> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

बुधवार, २९ एप्रिल, २०१५

सीएनक्सविरुद्ध फुसके आरडीएक्स!


महाराष्ट्राच्या मानबिंदूने नागपूरसह काही आवृत्त्यांतून सीएनक्स ही एक्सक्लुझिव्ह बातम्यांची स्वतंत्र पुरवणी देण्यास सुरुवात केल्यानंतर त्याची हुबेहूब नक्कल दैनिक देशोन्नतीने केली आहे. फरक एवढाच की, स्वतंत्र पुरवणीऐवजी अकोल्यात लाईव्ह पुरवणीतच स्वतंत्र तीन किंवा चार पाने देण्यात येत आहे. नक्कल करतानाही अक्कल लागते. नेमका तोच भाग देशोन्नतीच्या नक्कलकारांकडे नसल्याने ही पानेही सद्या जिल्ह्यात हास्यास्पद विषय ठरला आहे. जे विषय एक्सक्लेझिव्ह म्हणून मांडले जात आहेत ते विषय यापूर्वीच देशोन्नतीसह इतरत्र छापून आलेले आहेत. आज घेतलेला पेट्रोलपंपांचा विषयतर एका माजी निवासी संपादकाने ज्युनिअर लोकांकडून तयार करून घेऊन छापून झाला होता. लोकमतची सीएनक्स पुरवणी ही गुणवत्तेच्या बाबतीत देशोन्नतीच्या पानांपेक्षा कितीतरी अधिक सरस ठरत आहे. बातम्यांचे विषय, त्यांची वाचनियता, एक्सक्लुझिव्ह म्हणता येईल, असे मुद्दे, वाचकांना नाविन्यपूर्ण ठरेल, अशी माहिती याबाबी या सीएनएक्समध्ये आहे. परंतु, याच्या नेमकी उलटी परिस्थिती देशोन्नतीच्या फुसक्या आरडीएक्समध्ये दिसते.

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

महाराष्ट्रनामा ...

आज दि. 27 एप्रिल रोजी साम Tv वर 'आवाज महाराष्ट्र'चा शोचेे एंकर समीरण वाळणेकर होते.
वाळवेकर यांनी दोन महिन्यापुर्वी 'जागृती' चॅनल जॉईन केले होते,परंतु ते आज सामवर दिसल्याचे जागृतीचे कर्मचारी अवाक् झाले...
तर वाळवेवर यांनी साम पुन्हा जॉईन केल्याने 'सोलापुरी ओबामा उर्फ सोलापुरी रंगिला'चे tv वर मिरवण्याचे स्वप्न भंगले...


............................

'जय महाराष्ट्र न्युज'ने नोव्हें १४ पासुन स्ट्रींजर्स'चे थकवलेले पेमेंट अखेर आज रिलीज केले. सहा-सहा महिने पैसेच न मिळाल्याने वैतागलेल्या स्ट्रींजर्स'चा अखेर आज जीव भांड्यात पडला. पण हे किती दिवस चालणार, आता पुढचे पेमेंट थेट सहा महिण्याने मिळणार का? या शंकेने स्ट्रींजर्स चिंतातुर आहेत. नवीन संपादकांनी या प्रश्नात लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे.

.......................

सोलापुरच्या मानबिंदुतील संपादक आणि सहकारी पत्रकार सध्या 'सी एन एक्स' पुरवणीमुळे त्रस्त आहेत कारण रोज नवी exclusive स्टोरी
देणार कुठून? रोज नवा विषय शोधून शोधून गळाला लागेल त्या विषयास exclusive बनवले जात आहे आणि त्यांच्याच पत्रकारांकडून याची चर्चा बाजारात होत आहे
दुसरीकडे वितरण विभागातून शहरातील 25 टक्के विक्रेत्यांना मोबाइल वाटप सुरु आहे. जो तो विक्रेता बाजारात लोकमतचा मोबाइल दाखवत आहे आणि त्यांचे 2 रूपयातील अंक विक्री न होता कुठे जात आहे हे न सांगणेच बरे.

भाऊ तोरसेकर यांच्या नजरेतून सोलापुरी ओबामा उर्फ सोलापुरी रंगीला ...

पादर्‍याला आवट्याचे निमीत्त 

 माझ्या पत्रकारितेची सुरूवात दैनिक ‘मराठा’त झाली. तिथे आचार्य अत्र्यांच्या सहवासाने भाषेवर प्रभूत्व असलेल्या लोकांची मांदियाळी होती. त्यात दत्तू आंबेरकर ह्या जाहिरात खात्यात काम करणार्‍या छायाचित्रकाराचाही समावेश होता. अधूनमधून नव्या पत्रकार बुद्धीमंतामुळे दत्तोबाची आठवण येत असते. कारण त्यांनी अशा अर्धवटरावांचे नेमके विश्लेषण वा व्याख्या सांगितली होती. सोशल मीडियावर ‘सकाळ’चे रोविंग एडीटर संजय आवटे यांनी लिहीलेल्या एका चिरकुट मजकुरामुफे दत्तू आंबेरकर आठवले. ते अशा अर्धवटरावांना  नव्याने शेंबुड खायला शिकणारा कावळा म्हणायचे. अतिशय किळसवाणा असा तो प्रकार आहे. आरंभी मला त्याचा अर्थ माहिती नव्हता. दत्तोबांशी चर्चा केल्यावर त्यांनी प्रत्यक्षच असा कावळा दाखवला. अत्यंत बुळबुळीत असा हा पदार्थ तुम्ही फ़ेकला, की कावळा त्यावर झेपावतो. पण तो सहजगत्या त्याच्या चोचीत येत नसतो. मग तो चोचीत ओढून घेण्यासाठी कावळा जी कसरत करतो, ती खरेच कितीतरी केविलवाणी असते. ‘चोरटया भाऊच्या मनात चांदणे!!!’ या शिर्षकाचा जो मजकूर आवटे यांनी सोशल मीडियात टाकला, त्यावर नजर टाकली तर दत्तू आंबेरकरच्या शब्दांची प्रचिती येते. 

पुढे वाचण्यासाठी क्लीक करा....

पादर्‍याला आवट्याचे निमीत्त 

....................

 

त्यांच्या खांद्यावर डोकेच नाही मग.....

समर खडस वा आवटे वा त्यांच्यासारखे डाव्या विचारांचे पुरस्कर्ते वास्तवात त्याच विचारसरणी वा चळवळीचे खरे मारेकरी असतात. कारण ते आपले ‘इमान’ उजव्या विचारांनी चालणार्‍या भांडवलदारांच्या ‘दारी’ बांधून समर्थाघरीचे श्वान होतात. त्यांनी येणार्‍या जाणार्‍याला भुंकून भुंकून आपल्या गळ्यातला पट्टा लपवण्यात धन्यता मानली तर नवल नाही.
कुठल्या मोठ्या प्रस्थापित भांडवली गुंतवणूकीच्या माध्यमात डाव्या बुद्धीवादाचे फ़ुटके, गळती लागलेले हौद भरत बसलेल्यांची भामटेगिरी कॉ. पानसरेंनी आपल्या (परिवर्तनाच्या दिशा) पुस्तकातून उघड करताना लिहीले आहे. ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ तमाम मोठ्या माध्यमातून डाव्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या पत्रकार, संपादक व विचारवंतांच्या खांद्यावर त्यांचे स्वत:चे डोके आहे काय? असते, तर त्यापैकी एकाने आपल्या मनासारखे लिहीण्याची हिंमत केली असती. त्यासाठी सोशल माध्यमात येऊन भाऊवर दुगाण्या झाडायची लाचारी त्यांच्यावर कशाला आली असती? गरीबांच्या नावाने गळा काढून गरीबांचाच संघर्ष हे कमकुवत करत असतात. या एका परिच्छेदात त्यांच्या पुरोगामी लढवय्येगिरीचा बुरखाच पानसरेंनी फ़ाडून टाकलाय. मग ते वास्तव लोकांसमोर आणणारा भाऊ तोरसेकर व त्याचा इवला ब्लॉग अशा भामट्यांना खुपत असेल, तर नवल कुठले?

पुढे वाचण्यासाठी क्लीक करा..

 त्यांच्या खांद्यावर डोकेच नाही मग........

 

 

 

 

रविवार, २६ एप्रिल, २०१५

पत्रकार संघ कोणासाठी?

औरंगाबाद शहरातील स्व. प्रमोद महाजन मराठी पत्रकार भवनामध्ये शहरातील विविध दैनिकांच्या युवा पत्रकारांनी एकत्र येऊन अभ्यास वर्ग सुरू केला. त्यास आज 26 एप्रिल रोजी 3 महिने पूर्ण झाले. वेगवेगळ्या विषयांतील तज्ञ, अभ्यासक आतापर्यंत येथे हजेरी लावून गेले. आजच्या अभ्यास वर्गात खैरलांजी, सोनई, खर्डा व जवखेड्यासह महाराष्ट्रभर घडलेली जातीय अत्याचारांची प्रकरणे हाताळणारे कार्यकर्ते केशव वाघमारे यांचे 'जातीय अत्याचार आणि वास्तव' या विषयावर भाषण आणि सादरीकरण झाले. परंतु आजच्या अभ्यास वर्गासाठी पत्रकार भवनाची चावीच मिळाली नाही. त्यामुळे पत्रकार भवनाच्या ओसरीत हा कार्यक्रम घ्यावा लागला.
शहरातील तरुण पत्रकार काही चांगला उपक्रम राबवत आहेत. त्यांना बळ मिळून तो उपक्रम चांगल्या पद्धतीने चालायला हवा. पण चाव्या मिळण्यासाठीच जर ते असे अडत असतील, तर ती अतिशय खेदाची बाब आहे.
तीन महिन्यापासून हा वर्ग नियमित चालतो, हे सर्वाना माहित आहे. पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या सेवकांकडे सभागृहाची चावी असते. त्याने न चुकता रविवारी हॉल उघडून देणे गरजेचे आहे. आज तो सेवक सिल्लोडला चावी घेऊन गेला होता. कुलुपाची दुसरी डुप्लिकेट चावीही नाही.  अध्यक्ष आणि सेवक या दोघांनाही नियमित अभ्यास वर्गाची पूर्वकल्पना कल्पना आहे. सर्वजण प्रत्येक वेळी त्यांना आठवण करून देतात. कोणी नसेल तर त्या सेवकाच्या घरी जाऊन चावी आणतात. तरीही असे घडते हे नक्कीच दुर्दैव आहे.
पुण्याहून खास आलेल्या वक्त्याच्या उपस्थितीत औरंगाबादच्या पत्रकार संघाची ही शोभा झाली. तरीही पाहुणे अतिशय चांगले होते. पत्रकार संघाच्या सभागृहासमोर ओसरीवर बसून त्यांनी मार्गदर्शन केले.
अभ्यासवर्ग उत्तम झाला. पण हा चावीचा संदर्भ पुण्यापर्यंत गेला, याचे खुप वाईट वाटले.
नेमकी आज याच पत्रकार भवनात भारतीय बौध्द महासभेचीही पत्रकार परिषद होती. त्यांनीही मग पत्रकार भवनाच्या पटांगणात मोकळ्या जागेतील लिंबाच्या झाडाखाली सतरंज्या टाकून पत्रकार परिषद घेतली. अध्यक्षांना पूर्वसूचना दिली होती, असेही त्यांनी सांगितले.
असो. घडलेल्या प्रकारचे वाईट वाटले. बाकी काही नाही.   आजच्या अभ्यास वर्गात युवा पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थिती लावली. हा उपक्रम चांगला आहे. तो पुढे चालावा. त्यातून चांगले पत्रकार घडावेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फार मदत कुणाची झाली नाही तरी किमान त्यात खोडा तरी घालू नये, ही अपेक्षा.

शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

'बेरक्या'चे आवाहन :

महाराष्ट्रातील तमाम पत्रकार मित्रहो, तुम्ही असे मुळीच समजू नका की तुम्ही एकटे आहात. भलेही तुमच्या आनंदात राहू देत पण संकटाच्या समयी 'बेरक्या' तुमच्या पाठीशी ठामपणे  उभा आहे. तमाम महिला पत्रकार या आमच्या भगिनी आहेत. त्यांचा मान-सन्मान आणि स्वाभिमानाची जपणूक व्हायलाच हवी. 'बेरक्या' सदैव आपणा सर्वांच्या साथीला उभा आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्राने आजवर इन-हाउस अशा महिला छळाच्या तक्रारींचे निवारण करणारी समिती स्थापन केलेली नाही. महिलांना पत्रकारितेत काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेय. माता-भगिनींच्या हित रक्षणासाठी शीर तळहाती घेवून लढल्याचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र आमचा... आज आम्ही इतके बधीर, अलिप्त का झालो आहोत? नाही चालणार हे असे यापुढे...  हक्काने आवाज द्या. तुमची दु:ख, चिंता, व्यथा, वेदना आम्हाला नि:संकोच कळवा. अनेकदा मालक मंडळीही वाईट नसतात. प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानी योग्य जाईलच असे नाही. मधले  दलाल हरामखोरी करतात. यापुढे आम्ही मालक आणि कर्मचारी, अगदी शेवटचा घटक यातील दुवा बनून .... आम्ही तुमचा आवाज बनून मालकांपर्यंत पोहोचू... आपल्याला संघर्ष नव्हे  तोडगा हवाय.... लढाई नव्हे न्याय हवाय... चला, एकमेकांच्या साथीने पत्रकारितेतील आपलं जगणं सुसह्य करूया ...
'बेरक्या'कडे ई-मेल berkya2011@gmail.com या आयडीवर पाठवा. आपली ओळख पूर्णत: गुप्त राखली जाईल.
 
प्रिंट तसेच टीव्ही/वेब मीडियातील सर्व पत्रकार मित्रहो, कंत्राटी, एक वर्षे-तीन वर्षे करार किंवा कोणत्याही स्वरूपातील कर्मचारी, व्हाउचरवर सेवा देणारा पत्रकार-वार्ताहर तसेच वृत्तपत्रातील कोणत्याही विभागात काम करणारे कर्मचारी ..... आपल्याला जर कुणी अचानक कामावरून कमी केले किंवा उद्यापासून कामावर येवू नको सांगितले, कुणी राजीनामा दे म्हणून दबाव आणत असेल, किंवा कोणत्याही मार्गाने वरिष्ठ छळत असतील तर सर्वप्रथम ऑनलाईन तक्रार महाराष्ट्र शासनाच्या लेबर कमिशनरकडे म्हणजे कामगार विभागाकडे दाखल करा. तुमच्याकडे नियुक्तीपत्र असो किंवा नसो, तुम्ही लेबर/वर्कमन असो की मैनेजरीअल पोजिशन होल्डर ... सर्वप्रथम तक्रार करा ... ते अगदी सहज-सोपे आहे. लक्षात ठेवा आपली हक्काची लढाई सर्वप्रथम आपण स्वत: लढायला शिका ... काही अडले, साथ हवी असेल, मार्गदर्शन हवे असेल तर 'बेरक्या' आहेच..
 
प्रिंट तसेच टीव्ही/वेब मीडियातील पत्रकारितेतील माता-भगिनीनो, आपला जर कार्यालयात/'वर्कप्लेस'च्या ठिकाणी छळ होत असेल, कुणी त्रास देत असेल, लगट-लंपटपणा-लोचटपणा करत असेल, मुद्दाम आडवे-तिडवे बोलणे, शेरेबाजी किंवा इशारेबाजी करत असेल, वरिष्ठ कामाच्या निमित्ताने मुद्दाम छळत असतील तर आपण आता अगदी सहज ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता... 

'पद्मश्रीं'च्या पेपरात निर्णय 'डॉक्टर पद्मश्री'च्या मर्जीने!! महिला पत्रकारावर अन्याय!!!

सध्या 'पद्मश्रीं'च्या पेपराचे काही खरे राहिलेले नाही. नाशकात 'बुवाबाजी'ने पार वाट लावलीय; त्यामुळे जळगाव, धुळे-नंदुरबार हे खान्देशचे एकस्पान्स्शन रखडलेय. सहा महिन्यात ही  मंडळी अजून मालेगाव विभागीय कार्यालय सुरू करू शकलेली नाही. मुंबईतही 'रंगीलो रे म्हारो'च्या लीला सुरूच आहेत. परवा दुपारी हे हिरो सकाळची कार्यालयातील प्लानिंग मीटिंग सोडून  परळच्या फोनिक्स मिलमधील पंचतारांकित अशा खास मालवणी "गझाली' हॉटेलमध्ये पोहोचले. एका राजदूतावासातील "देखण्या" मैत्रिणीसोबत त्यांचा खाना ठरला होता. ती पूर्वाश्रमाचीच  "मानबिंदू"तून 'मान खाली घालून बाहेर पडायला लावणारी' "देखणी" बाई व्याकुळतेने वाट पाहत बसलेली! काही माणसे सुधरतच नाही मुळी. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही  म्हणावे की कामातुराणां न भयं न लज्जा??
 
बाईच्या प्रेमळ शिफारसीवरून म्हणे आता "रंगीला" आपल्या रंगरुपाचा 'मेकओव्हर' करतोय; आधीच बोकड्यासारखी फ्रेंच कट दाढी ठेवलीय. टकलावर एक केस सापडेल तर शप्पथ; पण  बोकड्केस मात्र वाढलेहेत! "गझाली"मध्ये 'रंगीला'ने एन्ट्री मारली झोकात; ठरलेल्या जागी बसलेल्या "ती'च्या वर एक "देखणा" कटाक्ष टाकला; बोकडागत प्रेमाने केस कुरवाळले, स्वत:चेच!  एका क्षणाकरता "ती'च्या थोडी पुढे 'रंगीला'ची नजर ओझरती फिरली अन त्याने "ती"ला ओळखले न ओळखले करीत ढुंगणाला पाय लावून पळ काढला. "ती'च्या दोन हातांवरील टेबलवर  होता कोण तो पत्रकार?? फार उत्सुकता असेल तर 'रंगीला'लाच विचारा कारण 'बेरक्या' काही त्या पत्रकाराला ओळखत नाही. त्या पत्रकारालाही काही कळतंय की नाही, कोण जाणे! इतक्या  सुंदर अशा देखण्या अन रंगील्या लंचच्या कार्यक्रमाचा विचका केला. दोन जीवांचा तळतळाट लागेल त्याला! तरीही एक प्रश्न राहतोच; की मराठी दैनिकात काम करणारा माणूस "गझाली'त  प्रेयसीवर उधळायला पैसा आणतो कुठून? कारण लाखभर पगार असला तरी हे नवाबी शौक मराठी दैनिकात काम करणाऱ्याला परवडणारे नाहीत. काय भानगड आहे ते त्या "काशीनाथ  कुलकर्णी"लाच विचारायला हवे! असो. सुरुवातीलाच हे असे विषयांतर झाले तर 'पद्मश्री' राहायचे बाजूला आणि पोस्टला निव्वळ 'रंगीला'च कैफ चढत जाईल.
 
या 'रंगीला'मुळे मुंबईत माणसेच येत नाहीत आणि आलीच तर टिकत नाहीत. अशात आता पद्मश्री काहीही करायला लागलेले आहेत. त्यांचे 98 कुळी शहाणपण, तोरा, न्यायबुद्धी सारे काही  लोकांच्या हातातील बाहुले झालेय. आता तर चक्क एका मुजोर, मस्तवाल,  'पद्मश्री' असूनही 'लहान'च राहिलेल्या डॉक्टरच्या मर्जीनुसार पेपराचे निर्णय व्हायला लागले आहेत. हा डॉक्टर  कितीही आव आणत असला तरी काही तेव्हढा वंदनीय नाही. सर्व संपादक-पत्रकारांना त्याने अगदी व्यवस्थित 'सेटिंग' करून ठेवलेय इतकेच! स्वत:च्या केबिनच्या रिनोव्हेशनवर अकारण  या पद्मश्री डॉक्टरने लाखो रुपये उधळलेहेत; एका मेट्रनला छळ-छळ छळलेय!! मागासवर्गीयांचा जातीवाचक उल्लेख करतो, कर्मचाऱ्यांना हिडीस-फिडीस करतो. गेल्यावर्षीच्या सुरुवातीला   फेब्रुवारीत या डॉक्टरच्या विरोधात संप पुकारला गेला होता. ते प्रकरण चांगले गाजलेही!! 'पद्मश्रीं'च्या दैनिकातील एका "नीती'मान लेडी रिपोर्टरने बेधडक-बिनधास्त पत्रकारिता करून  'डॉक्टर पद्मश्री'ला फार नागवे केले. 'महानगर'मधून शिकलेल्या पत्रकारितेचे संस्कार वाया जात नाही. इतर पत्रकारांप्रमाणे या पोरीने आपले इमान गहाण टाकले नाही; 'लहान' असलेल्या  डॉक्टरच्या तथाकथित मोठेपणाच्या वलयाला ती भुलली नाही. तो 'लहान' डॉक्टर तिला काही आमिष दाखवून थांबवू किंवा विकतही घेवू शकला नाही! ('बेरक्या' या मुलीच्या  प्रामाणिकपणा, धाडस आणि पेशाशी इमानाचे जाहीर कौतुक करतोय!! सलाम!!!) तेव्हा या डॉक्टरचा पार तिळपापड झाला.
 
मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयातील पत्रकार आपल्या दावणीला  आहेत आणि ही पोरगी ऐकत नाही म्हटल्यावर 'पद्मश्री लहान' डॉक्टरने हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला. या मुलीचे नोकरी घालवायचीच, या विचाराने डॉक्टर पेटला. हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी  व संघटना "नीती'मान पत्रकार मुलीच्या पाठी उभ्या राहिल्या. भायखळ्यात, दक्षिण मुंबईत कुस्तीच्या फडातला पेपर प्रथमच तुफान चालला... हातोहात विकला गेला... जागोजागी 'लहान  डॉक्टर'चा बुरखा फाडणाऱ्या बातमीच्या कात्रणाचे होर्डिंग्ज, फलक लागले! 7 वर्षे एकाच जागी तळ मांडून असलेल्या या नागोबा (की तात्याबा!) अशा 'लहान' डॉक्टरविरोधात आंदोलनाला  जोर मिळाला. त्यामुळे आणखीच पेटलेल्या पद्मश्री डॉक्टरने पेपरमालक पद्मश्रींना रंगवून स्टोरी सांगितली. त्या मुलीला काढा, असा हट्ट धरला. गेल्यावर्षी फेब्रुवारीत पेपरमालक पद्मश्रींची  न्यायबुद्धी शाबूत होती. त्यांनी अनेक वर्षे त्यांची चाटूगिरी करणाऱ्या, एका स्त्रीलंपट, ढेरपोट्या, 'राज'कीय पत्रकाराला हॉस्पिटलात पाठविले. त्याने खातरजमा करून मुलीची डेअरिंग व  बातम्याही पूर्ण सत्य तसेच खास असल्याची खात्री करवून घेतली. आयला हे आपल्याला कसे जमत नाही, असा विचार त्याला तेव्हा चमकून गेला असेल. अर्थात सारे आयुष्य दलाली  आणि सेटलमेंट यात घालविलेले चाटू ती हिंमत करू शकणार नाहीत. अशी दमाची आणि सत्याची पत्रकारिता करायला 'पाहिजेत जातीचेच'! ते काही 'नारायण नागबली'च्या नावे  ब्रह्मगिरीवर लोकांची धार्मिक लुबाडणूक करण्याइतके सोपे काम नाही. ज्या 'ढेरपोट्या'ना आणि दिसेल त्या मालकाचे 'कदम' चाटत राहणाऱ्यांनी यापुढे आणखी आपली अख्खी हयात  पत्रकारितेत घालविली तरी त्यांची हिंमत नाही व्हायची बेधडक-बिनधास्त पत्रकारितेची! या डेअरिंगबाज आणि "नीती'मान लेडी रिपोर्टरने उलट 'ढेरपोट्या'चे सेटलमेंटचे 'कदम'च उद्ध्वस्त  केले. ज्या दोन सीनिअर हरामखोरांनी एका चांगल्या ज्युनिअर रिपोर्टरची बदनामी केली त्यांनीच दोघांनी आणखी एकासह मिळून 'मिटवामिटवी'पोटी पद्मश्री लहान डॉक्टरकडून अडीच  लाखांचे शेण खाल्ल्याची आतल्या गोटातली पक्की खबर आहे. अर्थात हे सारे मूळ प्रकरण वर्षभरापूर्वीचे...
 
या सर्व प्रकरणाला वर्षानंतर पुन्हा फोडणी दिली गेली. कारण एक हरामखोर, लंपट 'कदमां'चा बुटक्या सारखा या बिचाऱ्या ज्युनिअर रिपोर्टरला छळत होता. रात्री-अपरात्री तो तिला  अश्लील एसएमएस पाठवायचा, विनाकारण कॉल करायचा. ती पोरगी बधली नाही म्हणूनच मग यांनी तिची बदनामी सुरू केली. सुरुवातीला चारित्र्याची अन नंतर यांनीच खाल्लेल्या  शेणाची! जसा लंपट 'कदमां'चा बुटक्या तसाच 'ढेरपोट्या'ही... अडीच लाख आणि इज्जतही गमावून बसलेला लहान डॉक्टर या मुलीला घालवायचेच म्हणून तरफडतच होता. वर्षभरानंतरही  जेव्हा पेपरवाले पद्मश्री त्याच्याकडे डोळे तपासायला गेले तेव्हा त्याचं जुनं दुखणं उफाळून आलं. त्या मुलीला काढाच, अशी अटच टाकली डॉक्टरने! रंगवून स्टोरीज पकविल्या. झाले! डोळे  तपासून पद्मश्री कार्यालयात आले. ती "नीती'मान लेडी रिपोर्टर, पद्मश्री मालक आणि मालकांचा अनेक वर्षांचा दलाल 'ढेरपोट्या' चमचा हे तिघेच, अशी बैठक झाली! कशासाठी तर  वर्षभरापूर्वी दिलेल्या बातमीच्या सत्यशोधनासाठी! खरेतर तेव्हाच 'ढेरपोट्या'ने हॉस्पिटलला भेट देवून सत्य जाणले होते. मात्र, मालकासमोर हा लाळघोटा कुत्रा नुसतीच जीभ हलवीत बसला.  एका शब्दानेही काही बोलला नाही! मालकाने तर जणू आपली न्यायबुद्धीच शाबूत ठेवली होती.
 
कुणीतरी एखादा 'लहान डॉक्टर' सांगतो म्हणून आपल्या पेपरचा कर्मचारी काढायचा, त्याला  उद्यापासून तू कामावर येवू नकोस, डॉक्टरची तू इथे काम करावेस ही इच्छा नसल्याचे सांगावे म्हणजे महाभयंकर आहे!! कुठे गेला यांचा छत्रपती बाणा? कुठे गेली न्यायबुद्धी? तो एखादा  लहान डॉक्टर आता तुमच्या पेपरचे निर्णय घेणार का? कुणाला काढायचे, कुणाला ठेवायचे हे बाहेरची व्यक्ती ठरविणार? मग मालक म्हणजे काय बाहुलं आहे बिनबुडाचं? 98 कुळांचा  अभिमान मिरविणाऱ्या, न्यायप्रिय छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणाऱ्याकडून ही असली अपेक्षा मुलीच नाही. मुंबईत माणसे का मिळत नाही तो काही फक्त एखाद्या 'रंगीला'चा दोष  नाही. पद्मश्री मालकांची धरसोड, असे काहीबाही ऐकून काहीबाही निर्णय घेणे आणि आपल्याच कर्मचाऱ्यांवर अन्याय करणे, हेही मुंबई खड्ड्यात जाण्याचे एक महत्त्वाचे अकारण आहे.  तुमच्या संस्थेत तुम्ही काय करायचे हे ठरविणारा तो लहान डॉक्टर कोण? उद्या तुम्ही त्याला त्याच्या हॉस्पिटलातल्या कुणाला असे तडकाफडकी काढायचे सांगितले तर तो ऐकेल का  तुमचे? कुणाचे काय आणि किती ऐकावे, याचे निदान काहीतरी तर तारतम्य हवे! आपलाच एव्हढा मजबूत पेपर असा 'मुकी बिचारी, कुणीही हाका' करून टाकलाय!
 
निदान त्या 'रंगीला'चे काही गुण तरी आहेत. जे काही मुंबईत तुमचे अस्तित्व आणि वेगळेपण टिकवून ठेवलेय ते त्यानेच; त्याच्याच धडपडीने!! तो एकटा खेचतोय! लंपट 'कदमां'चा  बुटक्या आणि 'ढेरपोट्या' दलाल यांची काय लायकी तरी काय आहे? मुली दिसल्या की लाळ टपकावतात!! नजरेने बलात्कार करतात साले!! तो 'रंगीला' निदान जे काही 'देखणे' धंदे  करायचे ते खुलेपणाने तरी करतो. या "नीती'मान लेडी रिपोर्टरच्या प्रकारणाबाबत 'बेरक्या' परिवार 'रंगीला'चे जाहीर अभिनंदन आणि कौतुक करायला संकोच करणार नाही. एका गरीब  घरच्या, बाप गमावल्या मुलीची नोकरी वाचावी म्हणून त्याने स्वत: त्या लहान डॉक्टरची समजूत काढली. गेल्यावर्षी या मुलीनेही त्याचे वाढदिवसाला बुके वैगेरे देवून शुभेच्छा देत साऱ्या  एपिसोडवर पडदा टाकला होता. एखाद्या घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या पोटावर तुम्ही लाथ मारता तेव्हा भयानक पाप करत असता. संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणता. दलालीच्या  कमाईवर पोसलेल्या आणि टमटमित ढेरी फुगविलेल्यांना मेहनतीच्या पैशांचे महत्त्व काय उमगणार? नोकरी टिकावी म्हणून कोणी किती वेळा कोपऱ्यात जावून पद्मश्री मालकांचे पाय  धरले आणि कशा त्यांच्या लगेजची हमाली केली, 'सामान' ने-आण केले... हे काही जगापासून लपून राहिलेले नाही!!
 
उद्ध्वस्त अवस्थेतील ही "नीती'मान लेडी रिपोर्टर आधीच लंपट 'कदमां'चा बुटक्या आणि 'ढेरपोट्या'ने केलेल्या बदनामीने त्रस्त आहे. तिची स्टोरी 'बेरक्या'ला प्राप्त झाली तेव्हा मन सुन्न  झाले. ती महिला आयोग, लेबर कमिशनर सर्वत्र तक्रार करायच्या मूडमध्ये आहे. त्यासाठी 'बेरक्या' तिला संपूर्ण सहकार्य करेल. तिच्याकडे सारे पुरावे आणि रेकॉर्डिंग आहेत. कुणीही  सुटणार नाही. माध्यमातील महिलांनाच इतकी हीन वागणूक दिली जात असेल तर ती किती दुर्दैवी बाब आहे. 'बेरक्या'ची पेपरवाले पद्मश्री मालक यांना हात जोडून विनंती आहे की,  कुणाच्या पाठीवर मारा; पण पोटावर उगाचच मारू नका. संपूर्ण भायखळा परिसरात आठवडाभर तुमचा पेपर ज्या मुलीने चर्चेत अग्रेसर ठेवला, तिलाच तुम्ही काही दलाल, चमच्यांच्या  कान फुंकण्याने सरळ काम बंद करायला सांगितले. दादा, हे बरे नाही हो! 'मोगलाई'ही इतकी भयंकर नव्हते. आपण तर श्रीमंत छत्रपती शिवरायांचे पाईक ना? महाराजांनी केलेल्या  'कल्याणच्या सुभेदारा'च्या सुनेच्या सन्मानाचा किस्सा पुन्हा सांगायलाच हवा का? आपण भलेही सन्मान नका करू; पण आपल्याकडे चाकरी करणाऱ्या गरिबाघरच्या मुलींवर अकारण  अन्याय होणार नाही, हे तरी पाहणार की नाही!! ज्यांनी तुमच्या पेपरची पताका फडकावत ठेवली, ज्यासाठी आमिषे झुगारले, जीवाचे रान केले... त्यांनाच तुम्ही ही बक्षिसी देणार? दादा,  खरेच तुम्ही असे आहात का हो? निदान सत्याची पडताळणी तर करा. भलेही तो लहान पद्मश्री डॉक्टर तुमचा मित्र असेल; पण त्याला तुम्ही तुमच्या संस्थेत हस्तक्षेप, ढवळाढवळ करू  देणार का हो? त्याची मर्जी राखण्यासाठी तुम्ही पेपरात तुमच्यासाठी झटलेल्या निष्ठावंतांचा बळी घेणार का हो? दादा, 'बेरक्या'चे तुम्हाला नम्र आवाहन आहे की; श्रीमंत छत्रपती  शिवरायांचा 98 सोडा अगदी 1 टक्का तरी अंश वापरा आणि प्रामाणिकपणे अंतर्मानाचा कौल घ्या!! आम्हाला खात्री आहे तुम्ही न्याय कराल...
 
'बेरक्या'चे आवाहन :
महाराष्ट्रातील तमाम पत्रकार मित्रहो, तुम्ही असे मुळीच समजू नका की तुम्ही एकटे आहात. भलेही तुमच्या आनंदात राहू देत पण संकटाच्या समयी 'बेरक्या' तुमच्या पाठीशी ठामपणे  उभा आहे. तमाम महिला पत्रकार या आमच्या भगिनी आहेत. त्यांचा मान-सन्मान आणि स्वाभिमानाची जपणूक व्हायलाच हवी. 'बेरक्या' सदैव आपणा सर्वांच्या साथीला उभा आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्राने आजवर इन-हाउस अशा महिला छळाच्या तक्रारींचे निवारण करणारी समिती स्थापन केलेली नाही. महिलांना पत्रकारितेत काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेय. माता-भगिनींच्या हित रक्षणासाठी शीर तळहाती घेवून लढल्याचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र आमचा... आज आम्ही इतके बधीर, अलिप्त का झालो आहोत? नाही चालणार हे असे यापुढे...  हक्काने आवाज द्या. तुमची दु:ख, चिंता, व्यथा, वेदना आम्हाला नि:संकोच कळवा. अनेकदा मालक मंडळीही वाईट नसतात. प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानी योग्य जाईलच असे नाही. मधले  दलाल हरामखोरी करतात. यापुढे आम्ही मालक आणि कर्मचारी, अगदी शेवटचा घटक यातील दुवा बनून .... आम्ही तुमचा आवाज बनून मालकांपर्यंत पोहोचू... आपल्याला संघर्ष नव्हे  तोडगा हवाय.... लढाई नव्हे न्याय हवाय... चला, एकमेकांच्या साथीने पत्रकारितेतील आपलं जगणं सुसह्य करूया ...
'बेरक्या'कडे ई-मेल berkya2011@gmail.com या आयडीवर पाठवा. आपली ओळख पूर्णत: गुप्त राखली जाईल.
 
प्रिंट तसेच टीव्ही/वेब मीडियातील सर्व पत्रकार मित्रहो, कंत्राटी, एक वर्षे-तीन वर्षे करार किंवा कोणत्याही स्वरूपातील कर्मचारी, व्हाउचरवर सेवा देणारा पत्रकार-वार्ताहर तसेच वृत्तपत्रातील कोणत्याही विभागात काम करणारे कर्मचारी ..... आपल्याला जर कुणी अचानक कामावरून कमी केले किंवा उद्यापासून कामावर येवू नको सांगितले, कुणी राजीनामा दे म्हणून दबाव आणत असेल, किंवा कोणत्याही मार्गाने वरिष्ठ छळत असतील तर सर्वप्रथम ऑनलाईन तक्रार महाराष्ट्र शासनाच्या लेबर कमिशनरकडे म्हणजे कामगार विभागाकडे दाखल करा. तुमच्याकडे नियुक्तीपत्र असो किंवा नसो, तुम्ही लेबर/वर्कमन असो की मैनेजरीअल पोजिशन होल्डर ... सर्वप्रथम तक्रार करा ... ते अगदी सहज-सोपे आहे. लक्षात ठेवा आपली हक्काची लढाई सर्वप्रथम आपण स्वत: लढायला शिका ... काही अडले, साथ हवी असेल, मार्गदर्शन हवे असेल तर 'बेरक्या' आहेच..
 
प्रिंट तसेच टीव्ही/वेब मीडियातील पत्रकारितेतील माता-भगिनीनो, आपला जर कार्यालयात/'वर्कप्लेस'च्या ठिकाणी छळ होत असेल, कुणी त्रास देत असेल, लगट-लंपटपणा-लोचटपणा करत असेल, मुद्दाम आडवे-तिडवे बोलणे, शेरेबाजी किंवा इशारेबाजी करत असेल, वरिष्ठ कामाच्या निमित्ताने मुद्दाम छळत असतील तर आपण आता अगदी सहज ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता... 

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

दिव्य मराठीची वाटचाल रखडली!

औरंगाबाद  - मोठ्या प्रमाणात झालेली भांडवली गुंतवणूक व बाजारपेठेतून घटलेले उत्पन्न यामुळे दैनिक दिव्यमराठीच्या विस्तारीकरणाची वाटचाल रखडली आहे. दिव्यचे औरंगाबाद युनीट सद्या तोट्यात चालत असून, प्रशासकीय खर्च वाढलेला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील स्थिती सुधारली नाही तर आणखी कॉस्ट कटिंग केल्याशिवाय व्यवस्थापनाला पर्याय राहणार नाही. पुणे व कोल्हापूर आवृत्ती सुरु करण्याचेही नियोजित होते. परंतु, बाजारपेठेची स्थिती चांगली नसल्याने या आवृत्त्यांबाबतही व्यवस्थापन काहीही निर्णय घेण्यास तयार नाही.

महाराष्ट्र संपादक अभिलाष खांडेकर यांनी माणसे भरताना गुणवत्तेपेक्षा जातीचा निकष लावल्याचा फटकाही दैनिकाला बसला. याच जागी बहुजन समाजातील गुणवान माणसे नियुक्त केली असती तर व्यावसायिक फटका बसला नसता. सद्या कॉर्पोरेट बिझनेस दैनिकाकडे येत असून, लोकल बिझनेस नसल्यात  जमा आहे. नगर, अकोला, नाशिक आणि फादर एडिशन असलेली औरंगाबाद आवृत्तीही मंदीच्या मार्‍यात सापडलेली आहे. त्यामुळेच पुणे अन् कोल्हापूर आवृत्या सुरु करण्यात व्यवस्थापन टाळाटाळ करत आहे. महाराष्ट्र टाईम्सने ज्याप्रमाणे आपलेच जातभाई पोसण्यासाठी बहुजनांची गुणवंत माणसे टाळली. तोच कित्ता दिव्यमध्ये खांडेकर यांनी राबविला. परिणामी, मटाप्रमाणेच दिव्यदेखील प्रत्येक ठिकाणी सपशेल अपयशी ठरले आहे. ही बाब व्यावसायिक मेंदू असलेल्या अग्रवाल शेठच्या पचनी पडत नाही. पुणे आवृत्ती ही व्यावसायिक फायद्याची ठरणारी असेल असे सल्लागार संपादकांनी व्यवस्थापनाला समजावून सांगूनही दुधाने तोंड पोळलेले व्यवस्थापन आता ताकही फुंकून पित आहे.

दिव्य मराठी औरंगाबादेत सुरू होवून पाच वर्षे होत आहेत.ही होम आवृत्ती असूनही मराठवाड्यातील नांदेड,परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यात  अंक नाही.सोलापूरला आवृत्ती सुरू झाल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कसाबसा अंक सुरू आहे.मराठवाड्यात क्रमांक एकवर लोकमत, पुण्यनगरी क्रमांक दोनवर आहे.सकाळ आणि दिव्य मराठीमध्ये क्रमांक तीनसाठी स्पर्धा सुरू आहे.
नगर शहरात अंक असला तरी नगर जिल्ह्यात अजून अंक पोहचला नाही.नगर आवृत्तीचे तीन तेरा वाजले आहेत.
अकोला आवृत्ती सलाईनवर आहे.तेथील सिटी न्यूज सुपरफास्ट दैनिक सुध्दा दिव्य मराठीपेक्षा जास्त खपते.सोलापूर आवृत्ती जिल्हापुरती सिमीत आहे.युनिट हेड आणि निवासी संपादकांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.सोलापुरात स्थानिक दैनिक सुराज्यसुध्दा दिव्य मराठीपेक्षा पुढे आहे.
जळगाव आणि नाशिक आवृत्तीची तिच बोंब आहे.त्यामुळेच भोपाळसेठ पुढील आवृत्ती काढण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.
नागपुरात किती तरी दैनिके आली आणि गेली पण लोकमत क्रमांक एकवर आहे.त्यामुळे दिव्य मराठीला नागपुरात पाय ठेवणे सोपे नाही.कोल्हापुरात पद्श्रीचा पुढारी क्रमांक एकवर आहे.लोकमतच्या दर्डाशेठला पद्श्रींनी कोल्हापुरात पाणी पाजले तिथे भोपाळशेठला मैदान सोपे नाही.पुण्यात क्रमांक एक वर सकाळ आहे.सकाळला पुण्यात शह देणे सोपे नाही.मुंबईत अनेक दैनिकांची वाट लागली आहे.तिथे काम सोपे नाही.अश्या परिस्थितीत भोपाळशेठला पुढच्या आवृत्त्या सुरू करताना मागचा पुढचा विचार करावा लागणार आहे.

सोमवार, २० एप्रिल, २०१५

नगर अपडेट

महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या नगर आवृत्तीत सध्या सावळा गोंधळ सुरु आहे. सिनिअर रिर्पोटर व उपसंपादक मंडळी जुनेच विषय (पेनड्राईव्ह) आकडेमोड करून पुन्हा छापत असतानाच आता उपसंपादकांच्या डुलक्याही चव्हाट्यावर आल्या आहेत. हॅलो अहमदनगरचे पान एक पाहणार्‍या सिनिअर उपसंपादकाची डुलकी आज चांगलीच चर्चेचा विषय ठरली. ‘शनिशिंगणापूर येथे चार लाख भाविकांनी साईदर्शन घेतले असे कॅप्शनच या उपसंपादकाने डुलकीच्याभरात छापून टाकले. शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन होते तर शिर्डीत साईदर्शन होते हेही या सिनिअरला कळू नये?
.....
मी मराठी लाईव्ह पुण्यात येत असल्याचे पाहून नगरमध्ये अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
....
बेरक्याने वर्तविल्याप्रमाणे दैनिक सार्वमतचे कार्यालय प्रिटिंग युनीट असलेल्या एमआयडीसीत स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे नेवाशावरून अप-डाउन करणार्‍या एका मुख्यउपसंपादकासह शहरातील रिपोर्टर व उपसंपादकांचे हेलपाटे व आर्थिक खर्च वाढले असले तरी सारडाशेठचे दरमहा ६० हजार रुपये मात्र वाचले आहेत.

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

वाचकाचे पत्र ..

बेरक्या भाऊ नमस्कार,
फेक आयडी वरून हा मेल पाठवतोय.तुमचे काम स्तुत आहे सुरु राहू द्या. पण एक मोहीम उघडा महाराष्ट्रात खास करून मुंबईत बाहेर प्रांतातून आलेले पत्रकार दिल्लीतून सेटिंग लावतात आणि कोटींचे पेकेज घेतात. इथे मराठी विद्यार्थी पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतो आणि सगळे स्किल असून सुद्धा त्याना संधी मिळत नाही भटकंती, फरफट होते. त्या हिंदी भाषिकांच्या विरोधात मोहीम उघडा. त्याना काहीच माहिती नसते महाराष्ट्राबद्दल राजकारण, इतिहास, भूगोल, मनोरंजन इत्यादी पण तरीही दिल्लीत सेटिंग लावतात आणि कोटीचे पेकेज घेऊन अय्याश आयुष्य जगतात. महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थी वनवन भटकतोय. यांच्या विरोधात मोहीम उघडा यांचा माज उतरवा.... वाहिनी हिंदी असो किंवा इंग्रजी महाराष्ट्र ज्यांची कर्मभूमी आहे अशाच माणसाना मुंबई ब्युरो ऑफिस मधे काम मिळायला हवे. लायक व्यक्तीची नियुक्ती करा… मुद्दा पेटवा त्याशिवाय हे रस्त्यांवर येणार नाहीत.....
धन्यवाद
Vishal Deshpande
vishaldeshpande15@rediffmail.com

मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

नांदेड येथील समाजकल्याण आयुक्तांनी पत्रकारांना वाटले पाकीटे ?


नांदेड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत शुक्रवार 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आल होते. यामध्ये जिल्ह्यातील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होतीे. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे आयोजित या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह समाजकल्याण सहा. आयुक्त सतेंद्र आऊलवार, सामाजिक कार्यकर्ते बालाजी कोम्पलवार यांच्यासह समाजकल्याण विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरवातीलाच उपस्थित पत्रकारांची नावे नोंदवून त्यांच्या नावाने पाकीटे तयार केली गेली. कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात सहाय्यक आयुक्तांनी सर्व पत्रकारांना गुलाबाच्या फुलासोबत एकेक पाकीट भेट म्हणून दिले. पाकीटात 1000 रूपये प्रत्येक पत्रकाराला मिळाले. बहुतांश पत्रकारांनी कार्यालयात या पाकीटाचे बिंग फुटू दिलेच नाही.

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

एक पाऊल मागे : एका दाम्पत्याच्या पाटीलकीचा 'ताप'

मुंबई - डॉक्टर गुडगुडकरांच्या एक पाऊल मागे चॅनेलची ही कहाणी. रिपोर्टर पत्नी आणि शिफ्ट इन्चार्ज पती असल्यामुळे अख्ख्या चॅनेलला 'पाटील'की सहन करावी लागतेय. पत्नीचा वॉक थ्रू, पॅकेज झाला नाही तर पती लीचमधल्या टीमला शिव्या घालतो. कोणी उशीर केला, कळत नाही का, या शब्दात उद्धार केला जातो. एके काळी हाच पती लीचमध्ये व्हिज्युअल, बाईट कापायचा. मात्र आता नियतीचा 'विनोद' बघा तो असा. एकमेकांचे पत्ते कापत पती महाशयांनी प्रगती केली. या पती महाशयांना दिल्लीला रिपोर्टर व्हायचं होतं. मात्र तिथं 'रश्मी'ची निवड झाली. त्यामुळे तिच्या विरोधात सगळेच उभे राहिले. काळू मामा इनपूट हेड असूनही काड्या करण्यात मागे नव्हते. मात्र पती देवांचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. दाम्पत्यापैकी एक संपादकाला माघारी शिव्या घालतो तर दुसरा संपादकाबरोबर असतो. एकदा ग्रुपवरती एकाने सरांसाठीचा मेसेज चुकून टाकल्यानं मोठा गोंधळ झाला होता. खरी कमाल तर तेव्हा झाली जेव्हा या दाम्पत्याला पहाटे संपादकाच्या घराच्या खाली एका ड्रायव्हरने पाहिले होते. मात्र नंतर त्या ड्रायव्हरलाच कामावरून काढण्यात आले. आता यांचा जाच थांबायचा तरी कधी ?

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

'भाला' फेक करणा-या 'चंद्रया' माणसाची हकालपट्टी

पद्मश्रीच्या पेपरची औरंगाबाद आवृत्ती सुरू होणार म्हणून गेल्या पाच वर्षापासून 'डंका' सुरू आहे.मात्र आवृत्ती काही सुरू झाली नाही.मात्र औरंगाबादच्या कार्यालयात बसणा-या एका डेप्युटी न्यूज एडिटरचा चांगलाच 'डंका' वाजला आहे.
कारण अगदी क्षुल्लक आहे.या डेप्युटी न्यूज एडिटरला कसलेच काम नव्हते.एक किंवा दोन शिळ्या बातम्या पाठवायच्या व उरलेल्या वेळेत फक्त चकाट्या मारायच्या ऐवढेच काम त्यास उरले होते.कामच नसल्यामुळं पारंपारितक पुजापाठ करण्याचा आणि घंटी वाजवण्याचा धंदा तो औरंगाबादेत करत होता.
आता असा धंदा करणारा माणूस कसा असेल हे तुम्हाला कळलेच असेल.तोंडावर गोडगोड बोलायचे आणि पाठीत खंजीर खुपसायचा हा त्र्याचा हातखंडा.
.त्याचबरोबर चारचौघात मालकाची उणीदुणी काढून त्यांच्यावर 'भाला' फेक करत होता. त्याची ही सर्व काळी कर्तृत्वे पद्मश्रीपर्यंत पोहचली आणि त्यांनी कोल्हापूरच्या आखाड्यात बोलावून खूप बेकार पध्दतीने नारळ दिला.या 'चंद्रया' माणसाची पद्मश्रीच्या पेपरमधून हकालपट्टी होताच,औरंगाबादेत चर्चेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्राच्या मानबिंदूतून पद्मश्रीच्या पेपरमध्ये दिवे पाजळण्यास आलेल्या या चंद्रया माणसाची कायमची घंटा वाजताच तो हवालदिल झाला आहे.हा 'भाला' फेक करणारा 'चंद्रा' माणूस भोपाळशेठच्या पेपरमध्ये हजेरी लावून आला,पण त्याची डाळ अद्याप शिजली नाही.त्यामुळे या चंद्रयावर आता पारंपारिक घंटा वाजवण्याचा धंदा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही...

गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

मुंबई/ पुणे अपडेट...

> सकाळमधून पुढारीत  आलेले संजीव साबडे चिंचपोकळी कार्यालयात रुजू... पुढारी न्यूज नेटवर्क ची जबाबदारी. आवृत्ती कॅप्टनपदी डोंगरधारी कायम… साबडे अद्याप बाजूला …

> तरुण भारत बेळगाव मधून बाहेर पडलेले नरेंद्र कोठेकर लोकमत मध्ये  वृत्त संपादक म्हणून रुजू …

> बेळगाव तरुण भारतला मुंबई आवृत्तीसाठी निवासी संपादक सापडेना.… अजूनही चर्चेचे गुर्हाळ सुरूच.…

> मी मराठी चा  TRP  वाढतच  या चॅनलकडे पत्रकारांचा ओढा वाढला...निलेश खरेमुळे  ABP माझा चे अनेक जण मी मराठीच्या संपर्कात ..

> मी मराठी लाईव्ह दैनिकाच्या पुणे आवृत्तीसाठी टीमची जुळवाजुळव सुरू....

> नव जागृती चॅनलच्या पुण्यातील नव्या स्टुडिओचे काम युध्दपातळीवर...लवकरच डिबेटसह विविध शो सुरू होणार..
>  मुंबई - जय महाराष्ट्रमध्ये विलास आठवले यांना पदोन्नती...कार्यकारी संपादक तथा चॅनल हेड म्हणून नियुक्ती...

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

मंगळवेढ्यात पत्रकारांतील वाद विकोपास

सोलापूर जिल्ह्यातील दामाजी पंतांच्या मंगळवेढ्यात दोन स्थानिक दैनिकाच्या संपादकातील वाद विकोपास...दैनिक दामाजी एक्स्प्रेसचे संपादक दिंगबर भगरे आणि दैनिक सुर्यनारायणचे संपादक औदुंबर ढावरे यांच्यात वाद पेटला .. ऐकमेकांच्या विरोधात बातम्या...सुर्यनारायणमधील बातम्या लोकमतचे तालुका प्रतिनिधी मल्लीकार्जुन देशमुखे दिल्याचा भगरे यांचा संशय...ढावरे राहिले बाजूला आणि भगरे आणि देशमुखें यांच्यात तेढ...यातून मंगळवेढा पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी.....सर्वप्रथम खंडणीची तक्रार नंतर गळ्याला चाकू लावला ,अंगावर गाडी घालून ठार मारणाचा प्रयत्न केला अश्या परस्परविरोधी तक्रारी दाखल...पोलीसांना पत्रकारांतील भांडणे पाहून वैताग आला आणि शेवटी खोट्या तक्रारीवरून दिंगबर भगरे यास पोलिसांनी लॉकअपमध्ये गजाआड केले,त्याचबरोबर देशमुखे यांचा भाऊ आणि मेहुण्यासही अटक केली.लोकमतचे तालुका प्रतिनिधी मल्लीकार्जुन देशमुखे फरार असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकारांतील खालच्या थरातील भांडणे पाहून संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात चर्चा आणि चिड...
हे ऐकूण आणि वाचून आम्हीही सुन्न झालो आहोत...
हे पाहून वैकुंठातून दामाजी पंत पण रडत असतील आणि म्हणत असतील विठोबा राया धाव रे...

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

सोलापूर अपडेट....

सोलापूर लोकमत ने दोन दिवसापूर्वी 2 रूपये चा अंक लॉन्च केला आहे. या अंकाचे खप वाढावे म्हणून लोकमत ने वाचकासाठी जीतो सोना चांदी या लकी ड्रॉ योजना सुरु केली आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही अंक वाढी वर बक्षीस योजना आहे त्यात 5 ग्राम पर्यंत सोने आहे. जानकारांचे मत आहे की याचा फरक फ़क्त लोकमतच्या जास्त किमतीच्या अंकावरच बसणार आहे.
गेल्या 4 - 5 दिवसापासून आवारे , खोत, तावड़े , कदम हे दिवस रात्र एक करुन हा अंक वाढवण्याचा प्रयन्त करीत आहेत पण गेल्या दोन दिवसापासून पाहिजे तसा प्रतिसाद या अंकास मिळत नाही. त्यामुळे विक्रेत्यांच्या घरा पर्यन्त गाडी घेऊन जाऊन त्याना पार्ट्या देत आहेत अंक वाढवावे म्हणून. विक्रेते सध्या जाम खुश आहेत कारण इकडे दिव्य मराठीने बुकिंगवर 40 रुपये तर टार्गेट पूर्ण झाल्यास 50 रुपये कमीशन दिले आहेत. पण विक्रेते काही प्रमाणात दिव्य मराठी वर नाराज आहेत कारण गेल्या 3 वर्षाच्या बुकिंगच्या अनुभवानुसार भेट वस्तु मोठे असेल तर विक्रेत्यांना बुकिंग मिळते नाहीतर दिव्य मराठीने स्वतः बुकिंग करुन घेते. म्हणजेच दिव्य मराठी विक्रेत्यांना हमाल समजते असा समज विक्रेत्यांत पसरला आहे. त्यात येथील 400 विक्रेत्यांत चार -चार संघटनाही यास कारणीभूत आहे.
..........................

दिव्य मराठी सोलपुरच्या ऑफिसमधे आज फ़क्त बेरक्याचीच चर्चा....
अति उत्साही मानव संसाधनचा कल्याण शेटे जोरजोरात ओफ्फिसमधे म्हणतो की हो मी असाच आहे हे सगळ्यांना माहित आहे अन ते बेरक्यावर आल्याने काय फरक फडणार आहे?
गेंड्यांचे कातडे पांघरणाऱ्यास काय फरक पडणार आहे ? आता बोला ? 

................

सोलापुरात  भोपाळ शेठच्या  पेपरचे वितरण व्यवस्थापकाचे मी नाही त्यातला... असे वागणे सुरु आहे. कारणही असेच आहे, दर महिन्याला टॅक्सीचे खर्च कमी केल्याचे दाखवून (संचार बरोबर शेरिंग मध्ये टॅक्सी चालतात) आणि औरंगाबादच्या बरबड़ेशी हात मिळवनी करुन दरमहा वरकमाई सुरु केले आहे. आणि हे कमी की काय म्हणून रात्री पुरवणी भरण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारीतूनही ह्या दोघानी मिळून कांट्रैक्टरशी गट्टी जमवून मलीदा लाटत आहेत. बिचारे कामगार उपाशी अधिकारी तुपाशी आहेत.
सोलापुरात भोपाळ शेठच्या पेपरचा युनिट हेडच मनमानी करत असेल तर बाकीच्या लोकाचे न विचारणे बरे …

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

मी मराठी नंबर वनवर कसे पोहचले ?

गेली अनेक वर्षे TRP च्या बाबतीत नंबर वनवर राहिलेल्या एबीपी माझाला मी मराठीने मोठा धक्का दिला आहे.दर गुरूवारी एक आठवड्याचा TRP येत असतो.त्यात मी मराठीने बाजी मारली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मी मराठीने कात टाकली आहे.लोकांना जे आवडते ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्याचे श्रेय मुख्य संपादक रविंद्र आंबेकर आणि कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांना द्यावे लागेल. उभयतांचे बेरक्याकडून अभिनंदन...चॅनलचे मालक महेश मोतेवार यांनी संपादकीय टीमला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे या चॅनलचा TRP चांगला वाढत आहे.त्यात निखिल वागळे यांचा शोही मी मराठीला उंचीवर नेत आहे.
लोणावळ्यात मुलीवर झालेले बलात्कार प्रकरण आणि झोपडपट्टीतील गुंडाराज या दोन स्टो-या मी मराठीवर चांगल्याच गाजल्या आहेत.फालतू विषयावर बातम्या करण्याऐवजी लोकांना जे आवडते,तेच देण्याचा प्रयत्न मी मराठीने सुरू केलेला आहे.त्यामुळेच मी मराठीचा TRP वाढल्याचे कळते. TRP मध्ये काही झोल करता येत नाही,ही आकडेवारी खरी असते,असे जाणकारांचे मत आहे.
मी मराठीचा TRP वाढताच,या चॅनलचे पत्ते कापण्याचा प्रयत्न प्रस्थापित चॅनलकडून सुरू झालेला आहे.अनेक ठिकाणी मी मराठी चॅनल केबलवरून गायब करण्यात आलेले आहे.त्याचबरोबर उघडा डोळे बघा नीट चॅनलेचे कांडेंकर आणि एक पाऊल मागे चॅनलचे डॉ.गुडगुडकर यांच्यात मी मराठी चॅनलला मागे कसे खेचायचे याबाबत जे संभाषण झाले,त्याची ऑडिओ क्लीपच मी मराठीच्या हाती लागली आहे.ही तर नीच मनोवृत्ती झाली, असेच म्हणावे लागेल. पण रविंद्र आंबेकर आणि तुळशीदास भोईटे ही जोडगोळी त्याला पुरून उरेल असे अनेकांचे मत आहे .

जाता जाता

बीजेपी माझाचा मराठवाडा ब्युरो मराठवाड्यातील स्ट्रींजरच्या स्टो-या ढापत असल्याची तक्रार आहे.ऐवढेच काय उस्मानाबादमध्ये ऑफीसच्या छतावर उभा राहून मी अमक्या अमक्या ठिकाणी उभा आहे,असे खोटे खोटे भासवत असला तरी चॅनलच्या हे लक्षात कसे येत नाही,हे लोकांना कोडे पडले आहे...म्हणजे लातूर,बीडच्या बातमीवर उस्मानाबादमध्ये ऑफीसच्या छतावर उभा राहून ptc देत आहे.याला कसली पत्रकारिता म्हणावी ? ही तर चॅनलच्या आणि चॅनल पाहणाऱ्यांच्या डोळ्यात चक्क धूळफेक झाली.अश्याने तर बीजेपी माझाचा TRP घसरत नाही ना,अशी शंका येत आहे.

नाशिक म.टा.ची अशीही घोडचूक, शिवाजी महाराज ऐवजी लिहिला अवमानकारक शब्द...

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वकालीन उत्तुंग व्यक्तिमत्त्व. महाराजांनी कधी जात-धर्म याला थारा दिला नाही. त्यांच्या लेखी गुणवत्ता सर्वश्रेष्ठ!! अशा या महाराजांच्या जयंतीचीच बातमी गुणवत्ता, नंबर वन व स्मार्टनेसचा टेंभा मिरविणाऱ्याना धडपणे लिहीता येवू नये, हे आजच्या मराठी पत्रकारितेचे दुर्दैव!!
'बेरक्या'ने काही दिवसांपूर्वी 'मटा'ची बिनपाण्याने चंपी केली होती; त्यानंतर नाशिकमधील अनेक वाचक व पत्रकारांचे रोजच 'मटा'मधील चुकांबाबतचे ई-मेल धडकत आहेत. 'मटा' वाचवत नाही, ही सर्वांचीच एकमुखी प्रतिक्रिया!! कुठल्यातरी गाण्यात ती बाई म्हणते, मी कात टाकली तसे यांनी जणू लाज टाकलीय!!  'नाशिक मटा'ने 9 मार्च रोजी पान 3 वर शिवजयंती साजरी झाल्याची बातमी ठळकपणे प्रकाशित केलीय. या बातमीत सर्वत्र 'शिवाजी महाराज' याऐवजी 'शिवाजी xxx' असा उल्लेख करण्यात आला आहे. ब्राह्मणी मनोवृत्तीच्या 'मटा'मधील स्टाफने जाणून-बुजून बहुजन समाजातून पुढे आलेल्या सर्वकालीन उत्तुंग युगपुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा चालविलेला हा खेळ आहे. मात्र, हा ब्राह्मणी कावा स्वत:ला 96/98 कुळी समजणाऱ्या देशमुखांनी तरी हाणून पाडायचा की नाही? गुणवत्तापूर्ण अंकाचा टेंभा मिरवित स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या अशोकराव पानवलकरांना आता हे कसे रुचते? अंकाची शहरात इतकी छी-थू होतेय, ब्रांडची पार अब्रू जातेय तरीही हे मौनीबाबा इतके स्थितप्रज्ञ कसे?
नाशकात, जळगावात ... सर्वत्र पानवलकर आणि त्यांचे फ़ाईन्ड्स आणि त्यांचे प्रोडक्ट्सही टोटली फेल्युअर ठरले आहेत. ग्लोबली लोकल आणि सुपर-लोकलच्या नादात 'मटा'चा मूळ चेहरा पार विद्रूप झालाय.. पानवलकरांची अवस्था आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी झालीय. स्वत:च्या चुकीच्या निवडीच्या अपयशाची चूक कुठल्या तोंडाने कबूल करणार? म्हणून आपले गिरे भी तो टांग उपर असे चाललेय सध्या!! किती दिवस दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पीत निर्णय घेत राहणार?? 'उघडा डोळे, बघा नीट'... आजूबाजूला काय गुणवत्तापूर्ण लोकांची कमतरता आहे काय? पण यांना मराठा, साळी-माळी-तेली नकोय... यांना हवाय 'कर' नाहीतर 'कुलकर्णी'... 'लांबे' नाहीतर 'तांबे'!!
चालू द्यात 'मटा'चा बट्ट्याबोळ... 'बेनेट-कोलमन'च्या जैनांकडे उधळायला बक्कळ पैसा आहे.. जळगावात जशी वर्गणी स्कीम संपल्यावर फे-फे उडाली, तेच नाशकात होणार.. शुभेच्छा ... महाराष्ट्रातील लहानग्या, तरुण पिढीचे व्याकरण बिघडविण्यासाठी अशोकराव पानवलकर आणि त्यांच्या काळातील मटा यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल.. पुनश्च शुभेच्छा ... 
 
20 मार्च रोजी पान 1 वरची गुणवत्तेला आणि व्याकरणाला घंटा दाखविणारी ही आणखी एक बातमी पाहा : 
 

 
 
हेही जरूर वाचा : 

सोलापूरच्या DM मध्ये धुसफुस सुरु

सोलापूरच्या दैनिक दिव्य मराठीच्या विभागप्रमुखात धुसफुस सुरु आहे . यूनिट हेड टिंकेश ग्यामलानी आणि निवासी संपादक संजीव पिंपरकर हे दरवर्षी वर्धापन दिनाच्या स्नेह मेळाव्यात एकत्र शुभेच्छा  स्विकारतात.  यावेळी फ़क्त पिंपरकर एकटेच आणि टिंकेश ग्यामलानी यानी वेगवेगळे शुभेच्छा स्विकारताना दिसून आले. टिंकेश ग्यामलानी यांच्याशी फाइनान्सचे राजेश खटके , मानव संसाधनचे कल्याण शेटे आणि वितरणचे संजय जोगीपेटकर यांच्याशिहि ताळमेल नाही. हे सर्व एकमेकांवर कुरगुड्या करण्यातच धन्य मानत आहेत.
टिंकेश ग्यामलानी यांच्या त्रासाला कंटाळून गेल्या तीन महिन्यात चार कर्मचार्यानी राजीनामा दिला आहे.त्यामुळे ते  ग्यामलानी आहेत कि ग्यानबाची मेख मारणारे आहेत, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

रविवार, ५ एप्रिल, २०१५

'पुण्यनगरी'त बदलांचे वारे!

 लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे हिशेब बहुतांश वृत्तपत्रांनी पूर्ण केले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात डझनभर संपादक व व्यवस्थापक निवडणूक घोळामुळे घरी गेले आहेत. पुण्यात पद्मश्रींच्या पेपरच्या संपादकाला बुधवाराचा रस्ता धरावा लागला; त्यांचा नाशकातल्या पंटरची नसबंदी केली गेलीय आणि सहमिजासी 'रंगीला औरंगाबादी'चीही घटिका भरत आलीय.
बुधवाराचे मुंबईतील दोघे संपादक गळपटले आणि बेळगाववाल्यांच्या दादरनिवासिनी कार्यकारीलाही रामराम केला गेलाय. निवडणूक हिशेबातील अफरातफरीचे गंडांतर आता 'पुण्यनगरी'तील अनेकांवर येणार आहे. पहिल्या टप्प्यात जळगावातील व्यवस्थापक देवेंद्र करकरे यांना प्रेमाचा निरोप देण्यात आलाय. त्यांना निवडणूक धामधुमीत नव्या फ्लॅटची खरेदी भोवल्याची चर्चा आहे. त्यांच्याच बरोबर कार खरेदी करणाऱ्याची 'दादा'गिरीही लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जातेय. मामा संकटात आणि तिकडे भांजाही 'दिव्य' संकटात असल्याची चर्चा आहे.
चोपड्यातील वार्ताहराने चोपड्यातील देवाण-'घेवाण'बाबत भांज्याची तक्रार केल्याचे समजते. अमळनेरातील मुलीच्या यशाची बातमी 3-4 आठवडे दडपून ठेवल्याचे खापरही भांज्याच्या माथी फोडले जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी डुप्लीकेट उपग्रह कामाला लागले आहेत. उपग्रहाच्या देवगिरीनगरीत परशुरामाचा अंश असलेल्या तीन वरिष्ठ संपादकांच्या 'दिव्य' अभद्र युतीने जालनारोडवरील पब्लिक जाम वैतागले आहे.
चिकनाचोपडा बम्बईया-फदया फदफदे-उपग्रह युतीच्या लाजिरवाण्या जातीयवादाने क्रांतीनगरीच्या पुरोगामित्त्वाचा इतिहास कलंकित करून ठेवलाय. या अभद्र युतीला देशमुखी साधन सापडलेय. तीन तिघाडात हा देशमुखी बिघाडा!! देवगिरीतून पुन्हा 'दादा'नगरीत - इथे ज्ञानेश्वर भाले या नवख्याला व 'जोशीं'च्या सचिनला तगड़ा पगार दिल्याने इतके दिवस कमी पैशात घासणारे 'शिंदें'चे कैलास या विचारानेच रोजची 'सकाळ' चिंतेत घालवत आहेत. ते स्वगृही 'देशदूत'ला परततील किंवा 'पुण्यनगरी'चा पर्यायही आहेच! 'पुण्य' व 'तभा'च्या काही बीटसमधील वार्ताहरांच्या आलटी-पलटीची शक्यता आहे.

मी मराठी लाईव्हची पुढारी, लोकमतला धास्ती

वाचकांना जोडून ठेवण्यासाठी बक्षीस योजनांची घोषणा
पुणे - मी मराठी लाईव्ह लवकरच पुण्यात येत असल्याने या नवख्या वृत्तपत्राची पुढारी अन् लोकमत या बलाढ्य वृत्तपत्र समूहांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पुणेरी वाचकांना जुळवून ठेवण्यासाठी या दोन्ही वृत्तपत्रांनी वाचकांसाठी बक्षीस योजनांची घोषणा केली आहे. त्याची शहरात जोरदार जाहिरातबाजीही केली जात असून, पुढारीने फ्रेंच जॅकेटसह शहरात जागोजागी फ्लेक्स बोर्डही लावले आहेत. सकाळने मात्र नवख्या दैनिकाचा फारसा धसका घेतल्याचे जाणवत नाही.
दैनिक लोकमतने वाचक जाहिरातदार योजना सुरु केली असून, २०० रुपयांचा धनादेश अन् दरमहा ७० रुपये वितरकांना असे १८८० रुपये घेऊन वर्षभर लोकमत अन् टप्प्याटप्प्याने १४५० रुपयांची हमखास बक्षीस देण्याची योजना जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, पुढारीने मात्र छप्परफाड बक्षीस योजना जाहीर करून पुण्यात धुमाकूळ घातला. ट्रेझर हंट योजना या नावाने ही बक्षीस योजना जाहीर केली असून, प्रकाशित केल्या जाणार्‍या १२० पैकी १०० कुपन्सच्या चिकटकात्रणांचा लकी ड्रॉ काढून १२१ हिरे, ६५ तोळे सोने, अन् १५ किलो चांदी वाटू असे पुणेकरांना आश्‍वासित केले आहे. शहरात सद्यातरी या दोन योजनांचीच चर्चा सुरु आहे. आपल्या योजनेच्या प्रचारासाठी फ्रेंच विंडो जॅकेटसह शहरात जागोजागी फ्लेक्स बोर्डही पुढारीने लावले आहे. मी मराठी लाईव्हच्या आगमनाचा ग्रामीण भागासह शहरी भागात पुढारी व लोकमतसह महाराष्ट्र टाईम्सच्या काउंटर सेलला जास्त फटका बसेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रभात, केसरी ही शेवटच्या घटका मोजणारी दैनिके चांगलीच अडचणीत आली असून, महाराष्ट्र टाईम्सलाही मी मराठी लाईव्हचा सर्वाधिक फटका बसणार आहे. मटाचे निवासी संपादक पराग करंदीकर हे पुण्यातले असूनही आपला काहीच प्रभाव दाखवू शकले नाहीत. तीच गत पुढारीच्या गोपाळ जोशींचीही झाली आहे.

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

'रंगीला'च्या नाशिकमधील पंटरचे अधिकार गोठविले!

पद्मश्री सध्या नाशिकमधील एकूणच 'प्रगती'वर नाराज आहेत. त्यामुळे मार्च संपताच त्यांनी बदलांचा धडाका लावलाय. पहिल्या टप्प्यात त्यांनी 'थंडा थंडा कूल कूल' असा कुंभमेळ्यात समाधी लावून बसलेल्या  'बुवा'टाईप कारभार काही खरा नाही, हे जाणले. असेच चालले तर प्रतिस्पर्धी दैनिकांवर 'विजय' कसा मिळविणार? सारा घोळ करून ठेवलाय धाकल्या मालकांनी! सूरूवातच चुकली, निवड चुकली!! अर्थात तेव्हा धाकले मालकही काही 'संजया'च्या दूरदृष्टीचा चष्मा लावून बसलेले नव्हते, त्यांनी विश्वास टाकला आणि ज्यांच्यावर टाकला त्यांनीच गंडविले. सोलापुरी मातीतील ओबामांनी रंगाअण्णांच्या शाळेत आपणच घडविलेला पंढरपुरच्या विठोबारायाच्या गावचा वार्ताहर चक्क संपादक बनवून टाकला आणि त्याला निष्ठेची जहागिरी बहाल केली. गोदाकाठच्या पुण्यभूमीत हा निष्ठावंत टिळक पथावरही चालला नाही आणि सातपुरातही उघडा पडला! तरीही सोलापुरी ओबामांनी स्पर्धेतील इतर अनेक चांगली माणसे राहू देत पंढरपुरी चाल चाललीच. अर्थात ओबामांचा हात पाठीवर असूनही शिष्याला काही 'सक्सेस पासवर्ड' गवसलाच नाही! खानदेशी मातीतील पाटलाने पेपर गावोगावी पोहोचविला, जिल्ह्यात चौथ्या स्थानी सुरुवातीला धडकावला. पण एका चाकाची गाडी पळून-पळून किती पळणार? सोलापुरी गुरुजी होते तोवर पंढरपुरी शिष्याची झाकली मूठ ही झाकलेलीच राहिली. मात्र, सोलापुरी गुरुजींनीच एक दिवस धाकल्या मालकांना आणि पद्मश्रींनाही टांग मारली; 'निवडणुकीचा हिशेब अर्धवट राखून ठेवत' बुधवाराची वाट धरली. जाता-जाता पंढरपुरी शिष्याची सोय 'रंगीला औरंगाबादी'कडे लावून देत लक्ष द्यायला, काळजी घ्यायला सांगितले. औरंगाबादी आणि सोलापुरी दोघांची गट्टी जाम कारण एक गुण समान; 'रंगीला' मिजास! औरंगाबादी सापडले ते चोर मात्र सोलापुरी यांचे 'चोरी चोरी-चुपके चुपके'! अर्थात लातुरातून त्यावर एका क्षणात 'प्रकाश' पडू शकेल; मात्र अजून थोडेसे 'पुण्य' गाठीशी असल्याने जगाला ताप नाही; सोलापुरी तूर्तास ओबामाच आहेत! (तशी 'रंगीला सोलापुरी' ही फाईल 'बेरक्या'कडे तयार होतेच आहे!) असो. तर धाकल्या मालकांनी ओबामांच्या नादी लागून केलेली चूक प्रत्यक्ष पद्मश्रीनीच दुरुस्त केली. त्यांनी पंढरपुरी जर्दा गुंडाळून ठेवला आणि नाशिकमध्ये नवे 'किरण' उदयास आले. आता सारे बातमी निवड, वार्ताहर, पान 1, नियोजन-निर्णय वैगेर संपादकीय अधिकार अगदी मन घट्ट, लोखंडी करून घ्यायला सांगितले गेले आहे. ओबामांच्या शिष्याची अवस्था सध्या 'बिनखात्याचे मंत्री' अशीच आहे. ज्यांच्या अंगी ओबामांनी पंढरपुरी शिष्य सोपविला ते 'रंगीला औरंगाबादी' महोदयच सध्या अडचणीत आहेत. ते प्रशिक्षणार्थी पत्रकार-उपसंपादक ते चीफ सब, वृत्तसंपादक, डिझाईनर, फोरमन, संपादक अशा ऑल-इन-वन भूमिकेत असूनही पद्मश्रींना हा पाने लावणारा व तपासणारा संपादक नकोसा झालाय. कारण तो कुणाला टिकूच देत नाही. त्याचा अक्षरश: काशीनाथ कुलकर्णी झालाय! या 'रंगीला'चा सोलापुरी सहमिजासी हार्बर लाईनवरच येवून बसल्याने बेलापूरच्या किल्ल्यातून विस्थापित जुनी मंडळी आता पद्मश्रींना भुरळ घालू लागली आहेत. त्यांनीच तर पेपरची मुंबापुरीतील फर्स्ट इनिंग यशस्वी केली होती. तेच सानपाड्यात परतण्याची चिन्हे आहेत. त्यांच्यासह विस्थापित नगरभूषण हे बेळगावच्या आश्रयाला जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचे तिथे जमले नाही तर मग पद्मश्रींना 'एकसे भले दो' अशी जणू पद्मसंजीवनी लाभेल. सध्या तरी हार्बर लाईनवरील तिघे संपादक हे पद्मश्री यांच्या पेपरचा कधीतरी शिक्का पडलेलीच माणसे आहेत.  पद्मसंजीवनी डोस घ्यायचा तर त्यासाठी 'रंगीला' मिजास काय कामाचा? त्यामुळे कदाचित ....

महाराष्ट्रनामा ...


  • जळगावात 'मानबिंदू'च्या वार्ताहर बिट्सची पुनर्रचना; पोलीस अधिकाऱ्यांकडून वाढदिवस पार्टीत अनेकांचा तोल ढासळला; लडखडले, पडले!! पेपरची मान खाली गेल्याने योग्य बिंदूवर झाली फिरवाफिरव ... इतरांकडेही अशी खमक्या कारवाईची दिव्य सकाळ उगवणार कधी? 
  • पोलिसांच्या अटकेतील भ्रष्ट पतसंस्थाचालक प्रमोद रायसोनी यांच्या चांदीच्या गाईनंतर आता जळगाव पीपल्स बँकेने वाटले चांदीचे ग्लास; छोट्याशा शहरात पत्रकार परिषदेला उसळला जनसागर ... 150 हून अधिक प्रतिनिधी .... चांदीच्या ग्लासवर कुणाचाच बहिष्कार नाही!!! 
  • जळगावात खान्देश एस्क्प्रेस पडले बंद; सत्यवाचा आठवड्यातून एक दिवस दर रविवारी अंक बंद ... 
  • नाशिकमधील सायंदैनिक साईमतला मिळेना चांगला, दमदार संपादक; विजय बाबर पनवेलला कर्नाळाचे संपादक. 
  • पुण्यात जनशक्तिची फिकी-फिकी सुरुवात;  अनेक ठिकाणी अंकच मिळेना/दिसेना; तीन ठोकळ्यांच्या पहिल्या पानाने गांवछांप साप्ताहिकाचा लुक  
  • माझा महानगर दैनिकाचे कार्यालय पवईतून रबाळे येथे स्थलांतरित; संपादकीय व्यवस्थेतील नवोन्मेष हरपला... नव्या संपादकाचा शोध सुरु 
  • मी मराठीच्या  मुंबई कार्यालयात बेरक्या कोण; यावर रोज होतेय जोरदार चर्चा ... माणसे मिळत नसल्याने झालीय मोठी पंचाईत 
  • ई-टीव्ही च्या (इनाडू) मराठी वेबसाइटचा पहिल्या टप्प्यात सातत्याने अपडेशनवर भर 
  • सुरतहून प्रकाशित होणारे आपले गुजरात दैनिक लवकरच महाराष्ट्रात येणार असायाची चर्चा

फेसबुक वर शेअर करा

Facebook