> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३० मे, २०१३

श्रावण मोडक या दिलदार मित्राला त्यांच्या सहकारयाने वाहिलेली श्रद्धांजली

अत्यंत वाइट बातमी : आमचे काही वर्षांपासूनचे निकटचे मित्र श्रावण मोडक हे आता या जगात राहिलेले नाही. 
अगदी पाच मिनिटांपूर्वी धुळ्याहून निखिल सूर्यवंशी (सकाळ) यांचा एसएमएस आला. फक्त चारच शब्द; ‘श्रावण मोडक पास्ड अवे’ मी हादरलोच. अतिशय दु:खद संदेश. किती वाइट बातमी. त्यानंतर पुण्याहून दीपक मुणोतनेही ही बातमी कळविली. अगदी चार दिवसांपूर्वीच माझी निखिलशी भेट झाली होती, तेव्हाही श्रावण हाच चर्चेचा केंद्रबिंदू होता. 
काही कामानिमित्त घाटकोपरला असताना काल सायंकाळीच श्रावणला हृद्यविकाराचा झटका आला. आज सकाळी पुन्हा दुसरा झटका आला. मधुमेहाचा त्रास असलेल्या श्रावणला सलग असे हे दोन झटके पचविता आले नाहीत. त्याची किडनी निकामी झाली व त्याने या जगाचा निरोप घेतला. 
मनस्वी जगणारा असा हा अवलिया. मधुमेहाकडे केलेले दुर्लक्ष त्याचा घात करून गेले असावे. माझी आणि श्रावणची शेवटची भेट साधारणत: चार वर्षांपूर्वी झाली असावी. पुण्यात हडपसरला मगरपट्टा सिटीतील एका हॉटेलात आम्ही दुपारचे जेवण एकत्र घेतले होते. त्यावेळी मी मुंबई ‘सामना’तून पुण्यात बदलीवर गेलो होतो. श्रावणला भेटलो. कारण त्याने पुण़्यात ‘सामना’त किमान चार-पाच वर्षे तरी काढली होती. तो गेल्यानंतर तिथे कुणी वृत्तसंपादक नव्हते. त्याला भेटलो, त्याच्याशी बोललो. त्याने सरळ सांगितले, करिअर करायचे असेल तर येथे अडकू नकोस. काहीही करून दाखवायला संधी नाही. दिवस ढकळायचे असतील, मजा करायची असेल तर बघ; पण मी तुला पाहिलेय. नको थांबूस तिथे. त्याच दिवशी संध्याकाळी मी ‘सामना’चे कार्यकाळी संपादक संजय राऊत यांना राजीनामा पाठवून दिला. ती संध्याकाळ आम्ही टिळकरोडवर कुठल्याशा हॉटेलात साजरी केली होती. त्यानंतर मग मी मुंबईत सानपाड्यात ‘लोकमत’ला जॉईन झालो. 
श्रावणला त्यानंतर दोनदा भेटण्याची संधी मिळाली; पण योग काही जुळला नाही. अगदी सहा महिन्यांपूर्वीच चांदणी चौकात तो येणार होता; पण त्याला कोथरूडमध्येच कुठेतरी उशीर होणार होता. त्याने मला सरळ हायवेवरून बस पकडून जाण़्यास सांगितले. मीही घाईत असल्याने मुंबईला निघून गेलो. 
श्रावणचा माझ्या एकूणच पत्रकारितेवर फार प्रभाव आहे. अगदी उत्तम कांबळे यांच्याइतकाच! अगदी स्टेÑट फॉरवर्ड, थेट बोलणारा, स्पष्ट बोलणारा तो एक दिलखुलास माणूस होता. त्याचे फारच कमी लोकांशी जमायचे. साधारणत: 1993 मध्ये मी नाशिकमध्ये ‘सकाळ’ला प्रशिक्षणार्थी असताना श्रावण धुळ्यात ‘सकाळ’ सांभाळायचा. कामापुरते फोनवरून बोलणे व्हायचे. तेव्हा स्पोर्टसमध्ये रुची असल्याने सुनील पात्रुडकर (आता विनायक; मुंबईत ‘लोकमत’चे संपादक), शिवाजी गायकवाड (दुर्दैवाने तोही आता या जगात नाही), दत्ता पाटील, विश्वास देवकर वैगेरे यांच्या प्रोत्साहनामुळे प्रशिक्षणार्थी असतानाच मी स्पोर्टस पेज, क्रीडा-विज्ञानाची ‘दिशा’ ही पुरवणी सांभाळायचो. मोहन वैद्य हे तेव्हाचे वृत्तसंपादक. त्यांनी मला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या खास कव्हरेजसाठी धुळ्यात पाठविले. धुळ्यातील गरुड मैदानावर ही स्पर्धा होती. त्याचवेळी माझी श्रावण मोडक या माणसाशी अगदी जवळून, खासम-खास ओळख झाली. 
पत्रकारितेत सुदैवाने काही अपवाद वगळली तर मला नेहमीच अतिशय चांगली माणसे भेटली. त्यात श्रावण हा एक आभाळाची उंची गाठणारा माणूस! त्याच्या जागी जर मी असतो आणि एखादा ज्युनिअर स्पर्धा कव्हर करण्यासाठी हेडआॅफिसमधून लादला गेला असता तर कदाचित मला त्याच्याएचढे चांगले नक्कीच वागता आले नसते; पण श्रावणने मला मोठ्या भावासारखे सांभाळले.  मला खो-खो मधले टेक्निकल काहीही माहिती नव्हते. खो-खो संघटनेचे तेव्हाचे अध्यक्ष माधवराव पाटील धुळ्यातील. श्रावणने मला आदल्या दिवशी त्यांच्याकडे नेले. त्यांच्याकडे तासभर बसून, चर्चा करून मी मूलभूत सारे फंडे समजून घेतले. ‘सकाळ’ने या स्पर्धेचे फक्कड कव्हरेज दिले होते. महाराष्ट्रभर सर्व आवृत्त्यात त्याला स्थान दिले गेले. ‘थर्ड रेट’च्या नियमाचा मुद्दा आम्ही लावून धरला आणि या स्पर्धेनंतर त्या नियमात महत्त्वाचे बदल केले गेले. 
दिवसभर स्पर्धा कव्हर करून पानभर मजकूर दिल्यावर मी कार्यालयात पोहोचायचो. श्रावणचे काम आटोपले की आम्ही प्रवीण फोटोजशेजारील नटराज की काहीशा हॉटेलात जेवायचो. आता नेमके नाव आठवत नाही त्या हॉटेलचे. आताचे धुळ्याचे शिवसेना आमदार शरद पाटील हे त्यावेळी   ‘सकाळ’चे बातमीदार होते. श्रावण तेव्हा प्यायचा. मी काही हे सारे शिकलो नव्हतो. त्याला पाप वैगेरे मानायचो. श्रावणने कधी मला त्यासाठी आग्रह धरला नाही की फोर्स केला नाही. मी बिघडलो तो मुंबईत ‘सामना’मध्ये गेल्यानंतर आणि ‘प्रेस क्लब’ला चटावल्यानंतर! पुण्यात कधी मग आता श्रावणला मी भेटलो की तो कोरडाच राहायचा. त्याने पिणे सोडले होते. मी मात्र प्यायचो. श्रावणसोबत गप्पा मात्र मस्त रंगायच्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा. 
श्रावण कामात एकदम परफेक्ट. शुद्धलेखनात कुणी त्याचा हात नाही धरू शकणार. स्टाईल भन्नाट. कांबळेंशी कधी जमले नाही म्हणून की शत्रुत्व ओढवून घेतले म्हणून काय असेल ते असो; पण तो नेहमी असा मुख्यालयाबाहेर राहिला. त्यामुळेच त्याची प्रतिभा, प्रगल्भ पत्रकारिता खरया अर्थाने जगासमोर आलीच नाही. धुळे-नंदुरबारात मात्र तो सर्वांना अजूनही ठावूक आहे. सुधीर देशपांडे, सतीश पाटील वैगेरे मंडळी त्याला नेहमी सबुरीचा सल्ला द्यायचे. मात्र, त्याने कधी तडजोड केली नाही. पदासाठी वरिष्ठांशीही नाही आणि तत्त्वांशी तर कधीच नाही. कांबळेंशी न पटल्याने नंदुरबारमधून थेट मुंबईत पोहोचून अतुल जोशी ‘सामना’त सहसंपादक झालेत, स्थिरावलेत. श्रावणच्या वाट्याला मात्र तशी स्थिरता फारशी आलीच नाही. तो जात्याच चळवळ्या होत्या. मेधा पाटकरांच्या मणीबेली वैगेरे आंदोलनाचे किस्से नेहमी सांगायचा. कधीतरी पाट्करांना नर्मदेच्या पुरातून नौकेत वाचविलेही आहे बहुधा त्याने. तो पत्रकारिता जगला. ती त्याच्या नसा-नसात भिनली होती. मात्र, ‘सकाळ’मधील वाइट अनुभवानंतर पुण्यात गेला तेव्हापासून त्याच्या पत्रकारितेतील मस्ती हरविली होती. बहुधा ‘हेरॉल्ड’मध्येही त्याने काम केले. ‘सामना’त फारसे काही करायला न मिळाल्याची त्याची खंत होती. अखेरच्या पर्वात तो इतर क्षेत्रात मोठे आणि निर्दोष, परफेक्ट असे काम करीत होता तरीही तो पत्रकारितेच्या मुख्य परिघाबाहेर राहिला, याची माझ्यासारख्या मित्राला नेहमीच खंत राहील. 
आज वृत्तपत्रात भाषेतील शुद्धता अभावानेच आढळते. नव्या पिढीला तर त्याच्याशी काही देणे-घेणेही नाही. तरीही मी शुद्धलेखनाचा वेडेपणाचा आग्रह सहकारयांकडे धरतो, हा श्रावणचा माझ्यावरील शुद्ध प्रभाव! श्रावण भाषांतरातही अव्वल होता. नेमके आणि नेटकी कॉपी. मी भाषांतर शिकलो तेही त्याच्याकडूनच. देवकर, किरण काळे, अभय सुपेकर आणि खुद्द मोहन वैद्यांचीही मदत झालीच. मात्र, श्रावणशी माझी नाळ जुळली होती. 1996-97 मी पुण्यात शिकायला असताना, नंतर 1999-2001 लोकमत, वेबदुनियासाठी पुण्यात असताना नेहमी त्याची भेट व्हायची. पुढे आमची भटकंती सुरू झाली अन भेटी दुर्मिळ होत गेल्या. मुंबईत असताना मी पुण्यात गेलो की मग मात्र त्याला हमखास भेटायचो. शिवाजी पुण्यात ‘लोकमत’ला असताना आम्ही नेहमी पर्वती, बालगंधर्व, चांदणी चौक, हडपसरची टेकडी असे कुठेही भटकायचो, तासनतास गप्पा मारत बसायचो. अनेकदा विद्यापीठात ही मंडळी यायची मग होस्टेलवर फड जमायचे. 
श्रावणने माझे सासरे जगतराव सोनवणे यांच्या कर्मचारी मार्गदर्शक आणि अधिकारी मार्गदर्शक या 1600 पानी पुस्तकांचे प्रूफरिडींग करून दिले. तेव्हा तो काही दिवस नाशिकला होता. मी ‘गांवकरी’त होतो. माझी बायको दीपाली हीही तिथे टेÑनी होती. टू बी आॅर नॉट टू बी अशा संभ्रमावस्थेत तेव्हाही श्रावणनेच मला सल्ला दिला होता, लग्न कर. माझ्या आयुष्यातील दोन व्यक्तिगत मोठ्या समस्यांवर मी या माणसामुळे मात करू शकलो होतो. पत्रकारितेच्या माझ्या प्रशिक्षण काळातच श्रावणसह या सर्व मंडळींचा सहवास, मार्गदर्शन लाभल्याने आम्हालाही नोकरीवर लाथ मारू पण तत्त्वांशी तडजोड नाही; अपमानाला थारा नाही असा बाणा जपता आला. 
श्रावणसारखा उमदा माणूस आता आपल्यात नाही, हे अतिशय वेदनादायी सत्य पचवीने फारच अवघड आहे. माझ्या भावनांचा कल्लोळ झालाय. त्याच्याही काही व्यक्तिगत समस्या होत्या; पण तत्वांशी तडजोड न करता आपल्या मर्जीने, ‘किंगसाइज’ आयुष्य जगलेल्या श्रावणला माझा सलाम! मुंबईतील हॉस्पिटलातून पुण़्याला पार्थिव आणून आज सायंकाळी श्रावणचे अत्यंसंस्कार केले जातील. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रभूचरणी प्रार्थना!

विक्रांत पाटील

बुधवार, २९ मे, २०१३

श्रीराम पवार अमरावतीत

अमरावती : दिव्य मराठीच्या आगमनामुळे सकाळची गळती थांबविण्यासाठी मुख्य संपादक श्रीराम पवार दोन दिवसांपासून अमरावतीत आहेत. सकाळमधील ज्यांना कुणाला डीएमचे ऑफर लेटर आले त्यांनी सकाळ सोडून जाऊ नये यासाठी पवार प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासोबत विदर्भ आवृत्तीचे संपादक भूपेंद्र गणवीर हेसुद्धा आहेत. दरम्यान, रिकाम्या जागा भरण्यासाठी श्रीराम पवार आणि गणवीर यांनी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; पण आता सकाळ प्रशासन अनुभवी पत्रकारांना घेण्याऐवजी पत्रकारितेत नव्याने आलेल्यांना संधी देणार असल्याचे यातून दिसून आले. मुलाखतीला अधिकाधिक नवोदित पत्रकारांनाच बोलावण्यात आले. कारण अनुभवी पत्रकार पाच-सहा महिने काम करून पुन्हा दुस-या दैनिकात जास्त पगारावर रुजू होतात हा अनुभव सकाळला आला आहे.
....
बुलडाणा : गजानन जानभोर यांनी बुलडाणा जिल्हा कार्यालयात बुधवारी बैठक घेतली. तालुका आणि शहर प्रतिनिधी उपस्थित होते. पण खामगाव कार्यालयात संपादकीय प्रमुख कधी देणार यावर तोडगा निघाला नाही.

सोमवार, २७ मे, २०१३

अकोला अपडेट...

* अकोला - लोकमतच्या अकोला आवृत्तीच्या संपादकीय विभागाची सुत्रे  गजानन जानभोर यांनी सोमवार दि.27 मे रोजी घेतली. त्यावेळी उत्साही उपसंपादक आणि रिपोर्टरनी फटाके वाजविले. हे दृश्य पाहून प्रेमदास राठोड यांना अपमानित होवून जावे लागले.एकंदरीत रागरंग पाहता, राठोडबाबत किती नाराजी होती, हे लक्षात येते....

* अकोला गजानन जानभोर यांना चार्ज देण्यासाठी मुंबईचे पुष्कर कुलकर्णी  अकोल्यात आले होते.चार्ज दिल्यानंतर संपादकीय विभागीतील प्रत्येकाशी वैयक्तीक गुप्त चर्चा...सर्वांची एकच तक्रार - प्रेमदास राठोड यांना कायमचे हटवा...जानभोर यांना कायम ठेवा...

* प्रेमदास राठोड महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण हॅलोचे प्रमुख. अकोल्यातून काम पाहणार.

* अकोला- दिव्य मराठीच्या आगमनाने सर्वत्र वृत्तपत्र सृष्टीत आपापली मोर्चेबांधणी करण्यात अग्रेसर असतांना अकोला लोकमतमध्ये अर्धा स्टाफ केवळ फुकटचा पगार घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संपादकांची कितीही अदलाबदली केली तरी हे कामचुकार कर्मचारी वठणीवर आणले जात नाहीत तोपर्यंत अकोला लोकमतमध्ये सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही.

जानभोरच काय अकोल्यात कुणालाही आणले तरी शहर कार्यालय आणि प्रेसवर काम करणारे कामचुकार वठणीवर आणण्याची गरज आहे. प्रेसवर बसून काहीजण नुसती डबापार्टी करीत असतात. गावात वर्तमानपत्रांच्या कार्यालयात काय चालू आहे, कुणाचा पगार किती वाढला, कोण कोठे गेले, कुणी राजीनामा दिला आदी चिलमी गप्पांमध्ये या मंडळींना रस असतो. एकाने तर बसल्याबसल्या अधीस्वीकृती पत्रिका मिळवून राज्यभर एसटीचा मोफत प्रवास सुरु केला आहे. काहीजण दिव्य मराठीत जात असले तरी तेवढ्याने काहीच बिघडणार नाही एवढे मनुष्यबळ सद्या अकोला लोकमतकडे उपलब्ध आहे. फक्त त्यांच्याकडून काम करुन घेण्याची गरज आहे.


* अकोला - दिव्य मराठीच्या पार्श्वभूमीवर लोकमतमध्ये अमुलाग्र बदल...मात्र  मायभूमीतच देशोन्नती थंड...कार्यकारी संपादक रवी टाले गेले...अनेक कर्मचारीही सोडून जाण्याच्या मार्गावर....पोहरेंना प्रकाश कधी पडणार... 

* लोकमतचे कर्मचारी फोडण्यासाठी खांडेकरांची फिल्डींग...आता दुप्पट ऐवजी तिप्पट पगाराचे आमिष...मात्र दिव्य मराठीचा मागील दोन वर्षाचा इतिहास पाहता, लोकमत कर्मचारी सावधानतेच्या भूमिकेत...

*. लोकमतचे उप महाव्यवस्थापक सुशांत दांडगे यांची एका महिन्यापुर्वी अमरावतीला बदली झाली आणि त्यांनी तिथे सूत्रेसुद्धा स्विकारली. तरीही लोकमत अकोला आवृत्तीच्या प्रेस लाइनमध्ये प्रकाशक म्हणून सुशांत दांगडे यांचेच नाव. नवीन महाव्यवस्थापक श्री. डेडवाल यांचे नाव का नाही या चर्चेला ऊत

*  कधी नव्हे ते अकोला लोकमतने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच एजंटच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार केला. त्यासाठी रविवारी एका हॉलेटमध्ये भव्य सोहळा पार पडला. डीएम येणार म्हणून एजंटला खूश करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा.

* अकोला - देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले यांनी एका न्यूज कव्हरेजचे बिल 20 हजार पाठविले होते.त्यावरून देशोन्नीत रामायण घडले.नंतर टालेनी राजीनामा दिला.ऐवढेच नाही तर त्यांनी देशोन्नतीतील आपलें सामान,पुस्तके घरी घेवून गेले.
टालेंचे मन वळविण्यासाठी स्वत: प्रकाश पोहरे,संध्याताई पोहरे,रणधीर सावरकर हे टालेंच्या घरी गेले होते.मात्र टालेंनी राजीनामा परत घेण्यास नकार दिला.ते सकाळच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे...टालेंनी सकाळपेक्षा डी.एम.जॉईन करावा...म्हणजे अकोल्यात रंगत येईल...

मु.पो.अकोला

अकोला - गजानन जानभोर यांच्यावर लोकमतने अकोल्याचे प्रभारी संपादकिय प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली. त्यामुळे काही दिवसानंतर जानभोर हे नागपुरला परत जाणार आहेत हे निश्चित. त्यामुळे अकोल्याला लोकमतच्या नागपुर कार्यालयात कार्यरत असलेले मुख्य उपसंपादक दिपक देशमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख गजानन चोपडे, त्यांचे सहायक गोपालकृष्ण मांडवलकर यांची नावे नवीन संपादकीय प्रमुख चर्चेत आहेत. यापैकी दिपक देशमुख यांना अकोल्यात काम करण्याचा अनुभव आहे. १९८८ मध्ये त्यांनी लोकमतमध्ये मेहकर तालुका प्रतिनिधी म्हणून कामास सुरुवात केली. १९९० मध्ये ते लोकमतचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी झाले. पुढे लोकमतची अकोला आवृत्ती सुरू होणार असल्याने त्यांची अकोला येथे बदली केली. या काळात तत्कालीन संपादकिय प्रमुखांच्या गैरहरीत ते संपादकिय प्रमुख म्हणून सर्व काम पाहात असत. तसेच अकोला, बुलडाणा आणि वाशिम हे हॅलो पेजही त्यांनी प्रत्यक्ष त्या-त्या जिल्ह्यात काम करून सुरू केले. तिन्ही जिल्हा कार्यालयाचा सेटअप करून दिला. पुढे लोकमतने त्यांची नागपूरला बदली केली. त्यानंत वर्धा आणि भंडारा या जिल्ह्याचा सेटअप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. तीही त्यांनी यशस्वी पार पाडली. त्यामुळे अकोला आवृत्तीचा देशमुख यांना अभ्यास आणि पूर्व अनुभव आहे. आता ते नागपूर कार्यालयात असतात. चोपडे आणि मांडवलकर हेही लोकमतमध्ये ज्येष्ठ आहेत. चंद्र्रपूर, यवतमाळ येथे त्यांनी काम केले आहे. सध्या दोघेही नागपूर कार्यालयात असतात. या तिघांपैकी तत्कालीन संपादकिय प्रमुख अविनाश दुधे यांच्या बदलीनंतर एकाची अकोला येथे संपादकिय प्रमुख म्हणून वर्णी लागणार होती. पण प्रेमदास राठोड यांना संधी देण्यात आली. आता पुन्हा या त्रिमुर्तीच्या नावाचा विचार होत आहे. पण या तिघांपैकी नेमकं अकोल्याला कुणाला पाठविले जाते याकडे लक्ष लागून आहे.

.

गांवकरी व्यवस्थापनाने 'बेरक्या'ला पाठविलेला खुलासा

आमच्या ब्लॉगवर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध ‘नाशिक गांवकरीची अवस्था बिकट‘ या मथळ्याखालील मजकुराबाबत गांवकरी व्यवस्थापनाने 'बेरक्या'ला पाठविलेला खुलासा -

आमच्याकडून सोडून गेलेले कर्मचारीच ‘गांवकरी’ची बदनामी करत आहेत.  ‘गांवकरी’ने आजपर्यंत सर्व कर्मचार्‍यांना आपले समजून त्यांच्याशी दीर्घकाळ बांधिलकी जपली आहे.

आपल्या ब्लॉगवर असेही म्हटले आहे की इतर दैनिकांच्या तुलनेत गांवकरी स्पर्धेत मागे पडला आहे, असे काही नसून आम्ही नवनवीन आव्हानांना समोर ठेऊन वेगवेगळे प्रयोग करत आहोतच. आमची प्रतिस्पर्धी दैनिके नाशकात आली असली तरी ‘गांवकरी’ बद्दल वाचकांना विशिष्ट प्रेम आहेच. लेआऊट सुधारून प्रिंटींगही चांगली करण्याचा प्रयत्न करत आहोत. पगाराच्या बाबतीत म्हटले तर आर्थिक संकटात  सापडल्याने थोडे अनियमित आहेत, पण तेही नियमित करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

पीटीआय सांभाळणारे अनिल दिक्षीत यांना मोठ्या पागाराची नोकरी हवी असल्याने ते सोडून गेले, दीपक रत्नाकर हे दररोज 2-3 तास उशिरा कामावर येत होते. उशिरा येऊन अंकालाही उशीर करत होते. सतत कर्मचार्‍यांशी उद्धट बोलणे, कर्मचार्‍यांना नाहक त्रास देणे असे प्रकार ते करत असल्याने ‘गांवकरी’ व्यस्थापन त्यांच्यावर तीव्र नाराज होते. त्यांना समज देऊनही त्यांच्या वर्तनात फारसा बदल झाला नाही. महापालिकेचे वार्ताहर म्हणून नियुक्ती केलेल तुळसीदास बैरागी हे वर्षातून निम्मे दिवस गायब असायचे, कामावर यायचे नाहीत. ‘गांवकरी’च्या नावाखाली बाहेर दहशत पसरवायचे. तसेच त्यांच्याकडे लाखो रुपयांची माया असल्याने त्यांना नोकरीची गरज नव्हती. रात्री रात्री बाहेर दंगा करायचे, अशा पद्धतीची पत्रकारिता ‘गांवकरी’च्या परंपरेला हानीकारण ठरत असल्याने त्यांना काम बंद करण्यास सांगितले. संतोष लोळगे हे क्राईमचे रिपोर्टर आहेत पण त्यांची प्रकृती ठिक नाही म्हणून त्यांना आता कामात रस नसल्याने त्यांनी  कामावर येणे बंद केले... यात ‘गांवकरी’ व्यवस्थापनाची काय चूक?

दीपक रत्नाकर, बैरागी यांचे गोपनीय अहवाल जर पुढे आणले तर त्यांना कोणत्याही दैनिकात नोकरी मिळणार नाही. ते जरी आमच्याकडे परत येत असले तरी आम्ही त्यांना पुन्हा नोकरी देणार नाही. एवढे लोक सोडून गेले असले तरी ‘गांवकरी’चा अंक दर्जेदार निघत आहे. आम्ही चांगला मजकूरूही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे इतर दैनिकांचा फारसा आमच्यावर परिणाम झाला नाही.
...........................................................

संतोष लोळगे यांचा खुलासा
दै गांवकरीच्या बातमीत माझ्याबाबत सातत्याने चुकीचा उल्लेख होत आहे...प्रकृती ठीक नसली तरी मी इमानेइतबारे काम करीत होतो मात्र कार्यकारी संपादक तनपुरेच्या कार्यपध्दतीविरूध्द आवाज उठवून मी संपादक वंदनराव पोतनीस यांना सांगून रजेवर आहे.माझा उल्लेख आपण जेव्हा करतात तेव्हा त्यावरील माझा खुलासा टाकणे न्यायाला धरून होईल.
संतोष लोळगे
9850097274
.............................................................
बेरक्या ब्लॉगवर प्रसिध्द झालेल्या बातम्याबाबत संबंधितांना खुलासा करायचा असल्यास त्याचे स्वागतच आहे. मात्र खुलासा नाव आणि सहीसह अधिकृत ई-मेलवरून पाठवावा लागेल.

रविवार, २६ मे, २०१३

'जय महाराष्ट्र'ला जनतेचा 'जय महाराष्ट्र'...

मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेले जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सध्या तरी फ्लॉप झाले आहे. मंदार फणसे, तुळशीदास भोईटे, रवी आंबेकर हे त्रिकुट काही तरी चमत्कार करेल,ही अपेक्षा फोल ठरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू होवून एक महिना होत आहे.हे चॅनल व्हिडीओकॉन डीटीएच सोडून अन्य डिशवर दिसत नाही.तसेच अनेक शहरात केबलवरही दिसत नाही.चॅनल सुरू होण्यापुर्वी सर्व केबल ऑपरेटरशी करार करणे गरजेचे असताना,ते न केल्याने हे चॅनलचे बहुतांश लोकांना अजूनही दर्शन झाले नाही.मार्केटींग आणि वितरणमध्ये हे चॅनल कमी पडले आहे.
ज्यांना चॅनल दिसले तेही समाधानकारक नाहीत.पिच्चर क्लॉलिटी अत्यंत डल्ल आहे.ग्राफीक्स बरोबर नाही.त्यामुळे हे चॅनल लोकांच्या मनात भरत नाही.तसेच मुळ म्हणजे बॅकअप नाही.
पुर्वीचे स्टार माझा आणि आताचे एबीपी माझाला स्टार न्यूजचे आणि आता एबीपी न्यूजचे बॅकअप आहे.झी २४ तासला झी न्यूजचे,आय.बी.एन.लोकमतला आयबीएन ७ चे बॅकअप आहे.मात्र जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला कोणाचेही बॅकअप नाही.त्यामुळे हे चॅनल अडचणीत सापडले आहे.जोपर्यंत एखाद्या नॅशनल चॅनलचे बॅकअप मिळत नाही,तोपर्यंत या चॅनलला मोठा सामना करावा लागणार आहे.
ऑफीसमधील वातावरण वरवर चांगले असले तरी दोन गटांत शीतयुध्द आहे. टीव्ही ९ मधून आलेल्या तुळशीदास भोईटे आणि त्यांच्या समर्थकांना भडक बातम्या तर आय.बी.एन.लोकमतमधून आलेल्या मंदार फणसे, रवी आंबेकर यांना शांत बातम्या हव्या आहेत.नेमक्या कशा बातम्या द्याव्यात,या कात्रित हे चॅनल सापडले आहे.
टेक्नीकल स्टॉफ अत्यंत रदाड आहे.८ ते १० हजार रूपयांवर काही टेक्नीकल स्टॉफ नियुक्त करण्यात आला आहे.त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा कशा पुर्ण होतील.काही कॅमेरामनही चांगले नाहीत.एखाद्या लग्नाची शुटींग करणारे कॅमेरामन भरती करण्यात आले आहेत.रिपोर्टरवी टीम चांगली असली तरी टेक्नीकल स्टॉफ चांगला नसल्यामुळे स्टो-या चांगल्या लागल्या जात नाहीत.
रात्री ९ वाजता संपादक मंदार फणसे यांचा लक्षवेधी कार्यक्रम असतो.मंदारचे संभाषण कौशल्य चांगले नाही.त्यांचे सारखे - सारखे आं...आं...हे पॉज घेणे लोकांना खटकते. हा कार्यक्रम अत्यंत रटाळ असतो.काही न्यूज अँकर सोडले तर अँकरही चांगले नाहीत.
या सर्व बाबीमुळे जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये गेलेले अनेकजण  नाराज झाले आहेत.अगोदरच चॅनलची मोठी बदनामी झाली आहे.त्यात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अनेकांची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी झाली आहे.

जाता - जाता : राज्यात अनेक महत्वाच्या ठिकाणी ब्युरो नेमण्यात आले आहेत.मात्र त्यांना अजूनही ऑफीस करून देण्यात आलेले नाही.तसेच टेलिफोनची लीज लाईन उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यांना फुटेज FTP करून पाठवावे  लागतात. गंमत म्हणजे दिल्लीच्या स्टोऱ्या आणि फुटेज तर कुरियरने पाठविले जाते.मग कशा लागतील अर्जंट स्टोऱ्या...
..............................

मुंबई - मंदार फणसे यांनी सुरू केलेल्या भारत 4 इंडिया मधील कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यापासून पगार नाही.
कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून फणसे गेले जय महाराष्ट्रात आणि आता भारत 4 इंडिया मधील कर्मचारीही करणार जय महाराष्ट्र...

शनिवार, २५ मे, २०१३

लोकमतचे सतिश सुदामे यांचे निधन

औरंगाबाद - लोकमतचे मुख्य उपसंपादक सतिश सुदामे (वय ५७ ) यांचे रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल लोकमत परिवारातील अनेकांनी शोक प्रकट केला आहे.लोकमतला गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा धक्का आहे.
सुदामे शहरातील कांचननगर भागात राहतात.शनिवारी घराच्या गच्चीवर चढून,आंब्याची कैरी तोडत असताना, तोल जावून ते २५ फूट खाली जमिनीवर कोसळले होते.या दुर्घटनेत त्यांचे हात - पाय फॅक्चर होवून,डोक्यासही मार लागला होता. त्यांना उपचारासाठी एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.उपचार चालू असतानाच,रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
सुदामे गेल्या २५ वर्षापासून लोकमतमध्ये होते.त्यापूर्वी पाच वर्षे मराठवाडा आणि लोकविजय दैनिकात होते.पत्रकारितेच्या ३० वर्षाच्या कारकिर्दपैकी २५ वर्षे त्यांनी लोकमतमध्ये घालविली.मुंबई,जालना आणि औरंगाबाद येथे त्यांनी काम केले.त्यांचा स्वभाव मनमिळावू होता.सुदामे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली (एक विवाहित), एक मुलगा आहे.
'लोकमत'मधील सेवेची २५ वर्षे त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. 'लोकमत'च्या औरंगाबाद व मुंबई आवृत्तीत त्यांनी विविध पदांवर काम केले. जालन्याचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी विशेष ठसा उमटविला होता. 'देई बा विठ्ठला' या त्यांनी लिहिलेल्या अभंगवाणीला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी स्वरसाज चढविला होता. उर्दू शायरी, गजल हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांचा 'मौसम' हा गजल संग्रहही प्रसिद्ध झाला आहे.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दर्डा यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. खा. चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसभेचे सूत्रसंचालन नंदकुमार घोडेले यांनी केले. 
सहा महिन्यापुर्वी लोकमतचे उपसंपादक विलास इनामदार यांचे रेल्वे अपघातात निधन झाले होते.सुदामे यांचेही अपघाती निधन झाल्याने लोकमतला दुसरा धक्का बसला आहे.
कै.सतिश सुदामे यांना भावपुर्ण श्रध्दांजली....  
............................................................

मनाला चुटपूट लावणारे इनामदार आणि सुदामे....
 

गेल्या सहा महिन्यात लोकमतची दोन माणसे अपघातात गेली.एक विलास इनामदार आणि दुसरे सतिश सुदामे.दोघांचाही मृत्यू मनाला चुटपूट लावणारा आहे.
सहा महिन्यापुर्वी इनामदार तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते.रेल्वेने येताना एका ठिकाणी रेल्वे थांबली. रेल्वे थांबली म्हणून इनामदार पाणी आणण्यासाठी खाली उतरले आणि रेल्वे सुरू झाली.रेल्वे सुरू झाल्यानंतर इनामदार पळत जावून रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला आणि पाय निसटून ते खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी सतिश सुदामे यांचाही अपघाती मृत्यू झाला.शनिवारी घराच्या गच्चीवर उभे राहून आंब्याची कैरी तोडत असताना, ते 25 फुट खाली पडले आणि गंभीर जखमी होवून रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
इनामदार हे लोकमतमध्ये उपसंपादक तर सुदामे मुख्य उपसंपादक होते.दोघेही मनमिळावू स्वभावाचे. कोणाच्या फंदात न पडणारे. आपण भले आणि आपले काम भले म्हणणारे. त्यामुळे दोघांचा मृत्यू मनाला चुटपूट लावणारा आहे.
इनामदार पाणी आणण्यासाठी खाली उतरले नसते तर....सुदामे कैरी तोडायला गेले नसते तर...पण अश्या जर-तरच्या प्रश्नांना नियतीपुढे उत्तरे नसतात.मृत्यू केव्हा आणि कधी येईल हे सांगता येत नाही.
हे दोघे आमच्यात नसले तरी आमच्या सतत स्मरणात राहतील.

शुक्रवार, २४ मे, २०१३

अकोला न्यूज एक्स्प्रेस ...

अकोला - देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले यांचा राजीनामा...टाले हे पोहरेंचे फॅमिली मेंबर....राजीनामा परत घेणार की अन्य पेपरला जाणार,याबाबत उलट - सुलट चर्चा...

अकोला - सकाळचे संपादकीय प्रमुख म्हणून सचिन काटे अकोल्यात...सकाळमधील पडझड रोखण्यासाठी काटेंवर जबाबदारी...

अकोला - डी.एम.च्या पार्श्वभूमीवर लोकमतचे संपादकीय प्रमुख प्रेमदास राठोड यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.राठोड एक दिवस मुंबईत राहिले आणि रजा टाकून पुन्हा अकोल्यात आले आहेत.राठोडबाबत बाबूजी काय निर्णय घेतात याकडे लक्ष...
- लोकमतचे नवे संपादकीय प्रमुख गजानन जानभोर सोमवार दि.27 मे रोजी अकोल्याचा पदभार स्वीकारणार आहेत.
 


 ..........................................................................................

मीडियातील प्रत्येक बातमीवर बेरक्याची नजर आहे...कोणतीही बातमी दबणार नाही किंवा दबली जाणार नाही...त्यासाठी बेरक्या कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे...
त्यासाठी वाचत रहा - पत्रकारांचा पाठीराखा : बेरक्या उर्फ नारद 

मी मराठी : भिक नको पण कुत्रा आवर

मुंबई - राज्यातील मी मराठीच्या स्ट्रिंजर रिपोर्टरचे गेल्या दीड वर्षापासून मानधन आणि बिले थकली असून, मानधन मागितले असता,काम करू वाटले करा अन्यथा साडून द्या, अशी धमकी मँनेजमेंटकडून दिली जात आहे.त्यामुळे या स्ट्रिंजर रिपोर्टरना  भिक नको पण कुत्रा आवर म्हणण्याची पाळी आहे.
राज्यात मी मराठीचे राज्यात जवळपास 40 स्ट्रिंजर रिपोर्टर आहे.त्यांचे दोन वर्षापासून मानधन आणि बिले थकली होती.बेरक्याने मध्यंतरी वृत्त दिल्यानंतर त्यांना सहा महिन्याचे मानधन मिळाले.आता उर्वरित दीड वर्षाचे मानधन मागितले असता,काम करू वाटले तर करा अन्यथा सोडून द्या म्हणून सांगितले जात आहे.
मी मराठीची मालकी पुर्वी कांचन अधिकारी यांच्याकडे होती.गेल्या वर्षभरापासून महेश मोतेवार यांच्याकडे आहे.मोतेवारचे अनेक उद्योगधंदे आहेत.मी मराठी केवळ एक दबाबतंत्र आहे.मोतेवार यांना स्ट्रिंजर रिपोर्टरच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.काही दिवसांपुर्वी पाच स्ट्रिंजर रिपोर्टरना कामावरून काढून टाकण्यात आले.आता अनेकांवर टांगती तलवार ठेवण्यात आली आहे.
मी मराठी 24 तास बातम्या सुरू करणार, ही केवळ अफवा आहे.त्यात कसलाही दम नाही.

गुरुवार, २३ मे, २०१३

पत्रकारांना पालिका रुग्णालयात मोफत उपचार देण्याची मागणी

मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिका रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळावेत अशी मागणी जर्नलिस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मुंबईचे महापौर सुनील प्रभू व पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाकडे अधिस्वीकृत पत्रकार म्हणून नोंद असलेल्या पत्रकारांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार घेण्याची सोय आहे. अशी सोय मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिकेकडून दिली जात नाही. महापौर सुनील प्रभू व आयुक्त सीताराम कुंटे यांनी लवकरात लवकर निर्णय घेवून शासनाप्रमाणे पालिकेमधील पत्रकारांना  रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत अशी मागणी जर्नलिस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्रचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम, भाजपा गटनेते दिलीप पटेल, मनसेचे गटनेते दिलीप लांडे, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यानाही देण्यात आले आहे.

डी. एम. मुळे अकोल्यात "कही ख़ुशी कही गम"

अकोला-  दिव्य मराठीने अकोल्यात आवृत्ती प्रकाशनाची जोरदार तयारी सुरु केली आहे.  संपादकीय विभागासाठी टीम तयार होत असून, अनेकांना ऑफर लेटर मिळाले आहेत. काहींना  अदयाप  ऑफर लेटर मिळालेले नसल्याने ते काळजीत पडले आहेत. काहींना मनाप्रमाणे पद तर काहीना अपेक्षेप्रमाणे वेतन देऊ केले असून काहींचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे अकोल्यातल्या पत्रकारामध्ये कही ख़ुशी कही गम अशी स्थीति निर्माण झाली आहे.
  मुख्य वार्ताहरपदी नवख्या सचिन देशपांडे यांची नेमणूक झाली आहे. लोकमत मधील अजय डांगे, सदानंद शिरसाट, नितीन कोंडलीकर, राजू चिमणकर, यांच्यासह सहा पत्रकारांना ऑफर लेटर देण्यात आले आहे. इतरांनी मात्र लोकमतच बरा म्हणत दिव्यकडे पाठ फिरविली आहे, सकाळमधून    मनीष जोशी, श्रीकांत पाचकवडे, श्रीकांत जोगळेकर,याच्यासह तिघांना डीएमने घेतले असून, देशोन्नती मधील आशिष गावंडे , सचिन राऊत यांना ऑफर लेटर देण्यात आले आहेत.   मटाचे वार्ताहर प्रबोध देशपांडे यांनाही  संधी मिळाली आहे.  
 पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल माहोरे यांनी पद आणि वेतनाची अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे डीएम मध्ये जाण्याचे टाळले आहे.  पुरुषोत्तम आवारे पाटील यांना दिव्यमध्ये संधी मिळाली नसून, सकाळचे वरिष्ठ वार्ताहर  विशाल राजे यांनीही डीएम कडे पाठ फिरविली असल्याचे वृत्त आहे, मुळचे अकोला जिल्ह्यातील असलेले आणि सकाळ, लोकमत मार्गे पुढारीत गेलेले मंगेश देशमुख यांना वृत्त संपादक किवा मुख्य उपसंपादक पदाची अपेक्षा असताना त्यानाही दुसऱ्याच पदाची ऑफर देण्यात आल्यामुळे तेही दिव्यपासून लांबच राहिले आहेत.  एकंदरीत अकोल्यासाठी दिव्य मराठीने निवडलेली संपादकीय टीम फारशी मजबूत दिसत नाही. पत्रकारितेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या जेष्ठ, अनुभवी पत्रकारांची निवड करण्यापेक्षा संपादक अभिलाष खांडेकर यांनी नव्या किवा कमी अनुभव असलेल्यांना झुकते माप दिल्याचे दिसते ,  अकोला शहर कार्यालयासाठी करण्यात आलेल्या नियुक्त्या बघता त्यामध्ये पत्रकारितेमध्ये नाव गाजविलेल्या धडाडीच्या अनुभवी पत्रकारांपेक्षा नव्या चेहऱ्यांना किवा कमी अनुभव असलेल्यांचा भरणा अधिक आहे.  अश्या परिस्थितीत दिव्य मराठीला लोकमतशी टक्कर देणे अशक्य दिसत आहे.  कारण लोकमतमध्ये अनुभवी पत्रकारांची संख्या दिव्याच्या तुलनेत अधिक असून, अकोला शहर कार्यालयात लोकमत अधिक एक-दोन दमदार पत्रकारांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे  डीएम समोर मोठे आव्हान आहे.  सकाळी रिपोर्टरची संख्या वाढविणार असल्याचे वृत्त आहे.  एकंदरीत डीएमने नेमलेल्या पत्रकारांच्या नावावर नजर टाकली तर  अनेकांची लायकी नसूनही त्यांना संधी मिळाली असल्याचे दिसते, दुसरीकडे अनेक चांगल्या पत्रकारांना संधीच देण्यात आली नसून, काहींना त्यांना नको असलेल्या पदाची ऑफर देण्यात आल्यामुळे अकोल्यातल्या पत्रकारांमध्ये काही ख़ुशी कही गम अशी स्थिती आहे…।
राऊत यांना टाळण्यासाठी अनेकांची फिल्डिंग !
अकोला -  अकोल्याच्या पत्रकारितेत गेल्या काही वर्षापासून अतिशय घाणेरडे प्रकार सुरु आहेत, आपल्यापेक्ष्या सरस ठरणाऱ्या आणि उत्तम कागीरीच्या जोरावर पत्रकारितेत लौकिक प्राप्त करणाऱ्या पत्रकाराला खोट्या तक्रारी करून बदनाम करणारे एक टोळकेच अकोल्यात सक्रिय आहे.  याच टोळक्याने गत 16 वर्षापासून अकोल्यात पत्रकारितेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अविनाश राऊत यांना काहीनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.  राऊत याच्यावर जळणाऱ्या काही तोडीबाज पत्रकारांनी खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे.  काही  त्यांच्या मुळावर उठले असल्याचे काही कारवयावरून  दिसते. अकोला सेक्स स्कडल सारखी अनेकानेक प्रकरणे उजेडात आणून सतत चर्चेत राहिलेल्या राऊत यांची दिव्य मराठीमध्ये नेमणूक होऊ नये यासाठी काही पत्रकार देव पाण्यात बुडउन बसले आहेत. कारण राऊत यांची नेमणूक झाल्यास ते पुन्हा चर्चेत येतील आणि आपण मागे पडू अशी भीती त्यांना असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध खांडेकर यांच्याकडे खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. अभिलाष खांडेकर यांनी राऊत यांना अकोल्यातील मुलाखती होण्यापूर्वी  चर्चेसाठी बोलाविले होते. तेव्हा त्यांना  32 हजार दरमहा वेतन आणि मुख्य उप संपादक पद देण्याचे ठरले होते. त्यावेळी आपल्याला रिपोर्टिंग मध्ये इंटरेस्ट असून आपली नियुक्ती शहर कार्यालयात करावी अशी विनंती त्यांनी खांडेकरांना केली होती. त्यावर ठीक आहे बघतो, असे खांडेकरांनी राऊत यांना सागितले होते.  अकोल्यात मुलाखती आटोपल्या नंतर अनेकांनी काड्या  करून चक्रे फिरविली, अविनाश राऊत यांच्या बाबत खोट्या तक्रारी केल्या, परिणामी खांडेकरांनी त्यांना प्रेसवर मुख्य उपसंपादक पदावर रुजू होण्याचे सांगितले आहे… मात्रं  राउत यांना डेस्कवर काम करायचे नसल्याने त्यांनी अद्याप काहीच निर्णय घेतला नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.  एकंदरीत काही चांडाळ पत्रकार अविनाश राऊत सारख्यांची वाट लावण्याच्या तयारीत असल्याचे दिसते
 .............................

बुलडाणा - डी.एम.चे बुलडाणा ब्युरो चिफ म्हणून निलेश जोशी यांची निवड...निलेश जोशी सध्या औरंगाबादच्या पुण्यनगरीत कार्यरत...

अकोल्यात रंगणार तिरंगी सामना

अकोला - १५ ऑगस्ट किंवा तत्पुर्वी अकोल्यात दिव्य मराठी अर्थात डी.एम.सुरू होणार आहे.त्यानंतर अकोल्यात देशोन्नती,लोकमत आणि दिव्य मराठी असा तिरंगी सामना रंगणार आहे.
डी.एम.साठी निवासी संपादक म्हणून गजानन जानभोर यांना निमंत्रण होते,मात्र जानभोर यांनी नकार दिल्यामुळे डी.एम.ला चांगला निवासी संपादक अजूनही सापडला नाही.त्यामुळे सध्या औरंगाबादेत डी.एम.मध्ये वृत्तसंपादक असलेल्या देविदास लांजेवारवर संपादकीय जबाबदारी सोपाविण्यात येणार माहिती बेरक्याकडे प्राप्त झाली आहे.लांजेवार अकोल्यात आल्यास डी.एम.मध्ये भविष्यात मोठी डोकेदु:खी होणार आहे.त्यामुळे डी.एम.काय भूमिका घेणार,याकडे लक्ष वेधले आहे.
डी.एम.च्या पाश्र्वभूमीवर लोकमतने चांगला बदल केला आहे.वादग्रस्त प्रेमदास राठोड यांना तातडीने मुंबईला हलवून,त्यांच्या जागी गजानन जानभोर यांना नियुक्त केले आहे.जानभोर तीन दिवस अकोला,तीन दिवस नागपूर आणि एक दिवस सुट्टीवर राहणार आहेत.अकोल्यात लोकमतचे अनेक संपादकीय प्रमुख आले आणि गेले,मात्र जानभोरची कारकिर्दच सर्वांना लक्षात राहणारी ठरली आहे.म्हणूनच त्यांच्या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले आहे.
लोकमतने आणखी एक बदल म्हणजे लेआऊट चेंज केला आहे.तो दिव्य मराठीशी मिळता - जुळता आहे.दिव्य मराठी सुरू झाल्यानंतर कोण - कोणाची कॉपी करतोय,या संभ्रमात वाचक पडतील.तसेच लोकमतने अंकाची किंमत दोन रूपये करून,मोठे आव्हान निर्माण केले आहे.
लोकमतने डी.एम.च्या पाश्र्वभूमीवर अनेक बदल आणि योजना आखत असताना,  देशोन्नती मायभूमी असलेल्या अकोल्यातच शांत आहे.खरे तर देशोन्नतीने सर्वाधिक काळजी आणि बदल करायला हवे होते.देशोन्नतीचे अनेक उपासंपादक,रिपोर्टर दिव्य मराठीच्या वाटेवर आहेत.आम्ही शेतक-यांचे कैवारी आहोत,वाचक,शेतकरी केवळ देशोन्नतीच घेतील,असा भ्रम प्रकाश पोहरे यांना आहे.हा भ्रमाचा हा भोपळा दिव्य मराठी सुरू झाल्यानंतर फुटणार आहे.
लोकमतने दिव्य मराठीत जाणा-या रिपोर्टर आणि उपसंपादकांना थोपविण्यासाठी पगारवाढ करण्याची गरज आहे.तसेच प्रेमदास राठोड यांच्यामुळे दु:खावलेल्यांची समजुत काढण्याची गरज आहे.
दिव्य मराठीच्या अभिलाष खांडेकरांनी भरती करताना,काही विशिष्ठ जातीस प्राधान्य दिले आहे.हा त्यांचा आत्मघात ठरणार आहे.पुरोगामी महाराष्ट्रात जाती - पातीची बिजे आता चालणार नाहीत,हे खांडेकरांना कोणी तरी समजून सांगण्याची गरज आहे.
लोकमतच्या दर्डा शेठनी कधीच जात - पात पाहिली नाही,म्हणूनच लोकमतची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.डी.एम.चा मालक अग्रवाल शेठ करोडो रूपये खर्च करीत आहेत.मात्र खांडेकरांसारखा जातीयवादी माणूस हे रूपये पाण्यात घालत आहे.डी.एम.ला महाराष्ट्रात भक्कमपणे उभे राहायचे असेल तर खांडेकरांची तातडीने अन्य राज्यात उचलबांगडी करण्याची गरज आहे.
खांडेकरांजवळ औरंगाबादेत एक चमचा बसला आहे.हा चमच्या सॅटेलाईट एडिटर असल्याचे सांगतो.त्याने खांडेकरांचे कान फुंकून अनेकांचे नुकसान केले आहे.या चमच्याचा समाचार बेरक्या लवकरच घेणार आहे.खांडेकर गेल्यानंतर त्याचीही उचलबांगडी अटळ आहे.

विकास देशमुख वाशिमचे ब्युरो चिफ

वाशिम - सकाळ,लोकमत नंतर एकमत असा प्रवास करून, विकास देशमुख पुन्हा एकदा वाशिमला येत आहेत.डी.एम.साठी त्यांची वाशिम ब्युरो चिफ म्हणून निवड झाली आहे.
गेल्या 9 वर्षापासून पत्रकारितेत असलेले विकास देशमुख सध्या लातूरच्या एकमतमध्ये गेल्या सहा महिन्यापासून काम करीत आहेत.एकमतपुर्वी ते लोकमतच्या वाशिम कार्यालयात चार वर्षे उपसंपादक म्हणून काम केले होते.
पत्रकारितेची उत्तम जाण आणि जबरदस्त लिखाण असणारे विकास देशमुख डी.एम.ला वाशिम ब्युरो चिफ म्हणून लाभल्यामुळे वाशिमकरांत आनंद व्यक्त केला जात आहे.
विकास देशमुख यांच्या डी.एम.च्या वाटचालीस बेरक्याच्या शुभेच्छा...

............................................................................


अमरावती - अमरावतीसाठी डी.एम.ची टीम अशी...
ब्युरो चिफ - सुरेंद्र चापोरकर (सकाळ)
रिपोर्टर - प्रेमदास वाडकर,नारायण भारती,रवींद्र खांडेकर (पुण्यनगरी),रवी लोखंडे (लोकमत),नितीन भट्ट (सकाळ)
प्रेस फोटोग्राफर - मनिष जगताप (लोकमत)

अकोला डी.एम.साठी कॉम्प्युटर ऑपरेटरची टीम तयार...

अकोला - डी.एम.साठी कॉम्प्युटर ऑपरेटरची टीम तयार झाली असून,खालील ऑपरेटरांना ऑफर लेटर देण्यात आले आहे.
1.गोपाल दांदळे - देशोन्नती - २४,०००
2.राम देशपांडे - लोकमत - २२,०००
3.सोपान खिराडे - सकाळ- १८,०००
4.मनोज वाकोडे - सकाळ -१७,०००
5.राजु बोरकुटे - पुण्यनगरी- १५,०००


अकोला - डी.एम.साठी फोटोग्राफर म्हणून निरज भांगे आणि प्रवीण ठाकरे यांची निवड झाली असून,त्यांना 1 जून पासून जॉईन होण्यास सांगण्यात आले आहे. 

 अकोला - लोकमतचे रिपोर्टर अजय डांगेला डी.एम.चे ऑफर लेटर मिळाले.दरमहा 22 हजार प्रमाणे एक वर्षाचे पॅकेज आहे. 
...............................

लोकमतचे उपसंपादक सदानंद सिरसाठ यांना बारा वर्षांत जे लोकमतने दिले नाही ते डीएमने एका मुलाखतीत दिले. चांगलं पॅकेजही दिलं. शिवाय वरिष्ठ उपसंपादक हे पदही. दरम्यान, त्यांनी थांबावं म्हणून प्रेमदास राठोड यांनी त्यांना वरिष्ठ उपसंपादक पदाचे अमीष दाखविले आहे. आता सिरसाट जातात की थांबतात याकडे लक्ष.
.......
लोकमतचे राजू चिमणकर यांनाही डीएममध्ये उपसंपादक म्हणून ऑफर लेटर. चिमणकर मागील पाच वर्षांपासून लोकमतमध्ये कार्यरत. पूर्व अनुभव असताना लोकमतमध्ये सुरुवातीच्या दोन वर्ष त्यांना ऑर्डरच मिळाली नव्हती. त्यामुळे दोन वर्ष अल्प पगारात लोकमतने त्यांना राबवून घेतले. पण चिमणकर यांनी प्रामाणिकपणे काम सुरूच ठेवले. पत्रकारातून वंचितांना न्याय दिला. त्यांचा प्रामाणिकपणा आणि मेहनत याचे आज चीच झाले आहे.


अकोला -  देशोन्नतीचे सचिन राऊत यांना बातमीदार म्हणून ६ जूनपर्यंत दिव्य मराठीत रुजू होण्याचे सांगितले.

सोमवार, २० मे, २०१३

साईप्रसाद मीडिया सुरू करणार मराठी वृत्तवाहिनी आणि साप्ताहिकबड्या माध्यमसमूहांच्या प्रतिथयश साप्ताहिकांच्या भाऊगर्दीत आक्रमक, बिनधास्त-बेधडक असे ‘हमवतन' साप्ताहिक प्रकाशित करणारा उत्तरेतील साईप्रसाद मीडिया लवकरच मराठी वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक सुरू करणार आहे. ‘हमवतन'ने यंदाचा सर्वोत्कृष्ट वृत्तसप्ताहिकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. साईप्रसाद मीडिया समूहातर्फे ‘हमवतन' साप्ताहिकाव्यतिरिक्त न्यूज एक्स्प्रेस ही  वृत्तवाहिनीही चालविली जाते. हिंदीत स्थान पक्के केल्यनंतर साईप्रसाद मीडिया समूहाने मराठी वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक या माध्यमातून भाषिक विस्ताराच्या कार्यक्रमाची योजना आखली आहे. नुकतेच साधना न्यूजमधून समूह संपादकपदाचा राजीनामा दिलेले वरिष्ठ पत्रकार एसएन विनोद 22 मे रोजी साईप्रसाद मीडिया समूहात रुजू होत आहेत. त्यांच्याकडे मराठी वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक तसेच भाषिक विस्ताराची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्यादोन महिन्यात मराठी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण सुरू व्हावे, अशी कंपनीची योजना आहे.

 

साईप्रसाद मीडिया समूह माध्यमाव्यतिरित वीजनिर्मिती, अन्न-प्रक्रिया उद्योग, सॉफ्टड्रींक्स उत्पादन, पायाभूत सुविधा, वित्तव्यवहार, रिअल इस्टेट अशा अनेक क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून भक्कम पाय रोवून आहे. देशातील वृत्तवाहिन्यांच्या गर्दीत न्यूज एक्स्प्रेस ही वृत्तवाहिनी सुरू करताना देशातील पहिले हायडेफिनेशन टेलिकास्टिंग सुरू करण्याचा मान या समूहाने मिळविला. नेहमीच्या प्रक्षेपणापेक्षा अशा प्रक्षेपणाला चारपट अधिक गुंतवणूक करावी लागते. साईप्रसाद मीडिया समूहाने टीव्ही पत्रकारितेचे प्रशिक्षण देणारी न्यूज एक्स्प्रेस मीडिया अकादमी ही संस्थाही सुरू केली आहे.

वरिष्ठ पत्रकार एसएन विनोद हे महाराष्ट्राला परिचित आहेत ते ‘देशोन्नती'चेसमूह संपादक म्हणून. त्यांनीच ‘देशोन्नती'चे हिंदी दैनिक ‘राष्ट्रप्रकाश' लॉंंंच केले होते. ‘प्रभात खबर' या नावाजलेल्या हिंदी दैनिकाचे संस्थापक-संपादक ही त्यांची खरी ओळख. याशिवाय नवभारत आणि ‘इंडिया न्यूज'सह अनेक माध्यमसमूहात वरिष्ठ पदांवर विनोद यांनी काम केले आहे.

रविवार, १९ मे, २०१३

दिव्य मराठीच्या मुलाखतीसाठी सकाळचे सर्वजण हजर

अमरावती - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे. या आवृत्तीच्या अमरावती ब्युरो कार्यालयासाठी रविवार ( दि.19 मे ) रोजी स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी मुलाखती घेतल्या.नागपूर रोडवरील हॉटेल गौरी इनमध्ये पार पडलेल्या या मुलाखतीसाठी सकाळचा सर्व संपादकीय चमू हजर हजर होता.यावरून सकाळमध्ये किती असंतोष खदखदत आहे,याची प्रचिती आली.
दिवसभरात जवळपास 40 जणांनी मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले.मुलाखती देणाऱ्यामध्ये सकाळचे सात जण, लोकमतचे दोघे, पुण्यनगरीचे तिघे उपस्थित होते.अमरावती ब्युरो चिफसाठी सकाळचे सुरेंद्र चापोरकर, सामचे माजी प्रतिनिधी संजय पाकोडे, लोकमतचे माजी जिल्हा प्रतिनिधी कुमार बोबडे, तरूण भारतचे जिल्हा प्रतिनिधी शिवराय कुलकर्णी आदींनी मुलाखती दिल्या.ब्युरो चिफ पदावर सकाळचे सुरेंद्र चापोरकर यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुलाखतीसाठी सकाळच्या संपादकीय विभागाचे सातहीजण उपस्थित होते.दोन प्रुप रिडरही सोबत आले होते.याचा अर्थ सकाळमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत असून, आता दिव्य मराठीत सकाळच्या किती जणांची वर्णी लागते,याकडे लक्ष वेधले आहे.

ता.क. - स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी मुलाखतीस आलेल्या प्रत्येकास जात विचारल्याने ते जातीयवादी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

बुधवार, १५ मे, २०१३

जळगावातील छायाचित्रकारांची 'मनसे'कडे लाचारी

सध्या जळगावातील पत्रकारिता या ना त्या कारणाने चर्चेत आहे. जळगावात पत्रकारांपेक्षा चालती आहे ती  छायाचित्रकारांची! 'बेरक्या'कडे आलेल्या एका यादीनुसार, जळगावातील सर्व वृत्तपत्रांच्या  छायाचित्रकारांनी अलीकडेच जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची जंगी सभा यशस्वीरित्या,'ललित'पूर्णरीत्या आयोजित करून दाखविणारया तरुण कार्यकर्त्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची 'बक्षिसी' स्वीकारली आहे. पाकिटाचा हा व्यवहार एका आघाडीच्या खासगी बँकेतील नोकरी सोडून राजकीय कार्यकर्त्याकडे नोकरीचा 'योग' स्वीकारणारया विश्वासू माणासामार्फ़त पार पडला. या विश्वासूने दोन मुख्य वृत्तपत्रांच्या पत्रकारांना यापेक्षा २५ पट मोठे पाकिट देउ केले होते. पण 'मनसे'च्या प्रसिद्धीच्या कंत्राटाचे हे काम दोघा पत्रकारांनी नाकारले. आता  छायाचित्रकारांना दरमहा एक हजाराचे पाकिट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आता 'आरटीओ' पाठोपाठ जळगावात दरमहा पाकिट वितरीत करणारी 'मनसे' ही दुसरी 'पार्टी' तयार झाली आहे.
 'आरटीओ'च्या यादीतही बहुतांश वरचीच सर्व माणसे आहेत. फक्त तिथे पत्रकारांची एक स्वतंत्र यादी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नि:पक्ष-निर्भीड आणि भ्रष्टाचारमुक्त पत्रकारितेचा दावा करणारया 'डीएम'मधील माणसे या व इतरत्रही यादीत असणे हा म्हणजे फारच मोठा विनोद आहे. 'डीएम'ची  दोघे माणसे या 'आरटीओ'च्या पत्रकारांच्या यादीत आहेत.  त्यातील एक मुरुमाच्या; गौण खनिजाच्या बातम्यांना गती देउन मध्येच थांबविणारा व तहसीलदारांकडून पुरेपूर 'वसुली' करणारा आहे. 'डीएम'ची जळगावातील पत्रकारिता 'कलंकित' होत चालली आहे. आव आणायचा, बडेजाव मिरवायचा आणि नंतर 'सेटलमेंट' करायची असा नवा खेळ सुरू झालाय. तहसीलदार कैलास देवरे व महापौर किशोर पाटील या दोघांना विचारले तरी 'डीएम'च्या नि:पक्ष आणि निर्भिडतेच्या चिंधड्या उडतील. उद्योजक रजनीकांत कोठारी यांच्या सुनेने एका निरपराध गरीब माणसाला कारने चिरडले  त्या प्रकरणात 'डीएम'ने नंतर शेपूट का घातले? कुणाच्या पदरी काय पडले? दोघा छायाचित्रकारांसोबतच कुणीकुणी 'केके'ची पाकिटे स्वीकारून प्रकरण दडपले? कोठारीच्या नाती, परिवाराची किती  छायाचित्रे 'डीएम'ने छापली? जळगावात दुसरे कुणी दिवाळीत रांगोळ्या घालीत नाही का? हा 'व्यवहार' कुणी घडवून आणलाय? त्यानंतर कुणाला कोठारींची  फोटोंची ऑर्डर मिळाली.  'डीएम'मध्ये नोकरी सांभाळून बाहेरची 'लाचारी' केलेली चालते का?

राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या बांभोरी अभियांत्रिकी कॉलेजात विद्यार्थ्यांचा छळ झाला. त्यात 'डीएम'वाल्यांनी काय सेटलमेंट केली. पहिल्या  दिवशी बातमी छापली मग फॉलोअप का नाही? तो का दाबला? 'डीएम'चे क्राईम रिपोर्टर आणि संपादक याचे उत्तर देतील का? संपादक केबिनबाहेर येवून 'डीएम'वाले जे काही घपले करताहेत, लूट करताहेत, खंडणी वसुलताहेत ते पाहणार आहेत की नाही? की काचेच्या चार भिंतीतच त्यांचा कारभार चालणार आहे. औरंगाबादमधील 'डीएम' वरिष्ठही जणू डोळे मिटून आहेत. त्यामुळे जळगावच काय सर्वत्र मांजरी दूध पिऊ लागल्या आहेत. महाराष्ट्राची 'डीएम' कडून फार अपेक्षा आहे; पण सध्या तरी त्यांचेही पाय मातीचेच! अशी स्थिती आहे. तेव्हा गड्या आपला 'लोकमत'च बरा. तो निदान  नीतीमत्तेच्या फुकाच्या गप्पा तरी मारत नाही. 'डीएम'ची गोष्ट म्हणजे आव पतिव्रतेचा अन धंदे बाजारबसवीचे असे झालेय. 'बेरक्या'लाच नव्हे तर सर्व महाराष्ट्राला बघायचेच आता कोणते वृत्तपत्र काय कारवाई करते ते. आमचे खुले आव्हान आहे की कुणीही आम्हाला यात तथ्य नाही, हे सिद्ध करून दाखवावे.

जळगावातील महाराष्ट्र टाईम्सच्या हालचालींसह बराच मसाला 'बेरक्या'कडे आहे. तो पुन्हा कधीतरी पाहू.

ता. क. : उद्योगपती रजनीकांत कोठारी यांच्या 'केके' कंपनीतून फक्त 'डीएम'च नव्हे तर वरील यादीतील सर्व छायाचित्रकारांनी पाकिटे स्वीकारली. याच मंडळीने दिवाळीत कोठारींसह जळगाव 'एलसीबी' व 'राष्ट्रवादी'च्या 'मामा'कडूनही वसुली केलीय. जळगावातील पत्रकारांची दिवाळी कोरडी आणि छायाचित्रकार मजेत अशी स्थिती होती. नितीमत्ता खालावलेला, बहिण मानून एका अविवाहित सहकारयाच्या भावी वधूलाच प्रपोज मारणारा एक चळ लागलेला प्रौढ, विवाहित छायाचित्रकार जळगावात आहे .  त्याला साथ देतोय तो पत्रकार बनून शिंग फुटलेला एक पूर्वाश्रमीचा छायाचित्रकार … या सर्व नीच, 'काळ्या' कृत्यांवर 'बेरक्या'चा प्रहार लवकरच ….

जाता - जाता : मनसेकडून पाकीटे घेणाऱ्या छायाचित्रकारांची यादी बेरक्याकडे उपलब्ध आहे.ती कधी तरी प्रसिध्द करू...

मंगळवार, १४ मे, २०१३

'सकाळ' पुणेच्या निवासी संपादकपदी नंदकुमार सुतार

पुणे - दै. 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीच्या निवासी संपादकपदी नंदकुमार सुतार यांची नेमणूक झाली आहे. त्यांनी सोमवारी पदाची सूत्रे स्वीकारली.

"सकाळ' माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी सुतार यांच्या नियुक्तीची घोषणा केली, "सकाळ' (पुणे)चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी त्यांचे स्वागत केले. सुतार हे 22 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. यापूर्वी ते दै. "पुढारी'च्या पुणे व नगर आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी पाच वर्षे कार्यरत होते. त्यांनी पत्रकारितेची सुरवात "सकाळ'मधूनच प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून केली. त्यांनी दै. "एकमत', दै. "लोकमत' या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर इत्यादी ठिकाणी काम केले. विज्ञान व तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान आणि समाजकारण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.

गुरुवार, ९ मे, २०१३

सुधाकरी जय महाराष्ट्र

‘जय महाराष्ट्र’ नावाचं मराठी चॅनेल महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू झालं आहे. कुठलंही चॅनेल सुरू होत असताना त्याचा जसा गाजावाजा होतो तसा या चॅनेलचाही झाला आहे. मात्र या चॅनेलचा गाजावाजा काहीसा टीकात्मक पद्धतीचा आहे. या चॅनेलची जुळवाजुळव सुरू असतानाच त्याबाबत चर्चा सुरू होती ती त्याच्या मालकाची. या चॅनेलचा मालक सुधाकर शेट्टी याच्यावर इंडियन एक्स्प्रेसने प्रकाश टाकला आणि हा विषय चव्हाट्यावर आला. बार, बांधकाम आणि मीडिया असा प्रवास करणार्या सुधाकर शेट्टी याचं कर्तृत्व तसं सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या. मीडिया कुणाच्या हातात जातोय याचीही गंभीर चर्चा सुरू आहे. ‘एकच प्याला’ मधील सुधाकर सगळ्यांनाच माहीत आहे, या सुधाकराने मात्र भल्याभल्या माणसांना आपल्या नादी लावलं आहे.
भारतात २४ तास बातम्यांचा रतीब देणार्या चॅनेलच्या संख्येत वाढ होतेय. भाषिक चॅनेलची संख्या वाढतेय. दक्षिणेत एकेका भाषेत ८ ते १० चॅनेल आहेत. मराठीतही आता कुठे चॅनेलची स्पर्धा सुरू झाली आहे. एका बाजूला गल्लोगल्ली, जिल्हा, तालुका पातळीवर वर्तमानपत्र नियतकालिकं निघतायत. या माध्यमांची ताकद ओळखून
ज्याला पत्रकारिता कशाशी खातात ते कळत नाही अशी माणसंही माध्यम मालक बनतायत. यातून लोकशाहीचा स्तंभ मजबूत होतोय म्हणायचं की त्याला सुरूंग लागतोय म्हणायचं, हा सवाल. ज्यांच्या हाती (कोणत्याही मार्गाने मिळवलेला) पैसा आहे तो जमेल तसं माध्यम आपल्या दावणीला बांधतोय. प्रमुख राजकारण्यांचा तर आपला स्वतःचा मीडिया आहे. बिल्डर आता मागे नाहीत. त्यांनीही माध्यमांत आपली गुंतवणूक चालवली आहे. खरं तर यात वावगं असं काही नाही. आता तो बिझिनेस आहे. नियमानुसार कुणालाही माध्यम सुरू करता येतं. मात्र त्याचा हेतू काय, कुणाचं हित जोपासलं जाणार, एवढाच कळीचा आणि मुळातला मुद्दा आहे. सेटर लोक कुणाचे पैसे कशात गुंतवतील याचा नेम नसतो. याचा वाईट परिणाम मीडियातील लोकांवर होऊ लागला याचं विदारक वास्तव ‘झी’- जिंदाल प्रकरणाने आपल्यापुढे आहेच.
सुधाकर शेट्टी याच्यासारखा बदनाम माणूस चॅनेल सुरू करणार ही बातमी सगळ्यांनाच धक्का देणारी असणं स्वाभाविक आहे. सुधाकर शेट्टी याच्या आधीच्या धंद्यांबाबत पुन्हा एकदा उजळणी करण्याची इथे गरज वाटत नाही. कुठलाही विधीनिषेध नसणारा असा हा बारवाला, सगळी अनैतिक कामं, गुन्हेगारी कृत्याचे आरोप त्याच्यावर आहेत. थेट दाऊदच्या लोकांसोबत त्याचं नाव जोडलेलं आहे. त्याने गेल्या काही दिवसांत जी काही मजल मारली आहे ती सगळ्यांनाच त्याच्यापुढे झुकायला लावणारी आहे. मुंबईतला सगळ्यात मोठा बिल्डर अशी त्याची ख्याती आहे. कुणाकुणाचा पैसा त्याच्याकडे आहे याची चर्चा सगळीकडेच होत होती मात्र त्याच्या नव्या चॅनेलच्या लाँचिंग पार्टीत जे नेत्याचं भूमंडल जमलं होतं त्याने त्यावर शिक्कामोर्तब केलं. मुख्यमंत्र्यांसह केंद्र-राज्यातील भले जाणते मंत्री, संत्री, पदाधिकारी यात हजर होते. धक्कादायक असा हा सगळा प्रकार होता.
‘जय महाराष्ट्र’ या चॅनेलचं उद्घाटन गँ्रड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालं. एखाद्या चॅनेलचा कार्यक्रम इतका लज्जास्पद आजवर झाला नसावा. मुळात या कार्यक्रमाची जाहिरात केली होती ती बॉलिवूड सितार्यांच्या रंगारंग कार्यक्रमाची. शरद पवार तिथे आले तेव्हा प्रियांका चोप्राची रिहर्सल सुरू होती. सगळा रागरंग पाहून आम्ही गेल्यावर काय तो कार्यक्रम करा, असं पवारांनी सुधाकर शेट्टीला सांगितल्याचं समजतं. बराच वेळ सर्व नेते पहिल्या रांगेत बसून होते. मग ‘जय महाराष्ट्र’ म्हणत श्रेयस तळपदे आणि अमृता पत्की या दोघांनी हिंदीतून सर्व कार्यक्रमात धिंगाणा घातला. कशाचा कशाला ताळमेळ नव्हता. कुणी कुठे बसायचं, कसं स्वागत करायचं यात सावळागोंधळ होता. चॅनेलच्या ऐन उद्घाटनाच्या वेळी तर तांत्रिक बिघाडही अक्षम्य होता. खरं तर हे चॅनेल ज्यांच्या खांद्यावर आहे त्या संपादकांना उद्घाटनाच्यावेळी मंचावर बोलावलं गेलं नाही. या प्रकाराने तिथे उपस्थित असलेले सगळेच पत्रकार आश्चर्यचकित झाले होते. हे असं का झालं असेल? कारण या कार्यक्रमात चॅनेलच्या उद्घाटनापेक्षा भर होता तो सुधाकर शेट्टी याच्या इमेजला प्रतिष्ठा देण्याचा.
‘जय महाराष्ट्र’ हे चॅनेलचं नाव सोडलं तर या कार्यक्रमात मराठीपणाचा लवलेशही नव्हता. कार्यक्रमासाठी आलेल्या बहुसंख्य माणसांना चॅनेलशी काही देणंघेणं नव्हतं. सहपरिवार मंचावर मिरवणार्या, मोडक्या हिंदीत बोलणार्या सुधाकर शेट्टीसाठीच ते टाळ्या वाजवत होते. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या राजकीय नेत्यांत मग सुधाकरगौरवाची जणू नशाच आली होती. महाराष्ट्रात आता सुधाकर शेट्टी नावाचा माणूस किती महत्त्वाचा आणि महाराष्ट्राच्या भल्याचा आहे याचं अश्लाघ्य गुणगान या नेत्यांनी गायलं. अर्थात या मागे अनेकांची अनेक गणितं आहेत. काही असो, या सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यातल्या एकाही नेत्याने या चॅनेलचे संपादक वा कार्यकारी संपादक यांचा उल्लेख करून त्यांना साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत, सगळे सुधाकर प्रेमात टुन्न झाले होते.
खरं तर या कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’ चॅनेलचे संपादक मंदार फणसे, कार्यकारी संपादक रविंद्र आंबेकर, तुळशीदास भोईटे यांना तसं काहीच महत्त्व नव्हतं. उपचार म्हणूनच सुरुवातीला त्यांना मंचावर काही मिनिटांसाठी बोलावण्यात आलं होतं. खरं तर बदनाम माणसाच्या चॅनेलमध्ये काम करावं की करू नये अशी चर्चा माध्यमकर्मींमध्ये सुरू आहे. सध्याचा मीडिया पाहता मुल्याधिष्ठीत पत्रकारिता करणार्यांना तसा माध्यम निवडीचा फारसा पर्याय नाही. त्यातल्या त्यात बरा मालक एवढाच काय तो भाग. तरीही एखाद्या पत्रकाराने कुणासोबत जावं हा त्याच्या विचार आणि निवड स्वातंत्र्याचा भाग आहे.
‘सामान्य माणसाच्या प्रश्नांशी आपली बांधिलकी असेल, प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या विरोधात आपण भूमिका घेऊ,’ असं मंदार फणसेंनी तिथे आपल्या मनोगतात सांगितलं. पण खरं तर एकूण सगळी परिस्थिती पाहता त्यांची मोठी परीक्षा आहे. या तिन्ही पत्रकारांना चॅनेलमधील कामाचा अनुभव आहे. मंदारने तर राजदीप सरदेसाई, निखिल वागळेंसोबत काम केलंय… ‘जय महाराष्ट्र’ या राजकारणात आधीच गुळगुळीत झालेल्या शब्दांची आणि पत्रकारितेची आब राखणं तसंच आपलं स्वातंत्र्य जपणं ही मंदार फणसे आणि त्यांच्या टीमची खरी कसोटी आहे.

 

साभार - कलमनामा

पुढारीच्या भरतीकडे पाठ...जागा पाच आणि माणसे चार... तेही नवखे ...

मुंबई - रंगिला औरंगाबादीची किर्ती संबंध महाराष्ट्रात माहीत झाल्यामुळे तसेच जुना अनुभव लक्षात घेवून पुढारीच्या भरतीकडे पत्रकारांनी चक्क पाठ फिरविली.जागा पाच आणि मुलाखतीसाठी केवळ चारजण हजर होते.गंमत म्हणजे सर्वच्या सर्व नवखे...हे पाहून आणि ऐकूण आता हसावे की रडावे,असा प्रश्न निर्माण झालाय.

महाराष्ट्राच्या मानबिंदूतून हकालपट्टी झाल्यानंतर रंगिला औरंगाबादी पद्मश्रींच्या पेपरमध्ये रूजू झाला.मात्र वृत्तीत काही बदल नाही.सुंभ जळेल पण पिळ कायम...लोकमतच्या कारकिर्दीत एकूण ५० ते ६० जण सोडून गेले,आता पुढरीतही तीच बोंब.आतापर्यंत बाराजण सोडून गेले.आता अनेकांना कॉल करूनही माणसेच मिळेनात.मग साहेबांनी आपल्या फेसबुक वॉलवर जाहिरात टाकली.परिणाम शुन्य.मग शेवटी गेल्या काही दिवसांपासून पुढारीत जाहिरात झळकू लागली.वृत्तसंपादक (जागा १), मुख्य उपसंपादक (जागा १), वरिष्ठ उपसंपादक (जागा २) आणि आर्टिस्ट (जागा १) अशा एकुण पाच जागा. काल दि.८ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते.किमान पदवीधर आणि पाच ते १५ वर्षाचा अनुभव असलेले पत्रकार हवे होते.
ही जाहिरात वाचून,पुढारीपुढे रांग लागेल,असा रंगिला औरंगाबादीचा कयास.साहेब पाच वाजता येण्याऐवजी नेहमीच्या थाटात साडेसहा वाजता आले, पहातात तर काय, इनीमिनी चार लोक.तेही सर्वच्या सर्व नवखे.एकालाही एकवर्षापेक्षा जास्त अनुभव नव्हता.एक अलिबागहून आलेला तर बाकी सारे स्थानिक पेपरमधून आलेले.चार पैकी एकही नामांकित दैनिकातील नव्हता.हे पाहून साहेबांचा चेहरा पार काळवंडला.काय करणार,किर्तीच तशी ना.
महाराष्ट्राच्या मानबिंदूत असताना,माणसांची किती गर्दी. दररोज किमान चार जण, सर प्लीज,माझे काम करा ना...म्हणून आग्रह.काही देखण्या तर सर,प्लीज,प्लीज म्हणून....(ओठांचा चंबू) जवळ येत असत. पण इकडे सगळीच मारामार...घर फिरले की घराचे वासे फिरतात,ते काही खोटे नाही.
असो, आपण मूळ विषयावर येवू....पुढारीत एकूण जागा पाच आणि माणसे चार.तेही वृत्तसंपादक,मुख्य उपसंपादक,वरिष्ठ उपसंपादक या जागेला लायक नसलेला.आर्टिस्टची तर बोंबच.मुखाखतीसाठी आलेले सर्वच ट्रेनि सबएडिटर म्हणून ठेवण्याच्या लायकीचे.मग काय, आता करा स्वत:च उपसंपादकांची ड्युटी....तुम्हाला शुभेच्छा...कार्यकारी संपादक सोडून उपसंपादक झाल्याबद्दल...

बुधवार, ८ मे, २०१३

ABP माझाचे ब्युरो ढापतात, स्ट्रींजरच्या स्टो-या...


नागपूर / औरंगाबाद - ABP माझाचे विदर्भातील  ब्युरो  स्ट्रींजर रिपोर्टच्या स्टो-या ढापत असल्याच्या तक्रारी बेरक्याकडे आल्या आहेत.हीच अवस्था मराठवाड्यातील स्ट्रींजर रिपोर्टरची आहे.त्यामुळे मेहनत करी मुर्गी और अंडा खाये फकीर म्हणण्याची वेळ आली आहे.
ABP माझा ची विदर्भ ब्युरो महिला आहे.ती नागपुरात बसून, विदर्भातील स्ट्रींजर रिपोर्टरला विषय देते.बिचारे स्ट्रींजर उन्हा - तान्हात जावून स्टो-यांचे शॉट घेतात,नंतर त्या स्टो-या ब्युरोकडे पाठवितात,पण दुर्देव असे की,त्यांच्या स्टों-या या महिला ब्युरो स्वत:च ढापत आहेत.बिचारे स्ट्रींजर रिपोर्टर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत आहेत.संतापाची बाब अशी की,अनेक स्ट्रींजर रिपोर्टर पाच वर्षापासून काम करीत असूनही त्यांना साधे ओळखपत्र देण्यात आले नाही.
हीच अवस्था मराठवाड्यातील स्ट्रींजर रिपोर्टरची आहे.ऐककाळी उस्मानाबादच्या बस स्टॅन्डवर एस.टी.डी.बुथवर काम करणारा आता मराठवाडा ब्युरो झाला आहे.तो मराठवाड्याच्या कोप-यात असलेल्या उस्मानाबादमध्ये बसून,मराठवाड्यातील स्ट्रींजर रिपोर्टरला पळवितो आणि त्यांच्या स्टो-या स्वत:च ढापत आहे,अशा तक्रारी आहेत...

जाता - जाता : मराठवाड्याचा स्टार रिपोर्टर मागे म.टा.त आलेली एक स्टोरी जशीच्या तशी ढापली.ऐवढेच काय अनेक इंग्रजी दैनिकात आलेल्या स्टो-या ढापत असल्याचे अनेकवेळा सिध्द झालेले आहे.

मंगळवार, ७ मे, २०१३

जय महाराष्ट्रच्या स्ट्रींजर रिपोर्टरवर उपासमारीची वेळ

मुंबई - सुधाकर शेट्टीचे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल १ मे रोजी सुरू झाले. हे चॅनल केवळ व्हीडीओकॉन डीटीएचवर दिसत आहे. अन्य डीटीएचवर अद्याप दिसत नाही.मुंबईसह राज्यातील अनेक केबल ऑपरेटरशी चर्चा न झाल्याने हे चॅनल अजूनही अनेक शहरात केबलवरही दिसत नाही.
गेल्या सात दिवसांत ज्यांनी चॅनल पाहिले,त्यांच्या प्रतिक्रिया समाधानकारक नाहीत.पिच्चर क्लॉलिटी एकदम अंधुक आहे. बातम्यांचे सादरीकरण योग्य नाही.स्क्रीनवर जे अक्षर येतात,ते अत्यंत लहान आहेत.ग्राफीक्स चांगले नाही,अशा एक ना अनेक वाईट प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.
स्ट्रींजर रिपोर्टरही या चॅनलबाबत बोंब मारीत आहेत.हे चॅनल १ मे रोजी लॉन्चिंग झाले असले तरी, अनेक स्ट्रिंजर रिपोर्टर गेल्या सात - आठ महिन्यापासून काम करीत आहेत. खिशातील पैसे घालून दीडशे ते दोनशे किलोमीटरचे अंतर कापायचे, शॉट घ्यायचे, स्टोरी तयार करायची आणि इंटरनेटवर तासन् तास बसून त्या चॅनलकडे पाठवायची...त्या स्टो-या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वेबसाईटवर वापरण्यात आल्या, पण प्रचंड मेहनत करूनही मानधन नाही की खर्च नाही. सुधाकर शेट्टी करोडपती असले तरी,बिचा-या स्ट्रिंजर रिपोर्टरच्या पदरात अजून एक दमडाही पडला नाही.
एका स्टोरीला किती पैसे देणार, खर्च देणार की नाही,याचा खुलासाही अद्याप करण्यात आला नाही.बिचारे स्ट्रिंजर रिपोर्टर याबाबत विचारणा केली तर पाहू, करू या मोघम उत्तरे देण्यात येत आहेत.त्यामुळे अनेक स्ट्रिंजर रिपोर्टर जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.

 जाता - जाता : सुधाकर शेट्टी यांनी बडेजावपणा करण्यासाठी दुष्काळग्रस्त निधी म्हणून मुख्यमंत्र्याकडे एक कोटी रूपयाचा धनादेश दिला.मात्र याच शेट्टींनी स्ट्रींजर रिपोर्टरच्या हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.

रविवार, ५ मे, २०१३

तोंडावरची चिकटपट्टी काढण्यापूर्वीच अकोल्यात वर्तमानपत्रांमध्ये किंमत युद्घ

अकोला : काही वर्षांपूर्वी अकोल्यात झालेले वर्तमानपत्रांमधील किंमत युद्घ शांत होऊन सर्व काही सुरळीत सुरु असताना एका मराठी दैनिकाच्या आगमनाची चाहुल लागताच पुन्हा एकदा हे युद्घ पेटले आहे. या युद्घात वाचकांची चंगळ होणार असून एक महिन्याच्या बिलात दोन महिने पेपर वाचायला मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे या युद्घामुळे कमी खप असणा:या वर्तमानपत्र संचालकांच्या पोटात गोळा उठला असून ही अयोग्य स्पर्धा असल्याचे मत व्यक्त होत आहे. 
कागदाच्या किंमती प्रचंड वाढल्याने वृत्तपत्र व्यवसायात मोठी अडचण निर्माण झाली आहे. वीजेचे वाढलेले दर व अन्य सर्वच बाबी महाग झाल्याने वर्तमानपत्रांच्या किंमतीही वाढल्या आहेत. तरीही वाचकांवर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून वर्तमानपत्रांची किंमत जाहिरातीतून काढण्यासाठी सर्वांची धडपड असते. सध्या असलेल्या वर्तमानपत्रांच्या किंमतीत कागद आणि छपाईचा खर्च निघत नसताना केवळ स्पर्धेमुळे पुन्हा एकदा किंमत युद्घ सुरु झाले आहे.
देशात क्रमांक १ असण्याचा दावा करणा:या वृत्तपत्र समुहाने गेल्या दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पदार्पण केले. या समुहाचे वर्तमानपत्र येत्या तीन महिन्यात अकोल्यातून सुरु होणार असून दोन दिवसांपासून तोंडावर चिकटपट्टी लावलेले होडॄग्स चौकाचौकात लागले आहेत. त्यांच्या तोंडावरची चिकटपट्टी काढून या वर्तमानपत्राची अधिकृत घोषणा त्या होडॄगवर होण्यापूर्वीच महाराष्ट्रात क्र.१ चा दावा करणा:या वृत्तपत्राने आपली किंमत शनिवारपासून अध्र्यावर आणली आहे. या स्पर्धेत वितरकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे कमीशन कायम ठेवण्यात आले असून वाचकांसाठी अन्य काही स्कीमही लवकरच जाहिर होणार आहेत. औरंगाबाद, जळगांव, उस्मानाबाद या ठिकाणी आवृत्त्या सुरु झाल्यानंतरअकोल्यात येणारे वृत्तपत्र कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ द्यायचे नाही असा चंग येथील वर्तमानपत्राने बांधला असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. किंमत कमी केल्यानंतर हॉकर्स मंडळीसोबत सतत संपर्क आणि जाहिरात एजंंसीसोबतही हे वृत्तपत्र सातत्याने संपर्क ठेऊन आहे. आपल्याकडील कर्मचारी ईकडेतिकडे जाऊ नाहीत म्हणून सर्वांनीच त्यादृष्टीने फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. काहींनी पगारवाढीचे तर काहींनी पदोन्नतीचे आमीष दाखवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत दुर्लक्षित झालेला अमरावती विभागातील वृत्तपत्र सुष्टीतील कर्मचारी आता एकदम उजेडात आला असून त्याच्या श्रमाला योग्य मोबदला मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
दरम्यान, कमी खपाच्या वृत्तपत्र संचालकांच्या पोटात या स्पर्धेमुळे गोळा उठला आहे. रेड्यांच्या टक्करीत आमचा चुराडा व्हायला नको अशा भावना काही जण व्यक्त करीत आहेत. या स्पर्धेमुळे कर्मचारी, वाचक, जाहिरातदार यांची चंगळ होईल एवढे मात्र निश्चित.
 

शनिवार, ४ मे, २०१३

मु.पो.अकोला...

* बुलडणाचे जिल्हा प्रतिनिधी हे अकोला लोकमतमधील स्टार रिपोर्टर आहेत. बाळासाहेब कुलकर्णी, गजानन जानभोर  आणि अविनाश दुधे या तिघांच्या जवळचे ....त्यांना  बाळासाहेब कुलकर्णी  यांनी नागपूर पुण्यनगरीत सिटी चिफ म्हणून रुजू होण्यास सांगितले होते २८ हजार रुपये पगारावर....पण ते रुजू झाले नाहीत. आताही अकोला येथे तीन जिल्ह्याचे संपादकीय प्रमुख म्हणून रुजू होण्याची ऑफर आहे पुण्यनगरीची.... पण ते डीएमची वाट पाहून आहेत....

* अकोला लोकमतचे सिटी चिफ राजू ओढे हे चार महिन्यापूर्वी औरंगाबादेत खांडेकर यांची भेट घेऊन आले आहेत.त्याचबरोबर अजय डांगे, मनोज भिवगडे,  नितीन गव्हाळे,राजू चिमणकर हेही डी.एम.साठी इच्छुक आहेत.

-  सदानंद सिरसाट आणि राजरत्न सिरसाट हे दोघेही लोकमत प्रेमी आहेत. ते  डी.एम.साठी इच्छुक नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की जे आहेत, त्यांनी सोडून जावे म्हणजेच लोकमतमध्ये आपण सिनिअर होऊ....

* लोकमतचे उपसंपादक डॉ. किरण वाघमारे हे पुण्यनगरीसाठी अविनाश दुधे यांच्या संपर्कात आहेत.

* वाशिम कार्यालयात कार्यरत असलेले उपसंपादक नागेश घोपे यांना सध्याही पुण्यनगरीची ऑफर आहे. . पण ते डीएमची वाट पाहात आहेत.


* लोकमतमध्ये नितीन कोंडुलीकर 8-10 वर्षांपासून एमआडीसीत काम करतात. पहिले पान पाहतात. खूप हुशार, मेहनती, प्रामाणिक आहेत. पण अजूनही अर्धवेळ उपसंपादक आणि अर्ध वेळ बातमीदार असेच पद आहे त्यांचे. संपादकाचे सर्वच गुण आहेत. त्यांच्यात; पण लोकमतने कधी त्यांनी साध वरिष्ठ उपसंपादकसुद्धा केलं नाही. त्यामुळे नाराज आहेत.डी.एम.ने स्वत:हून विचारल्यास जाण्यास तयार आहेत.

* लोकमतचे अकोट मोडेम प्रमुख नीलेश पोटे हेसुद्धा खूप वैतागले आहेत. सुरुवातीला अकोट वरून त्यांची अकोला, तिथून खामगाव परत अकोला आणि पुन्हा अकोट अशी बदली केली. त्यामुळे वैतागून गेलेत. कृषी क्षेत्राचा खूप अभ्यास आहे त्यांना.. तेही इच्छुक आहेत.

* लोकमतचे रिसोड तालुका प्रतिनिधी विश्वजित सरनाईक, कारंजालाडचे देशोन्नती शहर प्रतिनिधी संजय खांडेकर हेसुद्धा इच्छुक आहेत. डीएमसाठी. विश्वजित सरनाईक १९९८ मध्ये.लोकमतचे पहिले वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.. जाहिरातीमध्ये बाप माणूस आहे.

 * लोकमतचे अकोला,बुलडाणा आणि वाशिम तालुक्यातील अनेक तालुका वार्ताहर डी.एम.साठी इच्छुक....लोकमतच्या ज्या कर्मचा-यांचे डीएममध्ये जमणार नाही ते कर्मचारी दुधे  नेतृत्वात पुण्यनगरीत रुजू होतील. पण लोकमतला सोडण्याच्या मार्गावर आहेत हे निश्चित.

* बाळासाहेब कुलकर्णी यांना मानणारेही अनेक जण आहेत व-हाडात. त्यांच्या एका शब्दांवर गाव खेड्यातील वार्ताहर पुण्यनगरीत रुजू होऊ शकतात; पण अजून कुलकर्णी यांनी पुण्यनगरीसाठी आपले वजन का खर्ची केले नाही हे कोडेच आहे.....

गुरुवार, २ मे, २०१३

अकोल्यात १५ ऑगस्टला फडकणार डीएमचा झेंडा...

अकोला : डीएमच्या अकोला आवृत्तीची तारीख निश्चित झाली असून, १५ ऑगस्टला अकोला आवृत्तीचा झेंडा फडकणार आहे. त्या दृष्टीने अकोला महानगरात सर्वच होर्डिंग झळकले आहेत. शिवाय १०० जणांची कंपेनर टीमसुद्धा सज्ज झाली आहे. त्यामुळे देशोन्नती आणि लोकमत या दोघांचेही धाबे दणाणले आहेत.
डीएमची अकोला आवृत्ती अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांपुरती राहणार आहे. शिवाय यामध्ये अमरावती जिल्हासुद्धा घेण्याचा विचार सुरू आहे. हा परिसर म्हणजे देशोेन्नतीचा बाल्लेकिल्ला आहे. दरम्यान, लोकमत येथेही क्रमांक एकवर आहे. पण डीएम येणार असल्याने या दोन्ही पेपरचे धाबे दणाणले आहेत.

बुधवार, १ मे, २०१३

थोडक्यात महत्वाचे...

मुंबईहून लवकरच प्रसिद्ध होणार असलेल्या हिंदी दैनिकाचा संपादक चक्क मराठी माणूस आहे .
भोपाळ, इंदूर ,सागर उज्जैन आणि रायपूर येथून प्रसिद्ध होणारे हिंदी दैनिक दबंग दुनिया मे अखेर मुंबईतून प्रसिद्ध होणार आहे त्याचे संपादक
म्हणून श्री नीळकंठ पारटकर काम पाहतील . पारटकर मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद चे रहिवासी आहेत, त्यांचे बालपण व शिक्षण मध्य प्रदेश च्या जबलपूर शहरांत झाले,सन १९ ८ ० साली ते नागपूरच्या तरुण भारत ,नागपूर पत्रिकेचे जबलपूर चे वार्ताहर होते नंतर दैनिक देशबंधु ते पी टी आय असा प्रवास करून त्यांनी २ ० १ १ मध्ये मेट्रो ७ डेज नावाचे   हिंदी   दैनिक मुंबईतून सुरू केले. पारटकर हे निवडणूक विशेषज्ञ व न्यूज कंटेंट तज्ञ  आहेत  
....................
 

पुणे - सकाळमध्ये एक वर्षापासून विद्यार्थी बातमीदार म्हणून काम करणाऱ्यांना मानधनात वाढ नाही...तुटपुंज्या मानधनावर बिचारे राबताहेत....दुसऱ्या वृत्तपत्राची जाहिरात आली की, पगारवाढीचा अर्ज करण्यात सांगण्यास येते.चारदा अर्ज करूनही मानधनात वाढ नाही...
.............................

मुंबई- प्रहारचे उपसंपादक संजय सोनवणे यांच्यावर प्रहार....अंतर्गत राजकारणामुळे राजीनामा...
.............................

मुंबई - लोकसत्ताचे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर यांना पदोन्नती, आता झाले मुख्य संपादक...
...................................


परभणी -  जिल्ह्यातील सोनपेठ येथील सकाळचे वार्ताहर सुधीर बिंदू यांना आज राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत रोठोड यांनी बेदम मारहाण केली आहे.राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी जिलानी कुरेशी यांची निवड या मथळ्याखाली बातमी सकाळमध्ये छापली गेली होती.त्यात राठोड यांचा उल्लेख होता.या बातमी मुळे संतप्त झालेल्या राठोड यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास सुधीर बिंदू यांच्यावर हल्ला चढविला.या हल्लयात बिंदू गंभीर जखमी झाले आहेत.
.................................

अहमदनगर - येथील सायं दैनिक समाचारमध्ये बारा लाखाचा अपहार केल्याप्रकरणी माजी व्यवस्थापक गायकवाड याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.... 
.......................

पुणे - पुढारीचे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांची पद्मश्रीला सोडचिठ्ठी...सकाळच्या वाटेवर... 
.............................

औरंगाबाद - पुढारीच्या औरंगाबाद कार्यालयात काम नसल्याने वृत्त संपादक भालचंद्र वैद्य यांची मुंबईला बदली.. 

फेसबुक वर शेअर करा

Facebook