयार करुन खेळ बघत बसला.
अखेर फोनो लागलाच नाही.. फांदीची 'ताजी' बातमी विथ फोनो ऑन एअर जाता-जाता थांबली होती.. यामुळे असाईनमेंटचे मेहनत वायफळ गेल्याचं दुख साजरा करत होते. इकडे सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसरचा 'भ्येंच्योद साले कुठले सगळाच च्युतियापा आहे' म्हणत त्यानं महागठबंधन कंटीन्यू केलं..
पुढचे दोन तास बुलेटीन फांदी प्रतिस्पर्धी चैनलवर दिसली नसल्यानं 'ताजी खाली सरकली'

दोन तासानंतर फांदी पुन्हा प्रतिस्पर्धीकडे ऑन एअर आली. मठ्ठ न्यूजरुम पुन्हा जागं झालं.. यावेळी सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसरची शिफ्ट संपली होती.. ऑफीसमधून बाहेर पडता-पडता फांदी त्याच्या कानावर आदळली..

आता सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसर आवाज चढवून ओरडला...
अरे बेंक्रिंग घ्या.. ब्रेकिंग...

फोनोही घ्या, एक्सपर्ट मिळतो का तेही बघा'? त्याचा आवाज अचानक वाढला..

साला पांचट कुठले म्हणत तो इतक्यात तो न्यूजरुमच्या बाहेर सुसाट पळाला होता...

......

महाराष्ट्रनामा ...

टीव्ही 9 ला मोठा धक्का...
प्रिंसिपल करेस्पॉन्डेंट पंकज दळवी यांचा राजीनामा...
15 दिवसांत टीव्ही 9 ला दुसरा मोठा धक्का...
काही दिवसांपूर्वी नरेंद्र बंडबे यांनी दिला होता राजीनामा... .....
..................

जय महाराष्ट्र चॅनेलच्या राज्यातील स्ट्रिंजरचे जुलै 2016 पासून मानधन थकले ...
डेस्कवरील मंडळी लिडींग चॅनल प्रमाणे ब्रेकिंगची आणि चांगल्या बातम्याची अपेक्षा करतात, परंतु मानधन देण्यास टाळाटाळ
कार्यकारी संपादक निलेश खरे स्ट्रिंजरच्या समस्यांकडे कधी लक्ष देणार ?

सोमवार, १६ जानेवारी, २०१७

एड. उज्ज्वल निकम यांच्या शेजारी बसण्यावरून तू-तू, मै-मै !*


*स्थानिक पोलिसांनी वकीलसाहेबांना अंधारात ठेवले; चार गंभीर गुन्हे दाखल असलेला हद्दपारीचा गुन्हेगार बसला निकमसाहेबांच्या मांडीला मांडी लावून!!*

उस्मानाबाद । उस्मानाबाद जिल्हयात तीन ते चार पत्रकार संघ आहेत. पैकी कुठेही नोंदणीकृत नसलेल्या उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचा  पत्रकार पुरस्कार वितरण कर्यक्रम नुकताच  पार पडला. त्यात प्रमुख पाहुणे उज्ज्वल निकम यांच्याशेजारी बसण्यावरून अध्यक्ष आणि सचिवात  तू-तू, मै-मै झाल्याची चर्चा आहे. पूर्वी अध्यक्ष असलेला आता सचिव झाला आहे, त्याच्यावर चार गंभीर गुन्हे आहेत, त्यास मागे पोलिसांनी हद्दपारीची नोटीस दिली होती, परंतु तो विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या शेजारी बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी याबाबत निकम यांना माहिती दिली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेक प्रश्न उभे  राहिले आहेत.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या शेजारी बसण्यासाठी सचिवाने अध्यक्षाबरोबर हमरीतुमरी  केल्याची चर्चा आहे.  निकम यांना आणण्यासाठी आणि मागे पुढे करण्यासाठी तो पुढे-पुढे करत होता, त्याची ही  चमकोगिरी सर्वाना खटकत होती.

दुसरे असे की, पुरस्कार जाहीर करून दोन वर्ष लोटले तरी त्याचे वितरण नव्हते, अखेर हे वितरण झाले; पण पुरस्कारप्राप्त पत्रकांराना जेवण तर सोडा साधे चहापानही करण्यात आले नाही, त्यांची राहण्याची आणि जेवण्याची सोय तर दूरच,
तसेच हा पत्रकार संघ नोंदणीकृत नसताना शासनाचा भूखंड लाटला आहे, तसेच बेकायदेशीर देणग्या उकळल्या आहेत, हा पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषदशी सलग्न होता, पण तो मराठी पत्रकार परिषदेला कधी विचारत नाही किंवा मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांस बोलवत नाही, मराठी पत्रकार परिषदचे पदाधिकारीही मूग गिळून गप्प आहेत.

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

आवारे पाटलांच्या डोक्यावर 'तुळशी'पत्र

मुंबई - जेमतेम खप असलेल्या दैनिक 'जनशक्ति'मध्ये कार्यकारी संपादक पुरूषोत्तम आवारे - पाटील यांच्या डोक्यावर 'तुळशी'पत्र ठेवण्यात आले आहे.पिंपरी- चिंचवडच्या सिध्दीविनायक  मुख्यालयातून मालकांनी आदेश काढत संपादक म्हणून तुळशीदास भोईटे यांची नियुक्ती केली आहे.भोईटे जॉईन झाल्यामुळे आवारे- पाटील यांची विकेट पडण्याची शक्यता आहे.
उलटी गंगा आणत मालकांनी जळगावचा 'जनशक्ति' हा पेपर पिंपरी चिंचवड,पुणे अणि मुंबईमध्ये सुरू केला मात्र 'जना'ची 'शक्ति' नसलेला हा पेपर जळगाव वगळता अन्य ठिकाणी सपशेल फेल ठरला आहे.लेआऊट आणि प्रिटींग चांगली असतानाही कंटेन्ट नसल्यामुळे हा पेपर जेमतेम खपावर आणि प्रचंड तोट्यात  सुरू आहे.मालक कुंदन ढाके यांची मोठी स्वप्ने असतानाही लायक कार्यकारी संपादक न मिळाल्यामुळे  पेपरची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.यापूर्वी आक्रमक, धडाकेबाज संपादक असताना सुरु झालेला झंझावात आता पूर्णपणे थांबला आहे. जळगावात शेखर पाटलांनी डोलारा चांगला सांभाळला असला तरी पुण्यात गोेविंदा गोपाला सुरू आहे.उदय भविष्यपत्रामध्ये असताना नगरच्या एका वार्ताहराकडून पूजेसाठी हरणाचे कातडे घेतले म्हणून हकालपट्टी झालेले जोशी बुवा हरणाचे कातडे सोडायला तयार नाहीत. पिंपरी - चिंचवडमध्ये निवासी संपादक आणि कला संपादकामध्ये तू - तू मै - मै सुरू आहे.मुंंबईत आवारे पाटील टीम लिडर म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत.त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मालकांनी आवारे - पाटलांच्या डोक्यावर तुळशीपत्र ठेवत संपादक म्हणून तुळशीदास भोईटे यांची नियुक्ती केली आहे.
जाता जाता 
बोगस इन्कम टॅक्स अधिकारी बनून रेड घालताना अटक केलेल्याकडे कारभार दिल्याने वृत्तपत्र इमेजची पार वाट लागलीय... स्तुती पर पुरवण्या काढून कुणाला सुखावता येत असेल असा समज असेल तर ते शेखचिल्ली स्वप्नरंजन ठरावे!

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

डोंगरधारीचे अधिकार गोठवले

मुंबई -सानपाड्यात बसलेल्या डोंगरधारीचे अधिकार गोठवण्यात आले असून पुढारीची ठाणे आवृत्ती स्वतंत्र करण्यात आली आहे.ठाणे आवृत्तीची एकूण 16 पाने असून पैकी आठ पाने ही ठाण्यात लावण्यात येत आहेत.बाकीची पाने ही कोल्हापूरहून येत असून ठाणे आवृत्तीशी डोंगरधारीचा कसलाही संबंध नाही.
पुर्वी ठाणेसाठी माय ठाणे ही चार पानी पुरवणी दिली जात होती .त्यावर सानपाड्यातून नियंत्रण केले जात होते आणि ठाण्यात कोणाला नेमायचे याचे अधिकार डोंगरधारीला होते,परंतु विजय बाबर येताच त्यांच्यावर संक्रांत कोसळली आहे.डोंगरधारीला अंधारात ठेवत मालकांनी ठाणे आवृत्ती स्वतंत्र केली आहे.ठाणे आवृत्तीचे सर्वाधिकार विजय बाबर यांना देण्यात आले आहेत.भविष्यात वसई - विरार ही स्वतंत्र आवृत्ती निघणार असून त्याचे अधिकार कोणाकडे राहणार याकडे लक्ष वेधले आहे.

सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर देणार शेतकऱ्यांना प्रशिक्षण

मुंबई - प्रतिकूल वातावरणावर मात करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणाऱ्या मशाव या इस्रायली शेतीपद्धतीचे प्रशिक्षण राज्यातल्या पावणेतीन लाख शेतकऱ्यांना देण्यासाठी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी), राज्य सरकारचा कौशल्य प्रशिक्षण विभाग, इस्राईलमधील हिब्रू विद्यापीठ आणि पॅलेडियम ग्रुप यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
इस्राईलमधील शेतकरी ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करतात, त्या पद्धतीचे प्रशिक्षण राज्यातील शेतकऱ्यांना मिळावे व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा या कराराचा उद्देश आहे. या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्या वेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास प्रशिक्षण प्रधान सचिव दीपक कपूर, पॅलेडियम ग्रुपच्या प्रमुख बार्बरा स्टॅन्कव्होविका, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, डिलिव्हरिंग चेंज फोरम ऍडव्हायझरीचे संचालक बॉबी निंबाळकर आणि "एसआयएलसी'चे विश्वस्त महेंद्र पिसाळ उपस्थित होते.
या करारानुसार राज्यातील दोन लाख 80 हजार शेतकऱ्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणाचा फायदा विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या प्रतिनिधींची त्यांच्या त्यांच्या भागात इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयारी करून घेतली जाणार आहे. या शेतकरी प्रतिनिधींना अभ्यास साहित्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाइन तयार करण्यात येणार आहे. याशिवाय शेतकरी कुटुंबातील 40 हजार मुले आणि कृषी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचे शेतीशी संबंधित वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून सातत्याने कार्यक्रम घेतले जाणार आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. परदेशांतील प्रगत शेतीची उदाहरणे आपण नेहमी देत असतो. तंत्रज्ञानाची जोड देऊनच शेती विकसित करता येईल, त्यासाठीच 'एसआयएलसी'सोबत शेतकरी प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जाणार आहे.
- संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्यविकास मंत्री
इस्राईलसारख्या देशात प्रतिकूल वातावरणात तेथील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगाची बाजारपेठ काबीज केली आहे. त्यांच्याप्रमाणेच जगभरात विकसित असलेले तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांची सांगड घालून नफ्याची शेती करणे आवश्‍यक आहे. "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'ने असे अभ्यासक्रम तयार केले आहेत.
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर
हवामान, बी- बियाणे, खते, माती परीक्षण आदींचे सल्ले; तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पिकांची काळजी कशी घ्यावी, पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबतचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच होईल.
- बार्बरा स्टॅन्कव्होविका, प्रमुख, पॅलेडियम ग्रुप
सामंजस्य करारात काय आहे?
- इस्राईलच्या शेतीच्या धर्तीवर दोन लाख 80 हजार शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण, विदर्भ- मराठवाड्याला प्राधान्य
- प्रशिक्षण कार्यक्रम स्थानिक विभाग आणि पीकपद्धतीनुसार
- प्रशिक्षित शेतकऱ्यांना अभ्यास साहित्य देऊन त्यांनी गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे अपेक्षित
- चाळीस हजार कृषी विद्यार्थ्यांचे दोन महिन्यांचे वैयक्तिक प्रशिक्षण आणि एक महिन्याची इंटर्नशिप

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

वागळेंचं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न

जग बदलणाऱ्या चॅनेलनं वागळेंचं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु केलाय.१ जानेवारीला चॅनेलला वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त चॅनेल टीआरपीसाठी गृहयुद्ध सुरु केलंय. चॅनेलने ट्विटर आणि फेसबुक पेजवर चांगलीच मेहनत सुरु केली आहे. वेबसाईटचं कामंही जोरात सुरु असल्याचं कळतंय. तसेच चॅनेलने 'आता जग बदलेल' ऐवजी 'निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ' नावाची टैगलाईन १ जानेवारीपासून सुरु केलीय. यासह सर्व न्यूज बुलेटीनची नावे बदलली आहेत. प्राईम टाईमसाठी चॅनेल चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे. प्राईम टाईमला काही जणांचं महत्व आपोआप कमी झालं आहे. त्याचवेळी नवख्याला आणून जुन्यानोटा बाद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असाईनमेंट डेक्सला मनुष्यबळ वाढवलं. संपादकाला पुन्हा एकदा माफीनामा पाठवून कामचुकारे जागा बळकावली आहे. मात्र आऊटपुटचं खिंडार कायम आहे. आऊटपुटसाठी नव्या लोकांचा शोध सुरु असल्याचं कळतंय. पण सोडून जाणाऱ्यांचा कल काही कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे नव्या मनुष्यबळात चॅनेल टीआरपी कमावतो का महापालिकेनंतर फुस्स होतं हे काही दिवसात कळेल..

 जाता - जाता

'आता जग बदलेल' चॅनेल मध्ये वागळे मास्तर गेल्यानंतर त्यांचे पंटर हवालदिल झाले आहेत.त्यांचा चांगलाच धुराळा उठला आहे. वागळे मास्तर गेल्यानंतर जी स्वतःला स्त्री मुक्ती संघटनेची अध्यक्ष समजते तिला सध्या काहीच काम उरले नाही. 'ग्रेट भेट' व्यतिरिक्त दुसरं काहीच येत नसल्याने शर्मा मास्तरांनी तिची हकालपट्टी वेबसाईट डिपार्टमेंट मध्ये केली आहे. पूर्वी हे डिपार्टमेंट मंत्री यांच्याकडे होते परंतु, मंत्री सोडून गेल्यामुळे सोशल मीडिया डिपार्टमेंट वाऱ्यावर पडला होता. त्या साठीच या बाईसाहेबांची ची निवड करण्यात आली आहे. या बाईसाहेब आता वेबसाईट आणि सोशल मीडिया बघणार आहे,

 

रविवार, ८ जानेवारी, २०१७

मजनूभाई बेरक्यावर संतापला

चांगल्या समाजातल्या लैला-मजनूच्या सीसीटीव्हीतल्या रासलीलांचा पर्दाफाश केल्यामुळे मजनूभाई बेरक्यावर प्रचंड संतापला आहे. मजनूभाई एका 'बापू'चा भक्त आहे. बापूच्या माध्यमातून आपल्या अलौकिक शक्तीने, बेरक्या कोण आहे हे सिद्ध करणार असल्याचा विडा मजनूभाईने उचलला आहे.
हा मजनूभाई पूर्वी कॅमेरामन होता,बापूची भक्ती करत 'ढोकळा'च्या मेहरबानीने तो अँकर झाला. लग्न झाले असतानाही त्याने अनेक मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याची ही मजनूगिरी अखेर सीसीटीव्हीमध्ये कैद होताच बेरक्यावर बातमी झळकली आणि त्याचे बिंग फुटले मात्र चूक मान्य करून ती दुरुस्त करण्याऐवजी तो बेरक्यावर संतापला आहे.

गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

औरंगाबादेत अखेर पुढारी सुरू


औरंगाबाद - औरंगाबादेत अखेर पुढारी सुरू झाला आहे.मराठी पत्रकार दिन अर्थात दर्पण दिनाच्या मुहूर्तावर पुढारी सुरू झाला असून कोणत्याही मान्यवरांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन न करता तो वाचकांच्या हाती देण्यात आला आहे.केवळ दोन रूपये अंकाची किंमत असलेल्या पुढारीबद्दल वाचकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत.
गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर पुढारी यंदा सुरू होणार हे गृहीत होते,परंतु अनेक अडथळे आले.नोटाबंदीमुळे पुढारीचे लॉचिंग पुन्हा लांबले होते.अखेर अडथळ्याची ही शर्यत पार करून पुढारी वाचकांच्या हाती पडला आहे.
औरंगाबाद शहर,औरंगाबाद ग्रामीण,जालना आणि बीड या चार आवृत्त्या पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आल्या आहेत.स्थानिक विशेषतः राजकीय आणि क्राईम बातम्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.दोन रूपयात 16 पानापेक्षा जास्त पाने देता येत नाहीत म्हणून औरंगाबाद शहर आवृृत्ती 12 + 4 सुरू आहे.सोबत जाहिरात मजकूर असलेली पुरवणी देण्यात येत आहे.स्वागत मूल्य दोन रूपये असून भविष्यात पुढारीची किंमत तीन किंवा चार रूपयेे राहणार आहे.
औरंगाबाद आवृत्ती आपण ऑनलाईन पाहू शकता...
http://newspaper.pudhari.com/

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

लोकमतमध्ये सुधीर यांची महाजनी ...

लोकमतचे वैजापूर तालुका रिपोर्टर विजय गायकवाड हे गेल्या ११ वर्षांपासून लोकमत मध्ये कार्यरत होते ,पण संपादक सुधीर महाजन यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी राजीनामा दिला असून त्यांनी राजीनामा पत्रात काय लिहिले आहे ते वाचा ...  To
आदरणीय राजेंद्रबाबु दर्डा सर
एडिटर इन चिफ, लोकमत समूह
   जवळपास गेल्या ११ वर्षांपासून मी वैजापूर तालुका रिपोर्टर म्हणून कार्यरत आहे. परंतु संपादक सुधीर महाजन यांच्या हेकट व मनमानी कारभाराचा अक्षरशः कळस झाला आहे. गेल्या दीड ते दोन वर्षात महाजनांनी माझी मुस्कटदाबी करून माझे व्देषभावनेने खच्चीकरण केले. याबाबत मी आपणास वारंवार संदेश देवून कळविले आहे. त्यामुळे आपणास हे सर्व माहितीच आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीसाठी मला बोलाविण्यात आले नव्हते. याशिवाय सखीमंच सदस्य नोंदणीच्या छापून आलेल्या जाहीरातीमध्ये माझे हेतुपुरस्सर नाव टाळण्यात आले. महाजनांच्या या 'कर्तृत्वामुळे' मी थोडा व्यथित झालो खरा परंतु यात महाजनांची वैचारिक 'पातळी' किती आहे हे कळून आले. संपादकासारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीने माझ्यारख्या शेवटच्या घटकाशी अशा सूड व आकसबुध्दीने वागावे ही बाब निश्चितच शोभणारी नाही.  केवळ स्वतःमध्ये असलेल्या पराकोटीच्या अहंकारामुळे माझा बळी देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. महाजनांनी माझ्याबाबत आपणाकडे चुकीचा अहवाल दिला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर आपणाकडे माझ्याबाबत नेहमीच नकारात्मक बाबीच सादर केल्या. त्यामुळे महाजनांचे माझ्याबाबत असलेले 'विशेष' प्रेम हे व आमच्या दोघांमधील असलेले 'मधुर' संबंध पाहता मी आता थाबंणेच योग्य होईल असे माझे वैयक्तिक मत आहे. महाजनांना लोकमत वार्ताहर असण्यापेक्षा त्यांना 'घरगडी' असणे जास्त अपेक्षित आहे. ते माझ्याकडून शक्य नाही. त्यामुळे मी केवळ महाजनांच्या ञासाला कंटाळून आजपासून रितसर लोकमतसाठी काम करणे थांबवित आहे. आता काहीतरी नाविन्याची आस आहे.  आपण आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला कायम ऋणाईत राहिल.
धन्यवाद.... !💐💐🙏🏻🙏🏻
                                        आपला
                              विजय गायकवाड, वैजापूर
माहितीस्तव-
मा. सुधीर महाजन, संपादक लोकमत
मा. चक्रधर दळवी साहेब, संपादक लोकमत
                           

सोलापूर पुण्यनगरीत गळती सुरूच

सोलापूर - पुण्यनगरीच्या सोलापूर आवृत्तीत व्यवस्थापकांचा हुकूमशाही कारभार सुरू आहे.वृत्तसंपादकांपेक्षा व्यवस्थापक वरचढ ठरला असून संपादकीय कामात त्यांची ढवळाढवळ सुरू आहे.त्यामुळे गेल्या वर्षभरापासून किमान सात ते आठ उपसंपादक पुण्यनगरी सोडून गेले आहेत.
वृत्तसंपादक रघुवीर मदने असताना त्यांचे व्यव्स्थापक महाशय काहीच चालू देत नाहीत.ग्रामीण वार्ताहर नेमणुकीपासून सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले आहेत.त्यामुळे बातमी न लिहिणारे पण जाहिरात देणारे वार्ताहर व्यवस्थापकांना प्रिय झाले आहेत.जे वार्ताहर जाहिरात देत नाहीत किंवा टार्गेट पुर्ण करत नाहीत त्यांना घरी पाठवले जाते.
तसेच कोणती बातमी घ्यायची आणि कोणती बातमी टाळायची हे वृत्तसंपादकांच्या हाती राहिलेले नाही.सर्व काही व्यवस्थापक महाशयच पहात आहेत.उपसंपादकांवर ते अरेरावी करत असल्याने गेल्या एकवर्षभरात सात ते आठ उपसंपादक सोडून गेले आहेत.व्यवस्थापकांच्या मनमानीपणामुळे उपसंपादकांना काम करणे अवघड झाले आहे.मालकही व्यव्स्थापकांच्या तक्रारीकडे लक्ष देत नसल्याने पुण्यनगरीची वाटचाल थंडावली आहे.

आयबीएन - लोकमत चॅनलचे नाव बदलणार

मुुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे  नेटवर्क 18  कंपनीचे चे सर्व हक्क आल्यानंतर या कंपनीअंतर्गत चालणारे हिंदी न्यूज चॅनल आयबीएन 7 चे नाव आणि न्यूज इंडिया करण्यात आले आहे.त्यानंतर या कंपनीअंतर्गत सुरू असलेल्या सर्व अठरा चॅनलचे नामांतर करण्यात येत आहे.आता मराठीत सुरू असलेल्या आयबीएन - लोकमतचे नावही बदलण्यात येणार असून ते न्यूज इंडिया मराठी असे राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे
विशेष म्हणजे आयबीएन ही कंपनी आता अस्तीत्वाच नाही तरीही आयबीएन - लोकमत हे चॅनल सुरू आहे.आयबीएन 7 चे नाव न्यूज इंडिया नामांतर करण्यात आल्यानंतर आयबीएन - लोकमतचे नावही बदलण्यात येणार होते,परंतु राज्यात होणार्‍या नगर पालिका,महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नामांतर करण्याचे तीन महिने  पुढे ढकलण्यात आले आहे.मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवडयात आयबीएन - लोकमतचे नाव बदलण्यात येणार आहे.
दुसरे महत्वाचे म्हणजे नेटवर्क 18 ने लोकमतबरोबरची भागिदारीही तोडली असून सध्या लोकमतचा या चॅनलबरोबर आर्थिक संबंध नाही.केवळ जुन्या संबंधामुळे हे नाव टिकून आहे.

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

बेळगाव तरूण भारतमध्ये जोडगोळीची मुजोरी


मुंबई - नरेंद्र महाराजांच्या कृपेने मुंबईत बस्तान बसलेल्या बेळगाव तरूण भारतमध्ये सध्या काळे - गोरे जोडगोळीची मुजोरी सुरू आहे. 14 वर्षे काम करणार्‍या महेश पांचाळचे गणपती विसर्जनानंतर विसर्जन करण्यात आल्यानंतर एका दिगंबराचा उदय झाला,मात्र या दिगंबराला त्रास देण्याचा उद्योग काम कमी आणि चमकोगिरी जास्त करणार्‍या या जोडगोळीने सुरू केला त्यामुळे जोडगोळीला कंटाळून अखेर दिगंबरास राजीनामा द्यावा लागला..नवे संपादक राजेंद्र साठे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या जोडगोळीने भलतेच उद्योग सुरू केले आहेत.मालक किरण ठाकूर या जोडगोळीचा बंदोबस्त करणार का,याकडे लक्ष वेधले आहे.या जोडगोळीचा बंदोबस्त न झाल्यास बेळगाव तरूण भारतची मुंबई आवृत्ती आणखी गाळात रूतण्याची शक्यता आहे..

टीव्ही जर्नलिस्ट व्हायचंय?

सध्याच्या घडीला ‘झी 24 तास’, ‘एबीपी माझा’, ‘आयबीएन लोकमत’, ‘टीव्ही 9’, ‘जय महाराष्ट्र’, ‘महाराष्ट्र 1’, ‘साम’, ‘मी मराठी’ ही 8 मराठी न्यूज चॅनल्स आहेत. यावर्षी आणखी काही मराठी न्यूज चॅनल्स येऊ घातलीत. याशिवाय अनेक हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनल्सही आहेत. या सर्व चॅनल्सना हवे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाची भाषा, त्याचं तंत्र अवगत असणारे, काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे स्मार्ट पत्रकार...हल्ली सोशल मीडियामुळे प्रत्येक जण आजूबाजूला घडणाऱ्या बारीक सारीक घटनांवर व्यक्त होऊ लागलाय. याचाच अर्थ आपल्यापैकी प्रत्येकाला न्यूज सेन्स हा जात्याच अवगत आहे. माध्यमांनाही अशाच स्मार्ट पत्रकारांची गरज आहे. फक्त घोडं अडतं ते या माध्यमाचं तंत्र अवगत नसल्यानं... अँकर्स, रिपोर्टर्स, बुलेटिन प्रोड्युसर, कॉपी एडिटर, व्हिडिओ जर्नलिस्ट, व्हिडिओ एडिटर,..करिअरच्या अशा कितीतरी संधी या क्षेत्रात आहेत. त्यासाठी गरज आहे सरावासह योग्य प्रशिक्षणाची...
टीव्ही मीडियाचं प्रशिक्षण देणारी कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स बरीच आहेत. पण, ज्यांच्याकडे बघून तुम्ही या क्षेत्रात येण्याचा विचार करता, ज्यांना तुम्ही तुमचे आयडॉल मानता, असे किती पत्रकार याठिकाणी प्रशिक्षण देतात? न्यूज चॅनल्समध्ये प्रत्यक्ष कामाला येणारं प्रशिक्षण याठिकाणी दिलं जातं का? बदलत्या तंत्रज्ञानानुसार या इन्स्टिट्यूट्स अपडेट झाल्यायेत का? थिरॉटिकल माहितीसोबत भरपूर सरावही करून घेतला जातोय का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलात, तर उत्तर नकारार्थीच येतं.
म्हणूनच कॅलिडस मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीनं आघाडीच्या चॅनल्समधील नामांकीत पत्रकारांची अनुभवी टीम सोबत घेऊन प्रोफेशनल्स कोर्सेसची आखणी केलीये. टीव्ही जर्नलिझम, अँकरिंग, रिपोर्टिंग, व्हॉईस कल्चर, क्रिएटिव्ह रायटिंग स्किल्स, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ कॅमेरा अशा अनेक कोर्सेसच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण याठिकाणी दिलं जातं. 2 महिन्यांपासून 6 महिन्यांपर्यंत कोर्सचा कालावधी आहे. त्यातही शनिवार, रविवार असे आठवड्यातील दोन दिवस हे प्रशिक्षण दिलं जात असल्यानं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून कोर्स पूर्ण करणं सहज शक्य आहे. पत्रकारितेतील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात आलीये.
पुण्यात कर्वे रोडला नळ स्टॉप परिसरात अकॅडमीचा सुसज्ज असा मीडिया हाऊस सेट अप आहे. आजघडीला न्यूज अँकरिंग, टीव्ही जर्नलिझमचं ट्रेनिंग थेट चॅनल प्रोफेशनल्सकडून देणारी ‘कॅलिडस’ ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे.
पत्ता- कॅलिडस मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी,
‘सर्वदर्शन’, सारस्वत बँकेसमोर, कर्वे रोड, नळ स्टॉप, पुणे-4
संपर्क- 9167059079, 9527709609,
वेबसाईट- www.callidustvmedia.com
Email- info@callidustvmedia.com

मी मराठी चॅनलची अखेर विक्री

मुंबई - डबघाईला आलेल्या मी मराठी आणि लाइव्ह इंडिया चॅनलची अखेर विक्री झाल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे,मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
महेश मोतेवार जेलमध्ये गेल्यापासून मी मराठी आणि लाइव्ह इंडिया चॅनलला घरघर लागली आहे.चॅनल आर्थिक डबघाईस आल्यामुळे दोन वेळा किमान एक महिना बुलेटिन बंद झाले होते.काही महिन्यापुर्वी  विजय शेखर यांनी सूत्रे हाती घेवून  हे चॅनल नवख्यावर रडतपडत सुरू केले होते.डबघाईला आलेले हे चॅनल बिहारमधील एका भाजप नेत्याने खरेदी केल्याचे कळतय.मी मराठी आणि लाइव्ह इंडिया हे दोन्ही चॅनलचा व्यवहार काही कोटीमध्ये झाला असून लवकरच नव्या प्रशासनाकडे हे चॅनल जाणार असल्याची माहिती आहे.
चॅनल विक्री करताना राजेश शर्मा,विजय शेखर आणि लविना फर्नाडिस या त्रिकूटाने आपले स्थान मजबूत केले आहे मात्र ज्यांनी चॅनलसाठी अनेक वर्षे खस्ता खाल्ला ,6 महिने ते 1 वर्षे पगार न घेता राजीनामा दिला, त्यांचे काय ? त्यांचा पगार मिळणार का ? या प्रश्‍नाचे उत्तर अनुत्तरीय आहे.थकीत पगार न देल्यास सर्व माजी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचे कळते.

सोमवार, २ जानेवारी, २०१७

बेरक्याने इतिहास रचला...

पत्रकारांच्या बातम्या देणारा पत्रकार म्हणून बेरक्या उर्फ नारद ब्लॉग 21 मार्च 2011 रोजी सुरू झाला.मराठी मीडियात घडणार्‍या सर्व घडामोडी,पडद्यामागील हालचाली,पुढे काय होणार याची खबरबात,न्यूज पेपर आणि टीव्ही चॅनलमधील बित्तंबातमी देणार्‍या बेरक्याने आता मराठी ब्लॉग विश्‍वास नवा इतिहास रचला आहे.
गुगलच्या सहाय्याने बेरक्या उर्फ नारद ब्लॉग तयार करण्यात आला आहे.ब्लॉगमध्ये आता ब्लॉग स्टेटस् लिंक सुरू झाली आहे.त्यातून ब्लॉग किती लोकांनी वाचला,दररोज किती लोक वाचत आहेत याची माहिती मिळते.21 मार्च 2011 ते 31 डिसेंबर 2016 या दरम्यान बेरक्या ब्लॉग 43 लाख 58 हजार लोकांनी वाचला आहे.ही काही हेराफेरी नसून खरीखुरी आकडेवारी आहे.वाचकांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे हे शक्य झाले आहे.
मराठी मीडियातील बातम्या देणारा बेरक्या हा ऐकमेव ब्लॉग आहे,कुणी याला मराठी मीडीयाचा पीटीआय तर कुणी गॅझेट असेे नाव दिले आहे.बेरक्यावर येणारी बातमी 100 टक्के खरी असते,याची खात्री आता सर्वांना पटली आहे.बेरक्या ब्लॉग हा वृत्तपत्रातील प्रत्येक कर्मचारी,पत्रकारितेतील विद्यार्थी,शासनाच्या माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी,पोलीस,आमदार.मंत्री सुध्दा वाचतात असे एका सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे.बेरक्या हा आता पत्रकारांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
बेरक्याचा नेमका जनक कोण,त्यात किती लोक काम करतात,बेरक्या हा एक व्यक्ती आहे की अनेक व्यक्ती,बातम्या कश्या मिळतात असे एक ना अनेक प्रश्‍न वाचकांना पडले आहेत.याचे एकच उत्तर आहे,नाम नही काम देखो...
बेरक्याला मिळालेल्या यशामुळे आम्ही कधीच हुरळून जात नाही किंवा माज दाखवत नाही.आमचे पाय नेहमीच जमिनीवर आहेत आणि ते कायम राहणार आहेत.बेरक्या हा सज्जनांचा मित्र आणि दुर्जनांचा कर्दनकाळ आहे.चांगल्या पत्रकारांना नेहमीच साथ देण्याचे आणि वाईटांच्या चुका दाखवण्याचे काम बेरक्याने केले आहे.बेरक्या कोणत्याही पत्रकारांचा किंवा वृत्तपत्र मालकांचा दुश्मन नाही.बेरक्या ब्लॉग बंद पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले,काही लोकांनी पोलीसांत तक्रारही दिली होती,मात्र बेरक्या त्यांना पुरून उरला आहे.
असो,आपण दाखवलेला विश्‍वास,प्रेम आणि सदिच्छा यामुळे बेरक्या ब्लॉगला लवकरच सहा वर्षे पुर्ण होत आहेेत...
21 मार्च 2017 रोजी आम्ही सातव्या वर्षात पदार्पण करणार आहोत...
तेव्हा बेरक्या वाचता ना ? मग वाचत राहा....


- बेरक्या उर्फ नारद

'कामचुकारे'ला तंबी

मुंबई - जग बदलण्यासाठी निघालेल्या चॅनेलमध्ये मॅनेजमेंटच्या मॉनिटरिंगमध्ये परवा एक चमचा 'कामचुकारे' घावला.  हा कामचुकार सुरुवातीला असाईनमेंटचा शिफ्ट इन्चार्ज  होता. कामचोरी वाढल्याने बगळे मास्तरांनी  या कामचुकारेची मॉर्निंग शिफ्ट काढून एका ज्युनियरला दिली तर कामचुकारेला सवालच्या गेस्टला फोन करण्यासाठी ठेवलं. काम न करता नुसता बोंबलणारा हा कामचुकारे सेंकड शिफ्टची डोकेदुखी ठरला आणि दुपारीच्या वेळी येणाऱ्या मॅनेजमेंच्या डोक्यात बसला. गेल्या आठवड्यात या कामचुकारेला संपादकाने न्यूजरुममध्येच खूप झापलं. ज्युनियरसमोर संपादकाने कामचुकारेची लायकी काढली. या घटनेनंतर मॅनेजमेंटटने कामचुकारेला सस्पेंड केलं. कामासाठी पायपीट करुन इतर ठिकाणी कोणी उभं राहू न दिल्याने कामचुकारेनं पुन्हा संपादकाला पायघड्या घालायला सुरुवात केली. जॉब गेल्याने वैतागलेल्या कामचुकारेने मॅनेजमेंटआणि संपादकाचे पाय धरलं. कर्जाच्या हफ्त्यांची शपथ देत कामावर घेण्याची विनवणी करत माफीनामाही दिला आणि कामचुकारे परत कामावर आला. मात्र असाईनमेंटला नाही तर प्रॉडक्शनला ठेवलं. तसेच  कामचुकारेला सक्त ताकीद दिली कि, असाईनमेंटच्या कामात लक्ष घालायचे नाही. फक्त प्रॉडक्शनला काम करायचं.. इथंही कामचुकारे सुधारला नाहीये. कामाची सवय नसल्याने इथंही इमानइतबारे कामचोरी सुरु आहे. यामुळे मॅनेजमें अखेरची तंबी देण्याच्या विचारात असल्याचं कळतंय. शनिवारीही या कामचुकारेला संपादकाने न्यूजरुममध्ये झापल्याचं कळतंय. त्यामुळे किती दिवसात कामचुकारेला अखेरचा दणका मिळतो हे पहाणे महत्वाचं ठरेल.


फेसबुक वर शेअर करा

Facebook